Maharashtra Breaking Marathi News Live | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार?

| Updated on: May 26, 2023 | 7:01 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार?
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : आज इयत्ता 12 वीचा निकाल आहे. दुपारी हा निकाल सर्व विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. तीन देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर. के. चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्रीय समिती पक्षाची महाराष्ट्रात सदस्य मोहीम सुरू. सदस्य नोंदणीसाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आज विरारमध्ये. विरार पूर्व येथील खार्डी गावातील मैदानावर होणार गाण्यांचा कार्यक्रम. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 May 2023 12:08 AM (IST)

    कोल्हापूरातील या शहराला परिवहन खात्याने दिली नवी ओळख; MH 51…

    इचलकरंजी/कोल्हापूर :

    इचलकरंजी शहराची नवीन ओळख परिवहन खात्याने MH 51 मंजुरी दिली

    शहरात लवकरच परिवहन खाते होणार सुरू

    आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश

    महाराष्ट्र राज्य मंत्रालयातून निघाला जीआर

    शिंदे-फडणवीस सरकारचे इचलकरंजीकरांना एका वर्षात दोन गिफ्ट

    इचलकरंजी महानगरपालिका व परिवहन खाते मंजूर केल्यामुळे नागरिकांतून शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक

    खासदार धैर्यशील माने यांनी महापालिका मंजूर करून आणली

    आमदार प्रकाश आवाडे यांनी परिवहन खाते मंजूर करून आणले

  • 25 May 2023 11:27 PM (IST)

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षांवरील गोळीबार प्रकरणात 2 संशयित ताब्यात

    चंद्रपूर :

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील गोळीबार प्रकरणात आरोपींनी वापरलेली बंदूक, गाडी जप्त…

    मूल-नागपूर मार्गावरील एका शेतात आरोपींनी लपवून ठेवली होती बंदूक

    जप्त करण्यात आलेली बंदूक गावठी बनावटीची असल्याची प्राथमिक माहिती

    तर चंद्रपूर शहारातून जप्त करण्यात आली गुन्ह्यात वापरलेली कार

    चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जिल्हाध्यक्ष राजवीर यादव  आणि त्याचा भाऊ अमर यादवला  अटक

    अटकेनंतर न्यायालयाने सुनावली आहे 5 दिवसांची पोलीस कोठडी

  • 25 May 2023 09:06 PM (IST)

    संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाबाबत सुनावणी उद्या होणार

    सुप्रीम कोर्टात उद्या होणार महत्त्वपूर्ण सुनावणी

    उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल

    येत्या रविवारी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन

  • 25 May 2023 08:42 PM (IST)

    अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार राहुल कुल

    दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल हे आज दौंड तालुक्यातील आलेगाव येथे एका नियोजित कार्यक्रमासाठी आले असता दौंड – सिद्धटेक अष्टविनायक मार्गावर एका दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांचा निदर्शनास आलं.

    यावेळी आमदार कुल यांनी त्यांची गाडी तात्काळ थांबवून अपघातग्रस्त दुचाकी स्वराला त्यांच्या स्वतःचा गाडीतुन तात्काळ ग्रामीण रुग्णालय दौंड येथे तात्काळ हलवलं. स्वतः रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णाला अत्यावश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने पुढील अनर्थ टळला.

  • 25 May 2023 08:35 PM (IST)

    विरोधकांना अडीच वर्षात जे करता आले नाही ते आम्ही केलं : देवेंद्र फडणवीस

    विरोधकांना अडीच वर्षात जे करता आले नाही ते आम्ही केलं

    आमचे सरकार हे वेगाने निर्णय घेणारे सरकार

    2000 नंतरच्या घरांना मोफत घर देणं शक्य नव्हतं

    त्यांना अडीच लाखात घर देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला

    अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे

  • 25 May 2023 08:19 PM (IST)

    वाशिमच्या मालेगावमध्ये गोठ्याला अचानक लागली आग, जवळपास 7 ते 8 लाखांचं नुकसान

    वाशिमच्या मालेगावमध्ये गोठ्याला अचानक लागली आग

    या आगीत 7 बकऱ्या आणि 2 म्हैस होरपळळ्या

    तसेच 7 पोते सोयाबीन, 4 पोते कांदा बियाणे आणि 4 पोते भुईमूग जळून खाक

    जवळपास 7 ते 8 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती

    नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याकडून मागणी

  • 25 May 2023 08:01 PM (IST)

    ठाणेकरांना मोठा दिलासा, यंदा ठाणे महानगर पालिकेकडून पाणी कपात नाही

    या वर्षी ठाणे महानगर पालिकेकडून कुठलीही पाणी कपात होणार नाही

    पालिकेकडून नियमित पाणी पुरवठा सुरु राहणार आहे

    मात्र भविष्यात गरज पडल्यास पाणी कपात विषयी निर्णय घेतला जाऊ शकतो

    असं ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलं आहे

  • 25 May 2023 06:52 PM (IST)

    Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार?

    पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार?

    निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र अद्ययावर करण्याचं काम सुरु

    बंगळुरुतून 5 हजार 70 व्हीव्हीपॅट मशिन्स पुण्यात

    गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त

  • 25 May 2023 06:47 PM (IST)

    Pandharpur Temple Prasad | पंढरपुरातील लाडू प्रसादाची तपासणी, नक्की कारण काय?

    पंढरपुरातील लाडू प्रसादाची तपासणी होणार

    विना पँकिंग लाडू प्रसाद दिल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात

    मंदिर समितीकडून भाविकांच्या आरोग्याशी खेळ, औषध प्रशासनाने अहवाल मागितला

    पँकिंगचे नियम न पाळल्याने मंदिर समतीवर नामुष्की

    लाडूची तपासणी करुन प्रयोगशाळेकडून अहवाल मागवणार

  • 25 May 2023 06:35 PM (IST)

    Nana Patole | पोलीस भरतीची पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

    पोलीस भरतीची पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

    तसेच पोलीस महासंचाकांशीही पटोले यांची चर्चा

    भरतीसाठी पैसे घेतले असल्याच्या तक्रारी, पटोले यांचा दावा

    चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा, पटोलेंची मागणी

  • 25 May 2023 06:31 PM (IST)

    Disqualification of 16 Maharashtra MLAs | 16 आमदार अपात्रतेच्या प्रकरणार लवकरात लवकर कारवाई करा, ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष्यांना निवदेन

    आमदार अपात्रतेच्या प्रकरणार लवकरात लवकर कारवाईसाठी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याना निवेदन

    3 महिन्यात काय कारवाई होते, याची ठाकरे गट वाट पाहणार

    3 महिन्यात निर्णय न झाल्यास ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

  • 25 May 2023 06:24 PM (IST)

    Baramati Rain | बारामती शहर आणि परिसरात दमदार पाऊस

    बारामती शहर आणि परिसरात दमदार पाऊस

    शहर आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

    पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

    पावसामुळे थंडावा मात्र नागरिकांची धावपळ

  • 25 May 2023 06:21 PM (IST)

    Ajit Pawar | विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही विनंती

    मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षात कार्यक्रम राबवा, अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

    यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष

    75 कोटी रुपये निधी मंजूर असूनही नियोजन नाही : अजित पवार

  • 25 May 2023 06:14 PM (IST)

    Deepak Kesarkar | पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढणार : दीपक केसरकर

    विनायक राऊत यांना पराभवाची चव चाखवणार : दीपक केसरकर

    पक्षाने आदेश दिल्यास राउतांविरोधात लोकसभा लढवणार, दीपक केसरकरांची तयारी

    श्रीकृष्णाने सांगितलंय समोर भाऊ असला तरी लढलंच पाहिजे : दीपक केसरकर

  • 25 May 2023 05:58 PM (IST)

    परभणी : छताचे प्लास्टर कोसळले

    जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागातील घटना

    छताचे प्लास्टर कोसळल्याने दोन रुग्ण जखमी

    सलमान शेख, सुदाम तुरे असे जखमी रुग्णाचे नाव

    जखमी रुग्णांना तात्काळ दुसऱ्या वार्डत शिफ्ट करण्यात आले

  • 25 May 2023 05:40 PM (IST)

    ठाणे : महापालिका उभारणार कंटेनर टॉयलेट

    गर्दीचे ठिकाण मार्केट परिसरात स्वच्छालय नसल्याने पालिकेने घेतला निर्णय

    पहिल्या टप्प्यात 30 ठिकाणी उभारणार कंटेनर टॉयलेट

    स्लम एरियात ही राबवणार कंटेनर टॉयलेटची योजना

  • 25 May 2023 05:17 PM (IST)

    पुणे : टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

    महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

    पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाण्याची शक्यता

    टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीने लाकुड व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

    महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाकडून माहिती मागवून पंचनामे करण्याच्या सूचना

  • 25 May 2023 05:08 PM (IST)

    औरंगाबाद : काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन

    काँग्रेसचे महागाईविरोधात आंदोलन

    क्रांती चौकात गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्यविधी करत आंदोलन

    काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार थालीनाद सुरू

    महागाई आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

  • 25 May 2023 04:57 PM (IST)

    पोलिसांच्या दडपशाहीविरोधात उठविला आवाज

    अंबादास दानवे यांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट

    बारसू रिफायनरी प्रकरणी स्थानिक पोलिसांची दडपशाही

    पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे केली तक्रार

  • 25 May 2023 04:42 PM (IST)

    पवित्र राजदंड सैंगोल पुन्हा जीवंत केले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार

    भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर यांच्या पणतूचे मानले आभार

    सी. आर. केसवन यांनी केली मोदींची स्तूती

  • 25 May 2023 04:40 PM (IST)

    मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा

    राज्य सरकार त्यांना अडीच लाखात घर देणार

    2000-2011 या काळातील झोपडपट्टीधारकांना दिलासा

  • 25 May 2023 04:36 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार

    आंबेडकर यांच्या उद्धव ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्यावर प्रतिक्रिया

    शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या प्रश्नावर दिले उत्तर

    महाविकास आघाडीपासून सावध राहण्याचा आंबेडकर यांनी दिला होता सल्ला

  • 25 May 2023 04:34 PM (IST)

    भाजपविरोधातील पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न

    आता नेता कोण असणार हा प्राथमिक मुद्दा नाही

    भाजप व्यतिरिक्त पक्षांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे

    ही प्रक्रिया लवकरच सुरु होईल-शरद पवार

  • 25 May 2023 04:32 PM (IST)

    केजरीवाल उद्या काँग्रेस नेत्याना भेटणार

    काँग्रसे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांची भेट घेणार

    सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना भेटणार

    घटनात्मक व्यवस्थेवर, लोकशाही व्यवस्थेवर हे संकट-केजरीवाल

  • 25 May 2023 04:30 PM (IST)

    लोकांचा मतदानाचा अधिकार वाचविण्याचा प्रयत्न

    राष्ट्रवादीचा केजरीवाल यांना पूर्ण पाठिंबा

    संसदीय लोकशाहीत काम करण्याचा अनुभव पणाला लावणार

    शरद पवार यांनी दिला केजरीवाल यांना पाठिंबा

  • 25 May 2023 04:28 PM (IST)

    देशात लोकशाहीवर सातत्याने आघात

    शरद पवार यांनी डागली तोफ

    देशात प्रजासत्ताक राज्य नाही

    दिल्ली सरकारवर सातत्याने आघात

    प्रजासत्ताक वाचविण्याची ही लढाई आहे

  • 25 May 2023 04:25 PM (IST)

    देशातील अनेक राजभवन आता भाजपचे मुख्यालय झाले

    शरद पवार यांच्या मदतीची आवश्यकता

    देशाच्या लोकशाहीवर भाजपचे मोठे संकट आले आहे

    शरद पवार यांच्या अनुभवाची आता अत्यंत गरज- मान

  • 25 May 2023 04:24 PM (IST)

    देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे

    ही तर लोकशाही वाचविण्याची लढाई-भगवंत मान

    आमदारांना फोडून विरोधी सरकार पाडण्यात येतात

    भाजपविरोधातील सरकारविरोधात तपास यंत्रणांचा वापर

    दिल्ली सरकारचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे अधिकार हिसकावण्यात येत आहेत

  • 25 May 2023 04:22 PM (IST)

    भाजपविरोधी सरकारविरोधात भाजपचे हातकंडे

    ही केवळ दिल्लीची लढाई नाही देशाची लढाई आहे

    भाजपविरोधी सरकार पाडण्याचा अनेकदा प्रयत्न

    आमदार खरेदी करतात, पार्टी तोडतात अथवा दबाव आणतात

    शरद पवार हे भारतातील प्रबळ नेता-केजरीवाल

  • 25 May 2023 04:20 PM (IST)

    केंद्र सरकारने पुन्हा दिल्ली सरकारचे अधिकार हिरावले

    आठ वर्षांतील लढाईवर पुन्हा पाणी फेरले

    त्यासाठी केंद्र सरकारने खास बिल आणले

    राज्यसभेत हे बिल मंजूर होऊ नये यासाठी विरोधकांची एकजूट

    शरद पवार यांनी या बिलाविरोधात मदत करावे अशी केली विनंती

    अरविंद केजरीवाल यांची माहिती

  • 25 May 2023 04:18 PM (IST)

    दिल्लीतील लोकांवर केंद्राकडून मोठा अन्याय

    अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

    केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात आठ वर्षांपासून संघर्ष

    सुप्रीम कोर्टाने मोठा न्याय दिला-केजरीवाल

  • 25 May 2023 04:16 PM (IST)

    केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष

    या संघर्षामुळे प्रशासनावर आणि व्यवस्थेवर ताण

    केजरीवाल यांनी या मुद्यावर शरद पवार यांचे वेधले लक्ष

    पवार यांच्याकडे मागितली मदत -पटेल

  • 25 May 2023 04:14 PM (IST)

    दिल्ली सरकार आपल्या अधिकारासाठी लढले

    देशातील विविध विषयांवर बैठकीत झाली चर्चा

    राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती

    केजरीवाल शरद पवार यांच्या भेटीला

  • 25 May 2023 04:12 PM (IST)

    केजरीवाल यांच्याकडून विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न

    वाय. बी. चव्हाण सेंटरला पत्रकार परिषद

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित

    पंजाबचे मुख्यमंत्री पण या पत्रकार परिषदेला हजर

  • 25 May 2023 04:06 PM (IST)

    थोड्याच वेळात अरविंद केजरीवाल-पवार यांची पत्रकार परिषद

    अरविंद केजरीवाल हे शरद पवार यांच्या भेटीला

    यशवंतराव चव्हाण सेंटरला दोन्ही नेत्यांची भेट

    पंजाबचे मुख्यमंत्री पण यावेळी उपस्थित

  • 25 May 2023 03:54 PM (IST)

    मोदी यांच्या नेतृत्वात रेकॉर्डब्रेक विजय मिळवू – एकनाथ शिंदे

    मोदी एकटे सगळ्यांना भारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 25 May 2023 03:51 PM (IST)

    ठाकरे शेतकऱ्यांशी खोटं बोलायचे – सुधीर मुनगंटीवार

    ठाकरे सीएम असताना राज्याची वाट लावली – सुधीर मुनगंटीवार

    जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी अपेक्षा – सुधीर मुनगंटीवार

  • 25 May 2023 03:26 PM (IST)

    गडचिरोली | ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सतत अनुपस्थित, विकास कामाला फुल स्टॉप

    गडचिरोली डोंगरगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सतत अनुपस्थित असल्यामुळे विकास कामाला फुल स्टॉप

    गावकऱ्यांनी तीन तास वाट बघितली तरी देखील अधिकारी अनुपस्थित

    गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे

    उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे गावकरी बेहाल

    संताप नागरिकांनी आंदोलन छेडण्याच्या दिला इशारा

  • 25 May 2023 03:13 PM (IST)

    केजरीवाल पवारांच्या भेटीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरवर

    केजरीवाल यांच्याकडून विरोधकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न

    केजरीवाल शरद पवारांच्या भेटीसाठी

  • 25 May 2023 02:39 PM (IST)

    मोदींना विरोध करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येत आहे – फडणवीस

    मोदींना विरोध करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येत आहे – फडणवीस

    मोदींचा जगभरात सन्मान

  • 25 May 2023 02:30 PM (IST)

    बोरिवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात लोकांनी चोरट्याला बेदम मारहाण केली.

    बोरिवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात लोकांनी चोरट्याला बेदम मारहाण केली.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.

    जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले त्याचा मृत्यू झाला,

    सध्या कस्तुरबा मार्ग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

    पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत चोराचा मृत्यू कसा झाला हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • 25 May 2023 02:12 PM (IST)

    पुण्यात पालखीचा दोन दिवस मुक्काम असेल – माणिकराव महाराज मोरे

    तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात देहू मध्ये येणाऱ्या 400 दिंड्यांना उतरण्यासाठी जागा कमी पडत आहे, हा मुद्दा बैठकीत मांडला.

    त्यासाठी गायरानाची जागा देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे आम्ही केली आहे.

    तीर्थक्षेत्रासाठी गायरानाची जागा कायमस्वरूपी आरक्षित करा.

    पुण्यात पालखीचा दोन दिवस मुक्काम असेल

    यावेळी 67 देशाचे प्रतिनिधी वारी सोहळ्यासाठी पुण्यात येणार आहेत

    पालखी महामार्गामुळे झाडे नष्ट झाली आहेत.

    त्यामुळे शासनाने हरितवारी हा प्रकल्प राबवावा हे देखील मागणी आणि शासनाकडे केली आहे.

  • 25 May 2023 02:05 PM (IST)

    दौंड बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व 

    दौंड बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश जगदाळे व उपसभापतीपदी शरद कोळपे विजयी

  • 25 May 2023 02:04 PM (IST)

    गेल्या वेळी अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे उपाध्यक्षांनी निवेदन दिलं होत – अंबादास दानवे

    गेल्या वेळी अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे उपाध्यक्षांनी निवेदन दिलं होत
     लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी आहे
    चर्चा सकारात्मक झाली
    लवकरात लवकर सुनावणी होईल अशी आशा आहे
    लवकरात लवकर सुनावणी घेऊ अस आश्वासन अध्यक्षांनी दिलं आहे
  • 25 May 2023 01:59 PM (IST)

    मनेर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उपोषण

    शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण

    उपोषणात एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे युवा नेते महबूब शेख जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणा स्थळी उपस्थित

    केंद्र सरकार राज्य सरकारचा करण्यात आला निषेध

    केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी हे उपोषण

    कांदा, कापूस आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उपोषण

  • 25 May 2023 01:57 PM (IST)

    शासन आणि प्रशासन रथाची 2 चाक आहेत, ती समान वेगाने धावली पाहिजे – मुख्यमंत्री

    सगळी स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकली आता स्पीड पकडायला हरकत नाही

    ऑनलाईन नाही फेसबुक नाही डायरेक्ट फिल्डवर

    75 हजार नागिराकंना आम्ही रोजगार देण्याचा निर्णय घेतला

    केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की, मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल

    केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे, फंड देत आहे

    मुंबई गोवा महामार्ग यात गडकरी यांनी लक्ष घातले

    मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता बनवणार

  • 25 May 2023 01:54 PM (IST)

    परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडीत भाजपचा विजय

    सभापती आणि उपसभापती निवडीत भाजप विजयी

    गंगाधरराव बोर्डीकर सभापती, तर सुंदरराव चव्हाण यांची उप सभापतीपदी निवड

    आमदार मेघना बोर्डीकर यांचा गड शाबूत

  • 25 May 2023 01:52 PM (IST)

    वारकरी प्रमुख लोकांसोबत समाधानाची बैठक झाली – चंद्रकांत पाटील

    पालख्या आळंदी देहू यांची बैठक झाली

    तिन्ही जिल्ह्यातले जिल्हा अधिकारी, नेते वारकरी यांची बैठक झाली

    भविष्यातील विषय आले आहेत, यासाठी दोन समित्या केल्या

    त्यांचा WhatsApp ग्रुप आणि आठवड्याला बैठका होतील

    झाडं लावू पण ती मोठी व्हायला वेळ लागेल

    दोन मुक्कामाच्या मध्ये pandal उभारणार, टॉयलेट्सची सोय करणार

    मुक्कामाच्या जागा लहान झाल्यात

    टोल घेऊ नये यासाठी नितीन गडकरी यांना विनंती करणार

    टोल सुरू झाला तरी वारकऱ्यांना टोल नसणार

  • 25 May 2023 01:50 PM (IST)

    पूर्वीचं अडीच वर्ष सरकार सोडले तर 35 कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले – एकनाथ शिंदे

    आमचा अजेंडा सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत

    गेल्या अडीच वर्षाचा कारभार आपण पाहिला

    अडीच वर्ष सरकार कुठे होत आपल्याला माहीत आहे

    सरकारी काम सहा महिने थांब, हे आम्हाला बदलायचं आहे

    शासन आपल्या दारी या अभियानातून सगळ्यांना लाभ होणार

    याठिकाणी आलेले सगळे लाभार्थी आहेत

    शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली, चांगलं शासन असं त्यांचं ध्येय होतं

    तोच आदर्श समोर ठेवून सरकार काम करत आहे

    अडीच वर्ष सोडली तर आम्ही कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागिकांसाठी निर्णय घेतले

    सर्वमान्य लोकांच्याआयुष्यात बदल झाला पाहिजे हाच अजेंडा

    अडीच वर्षात आपण कारभार पाहिला आहे, सरकार कुठे होत हे आपण पाहिलं ?

    आम्ही लोकांच्या दारात गेलो

    सरकारी काम आणि ६ महिने थांब हे चित्र आम्हाला बदलायचं आहे

  • 25 May 2023 01:42 PM (IST)

    गेल्यावेळी अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे उपाध्यक्षांनी निवेदन दिलं होतं – अंबादास दानवे

    लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी आमची मागणी

    चर्चा सकारात्मक झाली

    लवकरात लवकर सुनावणी होईल अशी आशा

    लवकरात लवकर सुनावणी घेऊ असं आश्वासन अध्यक्षांनी दिलंय

  • 25 May 2023 01:41 PM (IST)

    महाराष्ट्राच्या जडघडणीमधला हा अभिनव कार्यक्रम – उदय सामंत

    प्रत्येक योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे

    हा माननीय मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन

    सर्वसामान्य रिक्षा चालकाच्या मागे ताकद उभी राहिली पाहिजे म्हणून सरकारने निर्णय घेतला आणि महामंडळ निर्माण झाले

    स्वतः काय करायचं नाही आणि एखादी चांगली गोष्ट करण्याचा सरकारने निर्णय घेतला

    त्यावर टीका करत राहण्याचा काही जणांचा धंदा

  • 25 May 2023 01:39 PM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत आषाढी वारीची बैठक पार

    आषाढी सोहळ्याच्या तयारीचा चंद्कांत पाटलांनी घेतला आढावा

    चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आळंदी आणि देहू संस्थानची एकत्रीत बैठक

    सोहळ्याची अंतिम बैठक पुण्यात पडली पार

    10 जूनला देहूतून संत तुकाराम महारांजांच होणार प्रस्थान

    तर 11 जूनला आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच प्रस्थान होणार

    प्रशासनाची वारी सोहळ्याची तयारी पुर्ण झाली आहे

    यंदा वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता

  • 25 May 2023 01:27 PM (IST)

    अंबरनाथमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीत मानाच्या गदा चोरीला

    मलंगगड भागातील खरड गावात पार पडल्या बैलगाडा शर्यती
    आयोजकांच्या डोळ्यासमोर स्टेजवरून मानाच्या गदा चोरीला
  • 25 May 2023 01:24 PM (IST)

    ठाकरे गटाचं शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला

    ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल नार्वेकरांची भेट

    सुप्रीम कोर्टाच्या निकालाची लवकरच अंमलबजावणी करण्याची मागणी

  • 25 May 2023 01:19 PM (IST)

    औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात धुसफूस सुरू

    चंद्रकांत खैरे यांचा अंबादास दानवे यांना नाव न घेता टोला

    व्हायरल झालेली यादी फेक आहे

    काड्या मास्टर लोक यादी व्हायरल करतात

    मी एकनिष्ठ नेता माझा पत्ता कट होऊ शकत नाही

    मी इथे असल्यानंतर अंबादास दानवेला कशाला तिकीट मिळेल

    चंद्रकांत खैरे यांचा सवाल

  • 25 May 2023 01:17 PM (IST)

    कांद्याच्या दरासाठी सदाभाऊ खोत आक्रमक

    कांद्याच्या दरासाठी सदाभाऊ खोत यांचं रास्ता रोको आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सदाभाऊ आक्रमक

  • 25 May 2023 01:09 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनाचं लोकार्पण

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर

    निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला भोवळ

  • 25 May 2023 01:07 PM (IST)

    नव्या संसदेच्या उद्घाटनावरुन सुप्रीम कोर्टात याचिका

    राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होण्यासाठी याचिका

  • 25 May 2023 01:03 PM (IST)

    नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी मॉकड्रिल

    वाशी पोलीस ठाण्याकडून मॉक ड्रिलचे आयोजन

    एखादी घटना घडल्यास तत्परतेने काय करता येईल, यासाठी मॉक ड्रिल

    महापालिका, अग्निशामक दल आणि रुग्णालय यांच्या सहकार्याने या मॉकड्रिलचे आयोज

  • 25 May 2023 01:02 PM (IST)

    गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी अरुण डोंगळे यांची निवड

    गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव इथल्या कार्यालयात पार पडली निवड

    निवडीनंतर समर्थकांचा जल्लोष

  • 25 May 2023 01:02 PM (IST)

    नितीन गडकरी धमकी प्रकरण

    NIA चे दोन DIG स्तरावरील अधिकारी काल नागपूरात दाखल
    NIA चे DIG विक्रांत खनाते, आणि एसपी प्रविण इंगावले हे दोन अधिकारी करत आहेत तपास
    NIA ची टीम मुंबईवरुन नागपूरात तपास करण्यासाठी आलीय
    NIA चे अधिकारी आणि नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची दीड तासांपासून बैठक सुरु
    आरोपी जयेश पुजारी याची NIA चे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता
  • 25 May 2023 01:00 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर महसूल कार्यालयात दाखल झालेत

    सोलापूरच्या महसूल भवनाचे लोकार्पण आज देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते पार पडत आहे

    तब्बल पंधरा वर्षानंतर महसूल भवनाचे काम पूर्ण झालंय.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महसूल भवनाचं लोकार्पण होणार

  • 25 May 2023 12:56 PM (IST)

    सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोण?

    सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवेंद्रराजे गटाचे विक्रम पवार

    तर उपसभापती पदी मधुकर पवार यांची बिनविरोध निवड

    या बाजार समितीमध्ये शिवेंद्रराजेंच्या अजिंक्य पॅनलचा विजय

    अजिंक्य पॅनलकडून स्वाभिमानी शेतकरी पॅनल आणि उदयनराजे गटाचा 18-0 असा दारुण पराभव

  • 25 May 2023 12:48 PM (IST)

    नाव न घेता खैरेंचा अंबादास दानवे यांना टोला

    औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात धुसफूस सुरू

    चंद्रकांत खैरे यांचा अंबादास दानवे यांना नाव न घेता टोला

    व्हायरल झालेली यादी फेक आहे, काड्या मास्टर लोक यादी व्हायरल करतात

    मी एकनिष्ठ नेता माझा पत्ता कट होऊ शकत नाही

    मी इथे असल्यानंतर अंबादास दानवेला कशाला तिकीट मिळेल

    चंद्रकांत खैरे यांचा सवाल

  • 25 May 2023 12:37 PM (IST)

    मालेगाव बाजार समितीत ठाकरेगटाची सत्ता; दादा भुसे यांना मोठा धक्का

    जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मालेगाव बाजार समितीत ठाकरेगटाची सत्ता

    ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड

    पालकमंत्री भुसे यांच्या बाजार समितीच्या सर्व पॅनलवर एकहाती निवडून आणण्यात अद्वय हिरे यांना यश मिळाले होते

    आज भुसेंना आव्हान देत एकहाती सत्ता मिळवली आहे

    मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली

    तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची निवड करण्यात आली

    ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला

  • 25 May 2023 12:28 PM (IST)

    जेजुरीच्या विश्वस्त मंडळाची निवड वादाच्या भोवऱ्यात, आज महत्वाची बैठक

    जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड वादाच्या भोवऱ्यात

    विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य न दिल्याने संताप

    जेजुरीतील खांदेकरी आणि मानकऱ्यांची आज बैठक

    स्थानिकांना डावललं जात असल्याबद्दल बैठकीत होणार चर्चा

    आज संध्याकाळी जेजुरीत होणार बैठक

  • 25 May 2023 12:15 PM (IST)

    मुंबई अहमदाबाद महामामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामामार्गावर भीषण अपघात

    तलासरी इभाडपाडा इथं दुचाकी आणि इर्टिगा कारचा भीषण अपघात

    महामार्ग क्रॉसिंग करून गुजरात वाहिनीने गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव इर्टिगा कारने दुचाकीस्वारांना धडक दिली

    भीषण अपघात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

    अपघाती मृत्यू झालेले दोघे आणि जखमी तिघे नाशिक जिल्ह्यातील हरसूल बारिमाळ येथील रहिवासी असल्याची माहिती

    स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू

  • 25 May 2023 12:01 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्या रत्नागीरीत

    शासन आपल्या दारी उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम

    कार्यक्रमासाठी 1 लाख लोकांचे कार्यकर्त्यांना टार्गेट

  • 25 May 2023 11:48 AM (IST)

    औरंगाबादमध्ये तीन टन कांद्यावर फिरवला जेसीबी

    योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

    कापूस बीयानांच्या दरात मोठी वाढ

    गेल्या वर्षीच्या तुलनेत 43 रूपयांची वाढ

  • 25 May 2023 11:43 AM (IST)

    एनआयएचे तपास पथक नागपूरात दाखल

    नितीन गडकरींना मिळालेल्या धमकीचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा नागपूरात दाखल

    धंतोली पोलीस स्टेशनमध्ये महत्त्वाचे कागदपत्र तपासणार

  • 25 May 2023 11:39 AM (IST)

    ठाकरे मुख्यमंत्री असतांना राज्याची वाट लावली- सुधीर मुनगंटीवार

    जूनमध्ये मंत्रीमंडळ विस्तार अपेक्षीत- सुधीर मुनगंटीवार

    बच्चू कडूंना राज्य मंत्री पदाचा दर्जा

  • 25 May 2023 11:32 AM (IST)

    नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार हा दुटप्पीपणा- देवेंद्र फडणवीस

    मोदींना पराभूत करण्याचे विरोधकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- देवेंद्र फडणवीस

    विरोधक हे सत्तेचे सौदागर- देवेंद्र फडणवीस

  • 25 May 2023 11:14 AM (IST)

    कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस फेकला रस्त्यावर

    पिकांना उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष

    बोधवडमधील बिचवे येथे शेतकरी आक्रमक

    संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला कापूस

  • 25 May 2023 10:51 AM (IST)

    हिंगोली – ट्रक आणि आयशर चा भीषण अपघात , ४ ठार

    नांदेड/ हिंगोली राज्य महार्गावरील दुर्घटना

    या अपघातात चार जण ठार झाले असून 100-150 मेंढ्यांच्या मृत्यू

    कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारात घडली घटना

  • 25 May 2023 10:42 AM (IST)

    नितीन गडकरी मनोहर जोशींच्या भेटीला

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत

    मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गडकरी रुग्णालयात आले आहेत.

  • 25 May 2023 10:31 AM (IST)

    नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी आज NIAची टीम नागपूरला जाणार

    केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणात एनआयएची टीम आज नागपुरात. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर एनआयए तपास सुरू करणार आहे.

  • 25 May 2023 10:19 AM (IST)

    नवी दिल्ली : सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल, तिहार तुरुंगात बाथरूममध्ये कोसळले

    दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    सत्येंद्र जैन यांना चक्कर आल्याने ते तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये कोसळले. याआधीही सत्येंद्र जैन बाथरूममध्ये पडून त्यांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती.

    गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 25 May 2023 10:07 AM (IST)

    बाळासाहेब हे विचारांना विरोध करायचे, व्यक्तींना नाही – संजय राऊत

    फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नयेत

    आपल्या देशात लोकशाहीचा मृत्यू झाला आहे, संजय राऊत यांची टीका

  • 25 May 2023 10:02 AM (IST)

    राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याने आमचा संसदेच्या उद्घाटन सोहळ्यास विरोध – संजय राऊत

    पंतप्रधानांनी उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण राष्ट्रपतींना द्यावं, राऊत यांची मागणी

    आम्ही विरोधक नाही, आम्ही तर देशभक्त

  • 25 May 2023 09:52 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी यात्रा

    मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई निघालेली मराठा वनवाइ यात्रा पुण्यात दाखल

    स्वारगेट ते लाल महाल अशी निघाली यात्रा

    यात्रेत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी

    ओबीसींमधून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या ही प्रमुख मागणी

  • 25 May 2023 09:43 AM (IST)

    समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या उद्घाटन

    बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

    उद्या 26 मे रोजी होणार उद्घाटन

    शिर्डी इंटरजेंच ते भरविर या 80 किलोमीटरच्या महामार्गाचे उदघाटन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यांसह अनेक मंत्री आमदार, खासदार यांची उपस्थिती

  • 25 May 2023 09:37 AM (IST)

    सांगलीत किरकोळ कारणावरुन खून

    सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा बनातील एका हॉटेलबाहेर अंडे खाल्ले म्हणून वेटरने दारूच्या नशेत दुसऱ्या वेटरच्या डोक्यात लाकडी दांडके घालून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. सुरेश कडीमाने (४५, रा. गोड्डड्याळ, ता. इंडी, असे मृताचे नाव आहे. संशयित प्रशांत ओबे (वय ४५, रा. माळवाडी, हडपसर, पुणे) हा फरार घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

  • 25 May 2023 09:31 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी कन्नड तालुक्यात जोरदार तयारी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जोरदार तयारी

    औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जोरदार तयारी

    26 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार कन्नड शहरात

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला तब्बल एक लाख लोक जमवण्याचे टार्गेट

    शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी दोन लाख स्क्वेअर फुटावर टाकला मंडप

  • 25 May 2023 09:23 AM (IST)

    भरपाईसाठी 1 कोटी रुपये देण्याची मागणी

    पुणे जिल्ह्याला अवकाळी नुकसान भरपाईसाठी 1 कोटी रुपये द्या

    महसूल विभागाची राज्य सरकारकडे मागणी

    एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं पुणे जिल्ह्यात 570 हेक्टरवर नुकसान

    सर्वाधिक नुकसान हे 206 हेक्टरवर नुकसान

    कृषी विभाग आणि महसूल विभागानं केलेल्या पंचनाम्याच्या आधारे केली मागणी

  • 25 May 2023 09:17 AM (IST)

    वाशिममध्ये युवकाचा मृत्यू

    वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटीत अतुल रंगभाळ (वय ४०) या युवकाचा मृतदेह आढळून आला

    सकाळी ७ वाजताच्या सुमारास घटना झाली उघड

    अतुल हा ड्रीमलँड सिटीत भाड्याच्या रूममध्ये राहत होता

    अतुल याचा मृत्यू साप चावल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज

  • 25 May 2023 09:13 AM (IST)

    किसान सभेचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ताफा अडविण्याचा इशारा देणारे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात

    अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांना मंद्रूप पोलिसांनी घेतले ताब्यात

    शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा दिला होता.

    डॉ. झळके यांना मंद्रूप येथील अपर तहसील कार्यालय येथे नजरकैदेत ठेवण्यात आलेय

  • 25 May 2023 09:04 AM (IST)

    मुख्यमंत्री रत्नागिरी दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी शासन आपल्या दारी उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाई या मंत्रीगणासह अनेक व्हीआयपी यावेळी उपस्थित राहणार आहे.

  • 25 May 2023 08:58 AM (IST)

    अहमदनगर | जामखेडला चौंडी येथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद

    31 तारखेला होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रोहित पवार भूमिका मांडणार

    रोहित पवारांनी कार्यक्रमासाठी मागितलेली परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारली

    रोहित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

  • 25 May 2023 08:55 AM (IST)

    मराठवाड्यातील धरणांची पाणी पातळी तब्बल 60 टक्क्यांनी घटली

    मराठवाड्यातील मोठ्या धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

    जायकवाडी धरणात 40.27 टक्के पाणीसाठा

    सीना कोळेगाव धरणात 21 टक्के पाणीसाठा

    सिद्धेश्वर धरणात 49 टक्के पाणीसाठा

    मांजर धरणात 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

    निम्न तेरणा धरणात 46 टक्के पाणीसाठा शिल्लक

    येलदरी धरणात 58 टक्के पाणीसाठा

    विष्णुपुरी धरणात 64 टक्के पाणीसाठा

    मराठवाड्यातील मोठ्या धरणात सरासरी 40 टक्के पाणीसाठा शिल्लक

  • 25 May 2023 08:52 AM (IST)

    LSG vs MI Eliminator IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या लखनऊवरील विजयात MS Dhoni च असंही योगदान

    LSG vs MI Eliminator IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या विजयाला एमएस धोनीनेही हातभार लावला. तुम्ही म्हणाल मुंबईच्या लखनऊवरील विजयाचा धोनीशी काय संबंध? वाचा सविस्तर….

  • 25 May 2023 08:51 AM (IST)

    Naveen ul haq IPL 2023 : विराटला नडणाऱ्या नवीन उल हकला Mumbai Indians च्या तीन खेळाडूंनी शिकवला धडा

    Naveen ul haq IPL 2023 : नवीन उल हकला आंब्यासह दिला निरोप. सतत पंगे घेणाऱ्या नवीन उल हकला उत्तर देणारे मुंबई इंडियन्सचे ते तीन खेळाडू कोण? मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर….

  • 25 May 2023 08:50 AM (IST)

    बीएसडब्ल्यू सहाव्या सेमिस्टर परीक्षेत दिली भलतीच प्रश्नपत्रिका

    प्रगती महाविद्यालय भंडारा येथील परीक्षा केंद्रावरील प्रकार

    नव्याने दिलेल्या प्रश्नपत्रिकेतही 20 ते 22 चुका

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून उन्हाळी परीक्षा सुरू

    बीएसडब्ल्यूच्या सहाव्या सेमिस्टरच्या मराठी विषयाचा होता पेपर

    अभ्यासक्रमाच्या बाहेरची प्रश्नपत्रिका पडली हाती

    प्रश्नपत्रिका रद्द करून तब्बल पाऊणेतीन तासांनी नव्याने प्रश्नपत्रिका देण्यात आली

    त्यातही चुका असल्याने विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप

  • 25 May 2023 08:44 AM (IST)

    समृद्धी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

    समृद्धी महामार्गावर मागील 6 महिन्यांत 755 अपघात

    मागील 6 महिन्यांत समृद्धी महामार्गावर 160 जणांचे गेले बळी

    वाढते अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे आणि उपयोजना करण्याची गरज

    सर्वाधिक जास्त अपघातची वेळ पहाटेची असल्याची माहिती

  • 25 May 2023 08:37 AM (IST)

    टिंबर मार्केट परिसरात लागलेल्या आगीची झळ पुणे महापालिकेच्या शाळेलाही

    शाळेच्या टेरेसवर ठेवलेले बेंचेस, रद्दीचं सामान जळून खाक

    शाळेच्या चौथ्या मजल्यावरही आगीचे लोट

    टिंबर मार्केट परिसरालाचं लागून महापालिकेची रफी अहमदत किडवाई उर्दू शाळा

  • 25 May 2023 08:30 AM (IST)

    नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ होणार सुरू

    केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल

    सेवाग्राम येथे थांब्यासाठीही मुनगंटीवार करणार पाठपुरावा

  • 25 May 2023 08:24 AM (IST)

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार

    निवडणूक लढण्याच्या निर्णयासाठी छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड या दोन पैकी एक मतदारसंघाची चाचपणी सुरू

    लोकसभेत पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्याचा के. सी. राव यांचा प्रयत्न

    पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात उतरणार असल्याची माहिती

  • 25 May 2023 08:17 AM (IST)

    तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा ड्रॉ पद्धतीने करण्याचा निर्णय

    तुळजाभवानी मंदीर संस्थानने घेतला निर्णय

    सिंहासन पुजेच्या एकाच वेळी होणाऱ्या ऑनलाईन बुकिंगच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

    प्रथम सिंहासन पूजा ऑनलाईन बुक केल्या जाणार आणि नंतर ड्रॉ पद्धतीने काढले जाणार

    तुळजाभवानी देवीची नवसपूर्ती म्हणून भक्त देवीला दही, दूध मध श्रीखंड असे सिंहासन पूजा घालतात

  • 25 May 2023 08:10 AM (IST)

    टिंबर मार्केट परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

    लाकडाची दुकानं असल्या कारणानं धुमसली आग

    अग्निशमन दलाच्या जवळपास 15 गाड्या पहाटेपासून आग विझवण्याचा करतायत प्रयत्न

    शेजारील घरांना आगीचा धोका टळला

    आगीत व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

  • 25 May 2023 08:02 AM (IST)

    आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूत आढावा बैठक

    जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 10 जूनला देहूमधून करणार प्रस्थान

    देहू संस्थान, देहू नगरपंचायत आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक

    वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन, शौचालय, राहण्याची व्यवस्था,वाहतूक व्यवस्था अशा विविध विषयांवर चर्चा

    अप्पर तहसीलदार यांनी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना

  • 25 May 2023 07:53 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर

    विविध विकासकामांसोबतच पक्ष पदाधिकाऱ्यांचा घेणार मेळावा

    सोलापुरातील नवीन महसूल भवनचे लोकार्पण तसेच स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झालेल्या विकास कामांचे उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते होणार

    सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह आंबेडकर चळवळीतील नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे

    दरम्यान फडणवीसांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरात विविध चौकांमध्ये स्वागताचे बॅनर आणि भाजपचे झेंडे झळकलेले पाहायला मिळतात

  • 25 May 2023 07:38 AM (IST)

    कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात आता बीएससी, बीएड अभ्यासक्रम सुरू होणार

    नव्या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव एनसीटीईकडे लवकरच दिला जाणार

    नव्या अभ्यासक्रमानुसार बारावीनंतर बीएससी, बीएडसाठी घेता येणार थेट प्रवेश

    मात्र शिवाजी विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमा बाबत संभ्रम

    अनेक बीएड कॉलेज विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना विद्यापीठाकडून बीएससी. बीएडचा अट्टहास का?

  • 25 May 2023 07:35 AM (IST)

    पुण्यातील टिंबर मार्केटमधील लाकडाचे सामान असलेल्या गोडाऊनला पहाटे भीषण आग

    शेजारील चार घरांना ही आगीची झळ

    आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे

    गोडाऊन बाजूची वस्ती आणि शाळेत आग पसरू नये म्हणून जवानांनी केले विशेष प्रयत्न

    10 सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला

    आगीमुळे कोणतीही जिवीत हानी नाही

    जखमी वा जिवितहानी नाही.

  • 25 May 2023 07:32 AM (IST)

    संभाजीनगर जिल्ह्यात 16 महिन्यात बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे 2049 जणांची बळी

    चार जिल्ह्यातील 16 महिन्यात झालेल्या अपघातात 2049 जणांचा गेला जीव

    छत्रपती संभाजी नगर जिल्हा, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आकडेवारी

    हजारो अपघातग्रस्तांना आले कायमच अपंगत्व

    अपघात रोखण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक राबवणार अभियान

  • 25 May 2023 07:31 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले, दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत

    जापान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत

    या तिन्ही देशात मोदींनी गेल्या सहा दिवसात अनेक बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावली

    त्यानंतर आज पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी मोदी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले

    यावेळी रात्रभर विमानतळावर थांबून असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींचं जोरदार स्वागत केलं.

    यावेळी शेकडो कार्यकर्ते हातात तिरंगा झेंडा आणि विश्व प्रिय नेता असं लिहिलेला फलक घेऊन उभे होते

  • 25 May 2023 07:26 AM (IST)

    इयत्ता 12 वीचा आज निकाल, निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष

    आज दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे.

    सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल.

    यासोबतच विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे.

Published On - May 25,2023 7:22 AM

Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.