Maharashtra Marathi News LIVE Updates : विधीमंडळ शिंदे-ठाकरे यांना नोटीस पाठवणार
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : मतदारसंघातील 100 कोटींच्या कामांना महायुती सरकारने मंजुरी दिली नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. नांदेडमधील सरकारी रुग्णालयातील मृतांचा आकडा 35 वर गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल. मध्यप्रदेशात तीन मजली इमारत कोसळली. अनेक लोक दबल्याची भीती. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Shiv Sena | शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळच्या कार्यवाहीला वेग
मुंबई | विधीमंडळ शिंदे-ठाकरे यांना नोटीस पाठवणार आहे. शिवसेना कुणाची हे ठरवण्यासाठी कार्यवाहीला आता वेग आला आहे. दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. जुलै 2022 मध्ये शिवसेनेची सूत्र कुणाकडे होती हे तपासलं जाणार आहे.
-
Vijay wadettiwar | सरकारकडून केवळ नागरिकांची दिशाभूल : विजय वडेट्टीवार
मुंबई | सरकारकडे आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत मात्र औषधांसाठी नाहीत”, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारकडून केवळ नागरिकांची दिशाभूल असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.
-
-
Bacchu Kadu | बच्चू कडू यांचा भाजपवर निशाणा
अमरावती | आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान दिलं आहे. माझ्या मतदारसंघात भाजपचा जास्त त्रास आहे. तसेच 10 खासदार पाठवले तरी बच्चू कडू पडणार नाही, असं आव्हानच कडू यांनी बावनकुळे यांना दिलं आहे.
-
सत्ताधारी आणि विरोधकांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही- राजू शेट्टी
सत्ताधारी आणि विरोधकांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाहीय. त्यामुळे मी कुठल्याच आघाड्यांमध्ये जाणार नाही, शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून मला संसदेत पाठवायचं असेल तर एक मत द्यावं. थकीत एफआरपीसाठी येत्या 17 तारखेपासून माझी पदयात्रा सुरू होणार आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
-
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उद्याचा ब्लॉक रद्द
काही तांत्रिक कारणांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गुरुवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. आता तो रद्द करण्यात आलाय.
-
-
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द
अहमदनगर जिल्ह्यासह 116 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द करण्यात आलीये. बँकेची मान्यता रिझर्व बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने जिल्ह्यात खळबळ निर्माण झालीये. पाच वाजता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँकेला मेल करून याबद्दल माहिती देण्यात आलीये.
-
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गा संबंधित अत्यंत मोठी बातमी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक असेल. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे.
-
Kalyan News | मोहणे परिसरात गोळीबाराची घटना
कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मोहणे परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आलीये. शासकीय रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय.
-
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी विरोधकांवर बरसल्या
केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या, “विरोधक शासन व्यवस्थेवर सत्ता गाजवायला आणि आपली घरे आणि कुटुंबे सुधारण्यासाठी आले आहेत. मोदी सरकारनेच ठरवले आहे की न खाणार, ना खाऊ देणार. त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर चौकशी होईल आणि शिक्षाही होईल.”
#WATCH केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी ने कहा, "विपक्ष के लोग शासन की व्यवस्था में राज करने और अपने घर परिवार को बेहतर करने के लिए आए हैं। ये मोदी सरकार है जिसने तय किया है कि ना खाऊंगा ना खाने दूंगा। देश की जांच एजेंसियां भारत के नियम और कानून के तहत बनाई गई है ताकि देश में… pic.twitter.com/mD49s63IPt
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे – सोमनाथ भारती
संजय सिंह यांच्या अटकेवर आपचे आमदार सोमनाथ भारती म्हणाले की, देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपा हरणार आहे. इंडिया जिंकणार आहे. ही त्यांची अस्वस्थता आहे. संजय सिंह, मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही. आम्ही लढत राहू.
दिल्ली शराब नीति मामले में पार्टी नेता संजय सिंह की गिरफ्तारी पर आप विधायक सोमनाथ भारती ने कहा, "देश में अघोषित आपातकाल है। आपातकाल का आगाज हो चुका है। भाजपा 2024 का चुनाव हार रही है, INDIA की जीत हो रही है। ये उसी की घबराहट है। संजय सिंह, मनीष सिसोदिया के खिलाफ कोई भी सबूत नहीं… pic.twitter.com/EpJTBzT8fu
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
काँग्रेस कोणत्याही अनियमिततेचे समर्थन करत नाही- लवली
आपचे खासदार संजय सिंह यांना अटक केल्यावर दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली म्हणाले की, काँग्रेस कोणत्याही अनियमिततेचे समर्थन करत नाही. दारू घोटाळ्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण एजन्सीचाही गैरवापर होता कामा नये.
#WATCH कांग्रेस किसी भी अनियमितता का समर्थन नहीं करती है, जो शराब घोटाले में दोषी हैं उनके ख़िलाफ कार्रवाई होनी चाहिए लेकिन एजेंसी का दुरुपयोग भी नहीं होना चाहिए… : ED द्वारा आबकारी नीति मामले में AAP सांसद संजय की गिरफ़्तारी पर दिल्ली प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंह लवली,… pic.twitter.com/IRdfALe5SX
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
खासदार संजय सिंह यांच्या वडिलांनी सांगितलं सत्ता परिवर्तन होणार
आप खासदार संजय सिंह यांचे वडील दिनेश सिंह म्हणाले, “आम्ही सांगितले की आम्ही प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करू. संजय निघाला तेव्हा आम्ही त्याला घाबरू नको असे सांगितले. त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही. त्यांना अटक करण्यास सांगितले होते, त्यामुळे अटक झाली. त्याचे सकारात्मक परिणाम होतील, सत्तापरिवर्तन होईल.”
#WATCH दिल्ली: AAP सांसद संजय सिंह के पिता दिनेश सिंह ने कहा, "हमने कहा कि हम हर कदम पर सहयोग करेंगे। संजय जाने लगे तब हमने कहा जाओ घबराना नहीं। उन्हें कोई आधार नहीं मिला था। उन्हें गिरफ्तार करने के लिए कहा गया था इसलिए गिरफ्तारी हुई है। इसके सकारात्मक परिणाम आएंगे, सत्ता… pic.twitter.com/YI2vjTLvTf
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
एशियन गेम्स स्पर्धेत अविनाश साबळेनं जिंकलं रौप्य पदक
नायब सुभेदार अविनाश साबळे याने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले.
नायब सूबेदार अविनाश साबले ने एशियन गेम्स में पुरुषों की 5000 मीटर दौड़ के फाइनल में रजत पदक जीता।
(फाइल फोटो)#AsianGames pic.twitter.com/gHefXcs2fn
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
आप खासदार संजय सिंह यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक
दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशी केल्यानंतर ईडीने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. बुधवारी सकाळपासून संजय सिंह यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे यापूर्वीच दारू घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहेत. याबाबत आम आदमी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. अटक केल्यानंतर आप खासदार संजय सिंह यांना आज संध्याकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानापासून दूर नेले.
#WATCH दिल्ली आबकारी नीति मामले में ईडी की छापेमारी के बाद गिरफ्तार किए जाने के बाद आप सांसद संजय सिंह को आज शाम ईडी अधिकारी उनके आवास से ले गए। pic.twitter.com/B42winW9Rt
— ANI_HindiNews (@AHindinews) October 4, 2023
-
सुजीत पाटकरांच्या विरोधातील आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारलं
मुंबई | मुंबई सत्र न्यायालयाने सुजीत पाटकर यांच्याविरोधात दाखल केलेलं आरोपपत्र स्वीकारलं आहे. जवळपास 7500 पानांच्या आरोपपत्राची कोर्टाने दखल घेतली आहे. सुजीत पाटकरांसह एकूण 6 आरोपींचे आरोपपत्र सादर करण्यात आलंय. ऑक्टोबरला आरोपींवर दोषारोप निश्चित होणार आहे. संबंधित सर्व आरोपींना 18 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी कोर्टाने समन्स जारी केलाय.
-
Pune News | अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पुण्यातील नीरा आणि पिंपरे या गावांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून आणि एकमेकाला पेढे वाटून जल्लोष केलाय.
-
Sanjay Singh Arrested | आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक
नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आलीय. ईडीकडून आज सकाळपासून संजय सिंह यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता अखेर संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे.
-
भाजपची ओबीसी जागर यात्रा आज गडचिरोलीत पोहोचली
गडचिरोली | भाजपाची ओबीसी जागर यात्रा आज गडचिरोलीत पोहोचली. माजी आमदार भाजप नेते आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व जिल्ह्यांत ही यात्रा पोहोचणार आहे. गडचिरोली शहरातील विविध भागात फिरून यात्रेने भाजपच्या ओबीसी ध्येय धोरणाबाबत जनजागृती केली. भाजपने सतत ओबीसी योजनांची अंमलबजावणी केल्याचा दावा भाजपने या यात्रेच्या माध्यमातून केलाय.
-
वसई-विरार महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन
पालघर | वसई-विरार महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वृत्ती विरोधात एका तरुणाने पालिकेच्या जी प्रभागात पैशाचे चिल्लर फेकून अनोखे आंदोलन केलं आहे. अनधिकृत बांधकामे तयार होतानाच, ती तोडली पाहिजेत मात्र वसई-विरार पालिका क्षेत्रात चाळमाफिया पालिकेतील अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करून, इमारती उभ्या करीत आहेत. ती अनधिकृत बांधकामे सामान्य नागरीकांना विकल्यावर तोडक कारवाई होते. त्यामुळे चाळ माफियांना आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचे उत्पन्न मिळून जाते. त्याचबरोबर गरीब मोलमजुरी करुन, पै नी पै जमवलेल्या पैशातून घर घेतल्यानंतर त्या सामान्य नागरीकांच्या घरावर बुल्डोझर फिरवलं जातं असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ता नानासाहेब कोळेकर यांनी हे आंदोलन केले आहे.
-
Gas Cylinder : उज्ज्वला योजनेतील कोट्यवधी नागरिकांना दिलासा
केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केलीय. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे.केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Vijay Wadettiwar News : विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा
नांदेडसह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्याचा आकडा वाढला आहे. विरोधकांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. ‘एक उपमुख्यमंत्री आजारी म्हणून घरी बसतात. पालकमंत्री पदासाठी निवडलेला जिल्हा भेटत नाही म्हणून रुसून बसतात. मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात…म्हणजे लोक मरू दे,यांना राजकारण महत्वाचे’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
-
Guardian Minister News : जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आमचेच
रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. पुण्यात अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळाले आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात पाच विधानसभा आमदार आहेत. याविषयीची चर्चा सुरु आहे. आपला या पदासाठी आग्रह नसल्याचे भुजबळ सांगत असले तरी त्यांनी जिल्ह्यातील संख्याबळ मात्र दाखवून दिले आहे.
-
Pune | पुण्यातून पळ काढलेल्या ड्रग माफियाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 10 पथकं
पुण्यातून पळ काढलेल्या ड्रग माफियाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 10 पथकं तयार करण्यात आली आहे. ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटीलचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं १० पथकं तयार केली आहेत. ललित पाटील हा ड्रग्ज तस्करीत कुख्यात आरोपी असून उपचारासाठी तो ससून रुग्णालयात दाखल होता. 2 ऑक्टोबर रोजी त्याने पोलिसांना गुंगारा देत ससून रुग्णालयातून पळ काढला होता. तीन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी तब्बल 2 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त केलं होतं. या प्रकरणात ललित पाटील मुख्य आरोपी होता.
-
रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूप्रकरणी इम्तियाज जलील यांच्याकडून राज्य सरकारवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूप्रकरणी इम्तियाज जलील यांच्याकडून राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. “रुग्णालयात होणारे मृत्यू हे मृत्यू नसून हत्या आहेत. याप्रकरणी अधिकारी आणि मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. औषध आणि साहित्याच्या पुरवठ्याची चौकशी झाली तर राज्यातील सर्वात मोठा घोटाळा बाहेर येईल,” असा आरोप त्यांनी केल.
-
दादा भुसे यांनी नाशिकचा गड राखला
दादा भुसे यांनी नाशिकचा गड राखला आहे. नाशिकच्या पालकमंत्री बदलाची जोरदार चर्चा होती. छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत होतं. मात्र दादा भुसेंनी आपलं पालकमंत्रीपद राखलं.
-
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर
नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवजात बालकावर उपचार करताना डॉक्टरच्या हातून पडल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवजात बालकाच्या नातेवाईकांनी वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
-
अजित पवार पुण्याचे पालक मंत्री, चंद्रकांत दादांची उचलबांगडी
अजित पवार गटाच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री पद देण्यात आले आहे. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री केले आहे. त्यामुळे चंद्रकांत दादा यांची उचलबांगडी झाला आहे.
-
मुंबई सेंट्रल रेल्वे यार्डात रिकामी लोकल घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई सेंट्रल रेल्वे यार्ड लाईनवर रिकाम्या लोकलचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा बाधित झाली आहे. डबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
-
दुपारी उठून कसं चालेल सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर टीका
एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, तेव्हा डीजेचा त्रास नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा, मात्र अनेक वर्ष लेझरमुळे अनेकजनांची दृष्टी जात होती तेव्हा कुठे होते. नेत्याच्या नातवाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तसे सर्वांचे आरोग्य चांगले राहिले पाहीजे अशी टीका राज ठाकरे यांचे नाव न घेता शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
-
नागपूर – आदिवासी कृती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विजय कुमार गावित यांना घेराव
नागपूरमध्ये आदिवासी संघटना झाल्या आक्रमक. आदिवासी कृती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विजय कुमार गावित यांना घेराव घालत रोखलं.
सर्वांना आदिवासी बांधवांना घरं देणार, असं आश्वासन गावित यांनी दिलं.
-
बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे रास्तारोको आंदोलन
जळगावातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूने सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरत एकही बस अथवा इतर वाहने जाऊ दिली नाहीत. विद्यार्थ्यांच्या या रास्तारोको आंदोलनामुळे धुळे खरगोन राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बस थांबत जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
-
75 वर्षांनंतरही सरकारला लोकांमध्ये विश्वास निर्माण करता आला नाही – बच्चू कडू यांचे टीकास्त्र
रुग्णालयातील विषमतेचा रोग थांबवण्याची गरज आहे, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. 75 वर्षांनंतरही सरकारला लोकांमध्ये विश्वास निर्माण करता आला नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
-
सामना व्हेंटिलेटरवर, त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही – गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सामनाच्या अग्रलेखावर सडकून टीका केली आहे. राज्यात सरकार मृत्यू शय्येवर असल्याचे सामनात म्हटले होते.
सामनाच व्हेंटिलेटरवर आहे, आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही, असे महाजन म्हणाले. वाढत्या मृत्यूबाबत शासन गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-
पुणे – पंढरपूर महामार्गावर नीरा येथे ट्रक पलटी होऊन अपघात
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर निरा येथे रात्री लोखंड वाहून नेणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अरुंद मार्गावर सतत अपघात होत असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी होत आहे. हे काम लवकर सुरू न केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला.
-
अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळील फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. महापालिकेच्या पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाहून फेरीवाल्यांनी सर्व माल जवळच्या झुडपात लपवून ठेवला. फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही.
-
LIVE UPDATE | नांदेड घटनेच्या निषेधार्थ शरद पवार गटाचं आंदोलन
नांदेड घटनेच्या निषेधार्थ शरद पवार गटाचं आंदोलन सुरु आहे. पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन सुरु आहे. नांदेड येथील घटनेचा आक्रोश नागरिकांमध्ये दिसत आहे.
-
LIVE UPDATE | रुग्ण मृत्यूच्या दारात पण औषधं नाही – दानवे
घटनेतील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची पाहणी केली आहे. शासकीय रुग्णालयाला औषधं मिळत नाहीत. एका कुटुंबानं ७० हजार रुपयांची ओषधं बाहेरुन खरेदी केली. याची चौकशी झाली पाहिजे. डॉक्टरच्या वाढदिवसामुळे सीजरसाठी वेळ लागला म्हणून आई – बाळाचा मृत्यू झाला. कोणत्या डॉक्टरांचा वाढदिवस होता.. याची देखील चौकशी झाली पाहिजे असं देखील दानवे म्हणाले.
-
LIVE UPDATE | महाष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरु – संजय राऊत
महाष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरु आहे…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ‘महाराष्ट्रातील सर्व व्यवस्था कोलमडली आहे.. राज्यात असंवेदनशील सरकार सत्तेवर आहे. निर्दयी आणि निर्घण सरकार महाराष्ट्राच्या वाट्याला आलं आहे…’ असं देखली संजय राऊत म्हणाले.
-
LIVE UPDATE | दहीहंडी पाठोपाठ आता कल्याण दुर्गाडीवर नवरात्र उत्सवाचा वाद न्यायालयात जाणार का ?
दहीहंडी पाठोपाठ आता कल्याण दुर्गाडीवर नवरात्र उत्सवाचा वाद न्यायालयात जाणार का? अशी चर्चा रंगत आहे. कल्याण दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. शिंदे गटाच्या पहाणी नंतर ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटाच्या शहर प्रमुखांकडून उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिसांकडे परवानगी देण्याची मागणी केली.
-
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन लवकरच
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचा आजपासून श्रीगणेशा होणार आहे. आजपर्यंत शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पितृपंधरवड्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. महाविद्यालयातील कामाला अंतिम हात देण्याचं काम सध्या सुरू आहे. मुलांच्या राहण्याची व्यवस्था शासकीय अध्यापक महाविद्यालयात आहे.
-
‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या 106 दुचाकी जप्त, नागरिकांनी केली ‘ही’ मागणी
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईच्या मोहिमेत सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 106 वाहने जप्त करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा पोलीस आणि मनपाने उगारलेला आहे. नागरिकांनी देखील याचा विरोध करत रोडच्या साईडला पांढरे पट्टे मारावे आणि वाहने उभे करण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
-
उपचाराच्या नावाखाली कैदी ससून रुग्णालयात तळ ठोकून
काही कैदी उपचाराच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयात तळ ठोकून आहेत. प्रशासनाकडून माध्यमांना कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं जात नाही. राज्यातला मटका किंग गेल्या अनेक महिन्यांपासून ससून रुग्णालयात आहे. राज्यभरात कल्याण मुंबई मटका चालवणारा मटका किंग विरल सावला हा उपचाराच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयात आहेत. तब्बल 274 दिवस तळ ठोकून आहे. कोल्हापूरचा मटका किंग सलीम मुल्ला याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईत केली होती. या गुन्हात विरल हा सहआरोपी आहे. मटका किंगवर लागलेल्या मोक्यामध्ये मोक्याच्या गुन्ह्यात विरल सावला याला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला होता. याच गुन्ह्यात येरवडा कारागृहात सावला हा तीव्र उच्च रक्तदाबच्या नावाखाली तळ ठोकून आहे. तब्बल 274 दिवस तो ससून रुग्णालयात आहे.
-
Raju Shetti | ‘गटार गंगे विषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल’
“शिंदे-फडणवीस-पवारांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय. या गटार गंगे विषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल. सत्ताधारी गटातील नेते मंडळीमधील एकही आमदार दारात उभा न करण्याच्या लायकीचे आहेत. आम्ही कुणाच्या ही भानगडीत न पडता शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी” असं राजू शेट्टी म्हणाले.
-
Nagpur News | नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 रुग्ण दगावले
नांदेड पाठोपाठ नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल रूग्णालयात 16 रुग्णांचा मृत्यू झाला, तर मेयो रूग्णालयात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
Pune News : पुण्याच्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा?
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 97.46 म्हणजेच 28.41 टीएमसी पाणीसाठा. गेल्या आठवडा भर पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. खडकवासला: 99.16 टक्के पाणीसाठा पानशेत: 100 टक्के पाणीसाठा वरसगाव: 100 टक्के पाणीसाठा टेमघर: 80.45 टक्के पाणीसाठा
-
Nashik News | नाशिक जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका?
नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका. 149 रिक्त जागांसाठी होणार पोटनिवडणूक. येत्या 16 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. नोव्हेंबर महिन्यात होणार मतदान
-
Nanded Government Hospital Incident : नांदेडमधील मृतांचा आकडा 35 वर, मुश्रीफ घेणार आढावा
नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा 35 वर गेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ नांदेडला जाणार आहेत. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
-
Bhaskar Jadhav : सरकार विरोधातील ‘त्या ‘याचिकेवर आज सुनावणी; भास्कर जाधवांच्या बाजूने निकाल लागणार?
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकार विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मतदारसंघातील 100 कोटींच्या कामांना महायुती सरकारने मंजुरी नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
-
Amit Shah : अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय घडलं; अडीच तास चर्चा करून मुख्यमंत्री परतले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल संध्यकाळी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अडीच तास चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा तिढा यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
-
Shiv sena : ‘त्या’ आमदारांचं टेन्शन कायम, 9 ऑक्टोबरला सुनावणी
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लांबली आहे. आधी ही सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुनावणी लांबली असली तरी या आमदारांचं टेन्शन कायम आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published On - Oct 04,2023 7:07 AM