Maharashtra Breaking Marathi News Live | लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप आहे- नाना पटोले
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.
मुंबई : जुहू चौपाटीवर मेगा बीच क्लीन इव्हेंट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. पुण्यातून राजस्थानच्या बीकानेरसाठी विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू होणार. येत्या 30 मेपासून धावणार विशेष रेल्वे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय कामगार सेनेला दणका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा टॅक्सी युनियन मार्फत विमानतळात प्रवेश. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह खूपच सुंदर; अभिनेत्री मुक्ता बर्वे
नवी मुंबई :
काही काही नाट्यगृहाची अवस्था खूपच दयनीय
मात्र नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह खूपच सुंदर असं आहे
या नाट्यगृहाची प्रशंसा अभिनेत्री नाटककार मुक्ता बर्वे यांनी केली
तसेच या नाट्यगृहाचे बांधकाम महापालिकेत विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालं
या नाट्यगृहाच बांधकाम भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते
हे महापालिकेचे नाट्यगृह असले तरीदेखील अद्यापही सुंदर असं आहे
नाट्यगृहाची प्रशंसा कलाकार मंडळी देखील करत आहे
-
वाकोला सुप्रीमो क्रीडा नगरी चषक मुळे गेट नंबर 8 विमानतळ येथे वाहतूक कोंडी
मुंबईः
वाकोला सुप्रीमो क्रीडा नगरी चषक मुळे गेट नंबर 8 विमानतळ येथे वाहतूक कोंडी
विमानतळ गेट 8 या परिसरात सर्वत्र मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे
सुप्रीमो क्रीडा नगरी चषकमुळे सर्व क्रीडा प्रेमींच्या वाहने बाहेरच लागल्याने वाहतूक कोंडी
-
-
पुण्यातील एनआयबीएम रोडवर भीषण अपघात
– खाजगी ब्रेक फेल होऊन इतर वाहनांना बसची धडक,
– यामध्ये कार, रिक्षा आणि टेम्पोचे मोठं नुकसान,
– यामध्ये दोघजण गंभीर जखमी झाल्याची माहिती
– अपघातामुळे एनआयबीएम रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी
-
केडगाव इंडस्ट्रिज एरियामध्ये तेल कंपनीला भीषण आग
खाद्यतेल बनवणाऱ्या साईराज इंडस्ट्रीज या कंपनीत अचानक लागली आग
महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
स्थानिक नागरिक, अग्निशामक दल आणि पोलिसांकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न
-
गडचिरोली जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात असताना मोठा अपघात
अपघातात जवळपास दहा मजूर गंभीर जखमी इतर किरकोड
गंभीर जखमी असलेल्या मजुरांना ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे उपचार सुरू
सिरोंचा तालुक्यातील लंबडपल्ली पासून तेलंगाना राज्यातील चंन्नुर येथे जात असताना झाला अपघात
-
-
सोलापूर : काँग्रेसचे मेळावे होतील
जिल्हा पातळीवर त्यानंतर तालुका पातळीवर काँग्रेसचे मेळावे होतील
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
दंगली नकोत हा काँग्रेसचा पहिला मुद्दा आहे
शेतकऱ्यांच्या जखमवेर मीठ चोळण्याचे काम सुरू
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर टीका
-
MI vs SRH IPL 2023 Live Score : रोहितची हाफ सेंच्युरी
रोहित शर्माने 34 चेंडूत हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्याने चौकार मारुन अर्धशतक झळकावलं. 12 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 132 धावा झाल्या आहेत.
-
नागपूर : आरएसएसच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या तृतीय संघशिक्षा वर्गातील स्वयंसेवकांचे पथसंचलन
देशभरातील विविध राज्यातून आलेले ६८२ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी होणार
संघाच्या रेशीमबाग स्मृतीभवन परिसरातून पथसंचलनाला सुरुवात
नागपुरातील रेशीमबाग, तिरंगा चौक परिसरातून पथसंचलन
-
सोलापूर : मनसे कार्यकर्त्यांना अटक
मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डेसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अटकेच्या निषेधार्थ मोडनिंब शहर कडकडीत बंद
गाडी रस्त्याच्या बाजूला करण्याच्या कारणावरून वाद
पोलीस आणि मनसे जिल्हाध्यक्ष गिड्डे यांच्यामध्ये वाद
घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर
-
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण
धरमपेठ महिला सोसायटीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
महिलांच्या मल्टिस्टेट सोसायटीचे फडणवीसांकडून कौतुक
महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशात सोसायटीचा विस्तार
-
हा विजय दक्षिणेतील प्रवेशद्वार ठरेल
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा दावा
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु
निवडणुकीदरम्यान जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार
#WATCH हमारी एक ही प्राथमिकता है कि हमने कर्नाटक के लोगों से जो वादा किया था, उसे लागू करना है…हम जानते हैं कि लोग हमारी तरफ देख रहे हैं(2024 चुनाव को लेकर)। हम दक्षिण से भारत की तरफ का एक प्रवेश द्वार बनना चाहते हैं: कर्नाटक के उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, बेंगलुरु pic.twitter.com/ohkvYU1Ud3
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023
-
2 हजारांची नोट काळा पैसा साठवण्यासाठीच काढली होती
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपवर निशाणा
भाजप देशात धार्मित तेढ निर्माण करत आहे
काळा पैसा साठविण्यासाठी दोन हजारांची नोट आणली
-
भाजप निवडणुकांना घाबरत आहे
अंबादास दानवे यांचा भाजपवर निशाणा
घोडामैदान जवळच मुंबईची जनता जागा दाखवेल
भाजपचं महाराष्ट्रातील नेतृत्व कुचकामी-दानवे
-
अरविंद केजरीवाल घेणार ठाकरे आणि पवार यांची भेट
दिल्लीचे मुख्यमंत्री मुंबईत दाखल होणार
24 आणि 25 मे रोजी अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर
-
नोटा बदलण्यासाठी भरावा लागणार अर्ज
23 मे 2023 रोजी बँकांमध्ये जाऊन नोटा बदलता येतील.
एका दिवशी 2,000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलता येतील.
बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरुन द्यावा लागेल
हा अर्ज बँकेत उपलब्ध असेल.
ग्राहकाला बँकेतच तो भरुन देता येईल.
अथवा घरी जाऊन भरुन पुन्हा बँकेत येता येईल
Facility of exchange of Rs.2000/- denomination Bank Notes to all members of the public upto a limit of Rs.20000/- at a time will be allowed without obtaining any requisition slip
No identity proof is required from the tenderer at the time of exchange – @TheOfficialSBI pic.twitter.com/fQqTRzqQNh
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) May 21, 2023
-
दोन टर्ममध्ये 1544 किमी रेल्वेची नवीन लाईन
मोदी सरकारचा दावा
भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे
अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतीय रेल्वेचा क्रमांक
दर दिवशी भारतात 14.4 किमी लोहमार्गाचे काम होते पूर्ण
Indian Railways is the fourth largest railway system in the world, after the US, Russia, and China. Tracks are being laid on an average of 14.4 km daily
During the years 2014 to 2023, 1544 km of new lines, gauge conversion and doubling work, falling fully or partially in the… pic.twitter.com/l5dydjdpJC
— PIB India (@PIB_India) May 21, 2023
-
समीर वानखेडे यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी
वानखेडेंनी तपासाता सहकार्य न केल्याचा दावा
वानखेडे यांची सीबाआयने केली चौकशी
तर तपासात सहकार्य केल्याचा वानखेडे यांचा दावा
-
सोलापूर आणि माढ्याच्या जागेवर काँग्रेसचा दावा
कुणीही काही बोलेले, पण तुम्ही तयारी ठेवा
या दोन्ही जागा काँग्रेस निवडून आणणार
नाना पटोले यांनी केला दावा
-
राज्यात 50 टक्के कमिशनचा रेट सुरु आहे
रोहित पवार यांचा राज्य सरकारवर घणाघात
हा पैसा कोणापर्यंत जातोय, हे माहित नाही
हा पैसा नेत्यांना फोडण्यासाठी केला जात असल्याचा केला आरोप
-
अडचणीच्या काळात माझ्याकडे येतात, मत त्यांना देतात
राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारला सवाल
कामावेळी माझ्याकडे, मतदानावेळी कुठे जाता
राज ठाकरे यांनी थेट विचारला प्रश्न
यापुढे असे होणार नाही, आपण पक्षाच्या मागे
शेतकऱ्यांनी दिले आश्वासन
-
स्टोअर इन्चार्जला पोलिसांनी केली अटक
राजस्थानमध्ये सापडल्या होत्या दोन हजारांच्या नोटा
जयपूरच्या योजना भवनातील कपाटात सापडल्या होत्या नोटा
स्टोअर इंचार्ज वेद प्रकाश यादव याला झाली अटक
सीसीटीव्ही फुटेजमध्ये यादव बॅग ठेवताना सापडला
बॅगेत कोट्यवधी रुपये आणि एक किलो सोने सापडले
योजना भवन के डीओआईटी विभाग में शुक्रवार को करोड़ों की नकदी मिलने और 1 किलो सोना मिलने की घटना में पुलिस ने सूचना प्रौद्योगिकी विभाग के ज्वाइंट डायरेक्टर और स्टोर इंचार्ज वेद प्रकाश यादव को गिरफ्तार किया है। पुलिस द्वारा खंगाले गए सीसीटीवी फुटेज में वेद प्रकाश यादव अलमारी खोलकर… pic.twitter.com/bM8qzhgwcH
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023
-
NIA ला मोठं यश
नक्षलवाद्याला झारखंडमध्ये केली अटक
खतरनाक नक्षलवादी दिनेश गोप ऊर्फ कुलदीप यादवला अटक
यादव हा पिपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचा प्रमुख
राष्ट्रीय जांच एजेंसी ने झारखंड के प्रतिबंधित नक्सली संगठन पीपुल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (पीएलएफआई) के भगोड़े सुप्रीमो दिनेश गोप उर्फ कुलदीप यादव को गिरफ्तार किया है। उसे नई दिल्ली में गिरफ्तार किया गया: NIA
— ANI_HindiNews (@AHindinews) May 21, 2023
-
The Kerala Story: ‘या’ कारणामुळे चित्रपटगृह मालकांना मिळतेय धमकी, भाजप नेत्याचा मोठा दावा
‘यापेक्षा आणखी वाईट काय… ‘, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा प्रकरणात चित्रपटगृह मालकांना मिळतेय धमकी,
भाजप नेत्याचा खळबळजनक दावा… वाचा सविस्तर
-
समीर वानखेडे यांची आजची चौकशी CBI संपली
समीर वानखेडे यांची सलग २ दिवस CBI चौकशी
‘सत्यमेव जयते’ चौकशीनंतर वानखेडेंची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे अडचणीत
-
शेतात सारस पक्षाचं घरटं असल्याच शेतकऱ्यांना मिळणार १० हजार रुपये
राज्य सरकार शेतकऱ्यांना १० हजार रुपये देणार…
सुप्रिम कोर्टाचे सारस संवर्धनासाठी प्रकल्प उभारण्याचे आदेश
कोर्टाचा राज्य सरकारला ६२ कोटींचा प्रकल्प उभारण्याचा आदेश
-
राज्यात भाजपमध्ये लवकरच फेरबदल होणार – जे पी नड्डा
अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलणार, या महिना अखेरपर्यंत भाजपमध्ये खांदेपालट- जे पी नड्डा
भाजप आता जिल्हाला दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करणार – जे पी नड्डा
जे पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल – जे पी नड्डा
-
राज ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना भेटणार
राज ठाकरे येत्या २ ते ३ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार
तुमची पिळवणूक करणाऱ्यांनाच तुम्ही मतदान करता – राज ठाकरे
-
कर्नाटकातील लोकांनी सांगितले की, यापुढे भाजपचे सरकार राज्यातच नव्हे तर गल्ली बोळातही येणार नाही – सुशीलकुमार शिंदे
बदलाचे वारे वाहण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे – सुशीलकुमार शिंदे
नाना पटोले हे खूप फिरत आहेत – सुशीलकुमार शिंदे
मी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होतो मात्र मी एवढा फिरत नव्हतो – सुशीलकुमार शिंदे
-
मला सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार निवडून आणायचे- नाना पटोले
भाजपच्या विचारला माफ करण्याची वेळ नाही, नाहीतर तुम्ही संपाल
महाराष्ट्रात मागील काही दिवसात 9 धार्मिक दंगली झाल्या
अकोल्यात 2 हजार पोलिस आहेत मात्र दंगल सुरु झाल्यावर तेथील पोलिस गायब होते
दोन तास तिथे पोलीस नव्हते. म्हणून मी पोलीस महासंचालकांना विचारले की पोलीसांवर कोणाचा दबाव आहे
मूळ प्रश्न बाजूला राहावेत म्हणून दंगली घडवतात
देशात कृत्रिम महागाई आणली आहे.
तुमच्या खिशातून पैसे काढायचे आणि निवडणुकीत तुम्हालाच वाटायचे
नरेंद्र मोदी हा खरा बनिया आहे. केंद्रातील सरकार हे बनिया वृत्तीचे आहे
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा लोकसभेला उमेदवार राहतील
तुम्ही त्यांना निवडून आणणार का?
मला सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणायचे आहेत
इथे कोणी भुट्टा येईल आणि काहीही बोलून जाईल हे खपवून घेणार नाही.
आमदार रोहित पवार यांना पटोलेंचा नाव न घेता टोला
मला सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार निवडून आणायचे.
-लोकांची पसंती ही काँग्रेस आहे -नाना पटोले
-
खोटारडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप आहे- नाना पटोले
एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपाल पदावर बसवले
राज्यपालाने आंबेडकर, शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या भाजपला सोडून आलात त्याबद्दल अशोक निंबर्गी यांचे स्वागत
मी मोदीसारखा खोटारडा माणूस नाही. मोदींनी सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापुरात शिवतो
मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केले
महाराष्ट्रातील कोळी समाज काँग्रेसच्या पाठीशी उभे करा, मी राज्यातील सर्व तलाव पूर्णतः मोफत करून देतो
सोलापुरात हुतात्मे, महात्मे आणि क्रांतिवीर आहेत
सोलापूरचे पूर्वीचे खासदार हे मोठ्या अंगठ्या घालून यायचे आणि लोकसभेत झोपत होते- नाना पटोले
-
निवडणुकीला आम्ही घाबरत नाही निवडणुकीला भारतीय जनता पार्टी घाबरते- अंबादास दानवे
मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या ही मागणी आम्ही करतोय
निवडणुका भारतीय जनता पार्टी काही तांत्रिक कारणाने पुढे निवडणुका पुढे ढकलते आहे
निवडणुकीला आम्ही घाबरत नाही निवडणुकीला भारतीय जनता पार्टी घाबरते
घोडा मैदान जवळ आहे किती निवडून येणार हे मुंबईची जनता निश्चित दाखवून देईल
कोणाला किती जागा मिळतील या बोलण्याला अर्थ नाही
महापालिकेच्या मैदानात तुम्ही यायची तयारी करा आम्ही तयारी केलेली आहे
नितेश राणे वर मला बोलायचं नाही
त्याचे उत्तर मी चॅनलवर देऊ शकत नाही, नितेश राणेंना उत्तर जिथे द्यायचे तिथे देईल
महाराष्ट्रातील नेतृत्व अकार्यक्षम, कुचकामी यांच्यामध्ये दम नाही.. ताकद नाही.. आणि त्यामुळेच केंद्राच्या नेतृत्वाला या ठिकाणी यावे लागते आणि आम्हीही त्यांची वाट बघत आहोत
भारतीय जनता पार्टीला बडवून चढवून दाखवण्याची सवय आहे- अंबादास दानवे
-
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आणि पोस्टिंग बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश चुकीचा- अरविंद केजरीवाल
सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आणि पोस्टिंग बाबत केंद्र सरकारचा
अध्यादेश चुकीचा अरविंद केजरीवाल यांचा आरोप
कोर्टासह महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
23 मे ला ममता बॅनर्जी 24 मेला उद्धव ठाकरे आणि 25 मे ला शरद पवार यांची भेट घेणार
या अध्यादेशाला राज्यसभेत थोपवण्यासाठी पक्षाच्या खासदारांनी प्रयत्न करावेत केजरीवाल वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार
सुप्रीम कोर्टासह संसदेतही अरविंद केजरीवाल अध्यादेशा विरोधात आक्रमक होणार
-
जरी काही त्रुटी असतील तर त्या दूर करू- उदय सामंत
रत्नागिरी येथील नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत अभिनेते भारत जाधव यानी व्यक्त केली नाराजी
भरत जाधव हे माझे चांगले मित्र आहेत.
त्यांनी फोन करून मला सांगितले असते तरी चाललं असते.
ते कलाकार असल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे
पण सभागृहाचा AC चालू होता पण तो कसा बिघडला की बिघडवला हे मी पाहतो.
मी त्यांच्याशी चर्चा करतो तो माझा मतदार संघ आहे आणि जरी काही त्रुटी असतील तर त्या दूर करू- उदय सामंत
-
कर्नाटकातील लोकांनी सांगितले की, यापुढे भाजपचे सरकार राज्यातच नव्हे तर गल्ली बोळातही येणार नाही- सुशीलकुमार शिंदे
कर्नाटकातील लोकांनी सांगितले की, यापुढे भाजपचे सरकार राज्यातच नव्हे तर गल्ली बोळातही येणार नाही
खूप चिडीने कर्नाटकातील जनतेने भाजपचे सरकार बनवले
बदलाचे वारे वाहण्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे
नाना पटोले हे खूप फिरत आहेत.
मी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होतो मात्र मी एवढा फिरत नव्हतो- सुशीलकुमार शिंदे
-
महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसचा झेंडा फडकवायचा प्रयत्न तुम्ही करताय
देशात परिवर्तनाची लाट देशात स्पष्टपणे दिसतेय
पुढील तीन राज्याच्या निवडणुकीत काय करायचे यांचा विचार करत आहेत
दोन हजाराची नोट फक्त काळा पैसा साठवूण ठेवण्यासाठी केली होती
मुळात तुम्ही दोन हजाराची नोट आणलीच कशासाठी?
सर्वसामान्य लोकांना दोन हजारची नोट वापरत नाहीत
भाजपचे लोक आता देशात धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका लढवायचा प्रयत्न आहे- पृथ्वीराज चव्हाण
-
मोदीला घालवले नाही तर लोकशाही घालवली जाईल- पृथ्वीराज चव्हाण
येणाऱ्या काही दिवसात तीन राज्याच्या निवडणूक आहेत
यातील तीन राज्ये आपण यापूर्वी जिंकलो होतो
मोदीला घालवले नाही तर लोकशाही घालवली जाईल
सरकार चालत नाही म्हणून प्रचंड कर्ज काढले जात आहे
आमचे सरकार असताना 470 रुपये सिलेंडरची किमंत होती आता 1100 रुपये किमंत केली
देशात प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरूय त्यामुळे देशात महागाई वाढत आहे- पृथ्वीराज चव्हाण
-
पाणी द्या नाहीतर विषप्राशन करण्यासाठी परवानगी द्या
खोनी वडवली गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी महिलांनी गावात काढला हंडा कळशी घेऊन निषेध
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहून विष विषप्राशन करण्याची मागितली परवानगी.
-
सोलापूर ब्रेकिंग: नसीम खान ( माजी मंत्री, काँग्रेस)
सोलापुरातील निर्धार महामेळाव्यातून नसीम खान यांची भाजपवर टीका
शिंदे साहेब यांनी देशाच्या लोकसभेत नेतृत्व करावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे.
हा महिन्यापासून भाजपचे नेते कर्नाटकमध्ये प्रयत्न करत होते
कधी हिजाब, कधी आरक्षण रद्द केले
पण जनतेने त्यांना धडा शिकवला
कर्नाटकात बजरंगबलीने भ्रष्टाचाराची नली तोडली
भाजपला फक्त सोलापूरच नव्हे तर राज्य आणि देशातून हद्दपार करायचे आहे
-
माझी जशी घुसमट होतेय तशीच आजच्या खासदारांच्या मनात घुसमट आहे
त्यांचा निधी खर्चायची सुविधा या दोन आमदारांनी ठेवलेली नाही- अशोक निबर्गी
कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाला धक्का लावला त्या प्रत्येक स्वाभिमानाचा हिशोब चुकता करणार आहे
अशोक निबर्गी ( भाजपचे माजी शहाराध्यक्ष)
-
मागील 7 वर्षांपासून पक्षात एकाधिकारशाही सुरूय- अशोक निबर्गी
त्याला कंटाळून मी भाजप पक्षातून बाहेर आलो
माजी महापौरांना सर्वात जास्त त्रास दिला मात्र आज तुमची जाहीर माफी मागतो
देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर करांना आवाहन केले की एकदा सत्ता द्या सोलापूरचा कायापालट करतो
मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही- अशोक निबर्गी
आत्ताची लोकशाही ही स्क्रिप्टेड लोकशाही आहे
भाजपला दोन खासदार निवडून दिले मात्र ते कधी आले आणि कधी गेले ते कळले नाही – अशोक निबर्गी
-
सोलापूर ब्रेकिंग: भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना मोठा धक्का
– भाजपतून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक निबर्गी यांची पक्ष नेतृत्वावर टीका
– भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा मोठा धक्का
– माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस मध्ये प्रवेश दिला यांचा आनंद
– अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्या विचाराने भारावलेले होतो
-
लोणावळा, पुणे: पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर लोणावळा एक्झिटला वाहतूक कोंडी
पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची प्रचंड कोंडी झालीय
सुट्ट्या संपवून आता नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाले असल्याने लोणावळा एक्झिट जवळ वाहतूक कोंडी झाली आहे
4 ते 5 किलोमीटर च्या मोठ्या रांगा एक्सप्रेस हायवेवर दिसून येत आहे. त्यामुळे सुट्ट्या संपवून घरी जाणाऱ्या नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे
-
सोलापूर ब्रेकिंग: आमदार प्रणिती शिंदे यांना आगामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद द्या
जय बजरंग बली तोडा दे भाजप की नली
आगामी लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हेच असावेत अशी आमची मागणी
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची सर्व काँग्रेस नेत्यासमोर मागणी
-
सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
सोलापूर भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
अशोक निंबर्गी हे प्रमोद महाजन यांच्यापासून भाजपत कार्यरत होते
मात्र आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
-
50% सवलत बसमध्ये बस मध्ये सीटवर बसायला जागा नसल्याने या हाणामारी झाल्याचं कळतं
जळगाव50% सवलत बसमध्ये बस मध्ये सीटवर बसायला जागा नसल्याने या हाणामारी झाल्याचं कळतं?बसमध्ये महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. -
बारामतीत खूप विकासकामे सुरू आहेत, लवकरच चित्र बदलेल दिसेल
अजित पवार –
– बारामतीत खूप विकासकामे सुरू आहेत, लवकरच चित्र बदलेल दिसेल
– जीवात जीव असेपर्यंत बारामतीकरांचं भलंच करणार
– नदी सुशोभीकरण करताना लावलेले भाले चोरीला गेलेत, एक भाला 100 रुपयाला विकला जातोय, तो विकून 2 दारूच्या चपटी घेतात,
– तसं करू नका, झाडं तोडू नका
-
जळगाव शहरात कमाल तापमान 43.2 अंशापर्यंत
जळगावात गेल्या आढवड्यापासून उष्णतेने कहर होत असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरात कमाल तापमान 43.2 अंशापर्यंत तर किमान तापमान 26.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोचले आहे त्यामुळे. सकाळी 9 वाजल्यापासूनच अंगाला उन्हाचे चटके लागत आहे. दुपारनंतर तर सूर्यनारायण आग ओकत आहे. यामुळे दुपारीनंतर तर बाहेत पडणे कठीण झालं आहे.
-
नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर मी स्वतः त्यांच्याशी बोलेल – सुप्रिया सुळे
नाना पटोलेंना काही वाईट वाटलं असेल तर मी स्वतः त्यांच्याशी बोलेल – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सूळे यांची पटोलेंवर प्रतिक्रिया
दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते
आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामे यामध्ये खूप व्यस्त आहोत
शरद पवार साहेबांनी सांगितल आहे, की सामंजसपणाने आम्ही प्रश्न सोडवू
त्यामुळे आम्ही बोलण्याचा प्रश्न येत नाही
मोदींशिवाय भाजपकडे दूसरं कोणी नाही
मोदी सगळीकडेच जातात त्यात नवीन काय
मोदींचा महाराष्ट्रात काही परिणाम होईल का ? असं विचारताचं काळ ठरवेल असं उत्तर सुळेंनी दिलं
-
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यास केंद्र महत्त्वाचे – पृथ्वीराज चव्हाण
– सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे लोकार्पण संपन्न
– शहरातील अशोक चौक परिसरामध्ये बांधण्यात आले सुसज्ज अभ्यासिका केंद्र
– सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यास केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे
– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अस्लम शेख, नसीम खान, भाई जगताप यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले
-
बिबट्या अचानक समोर आल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शेती शिवारात शेतकऱ्यांना शेती काम करत असताना अचानक समोर बिबट्या दिसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे एक प्रकारे बिबट्याने दर्शन दिल्याचे चित्र दिसून आलं.
-
वृद्धाक्षम आज काळाची गरज निर्माण झाली आहे – अजित पवार
अजित पवार –
– पहिले दोन किंवा तीन अपत्य असायचे आता काहीजण एकावरच थांबतात
– मुलं परदेशात असतात मग जेष्ठ नागरिकांना एकटेपणा वाटतो अशावेळी वृद्धाक्षमाची गरज निर्माण होते
– भाजप – सेनेचे सरकार होते, त्यावेळी वृद्धाक्षमाची संकल्पना पुढे आली, पुढे आमच्या सरकारने त्याला प्रोत्साहन दिले
– वृद्धाक्षम आज काळाची गरज निर्माण झाली आहे,
-
32 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक कामं केलीत – अजित पवार
अजित पवार –
– मला 1991 साली तुम्ही खासदार केलं, त्यानंतर मला 6 महिन्यात आमदार व्हावं लागलं
– 32 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक कामं केलीत
– आज बारामतीमध्ये बाहेरचे लोकं जास्त आहेत, मात्र ते आल्यावर बारामतीकर होऊन जातात,
– बारामतीकर कधी भेदभाव करत नाही
– सर्वजाती धर्माना सोबत घेऊन जातो
-
माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख अमृत महोत्सव शुभारंभ सोहळा
माजी आमदार तथा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश देशमुख अमृत महोत्सव शुभारंभ सोहळा– माजी आमदार सुरेश देशमुख ७५ व्या वर्षात पदार्पण करत असल्यानं वर्षभर विविध कार्यक्रमांच आयोजन– केक कापून सुरेश देशमुख यांचा वाढदिवस साजरा करत दिल्या शुभेच्छा -
अजित पवारांनी घेतला कॅरम खेळण्याचा आनंद
– बारामती जेष्ठ नागरिक निवासात करमणूक केंद्राचे उदघाटन करताना अजित पवारांनी घेतला कॅरम खेळण्याचा आनंद,
– सुनेत्रा पवार आणि अजित पवार दोघांनी समोरासमोर बसून घेतला कॅरम खेळण्याचा आनंद,
– यावेळी अजित पवारांनी पहिल्याच डावात सोंगटी घातली आत
-
CSK IPL 2023 : MS Dhoni चा संयम सुटला, थेट अंपायरला नडला, कशावरुन घातली हुज्जत? Video Viral
CSK IPL 2023 : प्लेऑफआधी CSK च्या कॅप्टनचा मूड खराब झाला. धोनी आणि अंपायरमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी IPL मध्ये धोनीने अंपायर बरोबर हुज्जत घातली होती. वाचा सविस्तर….
-
IPL 2023 MI vs SRH Dream 11 : प्लेऑफमध्ये दाखल होण्याची मुंबई इंडियन्स समोरची दोन समीकरण कुठली?
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Dream 11 Prediction IPL 2023 : रनरेटच्या शर्यतीत RCB ला मागे टाकणं मुंबई इंडियन्ससाठी सोपं नसेल. त्यासाठी मुंबईला SRH वर मोठा विजय मिळवावा लागेल. वाचा सविस्तर….
-
आज देशात चित्र बदलतय – शरद पवार
हमाल मापाडी कामगारांचा मेळावा. शरद पवारांच्या हस्ते शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण
आज देशात चित्र बदलतय. काही शक्ती देशात जाती-धर्माच काम करत आहेत, त्या शक्तींच्या विरोधात आपण संघर्ष करत एकत्र आलं पाहिजे.
सत्तेचा उपयोग गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी नाही. जाती-धर्माच्या नावाने राजकारणासाठी होतोय. अनेक बाजारपेठा उद्धवस्त होत आहेत.
नगर जिल्हा पुरोगामी आहे. मात्र शेवगावमध्ये चार दिवस बंद पाळला. हे आपल्या समोर मोठं आव्हान आहे.
-
शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जमीन अधिग्रहित करताना विचारले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
मी ठाम पणे तुमच्या पाठीशी उभा, राज ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
-
शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
जमीन अधिग्रहित करताना विचारले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
मी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा, राज ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
-
राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना थेट सवाल, म्हणाले…
राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना राज ठाकरे यांनी केला प्रश्न
तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात?
ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना?
जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता
याचं भान तुम्ही ठेवायला हवं..
शेतकरी सगळे आता तुमच्यामागे (राज ठाकरे) असल्याचं शेतकऱ्यांनी दिले आश्वासन
येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी दिले आश्वासन
-
समीर वानखेडे यांची आज पुन्हा चौकशी
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा सीबीआय चौकशीसाठी रवाना
आर्यन खान प्रकरणात काल समीर वानखेडेची सीबीआयने तब्बल 5 तास चौकशी केली
आज सकाळी 11.00 वाजता पुन्हा एकदा त्यांना सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे
समीर वानखेडे हे त्यांच्या घरातून सीबीआय कार्यालयाकडे रवाना झाले आहेत
-
भाजप आमदार सीमा हिरे यांचा व्हीडिओ व्हायरल
भाजप आमदार सीमा हिरे यांना एका कार्यक्रमात धक्का लागल्याने त्या खाली पडल्या, व्हीडिओ व्हायरल
दोन दिवसांपूर्वी निरमा पावर 2023 इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ही घटना घडली
आमदार सीमा हिरे यांना धक्का लागल्याने त्या खाली पडल्या
मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे हे देखील कार्यक्रमाला होते उपस्थित
कार्यक्रम उद्घाटनाची फीत कापताना सीमा हिरे यांना धक्का लागल्याने त्या खाली पडल्या
-
शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज अहमदनगर दौरा
हमाल मापडी कामगारांच्या राज्यस्तरीय द्वि वार्षिक अधिवेशन कार्यक्रमाला लावणार हजेरी
कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकररावजी घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार
जिल्हा हमाल पंचायत कार्यालय मार्केट यार्ड येथे कार्यक्रमाचं आयोजन
कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू, कार्यक्रम स्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त साईनाथ
राज्यभरातून हमाल, माथाडी कामगार कार्यक्रमाला हजेरी लावणार
-
राज ठाकरे यांचा नाशिक दौरा, आज काय घडामोडी? पाहा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आज तिसरा दिवस
ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
मुंबई नाशिक महामार्गावरील एका हॉटेलमधे होत आहे बैठक
राज ठाकरे बैठकीसाठी दाखल
जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी देणार निवेदन
-
माझ्याकडेही मंत्रिपदासाठी पैश्याची मागणी झाली – आमदार कृष्णा खोपडे
पैश्यांच्या बदल्यात मंत्रीपदासाठी खोपडेंना फोन
जे. पी. नड्डा यांचा आवाज काढून फोनवर पैसे मागीतल्याचा आरोप
दिल्लीतून शर्मा नावाच्या व्याक्तीचा फोन आल्याचा आमदार खोपडे यांचा दावा
-
काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये महामेळावा
सुशीलकुमार शिंदे, पटोले, अशोक चव्हान उपस्थित राहणार
भाजप, MIM, राष्ट्रवादीचे काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सतर्क
-
भाजपच्या मुंबई कार्यकारणीची आज महत्त्वाची बैठक
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
भाजपच्या मुंबई कार्यालयात थोड्याच वेळात बैठक पार पडणार
बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणूकीच्या रणनीतीवर चर्चा होणार
-
आर्यन आणि इतर आरोपींच नाव वगळण्यात आल्याचा वानखेडेंचा आरोप
समन्स न बजावता संजय सिंग यांनी आर्यन, शाहरूखला बोलावलं
सल्लागार जापान बाबूंनी कलमही सांगीतले होते, वानखेडेंची माहिती
2 जून 2022 रोजी जापान बाबूंनी तसं फोनवरून कळवलं असल्याची माहिती
-
महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादीच मोठा भाऊ- अजित पवार
जागा वाटवाआधी अजित पवारांचं मोठं वक्तव्य
ज्याची ताकद जास्त त्यालाच महाविकास आघाडीत अधिक महत्त्व – अजित पवार
आम्ही मोठे होतो तेव्हा गर्व केला नाही, त्यांनी देखील करू नये- नाना पटोले
-
स्पष्टच सांगतो भाकरी फिरवावी लागणार- अजित पवार
सुरूवात आमच्यापासून करणार – अजित पवार
नवीन लोकांना संधी देणार- अजित पवार
वापरून सोडून देणे ही भाजपची सवय- सुषमा अंधारे
आमच्या 40 भावंडांसोबतही तेच होणार- सुषमा अंधारे
-
बारसू रिफायनरीसंदर्भात 30 तारखेला पूण्यात बैठक
सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर यांनी संघटनांची बैठक बोलावली
जवळपास 40हून जास्त संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार
एस एम जोशी सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
-
इमामपूर जंगलात वणवा
नगर तालुक्यातील बहिरवाडी, इमामपूर जंगलात वणवा
शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक
वनविभाग तसेच वनमित्र पथकाच्या वतीने संपूर्ण रात्र वणवा विझवण्यासाठी प्रयत्न
तर सध्या आग आटोक्यात आणण्यात यश
अनेक जंगली प्राण्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता
-
नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल
नाशिकमधील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल
लग्न सोहळ्यात पारंपरिक वाद्यांवर झिरवाळ यांनी धरला ठेका
यापूर्वी देखील झिरवाळ यांचा डान्स झाला होता व्हायरल
-
शेतकरी घेणार राज ठाकरेंची भेट
नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात शेतकरी घेणार राज ठाकरे यांची भेट
कर्ज भरण्यासाठी बँकेकडून दिलासा मिळण्याची करणार मागणी
काही दिवसांपूर्वी देखील शेतकऱ्यांनी घेतली होती राज ठाकरे यांची भेट
मोठ्या थकबाकीदारांना जिल्हा बँक पाठीशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार; मात्र वेळ देण्याची मागणी
-
सांगलीत फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक
सांगली शहरातील रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास विशिष्ठ कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सहा जणांची फसवणूक केली. तब्बल ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची सहा जणांची फसवणूक करणाऱ्या चौघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
-
बारसू रिफायनरीप्रश्नी बैठक
बारसू रिफायनरीप्रश्नी 30 तारखेला पुण्यात बैठक
सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर यांनी संघटनांची बोलावली बैठक
जवळपास 40 पेक्षा जास्त संघटनांचे प्रतिनिधी राहणार बैठकीला उपस्थित राहणार
एस एम जोशी सभागृहात बैठकीचं आयोजन
-
योगेश खैरेंचा आचार्य तुषार भोसलेंना टोला
मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंचा आचार्य तुषार भोसलेंना टोला
हिंदू धर्माचा सगळा ठेका काय आचार्य तुषार भोसलेसारख्यांना दिलेला नाही
कट्टर हिंदुत्ववादी घरात राजसाहेब ठाकरेंचा जन्म झाला आहे
सोईनुसार हिंदुत्व वापरणाऱ्यांनी स्वतःची कमकुवत बुद्धी आणि दृष्टी सुधारून घ्यावी.
-
बोगस सर्टिफिकेट, दोघांना अटक
बोगस सर्टिफिकेट वाटणाऱ्या टोळीचा पुणे आर्थिक गुन्हे शाखेनं केला पर्दाफाश
दोन बड्या एजंटांना घेतलं ताब्यात
स्टेट ओपन स्कूल स्थापन करून पैसे घेऊन जवळपास 2 हजार 739 प्रमाणपत्र वाटल्याचा प्रकार
जमाल शेख आणि महेश विश्वकर्मा असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची नावं आहेत
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय
-
काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री सोलापुरात
काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आज काँग्रेसचा निर्धार महामेळावा होणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे नेते मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
-
शेतकऱ्यांचे आंदोलन
चांदवड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गवर रस्ता रोको आंदोलन केले.
-
धोकादायक पद्धतीने लेन कटिंग करणाऱ्या एक हजार 803 वाहनांवर दंडात्मक कारवाई
पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे- मुंबई महामार्गावर धोकादायक पद्धतीने लेन कटिंग करणाऱ्या एक हजार 803 वाहनांवर दंडात्मक कारवाई
डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत लेन कटिंग करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर 8 लाख 40 हजार 200 रुपये इतका दंड
तसेच गेल्या चार महिन्यांत वेग मर्यादा ओलांडणाऱ्या तीन हजार 771 वाहनांवर देखील मोठी दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकांची विशेष कारवाई
बेशिस्त वाहन चालकांवर विशेष लक्ष
-
नाशिक | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आज तिसरा दिवस
आज देखील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे करणार चर्चा
आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज ठाकरे, अमित ठाकरे नाशिकमध्ये
दोन दिवसांपासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडून झाडाझडती
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर झाडू मारणाऱ्या सफाई कामगारांची केली विचारपूस
G-20 च्या कार्यक्रमातून निघाल्यानंतर जुहूमध्ये रस्त्यावर गाडी थांबवून केली विचारपूस
-
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या मुलाच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालयातला प्रकार
शुक्रवारी सायंकाळी जयकर वाचनालयात घडली घटना
सतत छेड काढत असल्याच्या कारणाने मुलीने विद्यापीठात शिकणाऱ्या मुलाच्या डोळ्यात फेकली मिरचीची पूड
-
विरोधीपक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
बारामती दौऱ्यात अजित पवार विविध विकासकामांची पाहणी करणार
अजित पवार बारामतीत घेणार जनता दरबार
-
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाणार
दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकाने काल समीर वानखेडेंची सुमारे 5 तास केली चौकशी
आज पुन्हा एकदा समीर वानखेडे हे सकाळी 10 च्या सुमारास सीबीआय कार्यालयाकडे होणार रवाना
-
पुणे शहरात शुक्रवारी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याची तक्रार
पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा असतो बंद
शुक्रवारी होतो कमी दाबाने पाणीपुरवठा
मात्र शनिवारीही काही भागात नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास
शनिवारीही काही भागात कमी पाणी न मिळाल्याची नागरिकांची तक्रार
शिवाजीनगर गावठाण, मुंढवा, प्रभात रस्ता, केशवनगर या भागात आलं नाही पाणी
-
नाशिक | नाशिकरोड येथील नोट प्रेसला तीन महिन्यांत पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छपाईचे उद्दिष्ट
एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटांची झाली छपाई
2 हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याने पाचशे रुपयांच्या नोटांची वाढणार मागणी
इतरही नोटांची छपाई सुरू राहणार
-
नाशिक | दरपत्रक लावण्यासाठी 668 खाजगी रुग्णालयांना महापालिकेचे स्मरणपत्र
प्रत्येक खाजगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचा आहे नियम
शहरातील 668 रुग्णालयांना मनपाने पाठवले स्मरणपत्र
नागरिकांना टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
-
नाशिकमध्ये लाचखोर जिल्हा हिवताप अधिकाऱ्याकडे आढळले 81 तोळे सोने
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केला संपूर्ण मुद्देमाल
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांच्यासह दोन जणांनी मागितली होती 10 हजार रुपयांची लाच
रजेच्या कालावधीतील वेतन काढून देण्यासाठी तक्रारदार याने केला होता अर्ज
-
शिवडी – न्हावाशेवा सागरी प्रकल्पाचे 21.81 किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण
या सेतूवरून वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे केले आयोजन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित राहणार
मुख्यमंत्री सागरी सेतूवरून वाहनाने प्रवासही करणार
एमएमआरडीएने 9 मे रोजी पारबंदर प्रकल्पातील शेवटच्या 70 वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे (पोलादी कमान) काम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता
-
धरणांत पुरेसा पाणीसाठा, महाराष्ट्राला चिंता नाही. राज्यातील धरणांमध्ये सध्या 32 टक्के पाणीसाठा
पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईची चिंता नाही
नागपूर विभागातील धरणांमध्ये 40 टक्के पाणीसाठा
कोकण विभागातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा
अमरावती विभागातील धरणांमध्ये 41 टक्के पाणीसाठा
पुणे विभागात 23 टक्के पाणीसाठा असल्याने थोडी चिंता
-
अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार सोहळा संपन्न
जयंत सावरकर यांना जीवनगौरव पुरस्कार
तर श्रीधर फडकेंचा कारकीर्द गौरव पुरस्कारानं सन्मान
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींच्या वतीनं फेस्टिव्हलचं आयोजन
-
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर भारतीय कामगार सेनेला दणका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा टॅक्सी युनियन मार्फत विमानतळात प्रवेश
मोठ्या संख्येत टॅक्सी ड्रायव्हर उपस्थित होते
किरण पावसकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रहार, पाकिट सेना असा केला उल्लेख
मुख्यमंत्रीच परिवहन मंत्री असल्याचीही दिली ग्वाही
एयरपोर्टवर टॅक्सी चालकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे दिले आश्वासन
-
पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेच्या कचरा डेपोला लागली आग
पुणे जिल्ह्यात इंदापूर शहरातील ज्योतिबा माळ परिसरात आहे हा डेपो
इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोला शनिवारी रात्री उशीरा पुन्हा आग लागली
सातत्याने असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय
-
जुहू चौपाटीवर मेगा बीच क्लिनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोहीमेत भाग घेणार
जी -20 परिषद अंतर्गत केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत आयोजित मेगा बीच क्लीन इव्हेंट
मुंबईतील जुहू चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा थोड्याच वेळात आगमन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा बीच क्लीन इव्हेंट कार्यक्रमात लावणार हजेरी
Published On - May 21,2023 7:07 AM