Maharashtra Breaking Marathi News Live | भाजपची विचारसरणी म्हणजे विष; वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे स्पष्टीकरण

| Updated on: Apr 28, 2023 | 7:13 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला जळगावातील पाचोऱ्यात घडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Breaking Marathi News Live | भाजपची विचारसरणी म्हणजे विष; वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे स्पष्टीकरण
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : भंडारा जिल्ह्यात 2 मेपर्यंत येलो अलर्ट, मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात 15 टक्के पाणी कपात राहणार. आठवड्यातून एका दिवशी म्हणजे दर मंगळवारी राहणार 24 तास राहणार पुरवठा बंद. नाशिक ठाणे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा. मोठी वाहतूक कोंडी. कराड बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला, दिग्गजांच्या पॅनलमध्ये लढत. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Apr 2023 11:07 PM (IST)

    भाजपची विचारसरणी म्हणजे विष; वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे स्पष्टीकरण

    ‘भाजपच्या विचारसरणीत विष असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.

    या वादग्रस्त विधानावर खर्गे यांनी दिले स्पष्टीकरण

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी भाजपवर त्यांनी टीका केली

    मल्लिकार्जून खर्गे यांनी टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना विषारी सापाची उपमा दिली.

    टीका झाल्यानंतर आपल्या वक्तव्यावर त्यांनी दिले स्पष्टीकरण

  • 27 Apr 2023 10:59 PM (IST)

    दिल्लीतील नेबसराय भागात पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या

    दिल्लीतील नेबसराय भागात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. आरोपीने त्याच्या दोन मुलांवरही हल्ला केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर पतीने स्वत:च्या हाताची नसही कापली. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

  • 27 Apr 2023 10:41 PM (IST)

    दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी आणि आसाम सरकार यांच्यात करार

    दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीने आणि आसाम सरकारने अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली.
    
    
    
  • 27 Apr 2023 10:16 PM (IST)

    दिल्लीत कोरोनाचं सावट

    दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू आणि 24 तासात 865 जण पॉझिटिव्ह

  • 27 Apr 2023 09:03 PM (IST)

    Amaravati Unseasonal Rain | अमरावती जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसांचं थैमान

    अमरावती जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसांचं थैमान

    वरुड तालुक्यातील जामगाव खडका इथल्या कुंड नदीला महापूर

    मध्यप्रदेश राज्यात जोरदार पाऊस, वरुडमध्ये नदी-नाल्यांना पूर

  • 27 Apr 2023 08:56 PM (IST)

    Mumbai | मुंबई विमानतळावर 18 किलो सोनं जप्त

    मुंबई विमानतळावर 18 किलो सोनं जप्त

    केनियाच्या 9 महिला प्रवाशांना अटक

    एअर इंटेलिजिन्स युनिटची मोठी कारवाई

  • 27 Apr 2023 08:50 PM (IST)

    Karnataka Rain Update | कलबुर्गीत जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

    शेजारील राज्यात कर्नाटकमधील कलबुर्गीत गारांसह जोरदार पाऊस झाला. पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.

    कर्नाटकात जोरदार पाऊस

  • 27 Apr 2023 06:01 PM (IST)

    पुण्यातील मंदिरात चोरी

    दानपेटी फोडत चोरट्यांनी लंपास केले एक लाख रुपये

    कोंढवा परिसरातील शत्रूंजय मंदिरात घडला प्रकार

    सहा चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद

    कोंढवा पोलिसांकडून एका आरोपीला अटक

  • 27 Apr 2023 05:53 PM (IST)

    मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील 2 दिवस “ऑरेंज अलर्ट”

    पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

    पुणे हवामान विभागाने दिली माहिती

    मे च्या पहिल्या आठवड्यात 2 दिवस देखील पावसाची शक्यता

  • 27 Apr 2023 05:37 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

    वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याची अजित पवारांची मागणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित अजित पवार यांची मागणी

    वेल्हे तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे

    वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका करा याबाबत ठराव सरकारकडे दिलेत

    किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण राजगड करण्याबाबतच्या प्रस्तावास सरकारने मान्यता द्यावी

    विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  • 27 Apr 2023 05:32 PM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील

    आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

    प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध

    वनहक्क कायद्याने आदिवासींची जमीन, देवस्थानच्या जमीन याबाबत राज्य सरकारने पाऊल टाकलंय

    महसूल खात्यासंदर्भात बहुतांशी मागण्या

    महामार्गासाठी भूसंपादन ‌जमिनीला शेतकऱ्यांना जास्तीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न

    दूध उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती त्यात किसान सभेलाही स्थान देण्यात आलंय

  • 27 Apr 2023 05:31 PM (IST)

    काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर थेट क्रिकेटच्या मैदानात

    पुण्यात आमदार रंगले क्रिकेट खेळण्यात

    धंगेकरांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग

    तब्बल एक तास आमदार रवींद्र धंगेकर यांनी खेळले क्रिकेट

  • 27 Apr 2023 05:29 PM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेत मेगा भरती

    पुणे जिल्हा परिषदेत 34 विभागात होणार मोठी भरती

    जिल्हा परिषद भरणार तब्बल 900 पद

    जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात होणारं पदभरती

    जिल्हा परिषद लवकरच काढणार नोटिफिकेशन

    मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  • 27 Apr 2023 05:20 PM (IST)

    नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

    अनेक घरांवरचे छप्पर उडाले

    ग्रामीण भागातील साध्या घरावरची पत्रे उडून अनेकांच्या घरात शिरले पाणी

    घरातील साहित्य भिजल्याने अनेकांचे मोठे नुकसान

    वादळी वाऱ्याने जिल्ह्याच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा झाला खंडित

  • 27 Apr 2023 05:19 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जमाबंदी आदेश लागू

    1 मे ते 13 मे दरम्यान लागू असणार जमावबंदी आदेश

    जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी काढले आदेश

    जिल्ह्यात काही दिवसापासून सुरु असलेला महापुरुषांचा अवमान,आक्षेपार्ह पोस्ट पार्श्वभूमीवर काढले आदेश

    राजाराम कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने 29 तारखेपर्यंत काढला होता जमावंबंदी आदेश

    खूप दिवसाच्या खंडानंतर जिल्ह्यात पुन्हा असणार जमावबंदी आदेश

  • 27 Apr 2023 03:03 PM (IST)

    नवी मुंबई | रिमझिम पावसाला सुरुवात

    अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ

    मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मात्र दिलासा

  • 27 Apr 2023 02:58 PM (IST)

    सिंधुदुर्ग | उद्योगमंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टिका

    ‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा तळतळाट आणि थयथयाट देशाच्या राजकारणात पाहिल्यांदा बघायला मिळतोय.’

    ‘आपलं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे हे दुःख व्यक्त होतंय हे नैराश्य आहे. अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

    ‘जोडे पुसण्याची लायकी नसलेले राज्य चालवत आहे…’ अशी टीका ‘शिवसेना’ ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती…

  • 27 Apr 2023 02:34 PM (IST)

    मालेगाव | मालेगावात एका रात्रीत 4 मंदिरांमध्ये चोऱ्या…

    काही मंदिरांमध्ये दुसऱ्यांदा चोरी, घटना cctv कॅमेऱ्यात कैद..

    मंदिरांचे कळस, घंटा, पितळी नाग देखील चोरीला..

    पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी..

  • 27 Apr 2023 02:20 PM (IST)

    बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात; हायकोर्टाचा दणका

    झगमगच्या विश्वातून अशा घडलेल्या घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो,

    बलात्कार प्रकरणी ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीला हायकोर्टाचा दणका… वाचा सविस्तर

  • 27 Apr 2023 02:12 PM (IST)

    मालेगाव | उद्या होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…

    मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी असणार 4 बूथ,

    मालेगाव, निमगाव, झोडगे आणि सौंदाणे येथे असणार मतदान केंद्र,

    साहित्य वाटप आणि कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण

  • 27 Apr 2023 02:05 PM (IST)

    पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे खोपोली एक्झिटजवळ बारा वाहनांमध्ये अपघात

    वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान,

    जखमींना योग्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरु

  • 27 Apr 2023 02:03 PM (IST)

    सत्यपाल मलिक यांच्यासोबत संजय राऊत भेट

    नवी दिल्ली : भगतसिंह कोश्यारी यांच विधान सत्य मानता पण सत्यपाल यांचे मानत नाही

    सत्यपाल मलिक हे बाजू मांडत आहे ती सरकारच्या बाजूची नाही

    सत्यपाल मलिक हे त्यांचे मुखवटे फाडत आहे

    संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 27 Apr 2023 01:56 PM (IST)

    पुण्यात संजय शिरसाठ यांच्या विरोधात आब्रु नुकसानाचा दावा दाखल

    पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे सत्र न्यायालयात केला अब्रू नुकसानीचा दावा

    संजय शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा दावा

    47 वकिलांनी दिलं वकीलपत्र

    पुणे जिल्हा सत्र न्यायालयात संजय शिरसाठ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल

  • 27 Apr 2023 01:47 PM (IST)

    राष्ट्रवादीचे पदाधिकारी राज राजापूरकर यांच्या माध्यमातून ठाण्यात प्रभू श्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन…

    ठाणे : आज दुपारी भरवण्यात येणार प्रदर्शन या प्रदर्शनाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असणार उपस्थित

    राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्या नंतर अनेक आंदोलन झाली

    त्या आंदोलनानंतर खास ठाण्यात प्रभुश्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन

    तर या प्रदर्शनात श्रीरामाच्या विविध कला आणि भावगुणांना प्रकट करण्यात येणारे चित्राचा समावेश असणार आहे

    या प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न

  • 27 Apr 2023 01:39 PM (IST)

    मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ विचित्र अपघात

    खोपोली : जवळपास सात ते आठ गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत

    गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे

    काहीजण जखमी असल्याची माहिती आहे

    अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे

  • 27 Apr 2023 01:32 PM (IST)

    मनसे युवा नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    पुणे : अमित ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन

    या बैठकीला मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार

    मनसे शहर कार्यालयात बैठकांचे आयोजन करण्यात आले

    अमित ठाकरे मनसे विद्यार्थी संघटनेचाही आढावा घेणार

  • 27 Apr 2023 01:24 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्याकडून बारसू प्रकल्पावर प्रतिक्रिया

    मुंबई : राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प अडवून ठेवले होते

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं

    आम्ही काही बोललो की विकासाच्या आड आलो म्हणतात

    एअरबस प्रकल्प, फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात का आला नाही?

    तिथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे की नाही हे सांगा

    दडपशाही करून सांगू नका, विश्वासात घेऊन सांगा

    मी प्रकल्प करा म्हणून सांगितलं पण प्राथमिक अहवाल दिला होता

    उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या सभेत हे भाष्य केले आहे

  • 27 Apr 2023 01:20 PM (IST)

    ठाणे शहरात मोठी वाहतूक कोंडी

    ठाणे : ठाणे-नाशिक रोडवर सुरु असलेल्या कामामुळे प्रवाशी आणि वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास

    ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यात येत आहे

    तर वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा पोलिसांचे आवाहन

    महामार्गांवरील कामामुळे ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी

  • 27 Apr 2023 01:11 PM (IST)

    कामगार संघटना जुनी असली तरी तरुण – उद्धव ठाकरे

    मुंबई : कामगार सेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन

    कामगार सेना आणि शिवसेनेचे जून नातं आहे

    उद्धव ठाकरे यांचे कामगार सेनेच्या सभेत मार्गदर्शन

    आता सरकारच युनियन संपावायला लागले

    उद्धव ठाकरे यांचा कामगार सभेतून सरकारवर हल्लाबोल

  • 27 Apr 2023 01:05 PM (IST)

    बॅचलर मुलाच्या घरात सगळीकडं बिअरच्या बॉटल, घराचा मालक म्हणाला…

    एका बेंगलोरमधील घर मालकासोबत काय झालंय पाहा. शेअर झालेले फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एक बॅचलर मुलगा ज्यावेळी घर खाली करुन गेला, त्यानंतर मालकाने जाऊन घरं पाहिलं, घर पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्या मुलाने घराची एकदम वाईट अवस्था केली आहे. मालकाने घर खाली केल्याचे काही फोटो काढले आहेत. संपूर्ण बातमी

  • 27 Apr 2023 01:02 PM (IST)

    मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा

    मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देऊन मागणी करणार

    संभाजीनगर निर्णयाप्रमाणे मराठी भाषेचा निर्णय व्हावा

  • 27 Apr 2023 01:00 PM (IST)

    रेणुकामातेच्या श्री क्षेत्र माहूर गडावर ‘रोप वे’ची सुविधा, अशोक चव्हाण यांनी केले गडकरींचे अभिनंदन

    – रेणुकामातेच्या श्री क्षेत्र माहूर गडावर चार लिफ्ट आणि स्कायवॉकचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी भूमिपूजन होत आहे.

    – केंद्रीय मार्गनिधीतून लिफ्ट आणि स्कायवॉकसह रोप वे उभारण्याचे येथे नियोजन होते.

    – मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’सोबत याविषयी करारही झाला होता.

    – श्री क्षेत्र माहूर येथे रोप वे उभारणे काही कारणास्तव शक्य झाले नसले तरी लिफ्ट व स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

    – केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी याचे भूमिपूजन होत आहे. या कामाबद्दल नितीनजी याचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असे ट्विट माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे.

  • 27 Apr 2023 12:48 PM (IST)

    हार मानण्याची गरज नाही, हिंमत हरण्याची गरज नाही – सरसंघचालक मोहन भागवत

    नागपूर येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हार मानण्याची गरज नाही, हिंमत हरण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले.

    आपण उभे राहिलो, लढत राहिलो तर आपणच विजयी होऊ हा विश्वास सर्वसामान्य समाजाचा आणि कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबीयांचा आहे. आपणही त्यांचे मित्र बनले पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे. जागृत राहा जेणेकरून ते शक्य तितक्या चांगल्या प्रकारे हे काम पूर्ण करता येईल, असे ते म्हणाले.

    ज्यांनी हा प्रकल्प ज्यांच्यासाठी राबविला जात आहे त्यांच्यासाठी इमारतीच्या उभारणीपासून ते सुरू असलेल्या उपचारापर्यंतच्या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात. त्यासाठी काहीही करण्यासाठी उभे राहण्याची गरज आहे.

    एकदा हॉस्पिटल उभारले की आपलं काम संपलं असे नाही. तर त्यांनी अशी व्यवस्था करत राहावं की रुग्णांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल. त्यांना अधिक मदत कशी होईल याचा विचार करावा. वेळ आणि उपचाराचा खर्च कसा कमी करता येईल हे पहावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

  • 27 Apr 2023 12:28 PM (IST)

    आगामी लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

    – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केलीय.

    – केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 हजार ईव्हीएम मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत.

    – नाशिकच्या सय्यद पिंपरी येथील निवडणूक आयोगाच्या गोदामात या ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत.

    – 11 हजार 720 बॅलेट्स आणि 6 हजार 600 कंट्रोल युनिट्सचा यात समावेश

    – पुढील महिन्यात निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन करणार या यंत्रांची तपासणी करणार आहेत.

  • 27 Apr 2023 12:15 PM (IST)

    संजय राऊत यांनी हार घातला, कामगारांनी पुतळ्याचे शुद्धीकरण केले

    – खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखाना येथे जाऊन मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून पुढील सभेसाठी गेले होते.

    – मात्र, भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांनी संजय राऊत यांनी हार घातलेल्या मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले.

    – कामगारांनी या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले.

    – त्यानंतर पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला.

    – यावेळी कामगारांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

  • 27 Apr 2023 11:58 AM (IST)

     हसन मुश्रीफ यांनी घेतली अजित पवार यांची भेट

    आज हायकोर्टात हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे

    अजित पवार यांच्या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट

    हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्यामध्ये काहीवेळ चर्चा

  • 27 Apr 2023 11:55 AM (IST)

    मोठी बातमी : ठाण्यात होणार मुख्यमंत्री कार्यालय

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.

    कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये होणार आहेत.

    – या कामासाठी एकूण 4 कोटी 60 लाख इतका खर्च येणार आहे.

    – कार्यालयाच्या अंतर्गत कामांसाठी तसेच संगणक प्रणाली, इतर कामासाठी ठाणे महापालिकेने निविदा काढली आहे.

    – ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे..

    – त्यामुळे यापुढे राज्याचा कारभार ठाण्यातून देखील होताना दिसणार आहे.

  • 27 Apr 2023 11:51 AM (IST)

     पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू, सहकारी विद्यार्थ्यांकडून संताप

    सहकारी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन

    झाडावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

    वेळेवर उपचार न मिळाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

  • 27 Apr 2023 11:49 AM (IST)

    VIDEO | जंगलात वाघाचे फोटो काढत होते पर्यटक, बघताचं वाघाला राग आला, पर्यटकांवर उडी मारली, मग …

    Animal Viral Video | जंगलात गेल्यावर वाघाला पाहून फोटो काढताय, मग तुम्ही हा व्हिडीओ पाहा. पर्यटकांवर काय वेळ आली होती. नशीब चांगलं म्हणून नाहीतर...

  • 27 Apr 2023 11:47 AM (IST)

    मॅनकाईंड फार्माचा आयपीओ बाजारात

    आज गुंतवणुकीची आहे शेवटची संधी

    आतापर्यंत कसा मिळाला आयपीओला प्रतिसाद

    औषधी उत्पादनासह कंडोम निर्मितीत ही कंपनी अग्रेसर

    या कंपनीतून अशी करता येईल कमाई, वाचा बातमी 

  • 27 Apr 2023 11:45 AM (IST)

    नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा सोहळा, शिंदे- फडणवीसांची उपस्थिती

    उद्योगपती गौतम अडाणी कार्यक्रमस्थळी दाखल

    सरसंघचालक मोहन भागवत अणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित

  • 27 Apr 2023 11:42 AM (IST)

    कर्नाटक निवडणूकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

    कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारून पराभव होणार- संजय राऊत

    राज ठाकरे यांच्या उत्तरावर संजय राऊत यांचं प्रत्यूत्तर

    शेंदूर फासलेल्या देवाच्या मागे लोकं जात नाही, संजय राऊत यांचा टोला

  • 27 Apr 2023 11:21 AM (IST)

    संजय राऊतांमुळे ठाकरे कुटुंबीयांची बदनामी होत आहे – नितेश राणे

    राऊतांनी भाजप नेत्यांवर आरोप केल्यास मी ठाकरेंवर आरोप करणार- नितेश राणे

    भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास राऊतांनी कोर्टात जावे- नितेश राणे

    संजय राऊतांसारखी माणसं बाजारात विकतं मिळतात, नितेश राणेंची बोचरी टिका

  • 27 Apr 2023 11:11 AM (IST)

    बुलढाण्यात अवकाळी पावसासह गारपीटीचं थैमान, शेतकऱ्यांचं नुकसान

    पिकांचे नुकसान तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड

    विज कोसळल्याने जनावरं दगावली

    वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडाले

  • 27 Apr 2023 11:08 AM (IST)

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू

    -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू

    -केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले 18 हजार ईव्हीएम यंत्र

    -नाशिकच्या सय्यद पिंपरी येथील निवडणूक आयोगाच्या गोदामात ठेवण्यात आले यंत्र

    -11 हजार 720 बॅलेट्स युनिट्स आणि 6 हजार 600 कंट्रोल युनिट्सचा समावेश

    -पुढील महिन्यात निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन करणार यंत्रांची तपासणी

  • 27 Apr 2023 11:00 AM (IST)

    त्या आंदोलनानंतर खास ठाण्यात प्रभुश्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन..

    राष्ट्रवादी चे पदाधिकारी राज राजापूरकर यांच्या माध्यमातून ठाण्यात प्रभू श्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन…

    आज दुपारी भरवण्यात येणार प्रदर्शन या प्रदर्शनाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असणार उपस्थित..

    राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्या नंतर अनेक आंदोलन झाली..

    त्या आंदोलनानंतर खास ठाण्यात प्रभुश्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन..

    तर या प्रदर्शनात श्रीरामाच्या विविध कला व भावगुणांना प्रकट करण्यात येणारे चित्राचा समावेश असणार आहे..

    या प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा राष्ट्रवादी पदाधिकारी यांचा प्रयत्न..

  • 27 Apr 2023 10:55 AM (IST)

    उल्हासनगर – जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित दादाच!

    उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स

    जनतेच्या मनातील भावना मांडल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

  • 27 Apr 2023 10:45 AM (IST)

    नागपूर : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यु उद्घाटन सोहळा, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित

    नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युचं आज होणार उद्घाटन

    सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

    उद्योगपती गौतम अदानीही सोहळ्यास उपस्थित

    117 खाटांचे अद्ययावत रुग्णालय

  • 27 Apr 2023 10:40 AM (IST)

    अहमदनगर : भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं पावसात भिजून भाषण

    बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

    कर्जत-जमखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पावसात भिजून सभा

    शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा

    नेत्यांनी माझा विश्वासघात केला मात्र लोकांनी नाही

    तर बाहेरून आलेल्या लोकांनी बसवण्याचं काम केलं , लगावला टोला

  • 27 Apr 2023 10:38 AM (IST)

    आता जगात करन्सी वॉर

    डॉलरला धोबीपछाड देण्यासाठी लढाई

    आता डॉलरच सबकुछ राहणार नाही

    रशियासह भारत, चीन आणि इतर देशांची आघाडी

    भारतीय रुपयांने जागतिक बाजारात केली चढाई

    चीनतर गेल्या कित्येक वर्षांपासून डॉलरविरोधात आघाडीवर

    काय होऊ शकतो बदल, काय होतील परिणाम, वाचा सविस्तर 

  • 27 Apr 2023 10:29 AM (IST)

    VIDEO | गाडीच्या पार्किंगसाठी मालकांनी शोधला नवा जुगाड, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी म्हणाले…

    VIRAL VIDEO | गाडीची पार्किंग आपल्याला कायम राहावी, यासाठी मालकांनी नवा जुगाड शोधून काढला आहे. सद्या त्या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • 27 Apr 2023 10:28 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये दाखल

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं होणार उद्घाटन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

  • 27 Apr 2023 10:17 AM (IST)

    संजय राऊतांनी खोटे आरोप करू नयेत – नितेश राणे

    राऊतांनी भाजप नेत्यांवर खोटे आरोप करू नयेत

    आम्ही ओरिजनल, खरे शिवसैनिक आहोत

    संजय राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही

    राऊतांनी भाजप नेत्यांवर आरोप केले तर मी ठाकरेंवर टीका करेन

  • 27 Apr 2023 10:14 AM (IST)

    चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार…

    पुलाचे काम पूर्ण न झाल्याने उद्घाटनाला आणखी दोन महिने लागणार

    १ मेला होणार होते उड्डाणपुलाचे उद्घाटन

    मात्र गर्डर बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने पुल बांधण्यास लागणार आणखीन वेळ

    १ मे ला महाराष्ट्र दिनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन

    सध्या पुलाचे काम ८० टक्के पूर्ण…

    ९ गर्डर च्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा आणि ३२ मीटर रुंदीचा उभारण्यात येतोय उड्डाणपूल

    चांदणी चौकात ३९७ कोटी खर्च करुन १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत

  • 27 Apr 2023 10:11 AM (IST)

    Team India : सिलेक्टर्सनी एका टॅलेंटेड खेळाडूच करियर जवळपास संपवलं, WTC Final साठी साधा भावही दिला नाही

    WTC Final 2023 : टीम इंडियाच्या या खेळाडूकडे चांगल टॅलेंट आहे. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी साधा त्याचा विचारही केला नाही. या खेळाडूची तुलना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची. वाचा सविस्तर….

  • 27 Apr 2023 10:10 AM (IST)

    Virat Kohli IPL 2023 : तोल सुटला, पराभवानंतर विराट कोहलीने काढली टीमची लायकी

    IPL 2023 मध्ये काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 21 रन्सनी हरवलं. त्यानंतर कोहलीने आपल्या टीमला खडेबोल सुनावले. वाचा सविस्तर….

  • 27 Apr 2023 10:10 AM (IST)

    IPL 2023 : आधीच टीम इंडियातून बाहेर, आता ‘या’ प्लेयरच आयपीएलमधील करियरही धोक्यात

    IPL 2023 : टीम इंडियाच्या एका खेळाडूचा आयपीएलमधूनही पत्ता लवकरच कट होऊ शकतो. एका सीजनसाठी या प्लेयरला 5.50 कोटी रुपये मिळतात. त्याला त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवता येत नाहीय. त्याचं करियर धोक्यात आहे. वाचा सविस्तर….

  • 27 Apr 2023 10:05 AM (IST)

    लाकडी कपाट अंगावर पडून तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    – नाशिकच्या अंबड परिसरातील जाधव संकुल येथील घटना

    – झोपेत असताना तीन वर्षीय चिमुकल्यावर अचानक घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू

    – या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त

    – शौर्य विश्वकर्मा या तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    – कपाट अंगावर पडल्यानंतर शौर्यला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित

  • 27 Apr 2023 09:57 AM (IST)

    विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस

    कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २७ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30-40 किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहे.

  • 27 Apr 2023 09:50 AM (IST)

    भाजप नेत्यांकडून भ्रष्टाचार- संजय राऊत

    भाजपमधील सहा ते सात लोकांची प्रकरणे माझ्याकडे

    दादा भुसे यांच्यांकडूनही कोट्यवधींचा भ्रष्टाचार- संजय राऊत

    भ्रष्टचाराची तक्रार ईडी, सीबीआयकडे करणार

    भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज

  • 27 Apr 2023 09:44 AM (IST)

    VIDEO | पिंजऱ्यातले पक्षी विकत घेतले, विक्रेत्याच्या समोर आकाशात सोडले, नेटकरी म्हणाले….,

    Viral Video | पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हा माणूस पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी पक्षी विकत घेत आहे.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर मिलियनमध्ये लोकांनी पाहिला आहे. सविस्तर बातमी पाहा

  • 27 Apr 2023 09:41 AM (IST)

    अमित शाह यांचा नागपूर दौरा रद्द

    नागपुरात आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट च उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार होतं, मात्र अमित शहा यांचा आजचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. यामुळे हे उद्घाटन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  • 27 Apr 2023 09:40 AM (IST)

    सोने-चांदीचा आजचा दर काय

    सोने-चांदीची पुन्हा चढाई

    सकाळच्या सत्रात किंमतीत वाढ

    एका दिवसांत शंभर रुपयांनी किंमती वधारल्या

    चांदी देणार ग्राहकांना गोल्डन रिटर्न, वाचा बातमी 

  • 27 Apr 2023 09:33 AM (IST)

    तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत

    लाकडी कपाट अंगावर पडून तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत

    नाशिकच्या अंबड परिसरातील जाधव संकुल येथील घटना

    झोपेत असताना तीन वर्षीय चिमुकल्यावर अचानक घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू

    शौर्य विश्वकर्मा या तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

  • 27 Apr 2023 09:24 AM (IST)

    स्वच्छता अभियान

    मावळ तालुक्यातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा‘ अंतर्गत स्वच्छता अभियान

    तालुक्यातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा‘ अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे

    पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या सूचनेनुसार लोणावळा उपविभाग पोलीस उपअधीक्षक यांनी ‘टुरिझम पोलिसिंग‘ हा अभिनव उपक्रम राबविला आहे

  • 27 Apr 2023 09:16 AM (IST)

    पुणे उड्डाणपूलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार

    चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार

    पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन महिने लागणार उद्घाटनाला

    १ मेला होणार होते उड्डाणपुलाचे उद्घाटन

  • 27 Apr 2023 09:11 AM (IST)

    बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

    नगर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

    भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं पावसात केले भाषण

    कर्जत-जमखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पावसात झाली सभा

    शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा

    नेत्यांनी माझा विश्वासघात केला मात्र लोकांनी नाही

    तर बाहेरून आलेल्या लोकांनी बसवण्याचं काम केलं आमदार रोहित पवारांना टोला

  • 27 Apr 2023 09:02 AM (IST)

    संजय राऊत मलिक यांना भेटणार

    पुलवमा हल्ला ते जम्मू काश्मीरामधील 370 कलम हटवणे, शासकीय कर्मचाऱ्यांचे विमा कंत्राट देण्यासाठी रिलायन्सने देऊ केलेली लाचेचे प्रकरण, वादग्रस्त शेतकरी कायदे, गोव्यातील राजकीय भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर व्यक्त केलेल्या मतांमुळे सत्यपाल मलिक चर्चेत आले आहे.

    आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहे, मलिक यांना मुंबई भेटीचे आमंत्रण देणार आहेत.

    मुंबई भेटीत सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील

  • 27 Apr 2023 08:57 AM (IST)

    अखिल भारतिय किसान सभेच्या विविध मागण्यांसाठी आज विजय कुमार गावित घेणार आढावा बैठक

    दुपारी 1 वाजता संगमनेर इथं होणार बैठक

    आज तोडगा निघण्याची शक्यता

  • 27 Apr 2023 08:51 AM (IST)

    आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    कोणत्या शहरात सर्वात महागले इंधन

    कुठे आहे सर्वात स्वस्त दर

    कच्चा तेलाची सुरु आहे आगेकूच

    तुमच्या शहरातील इंधनाचा भाव घ्या जाणून

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा बातमी एका क्लिकवर

  • 27 Apr 2023 08:46 AM (IST)

    VIDEO | पोलीस कर्मचाऱ्याने कचरा वेचणाऱ्याला मुलाला घेतली नवीन कपडे आणि चप्पल, चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगतोय, व्हिडिओने अनेकांचं जिंकलं मनं

    VIRAL VIDEO | एका पोलिस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये कचरा वेचणाऱ्या मुलाला पोलिस कर्मचाऱ्याने नवीन कपडे आणि चप्पल गिफ्ट केली आहे. वाचा संपूर्ण स्टोरी 

  • 27 Apr 2023 08:44 AM (IST)

    खासदार संजय राऊत घेणार जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट

    आज दिल्लीत होणार राऊत-मलिक यांची भेट

    दुपारी 12 वाजता होणार भेट

    सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या एका मुलाखतीची सध्या देशात चर्चा

    संजय राऊत सत्यपाल मलिक यांना मुंबई भेटीचे आमंत्रण देणार

    मुंबई भेटीत सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक आणि संजय राऊत भेटीला महत्व

  • 27 Apr 2023 08:35 AM (IST)

    नाशिक | शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी

    मध्यरात्रीच्या सुमारास अनेक भागात पावसाचा शिडकावा

    पुढचे दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

    अवकाळी आणि गारपिटीच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल

  • 27 Apr 2023 08:31 AM (IST)

    चंद्रपूर | गेल्या 3-4 दिवसांत अवकाळी पावसामुळे वीज पडून तिघांचा मृत्यू झाला

    312 घरांचं आणि गुरांच्या गोळ्यांचं नुकसान

    321.51 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान, 65 जनावरांचा मृत्यू

    प्रशासनाने केले पंचनामे

  • 27 Apr 2023 08:19 AM (IST)

    शिर्डी | 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक

    शिर्डी ग्रामस्थ पाळणार बंद

    शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध

    साई मंदिरात CISF सुरक्षा नियुक्त करू नये, शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांची मागणी

  • 27 Apr 2023 08:08 AM (IST)

    शिर्डी | साईंच्या दानातील नाण्यांच्या प्रश्नावर रिझर्व्ह बँकेकडून तोडगा

    राष्ट्रीय बँकाच्या अधिका-यांची संस्थान प्रशासनाशी चर्चा

    तुटवडा असलेल्या इतर बँकाकडे नाणे वर्ग करणार

    साईबाबा संस्थानचे 13 राष्ट्रीय बँकेत आहेत खाते

    बँकाकडे कोटयवधीची नाणी साचल्याने चार बँकांनी नाणी घेण्यास दिला होता नकार

  • 27 Apr 2023 08:02 AM (IST)

    पुणे स्वारगेट परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाईचे आदेश

    पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील दहा गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

    सैफअली वाहिद बागवान (वय 20, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव

    त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार

    बागवान याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल

  • 27 Apr 2023 08:00 AM (IST)

    मनसे युवा नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    अमित ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन

    या बैठकीला मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार

    सकाळी 11 वाजता मनसे शहर कार्यालयात बैठकांचे आयोजन

    यावेळी अमित ठाकरे मनसे विद्यार्थी संघटनेचाही आढावा घेणार

  • 27 Apr 2023 07:49 AM (IST)

    कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान प्रियांका गांधींनी स्वतः हॉटेलमध्ये बनवला डोसा

    Priyanka Gandhi : राजकीय नेत्यांकडून एखादी कृती केल्यानंतर ती त्यांच्या चाहत्यांना अधिक आवडते, असं अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. सध्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांची एक गोष्ट चांगलीचं व्हायरल झाली आहे. वाचा संपूर्ण बातमी

  • 27 Apr 2023 07:31 AM (IST)

    नाशिकमध्ये पेव्हर ब्लॉकने युवकाचा खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घातल्या बेड्या

    तीन मुख्य संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक

    सहा अल्पवयीन संशयितांना देखील घेतले ताब्यात

    सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावतानगर भागात घडली होती खुनाची घटना

    सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

  • 27 Apr 2023 07:14 AM (IST)

    चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वाघोली बुटी गावात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

    ममता बोदलकर 65 असे मृत महिलेचे नाव, महिला शेतात काम करत असताना वाघाने दबा धरून केला हल्ला,

    सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ वाघाने याच भागात मांडले बस्तान

    घटना पाहण्यासाठी हल्लास्थळी गेलेल्या नागरिकांवर देखील वाघाने केली चाल

    अखेर वनपथक पोचल्यानंतर शव रुग्णालयाकडे केले रवाना

    सावली वनविभागाचे पथक करत आहे घटनेचा अधिक तपास

  • 27 Apr 2023 07:12 AM (IST)

    कोल्हापुरात होत असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादाचे ग्रहण सुटेना

    स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना महिला कार्यकर्त्यांचा विरोध

    आज होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

    बृजभूषण सिंह यांचे शहर भर लागले पोस्टर, बृजभूषण सिंह कोल्हापुरात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार

    बृजभूषण सिंह यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांचा आक्षेप, राजमाता जिजाऊ संघटनेचा इशारा

  • 27 Apr 2023 07:08 AM (IST)

    कल्याण-डोंबिवली क्षेत्रात 15 टक्के पाणी कपात राहणार

    आठवड्यातून एका दिवशी म्हणजे दर मंगळवारी राहणार 24 तास राहणार पुरवठा बंद

    पालिका आयुक्ताने दिले सूचना

    ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी नदीतील पाणी साठ्यात 32 टक्के तुट येणार असल्याने ही तुट भरून काढत पाणी कपातीचा निर्णय

  • 27 Apr 2023 07:06 AM (IST)

    नोकरी सोडली अन् एलोविराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

    भंडाऱ्याच्या खेमराजचं फूड आणि स्किन केअर पोहचलं विदेशात

    वडिलोपार्जित शेतीतील साडेतीन एकरात खेमराजनं नाविन्यपूर्ण एलोविराची शेती केली

    राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांचे प्रॉडक्ट विकल्या जात असून आता तर अमेरिका, जर्मनी, रशिया, दुबई सह अन्य देशातही यांच्या प्रॉडक्टला मोठी मागणी वाढली आहे

  • 27 Apr 2023 07:05 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात पुन्हा हत्तींच्या कळपांची एन्ट्री, ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा

    अर्जुनी मोरगाव तालुक्यात दिसला हत्तींचा कळप

    मागील वर्षी केलं होतं शेतीचं मोठा नुकसान

    वनविभागाने जारी केला अलर्ट

  • 27 Apr 2023 07:02 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात 2 मेपर्यंत येलो अलर्ट, मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

    भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी

    अधूनमधून अवकाळी पाऊस बरसत असल्याने भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

Published On - Apr 27,2023 6:59 AM

Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.