Mumbai Maharashtra News Live | नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले, तर देश पहिल्या क्रमांकावर जाईल : रामदास आठवले

| Updated on: Oct 22, 2023 | 7:10 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Mumbai Maharashtra News Live | नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले, तर देश पहिल्या क्रमांकावर जाईल : रामदास आठवले

मुंबई | 21 ऑक्टोबर 2023 : राज्यभरातील 70 हजार आशा सेविका आणि 4 हजार गट प्रवर्तकांचं आज चौथ्या दिवशीही बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नदी सुधार प्रकल्प योजनेचा आढावा घेणार आहेत. इस्रायल आणि हमास दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे हमासमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. भारत पुन्हा इतिहास रचणार आहे. गगनया मिशनचं पहिलं ट्रायल आज करण्यात येणार आहे. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Oct 2023 08:48 PM (IST)

    Ahmednagar News | मनोज जरांगे पाटील कोपर्डीच्या पीडित कुटुंबाची भेट घेणार

    अहमदनगर | मनोज जरांगे पाटील कर्जत सभा आटपून कोपर्डीकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील पीडित कुटुंबाची घेणार भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील गावाजवळ आले. पण समाधीवर येऊ शकले नाहीत, अशी खंत निर्भयाच्या आईने व्यक्त केली होती.

  • 21 Oct 2023 08:17 PM (IST)

    Chandrashekhar Bawankule | ‘मनोज जरांगे पाटील यांच्या अल्टीमेटमची सरकार नक्की दखल घेईल’

    पुणे | “मनोज जरांगे पाटील यांच्या अल्टीमेटमची सरकार नक्की दखल घेईल. सर्व पक्ष, सर्व महाराष्ट्र, आपलं विधीमंडळ मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यांच्या अल्टीमेंटमचा सरकार नक्की विचार करेल. सरकारने समिती स्थापन केली आहे. आम्ही देखील आरक्षणाच्या बाजूने आहोत. आरक्षणाच्या विरोधात कुणीच नाही. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि म्हणून पुढची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील’, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • 21 Oct 2023 07:37 PM (IST)

    Ramdas Athawale | पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल : रामदास आठवले

    मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करत आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत देश 14 व्या क्रमांकावर आला आहे. नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले तर देश पहिल्या क्रमांकावर जाईल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. तसेच मोदीजी लोकांच्या विकासासाठी अनेक सरकारी योजना करत आहेत. काँग्रेस पक्षाने ज्यांना तुरुंगात पाठवले होते ते सर्व एकत्र आले आहेत. INDIA एकत्र आल्याने मोठे यश मिळेल, असे राहुल गांधींना वाटते. ते INDIA च्या नावाचा गैरवापर करत आहेत, असंही आठवले म्हणाले.

  • 21 Oct 2023 07:18 PM (IST)

    Nandurbar Fire | महापारेशन येथे विद्युत केंद्रात भीषण आग

    नंदूरबार | नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील 132 के व्ही महापारेशन येथे विद्युत केंद्रात भीषण आग लागली आहे. संध्याकाळी सहाच्या दरम्यान ही आग लागली. आग लागल्याने शेजारील 2 पेट्रोल पंप आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. आगीचे क्षणातच रौद्र रूप धारण केलं आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचं प्रयत्न करत आहे.

  • 21 Oct 2023 07:11 PM (IST)

    Manoj Jarange Patil Karjat | मनोज जरांगे पाटील यांचे कर्जत इथे जंगी स्वागत

    कर्जत | मनोज जरांगे पाटील यांचं कर्जत शहरात आगमन झालं आहे. जरांगे पाटील यांचं कर्जत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळेस जेसीबीद्वारे जरांगे पाटलांवर फुलांची उधळण करण्यात आली. तसेच 20 फुटाचा हार घालून जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं. बस स्टँड जवळून भव्य रॅलीस सुरुवात झाली असून काही वेळातच होणार सभेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे लागले कर्जतकरांचे लक्ष लागलं आहे.

  • 21 Oct 2023 06:56 PM (IST)

    Beed News | आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

    भाजप आमदाराच्या पत्नीसह तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार सुरेश धस यांच्या पत्नीचा गुन्ह्यात समावेश, सर्वत्र खळबळ. शेतीच्या वादातून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन जणांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

  • 21 Oct 2023 06:37 PM (IST)

    गिरीश महाजन यांचा खडसेंबद्दल मोठा गाैप्यस्फोट

    खडसेंना आयकर विभागाने देखील नोटीस बजावल्याचं कळतंय. त्यातही त्यांना 25 ते 30 कोटींचा दंड होणार असल्याचा गौप्यस्फोट थेट गिरीश महाजन यांनी केलाय. शासनाकडून खडसे कुटुंबियांना 137 कोटी रुपयांचा दंड बजावण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

  • 21 Oct 2023 06:21 PM (IST)

    गिरीश महाजन यांनी केला अत्यंत मोठा खुलासा

    उगाचं खडे आमच्या नावाने फोडू नका? चोऱ्या तुम्ही करता आणि खडे आमच्या नावाने फोडता. भोसरी प्रकरणातही तुम्ही उलटेसुलटे प्रयोग केले आहेत आणि दोष आम्हाला देता असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

  • 21 Oct 2023 06:03 PM (IST)

    नवी मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई

    आयकर विभागाच्या तसेच इतर कारवाईची भीती दाखवून ऑनलाइन पैसे उकळणाऱ्या टोळीच्या एकाला सायबर पोलिसांनी केली अटक केलीये. त्याने वापरलेले एक खाते गोठवण्यात आले असून त्यामध्ये १८ लाख ८० हजारांची रोकड मिळाली आहे. चैन्नईतून एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. अधिक तपास नवी मुंबई सायबर पोलीस करत आहेत.

  • 21 Oct 2023 05:55 PM (IST)

    मुंबईत अभिनेत्री हेमा मालिनी, राणी मुखर्जी आणि ईशा देओल यांनी घेतलं देवीचं दर्शन

  • 21 Oct 2023 05:45 PM (IST)

    राजस्थान विधानसभा निवडणूक: काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली

    राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सचिन पायलट टोंकमधून निवडणूक लढवणार आहेत. तर अशोक गेहलोत सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत.

  • 21 Oct 2023 05:30 PM (IST)

    उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीचा घेतला आढावा

  • 21 Oct 2023 05:15 PM (IST)

    मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने 92 उमेदवारांची यादी केली जाहीर

  • 21 Oct 2023 05:01 PM (IST)

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक: आपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली

    आम आदमी पार्टीने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ‘आप’ने तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यापूर्वी पहिल्या यादीत 10 तर दुसऱ्या यादीत 29 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.

  • 21 Oct 2023 04:58 PM (IST)

    शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी 10 नोव्हेंबरला निर्णयाची शक्यता

    कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणात 10 नोव्हेंबरला निर्णय येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली. प्रकरणात कोर्टाने आज सरकारला खडेबोल सुनावले. सुनावणीला गांभीर्याने घ्या, चालढकल करु नका, असे न्यायमूर्तींनी सुनावले.

  • 21 Oct 2023 04:50 PM (IST)

    हसन मुश्रीफ-सतेज पाटील-धनंजय महाडिक एकाच मंचावर

    कोल्हापूरात तीन दिग्गज एकाच मंचावर आलेत. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे एकाच मंचावर आलेत. कृषी विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्धघाटनावेळी तीनही नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी तिघांनी फेटे बांधले. कोल्हापूरच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचे सहकार्य घेणार असे मुश्रीफ यांनी सांगितले.

  • 21 Oct 2023 04:24 PM (IST)

    विनायक मेटे यांच्या पुतण्याने उचलले टोकाचे पाऊल

    विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने गळफास घेत जीवन संपवलं आहे. या आत्महत्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव येथे ही घटना घडली.

  • 21 Oct 2023 04:02 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सरप्राईज देणार- प्रकाश आंबेडकर

    पाच राज्यांच्या निवडणुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरप्राईज देतील, असे चकित करणारे विधान वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. नरेंद्र मोदी हे सरप्राईज देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते कोणाला सरप्राईज देतील हे सांगत नाही, पण मोदी हे सरप्राईज देतील हे नक्की, असे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली.

  • 21 Oct 2023 03:59 PM (IST)

    देशात A फोर अमेठी झाले त्याच पध्दतीने B फोर बारामती होणार

    देशात A फोर अमेठी झाले त्याच पध्दतीने B फोर बारामती होणार. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार होणार. भाजपा युवा मोर्चा बारामती लोकसभा अध्यक्षा अंकिता पाटील यांचं पुन्हा एकदा वक्तव्य. पक्ष बांधणीसाठी अंकिता पाटील पुरंदर दौऱ्यावर असताना केलं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकिता पाटलांनी घेतला बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा

  • 21 Oct 2023 03:41 PM (IST)

    कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष

    कंत्राटी भरतीचा GR रद्द केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत करणार जल्लोष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जल्लोष.

  • 21 Oct 2023 03:33 PM (IST)

    ओबीसींना लगेच आरक्षण मिळतं, मराठ्यांना नाही – मनोज जरांगे

    आपल्याकडून सरकारने वेळ मागितला आहे, आपण चारच दिवसाचा वेळ दिला आहे. मराठ्याला आरक्षण द्यायला समिती पाहिजे..अहवाल पाहीजे.. पण ओबीसीला लगेच आरक्षण मिळतं..अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे.

  • 21 Oct 2023 03:02 PM (IST)

    इंदापूरकरांकडून मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत

    इंदापूर येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे  यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील हे उपस्थित असून मराठा समाज बांधवांसोबत बसून ते सभा ऐकणार आहेत.

  • 21 Oct 2023 02:22 PM (IST)

    सरकारने फसावा फसवीचे राजकारण थांबवावे – प्रकाश आंबेडकर

    शासनाने मनोज जरांगे यांच्याशी नीट बोलून परिस्थिती स्पष्ट करावी. सरकारने फसवा फसवीचे राजकारण थांबवावे, अन्यथा हे सर्व सरकारवरच उलटेल असे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. शरद पवार यांच्याशी राजकीय बोलणी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • 21 Oct 2023 01:58 PM (IST)

    Maharashtra News : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये भेट

    मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे आंबेडकर मविआत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील भेट सुप्रिया सुळे यांनी घडवून आणल्याचे कळते.

  • 21 Oct 2023 01:41 PM (IST)

    Maharashtra News : मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुणे वेगाने बरबाद होईल- राज ठाकरे

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर टिका केली. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, पुणे शहर वेगाने बरबाद होईल असं ते म्हणाले.

  • 21 Oct 2023 01:24 PM (IST)

    Maratha Reservation : सरकारला आता एक तासही वेळ मिळणार नाही- जरांगे पाटील

    मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. आरक्षण जाहिर झाल्यानंतर ज्यांना आरक्षण घ्यायचं ते घेतील, ज्याना नको त्यांना घेऊ नये असे जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण द्यायचं नसेल तर गरीबांच्या जेवणात माती मिसळू नका. सरकारला आता एक तासही वेळ मिळणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 21 Oct 2023 01:16 PM (IST)

    Jarange Patil : मला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे- जरांगे पाटील

    मला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे त्यासाठी मी सरकारला पर्याय दिला आहे. असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 21 Oct 2023 01:07 PM (IST)

    Jarange Patil : मी माझ्या समाजाच्या वेदना मांडतोय- जरांगे पाटील

    अकलजमध्ये जरांगे पाटलांची भव्य सभा सुरू आहे. यावेळी मी माझ्या समाजाची वेदना मांडतोय असं जरांगे पाटील म्हणाले. आरक्षणासाठी सर्व मराठा समाजानं मतभेद विसरून एकत्र यावं असंही ते म्हणाले.

  • 21 Oct 2023 01:03 PM (IST)

    मी घरंदाज मराठा, मी कोपऱ्यात येत नसतो- मनोज जरांगे-पाटील

    एक मातब्बरांची टिम माझ्याकडे आली.बोलणं झाल्यावर म्हणाले कोपऱ्यात चल.  मी म्हणालो मी घरंदाज मराठा. मी कोपऱ्यात येत नसतो. सगळे पक्ष, गट तट बाजूला ठेवा आणि मराठा समाजाला आरक्षणाच दान टाकून द्या. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील

  • 21 Oct 2023 12:57 PM (IST)

    आम्ही सगळे निकष पार केले तरी आम्हाला आरक्षण नाही- जरांगे पाटील

    मी माझ्या समाजासोबत गद्दारी करणार नाही. आता आरक्षणासाठी हा शेवटचा लढा, आम्ही सगळे निकष पार केले तरी आम्हाला आरक्षण नाही- जरांगे पाटील

  • 21 Oct 2023 12:53 PM (IST)

    मी माझी इंचबरही नियत ढळू दिलं नाही- मनोज जरांगे पाटील

    आरक्षण घ्यायचे ते घेतील ज्यांना नको त्यांनी घेऊ नका. मी माझी इंचबरही नियत ढळू दिलं नाही. गरीबाच्या जेवणात माती मिसळू नका- मनोज जरांगे पाटील

  • 21 Oct 2023 12:46 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सुट्टी देणार नाही- मनोज जरांगे-पाटील

    मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर सुट्टी देणार नाही. आपल्यावर खूप अन्याय झालाय तो विसरू नका. इतक्या ताकदीने लढायचं की आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही- मनोज जरांगे-पाटील

  • 21 Oct 2023 12:40 PM (IST)

    पुण्यातील सगळी बांधकाम थांबवा- राज ठाकरे

    माझ्या हातात सत्ता आल्यास आर्किटेक लोकांच्या हातात राज्य देतो. पुण्यातील सगळी बांधकाम थांबवा. लोकसंख्येनुसार शहरात १५ टक्के रस्ते हवेत, पुण्यात आता ७ ते ८ टक्के रस्ते आहेत- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 12:35 PM (IST)

    लोकांना शहरात राहण्यासाठी फक्त समाधान लागतं- राज ठाकरे

    सरकारकडील पैसा वाटेल तसा वापरला जात आहे. लोकांचा प्रतिनिधिंशी काही संबंध येत नाही. त्यांना शहरात राहण्यासाठी फक्त समाधान लागतं- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 12:27 PM (IST)

    वांद्रे वरळी सीलिंक बांधायला रामायणा एवढा वेळ लागला- राज ठाकरे

    वांद्रे वरळी सीलिंक बांधायला रामायणा इतका वेळ लागला ही आपल्या सरकारची गती, मुंबई दर्शन सहलीत ब्रिटिश काळातल्या वास्तू दाखवल्या जातात- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 12:24 PM (IST)

    संत गाडगेबाबांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते- राज ठाकरे

    संत गाडगेबाबा यांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते यापेक्षा मोठं दुर्देव नाही- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 12:21 PM (IST)

    मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही- राज ठाकरे

    तरूणाईचा कल विदेशाकडे वाढत चालला आहे. प्रचंड वेगाने बांधकाम होतं असल्याने प्रदूषणा वाढत चाललंय. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 12:16 PM (IST)

    महापालिकेमध्ये शहर नियोजन नाही- राज ठाकरे

    महापालिकेमध्ये शहर नियोजन नाही. आर्किटेकपेक्षा पालिकेत इंजिनिअरला जास्त महत्त्व आहे. आपण वेगळा विचार करतोय आणि सत्तेत बसलेत ते वेगळा विचार करत आहेत- राज ठाकरे

  • 21 Oct 2023 11:59 AM (IST)

    Maharashtra News | कंत्राटी भरतीविरोधात भाजपकडून आंदोलन

    कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा जीआर महाविकास आघाडी सरकार काळात काढण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. यामुळे भाजपने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले. वर्सोवा भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.

  • 21 Oct 2023 11:47 AM (IST)

    Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची अकलुजमध्ये सभा

    मनोज जरांगे पाटील यांची आज अकलुजमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी सकाळपासून मराठा बांधव एकत्र येत आहे. लाखो समाजबांधव या ठिकाणी येणार आहे.

  • 21 Oct 2023 11:40 AM (IST)

    Maharashtra News | मनोज जरांगे पाटील साताऱ्यात

    मनोज जरांगे पाटील सध्या सातारा जिल्ह्यात आहेत. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या खाजगी देवस्थान शिखर शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

  • 21 Oct 2023 11:18 AM (IST)

    Maharashtra News | मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

    मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. पुण्यावरुन दिल्लेकडे जाणाऱ्या या विमानाचे लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा एका प्रवासाने केले होते.

  • 21 Oct 2023 11:04 AM (IST)

    Maharashtra News | छगन भुजबळ यांना धक्का

    ओबीसीचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी त्यांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक होते.

  • 21 Oct 2023 10:44 AM (IST)

    कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून भाजप- मविआ आमनेसामने

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान राडा सुरू. कंत्राटी भरतीच्या मुद्यावरून भाजप- मविआ आमनेसामने आले आहेत. कंत्राटी भरतीसंदर्भात माफ मागावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

  • 21 Oct 2023 10:38 AM (IST)

    भाजपचं मविआविरोधात आज राज्यभरात नाक घासो आंदोलन

    कंत्राटी भरतीवरून भाजप नेते, कार्यकर्ते मविआविरोधात आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचं मविआविरोधात नाक घासो आंदोलन सुरू आहे. कंत्राटी भरतीसंदर्भात माफ मागा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे.

  • 21 Oct 2023 10:30 AM (IST)

    भाजपची ‘आम्ही ते नव्हेच’ भूमिका – नाना पटोले

    भाजपची ‘आम्ही ते नव्हेच’ भूमिका. कंत्राटी भरतीवरून भाजपकडून बचाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

  • 21 Oct 2023 10:15 AM (IST)

    Gaganyaan Mission | इस्त्रोच्या गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी

    इस्त्रोच्या गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी. पॅराशूटद्वारे क्रू मॉड्युलचं यशस्वी लँडिंग. चांद्रयान – 3 मोहिनमेच्या यशानंतर इस्त्रोची आणखी एक झेप.

  • 21 Oct 2023 10:11 AM (IST)

    Gaganyaan Mission | गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूल अंतराळात झेपावलं

    गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूल अंतराळात झेपावलं. गगनयान इस्त्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम

  • 21 Oct 2023 10:06 AM (IST)

    मरीन ड्राईव्ह परिसरात महानगरपालिकेकडून डस्ट सप्रेशन मशीनकडून फवारणीला सुरुवात

    मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात महानगरपालिकेकडून डस्ट सप्रेशन मशीनकडून फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. हवेतील धुळीकण दाबण्यासाठी या डस्ट सप्रेशन मशीनचा वापर केला जात आहे. मुंबईतील एक्युआय 157 वर पोहोचल्यानंतर महानगरपालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी उचलण्यात आलं महत्त्वाचं पाऊल.

  • 21 Oct 2023 09:52 AM (IST)

    LIVE UPDATE | तांत्रिक अडचणी दूर करण्यास इस्त्रोला यश

    तांत्रिक अडचणी दूर करण्यास इस्त्रोला यश मिळालं आहे. गगनयानाचं चाचणी उड्डाण आजच होणार आहे. सकाळी १० वाजता गगनयानाचं चाचणी उड्डाण होणार आहे. ‘गगनयाना’ इस्त्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे.

  • 21 Oct 2023 09:35 AM (IST)

    LIVE UPDATE | विरोधकांनी जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार केला – अजित पवार

    विरोधकांनी जाणीवपूर्वक चुकीचा प्रचार केला… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. दीड लाख नोकरभरतीचा आताच्या सरकारमध्ये निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरती सुरु असल्याचा तरुणांमध्ये संभ्रम तयार केला… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

  • 21 Oct 2023 09:20 AM (IST)

    LIVE UPDATE | पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची मोर्चे बांधणी

    पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची मोर्चे बांधणी… आज पुण्यात अजित पवारांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता थेट महापालिका आयुक्तांना सोबत घेवून अजित पवार घेणार बैठक

  • 21 Oct 2023 09:08 AM (IST)

    Israel Hamas War : ‘भीती वाटते कारण माझ्याकडे हक्क…’, इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट

    Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध गेल्या १४ दिवसांपासून सुरु आहे. युद्धात निरपराध बालकांचा बळी जात आहे… समोर येत असलेलं दृश्य मन विचलित करणारं आहे… गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली अभिनेत्री अखेर व्यक्त झालीच.. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा.. वाचा सविस्तर

  • 21 Oct 2023 08:51 AM (IST)

    Gaganyaan Mission | गगनयान मिशनची चाचणी स्थगित

    गगनयान मिशनची चाचणी स्थगित करण्यात आली आहे. मिशनमध्ये काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्याने चाचणी स्थगित केल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के.सोमनाथ यांनी दिली.

  • 21 Oct 2023 08:47 AM (IST)

    Lalit Patil | नाशिकचा सराफ व्यावसायिक रडारवर

    ललित पाटील ड्रग्स प्रकरण. नाशिकचा सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर. ड्रग्सच्या पैशातून भूषण पाटीलने सोने खरेदी केल्याचं उघड. पोलीस तपासात उघड झाली माहिती. भूषणने नाशिकच्या सराफाकडून विकत घेतले होते 8 किलो सोने

  • 21 Oct 2023 08:27 AM (IST)

    Manoj Jarange patil | मनोज जरांगे पाटील यांची आज कुठे सभा?

    मनोज जरांगे पाटील यांची आज अकलूजमध्ये सभा. सकाळ पासूनच सभास्थळी मराठा बांधव उपस्थित. अकलूजच्या विजयसिंह मोहिते क्रिडा संकुल येथे सभेचं आयोजन. सोलापूर जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठा बांधव सभेला राहणार उपस्थित. आज सकाळी 10 वाजता होणार सभेला सुरुवात. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मराठा समाज बांधवांची मोठी तयारी. काही तासात जरांगे पाटील यांचं होणार आगमन.

  • 21 Oct 2023 08:12 AM (IST)

    Gaganyaan Mission | इस्रोने लॉन्चिंगचा वेळ बदलला

    आज भारताच्या महत्वकांक्षी मिशन गगनयानची पहिली चाचणी होणार आहे. इस्रोने उ्डडाणाची वेळ बदलली आहे. सकाळी 8.00 वाजता टेस्ट फ्लाइट उड्डाण होणार होतं. पण आता 8.30 वाजता उड्डाण होईल. सतीश धवन अवकाश तळावर लॉन्च होणार आहे.

  • 21 Oct 2023 08:01 AM (IST)

    Israel Hamas War : आता इस्रायलचे पॅलेस्टाईनमध्ये एअरस्ट्राईक; 12 नागरिक ठार

    इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असतानाच आता इस्रायलने पॅलेस्टाईनवरही एअर स्ट्राईक केला आहे. पॅलेस्टाईनच्या रेफ्युजी कँपवर करण्यात आलेल्या या एअरस्ट्राईकमध्ये 12 नागरिक ठार झाले आहेत. वेस्ट बँकमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे.

  • 21 Oct 2023 07:46 AM (IST)

    Vijay Wadettiwar : कंत्राटी भरतीचा जीआर निघाला तेव्हा अजितदादा अर्थमंत्री, प्रकरणाची चौकशी करा : वडेट्टीवार

    कंत्राटी भरतीचा जीआर निघाला तेव्हा अर्थमंत्री अजित पवार होता. त्यावेळी कंपन्यांना कंत्राट देण्यामागचा सूत्रधार कोण होता हे समोर आलं पाहिजे. याची चौकशी करा. चौकशी केल्यानंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

  • 21 Oct 2023 07:33 AM (IST)

    Ravindra Waikar : आमदार रवींद्र वायकर यांना समन्स, चौकशीला बोलावलं

    ठाकरे गटाचे नेते, आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आलं आहे. वायकर यांच्यावर सहा जणांना फसवल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात सप्टेंबरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबतच्या चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आलं असून त्यांना चौकशीला बोलावलं आहे.

  • 21 Oct 2023 07:26 AM (IST)

    Gaganyaan Mission : आता मिशन गगनयान, भारत इतिहास रचणार, पहिली ट्रायल होणार

    भारत आज पहिल्या गगनयान मिशनचं ट्रायल करणार आहे. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानची पहिली टेस्ट फ्लाईट पाठवली जाणार आहे. सकाळी 8 वाजता या मिशनची पहिली टेस्ट फ्लाईट रवाना होणार आहे.

Published On - Oct 21,2023 7:24 AM

Follow us
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.