Maharashtra Marathi News Live | नामदेव जाधव यांच्यावर शाई फेक, राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली जबाबदारी
Maharashtra Mumbai Marathi News Live : आज शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : मुंबईतील लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस स्थानकात त्यासाठी गुरुवारी रात्री आले होते. मुंबईकरांच्या पाण्याच्या दरात सरसकट ८ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जलसंधारण खात्याने दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहेत. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रविवार १९ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.. देश, राज्यातील आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर…
LIVE NEWS & UPDATES
-
नामदेव जाधव यांच्यावर शाई फेक, राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली जबाबदारी
पुणे : नामदेव जाधव यांच्यावर झालेल्या शाईफेकीची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या घटनेची जबाबदारी घेतली आहे. आम्ही त्यांना इशारा दिला होता आणि आम्ही त्याच्या तोंडाला काळ फासले असे प्रशांत जगताप म्हणाले.
-
बाळासाहेबांना निश्चितच आनंद झाला नसेल, स्मृतिस्थळाजवळील वादावरून सुरेशदादा जैन यांची खंत
जळगाव : दोन्ही गटाचे शिवसेनेचे बाळासाहेबांना मानतात. मात्र, या शिवसैनिकांनी एकमेकांमध्ये भांडू नये अशी माझी अपेक्षा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमध्ये जो वाद झाला. त्यामुळे बाळासाहेबांना निश्चितच आनंद झाला नसेल आणि ते असते तर हा वादच झाला नसता किंवा ही परिस्थिती ओढवली नसती. दोन्ही बाळासाहेबांच्या विचारांची माणसे अशा पद्धतीने जर भांडत असतील तर ते निश्चितच योग्य नाही असे मत माजी आमदार सुरेश जैन यांनी व्यक्त केले.
-
-
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, एकाही कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली नाही
मुंबई : दरवर्षी देशाचे पंतप्रधान दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा हे आपण पाहतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी ६ – ७ कलमी कार्यक्रम जाहिर केला. काश्मिरचा चेहरा बदलेल असं जाहिर केलं. त्यातील एकाही कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली नाही. स्थिती गंभीर आहे. सामान्य माणूस संकटात, अडचणीत असेल त्याबद्दल तुम्ही पाठिशी राहिलात. तर सामान्य माणसाला प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.
-
बच्चू कडू यांनी केली भुजबळ यांच्यावर टीका
अमरावती : छगन भुजबळ हे मंत्री आहे. त्यांनी तेव्हाच बोलायला पाहिजे होतं. हा विषय जाहीर सभेतला नाही. कॅबिनेट बैठकीत मांडायला पाहिजे होता. महाराष्ट्रमधील हे पहिलंच उदाहरण आहे. एकाच व्यासपीठावर राज्याचा विरोधी पक्ष नेता आणि सरकारमधील मंत्री इतके विचित्र चित्र कधीच पाहिलं नाही, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केलीय.
-
माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव- आदित्य ठाकरे
माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यावर भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये टाकणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
-
-
प्रकाश आंबेडकरांकडून सहकार्याची अपेक्षा- भुजबळ
कोणाचंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यावर छगन भुजबळ यांनी सहकार्याची अपेक्षा केली आहे. आमचा आक्रोश काय आहे? ते समजून घ्यावं असंही भुजबळ म्हणाले.
-
काळं फासल्याच्या घटनेला रोहित पवार जबाबदार- नामदेवराव जाधव
नामदेव जाधव यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केला आहे. या घटनेला रोहित पवार जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली जाईल.
-
भाजपच्या गैरकृत्यांमुळे सर्वत्र निवडणुका हरतील – राम गोपाल यादव
उत्तर प्रदेशातील इटावा येथील मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणाले की, मला आशा आहे की भाजपच्या गैरकृत्यांमुळे सर्वत्र निवडणुका हरतील.
-
काळं फासल्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो- प्रशांत जगताप
नामदेवराव जाधव यांनी पुरावे नसताना शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. पण कोणताही पुरावा दिला नाही. तसेच अपशब्द वापरणं काही थांबवलं नाही, त्यामुळे आम्ही काळं फासलं असं शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
-
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं
नामदेव जाधव पत्रकारांना प्रतिक्रिया देण्यासाठी आले होते. पण शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्या दाखवल्यावर कुणबी नोंद असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचा रोष व्यक्त करत पुण्यात नामदेव जाधवांना काळं फासलं.
-
राजस्थानमधून काँग्रेसच्या प्रस्थानाची उलटी गिनती सुरू – पंतप्रधान मोदी
नागौरमध्ये पीएम मोदी म्हणाले की, आज मला दोन मोठे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. प्रथम वीर तेजाजी मंदिराला भेट दिल्यानंतर आता जनता जनार्दनला भेट देत आहे. राजस्थानमधून काँग्रेसच्या बाहेर पडण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे.
-
भांडारकर इन्स्टिस्ट्यूटसमोर पोलीस बंदोबस्त
नामदेवराव जाधव यांच्या कार्यक्रमावरुन वाद पेटला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटने त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या कार्यक्रमाच्या बुकिंगचे पैसे त्यांना परत केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी इन्स्टिट्यूटसमोर बंदोबस्त वाढवला आहे.
-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली चिंता व्यक्त
सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या परिस्थितीवरून ज्येष्ठ समाजकारण अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली. हे बरोबर नाही. यामुळे द्वेष निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. एका देशात, राज्यात आणि तालुक्यात सगळ्या प्रकारची लोक राहतात. तुम्ही एकमेकांच्या विरोधात अपप्रचार करत असाल तर नुकसान कोणाच आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.
-
नामदेवराव जाधव घेणार पोलिसांत धाव
नामदेवराव जाधव यांच्या कार्यक्रमाला भांडारकर इन्स्टिट्यूटने परवानगी नाकारली. त्यांना बुकिंगचे पैसे परत केल्याचा दावा इन्स्टिट्यूने केला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. याप्रकरणात जाधव हे आता थेट पोलिसांत धाव घेणार आहेत. ते डेक्कन पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
-
भारतच जिंकणार यंदाचा विश्वचषक, पुण्यात ज्योतिषाची भविष्यवाणी
19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होत आहे. हा सामना भारतच जिंकेल अशी भविष्यवाणी पुण्यातील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. मारटकर यांनी यंदाच्या विश्वचषकातील संपूर्ण सामने भारत जिंकणार असं भविष्य ऑक्टोबर महिन्यातच वर्तवलं होतं, असा त्यांचा दावा आहे.
-
पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
मराठा आरक्षणावर मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. भुजबळांच्या भूमिकेशी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी फारकत घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचा पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी सांगितले. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे भूमिका जाहीर करावी अशी विनंती त्यांनी केली. भुजबळ जे भूमिका मांडताहेत ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचा सूरही या बैठकीत लावला गेला.
-
धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक
मराठा,ओबीसी नंतर आता धनगर समाजाची आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. 18 डिसेंबरला सकल धनगर समाजाकडून नागपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात एक लाख धनगर बांधव सहभागी होतील. परभणीत सकल धनगर समाजाने याविषयीची बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
-
भुजबळ साहेबांना हे शोभत नाही- आमदार संजय गायकवाड
काऊंटर आंदोलन करून दोन समाजांत वाद निर्माण करण्याचे काम भुजबळ साहेब करत आहेत, ते दुर्दैवी आहे. राज्यातील एका जबाबदार मंत्र्याला हे शोभत नाही. मंत्री मंडळात सुद्धा निर्णय झालेला आहे. ज्याच्या नोंदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र द्यायचे, असे आमदार आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
-
दुकानात निघाला हिरवा साप, मोठी खळबळ
कल्याण पश्चिमेत किराणा दुकानात हिरवा साप निघाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. हरण टोळ जातीच्या या सापाला पाहून परिसरात धावपळ. सर्पमित्र दत्ता यांनी रेस्क्यू करत सापाला केले निसर्गमुक्त.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक
झोपडपट्टी पुनर्वसन विषयावर सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रेमनगर विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व सांताक्रुझ-खार (पूर्व) येथील शिवालिक व्हेंचर्स या विकासकाच्या प्रकल्पाबाबत बैठकीत होणार चर्चा
-
डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन व मानपाडा पोलीस ॲक्शन मोडवर
डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन व मानपाडा पोलीस ॲक्शन मोडवर. डोंबिवली परिसरात गुटका विकणाऱ्या पान टपरीवर धाडी टाकल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करत नऊ जणाला घेतले ताब्यात
-
Chagan Bhujbal : संभाजीराजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाही – छगण भुजबळ
संभाजीराजे यांनी मनोज जरांंगे यांना आरक्षणासाठी पाठिंवा दर्शविल्यानंतर छगण भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी राजे तुम्ही फक्त एकाच समाजाची बाजू कशी उचलू सकता असा सवाल त्यांनी विचारला आहे.
-
Chagan Bhujbal : आम्ही कुठलाही विरोध करत नसताना जाळपोळ केली- छगण भुजबळ
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी कधीच विरोध केला नाही फक्त ते आरक्षण कोणाचेही आरक्षण न काढता देण्यात यावे इतकीच इच्छा होती. आंदोलनादरम्यान केलेल्या जाळपोळीवर छगण भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
-
Chagan Bhujbal : कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या- भुजबळ
छगण भुजबळ यांची इगतपूरीमध्ये जाहिर सभा सुरू आहे. मराठा आरक्षण या मुद्यावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही असं भुजबळ यावेळी म्हणाले.
-
Chagan Bhujbal : इगतपूरीमध्ये छगण भुजबळ यांची सभा
नाशिक जिल्ह्याच्या इगतपूरीमध्ये छगण भुजबळ यांची सभा सुरू आहे. यावेळी आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं छगण भुजबळ म्हणाले.
-
Maratha Reservation : उदयनराजे यांच्या निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतली आहे. उदनराजे यांच्या निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी जमलेली आहे. भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली आहे.
-
Maratha Reservation : मनोज जरांगे उदयनराजेंच्या भेटीला
मनोज जरांगे पाटील आज उदयनराजे भोसले यांच्या भेटीला सोलापूरात पोहोचले आहे. जलमंदिर पॅलेस निवासस्थानी जरांगे उदयनराजेंच्या भेटीला आले आहेत. उदयनराजे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
-
मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
काही लोकांना कुणबी म्हणून आरक्षण घ्यायला कमीपणा वाटतोय. परंतू शेतीलाच कुणबी शब्द होता. शेती करायला कशाला लाजायचं. कुणबीला विरोध करून इतर लेकरांवर अन्याय करु नका. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण एक इंच मागे हटणार नाही असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील सातारा येथील सभेत केले आहे.
-
मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळायला हवे – मनोज जरांगे पाटील
24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. 24 तारखेला सरकार आरक्षण देणार परंतू नाही तर आपण आहोतच. परंतू शांततेने काम करायचं. अर्धे मंत्रिमंडळ कामाला लागलंय, आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. मराठा ओबीसीतच येणार दुसरीकडे आम्ही आरक्षण घेणार. ज्या जातीच्या पुरावे सापडले. आमच्यात येऊ नका का म्हणताय. आम्ही ओबीसीत आहोत असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सातारा येथील भाषणात सांगितले.
-
आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार – मनोज जरांगे पाटील
आमचं आरक्षण असताना दिलं नाही, मराठ्यांना दोन अंग आहे. मराठा क्षत्रिय आहे लढतो आणि शेतीही करतो. मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. यांनी यांच्या बुडा खाली पुरावे लपवून ठेवले. त्यावेळी पुरावे नाहीत असं सांगितले मग आता कसे सापडले. सत्तर वर्षांपासून नुकसान केले आहे. आमचें सत्तर वर्षांचा बॅगलॉग कसा भरुन काढणार ते सांगा असे सातारा येथील सभेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती करावीच लागेल- संजय राऊत
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. आरक्षणासंदर्भात घटनादुरुस्ती करावीच लागेल. सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रात नेण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
-
गर्दी जमते म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मालक नाहीत; प्रवीण दरेकरांचा टोला
“ओबीसी नेते एक झाले आहेत पण कुणीही त्या समाजाचं पालकत्व घेतल्यासारखी भाषा करू नये. मग ते भुजबळ असू देत किंवा जरांगे पाटील असू देत. समाज – समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम कोणी करू नये. अराजकता माजवू नये. गर्दी जमते म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मालक नाहीत. अन्यथा अशा मेळाव्यात उपस्थित राहायचं की नाही याचा समाजही विचार करेल,” अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी टीका केली.
-
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
“भाजपने तीन ओबीसी नेत्यांना अंबरच्या मेळाव्यासाठी पाठवलं हे आम्हाला माहीत नाही. याची मला कल्पना नाही. तो पंकजा मुंडे यांचा दावा आहे. त्यांनी त्या सभेला जायचं की नाही हा त्यांचा अधिकार होता. त्या समाजाच्या मोठ्या नेत्या आहेत. पंकजाताई नाराज असल्याच्या वावड्या नेहमीच उठवल्या जातात. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करता कामा नये,” असं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय.
-
उद्धव ठाकरे – आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही- प्रवीण दरेकर
“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. विकास कामाचा रिचार्ज उद्घाटन झाल्यानंतरच ते जनतेच्या सेवेमध्ये सुरू करण्यात येतो. हा नियम आहे. तुम्ही जर कायदाच मानणार नसाल आणि कायदा हातात घेऊन वातावरण खराब करण्याचं काम करत असाल तर त्यानुसार कारवाई होते. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे. जर असं वागायला लागलात तर इतरही लोकांचं धाडस वाढेल आणि बजबजपूरी माजेल,” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
-
पंढरपूर : छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचं दहन
पंढरपूर : मंत्री छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सकल मराठा समाजाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचं दहन करण्यात आलं. छगन भुजबळ यांनी काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सकल मराठा समाजाने आंदोलन केलंय.
-
अंजली दमानिया यांना सांताक्रूझ पोलिसांनी घेतलं ताब्यात
अंजली दमानिया यांना सांताक्रूझ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंजली दमानिया या छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र पत्रकार परिषदेपूर्वीच सांताक्रूझ पोलिसांनी अंजनी दमानिया यांना ताब्यात घेतलं आहे. छगन भुजबळांविरोधात दमानिया काहीतरी खुलासा करणार होत्या. त्या भुजबळांच्या घरी जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखलं. सध्या अंजली दमानिया यांना जुहू पोलीस ठाण्यात आणलं आहे. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
-
Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ
मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस खबरदारी घेताना दिसत आहेत. भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलिसांची गस्त…
-
Live Update : छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा नेते आक्रमक
छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा नेते आक्रमक झाले आहेत. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य खपवून घेणार नाही.. असं देखील नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.
-
Live Update : अंजली दमानिया यांना पोलिसांनी भुजवळांच्या घराबाहेर रोखलं
छगन भुजबळ यांच्या कालच्या भाषणानंतर आज मी त्यांच्या घरासमोर जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र पोलिसांनी बंदोबस्त असल्याचं चित्र माझ्या समोर आलं. तरी देखील मी पत्रकार परिषद घेईल. मी छगन भुजबळ विरोधात खुलासा करणार आहे… असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
-
Live Update : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर बंदची हाक
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर बंदची हाक पुकारण्यात आली आहे. यासाठी पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे.
-
Live Update : ‘विखे पाटील शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत…’
विखे पाटील शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत… असा आरोप प्रशांत बंब यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असं देखील प्रशांत बंब म्हणाले आहेत.
-
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात वाहतूक कोंडी
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीतील सलग दुसरा विकेंड आहे. दिवाळी भाऊबीज संपल्यानंतरही मुंबईतुन मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर जात आहेत.
त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली असून 2 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
-
ज्यांच्याकडे सत्ता आहे ते विषारी वक्तव्य करत आहेत – मनोज जरांगे
ज्यांच्याकडे सत्ता आहे ते विषारी वक्तव्य करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली. राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले
-
पुणे – ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा बिघडली, तिघे अडकले
ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा बिघडली. डॉक्टर आणि नर्ससह तिघे अडकले.
अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर लिफ्ट पुन्हा सुरू. सुदैवाने मोठी जीवीतहानी टळली
-
कोणाच्या सांगण्यावरून आमच्यावर असं कलम लावलं ? सचिन अहिर
कोणाच्या सांगण्यावरून आमच्यावर असं कलम लावलं ? सचिन अहिर यांनी असा सवाल विचारला.
आम्ही लोतांच्या हितासाठी पूल खुला करण्याची भूमिका घेतली. लोकांच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.
-
कराड – मनोज जरांगे पाटील यांचं कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगमावरील समाधीला अभिवादन
कराड – मनोज जरांगे पाटील यांनी कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगमावरील समाधीला अभिवादन केले. त्यानंतर ते साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
-
माजगाव परिसरात अफजल रेस्टॉरंट परिसरात गोळीबार, कोणीही जखमी नाही
माजगाव परिसरात अफजल रेस्टॉरंट परिसरात गोळीबार करण्याक आला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
-
सोलापुरात छगन भुजबळ यांचा निषेध
सोलापुरात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला गेला. बार्शी तालुक्यातील मालवंडी गावामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला. छगन भुजबळ यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांनी यापुढे जरांगे पाटलांवर टीका बंद नाही केली, तर त्यांना तीव्र विरोध करण्याचाही इशारा दिला आहे.
-
काल जालन्यातील सभेनंतर छगन भुजबळ आज इगतपुरीत
काल अंबड येथून ओबीसी एल्गार परिषदेतून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. जरंगे पाटलांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले होते. आज इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे भुजबळ हे इगतपुरी तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा आणि भव्य शेतकरी मिळाला उपस्थित राहणार आहेत. त्यांना तालुक्यातून मराठा बांधवांचा मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज भुजबळ नेमक काय बोलताय या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
-
पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग
पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग कार्यक्रम होणार आहे. भाजपचे जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. येत्या २० पासून २२ नोव्हेंबर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मात्र सत्तेत असूनही अजित पवार गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमाला विरोध करणार आहेत. बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम महाराजांच अवमान केला आहे. त्यामुळे असा कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये, असं म्हणत अजित पवार गट विरोध करत आहे.
-
Maratha Reservation | छगन भुजबळ यांच्या पोलीस चौकशीची मागणी
छगन भुजबळांची पोलीस महासंचालकाकडे तक्रार होणार. छगन भुजबळांची पोलीस चौकशी करण्याची मागणी. त्यांच्या केबिनमध्ये बसलेल्या राऊतांच हॉटल जळणार हे छगन भुजबळांना कसं माहिती होतं ?. बीडची जाळपोळ ही छगन भुजबळांनी करायला लावली. त्यांनी मराठा समाजाच्या बदनामीचा कट रचला आहे. त्यांची नार्को टेस्ट करा आणि गुन्हा दाखल करा. मराठा समन्वयक योगेश केदार यांची मागणी. पोलीस महासंचलकाकडे करणार तक्रार
-
Shirdi News | शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
सलग सुट्ट्या त्यातच पहिला विकेंड असल्याने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. दिवाळी भाऊबीज सण साजरे झाल्यावर भाविकांची शिर्डीत गर्दी. पहाटे पासूनच शिर्डीतील रस्त्यांवर भाविकांची गर्दी. शहर परिसरातील सर्वच हॉटेल , रेस्टॉरंट फुल्ल. पुढील काही दिवस शिर्डीत राहणार भक्तांची मांदियाळी.
-
Pune News | सायरस पूनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी
सिरम इंस्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु आहेत. 17 तारखेला आला होता सौम्य हृदयविकाराचा झटका. त्यांना रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. रुग्णालयाचे सल्लागार अली दारुवाला यांची माहिती.
-
Pune News | पूर व्यवस्थानासाठी केंद्र सरकारकडून पुण्याला निधी
पूर व्यवस्थानासाठी केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला निधी. 250 कोटीची काम करता येणार. त्यासाठी केंद्र सरकार देणार निधी. अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट अंतर्गत मोठ्या शहरातील पूर व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. केंद्र सरकारने पुण्यासाठी 250 कोटी मंजूर केलेत.
-
Maharashtra News | ऊस दरवाढीचे आंदोलन चिघळले
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरु असलेले आंदोलन चिघळले आहे. कर्नाटकातील सीमा भागातून येणारा ऊस ट्रॅक्टर चंदगड परिसरात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवला. पेट्रोलचे गोळे टाकून ट्रॅक्टर पेटवला आहे. शिरोळ, हातकणंगले नंतर आता चंदगड आणि सीमा भागातही भागात ऊस दरासंदर्भात आंदोलन सुरु झाले आहे.
-
Maharashtra News | पुणे मेट्रोचे काम रुळावर
पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गच काम आता रुळावर आले आहे. या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. २३ किमीच्या मार्गावर आता खांब उभारणीनंतर रूळ टाकायला सुरुवात झाली आहे. या मार्गावर सध्या पुणेकरांना वाहतूक कोंडींचा प्रचंड सामना करावा लागत आहे.
-
Maharashtra News | झोपडपट्टीधारक करणार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहन
वरळी येथील मरियम्मा नगर येथील एसआरए पुनर्वसनप्रश्रासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही. यामुले सुमारे ३५० झोपडपट्टीधारकांनी बुधवारी दि.२२ वर्षा निवासस्थानाबाहेर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. मरियम्मा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडामकर यांनी ही माहिती दिली.
-
Maharashtra News | संभाजीराजे मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार
आज छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळ राज्य मागासवर्गीय आयोगाच्या भेटीला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आयोगाची भेट घेणार आहे. यामुळे या भेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता राज्य मागासवर्गीय आयोगाची ते भेट घेणार आहेत.
Published On - Nov 18,2023 7:19 AM