Maharashtra Marathi News Live | अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? नांदेड घटनेवरुन आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

| Updated on: Oct 03, 2023 | 7:20 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi News Live | अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? नांदेड घटनेवरुन आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : गांधी जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जाणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आटोपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल. बैठकीत छत्तीसगड आणि राजस्थानातील जागांबाबत चर्चा झाली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात. मुंबईकरांना दिलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Oct 2023 09:01 PM (IST)

    Aditya Thackeray | दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणामुळे वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी खेळ सुरु : आदित्य ठाकरे

    मुंबई | नांदेडमध्ये औषधांअभावी गेल्या 24 तासांमध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय. या मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेवरुन आता राज्य सरकार आणि आरोग्यमंत्र्यांवरुन जोरदार टीका करण्यात येत आहे. या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे हल्लाबोल केला आहे.

    “ठाण्यात हेच झालं आता नांदेडला झालं. दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा ह्यामुळे वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे. अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

    आदित्य ठाकरे यांचं ट्विट

  • 02 Oct 2023 08:38 PM (IST)

    Kunal Patil | काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर धाड, गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु

    धुळे | काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर धाड टाकण्यात आली. दोन दिवसापासून पासून चौकशी सुरूच आहे. आज तिसऱ्या दिवशी ही सकाळ पासून तपासणी सुरूच आहे. रात्री दहापर्यंत ही चौकशी चालणार आहे. नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाची पथके असल्याची प्राथमिक माहिती आहे. मोराणे येथील जवाहर सहकारी सूतगिरणी मध्ये तपासणी सुरू आहे.

  • 02 Oct 2023 08:11 PM (IST)

    Ashish Shelar | आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांचा पराभव हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ : आशिष शेलार

    मुंबई | “आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचा पराभव हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे”, असं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत. “अरविंद सावंत हे गेल्यावेळी ते आमच्या ‘मेहेरबानीवर’ जिंकले. मोदीजींचे मोठे फोटो घेऊन प्रचारासाठी गेले. अकर्तृत्वान माणसालाही जिंकवण्याची किमया मोदीजींच्या नावात आहे. याकूब मेननची कबर सजविणाऱ्यांसोबत अरविंद सावंत मतं मागायला जात आहेत, याचा बदला दक्षिण मुंबईतील लोक निवडणुकीत घेतील”, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अरविंद सावंत यांच्यावर टीका केली.

  • 02 Oct 2023 08:01 PM (IST)

    महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री अयशस्वी ठरत आहेत- सुषमा अंधारे

    महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री अयशस्वी ठरत आहेत. अशा मंत्र्यांच्या हातात जर राज्याचे आरोग्य दिले तर ते धोक्याचे ठरू शकते, या घटनेचे गांभीर्य मुख्यमंत्री यांनी ओळखावे. नांदेडच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही टीका केलीये.

  • 02 Oct 2023 07:49 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमधील घटनेचा आढावा घेतलाय

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेडमधील घडलेल्या घटनेचा आढावा घेतलाय. नांदेडमध्ये रूग्णांना वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे २४ तासात २४ जणांना जीव गमवावा लागला. अजित पवार हे आज पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी आले असताना नांदेडमधील घटनेची माहिती त्यांनी मागवली.

  • 02 Oct 2023 07:33 PM (IST)

    अजित पवारांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये विविध विषयांसंदर्भात बैठका. चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवार यांची भेट. पुण्यात समाजमंदिर बांधकाम करण्याची केली मागणी

  • 02 Oct 2023 07:17 PM (IST)

    मुंबईचे हेच किमयागार आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कासारवाडी येथे चतुर्थ श्रेणीतील स्वच्छता कामगार राहतात. मुंबईमध्ये स्वच्छता साफसफाई करण्यासाठी हेच नागरिक आहेत ते मुंबईचे किमयागार आहेत. काल स्वच्छता अभियान केल्यानंतर आज दोन ऑक्टोबर रोजी या ठिकाणी मी आलो. जे मुंबईची स्वच्छता करतात, मुंबईचा आरोग्य सुधारतात ते कशा पद्धतीत राहतात हे मला प्रत्यक्ष बघायचं होतं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

  • 02 Oct 2023 07:04 PM (IST)

    Nashik News | कांदा व्यापाऱ्यांची बैठक संपली

    नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची बैठक संपलीये. व्यापारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या भेटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना झालेत. दादा भुसे यांच्याशी बोलून थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांची दिलीये.  प्रशासनाच्या अल्टिमेटमनंतर व्यापाऱ्यांचे एक पाऊल मागे

  • 02 Oct 2023 06:55 PM (IST)

    भाजपची जेजेपीसोबतची युती कायम राहिल्यास मी पक्ष सोडेन – बिरेंद्र सिंह

    भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांनी पक्षाच्या ओलांडून जींदमध्ये बोलावलेल्या “मेरी आवाज सुनो” रॅलीमध्ये एक मोठे विधान समोर आले आहे. हरियाणात भाजपची जेजेपीसोबतची युती कायम राहिल्यास मी भाजप सोडेन, असेही ते म्हणाले.

  • 02 Oct 2023 06:40 PM (IST)

    अपना दलच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याकडून जात जनगणनेचे समर्थन

    रायबरेली: केंद्रीय मंत्री आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल म्हणाल्या, “अपना दलाने नेहमीच जात जनगणनेचे समर्थन केले आहे आणि संसदेत आम्ही आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे की आम्ही जात जनगणनेच्या बाजूने आहोत आणि ही काळाची गरज आहे.

  • 02 Oct 2023 06:25 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयक 20 वर्षांपूर्वी यायला हवे होते – गुलाम नबी आझाद

    श्रीनगरमधील महिला आरक्षण विधेयकावर डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद म्हणाले की, ते 15-20 वर्षांपूर्वी यायला हवे होते. यूपीएच्या काळात आमच्याच पक्षाचे सदस्य विरोधात होते, एकमत नव्हते. आता सर्वांनी मिळून हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केले. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो.

  • 02 Oct 2023 06:05 PM (IST)

    उद्या मुख्यमंत्री नितीश यांनी जात जनगणनेवर सर्व 9 पक्षांची बैठक बोलावली

    जातीनिहाय जनगणनेच्या अहवालावर उद्या, मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी सर्व पक्षांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत 9 पक्ष सहभागी होणार आहेत. राज्य सरकार हा अहवाल सर्व पक्षांसमोर मांडणार असून आर्थिक सर्वेक्षणावर चर्चा होणार आहे. उद्या दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री नितीश सर्व 9 पक्षांची बैठक घेणार आहेत.

  • 02 Oct 2023 05:55 PM (IST)

    Mumbai News | समाजकंटकांकडून एसी लोकलवर दगडफेक

    मुंबई : मुंबईत समाजकंटाकांकडून चालत्या एसी लोकलवर दगडफेक करण्यात आलीय. कांदिवली ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान संबंधित घटना घडली.

  • 02 Oct 2023 05:47 PM (IST)

    ‘महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना व्हावी’, शरद पवार यांची मागणी

    पिंपरी चिंचवड : बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झालीय. तिथे जातनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यात आलीय. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

  • 02 Oct 2023 05:30 PM (IST)

    Nashik News | कांदा व्यापारी असोसिएशनची नाशिकमध्ये गुप्त बैठक

    नाशिक : कांदा व्यापारी असोसिएशनची नाशिकमध्ये गुप्त बैठक बोलावण्यात आलीय.  नाशिकच्या एका हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे. फक्त कांदा असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. आंदोलनात दोन गट पडल्याने असोसिएशनचे नेते पुन्हा चर्चेला लागले आहेत.  निफाड, विंचूर, नाशिक बाजार सुरू झाल्याने आंदोलनात फूट पडल्याचं उघड झालंय. बैठकीत बाजार सुरू करण्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. आंदोलन फसल्याने कांदा असोसिएशनचे पदाधिकारी बॅकफुटवर  आले आहेत.

  • 02 Oct 2023 05:23 PM (IST)

    कोणी कोणावर उपकार करत नाही, शरद पवार यांचं वक्तव्य

    पिंपरी चिंचवड –

    शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे –

    • अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. समाजातल्या पद्धती बदलायला हव्यात. व्यसन हे काही घटकांमध्ये आहेत. त्यासोबतच काही पद्धती बदलायला हव्यात. अगदी लग्नपद्धतीत ही दुरुस्ती करवी लागणार आहे. चुकीच्या चालीरीती बदलण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे.
    • काही घटकात व्यसनाचा विषय तो कसा थांबवला पाहिजे ही आवश्यकता आहे
    • लोकशाहीचे तुम्ही मालक आहेत, त्यामुळे तुमचा अधिकार आहे. कोणी कोणावर उपकार करत नाही. तुमच्या पदरात तुमचे अधिकार पडत नसतील, तर त्यासाठी सामूहिक शक्ती दाखवायला हवी, त्यात काही गैर नाही.
  • 02 Oct 2023 04:48 PM (IST)

    शिवाजीपार्क मैदान सोडणार नाही – चंद्रकांत खैरे

    छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे हे प्रामाणिक नेते आहेत, मात्र जरंगे यांच्या विरोधात जो ओबीसी समाज उठला आहे, त्यापाठीमागे नागपूरवाले आहेत. त्यांनीच ओबीसींना पेटवले आहे. शिंदे गट आहेच कुठे? मागच्यावेळी बिकेसी मैदानात दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. आमचा एक नेता एक मैदान आहे. आम्ही ते मैदान सोडणार नाही असे झालं तर महाराष्ट्रात काहीही होऊ शकत नाही, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिलाय.

  • 02 Oct 2023 04:19 PM (IST)

    धावत्या बसचे चाक निखळले, बस चालकाची सतर्कता

    जळगाव : जळगावातील जामनेरजवळ धावत्या बसचे चाक रस्त्यावर निखळून पडल्याची घटना घडली. छत्रपती संभाजी नगर ते मुक्ताईनगर अशी ही बस धावत होती. जामनेर नजीक असलेल्या कुऱ्हा गावाजवळ आल्यावर बसचे चक अचानक निखळून पडले. चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर नियंत्रण मिळवत काही अंतरावर जाऊन बस सुखरूप उभी केली. त्यामुळे बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचले.

  • 02 Oct 2023 04:01 PM (IST)

    पेंग्वीन कुटुंबाच्या पोटात दुखायला लागलं, आशिष शेलार यांची टीका

    मुंबई : कोथळा काढणारी वाघनखं परत येतायत त्यामुळे पेंग्वीन कुटुंबाच्या पोटात दुखायला लागलं अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय. नकली वाघ आता पुरावे मागायला लागलेत. उबाठाचे लोक वारंवार छत्रपतींच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करु पाहत आहेत. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागात आहेत आणि हास्यास्पद विधान करत आहेत. हे सगळे नकली वाघ आहेत. घाबरुन आता त्यांचा थयथयाट सुरु झाल्याची टीकाही त्यांनी केली.

  • 02 Oct 2023 03:57 PM (IST)

    पुण्यातील भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव बदला; केंद्रीय मंत्रालयाकडे मागणी

    पुण्यातील भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव बदला, अशी मागणी केंद्रीय मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी महामेट्रोने केली आहे. भोसरी स्टेशनचं नाव नाशिक फाटा असं करण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र महामेट्रोने लिहिलं आहे. स्टेशन ज्या ठिकाणी स्थित आहे त्या भागाला नाशिक फाटा नावानं ओळखलं जातं तर भोसरी या ठिकाणाहून पाच किमी दूर आहे, असंदेखील महामेट्रोने केंद्राला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलंय.

  • 02 Oct 2023 03:54 PM (IST)

    मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालंच पाहिजे- मनोज जरांगे पाटील

    परभणी : संत तुकाराम मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू झाली.  “मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालंच पाहिजे. विदर्भात मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यात आलं. मी मंत्री महोदयांना प्रश्न विचारला की ते शेतकरी आहेत तर आमच्याकडे काय समुद्र आहे का? मी खानदानी मराठ्याची औलाद आहे. मराठ्यांच्या नशिबाने 70 वर्षात जे घडलं नाही, ते मुंबईत झालं,” असं ते म्हणाले.

  • 02 Oct 2023 03:50 PM (IST)

    Pune Live | ऑनलाइन पेमेंट नंतर PMPL प्रवाशांसाठी आणखी एक सुविधा

    पुणे : ऑनलाइन पेमेंट नंतर PMPL प्रवाशांसाठी आणखी एक सुविधा आणणार आहे. प्रवाशांना आता घरबसल्या PMPL बसचं लोकेशन कळू शकणार आहे. PMPL बस गाड्यांचं आता लाइव्ह लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. PMPL लाइव्ह लोकेशनची सुविधा आणणार आहे. PMPL च्या 1200 बसेसमध्ये लाइव्ह लोकेशन ट्रॅकर सुरु करण्यात येणार आहे.

  • 02 Oct 2023 12:32 PM (IST)

    सोलापूरमध्ये धनगर समाजाच्यावतीने रास्ता रोको

    सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन सुरु झाले आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी 70 वर्षांपासून मागणी आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर यापुढे मंत्र्यांना जिल्हाबंदी घालून काळे फासू असा इशारा धनगर एसटी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी सरकारला दिला आहे.

  • 02 Oct 2023 12:03 PM (IST)

    LIVE UPDATE | पुण्यात PMPLच्या क्यूआर कोडला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

    PMPLच्या क्यूआर कोडला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी क्यूआर कोडचा वापर 1500 प्रवाशांनी केला आहे. PMPL च्या डिजिटल व्यवहाराला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी ऑनलाइन पद्धतीने पीएमपीएलने 27 हजार रुपये कमावले आहेत. PMPL कडून रविवारी ऑनलाईन पद्धतीने तिकीट स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनर पद्धतीची योजना सुरू करण्यात आली आहे.

  • 02 Oct 2023 11:27 AM (IST)

    LIVE UPDATE | आमदार सुमनताई पाटील उपोषण सुरु करण्याआधीच योजनेला सुरुवात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विस्तारीत ८ टीएमसी पाण्याला मंजुरी देण्यात आली आहे. आमदार सुमनताई पाटील उपोषण सुरु करण्याआधीच योजनेला सुरुवात झाली आहे. मंजुरी दिल्यानंतर खानापूर, आटपाटी, तासगाव तालुक्यातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 02 Oct 2023 11:16 AM (IST)

    LIVE UPDATE | कोल्हापूरच्या आळते गावात डेंग्यूचा कहर

    कोल्हापूरच्या आळते गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. दोन महिन्यात गावातील एक हजारांहून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे. आळते गावातील अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा कहर. डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 02 Oct 2023 10:51 AM (IST)

    राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती, 26% टक्के पाण्याची कमतरता

    राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 26% टक्के पाण्याची कमतरता आहे. यंदा 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सांगली मध्ये सर्वात कमी 44 % पाऊस झाला.

  • 02 Oct 2023 10:44 AM (IST)

    आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचं आजपासून उपोषण

    आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच उपोषण आजपासून सुरू होणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थोड्याच वेळात उपोषण सुरू होईल.

  • 02 Oct 2023 10:33 AM (IST)

    मुंबईतील मराठी माणसाच्या परिस्थितील एकनाथ शिंदे जबाबदार – संजय राऊत

    महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जात आहे. मराठी माणसाच्या परिस्थितील एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. शिंदेच्या माध्यमातून भाजप मराठी माणसाला कमजोर करत आहे,   अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 02 Oct 2023 10:30 AM (IST)

    निवडणूक आयोग कुणाचं दुकान आहे का ? संजय राऊत

    निवडणूक आयोग्याच्या माध्यमातून दिल्लीतील राज्यकर्ते खेळ खेळत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. निवडणूक आयोग कुणाचं दुकान आहे का ? असा सवालही त्यांनी विचारला.

    उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आली तेव्हा एकनाथ शिंदे हे कार्यकारिणीतही नव्हते, असे ते म्हणाले.

  • 02 Oct 2023 10:17 AM (IST)

    पुणे ISIS मॉड्युल प्रकरणातील फरार आरोपी शाहनवाजला अटक

    पुण्यातील ISIS मॉड्युल प्रकरणातील फरार आरोपी शाहनवाजला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. इतरही काही जण ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

  • 02 Oct 2023 10:11 AM (IST)

    सुजित पाटकरने राऊतांच्या नावानं कंत्राट मिळवलं – सोमय्यांचा आरोप

    सुजित पाटकरने संजय राऊतांच्या नावाने कंत्राट मिळवलं. याबाबत राऊत यांना माहीत होतं, त्यांच्याच नावाचा वापर करण्यात आला असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

  • 02 Oct 2023 10:06 AM (IST)

    राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या नेत्यांची बैठक

    लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

  • 02 Oct 2023 09:59 AM (IST)

    Maharashtra News | अमरावतीत डेंग्यू रुग्ण वाढले

    अमरावती जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आठवड्याभरात तब्बल 5 हजार रुग्ण आले आहे. अमरावती जिल्ह्यात मागील 9 महिन्यांत 247 डेंग्यूचे रुग्ण तर 54 चिकनगुनीयाचे रुग्ण सापडले. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 180 डेंग्यूचे रुग्ण सापडले.

  • 02 Oct 2023 09:49 AM (IST)

    Maharashtra News | स्वच्छता करताना सापडले चरस

    रायगडमधील अलिबाग येथे स्वच्छता मोहीम करण्यात आली. या मोहिमे दरम्यान चरसची पाकिटे सापडली. अलिबागच्या वरसोली समुद्रकिनारी १० पाकिटे सापडली. गांधी जयंती निमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता अभियान राबण्यात आले.

  • 02 Oct 2023 09:32 AM (IST)

    Maharashtra News | काँग्रेस आमदार कृणाल पाटील यांची सूतगिरणी सील

    काँग्रेस आमदार कृणाल पाटील यांची सूतगिरणी आयकर विभागाकडून सील करण्यात आली आहे. त्यांच्या सूतगिरणीवर गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची तपासणी सुरु होती. अखेर ती गिरणी सील केली गेली आहे.

  • 02 Oct 2023 09:21 AM (IST)

    Maharashtra News | आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा हल्ला

    आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील कळंब परिसरातील दत्तात्रय चव्हाण यांच्या घरापुढील शेडमध्ये असणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या परिसरात बिबट्या असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

  • 02 Oct 2023 09:08 AM (IST)

    Maharashtra News | अजित पवार यांच्याकडून कंत्राटदारांना कानपिचक्या

    बारामतीत अजित पवार यांनी प्रशासनाला स्वच्छतेचे धडे दिले. पोलिस उपमुख्यालय पाहताना त्यांना कचरा दिसला. त्यानंतर अस्वच्छतेवरुन अजित पवार यांनी प्रशासन व कंत्राटदारांना कानपिचक्या दिल्या.

  • 02 Oct 2023 08:58 AM (IST)

    Maratha Reservation | आज हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा

    मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. आज नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाशी जरांगे पाटील साधणार संवाद. आज तिसऱ्या दिवशी नांदेड मधून दौऱ्याला सुरुवात. आज पहिली सभा हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथे पार पडणार आहे.

  • 02 Oct 2023 08:48 AM (IST)

    Kokan Railway | मालगाडीचे डब्बे घसरले, निळजे स्टेशनवर राडा

    पनवेल लाईनवर मालगाडीचे डब्बे घसरल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशी संतप्त. दिवा, निळजे या स्टेशनवर प्रवाशांचा आक्रोश. निळजे स्टेशनवर बेंगलोर एक्सप्रेस ही गाडी जवळपास एक ते दीड तास थांबून असल्याने प्रवासी संतापले. निळजे स्टेशन वरती राडा. निळजे रेल्वे स्टेशनवर कार्यालयाची तोडफोड करत कार्यालयाच्या फोडल्या काचा. लाथा बुक्क्यांनी आर पी एफ जवानांशी हाणामारी.

  • 02 Oct 2023 08:30 AM (IST)

    OBC Reservation | आजपासून भाजपाच्या OBC सेलची जागर यात्रा

    आजपासून भाजपाच्या OBC सेलची जागर यात्रा सुरु होणार आहे. सेवाग्राम आश्रमातून जागर यात्रा सुरु होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार.

  • 02 Oct 2023 08:13 AM (IST)

    Nashik Rain | नाशिकमध्ये आतापर्यंत किती टक्के पाऊस?

    मान्सूनच्या आता परतीच्या प्रवासाला सुरुवात. नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर पर्यंत 68 टक्के पावसाची नोंद झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्या पावसाची नोंद. सप्टेंबर महिन्यात पावसाने काहीशी हजेरी लावल्याने धरणे भरली. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली, तरी खरीप हंगामात नुकसान झालय.

  • 02 Oct 2023 08:00 AM (IST)

    Rain : कोकणाला ऑरेंज तर विदर्भाला आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

    आज कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • 02 Oct 2023 07:45 AM (IST)

    onion price : कांदा व्यापारी संपावर ठाम, 13 व्या दिवशीही निर्णय नाहीच

    नाशिकमधील कांदा व्यापारी संपावर ठाम आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे व्यापारी संपावर गेले असून अजूनही संपावर आहेत. कांदा लिलाव सुरू करणार नसल्याचं या व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संपावर तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 02 Oct 2023 07:36 AM (IST)

    Gandhi Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महात्मा गांधी यांना अभिवादन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांची आज 154 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने राजघाटावर सर्व धर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 02 Oct 2023 07:30 AM (IST)

    Gandhi Jayanti : गांधी जयंती निमित्त देशभरात स्वच्छता अभियान, विविध कार्यक्रमांचं आयोजन

    महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. तसेच मुंबईत काँग्रेसकडून भाजपच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

  • 02 Oct 2023 07:21 AM (IST)

    Rain : येत्या 48 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

    दक्षिण कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुण्यातही आणखी दोन दिवस पाऊस पडेल असा हवामाना खात्याने अंदाज वर्तवला आहे. मात्र 4 तारखे नंतर राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

Published On - Oct 02,2023 7:17 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.