Maharashtra Marathi Breaking News Live | मोठी बातमी | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून ठाकरे गट-शिवसेना आमदारांना नोटीस
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : शहापूर, अहमदनगरसह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी. बळीराजा सुखावला. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू. चिपळूणच्या सीएनजी पंपवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मंत्री उदय सामंत यांनी घेतलं रात्री दोन वाजता लालबागचा राजाचे दर्शन. आशियाई स्पर्धेत भारताने दोन पदके जिंकले. देशाला मिळणार आज 9 वंदे भारत एक्सप्रेस. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Marathi News | विधानसभा अध्यक्षांकडून ठाकरे गट-शिवसेना आमदारांना नोटीस
मुंबई | राजकीय विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे-शिवसेना आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार सोमवारी 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या कार्यालयाकडून सुचना करण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी ३ वाजता विधानभवनात होणार सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाचे वकील हे विधानसभा अध्यक्षांकडे मांडणार बाजू आहेत.
-
Supriya Sule | सुप्रिया सुळे यांची गणपती मंडळांना भेट, चांगला पाऊस पडू दे गणेशाकडे साकडं
बारामती | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अनेक सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, असं साकडं सुप्रिया सुळे यांनी गणेशाला घातलं.
-
-
Sunil Bhusara On Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांना आमदारकीचा उन्माद : सुनील भुसारा
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी गोपीचंद पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “भाजपने गोपीचंद पडळकर यांना भीक म्हणून आमदारकी दिली. तसेच गोपीचंद पडळकर यांना आमदारकीचा उन्माद आलाय”, अशा शब्दात सुनील भुसारा यांनी पडळकर यांच्यावर टीका केलीय.
-
Sharad Pawar | आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे : शरद पवार
पुणे | “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. याच दिवशी महात्मा यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. उजव्या लोकांच्या हातातली सत्ता आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करुन त्यांनी हे पाऊल टाकलं. महात्मा फुलेंनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यातली सत्यशोधक समाजाची स्थापना महत्वाची आहे. गुलाममगिरी अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला. शाहू महाराजांनी थोतोंड विचारांचा विरोध केला. आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे. समाजात जी वाईट प्रवृत्ती वाढत चालली आहे त्याचा विरोध करायचा आणि पुढे जायचं हीच शपथ आपण घेतली पाहिजे आणि पुढं जायला हवं”, असं शरद पवार म्हणाले.
-
महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक – राष्ट्रवादीच्या महिला खासदाराची टीका
परभणी : महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यासाठी गाजावाजा केला मात्र हातात काहीच मिळाले नाही. महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांनी केलीय. राष्ट्रपती महिला असूनही त्यांना बोलवण्यात आले नाही. पण, चित्रपट सृष्टीचे कलाकार बोलवून इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात आले अशी टीका त्यांनी केली.
-
-
पुण्यात सत्यशोधक सम्मेलनाचं आयोजन, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : पुण्यात सत्यशोधक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. बामसेफचे वामन मेश्राम या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड देखील उपस्थित राहणार आहेत. भारत मुक्ती मोर्चातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
खडसे साहेबांचे म्हणजे… सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, – आमदार मंगेश चव्हाण
जळगाव : खोटं बोलंण हे एकनाथ खडसे यांच्या पाचवीलाच पुजलं आहे. खडसेंची वृत्ती लोकांना माहिती होती आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसवलं, खडसे साहेबांचे म्हणजे…सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, असं आहे अशा शब्दात जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्यावर टीका केलीय. जिल्हा दूध संघ तोट्यात असल्याच्या वक्तव्यावर अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय.
-
शरद पवारांची काही वेगळी भूमिका असू शकते – अंबादास दानवे
मुंबई : शाश्वत विकास झाला पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे यात टीका-टिप्पणी करून काही होणार नाही. अर्थखाते हे कोण्या व्यक्तीकडे किंवा मतदार संघाकडे झुकलं गेलं नाही पाहिजे. तर ते राज्यासाठी झुकलं गेलं पाहिजे हे अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य योग्य आहे. केंद्र सरकार फक्त अदानीकडे अर्थसत्ता आणण्याचा प्रयत्न करते आणि त्या विरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. शरद पवारांची काही वेगळी भूमिका असू शकते त्यात आम्हाला काही माहित नाही असे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणालेत.
-
Ramesh Kadam News : रमेश कदम यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी
रमेश कदम यांचं मोहोळमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या मतदार संघात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. ते नुकतेच जेलमधून बाहेर आलेत. मतदार संघात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
-
Jayant Patil News : जयंत पाटील यांचं सूचक विधान
अजित पवार हे सध्या सावध आहेत, याचं मला समाधान असल्याचे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. अजित पवार यांनी अर्थखाते किती दिवस असेल याविषयीच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्यावर काय अन्याय होत आहे, याचा त्यांनी विचार करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे. तर अजित पवार स्वखुशीने तिकडे गेल्याचे त्यांनी सांगितले.
-
Mumbai News : बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने यंत्रणांची धावपळ
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने यंत्रणांची धावपळ उडाली. एका निळ्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आला होता. मुंबई पोलीस अधिकारी आणि तपास पथकाने तातडीने विमानतळावर धाव घेतली. त्यांना काहीच मिळाले नाही. या खोट्या कॉलचा पोलीस तपास करत आहेत.
मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर एक फर्जी कॉल की गई जिसमें कहा गया कि हवाई अड्डे पर एक नीले बैग में बम है, मुंबई पुलिस अधिकारी और बम स्क्वाड टीम हवाई अड्डे पर पहुंची और जांच की गई, जांच के दौरान कुछ भी नहीं मिला। फिलहाल, पुलिस कॉल करने वाले की तलाश कर रही है: मुंबई पुलिस
— ANI_HindiNews (@AHindinews) September 24, 2023
-
धनगर आरक्षणासाठी थोडी कळ सोसावी – चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. धनगर आरक्षण न्यायालयात टीकावे त्यासाठी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे धनगर समाजाने वाट पहावी असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
-
Ajit pawar | गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला अजित पवारांकडून उत्तर
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. “वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. वाचाळवीरांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. अशा वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही” असं अजित पवार म्हणाले.
-
Beed News | कोंबड्या दगावल्याने शेतकऱ्याच 10 लाखाच नुकसान
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे एका पोल्ट्री फार्ममधील तीन हजार कोंबड्या दगावल्या. यात शेतकऱ्याचं तब्बल दहा लाख रुपयाच नुकसान झालय.
-
Ajit pawar | ‘मापात पाप करू नका’
“चिखलीच्या जवळच्या भागात रेड झोनचा विषय असल्यामुळे तिकडे विकासाला अडचणी येत आहेत. कारण परवानग्या भेटत नाहीत. शहरात वाहनांची संख्या मोठी वाढली आहे. मापात पाप करू नका, एखादा CNG भरायला आला आणि त्याला घाई आहेत तो म्हणाला, मला द्या घाई आहे तर त्यांना संयमाने सांगा. दोघे वाद घालू नका, नाही तर दादा आमच्यात भांडण झाली आमचे वाद मिटवा. मी उद्घाटनाला आलो आहे भांडणं सोडण्यासाठी आलो नाहीय” असा CNG चालकांना सल्ला दिला.
-
Pune news | झोपेत तरुणाचा जळून मृत्यू
घरात विजेचा शॉट सर्किट झाल्याने झोपेत तरुणाचा जळून मृत्यू. खेड तालुक्यातील खरपुडी येथील धक्कायक घटना. घरात गणपती समोर विजेच्या माळाची सजावट केली असताना घडली घटना. वैभव जगन्नाथ गरुड असे जळून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. खेड पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद.
-
Rain Updates | नवी मुंबईतील मोरबे धरणाने गाठली अत्युच्च 100% पातळी
यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरला आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.
-
Sangali News | सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक वार्षिक सर्वसाधारण सभा, सत्ताधाऱ्यांवर अंडीफेक
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्याच्या दिशेने अंडी फेकण्यात आलीयेत. विरोधी गटाने सभा सुरू असताना स्टेजवरील अध्यक्ष आणि अन्य सत्ताधाऱ्याच्या दिशेने अंडी फेकली. माधवनगर रोड वरील डेक्कन हॉल मध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत असताना हा प्रकार घडला.
-
नवी मुंबईतील मोरबे धरण 100 % भरलं
नवी मुंबईतील मोरबे धरणाने गाठली अतिउच्च पातळी गाठली आहे. यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरलं आहे. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबईचा पाणी प्रश्न सुटला आहे.
-
यवतमाळमध्ये आज संघर्ष मोर्चा
यवतमाळमध्ये आज राज्य सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचारी बेरोजगार पेन्शनर्सचा संघर्ष मोर्चा निघणार आहे. आझाद मैदानातून हा मोर्चा निघणार आहे. जुनी पेन्शन योजना यासह विविध मागण्या संघर्ष मोर्चा काढला जातोय. या मोर्चासाठी जिल्हाभरातून हजारो कर्मचारी उपस्थित राहणार आहे. याच आंदोलनातून पुढील राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे.
-
चंद्रशेखर बावनकुळे आज अहमदनगर दौऱ्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. घर चलो अभियान शहरातील माणिक चौक ते कापड बाजार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी एक वाजता ते भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील अध्यक्षपदाच्या निवडीवरून आमदार मोनिका राजळे आणि पदाधिकाऱ्यांच्या वादावर तोडगा निघणार का याकडे लागले सर्वांचं लक्ष आहे. शेवगाव पाथर्डीतील वादावर पदाधिकारी राजळे यांनी याबाबत तक्रार केली आहे.
-
मुक्ताईनगरमध्ये मुसळधार, नदी नाल्यांना पूर
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या वडोदा सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कु-हा मुक्ताईनगर जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याला पूर असल्याने 3 बसेस मुक्ताईनगर जाणाऱ्या अडकून पडल्या आहेत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या शेती खरडून वाहून गेलीय. केळी मका कापूस जमीन दोस्त वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
-
Maharashtra News | भामाआसखेड धरण अखेर १०० टक्के भरले
चाकण परिसरातील १९ गावे आणि आळंदी तसेच पुणे शहर वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामाआसखेड धरण अखेर १०० टक्के भरले आहे. गेली कित्येक दिवस धरणातील पाणीसाठा ८३ ते ८४ टक्क्यांवर स्थिरावला होता. परंतु दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरले आहे.
-
Maharashtra News | लालबागच्या राजाच्या गर्दीचे नियोजन मंडळाने करावे – अजित पवार
लालाबागच्या राजाचे देशभर नाव झाले आहे. यामुळे मंडळासमोर गर्दी वाढली आहे. गर्दीचे नियोजन करण्याचे काम मंडळाने करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
-
Maharashtra News | मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार
अंतरवाली सराटी येथे मराठा समाज पुन्हा एकवटणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील मराठा समाज एकत्र येणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांपैकी पैकी 30 दिवस 14 ऑक्टोबर संपतात. सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाज अंतरवाली सराटी एकवटणार आहे. तसेच जरांगे पाटील पुन्हा राज्याचा दौरा करणार आहे.
-
Maharashtra News | कोल्हापुरात आरोपीची मिरवणूक
कारागृहातून जामिनावर सुटलेल्या आरोपीची कोल्हापुरात मिरवणूक काढण्यात आली. भर रस्त्यात बिअरची बाटली फोडत नृत्य करण्यात आले. जंगी स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
-
Maharashtra News | पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे काठापूर येथील शेततळे फुटल्याने शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतातील उभी पिके आणि शेतातील मातीही पुराच्या पाण्यात वाहून गेली.
-
LIVE UPDATE | सोलापुरात टोमॅटोचे दर घसरल्यानं शेतकरी संतप्त; शेतकऱ्याने टोमॅटोची संपूर्ण बाग उखडली
सोलापुरातल टोमॅटोचे दर घसरल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्याने टोमॅटोची संपूर्ण बाग उखडली आहे. दर घसरले, उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
-
LIVE UPDATE | रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून लागला बॅनर
रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला आहे. पुणे – मुंबई मार्गावरील उर्से टोल नाक्यावर बॅनर लावला आहे.
-
LIVE UPDATE | नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंड अलर्ट
नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंड अलर्ट देण्यात आला आहे. कालच्या पुरस्थितीमुळे नागपूर येथे मोठं नुकसान झालं. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत.
-
LIVE UPDATE | राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रापर्यंत तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
Uma Bharati : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून उमा भारती आक्रमक; भाजपच्या अडचणी वाढणार
महिला आरक्षणावरून भाजप नेत्या उमा भारती आक्रमक झाल्या आहेत. महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशाराच उमा भारती यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
-
konkan : चाकरमानी निघाले मुंबईला, परतीचा प्रवास सुरू
पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांनी चिपळून येथील गॅस पंपवर वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी रांगाच रांगा लागल्या आहेत.
-
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात, दोन मेडल पटकावले
चीनमध्ये सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताने दोन पदके जिंकली आहेत. पहिलं पदक निशानेबाजीत तर दुसरं पदक मेंस डबल्स लाइटवेट स्कलमध्ये जिंकलं आहे.
-
vande bharat express : 9 वंदे भारत एक्सप्रेसचं आज लोकार्पण, महत्त्वाची शहरे जोडली जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 9 वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यामुळे महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. 11 राज्याच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळांना त्यामुळे जोडलं जाणार आहे.
Published On - Sep 24,2023 8:00 AM