Maharashtra Breaking Marathi News Live | सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे- किरण पावसकर 

| Updated on: May 29, 2023 | 7:25 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे- किरण पावसकर 
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : आज देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी ते सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आज आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादमध्ये हा सामना रंगणार आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज. पाणीपुरवठ्यापासून शौचालयापर्यंत पुणे जिल्हा परिषदेचे अचूक नियोजन. नवी दिल्लीतही साजरी होणार सावरकर जयंती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात साजरी करणार जयंती. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 May 2023 11:17 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; संभाजी ब्रिगेडची मागणी

    मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

    महाराष्ट्र सदनामध्ये राजमाता अहिल्याराणी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचा अवमान

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

    अन्यथा संभाजी ब्रिगेडच्यावतीने 31 मे रोजी महाराष्ट्रात राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंती दिनी महाराष्ट्रभर सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करणार

    खोट्या सावरकर प्रेमापोटी आणि मताच्या राजकारणासाठी महान महिला महानायिकांचा अवमान

    हा महाराष्ट्र सरकार आणि सरकारमधील सर्वोच्च पदावर बसणारी माणसं करत असतील तर हे महाराष्ट्र द्रोही

    महापुरुषांच्या विचारांच्या विरोधी सरकार

  • 28 May 2023 11:05 PM (IST)

    विरोधकांना टीका करण्याशिवाय काही राहिलं नाही ; दीपक केसरकर यांची टीका

    मुंबई.

    महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवसेना शाखांचा उद्घाटन

    बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहे.

    अनेक जण आमच्या सोबत येत आहेत.

    जेव्हा आम्ही बाहेर पडलो होतो तेव्हाही असच ठाकरे गटाचे नेते बोलत होते की आमदार खासदार आमच्या संपर्कात

    उरलेल्या लोकांना रोखण्यासाठी असा प्रकारचे वक्तव्य केलं जातं

    देश मोदींच्या नेतृत्वात पुढे जात आहे..

    विरोधकांना टीका करण्याशिवाय काही राहिलं नाही

  • 28 May 2023 05:59 PM (IST)

    प्री – वेडींग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी

    मराठा सेवा संघ आयोजित सोलापुरातील मराठा वधू – वर परिचय मेळाव्यात ठराव करण्यात आला मंजूर

    सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात पार पडला आज वधू वर परिचय मेळावा

    प्री – वेडींग शूटिंगवरील अतिरिक्त खर्च तळून समाजउपयोगी कार्यासाठी पैसा खर्च करण्याचा सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी धरला आग्रह

    मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

    मेळाव्याला जवळपास 500 वधू – वरांना लावली हजेरी

  • 28 May 2023 05:38 PM (IST)

    सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे- किरण पावसकर 

    शरद पवार हे मोठे नेते आहेत पण जमाल भाईसोबत टोपी लावून फिरण्यापेक्षा जमाल गोटा कधीही चांगला आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं

    सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे, पण राहूल गांधी अपमान करतात त्यावर तुम्ही गप्प बसता…

    विनायक राऊत सारख्या माणसाने आपल्या संपर्कात लोक आहे ते सांगणं म्हणजे हा दिवसाचा नाही तर वर्षभरातला विनोद आहे,

    त्यांच्या मतदारसंघातल्या शिवसैनिक त्यांचे संपर्कात नाही जनता संपर्कात नाही आणि ते असे आरोप करतात हे हस्यास्पद आहे

  • 28 May 2023 05:23 PM (IST)

    मागील दहा वर्षात पहिल्यांदाच सीताफळाला सर्वात उंचाकी भाव

    वडकी येथील शेतकरी शशिकांत फाटे यांच्या सीताफळाला पुण्यातील मार्केट यार्ड येथे उच्चाकी भाव

    आत्तापर्यंतचा सर्वात उचांकी भाव ३६१/- रुपये प्रति किलो असा भाव मिळालाय

    यावर्षी उन्हाचा तडाखा जास्त असताना शिवाय पाण्याची कमतरता असूनही शेतकऱ्यांनी घेतले उत्तम प्रतीचे सीताफळाचे उत्पन्न

  • 28 May 2023 05:17 PM (IST)

    पुणे- मुंबई दुर्गती मार्गावरती मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोरघाटात वाहतूक कोंडी 

    पुणे- मुंबई दुर्गती मार्गावरती मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोरघाटात वाहतूक कोंडी

    वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

    पुण्याच्या दिशेने कासव गतीने वाहतूक सुरू आहे. बोरघाट ते अमृतांजली ब्रिज असा दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत

    आज रविवार असल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे

  • 28 May 2023 05:12 PM (IST)

    कुत्र्याला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू

    डोंबिवली दावडी गावात परिसरात कुत्र्याला आंघोळ

    घालण्यासाठी गेलेल्या भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू

    किर्ती रविंद्रन व रणजित रविंद्रन असे मयत भाऊ

    बहिणीचे नवे असून दोघे डोंबिवली पश्चिम उमेश नगर परिसरात राहणारे होते.

  • 28 May 2023 04:57 PM (IST)

    राजस्थानमध्ये काँग्रेस 156 जागांवर बहुमत मिळवेल

    भाजपची कर्नाटकसारखी अवस्था होईल

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची प्रतिक्रिया

    नवीन संसदेचे पंतप्रधानांनी उद्धघाटन करणे दुर्भाग्यपूर्ण

  • 28 May 2023 04:50 PM (IST)

    लोकांमध्ये शिंदे यांचे स्थान काय आहे एकदा पाहा

    विनायक राऊत यांनी डागली तोफ

    एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील सभेतून लोक निघून गेली

    खासदार विनायक राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

  • 28 May 2023 04:41 PM (IST)

    सत्तेचा माज फार काळ टिकत नाही

    एकनाथ खडसे यांची टीका

    माझ्यामागे ईडी लागल्यामुळे महाजनांच्या मागे मोक्का लागला

    खडसे यांचं डोकं तपासायला लागणार-गिरीश महाजन

  • 28 May 2023 04:29 PM (IST)

    शेतकरी गाजीपूर बॉर्डर सोडणार नाही

    राकेश टिकेत यांचा केंद्र सरकारला इशारा

    पहिलवान मुलींना रस्त्यावर ओढले

    त्यांच्यावरील अन्याय दूर होईपर्यंत मैदान सोडणार नाही

  • 28 May 2023 04:17 PM (IST)

    मोदी@9 अभियानाची माहिती देणार

    उद्या मुंबईत दुपारी पत्रकार परिषद

    मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणार

    भाजपचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ नेते कार्यक्रमाला राहणार उपस्थित

  • 28 May 2023 04:10 PM (IST)

    पुण्याच्या रिक्त लोकसभा जागेसाठी रस्सीखेच

    राष्ट्रवादीने सांगतिला दावा, तर काँग्रेस पण तयार

    पुण्यात आमची ताकद जास्त-अजित पवार

    कसब्यात आमचा विजय, जागा आहे तशाच राहु द्या-काँग्रेस

  • 28 May 2023 04:08 PM (IST)

    मी आनंदी, मी तिथे नव्हतो

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शब्दबाण

    नवीन संसदेच्या उद्धघाटन सोहळ्यावरुन केले लक्ष्य

  • 28 May 2023 04:03 PM (IST)

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कॅमेऱ्यात कैद केला सोनेरी क्षण

    नवीन संसदेच्या आवारात दोघा नेत्यांचे फोटोसेशन

    यावेळी भाजप-शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कैद केला अविस्मरणीय क्षण

  • 28 May 2023 04:01 PM (IST)

    दिल्लीत भाजप शासित मुख्यमंत्र्यांची बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह बैठकीसाठी पोहचले

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत सहभागी होत आहेत

    राज्यातील विकास योजनांचा मोदी आढावा घेणार

  • 28 May 2023 03:56 PM (IST)

    चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली

    बाळू धानोरकर यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीला उपचारासाठी पाठवले

    आतळ्यांतील इंफेक्शनमुळे वेदांता रुग्णालयात दाखल

    वडिलांवर अंतीम संस्कारही करू शकले नाही खासदार धानोरकर

  • 28 May 2023 03:33 PM (IST)

    बुलढाणा : देऊळगाव राजा तालुक्यात दोन कुटुंबांमध्ये वाद

    शेत जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामाऱ्या झाल्या

    या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय

    सरंबा फाट्यावर बोरजे कुटुंबामध्ये हा वाद उफाळून आला

    दोन्ही कुटुंबातील लोकांमध्ये लाठ्या, काठ्या चालवत तुंबळ हाणामारी

    या हाणामारीत दोन जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत

  • 28 May 2023 03:14 PM (IST)

    मुंबई : कांदीवलीत तरुणावर गोळीबार

    कांदिवली पश्चिम गणेश नगरात तरुणाची गोळीबार करून हत्या

    पोलीस गोळीबार केल्याच्या घटनेला नकार देत आहेत

    एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले, परिसरात भीतीचे वातावरण

  • 28 May 2023 02:53 PM (IST)

    एकनाथ खडसे यांचं डोकं तपासायला लागणार, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय; गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र

    एकनाथ खडसे यांचं डोकं तपासायला लागणार आहे – गिरीश महाजन

    एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – गिरीश महाजन

    आपण किती मोठे चोर आहोत हे लपवण्यासाठी हवेत गोळीबार करायचा मला जास्त बोलायला लावू नका – गिरीश महाजन

    मी जर तोंड उघडलं तर लोक तुम्हाला तोंडाला काळं लावतील – गिरीश महाजन

  • 28 May 2023 02:22 PM (IST)

    जळगाव | जिल्ह्यातील सुनसगाव येथे पेपर मिलला लागली भीषण आग

    अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठे नुकसान

    आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू

  • 28 May 2023 02:06 PM (IST)

    दादर | महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं ५० टक्के काम पूर्ण

    प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ६५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन टप्प्यात प्रकल्पाचे काम सुरू…

    दुसऱ्या टप्प्यातील ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालयाच्या कामाला सुरुवात…

  • 28 May 2023 01:47 PM (IST)

    इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकी प्रकरणी नंदुरबार येथील ऊसतोड मुकादमावर गुन्हा दाखल

    उसतोडणी करीता 15 कोयते म्हणजे 30 माणसे देतो असे सांगुन वेळोवेळी 4 लाख 50 हजार रुपये घेऊनही कोयते न दिल्याने फसवणूक

    नंदुरबार येथील मुकादम शरद भटू पाडवी याच्यावर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

  • 28 May 2023 01:38 PM (IST)

    भंडारा: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शाळेचे छत उडाले.

    मोहाडी तालुक्यात गारपीटचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

    पवनी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

    काल रात्री आणि आज सकाळच्या सुमारास पवनी तालुक्यातील चिचाळ परिसरात वादळी वाऱ्यानं जोरदार हजेरी.

    चिचाळ येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या टीनाचे छत अक्षरशः उडून गेलेत.

  • 28 May 2023 12:34 PM (IST)

    काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली

    चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात केले दाखल.

    आतड्यातील इन्फेक्शनमुळे रुग्णालयात केले दाखल.

    अधिक उपचारासाठी नागपूरहून दिल्लीला विशेष एअर ॲम्बुलन्सने केले जाणार रवाना.

  • 28 May 2023 12:32 PM (IST)

    विनायक राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका

    – हिंदी गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाची कावीळ झाली आहे

    – शिंदे गट मोदीभक्त झालंय, टिका करण्याखेरीज काम नाही, आरएसएसची स्क्रिप्ट शिंदे वाचतात

    – आम्हाला जमाल गोटा देण्याच सोडा, पण तुम्ही रत्नागिरीची सभा घेतली त्या सभेत लोक निघून गेले, तुमचं स्थान काय आहे ते पाहा

  • 28 May 2023 11:53 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात पाण्याचे नमूने तपासले

    रत्नागिरी जिल्ह्यात ९४४ पाण्याचे नमुने तपासलेत. त्यापैकी १४ नमुने दुषित आढळलेत. सर्वाधिक दुषित पाणी गुहागर तालुक्यात आढळलंय.पाणी नमुना तपासणी अहवालात हे सष्ट झालंय.

  • 28 May 2023 11:40 AM (IST)

    मुंबईकरांना मिळणार लोकलला पर्याय

    मुंबईकर अन् लोकल हे एक अतुट नाते झाले आहे. परंतु काळानुसार बदलत लोकलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता लोकलच्या जागी वंदे भारत मेट्रो येणार आहे. मुंबईसाठी 238 वंदे भारत मेट्रो घेण्यात येणार आहे….सविस्तर वाचा

  • 28 May 2023 11:36 AM (IST)

    भाजपची लोकसभेची तयारी युतीसाठी- शिरसाट

    भाजप सर्व 48 लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करत आहे ते भाजप शिवसेना निवडणुकीसाठी आणि आमचे उमेदवार ते निवडून आणतील. भाजप शिवसेनेच्या मतदार संघात कुशल असा त्याचा अर्थ नाही फक्त सर्व उमेदवार जिंकून आणायचे आहे त्यासाठी तयारी सुरू आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

  • 28 May 2023 11:31 AM (IST)

    खासदार नवणीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार

    अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवणीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार ठरला?

    नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या प्रहार कडून रवींद्र वैद्य संभाव्य उमेदवार असल्याची जोरदार चर्चा

    खासदार नवनीत राणा यांना प्रहार आव्हान देण्याचा तयारीत

  • 28 May 2023 10:55 AM (IST)

    अन् एसटी बस धावली तीन चाकांवर

    गोंदियात  एसटी बस धावली तीन चाकांवर

    एस टी महामंडळाच्या चालत्या बसचा टायर निघून गेला शेतात

    एसटी बस काही अंतरापर्यंत तीन चाकांवरच धावली

    ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

    पंधरा ते सोळा प्रवासी थोडक्यात बचावले

    एसटी महामंडळ आता तरी नादुरुस्त बस रस्त्यावर चालवणे बंद करणार का?

  • 28 May 2023 10:45 AM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती; फडणवीस ट्विट करत म्हणाले…

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती

    उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वंदन

    ट्विट करत म्हणाले…

    “स्वातंत्र्यवीर गौरव दिन…राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य, क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!”

  • 28 May 2023 10:35 AM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांकडून वंदन

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वंदन

    ट्विट करत म्हणाले…  

    “उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, प्रभावशाली साहित्यिक, ओजस्वी वक्ता आणि समर्पित समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस, प्रेरणादायक विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन…”

  • 28 May 2023 10:25 AM (IST)

    Mumbai Municipal Corporation : हा मुद्दा वादाचा ठरण्याची चिन्हे

    मुंबईची रक्तवाहिनी म्हणून ओळख असलेली मिठी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीये

    मुंबई महानगरपालिकेने ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्प हाती घेतलाय

    या प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात येणार

    ते पुन्हा नदीत सोडण्यात येत असल्याचा दावा आता मनापाने केलाय

    पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मिठी नदीत काही ठिकाणी मासे दिसू लागले आहेत

    असाही दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

    त्यामुळे हा वादाचा विषय ठरू शकतो

  • 28 May 2023 10:10 AM (IST)

    पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

    पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया

    काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती

    पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही

    अजित पवार यांनी थेट काँग्रेसच्या मर्मावर बोट ठेवलं

  • 28 May 2023 09:50 AM (IST)

    पुणे लोकसभा महाविकास आघाडी लढवणार- सुप्रिया सुळे

    लोकसभा पोटनिवडणूक लागली नाही परंतु महाविकास आघाडी एक सक्षम उमेदवार देईल आणि तो उमेदवार पुणेकरांची सेवा करणारा असेल

    लोकसभा पोटनिवडणुकीवर थेट बोलणे सुप्रिया सुळे यांनी टाळले

    राष्ट्रवादीचा दाव्याऐवजी महाविकास आघाडीवर केले मत व्यक्त

  • 28 May 2023 09:44 AM (IST)

    MPSC आणि UPSC वर चित्रपट

    MPSC आणि UPSC वर आधारित मुसंडी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला

    केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला

    9 जून रोजी मुसंडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे

    ट्रेलर लाँचिंग करताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी मुसंडी चित्रपट टॅक्स फ्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

  • 28 May 2023 09:27 AM (IST)

    अजित पवार यांची विरोधकांवर टीका

    महाविकास आघाडीत फूट पडावी, असे विरोधकांना वाटत आहे

    अजित पवार यांनी केली विरोधकांवर टीका

    तिन्ही पक्ष एकत्र बसून पुण्यातील जागेचा निर्णय घेणार

  • 28 May 2023 09:22 AM (IST)

    पुण्यात राष्ट्रवादीची जास्त ताकद- अजित पवार

    पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे

    अजित पवार यांनी केला दावा

    पुण्यातली जागा काँग्रेसला जिंकता आले नाही

    पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी

  • 28 May 2023 09:13 AM (IST)

    कांदिवलीमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यू

    मुंबईतील कांदिवली गणेशनगरमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे खळबळ

    स्थानिकांचे म्हणणे आहे की गोळीबार झाला आणि त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला.

    कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, सध्या गोळीबार सारखी कोणतीही घटना समोर आलेली नाही

  • 28 May 2023 09:06 AM (IST)

    नागपुरात आग, तीन जखमी

    नागपूरच्या वाडी एमआयडीसीमध्ये मध्यरात्री आग, तीन जखमी

    एमआयडीसी धील कटारिया ऍग्रो कंपनीला आग

    आगीत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

    काही दिवसांपूर्वी हिंगणा येथील ऍग्रो कंपनीला आग लागली होती, त्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला होता

  • 28 May 2023 08:51 AM (IST)

    सेंट्रल हॉलमध्ये भाजप खासदार सावरकरांना आदरांजली वाहणार आहेत

    नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, थोड्याच वेळात भाजपचे खासदार जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना आदरांजली वाहतील.

  • 28 May 2023 08:32 AM (IST)

    बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न

    बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न..

    दुकानमालकाने जीवाची परवा न करता दरोडेखोरांचा ताकदीने सामना केल्याने मोठी घटना टळली..

    सर्व घटना दुकानात असलेल्या सीसीटिव्ही कॅमरेत कैद झाली आहे..

    मीरा रोड पूर्वेच्या जांगीड सर्कलजवळ असलेले कोठारी ज्वेलर्स दुकानाची घटना आहे.

  • 28 May 2023 08:28 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार

    10 वाजता महाराष्ट्र सदनातील स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीला लावणार हजेरी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसद भवनाच्या कार्यक्रमालादेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती

  • 28 May 2023 08:28 AM (IST)

    स्विफ्ट डिझायर कार पलटी

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन 3 जण जखमी…

    खामगाव तालुक्यातील वरखेड फाट्या जवळील घटना..

  • 28 May 2023 08:19 AM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन

    नाशिक ब्रेकिंग

    -स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन

    -भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांचा असणार विशेष सहभाग

    -भाजपा शहर कार्यालयापासून होणार रॅलीला सुरुवात

    -भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होणार सहभागी

  • 28 May 2023 08:18 AM (IST)

    कापूस घरात साठवून ठेवणारे शेतकरी अडचणीत

    कापसाचे दर सतत खाली येत असल्याने ज्या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला होता. ते शेतकरी आता अडचणीत आले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम तोंडावर आला असताना पैसे हातात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडी झाली आहे.

  • 28 May 2023 07:22 AM (IST)

    मुंबईतील पेडर रोड परिसरात असलेल्या ब्रीच कँडी को. ओ.सोसायटीला लागली आग नियंत्रणात

    रात्री इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग लागली होती, आग विझवण्यात अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना यश

    या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा इजा कोणाला झालेला नाही, परंतु घरात असलेल्या सर्व साहित्य जळाले

    घरात असलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, त्यामुळे मोठी घटना टळली

    घटनास्थळी 10 ते 12 अग्निशमन दलाचे गाड्या पोहचल्या होत्या

  • 28 May 2023 07:20 AM (IST)

    तृतीयपंथी सेजलचे इयत्ता 12 वीत यश

    कॉलेज किंवा खाजगी क्लासेसच्या मदतीशिवाय नांदेडमध्ये एका तृतीयपंथीयाने बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलंय

    तृतीयपंथी असलेल्या सेजल पवारने लोक चिडवतात तसेच आपली थट्टा करतात म्हणून घरातच बसून अभ्यास करत बारावीची परीक्षा दिली

    या परीक्षेत त्याला 62 टक्के गुण मिळाले आहेत

    नांदेडमध्ये बारावीच्या परीक्षेत यश मिळवणारी सेजल ही एकमेव तृतीयपंथी असून तिच्या या यशाचे कौतुक होतंय

  • 28 May 2023 07:18 AM (IST)

    आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज

    पाणीपुरवठ्यापासून शौचालयापर्यंत पुणे जिल्हा परिषदेचे अचूक नियोजन

    पालखीत पाणीपुरवठ्यासाठी 106 टँकर मंजूर

    तर शौचालयासाठी रोज 2700 शौचालयांची नियोजन

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे नियोजन

    पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखी मार्गावर मंडप टाकण्याची व्यवस्था

  • 28 May 2023 07:17 AM (IST)

    पुण्यात महाज्योतीचे विभागीय कार्यालय अखेर सुरू

    एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुण्यात महाज्योतीचे कार्यालय सुरू

    महा ज्योतीच्या योजनेअंतर्गत पुण्यात राज्यभरातील 5000 प्रशिक्षणार्थी घेत आहेत प्रशिक्षण

    या सर्व जणांची कामे आता पुण्यातच होणार

    यापूर्वी सर्व कामांसाठी या सगळ्यांना नागपूर येथे जावे लागत होते

    महज्योतीचे मदत केंद्र आणि मार्गदर्शन पुण्यात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मात्र दिलासा

  • 28 May 2023 07:15 AM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

    महाराष्ट्र सदनाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे

    यंदापासून राज्य सरकार गौरव दिन म्हणून करणार साजरा

    शिवसेनेचे सगळे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्रित संसद भवनात जाणार

    खासदारांसोबत मुख्यमंत्र्यांचं असणार शक्तीप्रदर्शन

    महाराष्ट्र सदनातून सगळे खासदार सावरकर जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत जाणार

    सगळ्या खासदारांनी हजर राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Published On - May 28,2023 7:12 AM

Follow us
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.