Maharashtra Breaking Marathi News Live | मंत्री नारायण राणे यांच्या डोक्यावर परिणाम; ठाकरे गटाचा घणाघात

| Updated on: May 01, 2023 | 6:57 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला जळगावातील पाचोऱ्यात घडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Breaking Marathi News Live | मंत्री नारायण राणे यांच्या डोक्यावर परिणाम; ठाकरे गटाचा घणाघात
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 147 बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आता आणखी एक डबा वाढवला जाणार. पासधारकांचे वाद टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला निर्णय . विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुणे, मावळ, बारामती,दौऱ्यावर. मुंबई, वाशिम आणि अमरावतीत पावसाची रिमझिम. उकाडा जाणवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 100वी मन की बात. मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 May 2023 12:01 AM (IST)

    हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता कायम; 30 वर्षांपासून सत्ता

    वसई

    वसईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

    एकूण 17 जागांपैकी 16 जागांवर विजयी तर सर्वपक्षी परिवर्तन पॅनला 1 जागांवर विजय

    मागच्या तीस वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता

    यंदाही बिवियाने आपला गड कायम राखण्यात यश मिळवलं

    वसई तालुक्यात एकूण 18 जागा,  त्यापैकी एक जागा रिक्त आहे तर 17 जागांवर लढत

    यात 17 पैकी 6 जागा बिनविरोध

  • 30 Apr 2023 11:39 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस; अनेक घरांचे पत्र उडाले

    जळगाव

    जामनेर तालुक्यात चक्रीवादळ व गारांचा पाऊस

    रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका

    चक्रीवादळामुळे अनेकांचे घरावरील पत्रे उडाले तर पेट्रोल पंपावरील पत्राचा शेड कोसळलं

    वृक्ष कोसळल्याने वाहनाचेही प्रचंड नुकसान

    शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान मदतीची मागणी

  • 30 Apr 2023 11:32 PM (IST)

    मंत्री नारायण राणे यांच्या डोक्यावर परिणाम; ठाकरे गटाचा घणाघात

    पंढरपूर

    मंत्री नारायण राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला

    त्यांना सरकारी दवाखान्यात दाखवण्याची गरज

    नारायण राणे यांच्या दादागिरीला शिवसैनिक ईटी दांडू सारखं राणे यांना उडवतात

    उद्धव ठाकरे यांना दम देणारी अवलाद जन्माला यायची आहे, अजून पैदा झाली नाही

    युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांची टीका

  • 30 Apr 2023 11:24 PM (IST)

    पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा, एकाला पोलिसांकडून अटक

    पुणे :

    पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा, एकाला पोलिसांकडून अटक

    संजय राऊतचे पार्टनर, सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार

    राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी आज पुणे पोलिसांकडून अटक

    पुणे सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा दिले आदेश

    भाजप नेते किरीट सोमैय्यानी हा घोटाळा उघडकीस आणला

    शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

    या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला

  • 30 Apr 2023 11:13 PM (IST)

    वज्रमूठ सभेच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे की आम्ही एक आहोत; भाई जगताप

    मुंबई..

    मुंबईतील BKC मैदानावर सुरू असलेल्या वज्रमूठ सभेच्या तयारीची काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्याकडून पाहणी

    वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात

    वज्रमूठ सभेत मोठी गर्दी असणार असा विश्वास

    वज्रमूठ सभेत गर्दी होवू नये यासाठी सरकारकडून खूप प्रयत्न

    लोकांमध्ये सरकारवर राग

    सत्तेच्या आणि पैश्याच्या जोरावर सरकारला माज

    वज्रमूठ सभेच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे की आम्ही एक आहोत..

  • 30 Apr 2023 11:07 PM (IST)

    नांदगाव बाजार समितीच्या विजयानंतर आमदार सुहास कांदे यांचे पंकज भुजबळांना थेट आव्हान

    नांदगाव / नाशिक

    नाशिकच्या नांदगाव बाजार समितीच्या विजयानंतर आमदार सुहास कांदे यांचे पंकज भुजबळांना थेट आव्हान

    माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवा

    महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांचे माझ्यासमोर कधीच आव्हान नव्हते.

    माजी खासदार समीर भुजबळांनी पडद्यामागून कारस्थान करून मैदाना लढावे

    आम्ही जनतेसाठी काम करतो, जनता विकासाबरोबर आहे.

    मनमाड बाजार समितीमध्येही आमचीच सत्ता येईल असा विश्वास

  • 30 Apr 2023 09:02 PM (IST)

    Gadchiroli News | गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान

    गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान

    भामरागडमधील दामरेचा परिसरात चकमकीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान

    गडचिरोलीतील नक्षल विरोधी सी-60 पोलीस पथकाची कारवाई

  • 30 Apr 2023 08:58 PM (IST)

    Rajapur Refinery Project | बारसू रिफायनरी परिसरातील गावांची प्रशासनासोबत बैठक पार

    बारसू ग्रामस्थांसोबत अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

    जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची ग्रामस्थांशी चर्चा

    ग्रामस्थांसोबत रिफायनरी संदर्भात सकारात्मक चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

    प्रत्येक गावात जाऊन जिल्हाधिकारी बैठका घेणार

    रिफायनरी होणाऱ्या ठिकाणीही ग्रामस्थांना घेऊन जाणार

  • 30 Apr 2023 08:42 PM (IST)

    Fast Marathi News | रात्री 8 च्या बातम्या, पाहा सर्व घडामोडींचे अपडेट

    राज्यातील सर्व बातम्यांचा धावता आढावा. जाणून घ्या एकूण एक घडामोड फक्त 4 मिनिटात. पाहा रात्री 8 च्या 24 हेडलाईन्स

  • 30 Apr 2023 08:39 PM (IST)

    PM Modi`Roadshow in Mysore | म्हैसूर रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या गाडीसमोर मोबाईल फेक

    म्हैसूर रोड शो दरम्यान पंतप्रधानांच्या गाडीसमोर मोबाईल फेक

    गाडीसमोर मोबाईल फेकल्याने एकच खळबळ

    पोलिसांकडून तपासाला सुरुवात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो

  • 30 Apr 2023 08:28 PM (IST)

    Income Tax : केंद्र सरकारने दिला अलर्ट

    या चुकीचा बसेल मोठा फटका

    आयटीआर अर्ज भरताना घ्या काळजी

    नवीन कर प्रणाली समजून घ्या

    जुनी कर प्रणालीचा फायदा जाणून घ्या

    अर्ज भरताना झाली चूक तर बसेल फटका, वाचा बातमी 

  • 30 Apr 2023 08:10 PM (IST)

    Delhi Rain | राजधानी दिल्लीत जोरदार मुसळधार

    राजधानी दिल्लीत आज संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

    दिल्लीत जोरदार पाऊस

  • 30 Apr 2023 08:06 PM (IST)

    Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती कोरोना रुग्ण?

    महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 425 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यापेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात 499 जण हे कोरोनामुक्त झालेत. तर सध्या राज्यात 4 हजार 79 सक्रीय रुग्ण आहेत.

  • 30 Apr 2023 07:40 PM (IST)

    Cheque : या फकस्त शब्दाचे गौडबंगाल तरी काय

    धनादेशावर रक्कमेनंतर का लिहितात ‘Only’

    ‘Only’ हा शब्द न लिहिल्यास कोसळतं का आभाळ

    रोजच्या व्यवहारात चेकवर का लिहिले जाते फक्त

    तुमचा कोणावर विश्वास नाही की समोरच्यावर तुमच्यावर नाही विश्वास

    ‘Only’ शब्द लिहिण्यामागे कारण काय,  ही बातमी तर वाचा 

  • 30 Apr 2023 06:42 PM (IST)

    Jaggery Explosive : तिच्या हातात गुळाचा खडा नव्हताच तर

    तुटता तुटेना म्हणून तिने फेकला गुळाचा खडा

    त्यानंतर जे झाले ते होते अघटितच

    तिने तर डोळ्यासमोर साक्षात मृत्यू पाहिला

    नक्षलवादी बक्सर जिल्ह्यात काय घडली घटना, वाचा सविस्तर 

  • 30 Apr 2023 05:45 PM (IST)

    Godrej-Raymond Deal : नवीन मालकीण बाईकडे व्यवसायाची धूरा

    रेमंडच्या कामसूत्र, पार्क अव्हेन्यूचा मेकओव्हर

    गोदरेज कंझ्युमरने घेतली रेमंडची मालकी

    या नवीन ब्रँडची ही आहे नवीन मालकीण

    लिलाया संभाळते 97,000 कोटींचा व्यवसाय, वाचा सविस्तर

  • 30 Apr 2023 04:47 PM (IST)

    Locking Graves : या देशात महिला कब्रस्तानात पण नाही सुरक्षित

    महिलांच्या कब्रस्तानात होत आहे महापाप

    देशभर तीव्र संताप, बुद्धीजीवींचा हल्लाबोल जोरदार

    तुमच्या तळपायाची आग जाईल मस्तकात

    थडग्यांना लावावे लागत आहे कुलूप, वाचा सविस्तर 

  • 30 Apr 2023 04:01 PM (IST)

    भिवंडी इमारत दुर्घटनेत पाच जणांचा बळी

    एनडीआरडीच्या पथकाने ढिगाऱ्याखालून एका मृतास बाहेर काढले

    प्रमोद चौधरी वय 22 असे मृत व्यक्तीचे नाव

    सकाळपासून एकूण तीन जणांना बाहेर काढले

    बचावकार्यात बाहेर काढलेल्या जिवंत व्यक्तींची संख्या 10

  • 30 Apr 2023 03:30 PM (IST)

    जळगाव : धरणगाव बाजार समितीवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्व

    धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मंत्री गुलाबराव पाटलांचे वर्चस्व

    विजयानंतर ढोल ताशाचा गजरात मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या समवेत ठेका धरला

    भाजप शिवसेना पुरस्कृत पॅनलने 12 जागेवर यश मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली

  • 30 Apr 2023 03:18 PM (IST)

    गडचिरोली : ट्रक अपघातात दोन जण ठार

    दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकचा भीषण अपघात

    दोन जण जागीच ठार, ट्रकचालक गंभीर जखमी

    लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

  • 30 Apr 2023 03:03 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि NCP प्रमुख शरद पवार कार्यक्रमानिमित्त येणार एकत्र

    24 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एनसीपी प्रमुख शरद पवार हे कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार

    मराठा मंदिराच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम निमित्त दोन्ही नेते दुपारी तीन ते संध्याकाळी 6 वाजता एकत्र येणार

  • 30 Apr 2023 03:01 PM (IST)

    रायगड : बोरघाटात कारला आग

    पुण्याकडे जाणाऱ्या कारमध्ये 4 प्रवासी होते

    फायर ब्रिगेडने कारची आग आटोक्यात आणली

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ कार जळून खाक

  • 30 Apr 2023 02:37 PM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत 4 मे ला सुप्रीम कोर्टात सुनावणी

    प्रशांत जगताप विरुद्ध महाराष्ट्र शासन याचिकेवर होणार सुनावणी

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच भवितव्य 4 तारखेला ठरणार

    सुप्रीम कोर्टात निर्णय देईल अशी आशा आहे

    याचिकाकर्ते प्रशांत जगताप यांची प्रतिक्रीया

    चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडणुका हरतायेत

    भाजपा दोन महिन्याला एक सर्वे करतीये

    लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत असा भाजपचा प्लान आहे

    चंद्रशेखर बावनकुळेंनी आत्मचिंतन करावं

    प्रशांत जगतापांचा सल्ला

  • 30 Apr 2023 02:23 PM (IST)

    परभणी शहरात जोरदार पावसासह गारपीट

    दुपारी दोनच्या सुमारास शहरात मेघगर्जनेसह थोडा वेळ पाऊस

    काही प्रमाणावर गारपीट

    परभणी शहरात जोरदार पावसासह गारपीट

  • 30 Apr 2023 02:14 PM (IST)

    जळगाव: एकनाथ खडसे यांची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती विजयानंतर प्रतिक्रिया

    या सरकारच्या धोरणांवर शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी हे नाराज आहेत

    अवकाळी मुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत

    खोक्यांच्या राजकारणाला शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी कंटाळला आहे

    कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 वर्ष केलेले विकास कामे त्याचीही विजयाची पावती आम्हाला मिळाली

    कृषी उत्पन्न बाजार समिती विजयानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

  • 30 Apr 2023 01:51 PM (IST)

    कोल्हापूर | शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

    18 पैकी 16 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

    एका जागेवर भाजप शिवसेना युती आणि एका जागेवर अपक्षाने मारली बाजी

    काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश

  • 30 Apr 2023 01:48 PM (IST)

    कोल्हापूर | स्वाभिमानी मतदाराने मतपेटीतून पैसे केले परत

    शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    स्वाभिमानी मतदाराने मतपेटीतून पैसे केले परत

    कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनोखा प्रकार

    परत केलेलं पैसे निवडणूक आयोगाकडे देण्याची केली विनंती

    मतदाराने मतपेटीत 1000 रुपयांचे पाकीट टाकले

  • 30 Apr 2023 01:33 PM (IST)

    मनमाड | नाशिकच्या मनमाडमध्ये जोरदार पावसाची हजेरी

    अचानक आलेल्या पावसामुळे निवडणूक यंत्रणेसह पोलिसांची तारांबळ,

    मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचीही उडाली धावपळ,

    मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी होते आहे मतदान

  • 30 Apr 2023 01:26 PM (IST)

    कोल्हापूर | शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या

    चिठ्यांमधून नेत्यांना कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या कानपिचक्या आणि सल्ला

    चिठ्यांमध्ये गुवाहाटीपासून ते ईडी कारवाईर्यंत सगळयांचा उल्लेख

    जिल्ह्यातील नेत्यांचे गट वाढवण्यापेक्षा पक्ष वाढवण्याचा चंद्रकांत दादानांही दिला सल्ला

  • 30 Apr 2023 01:10 PM (IST)

    जळगाव | बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व कायम

    एकनाथ खडसे यांच्या पॅनलला आतापर्यंत 18 जागांपैकी 16 जागेवर विजय

    बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकनाथ खडसे यांचा दबदबा कायम

    खडसेंनी 25 वर्षाचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं वर्चस्व ठेवलं कायम

    मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपाला या ठिकाणी मोठा धक्का…..

    दोन जागांचा निकाल सुरू

  • 30 Apr 2023 01:01 PM (IST)

    पुणे | जागतिक वाहतूक कोंडीच्या समस्येत पुण्याचा सहावा क्रमांक

    पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे,

    एका खाजगी ‘टॉम टॉम’ या संस्थेनं केलेल्या अहवालात 6 वा क्रमांक पुण्याचा,

    पुण्यात आज रविवारच्या निमित्ताने खरेदीसाठी पुणेकर पडले बाहेर,

    शिवाजी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

  • 30 Apr 2023 12:11 PM (IST)

    Rule Change : नियमातील बदलाची बसणार झळ

    एटीएम, जीएसटी आणि गॅस सिलेंडरबाबत बदल

    1 मे पासून होणार मोठा बदल, बसले तुम्हाला झळ

    नकोशा कॉलपासून पण होणार सूटका

    फसवणुकीच्या मॅसेजपासून तुम्हाला हा नियम वाचवणार, वाचा बातमी 

  • 30 Apr 2023 12:00 PM (IST)

    बाजार समितीचा निकाल म्हणजे जनतेची सरकारच्या कंबरड्यात लात- संजय राऊत

    महाविकास आघाडीला बाजार समित्यांच्या निवडणूकीत यश मिळाले आहे- संजय राऊत

    ग्रामीण भागातला शेतकरी सध्याच्या सरकारला वैतागला आहे- संजय राऊत

    या निवडणूच्या निकालामधून लोकांच्या ‘मन कि बात’ स्पष्ट झाली आहे- संजय राऊत

  • 30 Apr 2023 11:50 AM (IST)

    जामखेड बाजार समितीच्या मतदानाला सुरूवात

    आज संध्याकाळी लागणार मतदानाचा निकाल

    निवणूकीमध्ये चुरशीची लढत

    भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला

  • 30 Apr 2023 11:44 AM (IST)

    परभणीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

    परभणीला अवकाळी पावसाने झोडपल, आंब्याचा मोहोर गळाल्याने शेतकरी त्रस्त

    आंब्याचा मोहोर गळाल्याने शेतकरी हवालदिल

    शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी

  • 30 Apr 2023 11:38 AM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

    बीएमसीची रणनिती ठरण्याची शक्यता 

    मुंबईत शहांच्या स्वागताचे बॅनर

  • 30 Apr 2023 11:32 AM (IST)

    ठाकरेंच्या घरातील माहिती बाहेर काढावी ही संजय राऊताचीच सुप्त इच्छा – नितेश राणे

    आग लावणं हे राऊतांच काम- नितेश राणे

    मुंबईतील गुंडांना बारसूत नेण्याचा ठकरेंचा डाव- नितेश राणे

    उद्धव ठकरेंबरोबर येणाऱ्या प्रत्त्येक गाडीची तपासणी करा- नितेश राणे

  • 30 Apr 2023 11:31 AM (IST)

    जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपा शिंदे गटाला दोन जागांवर यश

    एका जागेवर महाविकास आघाडी तर अन्य एका जागेवर पक्षाची बाजी

    ग्रामपंचायत गटातून हे निकाल जाहीर झालेत

    आतापर्यंत समोर आलेल्या निकालात महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटाला संमिश्र यश

  • 30 Apr 2023 11:22 AM (IST)

    शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहिर करावी- कुणाल पाटील

    मागच्या महिन्यात झालेल्या अवकाळीची देखील अद्याप मदत मिळालेली नाही- कुणाल पाटील

    फक्त 20 ते 25 टक्के शेतकऱ्यांनाच मदत मिळाली- – कुणाल पाटील

  • 30 Apr 2023 11:20 AM (IST)

    जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपा शिंदे गटाला दोन जागांवर यश

    एका जागेवर महाविकास आघाडी तर अन्य एका जागेवर पक्षाची बाजी

    ग्रामपंचायत गटातून हे निकाल जाहीर झालेत

    आतापर्यंत समोर आलेल्या निकालात महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटाला संमिश्र यश

  • 30 Apr 2023 11:18 AM (IST)

    Twitter Elon Musk : एलॉन मस्कचा नवीन फतवा

    ट्विटरवर बातम्या वाचणं पण होणार मुश्कील

    आता का वाचता येणार नाहीत तुम्हाला बातम्या

    एलॉन मस्कची काय आहे योजना

    तुमच्या खिशाला बसणार नाही ना झटका

    एलॉन मस्क कशासाठी करतोय हा खटाटोप, वाचा सविस्तर 

  • 30 Apr 2023 11:14 AM (IST)

    धुळ्यात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस

    अवकाळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचं पाणी

    अवकाळीने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान

    कुणाल पाटील यांच्याकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी

  • 30 Apr 2023 11:10 AM (IST)

    बारसूमध्ये अजुनही अत्याचार सुरू आहेत, संजय राऊत यांचा आरोप

    बारसूमध्ये लोकांना धमकावलं जातयं- संजय राऊत

    कोकणात न येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना धमकावलं जातयं- संजय राऊत

    हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवा- संजय राऊत

  • 30 Apr 2023 11:04 AM (IST)

    बेळगावमध्ये एकीकरण समितीचा प्रचार करुन दाखवा’ संजय राऊत यांचं शिंदे-फडणवीसांना आव्हान

    अमित शाह उद्याच्या महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाची तयारी पाहायला येत आहेत- संजय राऊत

    कोकण हे कोणाच्या मालकीचं नाही- संजय राऊत

    हिंमत असेल तर पालिका निवडणूक घ्या- संजय राऊत

  • 30 Apr 2023 10:20 AM (IST)

    TRAI : 1 मे पासून घ्या आता मोकळा श्वास

    टेलिमार्केटिंग कंपन्यांची फौज एका झटक्यात धराशायी

    मार्केटिंग कॉलपासून कोट्यवधी भारतीयांची सूटका

    दूरसंचार विभागाने घातला कंपन्यांना लगाम

    नकोशा कॉलचा नाही होणार त्रास, वाचा सविस्तर 

  • 30 Apr 2023 09:58 AM (IST)

    पाटोदा- शिरूर बाजार समितीत मतदान

    पाटोदा- शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतेय. या निवडणुकीत भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आष्टी- कडा बाजार समिती सुरेश धस यांनी बिनविरोध काढली असली तर पाटोदा- शिरूर बाजार समिती निवडणुकीत मात्र मोठे आव्हान आहे.

  • 30 Apr 2023 09:49 AM (IST)

    गोंदियात पाऊस

    गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे आणि त्यात जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि गोरेगाव येथील बाजार समितीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना पावसाचा फटका बसला.

  • 30 Apr 2023 09:37 AM (IST)

    कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल

    कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल

    महाविकास आघाडीने खोलले खाते

    चार जागांवर विजय

  • 30 Apr 2023 09:37 AM (IST)

    2 तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक

    2 तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक

    शरद पवारांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा प्रकाशन सोहळा

    कार्यक्रमानंतर होणार बैठक बैठकीला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता

    2 तारखेच्या बैठकीत 14 तारखेच्या पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेचा निर्णय होणार

  • 30 Apr 2023 09:28 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात मतदान

    भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि पवनी ह्या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात

    पावसामुळे मतदान कमी होण्याची शक्यता

  • 30 Apr 2023 09:25 AM (IST)

    सोने-चांदीच्या किंमतींना ब्रेक

    खरेदीदारांना साधता येईल सुवर्णसंधी

    19 एप्रिलपासून मोठी दरवाढ नाही

    सोन्याच्या किंमती आटोक्यात असल्याने दिलासा

    अमेरिकन केंद्रीय बँकेच्या धोरणाकडे लक्ष

    आजचा सोने-चांदीचा भाव काय, येथे जाणून घ्या 

  • 30 Apr 2023 09:24 AM (IST)

    चंद्रपूर मतदान

    चंद्रपूर जिल्ह्यातील 3 बाजार समितींच्या मतदानाला सुरुवात

    पोंभुर्णा, गोंडपिंपरी आणि भद्रावती बाजार समिती साठी होत आहे मतदान

  • 30 Apr 2023 09:22 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि पवनी ह्या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात

    – भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि पवनी ह्या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदानाला सुरूवात…

    – रीप रीप पावसामुळे संत गतीने मतदानाला सुरुवात…

    – नाना पटोले,प्रफुल्ल पटेल,परीणय फुके.शिःदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला

    – नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखनीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लाखांदूर बाजार समितीकडे लागल्या आहे.

  • 30 Apr 2023 09:22 AM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या महापालिकेला सूचना

    पुण्यात पाणीकपात होणार नाही

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या महापालिकेला सूचना

    यंदा पर्जन्यमान कमी असल्यानं पाण्याचं नियोजन सुरू झालं आहे

    मात्र पाणी जपून वापरा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच नागरिकांना आवाहन

    ऐन उन्हाळ्यात पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवर.आहे

    मात्र पाणीकपात न करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

  • 30 Apr 2023 09:21 AM (IST)

    जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरूज हे पुस्तक अजित पवारांना दिलं भेट

    राजगडाच्या पायथ्याला 92 किलो सोन्याची जिजाऊंची मुर्ती असलेलं मंदिर उभं राहणाय

    शिवाजी द मँनेजमेंट गुरु पुस्तकाचे लेखक शिवव्याख्याते नामदेव जाधव यांनी घेतली अजित पवारांची भेट

    6 जूनला पाल गावात मंदिराच्या कामाचा होणार शुभारंभ

    कार्यक्रमासाठी अजित पवारांना दिलं निमंत्रण

    जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरूज हे पुस्तक अजित पवारांना दिलं भेट

  • 30 Apr 2023 09:18 AM (IST)

    जिजाऊंचे मंदिर उभारणार

    राजगडाच्या पायथ्याला 92 किलो सोन्याची जिजाऊंची मूर्ती असलेलं मंदिर उभारणार

    शिवाजी द मँनेजमेंट गुरु पुस्तकाचे लेखक शिवव्याख्याते नामदेव जाधव यांनी याबाबत अजित पवारांची घेतली भेट

    6 जूनला पाल गावात मंदिराच्या कामाचा होणार शुभारंभ

    कार्यक्रमासाठी अजित पवारांना दिलं निमंत्रण

    जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरूज हे पुस्तक अजित पवारांना दिलं भेट

  • 30 Apr 2023 09:14 AM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी संवाद

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी संवाद

    महात्मा सोसायटीत येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत समस्या घेतल्या जाणून

    वाहतूकीसह , पाण्याच्या समस्या नागरिकांनी चंद्रकांत पाटलांकडे मांडल्या…

  • 30 Apr 2023 09:14 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील सहा बाजार समितीसाठी मतदान सुरू.

    अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील सहा बाजार समितीसाठी मतदान सुरू..

    अचलपूर, चांदुरबाजार,वरुड, धामणगाव रेल्वे, धारणी व दर्यापूर तालुक्यात मतदान

    धारणीत १८ पैकी ८ संचालक अविरोध

    ८ अविरोध पैकी प्रहार संघटना ३ व भाजप २ जागा,काँग्रेस १ व उद्धव ठाकरे गट १ जागा अविरोध विजयी.

    आमदार बच्चू कडू यांच्या अचलपूर व चांदुरबाजार मध्ये प्रतिष्ठेची निवडणूक

    तर वरुड मध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील प्रतिष्ठेची निवडणूक

    पहिल्या टप्प्यातील ६पैकी ५बाजार समितीवर माविआने झेंडा फडकविला असल्याने उर्वरित ६ निवडणूकीत सर्वांच लक्ष

    आजच मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार व रात्री उशिरा निकाल येणार

  • 30 Apr 2023 09:11 AM (IST)

    अमरावतीत मुसळधार

    अमरावतीच्या मेळघाटमध्ये मध्यरात्री तुफान पाऊस झाला. या पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यावर धुक्याची चादर पसरली. पावसामुळे पहाटे चिखलदरातील रस्त्यांवर दाट धुके दिसून आले.

  • 30 Apr 2023 09:09 AM (IST)

    अमरावतीत मतदान सुरु

    अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील सहा बाजार समितीसाठी मतदान सुरू

    अचलपूर, चांदुरबाजार,वरुड, धामणगाव रेल्वे, धारणी व दर्यापूर तालुक्यात मतदान

    धारणीत १८ पैकी ८ संचालक अविरोध

    ८ अविरोध पैकी प्रहार संघटना ३ व भाजप २ जागा,काँग्रेस १ व उद्धव ठाकरे गट १ जागा अविरोध विजयी

  • 30 Apr 2023 09:01 AM (IST)

    बाजार समितीचे मतदार, संदीपान भुमरे मतदान करायला सुरुवात

    बाजार समितीचे मतदार, संदीपान भुमरे मतदान करायला सुरुवात

  • 30 Apr 2023 09:01 AM (IST)

    मनमाडमध्ये मतदानास सुरुवात

    नाशिकच्या अत्यंत चुरशीच्या आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे. या निवडणूक मतदानापूर्वी 100 पेक्षा जास्त मतदार गेल्या काही दिवसापासून अज्ञातॉस्थळी होते. आता त्यांना घेऊन बस मनमाडमध्ये दाखल झाली. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यासाठी अत्यंत चुरशीच्या समजली जाते. या निवडणुकीत कांदे विरोधात 5 महविकास आघाडीचे माजी आमदार असे चित्र आहे. निकाल आजच जाहीर होणार आहे.

  • 30 Apr 2023 09:00 AM (IST)

    वसई विरार नालासोपारा मध्ये पहाटे पासून अवकाळी पाऊस

    विरार:- वसई विरार नालासोपारा मध्ये पहाटे पासून अवकाळी पाऊस

    रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पावसाचा सडाका पडत आहे…

    सकाळ पासून रिमझिम पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून, गर्मी पासून दिलासा मिळाला आहे..

    सध्या पाऊस थांबला आहे मात्र पूर्ण परिसरात ढगाळ वातावरण आहे

    विरार पूर्व मनवेलपाडा रोड वरील सकाळी 8.50 ची ही दृश्य

  • 30 Apr 2023 08:54 AM (IST)

    कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती पहिला निकाल हाती

    कोल्हापूर

    कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती पहिला निकाल हाती

    हमाल गटातून बाबुराव खोत विजय

    बाबुराव खोत 60 मतांनी विजयी

  • 30 Apr 2023 08:53 AM (IST)

    हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त संचालक अरुण भोसले यांनी घेतली भेट

    हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त संचालक अरुण भोसले यांनी घेतली भेट

    काल झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळवला विजय

    बारामती हॉस्पिटलमध्ये अजित पवारांची घेतली भेट …

  • 30 Apr 2023 08:53 AM (IST)

    शिंदे गटाच्या दोन बस देखील हजर

    मनमाड मध्ये मतदारांना घेऊन आलेली बस मनमाड मध्ये पोहचली..

    शिंदे गटाच्या दोन बस देखील हजर

    दोन्ही गटाच्या लोकांनी मतदार बाहेर नेले होते..

  • 30 Apr 2023 08:43 AM (IST)

    जागतिक बाजारात कच्चे तेल महागले

    पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

    सुट्टीत बाहेर जाण्यापूर्वी भाव घ्या जाणून

    कोणत्या शहरात वाढला दर

    कुठे झाले सर्वात स्वस्त इंधन

    पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही मोठी वाढ

    गेल्या 11 महिन्यांपासून भावात उलथापालथ नाही

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर,  वाचा बातमी 

  • 30 Apr 2023 08:40 AM (IST)

    मनमाड बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे

    नाशिकच्या अत्यंत चुरशीच्या आणि महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली असून, थेट 100 पेक्षा जास्त मतदारांना गेल्या काही दिवसापासून अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याने मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींना वेग आल्याने मनमाड बाजार समिती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे…

  • 30 Apr 2023 08:38 AM (IST)

    अमरावतीच्या मेळघाट मध्ये मध्यरात्री तुफान पाऊस.

    अमरावती

    अमरावतीच्या मेळघाट मध्ये मध्यरात्री तुफान पाऊस.

    पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यावर पसरली धुक्याची चादर…

    पावसामुळे पहाटे चिखलदरातील रस्त्यांवर दाट धुके…

  • 30 Apr 2023 08:38 AM (IST)

    मनमाड बाजार समिती निवडणुक…

    मनमाड बाजार समिती निवडणुक… मविआचे उमेदवार आणि मतदार मनमाडकडे रवाना … पहाटे शिर्डीतून मनमाड कडे रवाना…. शिर्डीतील विविध हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचे ४०० मतदार होते मुक्कामी…. उमेदवार देखील शिर्डीत हॉटेलला होते मुक्कामी… हॉटेल थ्रि जी येथे थांबले होते उमेदवार आणि १६० मतदार… काल रात्री ११ वाजेच्या दरम्यान हॉटेलवर पोलिसांनी घेतली होती झाडाझडती… पोलिसांनी उमेदवारांना हॉटेलच्या रूममधून बाहेर काढत केली चौकशी… सत्ताधारी पोलिस बळाचा वापर करत असल्याचा मविआच्या नेत्यांचा आरोप… शिर्डीतील हॉटेलवर अर्धातास सुरू होता ‘हाय व्होल्टेज ड्रामा’… गोंधळानंतर पोलिसांचा हॉटेलमधून काढता पाय… मनमाड बाजार समितीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे विरोधात महाविकास आघाडी अशी लढत…

  • 30 Apr 2023 08:27 AM (IST)

    कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

    कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल

    बाजार समितीसाठी शुक्रवारी चुरशीन 92% इतकच झालं होतं मतदान

    18 जागांसाठी 51 उमेदवार होते रिंगणात

    आज रमणमळा शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये 36 टेबलवर होणार मतमोजणी

    बाजार समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी जनस्वराज्य विरुद्ध भाजप शिवसेना अशी होतेय लढत

    तर जयसिंगपूर बाजार समितीसाठी आज होणार मतदान

    जयसिंगपूर बाजार समितीच्या 18 पैकी सात जागा झाल्या आहेत बिनविरोध

    11 जागांसाठी 24 उमेदवार आहेत रिंगणात

  • 30 Apr 2023 08:27 AM (IST)

    कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या मतदानाला सुरुवात

    कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या मतदानाला सुरुवात

    तालुक्यातील सहा केंद्रावर होत आहे मतदान प्रक्रिया

    निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदयसिंह पाटील उंडाळकर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील डॉ अतुल भोसले यांची प्रतिष्ठा पणाला

  • 30 Apr 2023 08:26 AM (IST)

    दंगलीत जळालेल्या पोलिसांच्या तब्बल 13 वाहनांचे काढले नव्हते इन्शुरन्स

    छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग :-

    किराडपुरा दंगलीत जाळल्या गेलेल्या वाहनांचे इन्शुरन्स नसल्याची माहिती समोर

    दंगलीत जळालेल्या पोलिसांच्या तब्बल 13 वाहनांचे काढले नव्हते इन्शुरन्स

    वाहनांचे इन्शुरन्स नसल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

    किराडपुरा दंगलीत जाळण्यात आली होती पोलिसांची तब्बल 13 वाहने

  • 30 Apr 2023 08:25 AM (IST)

    डॉक्टरांच्या तात्पुरत्या बदल्यांना आता कायमस्वरूपी स्थगिती

    छत्रपती संभाजी नगर ब्रेकिंग :-

    डॉक्टरांच्या तात्पुरत्या बदल्यांना आता कायमस्वरूपी स्थगिती

    इम्तियाज जलील यांच्या याचिकेनंतर देशभरात मोठा निर्णय

    राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परिपत्रक काढून जारी केला आदेश

    डॉक्टरांच्या तात्पुरत्या बदल्यांना आता कायमस्वरूपी बंदी

  • 30 Apr 2023 08:25 AM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील 2 बाजार समितीचे मतदान आज…..

    गोंदिया जिल्ह्यातील 2 बाजार समितीचे मतदान आज…..

    मतदानाला दोन्ही बाजार समितीमध्ये सुरवात…..

    गोरेगांव बाजार समिती मध्ये भाजपा आणि विद्रोही कांग्रेस गठबंधन….

    सडक अर्जुनी येथे भाजप आणि राष्ट्रवादी गठबंधन…

  • 30 Apr 2023 08:25 AM (IST)

    यवतमाळ येथे अवकाळी पावसाला सुरुवात

    यवतमाळ येथे अवकाळी पावसाला सुरुवात

    सकाळी सात वाजल्यापासून विजेच्या कडकडासह जोरदार पावसाला सुरुवात

    सतत एक तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग

    शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज

    जिल्हा प्रशासनाने दिले शेतकरी व नागरिकांना सतर्कचा इशारा

  • 30 Apr 2023 08:23 AM (IST)

    अमरावती शहरासह जिल्हाभरात रात्रभर मुसळधार पाऊस

    अमरावती ब्रेकिंग

    अमरावती शहरासह जिल्हाभरात रात्रभर मुसळधार पाऊस

    अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडले.

    शहरात अनेक ठिकाणी विद्युत पोलही कोसळले..

    विद्यूत पोल वर झाडे कोसळल्याने मध्यरात्री अडीच वाजता पासून वीज पुरवठाही खंडित..

  • 30 Apr 2023 08:15 AM (IST)

    अमरावती शहरासह जिल्हाभरात रात्रभर मुसळधार पाऊस

    अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडले

    शहरात अनेक ठिकाणी विद्युत पोलही कोसळले

    विद्यूत पोल वर झाडे कोसळल्याने मध्यरात्री अडीच वाजता पासून वीज पुरवठाही खंडित

  • 30 Apr 2023 07:40 AM (IST)

    मुंबईत 5 हजार ठिकाणी ‘मन की बात’चे आयोजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या पर्वासाठी मुंबई भाजपने जय्यत तयारी केली आहे

    मुंबईसह उपनगरातील 36 विधानसभेतील 5 हजाराहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली

    कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी 11 वा. होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली

  • 30 Apr 2023 07:12 AM (IST)

    मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी, सकाळपासून मुंबईच्या काही भागात रिमझिम पाऊस

    परळ, मलबारहिल परिसरात जोरदार पाऊस

    गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या पारा वाढला होता, पावसामुळे मुंबईकरांना दिलासा

    येत्या 5 मेपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

  • 30 Apr 2023 07:10 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुणे, मावळ, बारामती दौऱ्यावर

    मावळात सुनील शेळकेंच्या बैलगाडा शर्यतीला लावणार हजेरी

    अजित पवारांचे आज विविध कार्यक्रम

    काल बाजार समितीच्या निवडणूकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं यश मिळवल्यानंतर आज दादांच मावळात होणार स्वागत

  • 30 Apr 2023 07:08 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 मे रोजी पुणे दौऱ्यावर जाणार

    राज ठाकरेंच्या हस्ते होणार पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन

    जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्थेच्यावतीने व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन

    बालगंधर्व कलादालन येथे शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता उद्घाटन सोहळा

  • 30 Apr 2023 07:07 AM (IST)

    राज्यभरात आज एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार

    राज्यात जवळपास 4 लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केला आहे

    तर 37 जिल्हा केंद्रावर.ही परीक्षा पार पडणार आहे

    एमपीएससी विद्यार्थ्यांची हॉलतिकीट व्हायरल झाल्यानंतर एमपीएससी गट ब संयुक्त पुर्व परीक्षा होणार की नाही यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता

    मात्र माहिती लिक झाली नाही डेटा सुरक्षित असल्याचं सांगत एमपीएससीनं आजच ठरलेल्या दिवशी परीक्षेचं नियोजन केलं आहे

  • 30 Apr 2023 07:05 AM (IST)

    बाजार समित्यांचे सर्व निकाल जाहीर, महाविकास आघाडीची सरशी तर भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

    बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला 40 आणि शिंदे गटाला अवघ्या 8 जागा मिळाल्या आहेत

    राष्ट्रवादीला 38, काँग्रेसला 32 आणि ठाकरे गटाला 11 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांनी 18 जागांवर विजय मिळवला आहे

    या निवडणुकीत 147 जागांपैकी महाविकास आघाडीला 81 तर भाजप-शिवसेना युतीला 48 जागा मिळाल्या आहेत

    राज्यातील मुख्यमंत्रीपद स्वत:कडे असूनही शिंदे गटाला अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत

Published On - Apr 30,2023 7:01 AM

Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.