Maharashtra Breaking Marathi News Live | वर्षावर राजकीय भेटीगाठींना वेग, पवारांनंतर शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.
मुंबई : 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडिया येथे आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि जाणता राजा महानाट्याचे आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. इयत्ता दहावीच्या निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता. कोकण रेल्वे मार्गावर शनिवारपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून करणार शुभारंभ. बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलन पेटणार. राज्यव्यापी आंदोलनाा निर्मय घेण्यासाठी 17 जूनला मुंबईत बैठक. मुंबई – गोवा महामार्गावर 5 दिवस अवजड वाहनांना बंदी. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त घेतला निर्णय. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या 200 भारतीय मच्छिमारांची सुटका होणार
पाकिस्तानच्या तुरुंगात ओलीस असलेल्या 200 हून अधिक भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी सर्व भारतीय मच्छिमार वाघा सीमेवर पोहोचतील. गुजरातचा मत्स्य विभाग आणि सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या मच्छिमारांना ताब्यात घेणार आहेत. वाघा सीमेवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मच्छिमार मायदेशी परततील. मच्छिमारांची सुटका झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान रांचीला रवाना
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांसह रांचीला पोहोचले.उद्या 2 जून रोजी ते झारखंडचे मुख्यमंत्री आणि जेएमएम कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांची भेट घेणार आहेत.
-
-
भारताने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 चे यशस्वी प्रक्षेपण
भारताने गुरुवारी (1 जून) ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 ची यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण यांनी माहिती दिली की हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
-
इम्रान खान यांच्या पक्षाचे अध्यक्ष परवेझ इलाही यांना अटक
पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री परवेझ इलाही यांना लाहोरमधून अटक करण्यात आली आहे.
-
पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आशिष शेलार वर्षावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीत जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. आता या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता भाजपा आमदार आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मंत्रिमंडळ विस्तार बाबत महत्वाचा संदेश घेऊन शेलार आल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
-
दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स बैठकीसाठी रशिया आणि चीनचे परराष्ट्र मंत्री तयार
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स आर्थिक गटाच्या बैठकीत सहभागी होण्याचे रशिया आणि चीनने मान्य केले आहे. बैठकीत युद्धासह प्रमुख भू-राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धावर ब्रिक्स देशांची भूमिका वेगळी आहे.
-
तळोदा ते रावेरपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी 62 कोटी निधी मंजूर; खासदार रक्षा खडसे यांची माहिती
जळगाव :
बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गावर तळोदा ते रावेरपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी 62 कोटी निधी मंजूर
खासदार रक्षा खडसे यांची माहिती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मंत्री नितिन गडकरी यांचे मानले आभार
मध्यप्रदेश, महाराष्ट्र तसंच गुजरात या तीन राज्यांना जोडणार बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्ग
केंद्र शासनाच्या निधीतून 61 कोटी रुपये मंजूर
-
राजकारणातील विरोध राजकारणात ठीक, मात्र त्याचा देशाच्या एकत्मतेवर परिणाम नको; मोहन भागवत
नागपूर:
कोरोना काळात सगळ्यात चांगलं काम कोणी केलं असेल तर ते भारताने केलं
हे जेव्हा जगात सांगितलं जातं त्याचा गौरव वाटतो
जी 20 भारतात झालं
संदेसच्या नवीन भवनच उद्घाटन झाले त्याचा गौरव वाटतो
काही चांगले दृश्य दिसत असले तरी काही कलहसुद्धा पाहायला मिळत आहेत
भाषेचा विवाद होतो आपसात लढतात हे योग्य नाही
आपण आपल्या शक्ती देशाच्या सीमेवर देशाच्या रक्षणसाठी दाखविली पाहिजे
आपल्या लोकांमध्ये विसंवाद होऊ नये आपसात लढाई झगडे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
राजकारणातील विरोध राजकारणात ठीक आहे मात्र त्याचा देशाच्या एकत्मतेवर परिणाम व्हायला नको
-
‘संघर्षाची मशाल हाती’चे प्रकाशन; सीताराम येचुरींनी सरकारवर साधला निशाणा
सोलापूर :
– माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा
– कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या ‘संघर्षाची मशाल हाती’ या आत्मचरित्राचा प्रकाशन
– माकपचे राष्ट्रीय सहसचिव सीताराम येचुरी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
– या कार्यक्रमात माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी बोलताना सरकारवर केला हल्लाबोल
-
शेतातून कामं करुन घरी जाताना ट्रक्टरने घेतला पेट; वाशिम जिल्ह्यातील घटना
वाशिम :
-शेतातील मशागतीचे कामे आटपून घरी जात असताना ट्रक्टरने घेतला पेट
-वाशिम जिल्ह्यातील मानोरा ते मंगरूळपीर महामार्गावर साखरडोह येथील घटना
-अचानक ट्रॅक्टरने पेट घेतल्याने रस्त्यावर गोंधळ
-या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
-ट्रॅक्टर मालकाचे मात्र प्रचंड नुकसान
-ट्रॅक्टरने पेट घेताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले
-
ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा धक्का; मुंबईतील माजी 2 नगरसेवकांचा पक्षप्रवेश
मुंबई :
ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा धक्का
मुंबईतील माजी 2 नगरसेवक आज शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार
थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार पक्ष प्रवेश
माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे राजकीय चर्चेला उधान
-
शरद पवार घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण
शरद पवार यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली
उद्धव ठाकरे प्रदेश दौऱ्यावर असताना पवारांनी ही भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण
परंतू एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबतचा खुलासा केला आहे
शरद पवार यांची भेट ही सदिच्छा भेट होती
मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी पवार यांनी ही भेट घेतली
असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांसोबतच्या भेटीनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे
-
राज ठाकरे यांचं रायगडमध्ये जंगी स्वागत, हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
राज ठाकरे यांचं रायगडमध्ये जंगी स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज विसावा हॉटेल येथे थांबणार
कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं रायगडमध्ये ढोल ताशे वाजवून स्वागत
मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आधीच गडावर दाखल
-
सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, अवकाळी पावसाने मोठं नुकसान
सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरुप
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली
वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकाने आणि वाहनांचे मोठं नुकसान
पहिल्याच अवकाळी पावसाने सांगलीकर हैराण
आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता
-
शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली
मुख्यमंत्री आणि पवार यांच्या भेटीचं कारण उद्याप स्पष्ट झाले नाही
शरद पवारांनी अचानक भेट घेतल्यानं सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे
काही वेळ झालेल्या या भेटीमुळे एक वेगळं महत्त्व आलं आहे
-
मान्सून पुन्हा लांबणीवर, अजून 8 ते 10 दिवस वाट पहावी लागणार
मान्सूनसाठी अजून 8 ते 10 दिवस वाट पहावी लागणार
केरळात मान्सून 4 जूनला दाखल होणार
पुढच्या दोन आठवड्यात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रीय
यंदा सरासरी 96% इतका पाऊस पडण्याची शक्यता
पुणे हवामान विभागाचा अंदाज
-
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खलबतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्या वर्षा निवासस्थानी 40 मिनिटं खलबतं झाली. सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी भेटीनंतर सांगितलं. मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी जय्यत
मुंबईः
छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
मनसेचे सर्व मोठे नेते कार्यकर्ते पदाधिकारी या सोहळा उपस्थिती दर्शवणार
आधीच गडावर गर्दी झाली त्यामुळे हा ऐतिहासिक असा सोहळा होणार
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिवभक्त जरी असले तरी महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची जी अवस्था आहे ती अत्यंत वाईट आहे
जर हे एवढे मोठे शिवभक्त असतील तर यांनी गडकिल्ल्यांची निगराणी का केली नाही
-जितेंद्र आव्हाड यांना केवळ एवढा सल्ला आहे की त्यांनी आता सांभाळून राहावं
-
‘या’ दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को संकुलात होणार
शिवसेनेचा वर्धापन दिन यंदा गोरेगाव येथील नेस्को संकुलात होणार
शिवसेनेचा वर्धापन दिन हा 19 जूनला आहे
सत्तांतरानंतर शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन
शिवसेना UBT पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार
-
Cm Eknath Shinde On Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
नियोजनात कुठलीही उणीव राहता कामा नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
वारकऱ्यांची सर्व सुविधा ही चोखपणे व्हावी, मुख्यमंत्र्यांची सूचना
-
Ambadas Danve | शिंदे गटातील लोकांची मानसिक घालमेल सुरु : विरोधी पक्षनेता अंबादास दानवे
शिंदे गटातील लोकांची मानसिक घालमेल सुरु, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
शिंदेसोबत 2-4 लोक मनाने, इतर नाहीत : अंबादास दानवे
अंबादास दानवे हे त्यांचा अनुभ सांगतायेत, दानवेंच्या प्रतिक्रियेला उदय सामंत यांचं प्रत्युत्तर
-
Girish Mahajan On Pankaja Munde | पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरुन गिरीश महाजन काय म्हणाले?
क्रीडा मंत्री आणि भाजप खासदार गिरीश महाजन यांची पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
पंकजा मुंडे भाजप कोअर कमिटीच्या सदस्य आहेत : गिरीश महाजन
पंकजा मुंडे सक्रीय, गैरअर्थ काढण्याचं कारण नाही, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण
-
रायगड राजदरबाराची प्रतिकृतीतील कमान हटवली, कारण काय?
रायगड राजदरबाराची प्रतिकृतीतील कमान हटवण्यात आली
पावसामुळे राजदरबारच्या प्रतिकृतीत बदल करण्यात आला
वाऱ्याचा वेग वाढत असल्यामुळे बदल करण्यात आला
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कमान हटवली
-
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा, नक्की प्रकरण जाणून घ्या
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा
माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
भाजप आयटी सेलकडून व्हीडिओ एडीट, आव्हाड यांचा आरोप
-
उल्हासनगर : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सिंधी समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
भादंवि १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ अन्वये गुन्हा दाखल
हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे
-
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे रायगडावर आगमन
३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह
-
नवी दिल्ली : विरोधी पक्षांची बैठक फिस्कटली
12 जूनला बिहारच्या पटनामध्ये होणार होती बैठक
राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची होती बैठक
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बोलावली होती बैठक
बैठकीत काँग्रेस सहभागी होणार नाही अशी सूत्रांची माहिती
महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना होत निमंत्रण
-
मुंबई : बैठकीत पर्यटन प्रकल्पांना मान्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक
समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना देण्यात आली मान्यता
गोसेखुर्द येथे जलपर्यटन, नागपुरातील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण होणार
कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबावच्या गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्पांना मंजुरी
-
काँग्रेसच्या आमदाराकडून रावसाहेब दानवे यांची स्तुती
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून खासदार रावसाहेब दानवे यांची स्तुती
जालना शहरात आज मोतीबाग परिसरात 150 फूट उंच ध्वजाचे,
लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे
या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमाला जालना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हजर होते
यावेळी भाषण करताना कैलास गोरंट्याल यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची स्तुती केली
जालना शहरात जी विकास कामे झाली ती फक्त दानवे यांच्यामुळे झाली
यासाठी रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले पाहिजे असेही आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले
-
कोणालाही महत्वाकांक्षा असणे अजिबात गैर नसून त्यांना माझ्या शुभेच्छा- खासदार अमोल कोल्हे
शिरूर लोकसभा मतदारसंघातून 2009 साली विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती
पुन्हा एकदा विलास लांडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे
कोणालाही महत्वाकांक्षा असणे अजिबात गैर नसून त्यांना माझ्या शुभेच्छा
पण असे म्हणतात ना की शर्यत जून संपली नाही, कारण मी जून जिंकलो नाही
अशा मोजक्या शब्दात खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
-
पटना येथे आयोजित करण्यात आलेली विरोधी पक्षांची बैठक फिस्कटली
12 जूनला बिहारच्या पटनामध्ये होणार होती बैठक
राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची होती बैठक
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बोलावली होती बैठक
बैठकीत काँग्रेस सहभागी होणार नाही, सूत्रांची माहिती
महाराष्ट्र राज्यासह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना होत निमंत्रण
-
शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांची मला जाण आहे- विलास लांडे
नागरिकांना न्याय देणारा कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य नागरिक माझ्याकडे बघतात
सध्याचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे सर्वसामान्यांना वेळ देत नाहीत, असं अप्रत्यक्षपणे लांडे म्हणाले
गेल्या 35 वर्षापासून मला राजकारणाचा अनुभव आहे
शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे
काही उत्साही कार्यकर्त्यांनी माझे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लावलेले आहेत
यातून मार्ग निघण्यासाठी माझ्याकडे भावी खासदार म्हणून बघितलं जात आहे.
अमोल कोल्हे अत्यंत हुशार आणि सुसंस्कृत असे नेते आहेत. राज्यात देशात त्यांचं मोठं नाव आहे.
2024 लोकसभेच्या दृष्टीने योग्य तो उमेदवार शिरूर लोकसभेसाठी पक्षश्रेष्ठी देईल या मला वाटत.
-
व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप
नाशिक रोड व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आणि वरिष्ठांनी पैसे घेतल्याचा आरोप
जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या अंगावर उधळल्या नोटा
-
क्लीनचिट मिळाली हे आरोपी कसं सांगू शकतो- सुषमा अंधारे
क्लीनचिट दिली ही गोष्ट तपास अधिकाऱ्यांनी सांगितली पाहिजे, त्यांनी का नाही सांगितलं
महिला आयोगाकडे अजून हा अहवाल आलेलाच नाही अजून, हा गोपनीय अहवालल डिसक्लोज कसा कायं झाला
तपास अधिकाऱ्यांनी आर्थिक अमिषाला बळी पडून ही कृती केलीय का? राजकीय दबावाखाली
ही कृती केली आहे का? त्या तपास अधिकाऱ्याचे निलंबन झालं पाहिजे
ज्या फिर्यादीच्या म्हणण्यावर ही चौकशी समिती नेमलेली आहे त्या फिर्यादीला याची माहिती का दिली गेली नाही
मला माहिती पण नाही तपास अधिकारी महिला आहे की पुरुष
-
गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
चक्क जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षाला हटवण्याची केली कार्यकर्त्यांनी मागणी
बाजार समितीच्या निवडणुकांपासून काँग्रेसचा अंतर्गत वाद सुरू
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली तक्रार
मागणी पूर्ण न झाल्यास सर्व कार्यकर्ते देणार राजीनामे
-
डोंबिवलीत डॉमिनोझ पिझ्झाच्या दुकानात चोरी
24 तासात रामनगर पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या मदतीने ठोकल्या बेड्या
आरोपी त्याच दुकानात करत होता काम
तोंडावर मोठा कपडा बांधून गल्ल्यामधील 80 हजार केले लंपास
-
एकीकडे भाजपविरोधात इतर पक्ष एकवटत असतानाच दुसरीकडे राज्यात आणखी 15 पक्षांची नोंदणी
राज्य निवडणूक आयोगाकडे मागील 5 महिन्यात या 15 पक्षांची नोंदणी
रामदास आठवलेंच्या रिपाइं, मेटेंच्या संघटनेसह BRS ने राज्य पक्ष म्हणून मान्यता घेतली
दरम्यान मागील 5 महिन्यात 15 नवीन पक्षांच्या मान्यतेवर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब
राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची चिन्हे
त्यादृष्टीने राजकीय हालचाली वाढत असतानाच प्रस्थापित राजकीय पक्षांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता
-
दहावी बारावीचे बोगस प्रमाणपत्र प्रकरण
दहावी बारावीचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या आणखी एका एजंटला पुणे पोलिसांनी केली अटक
जगदीश रमेश पाठक असे या एजंटचे नाव
पाठक याला रोहामधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक
पाठक याने आतापर्यंत अंदाजे 30 ते 40 लोकांना बोगस प्रमाणपत्रे दिली असल्याचं तपासातून समोर
पुणे पोलिसांनी आतापर्यंत राज्यातील विविध भागातून 6 जणांना अटक
अजूनही काही एजंट पुणे पोलिसांच्या रडारवर
दहावीचा पास प्रमाणपत्र देण्यासाठी घेतले जात होते 50 ते 60 हजार रुपये
-
तुमच्याकडे जे चार पाच लोकं राहिलेत ते आधी सांभाळा – गिरीश महाजन
कुणाला वेड लागलंय का, तुमच्याकडे यायला
आपण काय बोलतोय
तुमच्याकडे आमदार खासदार म्हणून जे लोकं थांबलेत
त्यांना दोन चार महिने सांभाळलं तरी खूप कमावल्यासारखं होईल
उगाच लोकांची थट्टा करू नका
-
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी वेगळा अर्थ काढलाय – गिरीश महाजन
पंकजा मुंडे मध्यप्रदेशच्या आमच्या प्रभारी आहेत, कोअर कमिटीच्या सदस्यही आहेत
प्रत्येक बैठकीला त्या हजर असतात
त्यामुळे माध्यमांनी त्यांच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय
पंकजा मुंडे मध्य प्रदेशमध्ये सक्रिय आहेत, राज्यातही पूर्ण वेळ देतायत
त्यामुळे कुणीही गैरअर्थ काढण्याचं कारण नाही
-
शिरसाटांच्या चौकशीचं नाटक कशासाठी केलं? – सुषमा अंधारे
पुरावे असूनही कारवाई होत नाही
संजय शिरसाट असभ्य आणि उर्मट
समितीचा अहवाल माझ्यापर्यंत आलाच नाही
समितीने माझी बाजू का ऐकली नाही?
पुरावे असूनही कारवाई होत नाही
-
मंचरमधील कथित लव्ह जिहाद प्रकरण
पीडित मुलीचा फायनल जबाब मंचर पोलिसांनी घेतला
राजगुरुनगर उपजिल्हा न्यायालयात सादर करणार जबाब
पीडित मुलीच्या सुटकेचा व्हिडीओ सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हाय
मंचर लव्ह जिहाद प्रकरणात पोलीस आणि न्यायालयाच्या निर्णायाकडे सर्वांचे लक्ष
प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी पिडित तरुणीसह नातेवाईकांची भेट घेतली
-
बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडला लागली आग
धुरामुळे परिसरातील नागरिकांचा श्वास गुदमरला
बदलापूर पालिकेचं घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
-
जालना शहराचे तापमान 40 अंशाच्या वर
सूर्य आग ओकत आहे
वाढत्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळताहेत
रस्त्यावरील वाहतूक मंदावली
-
नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जाच्या नोटीसा रामकुंडात बुडवून शेतकऱ्यांनी केला निषेध
शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली जिल्हा बँकेकडून सुरू
शेतकरी संघटना समन्वय समितीच्या वतीने पंचवटीतील रामकुंड येथे घोषणाबाजी करत आंदोलन
जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या नोटिसा रामकुंडाच्या पाण्यात बुडवून निषेध
-
ठाणे काँग्रेसकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची पोलखोल
31 मे पर्यंत नाले सफाईचा महापालिकेने दिला होता अल्टीमेटम
परंतु ठाणे शहरात अजून देखील नालेसफाई झाली नसल्याची काँग्रेसचा आरोप
मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांनी संबंधितावार कारवाई करण्याची मागणी
अन्यथा काँग्रेसकडून ठाणे महापालिका मुख्यालयावर टमरेल आंदोलन काढणार
ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा इशारा
काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी मोबाईल स्टेट्सवर ठेवले नाले सफाईच्या न झालेल्या नाल्याचे फोटो
-
कडाक्याच्या उन्हामुळे अमरावतीत संत्रा बागांना मोठा फटका
संत्रा उत्पादनात होणार कमालीची घट
उन्हाच्या तापमानात वाढ झाल्याने झाडावरील बारीक संत्रे भाजली
आधी अवकाळी पावसाने आणि आता कडक तापमानाने शेतकऱ्यांच मोठे नुकसान
संत्र्याबरोबरच मोसंबी आणि निंबूलाही मोठा फटका
-
अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन
अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट तसेच लेखकावर अतिशय कठोर कारवाई करण्याची मागणी
-
अकोला नांदेड महामार्गावर अपघात
वाशिम शहरातील इव्हेंटो हॉटेलजवळ अपघात
स्कूल बस, कार आणि मोटरसायकलचा तिहेरी विचित्र अपघात
अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू
वाशिम शहर ट्राफिक पोलीस घटनास्थळी दाखल
अधिक तपास सुरू
-
नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलन
– शेतकरी संघटना समन्वय समितीच्यावतीने जिल्हा बँकेच्या विरोधात आंदोलन
– जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीविरोधात निषेध म्हणून शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी
– सक्तीची वसुली तत्काळ थांबविण्याची मागणी.
– जिल्हा बँकेच्या कर्जाच्या नोटीसला पंचवटीतील रामकुंडात बुडवून शेतकऱ्यांनी केला निषेध.
– सरकारकडे कर्ज मुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
– जोपर्यंत जिल्हा बँकेची सक्तीची वसुली थांबत नाही, सरकार कर्ज मुक्त करत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा.
-
किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
– रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर आहेत.
– 500 कोटींच्या हॉटेलचे मुंबईला बांधकाम सुरू.
– ओपन प्लॉट वायकर यांच्या ताब्यात दिला गेला.
– उद्धव सरकारने हॉटेल बांधकामाला परवानगी दिली.
– मी याबाबत तक्रार केली होती.
– अर्धा डझन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटीस आली आहे.
– नगरविकास खात्याची चौकशी सुरू झाली आहे.
-
अजित पवार यांचा सोलापूर दौरा का रद्द झाला?
– विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा सोलापूर दौरा रद्द.
– तब्येत बरी नसल्यामुळे सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती.
– अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते.
– काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अजित पवार येणार होते.
– मात्र तब्येत बरी नसल्याने ते सोहळ्याला हजर राहू शकले नाहीत.
-
MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीवर कुठल्या डॉक्टरने ऑपरेशन केलं? त्यांचं नाव काय?
MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीच झालं ऑपरेशन. प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट. आयपीएल 2023 चा सीजन संपल्यानंतर एमएस धोनीने लगेच ऑपरेशन करुन घेतलं. वाचा सविस्तर…..
-
MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीच झालं ऑपरेशन, प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट
आज एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. 1 जूनच्या सकाळी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. वाचा सविस्तर…..
-
10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
10 वी चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा ऑनलाइन निकाल जाहीर होईल. त्याआधी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
-
अधिष्ठाता मानसिक त्रास देत असल्याने राजीनामा
वरिष्ठ डॉक्टर मनमानी करत असल्याचा आरोप
डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारखे यांच्यासह इतरांचे राजीनामा
जे. जे. रुग्णालयातील ७५० डॉक्टर संपावर
-
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
भाजप पाठिशी असल्याचं मुडें याचं वक्तव्य
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
आपण पक्षाचे, पण पक्ष आपला नसल्याचे केले होते मुंडे यांनी वक्तव्य
-
भारतीय जनता पक्षात मोठी अस्वस्थता
आयारामांमुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा खोचक टोला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये
सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा भाजपसमोर मोठा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी लगावला. आज सोलापूर दौऱ्यावर असताना… pic.twitter.com/1AVNu3mONn
— NCP (@NCPspeaks) June 1, 2023
-
पुण्यात काँग्रेस आणि भाजपमधील वाद चिघळला
काँग्रेस भवनाचा राजवाडा असा उल्लेख
भाजपकडून राजवाडा उल्लेख झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले
-
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी नवीन संकेतस्थळ
dte.maharashatra.gov.in या वेबपोर्टलचे उद्धघाटन
1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी संकेतस्थळ
तंत्र शिक्षण विभागाने तयार केली वेबसाईट
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्धघाटन
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष #अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची १ जूनपासून सुरु होणारी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी तंत्र शिक्षण विभागाने तयार केलेल्या https://t.co/crX2yOk0Px या वेबपोर्टलचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @ChDadaPatil पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. pic.twitter.com/b6GCtqNKRw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 31, 2023
-
जेजुरीतील विश्वस्त नेमणुकीचा वाद शिगेला
आज आंदोलनाचा सातवा दिवस
मुस्लीम समाज आंदोलनात सहभागी
विश्वस्त निवडीत ग्रामस्थांना प्राधान्य देण्यात आली नाही
गावकरी आंदोलनावर ठाम
-
कोल्हापूरमध्ये ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग
अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतींची लगबग
कोल्हापूरमध्ये वळव्याच्या कामाची हजेरी
वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांना हुरुप
-
आम्ही गरीबांना सवलती दिल्या तर भाजपच्या पोटात दुखले
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी साधला भाजपवर निशाणा
भाजपने तर मोठ्या उद्योगपतींना दिल्या सवलती
बड्या उद्योगपतींची कर्ज ही केली माफ
वो(भाजपा) बड़े-बड़े उद्योगपतियों को छूट दे सकते हैं, उनके कर्ज़ माफ कर सकते हैं। अगर हम गरीबों को कुछ दे रहे हैं तो उससे उन्हें तकलीफ होती है: कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्ली https://t.co/LgK07Fy0jn pic.twitter.com/Ki6OwRvd8P
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
-
मणिपूर हिंसाचारप्रकरणात चौकशी आयोग
पाच प्रकरणांत चौकशी करण्यात येणार
हिंसा भडकवल्याप्रकरणात होणार तपास
निष्पक्ष चौकशी करण्यात येणार- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
#WATCH मणिपुर में हिंसा के जितने भी मामले दर्ज़ किए गए हैं इनमें से 5 मामले चयनित किए गए हैं और एक मामला हिंसा के षड्यंत्र का दर्ज़ करके इन 6 मामलों की जांच CBI करेगी। निष्पक्ष जांच की जाएगी: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, इंफाल#ManipurViolence pic.twitter.com/YV1kWEgCVY
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
-
लोकसभा निवडणुकीत जागांची अदलाबदल?
ठाणे, कल्याण मतदारासंघावर राष्ट्रवादी दावा करणार नाही
ठाणे कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाचा उमेदवार?
लोकसभा जागांची अदलाबदल होणार?
-
पंकजा मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत शरद पवार निर्णय घेतील
पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत चर्चा
प्रस्ताव आल्यास शरद पवार निर्णय घेतील
अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया
-
दोन पंतप्रधानांची दिल्लीत द्विपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांची बैठक
नेपाळचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर
अनेक योजना, विषयावर चर्चा होणार
#WATCH दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नेपाल के प्रधानमंत्री पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की द्विपक्षीय बैठक की।
(वीडियो सौजन्य: डीडी न्यूज़) pic.twitter.com/CAg355vxAp
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
-
दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक
करंजगावमध्ये शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक
दुधाने आंघोळ करत केला निषेध
-
श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडमध्ये, मुंबईभर राबवणार शिवसेना शाखा संपर्क अभियान
– आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त कार्यक्रम करण्याचा मानस
– खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली विशेष जबाबदारी, सूत्रांची माहिती
– या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये श्रीकांत शिंदे स्वतः कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार
– युवा सेनेच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती
-
ठाणे – उद्या ठाण्यातील जास्त लोकवस्ती असलेल्या विभागात पाणीपुरवठा बंद
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.
पाण्याच्या नियोजनाकरीता सूचनेनुसार शुक्रवार दुपारी १२.०० वा ते शनिवार दुपारी १२.०० पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील.
या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतले आहे.
-
औरंगाबाद – दुधाचे भाव घसरल्याने शेतकरी आक्रमक
शेतकऱ्यांकडून करंजगाव येथे आंदोलन
गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले
रस्त्यावर दूध ओतून केले आंदोलन
-
राहुल गांधी सध्या फॉर्ममध्ये आहेत – संजय राऊत
सचिन तेंडुलकरप्रमाणे राहुल गांधी यांची सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे.
राहुल गांधी यांचं भाषण ऐकायला येणारे लोक भाडोत्री नाहीत
-
गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपाला राज्यात अच्छे दिन – संजय राऊत
मुंडेचं राजकारणात अस्तित्व राहू नये यासाठी भाजपात हालचाली सुरू आहेत
परिणामांची पर्वा न करता पंकजा मुंडे यांनी निर्णय घ्यावा
-
अहिल्यादेवींचा पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती – संजय राऊत
शिंदे-भाजप सरकारला उपरती झाली आहे
-
निवासी डॉक्टरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही – डॉ. सापळे
निवासी डॉक्टरांचे आरोप खोटे आहेत, जे.जेच्या डीन डॉक्टर सापळे यांनी नमूद केले
लहाने यांच्यासह नऊ जणांचे राजीनामे आलेले नाहीत
-
गडचिरोलीत सुरू झाला आंबा महोत्सव
गडचिरोलीत सुरू झाला आंबा महोत्सव
सोनापुरच्या कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम
जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद
स्थानिक वाणासह सीईओ आणि कलेक्टर आंब्याला पसंती
आंबा प्रक्रिया उद्योगावर भर दिला जाणार
-
उद्या ठाण्यातील जास्त लोकवस्ती असलेल्या विभागात पाणीपुरवठा बंद
उद्या ठाण्यातील जास्त लोकवस्ती असलेल्या विभागात पाणीपुरवठा बंद
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.
सात दिवस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात घेता व पाटबंधारे विभागाने बंद सांगितलं आहे.
पाण्याच्या नियोजनाकरीता दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार दुपारी १२.०० वा ते शनिवार दुपारी १२.०० पर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील.
या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतले आहे.
-
महाराष्ट्र गोव्याला जोडणारा कोल्हापुरातील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद
महाराष्ट्र गोव्याला जोडणारा कोल्हापुरातील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करा
सार्वजनिक बांधकाम विभागाच जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे पत्र
तीव्र वळण आणि उतार असल्याने घाटात वारंवार अपघात होत असल्याचा दावा
-
मटणाचे तुकडे कमी वाढले, म्हणून मित्रानेमित्राचे तुकडे केले
मटणाचे तुकडे कमी वाढले, म्हणून मित्रानेमित्राचे तुकडे केले
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक घटना
जितेंद्र कांशीराम धृवे असे मयत तरुणाचे नाव
तर जगदीश सुरेश रघुवंशी असे आरोपी तरुणाचे नाव
शेतात पार्टी सुरू असताना तुकड्यांवरून सुरू झाला होता वाद
वादातून केला रॉडणे मारहाण करत खून
-
दशरथ पाटील यांचे सूचक विधान
नाशिक – लोकसभेला 10 महिने शिल्लक असताना माजी महापौर दशरथ पाटील यांनी उमेदवारी केली जाहीर
नाशिक लोकसभा निवडणूक लढणार
माजी महापौर दशरथ पाटील यांची भूमिका
भ्रष्ट लोकांना थांबवण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे
येणाऱ्या दिवसात सिक्सर मारेल तेव्हा अनेकांना धक्का बसेल
दशरथ पाटील यांचे सूचक विधान
-
साताऱ्यात आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या पाच शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीसा
आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या पाच शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारणे दाखवा नोटीसा दिली आहे. दोन दिवसात शाळांनी उत्तर न दिल्यास मान्यता रद्द करण्याचा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी इशारा दिला आहे.
-
वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
मिरजेतील खोतनगर गल्ली क्र 4 मधील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकासमोरच वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. महापालिकेकडून सदर वृद्धमहिला आणि तिच्या पुत्राविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद
पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजानाचा काळ असल्याने या कालावधीत मत्स्य संरक्षण व्हावे त्या हेतूने शासनाने 1 जून ते 31 जुलै पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने मासेमारी आजपासून बंद झाली आहे.
-
कोकण किनारपट्टीवर आज पूर्व मोसमीच्या सरींची शक्यता
कोकण किनारपट्टीवर आज पूर्व मोसमीच्या सरींची शक्यता
विजांच्या कडकटांसह वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
दक्षिण भागातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टी भागात. वाढले
मोसमी पाऊस कोसळणार कुलाबा वेधशाळेचा अंदाज
-
‘महाराष्ट्र-गोव्याला जोडणारा कोल्हापुरातील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करा’
सार्वजनिक बांधकाम विभागाचं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे पत्र
तीव्र वळण आणि उतार असल्याने घाटात वारंवार अपघात होत असल्याचा दावा
रस्त्याच्या बाजूला भूमिगत विद्युत प्रकल्प असल्याने रस्ते दुरुस्ती काम करण्यातही सार्वजनिक बांधकाम विभागाला येत आहेत अडचणी
आंबोली आणि चोर्ला मार्गे गोव्यासाठी पर्याय उपलब्ध असल्याने तिलारी घाट अवजार वाहनांसाठी बंद करण्याचा सुचवला पर्याय
सार्वजनिक बांधकाम विभागाचा पत्रावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष
-
नाशिक | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये
लव्ह जिहाद करणी घेणार पोलीस अधीक्षकांची भेट
त्यानंतर नाशिकमधील स्नेहींच्या घरी देणार भेट
सोमय्या यांनी स्वतः ट्विटर हँडलवरून दिली माहिती
-
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आता हेल्मेट आवश्यक
विद्यापीठाच्या आवारात हेल्मेट वापरा
विद्यापीठ प्रशासनाच्या सूचना, दंडात्मक कारवाईचादेखील इशारा
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या सूचना
-
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान यांची होणार भेट
दोन्ही देशांमध्ये होणार महत्त्वपूर्ण चर्चा
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल आणि पंतप्रधान मोदी यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट होणार
दोन्ही देशांच्या दृष्टीने आजची भेट महत्त्वाची
-
नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या अध्यादेश विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या गाठीभेठी
आज केजरीवाल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन आणि झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची घेणार भेट
दिल्लीमधील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर केजरीवाल यांच्याकडून विरोधकांच्या गाठीभेटी
यापूर्वी केजरीवालांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची घेतली होती भेट
-
पुणे महापालिकेची मेगा भरती प्रक्रिया
पालिकेच्या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात
पुणे महापालिकेने वर्ग एक ते तीनमधील रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
320 जागांसाठी 10 हजार 171 अर्ज झाले प्राप्त
या पदांसाठी 22 जून आणि 5 जुलै या रोजी होणार ऑनलाइन परीक्षा
320 पदांची होणार भरती
-
नाशिक | संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसाठी तीस लाखांचा निधी मंजूर
भाविकांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून पुरवले जाणार
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध
2 जून रोजी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थान
-
नाशिक -सुट्ट्यांमुळे नाशिकचे ओझर विमानतळ हाऊसफुल
15 मार्च पासून सुरू झालेल्या नागपूर, गोवा, अहमदाबाद या मार्गांवरील विमानसेवेला जवळपास 87 टक्के प्रतिसाद
आजपासून इंडिगोकडून इंदूर, हैदराबाद या शहरांना नव्याने होणार सेवा सुरू
अहमदाबादसाठी देखील दुसरी फ्लाईट सुरू होणार
-
नाशिक | होर्डिंग्ज कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यास होर्डिंग्ज धारकांची टाळाटाळ
832 होर्डिंग्ज धारकांनी मनपाच्या नोटीसकडे फिरवली पाठ
845 पैकी केवळ 13 होर्डिंग्ज धारकांनी दिले प्रमाणपत्र
पिंपरी चिंचवड येथील घटनेनंतर नाशिक महापालिकेने होर्डिंग्ज धारकांना कार्यक्षमता प्रमाणपत्र केले बंधनकारक
-
वसई पश्चिम 100 फुटी रोडवर भलामोठा खड्डा
अपघात टाळण्यासाठी जागरूक नागरिकांनी खड्ड्यामध्ये झाड लावून पालिकेचं वेधलं लक्ष
शंभर फूट रोडवर टेम्पो स्टॅन्ड इथं नाल्याच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावर पडला हा खड्डा
नागरिकांनी पालिकेला तक्रार करून देखील पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष
मुख्य रस्ता खचत असल्याने लवकरात लवकर पालिकेने खड्डा बुजवावा अशी नागरिकांची मागणी
-
पुण्यातील मुळशीच्या पौड तहसीलदार कार्यालयावर माजी सैनिकांचा हल्लाबोल मोर्चा
दिल्लीतील जंतर मंतर येथे 20 फेब्रुवारी 2023 पासून विविध मागण्यांबाबत देशभरातील माजी सैनिकांच्या वतीने धरणा आंदोलन सुरू आहे
मात्र अद्याप त्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नसल्याने पाठिंबा म्हणून माजी सैनिकांचा मोर्चा
सैनिकांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यासाठी,मुळशी तालुक्यातील माजी सैनिकांनी मोर्चा मार्फत, तहसीलदारांना दिलं मागण्यांचे निवेदन
माझी सैनिक सहकुटुंब मोर्चात सहभागी
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म ठिकाण चौंडी ते वेल्हा पायी ज्योत वेल्ह्याकडे रवाना
अहिल्यादेवींच्या जयघोषात ज्योत पुण्यातील वेल्हा तालुक्याकडे रवाना, 2 जूनला ज्योत वेल्ह्यात पोहचणार
ज्योत वेल्ह्यामध्ये पोहचल्यानंतर अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून काढली जाणार मिरवणूक
यावेळी धनगरी गजा नृत्य,धनगरी ओव्या अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन
वेल्हा तालुका सकल धनगर समाजा कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमांच आयोजन
-
नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला जवळ टायगर पॅराडाईज रिसॅार्टवर पोलिसांचा छापा
रिसॅार्टवर सुरु होती झिंगाट पार्टी, अश्लील नृत्य, दारुच्या बाटल्या आणि बरंच काही
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सहा डान्सर मुलींसह 12 पुरुषांवर कारवाई
कारवाईत विदेशी दारुसह रोकड जप्त
-
नागपूर जिल्ह्यातील ग्रामिण भागात डायरियाचा स्फ़ोट, रुग्णसंख्या पोहोचली 400 वर
नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापुर आणि भिष्णूरमध्ये अतिसाराची लागण
पेठ मुक्तापुर आणि भिष्णूर गावात 400 वर डायरियाचे रुग्ण
दुषित पाण्यामुळे डायरीयाची लागण झाल्याची माहिती
काही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु
-
नाशिक जिल्रह्यातील इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाई
इगतपुरीकरांना वाढीव पाणीपट्टी भरूनही पाणी कपातीचा शॉक
आठवड्यातून दोन दिवस तेही एक तास पणी मिळणार
नगर परिषदेचा तलाव आणि तळेगाव डॅम आटल्याने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचे नगर परिषदेचे म्हणणे
मात्र गाजावाजा केलेल्या भावली योजनेचे पाणी गेले कुठे असा नागरिकांचा सवाल
मात्र पूर्व सूचना न देता पाणी कपातीचा निर्णय जाहीर केल्याने नागरिकात संताप
-
350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा, गेट वे ऑफ इंडिया येथे आज शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन
1 जून रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि त्यानंतर “जाणता राजा”हे महानाट्य सादर केले जाणार आहे
सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्यावतीने दिनांक 1 जून ते 6 जून या कालावधीत गेट वे ऑफ इंडिया येथे शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन सकाळी 9-30 ते सायंकाळी 7-30 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे.
या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत आदी चारशेहून अधिक शिवकालीन शस्त्रे नागरिकांना पाहता येणार आहेत.
याशिवाय, प्रदर्शनाच्या ठिकाणी दररोज दिवसातून चार वेळा युद्ध कला सादरीकरण आणि शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे.
Published On - Jun 01,2023 7:17 AM