Maharashatra Marathi News Live | “महिलांना जितकं प्रोत्साहन दिलं जाईल देश तेवढाच विकासाच्या मार्गावर पोहचेल”

| Updated on: Sep 21, 2023 | 8:12 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashatra Marathi News Live | महिलांना जितकं प्रोत्साहन दिलं जाईल देश तेवढाच विकासाच्या मार्गावर पोहचेल

मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : दीड दिवसाच्या बाप्पाला आज वाजतगाजत निरोप दिला जाणार. राज्यभर होणार दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन. महिला आरक्षणावरून विरोधक आक्रमक. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार. पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आजपासून वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतला आहे. गडचिरोली सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची पुन्हा धमकी. आत्राम यांना तिसऱ्यांदा नक्षलावाद्यांची धमकी आली आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Sep 2023 09:00 PM (IST)

    Women Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक पास झाल्यामुळे आम्ही आनंदी : राणी रामपाल

    नवी दिल्ली | “महिला आरक्षण विधेयक पास झाल्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत. महिलांना जितकं प्रोत्साहन दिलं जाईल, देश तेवढाच विकासाच्या मार्गावर पोहचेल. तसेच महिलांचा जितका सर्वाधिक सहभाग असेल त्यानुसार संसदेत महिलांच्या समस्येवर चर्चा होईल”, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाची हॉकीपटू राणी रामपाल हीने दिली.

  • 20 Sep 2023 08:19 PM (IST)

    Dhangar Reservation | धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गुरुवारी बैठक, सूत्रांची माहिती

    मुंबई | धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलन, रस्ता रोको करण्यात येत आहे. या दरम्यान आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीसाठी चौंडी येथील उपोषणकर्त्या यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचा निमंत्रण देण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहेत.

  • 20 Sep 2023 08:11 PM (IST)

    Maharashtra Health Department Recruitment | आरोग्य विभागातील भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ

    मुंबई | राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. गट क आणि ड या पदांसाठी ही भरती आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक 22 सप्टेंबर रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत अर्ज करु शकतात. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

  • 20 Sep 2023 07:59 PM (IST)

    एमआयएम पक्षाने केले महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान

    लोकसभेत महिला आरक्षण विधेयक 454 मतांनी मंजूर झालंय. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान केले आहे.

  • 20 Sep 2023 07:39 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयक अखेर मंजूर

    महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे या विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलाय.

  • 20 Sep 2023 07:23 PM (IST)

    Mumbai News : अर्पिता खान हिच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार थोड्याच वेळात

    बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याची बहीण अर्पिता हिच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे. विसर्जनापूर्वीच अर्पिताच्या घरी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शनासाठी आले होते.

  • 20 Sep 2023 07:16 PM (IST)

    Mumbai News : सलमान खान याची बहीण अर्पिता हिच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल

    सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,सलमान खान आणि राहुल कनाल यांनी बाप्पाचा दर्शन घेतले आहे.

  • 20 Sep 2023 07:10 PM (IST)

    राहुल गांधी यांची सरकारकडे मोठी मागणी

    लवकरात लवकरक जातीय गणणा करा, असे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला म्हटले आहे.

  • 20 Sep 2023 07:00 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना टोला

    लोकसभेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला मारला आहे. बहिणीचं कल्याण करणारा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्य आहेत. दोन दिवसांपूर्वीही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती.

  • 20 Sep 2023 06:49 PM (IST)

    धनगर आरक्षणासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक

    धनगर आरक्षणासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही बैठक घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे.

  • 20 Sep 2023 06:40 PM (IST)

    मुंबईतील खिचडी गैरव्यवहार प्रकरणात अमोल किर्तीकर यांची चौकशी

    मुंबईतील खिचडी गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे उपनेते अमोल किर्तीकर यांची 6 तास चौकशी करण्यात आली आहे. अमोल किर्तीकर हे खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत.

  • 20 Sep 2023 06:30 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी G20 मध्ये महिला सक्षमीकरणाची कल्पना केली: अमित शाह

    लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखालील प्रगतीची कल्पना मांडली. यावेळी महिला सक्षमीकरणाचे खरे मर्म भाजपमध्ये दिसून आल्याचे त्यांनी सांगितलं.

  • 20 Sep 2023 06:18 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना राबवल्या- अमित शाह

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या.  जनधन योजनांमुळे महिलांची 70 टक्के बँक खाती उघडली गेली आहेत.

  • 20 Sep 2023 06:00 PM (IST)

    Amit Shah | अमित शाह यांच्याकडून राहुल गांधी यांना उत्तर

    नवी दिल्ली | राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महिला आरक्षण विधेयक मांडलं. याशिवाय काल नव्या संसद भवनचं उद्घाटन झालं. देशाच्या इतिहासातील काल महत्त्वाचा दिवस होता. कालचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असं अमित शाह म्हणाले.

  • 20 Sep 2023 05:51 PM (IST)

    Rahul Gandhi | राहुल गांधी यांचा ओबीसी आरक्षणावरुन सरकारवर निशाणा

    नवी दिल्ली | राहुल गांधी यांचं लोकसभेत भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी लोकसभेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलाय. जातीय जनगनेनुसार सरकार लांब जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. सरकारच्या 90 सेक्रेटरीमध्ये ओबीसी समाजाचे फक्त 3 सेक्रेटरी आहेत. महिला आरक्षणात ओबीसी आरक्षणाचा उल्लेख नाही, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

  • 20 Sep 2023 05:42 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात विद्यूत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नी जागीच ठार

    गोंदिया | विद्यूत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नी जागीच ठार झाले आहेत.  तर एक महिला गंभीर जखमी झालीय. सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथील ही घटना आहे.

  • 20 Sep 2023 05:25 PM (IST)

    अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 15 दिवसांपासून उपोषण सुरु

    अहमदनगर | जामखेड येथील चौंडीत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 15 वा दिवस आहे. पंधराव्या दिवशी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील नांदेवली माळेवाडी गावचा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय.  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंडन आंदोलनाला सुरुवात झालीय. सरपंच अंकुश शेळके यांच्यासह गावातील दहा ते पंधरा तरुणांनी मुंडन आंदोलन करत आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.

  • 20 Sep 2023 05:02 PM (IST)

    Rahul Gandhi News : राहुल गांधी मांडतील महिला आरक्षणावर बाजू

    केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण बिल मंजूर केले आणि ते संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या बिलाला पाठिंबा दिला असला तरी, त्यांनी काही मागण्या पण मांडल्या आहेत. आता राहुल गांधी काय बाजू मांडतात ते थोड्यात वेळात समोर येईल.

  • 20 Sep 2023 04:00 PM (IST)

    CM News : मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

    महिला आरक्षणाच्या बिलावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे. देशाची बदनामी करणाऱ्यांना बाप्पांनी सदबुद्धी द्यावी असा चिमटा त्यांनी काढला. राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • 20 Sep 2023 03:57 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन जाऊन घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आहे. गणरायांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी अशी बाप्पाच्या चरणी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

  • 20 Sep 2023 03:14 PM (IST)

    75 टक्के महिला लोकप्रतिनिधींचे काम त्यांचे नवरोबाच करतात – बच्चू कडू

    महिला आरक्षणावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. आजही 75 टक्के महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी या क्रियाशील नाहीत. त्यांचे नवरोबाच सर्व काम पाहतात अशीही टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

  • 20 Sep 2023 02:27 PM (IST)

    गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आंदोलन

    काही दिवसांपूर्वी  गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने थाळीनाद तसेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

    यावेळी जोरदार घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 20 Sep 2023 02:02 PM (IST)

    आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, आंदोलकांचा पुणे- सातारा महामार्गावर रास्तारोको

    आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. साताऱ्यातील खंडाळ्याजवळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

    धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे.

  • 20 Sep 2023 01:52 PM (IST)

    बहिणींचं कल्याण बघेल असा भाऊ प्रत्येक घरात नसतो – सुप्रिया सुळे

    बहिणींचं कल्याण बघेल असा भाऊ प्रत्येक घरात नसतो असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केलं आहे. सर्वच बहिणींचं नशीब चांगल नसतं, असंही त्या म्हणाल्या.

    त्यांच्या या वक्तव्यावरून नवी चर्चा रंगली आहे.

  • 20 Sep 2023 01:35 PM (IST)

    मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस टँकरला लागली आग

    मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे गावाजवळ नजिक एलपीजी गॅस टँकरला लागली आहे. यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक थांबवण्यात आली.

    भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 20 Sep 2023 01:15 PM (IST)

    भाजपाकडून महिलांचा सतत अपमान – सुप्रिया सुळे

    सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. भाजपाकडून महिलांचा सतत अपमान होत असल्याची टीका त्यांनी केली.

  • 20 Sep 2023 01:12 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयकाला माझा पाठिंबा – सुप्रिया सुळे

    सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

    SC, ST, OBC महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करावे.

  • 20 Sep 2023 01:03 PM (IST)

    सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

    सांगलीच्या आटपाडी येथे गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला आहे. तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

    अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर पडळकरांवर राज्यभरातून टीका सुरू होती.

  • 20 Sep 2023 12:59 PM (IST)

    नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे एकाच माळेचे मणी – सूरज चव्हाण यांची टीका

    अजीत पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाण आक्रमक झाले आहेत. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे एकाच माळेचे मणी आहेत. आम्ही कधी पातळी सोडून टीका करत नाही असं वक्तव्य चव्हाण यांनी केले.

  • 20 Sep 2023 12:31 PM (IST)

    LIVE UPDATE | गोपीचंद पडळकर यांच्या विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक..

    गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.. राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून जोडो मारो आंदोलन करण्यात आले.. दादर नायगाव या विभागात गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडो मारत केले आंदोलन.. तर प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून बेताल वक्तव्य करणाऱ्या पडळकर यांच्या विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार.. पडळकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी…

  • 20 Sep 2023 11:57 AM (IST)

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर अमोल कोल्हे म्हणाले…

    प्रफुल्ल पटेलांच्या मनात काय आहे माहीत नाही.  मात्र त्यांना ग्राउंड परिस्थिती लक्षात आली असावी.  त्यामुळे त्यांनी कसं वक्तव्य केलं का हे माहीत नाही. मात्र शरद पवारांनी भूमिका जाहीर व्यासपीठावरून स्पष्ट केली आहे. शरद पवार हा ब्रँड आहे. नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहातं, असं म्हणत  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 20 Sep 2023 11:45 AM (IST)

    Sonia Gandhi in Parliament : महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी काय म्हणाल्या?

    कुठलंही संकट येऊ द्या, महिला खंबीर असतात. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा राजीव गांधी यांनी आणलं. जर हे विधेयक मंजूर झालं तर राजीव गांधी यांचं स्वप्र पूर्ण होईल. महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंबलबजावणी व्हावी, असं सोनिया गांधी म्हणाल्या. मोदी सरकारकडून मांडण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावर त्या आपलं म्हणणं मांडत होत्या.

  • 20 Sep 2023 11:30 AM (IST)

    Pune Live News : पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन

    पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले वाड्यात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.  आमदार रोहीत पवार देखील आंदोलनस्थळी दाखल झालेत. सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. जी काही सरकारी भरती होत आहे त्यातही प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत आहेत. परीक्षा फी च्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडून आपली तिजोरी भरत आहे, याविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी सर्व आमदार,नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थितीत आहेत.

  • 20 Sep 2023 11:15 AM (IST)

    नितेश राणे यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांची पाठराखण

    नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली आहे.  महाविकास आघाडीत अजित दादांवर उठसूट टीका करणारे आणि सामनाच अग्रलेख लिहिणारे कसे चालतात?  संजय राऊतांना अजित दादांवर बोलायला कोणाचा आशिर्वाद होता? संजय राऊतला वेगळा न्याय आणि गोपीचंद पडळकरांना वेगळा न्याय का?संजय राऊतला मुकसंमती होती काय?, असं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

  • 20 Sep 2023 11:04 AM (IST)

    LIVE UPDATE | लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी भरभरून दान

    लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी भक्तांनी भरभरून दान केलं आहे. मंगळवारी २५ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी गणरायाचं दर्शन घेतलं आहे. सध्या लालबागच्या राजाला भक्तांनी केलेल्या दानाची मोजणी सुरु आहे.

  • 20 Sep 2023 10:44 AM (IST)

    LIVE UPDATE | आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

    आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे. आंदोलक पुणे – सातारा महामार्ग अडवणार आहत. खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन होणार आहे.

  • 20 Sep 2023 10:13 AM (IST)

    LIVE UPDATE | आजपासून कांदा व्यापारी पुन्हा एकदा लिलाव बंद करणार

    आजपासून कांदा व्यापारी पुन्हा एकदा लिलाव बंद करणार आहेत. विविध मागण्यांसाठी कांदा व्यापारी लिलाव बंद करणार आहेत. नाशिकमध्ये १७ बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

  • 20 Sep 2023 10:10 AM (IST)

    LIVE UPDATE | मालेगावात दहशतवाही कारवाईच्या संशयानं एकाला ताब्यात घेऊन सोडलं

    मालेगावात दहशतवाही कारवाईच्या संशयानं एकाला ताब्यात घेऊन सोडलं आहे. मालेगावात आयबी आणि एटीएसने कारवाई केली आहे. मनमाडमध्ये मंडळाचं चित्रिकरण केल्याच्या संशय.. चौकशी करुन एकाला सोडून देण्यात आलं आहे..

  • 20 Sep 2023 10:03 AM (IST)

    LIVE UPDATE | पडळकर नागपुरात आल्यास सोडणार नाही – प्रशात पवार

    अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकरांना काळं फासा आणि एक लाख रुपये मिळवा.. असं वक्तव्य प्रशांत पवार यांनी केलं आहे.

  • 20 Sep 2023 09:51 AM (IST)

    आरक्षणाच्या विषयावर लोकांना झुलवत ठेवणं बरोबर नाही – शाहू महाराज

    आरक्षण मिळणार असेल किंवा नसेल तर तसं स्पष्ट करावं. आरक्षणाच्या विषयावर लोकांना झुलवत ठेवणं बरोबर नाही, असं छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.

    घटना दुरूस्ती शिवाय आरक्षण अशक्य असल्याचेही ते म्हणाले.

  • 20 Sep 2023 09:49 AM (IST)

    तोंडाला लगाम घाला,काय बोलतोय याचं भान ठेवा – आमदार प्रकाश आवाडे यांचा इशारा

    तुमच्या तोंडाला लगाम घाला, काय बोलतोय याचं भान ठेवून बोला, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना दिला आहे.

    जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रकार घडला. उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये देण्यावरून स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. प्रसंगी कारखानदारांच्या कानशिलात ओढू असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी संघटनेने काढलेल्या मोर्चादरम्यान केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आवाडे यांनी हा इशारा दिला.

  • 20 Sep 2023 09:33 AM (IST)

    महिला आरक्षणाच्या मुद्यावर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही.

    नव्या संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले, तेव्हा राष्ट्रपतींना का डावलण्यात आलं, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

  • 20 Sep 2023 09:30 AM (IST)

    फक्त राजकीय आरक्षण वाढवून महिलांचं सबलीकरण होईल का ? संजय राऊत

    राज्यात महिलांवर अत्याचार सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. फक्त राजकीय आरक्षण वाढवून महिलांचं सबलीकरण होईल का ? असा सवालही राऊत यांनी विचारला.

  • 20 Sep 2023 09:23 AM (IST)

    मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी

    मंत्री धर्मरावबाबा आत्राम नक्षलवाद्यांकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील नक्षलवाद्यांच धमकीचं पत्र सापडलं आहे. आत्राम यांना वर्षभरात ही तिसऱ्यांदा धमकी मिळाली आहे.

  • 20 Sep 2023 09:15 AM (IST)

    राज्यात दुष्काळ जाहीर करा – विजय वडेट्टीवार

    राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    सोयाबीन हातचे गेले आहे, पिकांची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल घेतला पाहिजे, त्यांना तातडीने मदत कशी करता येईल यावर विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • 20 Sep 2023 09:11 AM (IST)

    राज्यातील ओबीसी आंदोलनात आता ‘बीआरएस’ची उडी

    राज्यातील ओबीसी आंदोलनात आता ‘बीआरएस’ने उडी मारली आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून ‘बीआरएस’ तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. २५ तारखेला वर्धा जिल्ह्यात हे मोठं आंदोलन होणार आहे.

  • 20 Sep 2023 09:00 AM (IST)

    Ganesh utsav 2023 | रोहित-विराटच्या घरच्या गणेशोत्सवाचा पाहा काही खास PHOTOS

    टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने घरच्या गणेशोत्सवाचे काही खास फोटो शेअर केलेत. इथे क्लिक करुन पाहा.

  • 20 Sep 2023 08:44 AM (IST)

    Parliament Special Session | अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

    संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी महिला विधेयकावर होणार सात तासांची चर्चा. अकरा वाजल्यापासून चर्चेला होणार सुरुवात. तत्पूर्वी दहा वाजता होणार दोन महत्त्वपूर्ण बैठका. सत्ताधारी भाजपची होणार बैठक. विरोधी पक्षांची मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली होणार बैठक.

  • 20 Sep 2023 08:36 AM (IST)

    Dhananjay munde | धनंजय मुंडे यांचा लातूरकरांना धक्का

    धनंजय मुंडे यांचा लातूरकरांना धक्का. लाल कंधारी गोवंश आणि सोयाबीन संशोधन केंद्र पळवले परळीला. मराठवाड्यातील पहिल्याच बैठकीत धनंजय मुंडेंची पळवापळवी. लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र आणि सोयाबीन संशोधन केंद्र होणार होते लातुरात. कृषीमंत्री दादा भुसे आणि अब्दुल सत्तार यांनी केले होते शिक्कामोर्तब. मात्र धनंजय मुंडे कृषिमंत्री होताच दोन्ही केंद्र पळवले परळीला. लातूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थता

  • 20 Sep 2023 08:18 AM (IST)

    Onion | कांद्याचे लिलाव आजपासून बेमुदत बंद

    लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आजपासून बेमूदत बंद. नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये. ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा. कांद्यावर लादलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे. एक टक्का बाजार फी, अर्धा टक्का करावी. संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी. या शेतकरी हिताच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय.

  • 20 Sep 2023 08:00 AM (IST)

    Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडले, गृहिणींना दिलासा, तर बळीराजा चिंतेत

    नवी मुंबईत महिनाभरापूर्वी 140 रुपये किलोपर्यंत गेलेल्या टोमॅटोचे भाव आता पुन्हा कोसळले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो पुन्हा 20 रुपये किलो झाले आहेत. आवक वाढल्याने भाव खाली आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आणखी एक महिना तरी हे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली आहे.

  • 20 Sep 2023 07:45 AM (IST)

    Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी रुग्णालयातच उपोषण; उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

    नगरच्या चौंडी येथे मागील 15 दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरूच आहे. यशवंत सेनेने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण सुरू केलंय. उपोषणादरम्यान उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात केले होते दाखल. तर आता रुपनर यांनी रुग्णालयातही उपोषण सुरू ठेवल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आलं आहे.

  • 20 Sep 2023 07:31 AM (IST)

    Ganesh Chaturthi : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आजपासून वाहतुकीत मोठे बदल, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय

    गणेशोत्सवानिमित्ताने पुण्यातील वाहतुकीत आजपासून बदल करण्यात आले आहेत. 20 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबरपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शहरातली सर्व मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवाजी नगर, स्वारगेट, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता या मुख्य मार्गांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

  • 20 Sep 2023 07:16 AM (IST)

    Ganesh Chaturthi : बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… आज दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

    राज्यभरात काल वाजतगाजत बाप्पाचं आगमन झालं. काल दिवसभर आणि आज बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज लाडक्या विघ्नहर्त्या बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी चौपाट्या आणि तलावे सजली असून विसर्जन ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी एक नंतर बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.

Published On - Sep 20,2023 7:12 AM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.