Maharashtra Breaking Marathi News Live | शिवसेना उबाठा गट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

| Updated on: May 20, 2023 | 7:06 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | शिवसेना उबाठा गट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया शपथ घेणार आहेत. तर डीके शिवकुमार हे नवे उपमुख्यमंत्री असणार आहेत. 20 मे रोजी बंगळुरूत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पाकिस्तानच्या लाहौरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराची घेराबंदी, पोलीस मोठ्या कारवाईच्या तयारीत. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील गोडाऊनला भीषण आग. शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 May 2023 11:26 PM (IST)

    भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांना लागली गाढ झोप

    पुणे :

    पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण खाली बसलेले कार्यकर्ते मात्र गेले झोपी

    भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांना लागली गाढ झोप

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज पार पडली भाजपची प्रदेश कार्यकारिणी

    याच प्रदेश कार्यकारणीत देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना समोर बसलेले कार्यकर्ते मात्र गाढ झोपलेले पाहायला मिळाले

  • 18 May 2023 11:14 PM (IST)

    फडवणीसांना बोलू द्या आमच्या जागा वाढतात; संजय राऊत

    नांदेड : -कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, फडवणीसांना बोलू द्या आमच्या जागा वाढतात

    -त्यांच्या अशा बोलण्यानेच आमच्या जागा वाढत आहेत.

    -कर्नाटकमध्ये गुजरात पॅटर्न राबवला पण कर्नाटकच्या जनतेने तो पॅटर्न उधळून लावला

    -महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन होईल राऊत यांचा दावा

    -उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आठ मागण्या केल्या पण एकही मान्य केली नाही यावर बोलताना राऊत म्हणाले की सर्वोच्य न्यायायलाचा हा अवमान

  • 18 May 2023 09:52 PM (IST)

    बंगलोरमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक

    बैठकीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित राहणार

    त्याबरोबर आमदार व खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार

    सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतील

    मात्र त्याआधी बंगलोरमध्ये ठराव समंत करण्यासाठी महत्वाची बैठक

  • 18 May 2023 09:33 PM (IST)

    गिरणेतील अवैध वाळू उपसाविरोधात मनसे आक्रमक

    जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेनेची जोरदार घोषणाबाजी

    तोडगा निघाला नाही तर मनसे तर्फे आंदोलनाचा इशारा

    ‘कलेक्टर हटाव जिल्हा बचाव’ अशा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार

    असा इशारा मनसे पदाधिकारी अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिला आहे

  • 18 May 2023 09:15 PM (IST)

    ईडीनं बोलावलं आहे तर जावं लागेल : जयंत पाटील

    ईडीने मला दूसरी नोटीस दिली नाही तर तारीख बदलून मागितली होती ती बदलून दिली

    ईडीनं बोलावलं आहे तर जावं लागेल

    आता चौकशी करतात की चहापाणी करतात हे पाहावं लागेल

    मला जे प्रश्न विचारले जातील त्यांची मी उत्तर देणारं आहे

    माझ्या मालकीचं या पृथ्वी तलावर एकही घर नाही

    गावाकडचं घरं आईकडून माझ्याकडे आलं

    ईडीचा काय गैरसमज झालेला आहे का ?

  • 18 May 2023 08:53 PM (IST)

    कोरोनामुळे उद्धव ठाकरेंना भेटायला मर्यादा आली हे खरं : जयंत पाटील

    भाजपात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून गेलेले आमदार आहेत

    महाराष्ट्रातील जनता जाहिरातीला भुलत नाही

    महाराष्ट्रातील कोणताच घटक समाधानी नाही

  • 18 May 2023 08:39 PM (IST)

    एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली फडणवीसांची भेट

    2020 मधील पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल लवकर लावण्याची मागणी,

    यासंदर्भात विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्र्याना दिले निवेदन

    -साडे तीन वर्षांपासून 650 विद्यार्थी अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत

    -यामध्ये स्वता लक्ष घालून सकारात्मक भूमिका घेण्याचं फडणवीसांचे विद्यार्थ्यांना आश्वासन

  • 18 May 2023 08:25 PM (IST)

    बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

    टीम इंडिया आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल बीसीसीआयने अनिल पटेल यांची संघ व्यवस्थापक पदी (टीम मॅनेजर) नियुक्ती केली

  • 18 May 2023 07:49 PM (IST)

    Tuljabhavani Temple | तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा मोठा निर्णय

    तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा मोठा निर्णय

    मंदिरात आता वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश नाही

    मंदिर प्रशासनाकडून आसपासच्या परिसरात फलकबाजी

    मंदिरात येताना भारतीय संस्कृतीचं भान राखण्याचं आवाहन

    मंदिर प्रशासनाच्या निर्णयावरुन संमिक्ष प्रतिक्रिया

  • 18 May 2023 07:40 PM (IST)

    Shiv Sena Ubt Lok Sabha 2023 | ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना लोकसभेत पाठवण्याची तयारी

    शिवसेना उबाठा गट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज

    मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांना उमेदवारीची शक्यता

    कीर्तीकरांनी नकार दिल्यास माजी महापौर सुनील प्रभू यांना संधी

    अमोल कीर्तीकर शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र

  • 18 May 2023 07:02 PM (IST)

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला

    पुण्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला

    पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे

    थोड्या वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येणार आहेत

  • 18 May 2023 06:48 PM (IST)

    कल्याण : पार्किंगवरून दोन गटांमध्ये राडा

    हॉटेल कर्मचारी आणि वॉचमनमध्ये झाला राडा

    सोसायटीच्या वॉचमनला हटकल्यावरून राडा

    सोसायटीबाहेरील राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद

  • 18 May 2023 06:33 PM (IST)

    बुलढाणा : सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

    चुलत बहिणीच्या लग्नानिमित्त आला होता रजेवर

    भानापूर गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

    येसापूर येथील विकास गायकवाड यांचा अपघाती मृत्यू

  • 18 May 2023 06:14 PM (IST)

    पुण्यात भाजपच्या आमदार खासदारांची बैठक सुरू

    पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    आमदार, खासदारांच्या बैठकीनंतर जेपी नड्डा घेणार राज्यातील सर्व मंत्र्यांची बैठक

    आज पुण्यात पार पडत आहे भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक

    निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची पुण्यात रणनीती सुरू

  • 18 May 2023 06:00 PM (IST)

    लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत रस्सीखेच

    लोकसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा दावा

    दक्षिण मध्य जागेवर ठाकरे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांना लढविणार

    तर काँग्रेसेची जागेवर वर्षा गायकवाड यांना लढविण्याची तयारी

    काँग्रेस आणि ठाकरे गटात जागेसाठी आतापासूनच रस्सीखेच

  • 18 May 2023 05:51 PM (IST)

    या देशात महापुरुषांनी जन्म घेणे आवश्यक आहे

    तरच देशात सलोखा कायम राहिल

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमावी

    वाद पेटविणाऱ्यांची पण चौकशी करावी

    हुसेन दलवाई यांनी केली मागणी

  • 18 May 2023 05:48 PM (IST)

    नाशिककरांचे अभिनंदन करायला आलो

    वाद पेटविण्याचा प्रयत्न असतानाही लोकांनी समजून घेतले

    मुस्लीम-हिंदू वाद घडविण्याचा प्रयत्न

    आम्हाला विठ्ठल ही आमचाच वाटतो

    त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात संदल येण्याची परंपरा 100 वर्षांपासून

    हुसेन दलवाई यांनी केला दावा

  • 18 May 2023 05:46 PM (IST)

    देशात सर्वसमावेश संस्कृती आहे

    हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ

    मंदिर परिसरात हुसेन दलवाई

    माझे चांगले दर्शन झाले-दलवाई

    मुस्लीमांना केले शांततेचे आवाहन

  • 18 May 2023 05:44 PM (IST)

    ठाकरे गटाची लोकसभेची निवडणुकीची तयारी

    मुंबई उत्तर-मध्यमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी

    ते लढले नाही तर सुनील प्रभू यांना उमेदवारी देण्याची शक्यता

    गजानन किर्तीकर सध्या शिंदे गटात

  • 18 May 2023 05:40 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता

    खरीप हंगामासाठी युरिया आणि DAP साठी सबसिडीत वाढ

    1 लाख 8 हजार कोटींची सबसिडी वाढवली

    केंद्र सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

  • 18 May 2023 05:34 PM (IST)

    अखेर पीएफआयच्या सदस्याला अटक

    एनआयने केली पीएफआयच्या सदस्याला अटक

    आरएसएसचे श्रीनिवासन यांची करण्यात आली होती हत्या

    केरळातील घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते आंदोलन

  • 18 May 2023 05:29 PM (IST)

    अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे

    मी दुःखी कशाला होऊ, तुम्हीच सांगा

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली प्रतिक्रिया

    शिवकुमार होते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

  • 18 May 2023 05:25 PM (IST)

    कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही एकत्र पॅनल केले आहे

    शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र निवडणूक लढविणार

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

    वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या निवडणूकीत बंधू-भगिनीचे एकच पॅनल

  • 18 May 2023 05:23 PM (IST)

    पुणेकरांनो जागरुक रहा, अशी होत आहे फसवणूक

    ‘बिल भरले नाही म्हणून, तुमची वीज आज रात्री 8.30 वाजता खंडित होईल, ताबडतोब संपर्क करा.’

    अशा भूलथापांना, मॅसेजला बळी पडू नका

    पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन

    फसवणुकीचा सायबर भामट्यांकडून नवीन फंडा

  • 18 May 2023 05:19 PM (IST)

    स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा नफा

    तिमाही निकालात झाला फायदा

    चौथ्या तिमाही निकालात बँकेने मांडले फायद्याचे गणित

    16,695 कोटींवर घेतली नफ्याची हनुमान उडी

  • 18 May 2023 05:13 PM (IST)

    दिल्लीत महिलांना मोफत प्रवासाचा फज्जा

    स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेअर केला व्हिडिओ

    महिला, मुली दिसल्यावर बस चालकाने काढला पळ

    बस थांबवलीच नाही, महिलांच्या मोफत योजनेची अशी केली जात आहे थट्टा

    अरविंद केजरीवाल यांनी कडक कारवाईचा दिला इशारा

  • 18 May 2023 05:08 PM (IST)

    2024 मध्ये राज्यात आणि देशात भाजपचेच सत्तेत येणार

    तिसऱ्या आघाडीचे प्रयोग यापूर्वी दोनदा झाले

    तिसऱ्या आघाडीचा प्रयोग देशात यशस्वी झाला नाही

    महािवकास आघाडीतील घटक पक्षांनी किती ही बैठका घेऊ द्या

    रावसाहेब दानवे यांनी काढला चिमटा

  • 18 May 2023 05:04 PM (IST)

    PM Narendra Modi : देशातील प्रत्येक राज्यात विकासाला चालना

    आधुनिक इन्फास्ट्रक्चरसाठी मोठी गुंतवणूक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्पष्ट

    ओडिशा राज्यात नवीन पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक

  • 18 May 2023 04:58 PM (IST)

    कलस्टरमधून कोळीवाडा वगळता यावेत अशी आमची मागणी आहे- राजन विचारे, खासदार 

    मिरा भाईंदर शहराच्या विविध मुद्यांवर खासदार राजन विचारे यांनी घेतली मिरा भाईंदर मनपा आयुक्तांची भेट

    घोडबंदरमधील जे शिवसृष्टी बांधले जात आहे तिथे लोकांना बेघर करून नऊ मीटरच्या रस्त्या करून येत आहे.

    शासनाकडून कलस्टर राबवले जातात, ज्याच्या कोलीवड्यात विरोध आहे.

    कलस्टरमधून कोळीवाडा वगळता यावेत अशी आमची मागणी आहे- राजन विचारे, खासदार

  • 18 May 2023 04:47 PM (IST)

    पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छा मरणाची परवानगी सुनील पाटील यांनी मागितली

    सांगलीतल्या एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे.

    पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छा मरणाची परवानगीची मागणी केली आहे.

    तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

    शहरातल्या त्यांच्या मिळकतीच्या जागेवर एका प्रांताधिकारी असणाऱ्या

    एका अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत सुनील पाटील दांपत्याने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.

  • 18 May 2023 04:39 PM (IST)

    रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत मोठा निर्णय

    पुणे रांजणगाव अष्टविनायक महागणपतीच्या ट्रस्टचा मोठा निर्णय

    अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात अंग प्रदर्शक

    उत्तेजक असभ्य व अशोभनीय वस्र तसेच हाफ पँन्ट बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आहे.

    रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 18 May 2023 04:36 PM (IST)

    पार्टीला मागण्याची नाही देण्याची गरज आहे- देवेंद्र फडणवीस

    पार्टीला मागण्याची नाही देण्याची गरज आहे

    तुम्ही त्याग करायला तयार आहात का? मी त्याग करायला तयार आहे, मी पद सोडायला तयार आहे , वर्षभर घर सोडायला तयार आहे

    अडीच वर्षे एक सरकार बघितलं, विश्वातघाताच सरकार आपण बघितलं

    मुख्यमंत्र्याना बघितलं किती वेळ मंत्रालयात आलेत- देवेंद्र फडणवीस

  • 18 May 2023 04:30 PM (IST)

    चंद्रकांत खैरे यांचं जे पी नड्डा यांना प्रतिउत्तर

    पोलखोल किंवा इन्कवायरी करायची असेल तर ठाणे महापालिका, पुणे, नागपूर महापालिका आणि समृद्धी महामार्गाची चौकशी करा

    मुंबईत मराठी माणसांची अस्मिता आहे तिथे शिवसेनेला कुणाही हरवू शकत नाही, शिवसेनेच्या स्पर्धेत कुणीही टिकू शकत नाही मुंबई महापालिकेत महापौर शिवसनेचाच होणार

    बच्चू कडू म्हटले तसं एका व्यक्तीकडे सगळे जिल्हे दिल्यास काम होणार नाही पण मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही हे ईश्वरालाच माहीत

  • 18 May 2023 04:26 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तोड बंद होतील असे वाटलं होतं- देवेंद्र फडणवीस

    जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केलेल्या टीमसोबत ही कार्यकारणी होत आहे

    राज्य सरकारला कोर्टाने स्टँम लावल्यानंतर जे पी नड्डा महाराष्ट्रात येत आहेत

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तोड बंद होतील असे वाटलं होतं

    मात्र उद्धव ठाकरेंना कोण सांगणार पोपट मेलाय, मात्र तरी पोपट हलतोय, बोलतोय असच उद्धव ठाकरेंना वाटतोय- देवेंद्र फडणवीस

  • 18 May 2023 04:17 PM (IST)

    येत्या निवडणुकीत महापालिका आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकणार- देवेंद्र फडणवीस 

    मतांचे दृविकरण कितीही करा, कितीही लांगूचलन करा, इथे कर्नाटक पटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदींचा पटर्न चालणार

    आज भाजप आणि सेनेची युती भक्कम आहे

    आज फक्त शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे

    येत्या निवडणुकीत महापालिका आणि लोकसभा, विधनासभा निवडणुकीत जिंकणार

    हे खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत

    मात्र फक्त सर्वसामान्याचा नरेटिव्ह आपल्याकडे आहे

    आपण जिकणार कुणाच्या मनात शंका नाहीय

    हा काळ सक्रियेतचा आहे

    हे 6 महिने आणि पुढचे सहा महिने महत्वाचे आहेत

  • 18 May 2023 04:12 PM (IST)

    कुणी समिती मागायची नाही, कुणी मंत्रिपद मागायचे नाही- देवेंद्र फडणवीस

    एका वर्षाचे समर्पण हे मोदींच्या कार्यासाठी, देशासाठी असणार आहे

    पुढच्या एका वर्षात कुणाला काही मिळणार नाही

    कुणी समिती मागायची नाही, कुणी मंत्रिपद मागायचे नाही- देवेंद्र फडणवीस

  • 18 May 2023 04:10 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या मुंबई महानगरपालिका आयुक्तांना मोठ्या सूचना

    एमएमआरडीएचे सर्व रस्ते मुंबई महानगरपालिकेने साफसफाईला घ्यावे

    साफसफाईचा जो खर्च आहे एमएमआरडीएकडून मागून घ्यावा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सूचना

  • 18 May 2023 04:07 PM (IST)

    भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक सुरू

    भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक सुरू

    जे पी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुरू

    देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित

  • 18 May 2023 04:00 PM (IST)

    भारतीय जनता पक्षाचा जीव मुंबई महानगर पालिकेत अडकला आहे हे सर्वांना माहीत आहे – विनायक राऊत

    उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत असलेली फिक्स डिपॉझिट आता प्रशासकांच्या राजवटीत जवळजवळ सहा हजार कोटींनी कमी झाली आहे.एवढ्या पैशाची उधळपट्टी त्यांनी केलेली आहे – विनायक राऊत

    मुंबई म्हणजे सोन्याची कोंबडी अस भारतीय जनता पक्षाला वाटतं. मागच्या 30 वर्षांपासून मुंबई करांची सेवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते – विनायक राऊत

    भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पॅटर्न राबवला जाईल. मुंबईकर त्याला तयार आहेत. भाजपच्या लोकांना किती आपटायची आहे ते आपटून घेऊ दे. आम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही- विनायक राऊत

  • 18 May 2023 03:52 PM (IST)

    भंडारा: भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी.

    भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

    नागरिकांना उन्हापासून दिलासा

    दुपारच्या सुमारास मोहाडी शहरासह ग्रामीण भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे

  • 18 May 2023 03:50 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नालेसफाईची पाहणी

    नालेसफाई नीट न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

    मुख्यमंत्र्यांकडून पावसाळ्याआधीच्या कामाची पाहणी

    मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सूचना

  • 18 May 2023 03:47 PM (IST)

    पुण्यात पंकजा मुंडेंना सुजय विखे भेटले

    भेटीवेळी पंकजा मुंडे म्हणाल्या काय चाललंय तुमचं ?

    काय चाललंय तुमचं हे वाक्य कोणाला उद्देशून

    राम शिंदे आणि विखेंमध्ये सुरू असलेल्या वादावरून पंकजा मुंडे बोलल्या का ?

    सुजय विखे भेटल्यानंतर हसून पंकजा मुंडे बोलल्या

  • 18 May 2023 03:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर: लासुर गावात तालुक्यातील सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा

    छत्रपती संभाजी नगर शहरातील गंगापूर तालुक्यातल्या लासुर या गावात तालुक्यातील सगळ्यात पहिला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला

    या पुतळ्याला प्रशासकीय परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला हा पुतळा काढून घेण्याची भूमिका घेतली होती मात्र चाहत्यांचा राग पाहता पोलिसांनी माघार घेतली

    यामुळे लासुर स्टेशन चौकातील पुतळा कायम ठेवण्यात आला आहे यामुळे शिवप्रेमींनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

  • 18 May 2023 03:36 PM (IST)

    पिंपरी चिंचवड: बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू झाल्याने राजकीय नेत्यांमधील श्रेयवाद पाहायला मिळत आहे

    सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली असून पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात बैलगाडा मालक, प्रेमी आणि शौकीन यांनी जल्लोष साजरा केला आहे

    बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरू झाल्याने राजकीय नेत्यांमधील श्रेयवाद पाहायला मिळत आहे

    शिरूर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थकांमध्ये श्रेयवादावरून स्टेटस वॉर बघायला मिळत आहे.

    “आपल्या फकड्याने करून दाखवलं” असे खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थकांनी व्हाट्सऍप स्टेटस ठेवून आमदार महेश लांडगेच्या समर्थकांना डिवचले आहे.

    तर आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांनी “पैलवानाने करून दाखवले” असे व्हाट्सऍप स्टेटस ठेवले असून चोख प्रतिउत्तर दिले आहे. दोन्ही समर्थकांमध्ये स्टेटस वॉर रंगल्याचे चित्र आहे

  • 18 May 2023 03:00 PM (IST)

    40% कमिशन ही कोणती पार्टी घेत होती हे कर्नाटकच्या जनतेला चांगलंच माहिती – अंबादास दानवे

    भारतीय जनता पार्टी 40% कमिशन घेणारी पार्टी तिला कर्नाटकात लोकांनी धडा शिकवले

    महाराष्ट्रामध्ये देखील नेत्यांनी सांगितले की आमच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होतोय

    त्यामुळे यांनी आम्हाला धडा शिकवायची गरज नाही

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याला सांगतील तोच महापूर होणार याचाच अर्थ आमच्या शिवसेनेचा महापौर होणार

    भाजप समीर वानखेडेच्या प्रकरणांमध्ये तेव्हा संरक्षण देण्याच्या भूमिकेत होती

    नवाब मलिक सुद्धा बोलत होते

    आता भाजपने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे

    तुळजाभवानी मंदिराच्या ज्या प्रथा आहेत परंपरा आहेत, त्या जपल्या पाहिजेत

  • 18 May 2023 02:54 PM (IST)

    बैलगाडा शैर्यतीचा राज्य सरकारचा कायदा मंजूर – सुनिल केदार

    आता सत्ताधारी, विरोधकांमध्ये श्रेय्यवादाची शैर्यत
    आता बैलगाडा शैर्यतीवरुन श्रेय्यवादाची लढाई सुरु
    देवेंद्र फडणवीस म्हणतात आमच्या प्रयत्नांना यश
    सुनील केदार म्हणतात माझा पाठपुरावा सर्वांना माहित
  • 18 May 2023 02:53 PM (IST)

    जे पी नड्डा बैठकीसाठी रवाना

  • 18 May 2023 02:47 PM (IST)

    जे पी नड्डा पुणे विमानतळावर दाखल

    ढोल ताशाच्या गजरात जे पी नड्डा यांचं स्वागत

  • 18 May 2023 02:47 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचे आभार या ऐतिहासिक निर्णयाबद्दल – दिलीप मोहिते पाटील

    शेतीच्या कामासाठी चांगले बैल मिळावे यासाठी लोक नवस करायचे व पूजा करायचे

    शेतकऱ्यांना आणि गावाकडच्या लोकांना बैल हा आपल्या जिवापेक्षा प्रिय प्राणी आहे

    शर्यत आणि गावाकडचा माणूस याचं एक समीकरण असायचं

    मात्र या शर्यतीवर बंदी आणली होती, ती आता उठवली आहे, त्याबद्दल खरंच धन्यवाद

    बैल नामशेष झाले असते, मात्र या निर्णयामुळे आता बैल मोठ्या प्रमाणात टिकून राहतील

    ज्याच्या त्याच्या कर्तव्याचा भाग होता, कोणीही श्रेयवाद करू नये

    एखाद्या गोष्टीमुळे लोकांना आनंद मिळत असेल तर त्याचं श्रेयवाद घेऊ नये

  • 18 May 2023 02:45 PM (IST)

    अंबरनाथमध्ये माजी नगरसेवकाची पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ

    शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

    मिलिंद पाटील असं शिवीगाळ करणाऱ्या माजी नगरसेवकाचं नाव

    रिक्षा स्टॅण्डवर दुसऱ्या युनियनने बोर्ड लावल्यानं केली शिवीगाळ

  • 18 May 2023 02:45 PM (IST)

    तुम्ही पुजारी असाल तर पूजा करा – विद्या चव्हाण

    तुम्हाला ट्रस्टने सांगितलं आहे तेवढंच करा

    भाजपला कोणी मिञ राहिला नाही, त्यामुळं दंगे घडवण्याचं काम भाजप करत आहे

    महादेवाला राक्षस सुद्धा पुजत होते, मग तुम्ही मानवाला अटकाव कसं काय करता? हे चालणार नाही

    वर्षानुवर्ष सुरू असलेल्या परंपरेचा तुम्हाला काय प्रोब्लेम आहे

    भाजपने फालतूपणा करू नये

    ह्याचा पोपट मेलाय त्याचा पोपट मेला आहे हे फडणवीस यांनी बोलतं बसण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं

    राज्यातून मुली गायब होत आहेत यावर बोलावं

    धर्मा-धर्मांत दंगे पसरवण्यापेक्षा काम करा

  • 18 May 2023 02:42 PM (IST)

    थोड्याच वेळात जे पी नड्डा पुणे विमानतळावर दाखल होणार

    पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारणीला जेपी नड्डा लावणार हजेरी

    जे पी नड्डा साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

    नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांची बैठक देखील पडणार पार

  • 18 May 2023 02:37 PM (IST)

    आमदार नितेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टिका

    संजय राऊत राजाराम राऊतांचा मुलगा असेल तर त्यांनी आता त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावं

    संजय राऊतचा लव्ह जिहाद झाला आहे

    त्याचं शुद्धीकरण करणं अजून बाकी आहे

    संजय राऊत दोन पायांनी परत येणार नाही

    उद्धव ठाकरेंना आनंद काँग्रेस जिंकल्याचा आहे की पाकिस्तान?

    भाजपा जिंकलं की भारत माता की जय बोलतात

    काँग्रेस जिंकलं की पाकिस्तान जिंदाबाद बोलतात हा फरक आहे

  • 18 May 2023 02:36 PM (IST)

    शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडा

    सभापती पदी भाजपचे नंदू डोहळे तर उपसभापती पदी शिवसेनेचे शरद वेखंडे

  • 18 May 2023 02:35 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरची बंदी कायमची हटवल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आभार

    ट्विटरवर ट्विट करता पाटील यांनी न्यायलाचे मानले आभार

    बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग

    आज सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवरची बंदी कायमची हटवली

    ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी

    बारा वर्षांचा महाराष्ट्राचा कायदेशीर संघर्ष आज फळाला आला

    महाराष्ट्राच्या मनातला निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार

  • 18 May 2023 02:34 PM (IST)

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नेरुळ येथील वंडर पार्कचे उदघाटन रखडले

    ज्येष्ठांसह बच्चे कंपनीचा हिरमोड

    वंडर पार्कच्या मेकओव्हरसाठी पालिकेकडून 23 कोटींचा खर्च

    मनसे विद्यार्थी सेनेकडून महापालिका आयुक्तांना पत्र

    आंदोलनाचा दिला इशारा

  • 18 May 2023 02:29 PM (IST)

    चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कार टेपचोरी करणाऱ्या चोरट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

    22 कार टेप नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 1 ने केले हस्तगत

    आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न

    सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला पकडण्यात यश

    सोलापूरवरून केली आरोपीला अटक

  • 18 May 2023 02:28 PM (IST)

    कल्याण पूर्व परिसरात विषारी साप चावल्‍याने 15 वर्षीय बालकाचा मृत्यू

    शाळेला सुट्टी लागल्याने घराजवळ वडिलांच्या ज्युसच्या दुकानात बसला असताना सर्पदंश

    शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ठाणे कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झाला दुर्दैवी मृत्यू

  • 18 May 2023 02:26 PM (IST)

    कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची संजय शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका

    संजय शिरसाट हे एवढ्या वर्ष उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वामुळे 3 वेळा निवडून आले होते

    जर त्यांना भाजपच्या हिंदुत्व एवढं आवडत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा

    मुख्यमंत्री नालेसफाईची पाहणी करतात

    एवढे वर्ष ते नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडे संपूर्ण मुंबईचा चार्ज होता

    मग त्यावेळी त्यांनी पाहणी केली का?

    सगळ्यात जास्त भाजपला आसमंत दाखवण्यात आलं

    तसेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे महायुतीला आसमंत दाखवतील

  • 18 May 2023 02:22 PM (IST)

    अटकपूर्व जामीन घेणार नाही – समीर वानखेडे

    कोणताही गुन्हा केला नाही

    तत्कालीन वरिष्ठ ज्ञानेश्वर सिंग यांचं षडयंत्र

    मी चौकशीला सामोरं जामार

  • 18 May 2023 02:20 PM (IST)

    आमदार महेश लांडगेंनी देवेंद्र फडणवीसांना भरवला पेढा

    बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर मानले आभार

    देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा केल्याचा भाजपचा दावा

    आमदार महेश लांडगेंनी केला देवेंद्र फडणवीसांचा सत्कार

  • 18 May 2023 02:19 PM (IST)

    मी धुरकरीच आहे, पटात गेलो की हाकलतच असतो – बच्चू कडू

    बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली हा निर्णय स्वागतार्ह

    कुराणी न टोचता शेतकऱ्यांनी बैल हाकलले पाहिजे ही विनंती आहे

    दंगल करणारा कुणीही असो ज्यांनी दंगल पेटवण्यासाठी हात समोर आणले असेल त्याचे हात छाटले पाहिजे

    अशांतता निर्माण करण्याच काम होत त्यामुळे विकासाला गती मिळत नाही

    बेरोजगार वाढली आहे, रोज आत्महत्या होताहेत

    औषध भेटत नाही म्हणून लोक मरतात आणि दुसरी कडे तलवार काढली जात असेल

    तर शांत शहर जर अशांत करत असेल तर देशद्रोहच आहे

    कोणत्याही धर्माचे असो कारवाई झाली पाहिजे

  • 18 May 2023 02:13 PM (IST)

    ठाण्यातील कळवा परिसरात राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा बॅनरबाजी

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या तडीपारीची नोटीस संदर्भात लावण्यात आलेत बॅनर

    ‘कितीही गुन्हे दाखल करा, आमची निष्ठा सदैव आव्हाड साहेबांशीच’ अशा आशयाचे लावण्यात आलेत बॅनर

    आम्ही पण अभीजित पवार, करा आम्हाला तडीपार, कट्टर आव्हाड साहेब समर्थक

    संघर्ष माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने लावण्यात आले बॅनर

    पालिका अधिकारी महेश आहेर मारहाण प्रकरण आणि इतर राजकीय गुन्हे संदर्भात अभिजित पवार यांना केले ठाणे पोलिसांनी तडीपार

  • 18 May 2023 02:09 PM (IST)

    बैलगाडी शर्यतीवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रघुनाथ पाटील यांच्याकडून स्वागत

    शेतकऱ्यांना अपेक्षित असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला

    या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता आणखी बळ मिळाले

    पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारे अन्य कायदे देखील मागे घेण्यासाठी लढा उभारला जाईल

    हा बैलगाडा शर्यत प्रेमींच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक असा निकाल

  • 18 May 2023 02:07 PM (IST)

    कपड्यांच्या दुकानात चोरी करणाऱ्या महिलांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    महिलांची टोळी दिल्लीची असल्याचा संशय

    कपडे पाहण्याच्या बहाण्याने दक्षिण मुंबईतील काळाघोडा परिसरातील दुकानात चोरी

    1.34 लाख रुपये किमतीचा गुलाबी गाऊन केला चोरी

    या टोळीने आतापर्यंत मुंबईतील अशा तीन दुकानांना केले लक्ष्य

    एमआरए मार्ग पोलीस घेतायत आरोपी महिलांचा शोध

  • 18 May 2023 02:05 PM (IST)

    कर्जत राशीन रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

    व्यायाम करत असलेल्या तरुणांना अज्ञात वाहनाने चिडले

    कर्जत तालुक्यातील बेलवाडी येथील तरुणांवर काळाचा घाला

    ओम प्रकाश धुमाळ आणि संतोष गदादे यांचा जागीच मृत्यू तर केदार गदादे गंभीर जखमी

    केदारवर कर्जतच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

    घटनेनंतर बेनवडी गावातील ग्रामस्थ आक्रमक

    कर्जत राशीन रोडवर केला रास्ता रोको

  • 18 May 2023 01:53 PM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्या भाविकांना अडवले

    तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानने मंदीर परिसरात याबाबतचे फलक लावले असुन त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरु केली आहे. भाविकांना मंदीर प्रवेश बंदी करीत महाद्वारजवळ अडविले जात आहे.

  • 18 May 2023 01:47 PM (IST)

    सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

    सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

    हिंमत होती तर बहुमत सिद्ध करायचं होतं

    का पळून गेले पळपुटेपणा केला 30 ला बहुमत सिध्द करा, म्हटलं की 29 ला पळून गेले,

    काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात औरंगजेबाचे विचार आहेत

    यांना 40 माणसं टिकवता आली नाहीत

    सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून संभ्रम निर्माण करता

    भाजपा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणी करत नाही

    सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

  • 18 May 2023 01:40 PM (IST)

    आईस्क्रीम, रसवंती या थंड पदार्थाच्या दुकानात गर्दी

    येवल्यात दिवसेंदिवस उन्हाच्या तडाखा वाढत असून अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक आता आईस्क्रीम, रसवंती या थंड पदार्थाच्या दुकानात गर्दी करत असल्याचे बघण्यास मिळत आहे.

  • 18 May 2023 01:32 PM (IST)

    मंदिर हटावणार असल्याच्या अफवेने शिर्डीत खळबळ

    मंदिर हटावणार असल्याच्या अफवेने शिर्डीत खळबळ श्रीरामनगर भागातील तुळजाभवानी मंदिरावर नगरपरिषद हातोडा टाकणार असल्याची अफवा रात्री सोशल मिडीयावर मेसेज झाले व्हायरल श्रीरामनगर भागातील नागरिक एकवटले शिर्डी पोलीस स्टेशन ठाण्यात घेतली पोलिस अधिकाऱ्यांची भेट अशी कोणतीही कारवाई होणार नसल्याचं पोलीसांनी केले स्पष्ट मंदिराजवळील पत्र्याच शेडबाबत नगरपालिकेने दिले होते पत्र मात्र थेट मंदिरच पाडणार असल्याच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे काही काळ तणाव शहरातील नाल्याजवळ आहे मंदिर आणि बांधलेली शेड

  • 18 May 2023 01:25 PM (IST)

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेहभोजन आणि बैठकीचे नियोजन

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्नेहभोजन आणि बैठकीचे नियोजन

    कोरोना काळातील टास्क फोर्स मधील डॉक्टरांसाठी स्नेहभोजन

    आज सायंकाळी 8 वाजता वांद्रे ताज लँड्स एन्डमध्ये होणार भेट

    कोरोना काळात टास्क फोर्सने केलेल्या सहकार्याबद्दल उद्धव ठाकरे ऋणनिर्देश व्यक्त करणार

    सध्या कोरोनाची नेमकी स्थितीही उद्धव ठाकरे या बैठकीत जाणून घेणार

  • 18 May 2023 01:23 PM (IST)

    भाजपच्या आमदारांकडे पैसे मागणारा पोलिसांच्या ताब्यात

    भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणी करणारा निरज सिंग राठोड याला पोलीसांनी नागपुरात आणले आहे. नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेनं निरज सिंह राठोड याला गुजरातवरुन नागपूरात आणलंय. आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील सहा आमदारांकडे केली होती पैशाची मागणी केली होती.

  • 18 May 2023 01:14 PM (IST)

    दगडफेक प्रकरणानंतर  व्यापाऱ्यांनी दिली होती शेवगाव बंदची हाक 

    अहमदनगर

    शेवगाव बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे

    चार दिवसापासून शेवगाव होते कडकडीत बंद

    प्रशासनाच्या विनंतीनंतर शेवगाव  बंदचा निर्णय मागे

    दगडफेक प्रकरणानंतर  व्यापाऱ्यांनी दिली होती शेवगाव बंदची हाक

  • 18 May 2023 01:09 PM (IST)

    राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या निकालानंतर सांगलीत जल्लोष

    राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या निकालानंतर सांगलीत जल्लोष

    बैलगाडा शर्यतीच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल लागला.

    सांगलीत ही जल्लोष करण्यात आला.

    यावेळी साखर वाटत गुलाल लावून जल्लोष करण्यात आला.

    कोर्टच्या निर्णयचा स्वागत बैलगाडा मालक शेतकरी यांनी केले.

    वर्षभराच्या कालावधीमध्ये कोणत्याही वादाविना महाराष्ट्रभर प्रचंड उत्साहात आणि लाखो बैलगाडी शर्यत प्रेमीच्या उपस्थितीत शर्यती पार पडल्या ते पाहता सुप्रीम कोर्ट आज बैलगाडी शर्यतीला अंतिम परवानगी दिली.

  • 18 May 2023 01:08 PM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात आता या भक्तांना प्रवेश नाही – संस्थानचे आदेश जारी

    तुळजाभवानी मंदिरात आता या भक्तांना प्रवेश नाही – संस्थानचे आदेश जारी

    धाराशिव – तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे.

    तुळजाभवानी मंदीर संस्थानने मंदीर परिसरात याबाबतचे फलक लावले आहेत.

    अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही.

    भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भाव ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहन केले आहे.

  • 18 May 2023 01:06 PM (IST)

    बैलगाडा शर्यत निकालावरती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    खासदार सुप्रिया सुळेंनी मानले अमोल कोल्हे यांचे आभार,

    हा श्रेयवादाचा विषय नाही तर सामाजिक विषय – सुप्रिया सुळे

  • 18 May 2023 01:05 PM (IST)

    बांगलादेशात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरु

    बांगलादेशात उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरु झाल्याने 15 मार्चपासून परदेशी कांद्यावर आयात बंदी केल्याने त्याचा परिणाम भारतीय कांद्याच्या दरावर झाला. कांद्याच्या दरात घसरण होत सरासरी कांद्याचे दर पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्याने भारत सरकारने बांगलादेशातील कांद्यावरील आयात बंदी उठवण्यासाठी तेथील सरकारकडे मागणी केली पाहिजे

  • 18 May 2023 01:02 PM (IST)

    साप चावल्‍याने पंधरावर्षीय बालकाचा मृत्यू

    कल्याण पूर्व परिसरात विषारी साप चावल्‍याने पंधरावर्षीय बालकाचा मृत्यू

    अमित सोनकार असे बालकाचे नाव असून शाळेला सुट्टी लागल्याने घराजवळ वडिलांच्या ज्यूस दुकानात बसला असताना विषारी साप चावला

    शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ठाणे कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान झाला दुर्दैवी मृत्यू

  • 18 May 2023 12:59 PM (IST)

    बीआरएसची नांदेडमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक

    – भारत राष्ट्र समिती पक्षाची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक नांदेड येथे होणार आहे.

    – 19 आणि 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर आहे.

    – या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत.

    – राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली.

  • 18 May 2023 12:42 PM (IST)

    राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, सरकार देणार तीन लाख नोकऱ्या

    – मुंबई येथे राज्य सरकारच्या युवा कौशल्य विभागाने ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’चे आयोजन केले आहे.

    – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.

    – यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.

    – राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणे हेच आमचे टार्गेट आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 18 May 2023 12:39 PM (IST)

    MS dhoni IPL 2023 : अजिंक्य रहाणेनंतर एमएस धोनीमुळे मुंबईच्या दुसऱ्या बॅट्समनच यशस्वी कमबॅक

    MS dhoni IPL 2023 : धोनीमुळेच मुंबईचा दुसरा बॅट्समन फॉर्ममध्ये आला. धोनीच योगदान कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वाचा सविस्तर….

  • 18 May 2023 12:38 PM (IST)

    India vs Pakistan : भारतात येणार पाकिस्तानी टीम, ‘या’ दोन शहरात होणार टक्कर

    India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आशिया कप तसच वर्ल्ड कप खेळण्यासाठी परस्परांच्या देशात येण्यास स्पष्ट नकार दिलाय, पण….वाचा सविस्तर…..

  • 18 May 2023 12:36 PM (IST)

    औरंगाबादमध्ये पोलिसांचा एक नवा प्रयोग, ‘फिर्यादी संमेलन दिवस’

    – औरंगाबाद शहर शांत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.

    – शहरात पाच स्टेजमध्ये पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे.

    – तक्रारदार फिर्यादींना आपल्या तक्रारीची प्रगती कळावी यासाठी फिर्यादी संमेलन दिवस सुरू करण्यात आला आहे.

    – पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या या वेगवेगळ्या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

  • 18 May 2023 12:27 PM (IST)

    मोठी बातमी : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी ईडीसमोर हजर

    – नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी ईडी समोर आज हजर झाल्या आहेत.

    – दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात राबडी देवी पोहोचल्या.

    – रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांनी जमीन घेऊन त्याबदल्यात रेल्वेत नियमबाह्य नियुक्त्या केल्या असा त्यांच्यावर आरोप आहे.

    – लालू प्रसाद यादव राबडी देवी यांच्यासह याप्रकरणात अन्य कुटुंबीय यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहे.

  • 18 May 2023 12:23 PM (IST)

    मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्या

    – त्रंबकेश्वर येथील प्रकरणावरून महंत अनिकेत शास्त्री यांची एक मोठी मागणी केली.

    – मशिदीत हनुमान चालीसा म्हणण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली.

  • 18 May 2023 12:18 PM (IST)

    विनोद तावडे यांच्या घरी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट

    – पुणे येथे भाजपची दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीची बैठक आहे.

    – या बैठकीला जाण्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबईत आले आहे.

    – मुंबईत आल्यानंतर ते राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या घरी जाणार आहेत,.

    – त्यानंतर तावडे यांच्या घरीच स्नेहभोजन करुन ते पुढे पुण्याला जाणार आहेत.

  • 18 May 2023 12:09 PM (IST)

    शेवगाव बेमुदत बंदचा निर्णय अखेर मागे

    – अहमदनगर येथील शेवगाव मध्ये चार दिवसापासून कडकडीत बंद आहे.

    – अखेर प्रशासनाच्या विनंतीनंतर शेवगाव बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

  • 18 May 2023 11:55 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राचा विजय- देवेंद्र फडणवीस

    बैलगाडा शर्यतीसाठी अहवाल सादर केला- देवेंद्र फडणवीस

    बैल हा धावणारा प्राणी आहे- देवेंद्र फडणवीस

    गेल्या १० वर्षाच्या बैलगाडा शर्यत लढ्याला यश- शिवाजीराव आढळराव पाटील

    शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

  • 18 May 2023 11:40 AM (IST)

    बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण 

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बैलगाडा प्रेमी समाधानी

  • 18 May 2023 11:36 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी लढा देणाऱ्या सर्वांचे आभार- अमोल कोल्हे

    ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णय – खासदार अमोल कोल्हे

    बैलगाडा शर्यतीचे सर्व अडथळे दूर

  • 18 May 2023 11:27 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवाणगी

    हा एक पारंपारीक खेळ- सर्वोच्च न्यायालयाचे मत

  • 18 May 2023 11:25 AM (IST)

    शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यतीच्या याचीकेवर आज अंतीम निर्णय

    पाच न्यायमुर्तींचे घटनापीठ देणार निकाल

    अंतीम निकालाकडे सर्वांचे लक्ष

  • 18 May 2023 11:20 AM (IST)

    जे.पी.नड्डा यांचा पुणे दौरा; बालगंधर्व रंगमंदिरामध्ये बैठक घेणार

    परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी

    उद्धव ठाकरे गटाचा बॅनरबाजीवर आक्षेप

    फ्लेक्समुळे शहराचे विदृपीकरण होतयं- ठाकरे गटाचा आरोप

  • 18 May 2023 11:16 AM (IST)

    गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा

    संचालक मंडळाच्या बैठकीत दिला राजीनामा

    25 मे रोजी होणार नवीन अध्यक्षांची निवड

    अरूण डोंगळे होणार गोकुळचे नवे अध्यक्ष

  • 18 May 2023 11:12 AM (IST)

    कोल्हापुरातल्या सरनोबतवाडीमध्ये ग्रामसभेत राडा

    अपेक्षीत उत्तरे न मिळाल्यामुळे विरोधक आक्रमक

  • 18 May 2023 11:09 AM (IST)

    समीर वानखेडे यांचे NCB चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर आरोप

    उच्च न्यायालयाच्या वानखेडे यांच्याकडून गंभीर आरोप

    आर्यन खान सह सर्व आरोपींबाबत अपडेट्स दिले जात होते- वानखेडे

  • 18 May 2023 10:50 AM (IST)

    ठाकरे गटाच्या बैठकी झाल्या तरी पुन्हा भाजपाचेच सरकार येणार – रावसाहेब दानवे

    ठाकरे गटाने कितीही बैठकी घेतल्या, दौरे केले तरी भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार, दानवेंनी व्यक्त केला विश्वास

  • 18 May 2023 10:44 AM (IST)

    जे. पी. नड्डांची मुंबईत लुडबूड नको – संजय राऊत

    भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुंबईत येऊन लुडबूड करू नये

    जे.पी. नड्डा यांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी लगावला टोला

  • 18 May 2023 10:42 AM (IST)

    मी समितीसमोर हक्कभंगावर माझी बाजू मांडणार आहे – संजय राऊत

    खटला सुरू असताना अध्यक्षांनी मुलाखती देऊ नयेत

    अध्यक्षांकडून खटल्याबाबत बाहेर कुठेही वाच्यता नको

    देशातील लोकशाही संकटात आहे.

  • 18 May 2023 10:39 AM (IST)

    तर माझी शिक्षा भोगण्याची तयारी – संजय राऊत

    मी विधिमंडळाला चोर म्हणालो नाही, राऊत यांचे स्पष्टीकरण

    मी बंडखोर आमदारांना चोर म्हणालो होतो.

  • 18 May 2023 10:31 AM (IST)

    भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक

    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे.

  • 18 May 2023 10:26 AM (IST)

    Crime News : भयानक! विश्वास ठेवलाच त्याने दगा दिला, गर्लफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर

    तरुणीला जेव्हा समजलं आपला प्रियकर विवाहित आहे, तेव्हा तिने…..वाचा सविस्तर…..

  • 18 May 2023 10:25 AM (IST)

    IPL 2023 : Prithvi shaw ने हाफ सेंच्युरी झळकवताच नाशिकची मुलगी खुश, ‘ती’ खास पृथ्वीसाठी आलेली

    Prithvi shaw IPL 2023 : टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ची कथित गर्लफ्रेंड नाशिकची आहे. पृथ्वीला सपोर्ट करण्यासाठी ती मैदानात हजर होती. वाचा सविस्तर….

  • 18 May 2023 10:25 AM (IST)

    नागपूर : नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यासाठी आज अकोल्यात जाणार – नाना पटोले

    अकोल्यातील नागरिकांनी शांतता राखावी , नाना पटोले यांचे आवाहन

    रक्तपात करण्याचं काम राज्यात सुरू

  • 18 May 2023 10:24 AM (IST)

    MI IPL 2023 Playoff Scenario : मुंबईसाठी प्लेऑफच गणित कठीण, SRH विरुद्ध इतक्या रन्सनी हवा विजय

    Mumbai Indians could get eliminated : एका पराजयाने सगळ समीकरण बदललं. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध हरुन मुंबई इंडियन्सने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारलीय. रनरेटमध्ये मुंबई RCB पेक्षा मागे आहे. वाचा सविस्तर…..

  • 18 May 2023 10:24 AM (IST)

    IPL 2023 Playoff : हरलेल्या खेळाडूंच्या हाती 3 टीम्सच नशीब, 4 दिवसात क्लियर होईल प्लेऑफचा सीन

    IPL 2023 Playoff : फक्त 4 दिवस थांबा, कुठले आहेत ते चार दिवस?. आता प्रत्येक जय-पराजयामुळे प्लेऑफची चुरस वाढत जाणार आहे. गुजरात टायटन्स ही प्लेऑफमध्ये दाखल झालेली पहिली टीम आहे. आता चुरल उर्वरित तीन टीम्समध्ये आहे. वाचा सविस्तर…

  • 18 May 2023 10:19 AM (IST)

    मुंबई : जे.पी.नड्डा सिद्धीविनायकाच्या चरणी झाले लीन

    भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतले सिद्धीविनायक मंदिरात दर्शन

    जे.पी. नड्डा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा मुंबई दौरा महत्वाचा

  • 18 May 2023 10:14 AM (IST)

    किरेन रिजिजू कायदेमंत्रीपदावरून हटवलं, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

    कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल, किरेन रिजिजू यांच्याकडून कायदेमंत्रीपद काढून घेतलं.

    अर्जुनराम मेघवाल होणार नवे कायदामंत्री

  • 18 May 2023 10:09 AM (IST)

    मध्य प्रदेश : शाजापूरमध्ये बस आणि ट्रकची धडक, 4 ठार, 14 जखमी

    मध्य प्रदेशातील शाजापूर येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत.

  • 18 May 2023 10:02 AM (IST)

    नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळ घोटभर पाण्यासाठी महिलांची लांबवर पायपीट

    त्र्यंबकेश्वर जवळील गावातील महिलांना पाण्यासाठी लांबपर्यंत जावे लागत आहे.

    महिलांना 2 किलोमीटर पर्यंत चालत जावून पाणी आणावे लागत आहे.

    ऐन उन्हाळ्यात महिलांना करावा लागत आहे जीवघेणा प्रवास

  • 18 May 2023 10:01 AM (IST)

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपची बैठक

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपची बैठक

    बैठकीत कार्यकर्त्यांना जे पी नड्डा करणाय संबोधित

    बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    भाजपकडून परिसरात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे

  • 18 May 2023 09:51 AM (IST)

    नांदेडमध्ये पोलिसांकडून दंड वसूल

    स्वतःचे चार चाकी वाहन रस्त्यावर लाऊन रस्त्यावर दुचाकी लावणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याचा प्रकार नांदेड पोलीसांनी केला. पण तुमची गाडी का रस्त्यात आहे हे नागरिकांनी विचारताच पोलीस काही न बोलता आपली गाडी घेऊन पसार झाले.

  • 18 May 2023 09:40 AM (IST)

    अडीच किलोचा आंबा

    सोलापुरात तब्बल अडीच किलोचा आंबा, आंबा महोत्सवात विक्रीस आलाय आणि त्या आंब्याचं शेतकरी राजाने नामकरण करत चक्क ‘ शरद पवार ‘ असं नाव ठेवलं आहे. दूरवरून पाहिल्यानंतर एखादा मोठा शहाळच असल्याचा भास प्रत्येकाला होईल अशी या आंब्याची रचना आहे.

  • 18 May 2023 09:30 AM (IST)

    सैन्यदलासाठी एक लाख लिटर बॉटल रक्त जमा करणार

    डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या महारक्तदान यात्रेस कराडमधून प्रारंभ

    कराड ते पुणे येथील आर्मी हॉस्पिटल अशी होणार रॅली

    राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील दाखवणार रॅलीला हिरवा झेंडा

    सैन्यदलासाठी एक लाख रक्त बॉटल जमा करण्याचा संकल्प

  • 18 May 2023 09:23 AM (IST)

    नाशिकमध्ये पाण्यासाठी पायपीट

    नाशिक जिल्ह्यात घोटभर पाण्यासाठी करावी लागते 2 किलोमीटर पायपीट

    गाळून प्यावं लागत डबक्यातील घोटभर पाणी

    त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाण्यासाठी महिलांची परवड

    हेदआंबा गावातील महिलांना पहाटेच्या अंधारात करावा लागतोय लेकरांना घेऊन पाण्यासाठी प्रवास

  • 18 May 2023 09:15 AM (IST)

    संभाजीनगरात पाईपलाईन फुटली

    छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर पैठण रोड वरती घडली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या एका पोकलेनचा धक्का लागल्यामुळे ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर बारा ते पंधरा फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे जायकवाडी येथील पंप हाऊसमधून शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा बंद करावी लागली.

  • 18 May 2023 09:08 AM (IST)

    बैलगाडा शर्यतीवर आज निकाल

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बैलगाडा शर्यतीचा घाट अवलंबून आहे. गोवंश राखण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे आणि तो आमच्याच बाजूनं लागेल, असा विश्वास आयोजक रणजित जाधव यांनी व्यक्त केली. बैलगाडा शर्यतीचा आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

  • 18 May 2023 09:00 AM (IST)

    कोल्हापूर | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांचं पावणेदोन कोटींचे दान

    दानपेटीतील महिन्याभरातील रकमेची केली मोजदाद

    उन्हाळी सुट्टी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर दानपेटीतील रकमेची केली मोजदाद

    तीन दिवसांत सहा दान पेट्यांमधील रक्कम मोजली

    दानपेटीत रोख रकमेसह परकीय चलन आणि काही दागिनेही मिळाले

    परकीय चलन आणि दागिन्यांचे मूल्यांकन एकत्रित केलं जाणार

  • 18 May 2023 08:58 AM (IST)

    पंजाब | अंबालामधील भाजप खासदार रतनलाल कटारिया यांचं निधन

    चंदीगडमध्ये सुरू होते उपचार

  • 18 May 2023 08:55 AM (IST)

    कोल्हापूर | गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा मंजूर

    संचालक मंडळाच्या बैठकीत दिला राजीनामा

    25 मे ला होणार नवीन अध्यक्षांची निवड

    अरुण डोंगळे होणार गोकुळचे नवे अध्यक्ष

    विभागीय उपनिबंधक महेश कदम निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार

  • 18 May 2023 08:51 AM (IST)

    नाशिक | मस्जिदमध्ये हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी द्या

    महंत अनिकेतशास्त्री महाराज यांची मागणी

    मागणी मान्य नसेल तर नौटंकी बंद करा

    त्र्यंबकेश्वर वादानंतर साधू महंत आक्रमक

  • 18 May 2023 08:42 AM (IST)

    कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला

    सिद्धरामय्याच असणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

    20 तारखेला होणार शपथविधी

    डिके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह सहा खाती दिली जाणार, सूत्रांची माहिती

  • 18 May 2023 08:26 AM (IST)

    सोलापूर, बार्शी आणि करमाळा बाजार समितीच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

    तिन्ही बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादी सादर करण्याचे सहाय्यक निबंधकांना आदेश

    सोलापूर, बार्शी आणि करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाचे मुदत 15 जुलै रोजी संपणार

    पुढील 45 दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली

    सोलापूर बाजार समितीच्या संचालकांनी एक वर्षांची मुदतवाढ मिळावी यासाठीचा प्रस्ताव पणन खात्याला सादर

  • 18 May 2023 08:17 AM (IST)

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपची बैठक

    बैठकीत कार्यकर्त्यांना जे. पी. नड्डा करणार संबोधित

    बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    भाजपकडून परिसरात जोरदार वातावरण निर्मिती

  • 18 May 2023 08:06 AM (IST)

    नाशिक | डॉ. प्रदीप कुरुलकरांचे नाशिक कनेक्शन ?

    हनी ट्रॅपप्रकरणी डॉ. कुरुलकरांना एटीएसकडून अटक

    मुंबई एटीएसकडून नाशिक एटीएसला दोन मोबाईल देण्यात आल्याची माहिती

    नाशिक एटीएसकडून या दोन मोबाईलचा सखोल तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती

    नाशिक कनेक्शनमधून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष

  • 18 May 2023 07:57 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात 4 महिन्यात 214 अपघात, तबल 117 जणांचा मृत्यू

    अतिवेग, बेदरकारपणा ठरत आहे अपघातास कारणीभूत, पोलिसाकडून जनजागृती

    120 दिवसांत झालेल्या अपघातात 177 जण झाले आहेत जखमी

    सर्वाधिक अपघात अचलपूर उपविभागात

  • 18 May 2023 07:49 AM (IST)

    पुण्यात आज भाजपच्या कार्यकारिणीची बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12 वाजता पुण्यात दाखल होणार

    जे पी नड्डा हे आज आमदार, खासदार, मंत्र्यांची घेणार बैठक

    बैठकीत भाजपा काय रणनीती आखते पाहावं लागेल

  • 18 May 2023 07:48 AM (IST)

    अकोल्यात संवेदनशील भाग वगळता शहरातील जमावबंदी उठवली

    तर दंगलग्रस्त भागातील जुने शहर आणि डाबकी रोड पोलीस स्टेशन येथील संचारबंदी कायम

    शहरातील जमाबंदी उठल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला

    13 मेच्या मध्यरात्री झाली होती शहरात दगडफेक आणि जाळपोळ

    पोलिसांनी लावले होते 144 कलम

    आतापर्यंत 300 जणांवर कारवाई करण्यात आली असून 150 जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे

    कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील wathsapp ग्रुप ऍडमिनला नोटीस बजावण्यात आल्या आहेत

  • 18 May 2023 07:45 AM (IST)

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार का?

    आज पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी

    स्वातंत्र्यीवर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी केली होती याचिका

    आज पुणे न्यायालयात होणार सुनावणी

  • 18 May 2023 07:11 AM (IST)

    गर्मीवर उपाय म्हणून चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

    चालत्या दुचाकीवर बादली आणि मग्गा घेऊन अंघोळ करतानाचा इन्स्टा रिल व्हिडीओ झाला होता व्हायरल

    उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून भादंवि 279 आणि मोटार वाहन कायदा 129 अन्वये गुन्हा दाखल

    टीव्ही 9 मराठीने प्रसारित केली होती व्हायरल व्हिडीओची बातमी

    बातमीची दखल घेत पोलिसांकडून रिल बनवणाऱ्या आदर्श शुक्ला आणि एका तरुणीविरोधात केला गुन्हा दाखल

  • 18 May 2023 07:09 AM (IST)

    कल्याण APMC मार्केटच्या गोडाऊनला भीषण आग

    आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

    गोडाऊनचे शटर तोडून अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आगीवर आणले नियंत्रण

    गोडाऊन बंद असल्याने जीवित हानी टळली, मात्र साहित्य जळून खाक

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

  • 18 May 2023 07:02 AM (IST)

    कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया, तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार

    20 मे रोजी दुपारी 12.30 वाजजात बंगळुरू येथे नव्या सरकारचा शपथविधी होणार

    काँग्रेसने आज 18 मे रोजी पक्षाच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक बोलावली

    बंगळुरू येथे संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार

Published On - May 18,2023 7:00 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.