Maharashtra Breaking Marathi News Live | टोलनाक्यावरील वसुलीच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 700 नागरिक ठार झाले आहेत. तर 2 हजारहून नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही देशांदरम्यानचे युद्ध अजूनही सुरूच आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकच्या येवला मतदारसंघात सभा होत आहे. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज संभाजीनगर, नांदेड आणि नागपूरच्या दौऱ्यावर जाऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणार आहेत. यासह देश आणि विदेशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
मैदान सांगत नाही पण ऐतिहासिक दसरा मेळावा पुन्हा होणारच – उदय सामंत
ठाणे : एखादी गोष्ट लोकांपर्यंत खोट्या पद्धतीने पोहोचविण्याचा प्रकार होत आहे. काही लोक त्यामध्ये माहिर आहेत. आम्ही तशा पद्धतीचे नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण हा शिंदे साहेबांकडे आहे. बाळासाहेबांचा प्रामाणिक विचार पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, त्यामुळे मैदान सांगत नाही, परंतु ऐतिहासिक मेळावा पुन्हा एकदा दसरा मेळावा मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
-
पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पुणे : महात्मा गांधी सप्ताह निमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यात धाडसत्र सुरु केलंय. जिल्हाभरात अवैध दारु विक्री आणि अवैध दारु साठ्याविरोधात 284 गुन्हे दाखल करण्यात आले. तर विविध ठिकाणी धाडी टाकत 242 आरोपींना अटक केली. या कारवाईत 1 कोटी 19 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
-
-
ओबीसीची ताकद दाखवण्याची गरज – आशिष देशमुख
अमरावती : ओबीसी ताकद या जागर यात्रेतून दाखवण्याची गरज आहे. ओबीसी मंत्रालय हे महाराष्ट्र मध्ये स्थापन झाले. भाजपा हा ओबीसीसा आणि ओबीसी हा भाजपा आहे. ओबीसी उद्धार करण्याचा भाजपचा निर्धार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ओबीसींच्या पाठीशी भाजप आहे मूळ जनसमुदाय भाजप आहे, असे माजी आमदार आशिष देशमुख म्हणाले.
-
नागपूर मेडिकल कॉलेजला आदित्य ठाकरे यांनी दिली भेट
नागपूर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागपूर मेडिकल कॉलेजला भेट दिली. यावेळी त्यांनी मेडिकल प्रशासनासोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली. तीन वेगवेगळ्या शहरात भेटी दिल्या तिथली व्यवस्था बघितली. राज्यात काही शहरात औषध आणि मृत्यूची चर्चा झाली. मात्र, यावर राजकारण न करता मार्ग काढणं महत्वाचं आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
-
चांदवडमध्ये मनसे कार्यकर्ते झाले आक्रमक
राज्यातील टोलनाक्यावरील वसुलीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर नाशिकच्या चांदवडमध्येही मनसे कार्यकर्ते झाले आक्रमक. मुंबई -आग्रा हायवेवरील चांदवड टोलनाक्यावर मनसे सैनिकांनी चारचाकी वाहने फ्री मध्ये सोडली.
-
-
मुलुंड टोल नाका मनसैनिकांनी पेटवण्याचा केला प्रयत्न
मुलुंड टोल नाका मनसैनिकांनी पेटवण्याचा प्रयत्न केलाय. टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या मनसैनिक ताब्यात घेण्यात आलेत.
-
Sangli News | मनसे कार्यकर्ते आक्रमक
राज्यातील टोलनाक्यावरील वसुलीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सांगलीत मनसे कार्यकर्ते झाले आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. रत्नागिरी-नागपूर हायवेवरील कवठेमहाकाळ तालुक्यात येणाऱ्या बोरगाव टोलनाक्यावर मनसे सैनिकांनी चारचाकी वाहने फ्री मध्ये सोडली आहेत.
-
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर उद्या ब्लाँक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर उद्या ब्लाँक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लाँक होणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाट हद्दीत गँट्री बसविण्यासाठी घेण्यात येणार आहे हा ब्लाँक. फक्त कारसाठी जुना पुणे मुंबई महामार्ग शींग्रोबा घाटातील सुरू राहील.
-
Kalyan News | कोळगाव परिसरात मोठा अपघात
कल्याण ग्रामीण कोळगाव परिसरात भरधाव ओलाकार घुसली नाल्यात. कारमध्ये पाच जण अडकल्याने घटनास्थळी शिवसेना शिंदे गटाचे माझी नगरसेवक महेश पाटील सह इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घाव घेत लोकांचा जीव आहे.
-
राजस्थानमध्ये 25-30 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी होईल : सचिन पायलट
आम्ही निवडणुकीच्या तारखांचे स्वागत करतो, असे सचिन पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थानमध्ये 25-30 वर्षात जे घडले नाही ते यावेळी होईल. काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल.
-
आरोग्य विभाग सक्षम करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. राज्यात 25 ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल नव्याने उभारणार आहोत.
-
देशाच्या भवितव्यासाठी जात जनगणना आवश्यक – राहुल गांधी
देशाच्या भवितव्यासाठी जात जनगणना आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हे देशाचे विभाजन करण्यासाठी नाही, तर अधिकार देण्यासाठी आवश्यक आहे. याबाबतची संपूर्ण आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे, ती सरकारला जाहीर करावी. आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांनी आतापर्यंत ओबीसींसाठी काय केले, असे म्हटले आहे.
-
महाराष्ट्रात कोणाला विचारलं तर राष्ट्रवादी कोणाची हे कळेल- जयंत पाटील
महाराष्टात कोणालाही विचारलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? तर कोणीही सांगेल शरद पवारांचा…निवडणूक आयोगाने यात बदल केला तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करेल असं वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील हे शरद पवारांसोबत आहेत.
-
NCP Controversy | बहुसंख्य आमदार कोण? ते सांगा – शरद पवार गट
अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडली. अजित पवार गटाने बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचं सांगितलं आहे. पण बहुसंख्य आमदार कोण आहेत? ते सांगा, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हं आम्हाला द्यावं, अजित पवार गटाचा युक्तिवाद
अजित पवार गटाचे वकिलांनी बाजू मांडल्यानंतर आता शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत निवडणूक आयोगात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला द्यावं असा दावा केला आहे.
-
शरद पवार यांनी घरासारखा पक्ष चालवला, लोकशाही नव्हती – अजित पवार गट
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने चारवेळा संधी दिली नाही. त्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं अजित पवार गटाने सांगितलं आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा दावा देखील अजित पवार गटाने केला आहे. वकील निरज किशन यांनी युक्तिवाद केला आहे.
-
Election Commission Hearing | अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या नियुक्तीवर सवाल
नवी दिल्ली | शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड निवडणूक घेऊन झालेली नाही. त्यामुळे निवडून न येता एक व्यक्ती पदाधिकाऱ्यांची नेमणूका करत होता. ते योग्य आहे का? शरद पवार एकदाही निवडून आले नाहीत. मग त्यांची नियुक्ती वैध कसं म्हणता येईल? अजित पवार गटाची नियुक्ती कायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकिल मनिंदर सिंह यांनी केला.
-
Election Commission Hearing | पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही, अजित पवार गटाचा युक्तिवाद
नवी दिल्ली | पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.
-
Sharad Pawar | शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, अजित पवार गटाचा यु्क्तिवाद
नवी दिल्ली | शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा दावा अजित पवार गटाने केलाय.
-
NCP | अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाता दाखला
नवी दिल्ली | अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाता दाखला देण्यात आलाय.
-
Sharad Pawar | शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल
नवी दिल्ली | शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे नीरज कौल यांचा युक्तिवादावर मनु सिंघवी काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
-
Ajit Pawar Group | विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे, अजित पवार गटाचा दावा
नवी दिल्ली | विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय.
-
Election Commission | निवडणूक आयोगात सुनावणी सुरु
नवी दिल्ली | निवडणूक आयोगात युक्तिवादाला सुरुवात झालीय. अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांच्याकडून सुरुवात सुरु झालाय.
-
EC hearing on NCP | राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगातील सुनावणीला 15 मिनिटे उशिराने सुरुवात
नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरु होत आहे. शरद पवार गटाचे वकील लवकर न आल्याने सुनावणीला उशिर झालाय.
-
Election Commission Hearing on NCP : अजित पवार गट आज भूमिका मांडणार
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात थोड्याच वेळात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गटाचे दोन महत्त्वाचे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. आजच्या सुनावणीत अजित पवार गट भूमिका मांडणार आहे.
-
Kalyan Updates | कल्याण पश्चिमेत घरात घुसून 20 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला
कल्याण पश्चिमेत घरात घुसून 20 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला. गंभीर अवस्थेत महिला वर उपचार सुरू तर कल्याण खडकपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करत सुरू केला तपास. परिसरात महिला वर्गात भीतीचे वातावरण.
-
Virar | विरार मध्ये 2023-24 च्या मुंबई विभागीय स्तरीय शालेय जलतरण स्पर्धा
विरार मध्ये 2023-24 च्या मुंबई विभागीय स्तरीय शालेय जलतरण स्पर्धा आज पासून सुरू झाल्या आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर द्वारा वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 9 आणि 10 ऑक्टोबर दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत. वसई विरार महानगरपालिकेच्या विरार पूर्व पापडखिंड तरण तलाव येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाच जिल्हे व आठ महा नगरपालिकेतून दीड हजाराच्या वर स्पर्धकांनी यात भाग घेतला आहे. या स्पर्धेत विजयी झाले पहिले दोन जलतरणपटू यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात करण्यात येणार आहे.
-
MNS Vashi Toll Naka | वाशी टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते आक्रमक
वाशी | राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कायकर्ते हे टोलप्रश्नी आक्रमक झाले आहेत. वाशीतील टोल नाक्यावर मनसे आक्रमक झाली आहे. जोवर टोल नाके बंद करत नाहीत तोवर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका यावेळेस मनसैनिकांनी घेतली. तसेच या दरम्यान मनसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
-
Devendra Fadnavis On Toll Naka | देवेंद्र फडणवीस याचं टोलमाफीवरील विधानाबाबत स्पष्टीकरण
मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी 8 ऑक्टोबर रोजी टोलमाफीबाबत विधान केलं होतं. त्यानंतर आता फडणवीस यांनी टोलमाफीवरील विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 2015 रोजी 12 टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी च्या 53 टोलनाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
-
Avinsh Jadhav Mulund Toll Naka | मुलुंड टोलनाक्यावरुन अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
मुलुंड | मनसे नेते अविनाश जाधव यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. अविनाश जाधव यांना पोलिसांनी मुलुंड इथून ताब्यात घेण्यात आलं आहे. या दरम्यान अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.
-
MNS Protest : मुलूंड टोल नाक्यावर अविनाश जाधव पोहोचले
मनसेचे नेते अविनाश जाधव हे मुलूंड टोल नाक्यावर पोहोचले आहे. या टोलनाक्यावर लहान चारचाकी वाहानांना टोल न घेता सोडण्यात येत आहे. तसेत देवेंद्र फडणवीस यांच्या टोल संबंधीत विधानाचा व्हिडीओ कार चालकांना दाखवण्यात येत आहे.
-
MNS Protest : पनवेल टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन
लहान चार चाकी आणि तीन चाकी गाड्यांना टोल आकारल्या जात नाही असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या हवाला देत. पनवेल टोल नाक्यावर मनसेने आंदोलन सुरू केले आहे. लहान गाड्यांकडून टोल न आकारता सोडण्यात येत आहे.
-
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबीला अपघात
जरांगे पाटील यांची आज येवला येथे जाहिर सभा आहे. त्या निमीत्त्य पूष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आलेल्या आहेत. या जेसीबीवर उभे असलेले काही जण अचानक खाली कोसळले. यामध्ये तीन ते चार जण जखमी झालेले आहेत.
-
Maharashtra News : छगन भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
आज येवला येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्यावर मतभेद आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आज छगन भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
-
Election 2023 : उद्या उद्धव ठाकरे घेणार मतदार संघाचा आढावा
निवडणूकीसाठी ठाकरे गटानेही कंबर कसली आहे. उद्या उद्धव ठाकरे धाराशिव आणि लातूल मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. या संबंधीची आढावा बैढक उद्या दूपारी 12 वाजता मातोश्रीवर होणार आहे.
-
महाराष्ट्रातील दोन लोकसभा पोटनिवडणूक होणार नाहीत?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नागालँडमधील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील दोन लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. पुणे लोकसभेतील जागा ही गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झाली होती. तर चंद्रपूर लोकसभेतील जागा बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झाली होती. नागालँडमधील तापी मतदारसंघ हा नको वांगो यांच्या निधनाने रिक्त झाला होता. त्याची घोषणा आज करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीबाबत कोणतीच घोषणा नाही.
-
दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार
दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवारांच्या या सभेने होणार आहे. तर या यात्रेची सांगता नागपुरातील शरद पवारांच्या सभेने होणार आहे.
-
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरममध्ये कधी मतदान पार पडणार, ते पाहुयात..
मिझोरम- 7 नोव्हेंबर
छत्तीसगड- 7 आणि 17 नोव्हेंबर
राजस्थान- 23 नोव्हेंबर
मध्यप्रदेश- 7 नोव्हेंबर
तेलंगणा- 30 नोव्हेंबर
या पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
-
पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण; मनसेनं पाडली शाळा बंद
पुण्यातील पर्वती परिसरातील मुक्तांगण शाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेतील लहान मुलांचं दहावी, बारावीच्या मुलांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. पहिली ते चौथीत असणाऱ्या मुलांना आणि मुलींना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात असल्याचं पालकांनी म्हटलंय. संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी आणि मनसेनं केली आहे. यावेळी पालक आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळा बंद पाडली आहे.
-
महायुतीच्या समन्वय समितीची उद्या महत्त्वाची बैठक
मंगळवारी दुपारी 3.30 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीला तिन्ही पक्षातील चार-चार नेते उपस्थित राहणार आहेत. शासकीय नियुक्त्या आणि लोकसभेच्या जागांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
-
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घोषित केल्या आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराममध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत.
-
मनोज जरांगे-पाटील येवला येथे दाखल, जंगी स्वागत
मनोज जरांगे-पाटील नाशिकच्या येवला येथे दाखल झाले आहेत. भुजबळांच्या बालेकिल्यात जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
-
सुप्रीम कोर्टातील पवार गटाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी
सुप्रीम कोर्टातील पवार गटाच्या याचिकेवर १३ तारखेला शुक्रवारी, सुनावणी होणार. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक ठरवून देणार. ठराविक वेळेत निर्णय देण्यासाठी टाईमलाइन देणार.
-
Raj Thackeray Live : सरकार थापा मारणार आणि आपण ऐकत बसायचं का ? राज ठाकरे
राज्यातील नेते आपल्याला लुबाडतात, हे लोकांना , जनतेला कळत नाही का ? व्हिडीओ दाखवलेल्या सर्व नेत्यांचं सरकार येऊन गेलं, पण काम काही होत नाही. टोल हा सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
-
Raj Thackeray Live : तर टोलनाके जाळून टाकू.. – राज ठाकरेंचा इशारा
देवेंद्र फडणवीस हे टोलवरून धादांत खोटं बोलत आहेत. टोलमधून पैसे मिळतात, ते बंद होणं अशक्य आहे.
आमचे लोकं टोलनाक्यावर जाऊन पाहणी करतील, आमच्या लोकांना अडवलं तर टोलनाके जाळून टाकी, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
-
Raj Thackeray Live : टोल हा सर्वात मोठा स्कॅम – राज ठाकरे
टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात, पैसे मिळत असल्याने टोल बंद होणं अशक्य, असं राज ठाकरे म्हणाले.
-
Raj Thackeray Live : टोलचा पैसा जातो कुठे ? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल
टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्याच कंपन्यांना टोलचं कंत्राट कसं मिळतं ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. शिवतीर्थ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
-
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय घ्यायची गरज नाही – राहुल नार्वेकर
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कार्यपद्धती वर संशय घ्यायची गरज नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
कायदा पाळून सगळे निर्णय घेतील जातील. संविधानिक शिस्त पाळली जाईल, सभागृहाच्या बाहेरून होणाऱ्या आरोपामुळे कधीच प्रभावित होत नाही आणि माझ्या निर्णयावर काही त्याचा फरक होणार नाही, असे नार्वेकरांनी नमूद केले.
-
LIVE UPDATE | नाशिकच्या येवल्यात आज मनोज जरांगे यांची सभा
नाशिकच्या येवल्यात आज मनोज जरांगे यांची सभा आहे. जरांगे यांची सभा असल्यामुळे भुजबळांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
-
LIVE UPDATE | संजय राऊत यांचं निवडणूक आयोगाला आव्हान
मंबई पालिकेसह १४ महापालिकांच्या निवडणुका जाहीर कर… असं आव्हान संजय राऊत यांचं निवडणूक आयोगाला केलं आहे. तोडा – फोडा आणि राज्य करा अशी भाजपची निती आहे. कितीही पक्ष फोडले तरी विचार पक्षाकडेच असतील… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Shahrukh Khan याच्या जीवाला धोका, सतत येत असलेल्या धमक्यांमुळे सरकारने उचललं मोठं पाऊल
अभिनेता शाहरुख खान याच्या जीवाला धोका.. अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, किंग खान याचे चाहते चिंतेत… सध्या सर्वत्र किंग खान याची चर्चा… किंग खान याच्या कुटुंबासाठी घेतण्यात आला मोठा निर्णय… वाचा सविस्तर
-
Maharashtra News | अमरावतीत नवरात्री उत्सवाची तयारी
अमरावतीत नवरात्री उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील एकवीरा देवीच्या दागिन्यांची साफसफाई केली जात आहे. एकविरा देवीला चढवण्यात येणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची सुवर्णकाराकडून उजळणी केली जात आहे.
-
Maharashtra News | येवल्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा
ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी सभा होणार आहे. यामुळे येवला येथील भुजबळ यांच्या संपर्क कार्यालया बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
-
Maharashtra News | आम्ही पूर्वीपासून ओबीसीच – मनोज जरांगे पाटील
मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाहीत. मराठे पूर्वीपासूनच ओबीसीत आहोत. नेते काहीही बोलतात, परंतु तसे होणार नाही. आमची एकच मागणी आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सर्वच मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यामुळे काही फरक पडणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News | छत्रपती संभाजी नगरात पोलिसांची कमतरता
छत्रपती संभाजी नगरात मंत्र्यांमुळे आणि नेत्यांमुळे पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. पोलिसांकडे 325 वाहनासाठी फक्त 55 चालक आहेत. वारंवार शहरात मंत्री आणि नेते असल्याने पोलीस दलात मनुष्यबळ कमी असल्याचे चित्र दिसत आहे.
-
Maharashtra News | आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहे. सोमवारी संभाजीनगरात जाऊन घाटी रुग्णालयास ते भेट देणार आहे. घाटी रुग्णालयात 3 ऑक्टोबर रोजी 24 तासात 14 रुग्ण दगावले होते. यामुळे आदित्य ठाकरे हे भेट देणार आहेत.
-
Israel-Hamas conflict | हमासच नौदल मुख्यालय उद्धवस्त
इस्रायली एअर फोर्सचे गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु आहेत. हमासचे नेते ज्या इमारतीत राहत होते, त्या इमारती उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. हमासच्या नौदलाशी संबंधित मुख्यालय उद्धवस्त करण्यात आलं आहे. हमासचे गाझा पट्टीतील बेस उद्धवस्त करण्याय येत आहेत.
-
Israel-Hamas conflict | हमासची मागणी काय?
हमासने बऱ्याच प्रमाणात इस्रायली सैनिकांना बंधक बनवून ठेवलय. इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या पॅलिस्टिनींना सोडा, अशी हमासची मागणी आहे. इस्रायली सैन्याचे मोठे अधिकारी हमासच्या ताब्यात आहेत.
-
Israel-Hamas conflict | युद्धामुळे सोनं-चांदी महागणार
इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु झालय. त्याचा परिणाम आता सोने-चांदीच्या दरावर दिसून येणार आहे. बाजारात सोन्याची डिमांड वाढलीय. त्यामुळे गोल्ड आणि सिल्वर प्रीमियम वाढला आहे. शेअर बाजारातही आज घसरण दिसू शकते.
-
Israel-Hamas conflict | संगीत महोत्सवाच्या ठिकाणी मिळाले 260 मृतदेह
इस्रायलमधल्या एका संगीत महोत्सवावर हमासने हल्ला केला. तिथे इस्रायलच्या बचाव पथकाला 260 मृतदेह मिळाले आहेत. इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासने 100 लोकांना बंधक बनवून ठेवलय. हमासच्या एका वरिष्ठ सदस्याने ही माहिती दिली.
-
Shivsena : चाय पे चर्चाला परवानगी नाकारली, डोंबिवलीत ठाकरे गटाचा आज मूक मोर्चा
डोंबिवलीत ठाकरे गटाच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याने ठाकरे गटाने त्याच्या निषेधार्थ आज डोंबिवलीत मूक मोर्चाचं आयोजन केलं आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरातील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालय ते स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी शिवसैनिक हात, तोंड आणि डोक्याला काळया फिती लावून मोर्चात सहभागी होणार आहेत.
-
Hamas Attack : हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या 700 नागरिकांचा मृत्यू, 2000 जखमी
इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचं युद्ध अजूनही सुरूच आहे. पॅलेस्टाईनच्या हमास या कट्टरतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे 700 नागरिक ठार झाले आहेत. तर 2000 नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून सर्वत्र हाहा:कार उडाला आहे.
-
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे देणार रुग्णालयांना भेटी, रुग्णांच्या मृत्यूंची माहिती घेणार
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आज नांदेड, नागपूर आणि संभाजी नगर येथील रुग्णालयांना भेट देऊन रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाची माहिती घेणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
NCP : राष्ट्रवादीच्या त्या आमदारांचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च सुनावणी
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 41 आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published On - Oct 09,2023 7:30 AM