Maharashtra Breaking Marathi News Live | आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई सुरू

| Updated on: May 18, 2023 | 6:58 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live |  आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई सुरू
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकांची रणनीती ठरवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम. आज मुख्यमंत्रीपदावर तोडगा निघण्याची शक्यता. मनमाडमधील अघोषित भारनियमनाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. मेणबत्ती लावत वीज वितरण कंपनीचा निषेध. केरळमध्ये 4 जूनमध्ये मान्सून दाखल होणार. कल्याण ते बदलापूर दरम्यान रेल्वे अपघातात वाढ, तीन महिन्यात 80 जणांचा मृत्यू. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 May 2023 11:45 PM (IST)

    मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी जे. पी. नड्डा यांच्याबरोबर झाली चर्चा

    ब्रेक

    जे पी नड्डा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, आगामी निवडणुकीसाठी रणनिती आखली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीर्घ चर्चा

    येणाऱ्या निवडणुका साठी महत्वाची राजकीय भेट

    खासकरुन मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती..

  • 17 May 2023 11:26 PM (IST)

    गर्मीवर उपाय म्हणून चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

    उल्हासनगर :

    गर्मीवर उपाय म्हणून चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

    चालत्या दुचाकीवर बादली आणि मग्गा घेऊन अंघोळ करतानाचा इंस्टा रिल व्हिडिओ झाला होता व्हायरल

    मध्यवर्ती पोलिसांकडून भादंवि 279 आणि मोटार वाहन कायदा 129 अन्वये गुन्हा दाखल

    टीव्ही 9 मराठीने प्रसारित केली होती व्हायरल व्हिडिओची बातमी

    बातमीची दखल घेत पोलिसांकडून रिल बनवणाऱ्या आदर्श शुक्ला आणि एका तरुणीविरोधात गुन्हा दाखल

  • 17 May 2023 11:17 PM (IST)

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट

    मुंबईः

    भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

    वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक हेदेखील उपस्थित होते

  • 17 May 2023 09:29 PM (IST)

    ए के सिंग यांची दिल्लीचे सेवा सचिव म्हणून नियुक्ती

    दिल्ली सरकारने सेवा सचिव बदलण्याचा प्रस्ताव LG कडे पाठवला आहे. दिल्ली सरकारच्या प्रस्तावात आशिष मोरे यांच्या जागी ए के सिंग यांना नवीन सेवा सचिव बनवण्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 11 मेच्या आदेशानुसार दिल्ली सरकारचा निर्णय LG वर बंधनकारक आहे.

  • 17 May 2023 08:49 PM (IST)

    कल्याणमधील APMC मार्केटच्या गोडाऊनला भीषण आग, दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    कल्याणमधील APMC मार्केटच्या गोडाऊनला भीषण आग

    माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    गोडाऊनचे शटर तोडून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली

    गोडाऊन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी नाही

    शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

  • 17 May 2023 08:42 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचं राज्यपालांना पत्र, महापालिका प्रशासनावर कारवाईची मागणी

    मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळा थांबवा

    आदित्य ठाकरे यांचं राज्यपाल महोदयांना पाठवलं पत्र

    महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची केली मागणी

  • 17 May 2023 08:37 PM (IST)

    धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

    पोलिस आणि नगर परिषद विभागाकडून अतिक्रमण काढण्याची मोहीम

    रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमण नगर परिषद आणि पोलिसांनी हटवले

    अतिक्रमण काढल्याने तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • 17 May 2023 08:21 PM (IST)

    डॉ. तानाजी सावंत संतप्त, लातूरमधील महावितरण विभागाच्या अभियंता व धारशिवचे अधीक्षक अभियंतांवर कारवाईची मागणी

    लातूर महावितरण विभागाचे मुख्य अभियंता आणि धाराशिवचे अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करा

    पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी

    आलेल्या तक्रारींवर कारवाई केली यांचा आढावा न दिल्याने तानाजी सावंत संतप्त

    संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सावंत यांची मागणी

  • 17 May 2023 08:05 PM (IST)

    पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम आणण्याचा प्रयत्न करा : चंद्रकांत पाटील

    योग्य नियोजन केल्यास स्वच्छतेसोबतच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करता येते

    विशेष म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करता येतात

    कोरडा कचरा उपयोगात आणून कांडी कोळसा तयार करता येतो

    त्यामुळे कचरा व्यवस्थापनात योग्य नियोजन पाहिजे

  • 17 May 2023 07:28 PM (IST)

    जळगाव : उन्हामुळे केळीचे घड करपू लागले

    जळगावात तापमान ४५ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत

    कोरड्या पानांपासून घोंगड्या तयार करून घड झाकले जातात

    पाण्याअभावी घड तुटून जमिनीवर पडत आहेत

  • 17 May 2023 06:39 PM (IST)

    पुणे : उद्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार

    बालगंधर्व रंगमंदिर परिसरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजी

    या बैठक परिसरात आजपासूनच कडक पोलीस बंदोबस्त

    राज्यातील भाजप आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित राहणार

  • 17 May 2023 06:07 PM (IST)

    मुंबई : राज्याभिषेकामागची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणार

    सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

    छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचं हे ३५० वे वर्ष

    कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरायांनी विरता, शुरता पराक्रम दाखवला जाईल

    १०० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजन करत आहोत

    २ जूनला रायगडावर कार्यक्रमाचा शुभारंभ होईल

  • 17 May 2023 05:46 PM (IST)

    बुलढाणा : अनेकांनी मातोश्रीवर पैसे दिले

    संजय गायकवाड यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार

    मातोश्रीला पैसे मिळत होते, त्यावर दुकानदाऱ्या चालत होत्या

    शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुमच्या दुकानदाऱ्या चालल्या

    संजय गायकवाड यांची संजय राऊत यांच्यावर टीका

  • 17 May 2023 05:18 PM (IST)

    प्रकाश आंबेडकरांना ठाकरे गट मुंबईतून लढवणार?

    दक्षिण मध्यची जागा वंचितसाठी सोडण्याची शक्यता

    प्रकाश आंबेडकर-ठाकरे गट मुंबईतून लढवणार

  • 17 May 2023 05:14 PM (IST)

    खेळाडूंच्या बँक खात्यात लवकरच रक्कम

    गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी आंनदवार्ता

    खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम

    रक्कम होणार त्यांच्याच बँक खात्यात जमा

    क्रीड व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली माहिती

  • 17 May 2023 05:10 PM (IST)

    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी भरीव आर्थिक तरतूद

    यावर्षीच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास यावेळी मान्यता देण्यात आली

    १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणाही करण्यात आली

    जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील हे शुल्क होते

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुल्क माफ करण्याची केली घोषणा

  • 17 May 2023 05:05 PM (IST)

    त्र्यंबकेश्वरमध्ये शांतता आणि सलोखा रहावा

    धूप दाखविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून

    शांतता समितीने केला दावा

    नागरिकांना शांतता ठेवण्याचे केले आवाहन

  • 17 May 2023 05:05 PM (IST)

    राष्ट्रवादीकडून दिग्गज नेत्यांकडे बुथची जबाबदारी

    तीन नेत्यांवर विदर्भ मराठवाडा, खानदेशीच जबाबदारी

    दोन महिन्यात बुथ रचना करण्याचे निर्देश

  • 17 May 2023 05:01 PM (IST)

    देशाच्या राजधानीत दृश्यमान्यता अत्यंत कमी

    प्रदुषणाचा दिल्लीला विळखा

    धुळीच्या वादळाचा ही दिसून आला परिणाम

    व्हिजिबिलीटी झाली कमी, जवळचे ही लवकर दिसेना

  • 17 May 2023 04:58 PM (IST)

    जलयुक्त शिवारासाठी योजना 2.0 साठी तयारी

    प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा घेतला आढावा

    सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाचे अधिकारी यांच्याशी संवाद

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला ई-संवाद

  • 17 May 2023 04:53 PM (IST)

    भारत आता जगाचा फार्मा हब

    185 हून अधिक देशात करतोय औषधांचा पुरवठा

    60 टक्के लसींचा भारताकडून जगाला पुरवठा

    3000 हून अधिक औषधी कंपन्या देशात

  • 17 May 2023 04:53 PM (IST)

    साखर कारखान्याच्या निवडणुकीत बहिणी-भाऊ एकत्र

    बीडच्या राजकारणात पहिल्यांदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आले एकत्र

    वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत बंधू भगिनी आले एकत्र

    21 जागांसाठी ही निवडणूक होण्याची चिन्हं

    11 जागा या पंकजा मुंडे यांच्या गटाकडे तर दहा जागांवर धनंजय मुंडे यांचे उमेदवार

  • 17 May 2023 04:49 PM (IST)

    विधानसभा अध्यक्ष पदचं घटनाबाह्य आहे

    संजय राऊत यांची घणघाती टीका

    लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार

    भाजप पुरुस्कृत टोळ्या देशात फाळणीचं बीज पेरत आहेत

    त्यांना देशात दंगली पेटावायच्या आहेत

  • 17 May 2023 04:47 PM (IST)

    पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा इतिहास

    राज्यात घटनाबाह्य सरकार आहे

    राहुल नार्वेकर यांनी 2028 पर्यंत निर्णय घेतला तरी हरकत नाही

    आम्ही धमकी दिलेली नाही, आम्ही सर्वसामान्य माणूस

    राहुल नार्वेकर यांच्या राजकीय प्रवासावर बोललो तर हक्कभंग कसा-राऊत

  • 17 May 2023 04:45 PM (IST)

    मी माझ्या पक्षाची भूमिका मांडणे, हा हक्कभंग कसा असेल

    संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    हक्कभंग हा आमदारांचा हक्क आहे

    कुरुलकर यांच्या प्रकरणावरुन लक्ष हटविण्यासाठी ही दंगल

    आम्हाला प्रतिवाद करण्याचा अधिकार आहे

  • 17 May 2023 04:42 PM (IST)

    पुणे लोकसभा पोटनिवडणूकीत संधी मिळाल्यास जबाबदारी घेणार

    स्वरदा बापट यांची पहिली प्रतिक्रिया

    गिरीश बापट यांच्या निधनाने लोकसभेची पोटनिवडणूक

    पुणे लोकसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी

  • 17 May 2023 04:35 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात भेट

    सह्याद्री अतिथी गृहावर प्रकाश आंबेडकर दाखल

    लवकरच कळणार भेटीचे कारण

  • 17 May 2023 04:33 PM (IST)

    भावी मुख्यमंत्र्यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

    डी. के. शिवकुमार राहुल गांधी यांना भेटले

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमैया यांनी घेतली भेट

    कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये दोन्ही उमेदवार

  • 17 May 2023 04:30 PM (IST)

    संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार आक्रमक

    शिवसेनेचे सर्व आमदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणणार

    संजय शिरसाट यांनी दिली माहिती

    राऊत यांना विधानसभेचा नियम माहिती नाही का-शिरसाट

  • 17 May 2023 04:28 PM (IST)

    इमरान खान यांच्या घराला पोलिसांचा वेढा

    30-40 दहशतवादी लपल्याची माहिती

    पंजाब सरकारने दहशतवादी लपल्याची दिली माहिती

    पोलिसांचा खान यांच्या घराला वेढा

  • 17 May 2023 04:26 PM (IST)

    Dengue Vaccine : लवकरच डेंग्यूवर लस

    डेंग्यू वॅक्सीनच्या पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण

    लस मोठी फायदेशीर असल्याचा चाचणीतील कल

    आता लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला होणार सुरुवात

    सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल होण्याची शक्यता

  • 17 May 2023 04:21 PM (IST)

    चित्रपटगृहाला होणार 10 लाखांचा दंड

    वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक

    राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

    सिंगल स्क्रीन चित्रपट गृहामध्ये भाडे न वाढविण्याचे निर्देश

  • 17 May 2023 03:58 PM (IST)

    नालासोपारा: आज मनसेचं ठिय्या आंदोलन

    वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पश्चिमेकडील प्रभाग इ च्या कार्यालयात आज मनसेचं ठिय्या आंदोलन

    शहरातील आरक्षित भूखंडावर झालेले अनाधिकृत बांधकाम, तात्काळ निष्कशीत करण्यात यावेत, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, गटार, रस्ते दुरुस्त करावे या मागण्या घेऊन हे आंदोलन केले आहे.

    आरक्षित भूखंड आणि पावसाळ्यापूर्वी नाले सफाई यासंदर्भात पत्रव्यवहार करून ही पालिका प्रशासन कोणतीच दखल घेत आज मसेने पालिकेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं होतं.

    पालिकेने यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास मनसे उग्र आंदोलन छेडणार असा इशारा ही दिला आहे.

  • 17 May 2023 03:43 PM (IST)

    बिहारमधील मुस्लिम समाजातील 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला

    ट्रकमध्ये 7 ते 14 वयोगटातील 63 मुस्लिम समाजाची लहान मुलं

    हिंदुत्ववादी संघटनांना संशय आल्याने पोलिसांमार्फत ट्रक घेतला ताब्यात

    ही सर्व मुलं बिहार मधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथे असणाऱ्या एका मदरशात शिक्षणासाठी आल्याची प्राथमिक माहिती

    ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल

    त्यानंतर एका ट्रकमध्ये भरून ती आजऱ्याला जाणार होती

    संशय आल्याने पोलिसांनी हा ट्रक आणि मुलांना घेतलं ताब्यात

    या सगळ्याबाबत मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती नाही

  • 17 May 2023 03:32 PM (IST)

    नालासोपारा: बहुजन विकास आघाडीचे परिवहन समिती सदस्य अमित वैद्य यांच्या कार्यालयात घुसला टँकर

    नालासोपा-यात बहुजन विकास आघाडीचे परिवहन समिती सदस्य अमित वैद्य यांच्या कार्यालयात भरधाव वेगात आलेला टँकर घुसला

    टँकर एवढा भरधाव वेगात होता की त्याने विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली

    तो कार्यालयात घुसल्याने त्यात टँकरचे अक्षरशः तीन तुकडे झाले आहेत.

    या अपघातात विजेचा खांब पूर्णपणे वाकडा झाला असून, कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड झाली आहे.

    सकाळीची वेळ असल्याने कार्यालयात कोणीही नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • 17 May 2023 03:17 PM (IST)

    भंडारा: कुणी चुकीचा अर्थ लावत असेल तर, त्याला आमचा नाईलाज आहे- नाना पटोले

    कुणी चुकीचा अर्थ लावत असेल तर, त्याला आमचा नाईलाज आहे

    माध्यमाच्या चुकीच्या बातम्या आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज निर्माण केल्या जात असेल तर ते चुकीचे आहे- नाना पटोले

    जागा वाटपच झालेला नाही, त्यासाठी कमिटी बनणार आहे. राहिलं लोकल बॉडी निवडणूक बद्दलची भूमिका आजची नाही, ती वर्षभरापूर्वीच आहे, ती सर्वांचीच आहे, त्यामुळं कुणी गैरसमज करून घेवू नये.

    महाविकास आघाडी पुढे चालेल आणि आम्ही टिकून राहू- नाना पटोले

    अकोला इथं मी उद्या जाणार आहे. सगळ्या लोकांना मी भेटणार आहे- नाना पटोले

    मृत्यू झालेल्याच्या घरी जाऊन भेट देणार आहे. जिथे घटना होते, तिथं जाऊन बघितल्यावर कारणमीमांसा जवळ जाऊन बघितल्यास अधिक स्पष्टता होईल.

  • 17 May 2023 03:13 PM (IST)

    तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड 

    खडकवासला धरणात झालेले मृत्यू दुर्दैवी- तृप्ती देसाई

    परंतु या मतदारसंघात अकार्यक्षम खासदार सुप्रिया सुळे असल्यामुळेच इथे अजूनही पर्यटकांसाठी कडेकोट नियमावली तसेच व्यवस्था उपलब्ध नाही- तृप्ती देसाई

  • 17 May 2023 03:12 PM (IST)

    सांगली: नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर काल लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले

    विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर काल लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले

    आज विटा नगरपरिषद कर्मचारी व नागरिकानी गोमूत्र शिंपडून नगरपालिका स्वच्छ करत या झालेल्या कारवाईचे स्वागत केले.

    तसेच नागरिक आणि कर्मचारी यांनी विनायक औंधकर याच्या विरोधात घोषणाबाजी केली

  • 17 May 2023 02:57 PM (IST)

    भारत डिजीटल झालंय, ही क्रांती आहे – जे पी नड्डा

    विकास होतोय, देश पुढे जातोय

    2014 पूर्वी 9 कोटी 50 लाख बहिणी लाकडाची चूल पेटवायचे

    आज त्यांच्या आयुष्यात परिवर्तन होतंय

    केंद्रीय योजनेचा गोरगरिबांना फायदा हेच आहे भाजप सरकार

    जेपी नड्डा यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांची स्तुती

    देशात जेव्हा योग्य नेतृत्व असेल तर देश प्रगती करतो

    मविआ भ्रष्ट सरकार होती, विकासात खोडा होती

    हे डबल इंजिनचं सरकार राज्याला पुढे नेणार

  • 17 May 2023 02:29 PM (IST)

    सगळ्या धर्मात चांगली लोकं आहेत – श्रीपाल सबनीस

    त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलेले लोक शुद्ध भावनेने गेले होते का ? याची चिकित्सा करायला हवी

    शुद्ध भावना महत्वाची आहे

    जिवंतपणी माझ्यावर एक विचारधारा आली आहे, यापेक्षा मोठं काय असू शकतं

    माणसांनी संताची वजाबाकी नको बेरीज करायला हवी आहे

  • 17 May 2023 02:26 PM (IST)

    बैठकीत कोर्टाच्या निकालाबाबत चर्चा – अंबादास दानवे

    निकालाबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली

    निकाल जनतेपर्यंत पोहचवण्याच्या सूचना

  • 17 May 2023 02:22 PM (IST)

    अनिल देशमुख यांनी परमवीर सिंग यांचा बैठकीत विषय मांडला – महेश तपासे

    परमवीर सिंग यांचे निलंबन मागे घेतले आहे

    निलंबनाबाबत राष्ट्रवादीचे आक्षेप आहे

    ज्या परमवीर सिंगने ऐकीव आरोप लावले

    त्यामुळे सरकार आणि एक नेत्यांवर आरोप झाले

    हे भाजपचा सांगण्यावरून करण्यात आलं आहे

    आमचे पक्षाचे आमदार हे मुद्दे उपस्थित करतील सरकार विरोधात

    अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले

    भाजप सांगण्यावरून पत्र लिहिले का, असा आक्षेप राष्ट्रवादी आहे

    पक्षाचा अंतर्गत निवडणूक प्रोग्राम लवकर जाहीर होणार

    निवडणूक अधिकारी नेमले ते पक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील

    राष्ट्रवादी कार्यकारणी बैठक आज पार पडली

    कर्नाटक निवडणूक नंतर ही बैठक झाली

    या बैठकीत पक्ष संघटनाबाबत चर्च झाली

  • 17 May 2023 02:20 PM (IST)

    सेना भवन येथील जिल्हा प्रमुखांची बैठक संपली

    शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होण्याची शक्यता

    19 जुलै शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव साजरा केला जाणार

    शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत निर्णय

  • 17 May 2023 02:16 PM (IST)

    रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

    ट्रॅक्टर रॉंग साईडने आल्याने अपघात

    अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण जागीच ठार, 2 जण जखमी

    मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर झाला भीषण अपघात

    बोलेरो गाडीमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते

    यावेळी रॉंग साईडहून विटाने भरलेला ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली

  • 17 May 2023 02:12 PM (IST)

    शेवगाव दगडफेक प्रकरणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली घटनास्थळाची पाहणी

    व्यापाऱ्यांशी संवाद साधून आरोपींवर कडक कारवाईचा दिला इशारा

    व्यापाऱ्यांनी शेवगाव बेमुदत बंदचा घेतलेल्या निर्णय मागे घेण्याची केली विनंती

    विरोधकांचाही घेतला समाचार

    अशा प्रकारच्या घटना काही ठराविक लोक घडून आणताय

    याचा उगम शेवगाव तालुक्यातून नाही तर इतर तालुक्यातून आहे

    ही सर्व नावं आम्हाला माहिती आहे

    कटकारस्थान करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम ते लोक करतायत

    आमच्यावर आरोप करताय की, आम्ही सामाजिक सलोखा बिघडण्याचा काम करतोय

    आम्ही रामाचा वापर करतोय असे आरोप करणारेच लोक या गोष्टीला बळ देण्याचा प्रयत्न करताय

    आमची रामाची भूमिका ठाम आहे, काही लोक अशा गोष्टी घडून आणताय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओळखला आहे

    आता या गोष्टीचा बंदोबस्त केला जाईल, खासदार सुजय विखेयांचा इशारा

  • 17 May 2023 02:08 PM (IST)

    काँग्रेस कार्यकर्त्यांची वसई विरार महापालिका पेल्हार प्रभाग एफ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

    कार्यालयाला टाळ मारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे पालिकेत आंदोलन

    पेल्हार विभागातील विविध समस्या सोडवण्याची मागणी

  • 17 May 2023 02:03 PM (IST)

    नागपूर मनपात काँग्रेसची स्वबळावर निवडणुकीची तयारी – विकास ठाकरे

    मुंबईप्रमाणे नागपूरातंही काँग्रेस स्वबळावर लढणार!

    महाविकास आघाडीची वाट न पाहता स्वबळाची तयारी

    ‘151 मतदारसंघात काँग्रेसने सुरु केली तयारी’

    ‘प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानं नागपूर मनपा लढणार काँग्रेस’

    काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती

  • 17 May 2023 01:54 PM (IST)

    मालेगाव | नामपूर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला प्रतिकिलो 1 रुपया भाव..

    नामपूर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर पुन्हा रास्ता रोको ..

  • 17 May 2023 01:44 PM (IST)

    नाशिक | शांतता समितीतील महत्त्वाचे मुद्दे

    गावाला काळीमा लागू नये, हा बैठकीचा हेतू

    बाहेरून कुणी येऊन काही करू नये, यावर देखील लक्ष ठेवावे लागणार

    त्र्यंबक नगरात शांतता आणि सलोखा रहावा

    मुद्दामून कुणी डिवचत असेल, चिथवत असेल, तर हे चुकीचे, या घटनेबाबत गैरसमज होऊ नये

    कुणी चुकत असेल तर घरातला व्यक्ती म्हणून कान धरून समजावले पाहिजे..

  • 17 May 2023 01:33 PM (IST)

    नाशिक | त्र्यंबक नगरपरिषदेच्या कार्यालयात शांतता समितीची बैठक सुरू

    बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी, दोन्ही धर्मातील नागरीक उपस्थित

    शहरात शांतता राखण्यासाठी बैठक सुरू

    नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित

  • 17 May 2023 01:29 PM (IST)

    मुंबई | जे पी नड्डा यांच्या स्वागतासाठी कालिना याठिकाणी व्हीआयपी गेटबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी…

    ढोल ताषाच्या गजरात होणार जे पी नड्डा यांचं स्वागत

    अवघ्या काही वेळात जे पी नड्डा मुंबईत दाखल होणार…

  • 17 May 2023 12:59 PM (IST)

    पी.एम.जी.पीच्या इमारतीची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी, आमदार रवींद्र वायकर यांची मागणी

    – पूनमनगर येथील १७ इमारती अति धोकादायक आहेत. यात सुमारे ९८२ सदनिकाधारक रहात आहेत.

    – राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे.

    – येत्या पावसाळ्यात कुठलीही अप्रिय घटना घडण्यापुर्वी या अतिधोकादायक इमारतींची डागडुजी म्हाडाने तात्काळ करावी, अशी सुचना आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाकडे केली आहे.

    – धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतर करण्यासाठी म्हाडाने ट्रान्झीट कॅम्प द्यावेत.

    – इमारतींच्या पुनर्विकासासाठी टेंडर काढावे किंवा म्हाडानेच इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी मागणीही वायकर यांनी केली.

  • 17 May 2023 12:41 PM (IST)

    तलावात क्रिकेट खेळून मनसेच हटके आंदोलन

    – पुण्यात मनसेने एक हटके आंदोलन केलंय.

    – स्विमिंग सूट ,गॉगल, ट्यूब परिधान करून तलावात क्रिकेट खेळून हे आंदोलन करण्यात आलं.

    – औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी मनसेने हे आंदोलन केले.

    – 2017 पासून जलतरण तलाव बंद आहे.

  • 17 May 2023 12:31 PM (IST)

    पोलीस स्टेशनमध्ये गळफास घेऊन चोराची आत्महत्या

    – वाहन चोरीत अटक करण्यात आलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    – विश्रामबाग पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये ही घटना घडलीय.

    – शिवाजी उत्तम गरड असे या आरोपीचे नाव आहे.

    – काही दिवसापूर्वीच चोरीच्या प्रकरणात त्याला अटक करून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

    – आरोपीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरु आहे.

  • 17 May 2023 12:27 PM (IST)

    विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारा, वारकरी सांप्रदायाची मागणी

    – पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.

    – व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क सुरू केल्यास मंदिराचे उत्पन्न वाढेल असे वारकरी सांप्रदायाचे म्हणणे आहे.

    – उत्पन्न वाढल्यास येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा देता येईल याकडे मंदिर प्रशासनाचा कल आहे.

    – वारकरी सेवा संघाच्या ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी ही मागणी केली आहे.

    – तसेच, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिला.

  • 17 May 2023 12:18 PM (IST)

    कर्नाटकमध्ये तीन उपमुख्यमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री कोण हा पेच सुटला

    – माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कर्नाटक राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी माहिती सूत्रांनी दिली.

    – मुख्यमंत्री पदासह तीन उपमुख्यमंत्री कर्नाटकमध्ये असणार आहेत.

    – लिंगायत, मुस्लिम आणि दलित समाजातील तीन उपमुख्यमंत्री येथे कार्यरत असणार आहेत.

    – एम बी पाटील, यु टी कादर आणि जी परमेश्वरा अशी तीन उपमुख्यमंत्री यांची नावे आहेत.

  • 17 May 2023 12:14 PM (IST)

    दंगल घडविण्यासाठी मातोश्रीत बैठक, एसआयटी स्थापन करा, शिंदे गट आक्रमक

    – राज्यात दंगली घडवण्यासंदर्भात मातोश्रीत बैठक झाली होती असा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला.

    – नितेश राणे यांच्या विधानानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे.

    – शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी राज्य सरकारकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

    – एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकारची चौकशी करावी.

    – मातोश्री येथे झालेल्या बैठकीला कोण आमदार आणि नेते उपस्थित होते याची माहीती घेऊन तातडीने कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री आणि ऊपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.

  • 17 May 2023 12:06 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शुद्धीकरणानंतर आता आरती केली जाणार

    – हिंदू महासंघाकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले.

    – त्यानंतर आता हिंदू संघटनांचे पदाधिकारी मंदिरात जाणार आहेत.

    – त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रसाद दाखवला असून थोड्याच वेळात मंदिरात आरती केली जाणार आहे.

  • 17 May 2023 12:00 PM (IST)

    वांद्रे येथील झोपडपट्टीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

    – वांद्रे येथील नर्गिस दत्त रोडजवळील झोपडपट्टीला आग लागली.

    – सात ते आठ झोपड्या आणि एका मजल्याच्या इमारतीपर्यंत आग मर्यादित आहे.

    – अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    – आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • 17 May 2023 11:51 AM (IST)

    तर थिएटर मालकांना दंड होणार

    – थिएटरमध्ये मराठी सिनेमा न दाखवणाऱ्या मालकांवर सरकार मोठी कारवाई करणार आहे.

    – मराठी सिनेमा न दाखवणाऱ्या थिएटर मालकांना दंड करणार अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

  • 17 May 2023 11:46 AM (IST)

    मोठी बातमी : हिंदी महासागरात नाव उलटून 39 जण बुडाले

    – हिंदी महासागरामध्ये चिनी मच्छीमारांची एक नाव उलटली आहे.

    – नावेतील सर्व 39 जण बुडले आहेत.

    – चीन सरकारने तातडीने बचावासाठी शोध पथके पाठवली.

    – या 39 जणांमध्ये 17 चिनी चालक दलाचे सदस्य, 17 इंडोनेशियन चालक दलाचे सदस्य आणि 5 फिलिपाइन चालक दलाचे सदस्य होते अशी माहिती मिळत आहे.

  • 17 May 2023 11:43 AM (IST)

    Rohit Sharma IPL 2023 : कोहली, कोहलीच्या घोषणा, रोहितच नवीन उल हकला आक्रमक उत्तर, VIDEO व्हायरल

    LSG vs MI IPL 2023 : रोहितने नवीन उल हकला कडक उत्तर दिलं. जणू विराटचा बदला रोहितने घेतला. काल लखनऊच्या इकाना स्टेडियमवर हेच दिसलं. भविष्यातही नवीन उल हकला अशा प्रसंगाना सामोर जावं लागेल. वाचा सविस्तर….

  • 17 May 2023 11:38 AM (IST)

    तर महाराष्ट्रातील सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवू, हिंदू महासंघाचा इशारा

    – नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिरात काही अज्ञातांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता.

    – त्यावरून ब्राम्हण महासंघ आणि हिंदू महासभेने आंदोलन करायचा इशारा दिला.

    – हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्रंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण केले.

    – त्यानंतर दुसखोरी करणाऱ्या त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली.

    – त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्राची सर्व मंदिर दोन दिवस बंद ठेवू असा इशारा हिंदू महासभेने दिला आहे.

  • 17 May 2023 11:01 AM (IST)

    आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई सुरू

    विधानसभा अध्यक्ष  आज दोन्ही गटांकडून राजकीय पक्षाची घटना मागवणार, अभ्यास करणार

    पुढील सात दिवसांत आमदारांना भूमिका मांडण्यासाठी वेळ देणार

  • 17 May 2023 10:59 AM (IST)

    शहरी नक्षलवादी आणि राऊत यांचे गुण सारखेच आहेत – नितेश राणे

    संजय राऊत घटनात्मक संस्थांवर सातत्याने टीका करत आहेत.

    राऊत राज्याला अस्थिर करण्याचं, राज्यात अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत

    हिंदुत्वाबदद्ल बोलण्याचा अधिकार राऊतांना नाही

  • 17 May 2023 10:56 AM (IST)

    दंगली घडवणारे मास्टरमाइंड कलानगरमध्ये बसलेत – नितेश

    नितेश राणेंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार टीका

  • 17 May 2023 10:54 AM (IST)

    संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात – नितेश राणे

    संजय राऊत सध्या मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहेत.

    राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते

  • 17 May 2023 10:34 AM (IST)

    छ. संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

    मुलांच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

    वसतीगृहात चांगल्या सुविधा मिळत नाहीत, विद्यार्थ्यांचे अनुदान वेळेवर मिळत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार

    वसतीगृहातील भरती पूर्ण क्षमतेने करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

  • 17 May 2023 10:33 AM (IST)

    Marcus Stoinis IPL 2023 : स्टॉयनिसच्या इनिंगमधील याच 12 बॉलनी मुंबईची कशी वाट लावली, ते समजून घ्या, VIDEO

    Marcus Stoinis IPL 2023 : शेवटच्या 12 चेंडूंमध्ये असा झाला मुंबई इंडियन्सचा घात. मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या ओव्हर्समध्येच लखनऊ सुपर जायंट्सला अडचणीत आणलं होतं. वाचा सविस्तर….

  • 17 May 2023 10:32 AM (IST)

    LSG vs MI IPL 2023 : मुंबईला हरवून लखनऊला भलताच जोश चढला, कृणाल पंड्या बनला MS Dhoni, VIDEO

    LSG vs MI IPL 2023 : लखनऊचा कॅप्टन कृणाल पंड्याने मैदानात CSK ची कॉपी मारली. रोहित-इशानने मिळून विजयाचा पाया रचला होता. पण 10.3 ओव्हर्समध्ये मुंबईला 88 धावा बनवता आल्या नाहीत. जिंकणारी मॅच मुंबईची टीम हरली. वाचा सविस्तर….

  • 17 May 2023 10:31 AM (IST)

    LSG vs MI IPL 2023 : 49 रन्सवर खेळताना Krunal Pandya ने जे केलं, तो योग्य का? अश्विनचा थेट सवाल

    LSG vs MI IPL 2023 : सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी कृणालच्या कृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. वाचा सविस्तर….

  • 17 May 2023 10:30 AM (IST)

    LSG vs MI IPL 2023 : CSK विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 42 धावा लुटवणारा बॉलर लास्ट ओव्हरमध्ये ठरला मुंबई विरुद्ध विजयाचा हिरो

    LSG vs MI IPL 2023 : पुनरागमन करताना या बॉलरला चांगलाच मार पडलेला. दुखापतीमुळे 1 वर्ष तो टीमच्या बाहेर होता. पण काल त्याने लास्ट ओव्हरमध्ये कमाल केली. वाचा सविस्तर….

  • 17 May 2023 10:25 AM (IST)

    नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम, आजही पार पडणार बैठक

    कर्नाटकच्या मुख्यमंत्री पद कोणाकडे, या संदर्भात आजही बैठक होणार आहे.

    आज सकाळी 11 पासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे विविध पर्यवेक्षक, प्रभारी, संघटनेचे सरचिटणीस यांची बैठक होणार आहे.

    मल्लिकार्जुन खर्गे आज पुन्हा डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची भेट घेणार आहेत.

  • 17 May 2023 10:18 AM (IST)

    सत्यपाल मलिक यांच्या सहकाऱ्याच्या घरावर सीबीआयचा छापा

    जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तत्कालीन सहकाऱ्याच्या घरावर सीबीआयने छापा मारला आहे.

    विमा घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली कारवाई

  • 17 May 2023 10:09 AM (IST)

    नार्वेकर खरंच अध्यक्ष असते तर ते मुलाखती देत फिरले नसते – संजय राऊत

    राहुल नार्वेकर थेट मुलाखती देतात, त्यांना बडतर्फ केले पाहिजे, राऊत यांची मागणी

    पक्षांतर करणं हा नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय आहे.

  • 17 May 2023 10:06 AM (IST)

    आम्ही कडवट हिंदूत्ववादी, ढोंगी नाही – संजय राऊत

    दंगली घडवून राजकारणाचा डाव यशस्वी होणार नाही

    राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, संजय राऊत यांचा आरोप

  • 17 May 2023 09:52 AM (IST)

    राहुल नार्वेकर यांना बडतर्फ केले पाहिजे- राऊत

    कोणाताही न्यायाधीश मी कसा निकाल लावणार आहे, हे मुलाखती देवून सांगत नाही

    परंतु राहुल नार्वेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या त्यानंतर त्यांना बडतर्फ केले पाहिजे- संजय राऊत

    भगतसिंह कोश्यारीनंतर हे दुसरे व्यक्ती या पद्धतीने कामकाज करत आहे

  • 17 May 2023 09:44 AM (IST)

    संघाशी संबंधीत लोक हनी ट्रॅपमध्ये अडकले

    हिंदूत्व आमची श्रद्धा आहे

    हिंदूत्वाचा वापर राजकारणासाठी केला जातो

    संघाशी संबंधीत लोक हनी ट्रॅपमध्ये अडकले

    संघाची संबंधित लोकांच्या या प्रकरणावर एसआयटी का नेमत नाही- संजय राऊत

  • 17 May 2023 09:43 AM (IST)

    संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

    त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसले नाही

    मंदिर प्रशासनावर दबाब आणून तक्रार देण्यास लावली- संजय राऊत

    त्र्यंबकेश्वरच्या माध्यमातून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न

    दंगली घडवून राजकारण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

  • 17 May 2023 09:31 AM (IST)

    पुण्यात स्वराज्याचा मेळावा

    छत्रपती संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता पुण्यात स्वराज्यचा मेळावा

    27 तारखेला राज्यस्तरीय एक दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे

    स्वराज्यच्या पहिल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत पार पडणार आहे

    स्वराज्यनं पश्चिम महाराष्ट्रात मोट बांधायला सुरुवात केली आहे

    आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्यची राजकीय भूमिका स्पष्ट होऊ शकते

  • 17 May 2023 09:24 AM (IST)

    नांदेडमध्ये ११ जणांवर गुन्हा दाखल

    नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मरखेल गावात एका कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी अमोल जाधव या युवकाने दिलेल्या तक्रारीवरून गावातील अकरा आरोपी विरोधात अॅट्रॉसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीच्या तक्रारीत आई आणि बहिणीला मारहाण केल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केलय.

  • 17 May 2023 09:16 AM (IST)

    पिंपरी चिंचवड नदी सुधार प्रकल्प

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मुळा नदी सुधार प्रकल्प राबवला जाणार आहे

    या प्रकल्पामुळे 350 झाडे बाधित होणार आहे, यामुळे पर्यावरणप्रेमींचा विरोध

    वाकड बायपास ते स्पायसर कॉलेज असे जवळपास आठ किलोमीटरचे हे अंतर असून महापालिका त्यावर नदी सुधार प्रकल्प राबवणार आहे

  • 17 May 2023 09:04 AM (IST)

    कोल्हापुरात तलवार हल्ला, एकाचा मृत्यू

    करणीच्या संशयातून शेजाऱ्याचा घरात घुसून तलवार हल्ला

    कोल्हापूरच्या टेंबलाई उड्डाणपूल झोपडपट्टीतील प्रकार

    हल्ल्यात आझाद मुलतानी यांचा जागीच मृत्यू तर प्रतिकार करताना सून गंभीर जखमी

    हल्लेखोर निखिल गवळी स्वतःहून पोलिसात झाला हजर

    मुलतानी कुटुंब जेवणात मग्न असताना केला प्राणघातक हल्ला

  • 17 May 2023 08:53 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर | राज्यातील हिंसाचाराच्या घटनांनंतर छत्रपती संभाजी नगरात पोलिसांकडून रेड अलर्ट

    छत्रपती संभाजी नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट केला जारी

    शहराच्या सुरक्षेसाठी आणि खबरदारीचे उपाय म्हणून एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात

    राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद होण्याच्या वाढल्या घटना

    येणाऱ्या काळात पोलिसांनी अलर्ट राहावे अशा पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या सूचना

  • 17 May 2023 08:46 AM (IST)

    गोंदिया | एकाच रात्री तीन मंदिरे फोडणाऱ्या चोरट्यास अटक

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    चांदीचे छत्र आणि रोख रक्कम चोरीला

  • 17 May 2023 08:40 AM (IST)

    राष्ट्रवादीची आज सकाळी 11 वाजता बैठक

    शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

    या बैठकीत सर्व प्रमुख नेते, माजी नेते, आमदार, खासदार राहणार उपस्थित

    यशवंतराव चव्हाण सेंटर इथे होणार बैठक

    येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखणार रणनीती

  • 17 May 2023 08:38 AM (IST)

    पुण्यातील वारकऱ्यांच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांच्या कृतीनं एकच हशा पिकला

    वारकऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे असं म्हणताच

    चंद्रकांत पाटलांनी आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढली आणि दाखवली

    माळ दाखवताच वारकऱ्यांमध्ये पिकला एकच हशा

  • 17 May 2023 08:28 AM (IST)

    पुढील 2 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

    दिल्ली, उत्तर दिल्ली, ईशान्य दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, मध्य दिल्ली, पूर्व दिल्लीत पावसाची शक्यता

    सोनीपत, रोहतक, खरखोडा, बरौत, बागपत, मेरठ, मोदीनगर, गढमुक्तेश्वर, हापूर, सियाना, सिकंदराबाद, बुलंदशहर, जहांगीराबाद (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या प्रदेशातही पाऊस पडू शकतो

    भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला अंदाज

  • 17 May 2023 08:20 AM (IST)

    नाशिक | त्र्यंबकेश्वर मंदिर घटना प्रकरण

    सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस आणि मंदिर प्रशासन यांना देण्यात येणार निवेदन

    समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची करण्यात येणार मागणी

    त्र्यंबकेश्वर येथे साडे दहा वाजता जमणार हिंदू बांधव

    काल याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला दाखल

    कलम 295, 511 नुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 17 May 2023 08:12 AM (IST)

    चंद्रपूर | खांबाळा परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्या दोघांना अटक

    75 हजारांचा मुद्देमाल जप्त

    राजुरा वनविभागाची कारवाई

    दोन आरोपींना सागवान आणि दुचाकीसही सुमारे 75 हजारांचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकाने केला जप्त

    सुनील भाऊराव हजारे (41), प्रभाकर बारीकराव टेकाम (67) अशी आरोपींची नावं

  • 17 May 2023 08:05 AM (IST)

    आज पुणे (पीएम आरडीएचा ) अर्थसंकल्प होणार सादर

    मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार अर्थसंकल्प सादर

    जवळपास 801 गावांचा परिसर हा पीएम आरडीएमध्ये येतो

    विविध प्रकल्प पीएम आरडीए मार्फत राबवले जातात

    त्यामुळे किती अर्थसंकल्पाला मंजूरीम मिळते हे पाहणं महत्त्वाचं

  • 17 May 2023 07:48 AM (IST)

    भाजप कार्यकारिणीची उद्या पुण्यात बैठक

    बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार

    सगळे आमदार, खासदार, मंत्र्यांचा उद्या दिवसभर पुण्यात तळ

    सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालणार बैठक

    जे पी नड्डा घेणार संघटनात्मक आढावा

    भाजपात 8 दिवसांत संघटनात्मक बदल होण्याचे संकेत

  • 17 May 2023 07:26 AM (IST)

    सीएसएमटी, पनवेल ठाण्यात स्तनपान कक्ष, मध्य रेल्वेचा महत्त्वपूर्ण उपक्रम

    रेल्वेने प्रवास करताना प्रवासादरम्यान सुरक्षित आणि आरामदायक असे 13 स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहेत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्थानकावर तीन, लोकमान्य टिळक टर्मिनसवर तीन, ठाण्यात दोन, कल्याण, पनवेल आणि लोणावळ्यात दोन असे 13 कक्ष (पॉड्स) बसवण्यात येणार आहेत

    ही सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहे.

    नोकरदार आणि प्रवासादरम्यान महिलांना तान्हुल्यांना सुरक्षितपणे स्तनपान करता यावे, यासाठी स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहेत

  • 17 May 2023 07:23 AM (IST)

    कल्याण ते बदलापूर दरम्यान रेल्वे अपघातात वाढ

    गेल्या तीन महिन्यात अपघातामुळे 80 जणांचा मृत्यू

    60 प्रवाशी जखमी असल्याची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या नोंद

    लटकून प्रवास करणे, रेल्वे लाईन क्रॉस करणे, दरवाजात उभे राहणे या गोष्टी टाळाव्या कल्याण रेल्वे पोलिसांचे आवाहन

  • 17 May 2023 07:21 AM (IST)

    जेपी नड्डा यांचा सहाय्यक असल्याचा बनाव करणाऱ्याला अटक

    भाजप आमदारांकडे मंत्रीपदासाठी केली पैशाची मागणी

    निरजसिंह राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव

    राज्यातील चार आमदारांकडे केली होती मागणी

    आमदार विकास कुंभारेंच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांची कारवाई

  • 17 May 2023 07:16 AM (IST)

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक; शिवसेना भवनात होणार मंथन

    उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे

    या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे

    महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होणार आहे

    या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतं

Published On - May 17,2023 7:13 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.