Maharashtra Breaking News Live | शरद पवार यांचे पुरंदरमध्ये जंगी स्वागत

| Updated on: Aug 25, 2023 | 7:11 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live | शरद पवार यांचे पुरंदरमध्ये जंगी स्वागत
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : ठाण्यातील कळवा रुग्णालयातील 24 मृत्यूनंतर प्रशासनाला जाग. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची 37 पदे भरणार. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची आज बैठक. लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक घेणार. मून मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव. मुंबईसह ठाण्यात पावसाला सुरुवात. दमदार हजेरीने चाकरमानी सुखावला. यासह राज्य, देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Aug 2023 04:39 PM (IST)

    Shahajibapu Patil News : संजय राऊत यांना चंद्रावर पाठवायला हवं होतं-शहाजीबापू

    संजय राऊत यांना यानात बसवून चंद्रावर पाठवायला हवे होते, असा टोला आमदार शहाजीबापू पाटील यांनी हाणला. राऊत यांना पाठवलं असतं तर किरकिर गेली असती, अशी टीका ही त्यांनी केली.

  • 24 Aug 2023 04:21 PM (IST)

    Onion News : पुण्यातील कांद्यावरील बैठकीत वादावादी

    पुण्यातील कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु आहे. पण या बैठकीत गेल्या दोन तासांपासून काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे वादावादी झाली. पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि कांदा उत्पादकांमध्ये या प्रश्नावरुन खडाजंगी झाली.

  • 24 Aug 2023 04:14 PM (IST)

    Sharad Pawar News : शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर

    शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी हितगुज साधले. पक्षातील दुफळीनंतर शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यांनी राज्य पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

  • 24 Aug 2023 12:06 PM (IST)

    गेल्या दोन तासांपासून मुंबई – आग्रा महामार्ग ठप्प

    गेल्या दोन तासांपासून मुंबई – आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. चांदवडमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांनी मुंबई – आग्रा महामार्ग जाम केला आहे. नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सकाळपासून लासलगाव, पिंपळगाव, चांदवडमध्ये कांदा खरेदी बंद आहे.

  • 24 Aug 2023 11:55 AM (IST)

    पुणे – सोलापूर रस्त्यावर हडपसर उड्डाण पुलाजवळ मोठा अपघात

    पुण्यात भल्या पहाटे मोठा अपघात झाला आहे. पुणे – सोलापूर रस्त्यावर असलेल्या हडपसर उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला. मगरपट्ट्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रक ड्रायव्हरला डुलकी लागण्याने हा भीषण अपघात झाला. ट्रकचा स्टिअरिंग तुटल्याने चालकाने दुभाजकाला धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे ब्रिजचा काही भाग देखील कोसळला आहे.

  • 24 Aug 2023 11:45 AM (IST)

    Chandrayaan 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर राकेश रोशन जोरदार होऊ लागले ट्रेंड

    सोशल मीडियावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.  चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचं नाव चुकून भारतीय अंतराळवीर म्हणून घेतलं. यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत, वाचा सविस्तर..

  • 24 Aug 2023 11:32 AM (IST)

    ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोला देणार भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी बेंगळुरुला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान मोदी इस्रो कार्यालयाला भेट देणार असल्याचं कळतंय. ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी मोहिमेनंतर मोदी इस्रोला भेट देणार आहेत. उद्या रात्री ते परदेशातून भारतात परतणार आहेत.

  • 24 Aug 2023 11:20 AM (IST)

    चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक, मुंबई-आग्रा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

    चांदवडमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड चौफुलीवर शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं आहे. यामुळे मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नाफेडचे अधिकारी बाजार समितीत उपस्थित नसल्याने हे आंदोलन सुरू आहे.

  • 24 Aug 2023 11:06 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

    मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता, वाचा सविस्तर..

  • 24 Aug 2023 10:52 AM (IST)

    सोनिया गांधी यांचे इस्त्रोला पत्र, केले अभिनंदन

    काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना पत्र लिहून चांद्रयान मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे.

  • 24 Aug 2023 10:34 AM (IST)

    घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे

    घरात बसून पक्ष चालवणारे कुणाला संपवू शकत नाहीत , अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 2024 पर्यंत ठाकरेंसोबत स्टेजवर 4 ते 5 लोकंच दिसतील असेही त्यांनी म्हटले.

  • 24 Aug 2023 10:28 AM (IST)

    हिमाचल प्रदेशीमधील कूल्लूमध्ये भूस्खलन

    हिमाचल प्रदेशातील कूल्लू येथील अनीमध्ये भूस्खल झाले आहे. यामध्ये अनेक मोठ्या इमारती कोसळल्याची माहिती समोर आली असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून मदत आणि बचावकार्याला सुरूवात झाली आहे.

  • 24 Aug 2023 10:16 AM (IST)

    नाशिकच्या चांदवडमध्येही शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले

    चांदवड बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. पिंपळगाव पाठोपाठ आता चांदवड बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला आहे.

    नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका.

  • 24 Aug 2023 09:57 AM (IST)

    गणेशोत्सवासाठी खास तयारी

    रेल्वेकडून गणेशोत्सव काळात 94 अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहेत. जवळपास दीड लाख चाकरमानी यंदा कोकणात पोहोचणार आहेत. आतापर्यंत तब्बल 1 लाख 4 हजार चाकरमान्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाल्याची माहिती आहे. अनारक्षित 94 गाडय़ांच्या माध्यमातून दीड लाख प्रवासी कोकणात पोहोचणार आहेत. मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत आपल्या कुटुंबकबिल्यासह कोकणात जाण्यासाठी तयारीला सुरवात केली आहे.

  • 24 Aug 2023 09:46 AM (IST)

    महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु

    महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. साखरेवर निर्यात बंदी घालण्याची शक्यता आहे.  गहू आणि तांदळानंतर देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.  आगामी काळात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. नव्या हंगामात साखर कारखान्यांकडून होणाऱ्या साखरेच्या उत्पादनावर निर्यात बंदीची शक्यता आहे.  येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात ऊस गाळपाचा नवा हंगाम सुरू होणार त्याआधी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 24 Aug 2023 09:30 AM (IST)

    लासलगावमध्ये कांदा लिलाव सुरू, पण शेतकऱ्यांचा मात्र नाराजीचा सूर का? वाचा…

    नाशिकच्या लासलगावमध्ये कांदा लिलाव सुरू झाला आहे. 400 वाहनातून कांदा विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीत दाखल झाला आहे.  कांद्याला जास्तीत जास्त 2500 शे रुपये, कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 2100 रुपये मिळाला बाजार भाव मिळाला.  बाजारभावात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर आहे.

  • 24 Aug 2023 09:15 AM (IST)

    क्रीडा संकुलासाठी पैलवानांचं अनोखं आंदोलन

    मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी पैलवानांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर पैलवानांनी मारले जोर बैठकांचा व्यायाम अनोखं आंदोलन करत केलं आहे. मोहोळ तालुक्यासाठी क्रीडा संकुल 23 वर्षापूर्वी मंजूर झाले मात्र अद्याप कोणत्याही कामाची सुरुवात नाही. क्रीडा संकुल नसल्याने तालुक्यातील खेळाडूंची मोठी अडचण होत आहे  राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे क्रीडा संकुल रखडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • 24 Aug 2023 08:58 AM (IST)

    Maharashtra News : मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा कामाला गती

    रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा कामाला गती आली आहे. गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्यासाठी कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पाहणी दौऱ्यानंतर कामाला वेग आला आहे.

  • 24 Aug 2023 08:47 AM (IST)

    Maharashtra News : शरद पवार यांची सभा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची उद्या कोल्हापुरात सभा होत आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात सायंकाळी पाच वाजता होणार सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात सभा घेणार आहेत.

  • 24 Aug 2023 08:35 AM (IST)

    Maharashtra News : नवद्योजकांनी बँकेला लावला 94 कोटी रुपयांचा चुना

    अमरावती जिल्ह्यातील तबल 20 हजार नवद्योजकांनी बँकेला 94 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक बँका अर्थिक अडचणीत आल्या आहेत. ज्यांनी कर्ज घेतले आहे त्या उद्योजकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे नवीन उद्योग करू पाहणाऱ्या तरुणांना कर्ज मिळण्यासाठी अडचणी येत आहेत.

  • 24 Aug 2023 08:21 AM (IST)

    Chandrayaan 3 Moon Landing LIVE : प्रग्यान रोव्हरने चंद्रावर सुरु केलं संशोधन

    चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रग्यान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आहे. प्रग्यान रोव्हरने चंद्रावरील संशोधनाच आपलं काम सुरु केलं आहे. बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी इस्रोच्या नियोजनाप्रमाणे विक्रम लँडरने चांद्रभूमीला स्पर्श केला. हा तमाम देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण होतं. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर काही तासांनी प्रग्यान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला.

  • 24 Aug 2023 08:20 AM (IST)

    Maharashtra News : कांद्याचा लिलाव पुन्हा सुरु होणार

    नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव पुन्हा सुरु होणार आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी संप मागे घेतला आहे. यामुळे तब्बल 3 दिवसांनी बाजार पूर्ववत होणार आहे. आता नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समितींमध्ये कांदा लिलाव आजापासून सुरू होत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री भरती पवार यांनी मध्यस्थी केली.

  • 24 Aug 2023 08:05 AM (IST)

    board exams : आता बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालय निर्णय

    दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी तयार केली जात असून 2024 च्या सत्रात नवीन पाठ्यपुस्तकेही येणार आहेत.

    नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे.

  • 24 Aug 2023 07:47 AM (IST)

    Mumbai Water Cut : मुंबईतील काही भागात आज पाणी पुरवठा बंद, पालिकेची माहिती

    मुंबईतील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि देवनारमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणास्तव हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

  • 24 Aug 2023 07:34 AM (IST)

    navi mumbai : नवी मुंबईतील नेरुळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; दोन ठार

    नवी मुंबईतील तुलसी भवन या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. काल रात्री 10 वाजता ही दुर्घटना घडली.

  • 24 Aug 2023 07:30 AM (IST)

    uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांची विदर्भावर नजर, विदर्भातील जागांचा आज आढावा

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नजर आता विदर्भावर वळली आहे. ते आज मातोश्री निवासस्थानी विदर्भातील लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. खासकरून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची इत्थंभूत माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Published On - Aug 24,2023 7:27 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.