Maharashtra Marathi News Live : राज्य सरकारच्या त्या मोठ्या घोषणेचा अखेर शासन निर्णय जारी

| Updated on: Aug 31, 2023 | 7:17 AM

Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. मुंबई आज आणि पुढचे दोन दिवस काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे.

Maharashtra Marathi News Live : राज्य सरकारच्या त्या मोठ्या घोषणेचा अखेर शासन निर्णय जारी

मुंबई : येत्या 31 ऑगस्टला मुंबईत काँग्रेस प्रणीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी आहे. मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. इंडिया आघाडीतील 26 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून बैठकी संदर्भात माहिती देण्यात येईल. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहार पाटनामध्ये झाली होती. दुसरी बैठक बंगळुरु येथे झाली होती.

आता तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा संयोजकाची निवड होऊ शकते. मल्लिकार्जुन खर्गे यांच नाव संयोजकपदासाठी चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणं हा इंडिया आघाडीचा उद्देश आहे. दरम्यान शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. शरद पवार आमच्या ह्दयात आहेत. शरद पवार यांना आम्ही सोडलेलं नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Aug 2023 09:21 PM (IST)

    Pro Govinda League 2023 | गोविंदांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, अखेर जीआर जारी

    मुंबई | दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना अनेकदा अपघात होतात. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री यांनी दिली.

    गोविंदांना मोठा दिलासा

  • 30 Aug 2023 09:10 PM (IST)

    पुणे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही

    पुणे | पुणे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करुन निवडणूक टळणार, अशी माहिती समोर आली आहे.  29 सप्टेंबरपर्यंत दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणूक जाहीर होणं अपेक्षीत होतं. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम किमान 30 ते 35 दिवस आधी जाहीर होत असतो. मात्र, अद्याप कार्यक्रम जाहीर करण्यात आला नसल्याने पोटनिवडणुकीची शक्यता संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे. आता थेट 2024 ला लोकसभा निवडणूक लागणार आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे 28 मार्च तर चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झालं होतं.

  • 30 Aug 2023 08:32 PM (IST)

    Pune News | पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत रांगा

    पुणे | पुण्यातील चांदणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांबपर्यंत रांगा बघायला मिळत आहेत.  रोजच्या वाहतूककोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे 12 ऑगस्टला चांदणी चौक उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची अद्याप सुटका झालेली नाही.

  • 30 Aug 2023 08:29 PM (IST)

    Mamata Banerjee meet Uddhav Thackeray | ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

    मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंंत्री ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी मुंबईत आल्यानंतर सर्वात आधी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी भेट दिली. तिथे त्यांनी बच्चन कुटुंबियांची भेट घेतली. ममता दीदी आणि बच्चन कुटुंबियांमध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर ममता बॅनर्जी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली.

  • 30 Aug 2023 07:59 PM (IST)

    पुणे आणि चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे

    पुणे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करुन निवडणूक टाळणार असल्याचे सांगितले जात आहे. 29 सप्टेंबरपर्यंत दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणूक जाहीर होणे अपेक्षीत होते.

  • 30 Aug 2023 07:39 PM (IST)

     Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्याच जिल्हात तहसीलदाराला मारहाण

    अहमदनगर नेवासा येथे एक धक्कादायक घटना घडलीये. चक्क तहसीलदाराला मारहाण करण्यात आलीये. पोलिसांच्या उपस्थितीत नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार यांना मारहाण झालीये. रस्त्याचा वाद सोडवण्यासाठी गेले असता एका गटाकडून मारहाण करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. महसूल मंत्र्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील घटनेने खळबळ घडलीये.

  • 30 Aug 2023 07:27 PM (IST)

    Pune News : कसब्याच्या विकास निधीवरुन रासने- धंगेकरांमध्ये रंगला शाब्दिक वार 

    कसब्याचा निधी पर्वती मतदार संघाला दिल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी नुकताच केला आहे. तर आधी संपूर्ण माहिती घ्या, मग आरोप करावे असे हेमंत रासने यांनी म्हटले आहे. निधी वाटपात चंद्रकांत पाटील भेदभाव करीत असल्याचा आरोप धंगेकरांचा आहे.

  • 30 Aug 2023 07:18 PM (IST)

    NCP- राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मणिपूरमध्ये पाठवली मदत

    नुकताच आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मणिपूरमध्ये मदत पाठवली आहे. मणिपूरच्या राज्यपालांची भेट देखील घेण्यात आलीये आणि मदत सुपुर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप आणि धीरज शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतली

  • 30 Aug 2023 07:07 PM (IST)

    Mumbai News : सुषमा अंधारे यांनी बांधली उद्धव ठाकरे यांना राखी

    नुकताच आता सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आहे.  मुंबईतील बैठकी वेळी अंधारे यांनी ठाकरे यांची भेट घेत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांना राखी बांधली आहे.

  • 30 Aug 2023 07:03 PM (IST)

    Pune News : चांदणी चौकात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी

    पुणे बेंगलोर महामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून बेंगलोरकडे जाणाऱ्या मार्गावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा बघायला मिळत आहेत. चांदणी चौकातील नवीन पुलावर देखील मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालीये. ह्या वाहतूक कोंडीत अंमबुल्स देखील अडकल्या आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे.

  • 30 Aug 2023 06:54 PM (IST)

    PAK vs NEP : पाकिस्तानचं नेपाळसमोर 343 धावांचं आव्हान

    पाकिस्तानने 50 षटकात 6 गडी गमवून 342 धावा केल्या आणि विजयासाठी 343 धावांचं आव्हान दिलं आहे. आता नेपाळचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

  • 30 Aug 2023 06:36 PM (IST)

    काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परतल्यास खोऱ्यातील निराशा संपेल : मेहबुबा मुफ्ती

    पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परतत नाहीत आणि सन्मानाने आणि आनंदाने जगत नाहीत तोपर्यंत काश्मीर खोऱ्यातील निराशेचे वातावरण संपणार नाही.

  • 30 Aug 2023 06:18 PM (IST)

    ममता बॅनर्जी यांनी मुंबईत घेतली बच्चन कुटुंबियांची भेट

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई बच्चन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली. अमिताभ बच्चन यांना बंगालमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

  • 30 Aug 2023 06:14 PM (IST)

    PAK vs NEP : बाबर आझमने पाकिस्तानचा डाव सावरला

    नेपाळ विरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने पाकिस्तानचा डाव सारवरला. शतकी खेळी करत पाकिस्तानला 250 धावांच्या पार मजल मारण्यात मदत केली आहे. अजूनही काही शतकांचा खेळ बाकी असून 300 धावांचा आकडा गाठेल अशी स्थिती आहे.

  • 30 Aug 2023 06:04 PM (IST)

    India Political Meet : मुंबईत ‘इंडिया’ची बैठक, 28 राजकीय पक्ष घेणार भाग

    मुंबईत भाजपा विरोधी गटाच्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्टला होणार आहे. या बैठकीत 28 राजकीय पक्ष भाग घेणार आहेत. शरद पवार यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी भाग घेतील. विरोधी आघाडीची ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये होणार आहे. यापूर्वीच्या दोन बैठका पाटणा आणि बंगळुरु येथे झाली होती.

  • 30 Aug 2023 04:25 PM (IST)

    India Alliance News : वंचित सोबत आमची युती- उद्धव ठाकरे

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत आमची युती असल्याचे उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. इंडिया आघाडीत त्यांना घेण्याविषयी चर्चा होईल. आंबेडकर यांची इंडिया आघाडीत येण्याची इच्छा आहे का, ते विचारावे लागेल असे त्यांनी सांगितले.

  • 30 Aug 2023 04:15 PM (IST)

    India Alliance News :  केंद्र सरकार सध्या गॅसवरती-उद्धव ठाकरे 

    गेल्या 9 वर्षांत रक्षा बंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल, असा चिमटा त्यांनी काढला.

  • 30 Aug 2023 04:13 PM (IST)

    India Alliance News : लोकांना परिवर्तन हवं आहे-शरद पवार

    लोकांना देशात परिवर्तन हवं आहे. अनेक राज्यातून आम्हाला, इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 28 पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 30 Aug 2023 04:08 PM (IST)

    India Alliance News : इंडियाचं रक्षणं करणे ही आपली जबाबदारी

    इंडियाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. शाहु-फुले-आंबेडकर यांचे विचारधारा पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीत 36 पक्ष आले आहे. पूर्वी हा आकडा 28 इतका होता.

  • 30 Aug 2023 04:04 PM (IST)

    India Alliance News : उद्यापासून मुंबईत इंडिया आघाडीची बैठक

    उद्यापासून मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी सध्या इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरु आहे. हॉटेल ग्रँड हयातमध्ये ही पत्रकार परिषद सुरु आहे.

  • 30 Aug 2023 03:44 PM (IST)

    साचलेल्या पाण्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

    अकोला शहरांमध्ये बनविण्यात आलेल्या अंडरपासमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी साचले आहे. या पाण्यामुळे या अंडरपासमधील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे महापालिकेने या अंडरपासमधील पाणी काढावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे अंडरपासमध्ये आंदोलन करण्यात आले.

  • 30 Aug 2023 03:31 PM (IST)

    संजय राठोड यांना पाचशे महिलांनी बांधल्या राखी

    यवतमाळ : भाऊ आणि बहीण यांच्या पवित्र नात्याला जपणारा सण उत्साहात साजरा केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना पाचशे महिलांनी राखी बांधल्या. कोणत्याही संकटात हा भाऊ आपल्या पाठिशी उभा राहील, असे आश्वासन मंत्री संजय राठोड यांनी दिलं. हा रक्षाबंधन कार्यक्रम मंत्री राठोड यांच्या विदर्भ हाऊसिंग सोसायटीच्या जनसंपर्क कार्यालयात झाला.

  • 30 Aug 2023 03:09 PM (IST)

    रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

    नांदेडमध्ये आज जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे तीर्थक्षेत्र माहूर गडावर भाविकांची गर्दी उसळलीय. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गडावर गर्दी केली. भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे मंदिर देवस्थानाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त गडावर तैनात केला.

  • 30 Aug 2023 02:28 PM (IST)

    Rahit Pawar News : हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आपमान – रोहित पवार

    गेल्या काळापासून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नितीन आयोगाच्या माध्यमातूनही तेच केलं जातय याचा आम्ही निषेध करतो.

  • 30 Aug 2023 02:26 PM (IST)

    Nashik News : नाशिक महापालिकेच्या रडारवर पार्किंगचा मुद्दा

    नाशिकमध्ये ग्राहकांऐवजी हॉटेल्सकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा महापालिकेचा विचार. पालिकेकडून पार्किंग योजनेसाठी जागांची चाचपणी सुरू. नाशिक महानगर पालिकेचा वाहतूक विभाग अॅक्टिव्ह होणार. गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड याशिवाय रिंग रोड परिसरात हॉटेल्ससमोर वाहने लावली जातात. खवय्यांकडून रस्त्यात होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी.

  • 30 Aug 2023 02:06 PM (IST)

    Pandharpur News : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खासगीकरणास वाखरी ग्रामस्थांचा विरोध

    खासदार सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळण्याची उच्च न्यायालयास विनंती. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर टेम्पल ॲक्ट रद्द करून श्री विठ्ठल मंदिर खासगीकरण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. वाखरी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी या कायद्याच्या विरोधात दाखल याचिका फेटाळून लावली जावी हा ठराव केला मंजूर. वाखरी ग्रामपंचायतने सरपंच धनश्री साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेतली होती.

  • 30 Aug 2023 02:01 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत ८१ टक्के पाऊस, सहा जणांचा बळी

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस दडी मारून बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 81 टक्के पाऊस पडला आहे. उर्वरित पाऊस केव्हा पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ६ व्यक्तींचा मृत्यू झाला. 6 जणांना जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 650 घरगुती गोठे पडलेत .

  • 30 Aug 2023 02:01 PM (IST)

    Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यात आणखी एक बँकेवर RBI चे निर्बंध

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणलेत. मलकापूर पतसंस्था, आदर्श पतसंस्थेनंतर आता अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध. अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या गैरकारभारावर आरबीआयने ताशेरे ओढले. कर्जाचे नूतनीकरण, निधीची उलाढाल, नवीन ठेवी स्वीकारणे तारण करार करण्यावर बंदी घातली.

  • 30 Aug 2023 01:58 PM (IST)

    Bhima-Koregaon News : प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदणी संपली

    कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंद संपली. तब्बल तीन तास आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी साक्ष दिली.

  • 30 Aug 2023 01:00 PM (IST)

    नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत आलं चारपटीने महागलं

    नवी मुंबई | नेहमी बेंगळुरूहून येणारे आलं तुरळक प्रमाणात येत असल्याने बाजारात आल्याची कमतरता निर्माण झाली आहे. एक किलो आल्याच्या दराने पाव किलो आलं खरेदी करावं लागत आहे. किरकोळ बाजारात पाव किलो आल्यासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक बाजारात आलं ९० ते ११० रुपये किलो आहे. त्यातही किरकोळ बाजारात आलं 180 ते 220 रुपये आणि त्यातही चांगलं आलं हे 240 रुपये किलोपर्यंत पोहोचलं आहे.

  • 30 Aug 2023 12:45 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं मणिपूरमध्ये साजरा केला रक्षाबंधन

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं मणिपूरमध्ये रक्षाबंधन साजरा केला. मणिपुरातील तेरापुरा गावाला त्यांनी मदत केली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप ही मदत घेऊन गेले.

  • 30 Aug 2023 12:30 PM (IST)

    एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 40 आमदारांसाठी सुषमा अंधारे यांनी खरेदी केल्या राख्या

    ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रक्षाबंधननिमित्त 40 राख्या खरेदी केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना सुषमा अंधारे या राख्या बांधणार आहेत. “ते 40 जण माझे भाऊ असून त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. किमान एक तरी भावाने आज माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावं,” अशी इच्छा अंधारे यांनी बोलून दाखवली.

  • 30 Aug 2023 12:16 PM (IST)

    Pune News | पुण्यातील अनधिकृत रुफ टॉप हॉटेल्सवर होणार कारवाई

    पुणे : पुण्यातील अनधिकृत रुफ टॉप हॉटेल्सवर कारवाई होणार आहे. महापालिकेने आतापर्यंत 97 हॉटेल्सवर कारवाई केली आहे. अनधिकृत हॉटेलवर कारवाई करा आणि पंधरा दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत.

  • 30 Aug 2023 11:49 AM (IST)

    ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत राजू शेट्टी सहभागी होणार नाहीत

    31 ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेस प्रणीत ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. मात्र या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी हे सहभागी होणार नाहीत.

    बैठकीचं निमंत्रण मिळालं मात्र सहभागी होणार नाही, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

  • 30 Aug 2023 11:31 AM (IST)

    अजितदादांवर भाऊ आता वरचढ – विजय वडेट्टीवार

    अजितदादांवर फडणवीस हे आता वरचढ होत आहेत. साखर कारखान्यांबाबतचा जीआर मागे घेतल्याने विजय वडेट्टीवार यांनी लगावला टोला.

    राज्य सरकारमध्ये इतक्या लवकर धुसफूस सुरू होईल असं वाटल नव्हतं, अशी टीकाही त्यांनी केली.

  • 30 Aug 2023 11:16 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी

    पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

    शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर , मुळशी या सात तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रसार वाढत असल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे.

  • 30 Aug 2023 11:15 AM (IST)

    पुणे – कालीचरण महाराजाविरोधात गुन्हा दाखल, भडकाऊ भाषण करणे भोवले

    शिवजयंतीच्या दिवशी पुण्यात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 30 Aug 2023 11:07 AM (IST)

    गुजरातमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू

    गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळणार आहे.

    न्यायमूर्ती झवेरी आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

  • 30 Aug 2023 10:41 AM (IST)

    फारूख अब्दुल्ला मुंबईत दाखल, जागावाटपाची घाई नाही

    इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी फारूख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना जागावाटपाची घाई सध्या तरी करून चालणार नाही. जास्तीत जास्त बहुमत मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं फारूख अब्दुल्ला म्हणाले.

  • 30 Aug 2023 10:15 AM (IST)

    केंद्राला मुंबई गिळायची आहेत- संजय राऊत

    केंद्राला मुंबई गिळायची आहे, मुंबईतील अनेक महत्त्वाची कार्यालय गुजरातला नेलीत. ठाकरेंच्या काळात गॅस दरामध्ये कमी करण्याचा निर्णय घेता आला नसता. लाचार मुख्यमंत्री बनवून केंद्रान निर्णय घेतल्याचं संजय राऊत म्हणाले.

  • 30 Aug 2023 10:08 AM (IST)

    आमच्या लुटीतील 200 रूपयांचा तुकडा तोंडावर फेकला- राऊत

    केंद्र सरकारने गॅसच्या किमतीमध्ये 200 रूपये कमी केले आहेत. यावर बोलताना संजय राऊत यांनी आमच्या लुटीतील 200 रूपयांचा तुकडा सर्वसामान्यांच्या तोंडावर फेकला असल्याचं म्हटलं आहे.

  • 30 Aug 2023 09:47 AM (IST)

    LIVE UPDATE | पंकाजा मुंडे यांच्या शिवशक्ती दौऱ्याला सुरुवात

    नांदेडमधून पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ११ दिवसात पंकजा मुंडे १० पेक्षा जास्त जिल्ह्यात दौरा करणार आहेत. पंकजा मुंडे आज माहूरच्या रेणुकामाता शक्तीपीठाचं दर्शन घेणार आहेत.

  • 30 Aug 2023 09:40 AM (IST)

    LIVE UPDATE | संजय राऊतांविरोधात नितेश राणेंचं एटीएस प्रमुखांना पत्र

    संजय राऊतांविरोधात नितेश राणेंचं एटीएस प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. संजय राऊत यांवर कारवाई करुन दंगलीची माहिती घ्यावी… असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाहीतर राऊत यांची नार्को टेस्ट करावी असं वक्तव्य देखील नितेश राणे यांनी केलं आहे.

  • 30 Aug 2023 09:04 AM (IST)

    LIVE UPDATE | मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, मुंबईच्या दिशेला येणाऱ्या सर्व लोकल गाड्या 15 ते 20 लेट

    मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे. नेरळ-वांगणी दरम्यान मालगाडीचा कपलिंग निघाल्याने डब्बे वेगळे झाले आहेत. घटनेनंतर कर्जत ते सीएसएमटी/कल्याण दिशेने येणारी लोकल थांबविण्यात आली आहे.तर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत. मुंबईच्या दिशेला येणाऱ्या सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे…

  • 30 Aug 2023 08:58 AM (IST)

    Entertainment Update | ‘या’ प्रोमोकोडचा वापर करत ‘गदर २’ सिनेमाच्या तिकिटांवर मिळावा Buy 2 Get 2 ऑफर

    अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाला मिळत असलेलं प्रेम लक्षात घेत, सिनेमाच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे सिनेमात्या निर्मात्यांनी Buy 2 Get 2 ऑफर प्रेक्षकांना दिली आहे. ज्यामुळे सनी देओल यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे…. वाचा सविस्तर

  • 30 Aug 2023 08:50 AM (IST)

    पुणे लोकसभेसाठी सुनील देवधर इच्छूक

    पुणे लोकसभेसाठी सुनील देवधर अधिक इच्छूक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मुरलीधर मोहोळ, सुनील देवधर अजून एक उमेदवार इच्छूक आहे. सुनील देवधर यांची गांभीर्याने चर्चा झाली आहे.

  • 30 Aug 2023 08:41 AM (IST)

    किशोरी पेडणेकरांचा जामीन अर्ज फेटाळला

    किशोरी पेडणेकरांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पेडणेकरांनी पदाचा गैरवापर केल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती समजली आहे.

  • 30 Aug 2023 08:24 AM (IST)

    शिकागो विद्यापीठाच्या अहवालामुळे वायू प्रदूषणाची भीती

    नवी दिल्ली – शिकागो विद्यापीठाच्या अहवालात वायू प्रदूषणाची भीती जाहीर केली आहे. भारतीयांचे आयुष्य पाच वर्षांनी कमी होणार तर राजधानी दिल्लीतील नागरिकांचे आयुष्य बारा वर्षांनी कमी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण देशभरात राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिकागो विद्यापीठातील एका संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

  • 30 Aug 2023 08:16 AM (IST)

    पाण्याअभावी पीकं करपायला सुरुवात

    माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील रेडे गावात पाण्याअभावी मका,बाजरी, कांदा पिके जळून चालली असून गेली तीन महिने झाले पाऊस नसल्यामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

  • 30 Aug 2023 08:15 AM (IST)

    विठ्ठलास सुकामेव्यापासून तयार केलेले दागिने परिधान

    श्रावण महिन्यानिमित्त सावळ्या विठुरायास उदगीर येथील विठ्ठल भक्त सौ योगेश्वरी ईश्वर बोथीकर यांनी पिस्ता,चारोळी, मनुके अशा सुकामेव्याच्या वस्तूंपासून सुंदर हसा चंद्रहार करून गळ्यात घातला आहे. हार ,बाजूबंद , चोकर वाकी असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हे विठ्ठलास सुकामेव्यापासून तयार करून परिधान करण्यात आले आहेत.

  • 30 Aug 2023 07:56 AM (IST)

    Farmer news : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर कांदा अनुदान जमा होणार. 1 लाख 72 हजार शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 435 कोटींचे अनुदान यापूर्वीच मंजूर. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांत होती नाराजी. अखेर शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा

  • 30 Aug 2023 07:41 AM (IST)

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

    मुंबईतील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत? रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेतीन हजारकोटी का खर्च केले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

  • 30 Aug 2023 07:21 AM (IST)

    Ratnagiri sindhudurg loksabha : उदय सामंत यांच्या सख्ख्या बंधुंना लोकसभेच तिकीट मिळणार?

    रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली जाणार आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे सख्खे बंधू आहेत. सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत इथून खासदार आहेत.

  • 30 Aug 2023 07:16 AM (IST)

    Farmer news : शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा

    गोंदियामध्ये 433 शेतकऱ्यांना चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा. 100 शेतकऱ्यांचे मूळ बिल नसल्यामुळे याबाबत आता शासन स्तरावर कोणता निर्णय होतो याकडे लक्ष आहे. दहा दिवसात पैसे जमा न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करू अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

Published On - Aug 30,2023 7:13 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.