Maharashtra Breaking Marathi News Live | समीर वानखेडेनंतर होणार त्यांच्या वडिलांची आणि बहिणीची चाैकशी

| Updated on: May 30, 2023 | 7:59 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | समीर वानखेडेनंतर होणार त्यांच्या वडिलांची आणि बहिणीची चाैकशी
Marathi News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आयपीएल स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला कालचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स दरम्यानचा सामना आज खेळवला जाणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. पहाटे 6 वाजल्यापासून विकास कामांचा आढावा. वांद्रे-वरळी सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 May 2023 11:24 PM (IST)

    गडचिरोली पोलीस दलाच्या भूसुरुंग विरोधी वाहनाच्या धडकेत एक जण ठार; 2 गंभीर

    गडचिरोली :
    गडचिरोली पोलीस दलाच्या भूसुरुंग विरोधी वाहनाच्या धडकेत एक दुचाकी स्वार जागीच ठार तर दोघे गंभीर
    आष्टी-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथे अपघात
    परागत कञोजवार असे अपघातात मृतक व्यक्तीचे नाव
    जखमी असलेल्या रुग्णांना सरकारी रुग्णालय गडचिरोलीमध्ये दाखल
  • 29 May 2023 08:46 PM (IST)

    केंद्रातील मोदी सरकारची 9 वर्षे पूर्ण, देशभर राबविणार विविध कार्यक्रम

    देशभर भाजपा राबविणार विविध कार्यक्रमांची मालिका

    गडचिरोली जिल्ह्यात भाजपने आखले विविध कार्यक्रम

    मोदी सरकारच्या योजना आणि धोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचा संकल्प

    केंद्रीय मंत्र्यांच्या सभा आणि विविध समाज घटकातील परिषदांचे होणार आयोजन

    गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला

  • 29 May 2023 08:33 PM (IST)

    नागपूर शहरात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे कोलमडली

    वादळी वाऱ्यासह नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी

    शहरातील विविध भागांमध्ये 12 ठिकाणी झाडे कोलमडली

    पडलेली झाडं नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाने लगेच हटवली

  • 29 May 2023 08:19 PM (IST)

    नवी मुंबईत कोथिंबीर आवक घटल्याने दरात मोठी वाढ, नागरिक हैराण

    नवी मुंबईत कोथिंबीर आवक घटल्याने दरात मोठी वाढ

    मुंबईतील APMC बाजारपेठेत कोथिंबीरीची आवक कमी

    आवक कमी झाल्याने मुंबईत कोथिंबीर 22-28 रुपये

    मागील आठवड्यात कोथिंबीरीची जोडी 15-17 रुपये होती

  • 29 May 2023 08:05 PM (IST)

    करमाळा तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

    करमाळा तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

    सुमारे वादळी वारे आणि गारांचा पाऊस 20 मिनिटे पडला

    काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं होते

  • 29 May 2023 06:57 PM (IST)

    गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेकडून साडेसहा किलो गांजा जप्त

    जप्त केलेल्या गांजाची किंमत जवळपास आठ लाख रुपये

    कारच्या साह्याने एक महिला आणि पुरुष दोघे मिळून गांजा तस्करी करतात

    गुप्त माहिती पोलीस विभागाला झाला प्राप्त

    कारमधून जवळपास मोठ्या संख्येत गांजा आणि इतर साहित्य जप्त

    चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात गांजा तस्करी करीत होते

    गांजा हा निकोटीन बंदी असलेला एक तंबाखूचा प्रकार

  • 29 May 2023 06:44 PM (IST)

    नाशिक – विजय वडेट्टीवार यांचा संजय राऊत यांना सल्ला

    नेते एकत्र बैठक घेऊन बोलतील

    इतरांनी माध्यमांसमोर चर्चा करायला नको

    लोकसभेच्या दृष्टीने वाद होतील असे काहीही वागायला नको

    आज नाना पटोले आमचे नेते, उद्या दुसरं कोणी आलं तर ते आमचे नेते

    विजय वडेट्टीवार यांचा नाना पटोले यांना टोला

    हायकमांडच्या मनातलं जाणायला मी मनकवडा नाही

  • 29 May 2023 06:26 PM (IST)

    खेड : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पावसाचा राडा

    चाकणमधील मोई येथे गौतमी पाटीलचा आयोजित कार्यक्रम

    निमित्त खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे

    कार्यक्रमावेळीच वादळी वाऱ्यासह पावसाची तुफान बॅटिंग

  • 29 May 2023 06:08 PM (IST)

    पुणे : पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

    चासकमानच्या पाण्यासाठी राजकीय कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक

    शिक्रापुरात चासकमानच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

    चोवीस तासात पाणी न मिळाल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा

    पोलिसांच्या हस्तक्षेपाने वातावरण शांत

  • 29 May 2023 05:56 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी 

    गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते

    आज सकाळपासून ही उन्हाच्या झळा बसत होत्या.

    अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली.

    अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली.

    या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यानं शहरवासीय मात्र सुखावले आहेत.

  • 29 May 2023 05:54 PM (IST)

    चाकण औद्योगिक क्षेत्रात वादळी वाऱ्यासह पाऊसाचा धुमाकूळ

    पुणे नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वादळी वारे

    पत्राशेड कोसळली, शेडखाली दुचाकी अडकल्या

    प्रवासी वाहतुकीवर परिणाम

    वादळी वाऱ्यासह पाऊसाचा जोर सुरु

  • 29 May 2023 05:48 PM (IST)

    विनायक राऊत यांनी घेतली सेंट्रल रेल्वेच्या जनरल मॅनेजरची भेट

    विनायक राऊत, सुनिल प्रभू , रमेश कोरगांवकर यांनी सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर यांची घेतली भेट

    गणेशोत्सवादरम्यान कोंकणात जाणाऱ्या भाविकांच्या मांडला समस्या

    अतिरिक्त ट्रेन्स आणि रिझर्वेशन सुरू करण्याची केली मागणी

    लवकरच यावर तोडगा काढू असं या शिष्ठमंडळाला रेल्वेकडून आश्वासन

  • 29 May 2023 05:34 PM (IST)

    समीर वानखेडेनंतर होणार त्यांच्या वडिलांची आणि बहिणीची चाैकशी

    एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे

    यांच्यानंतर सीबीआयचे पथक उद्या समीर वानखेडे यांची

    बहीण आणि वडिलांचीही चौकशी करणार आहे

  • 29 May 2023 05:32 PM (IST)

    पुण्यात गारांसह पावसाला सुरुवात

    उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा,

    औंध, सांगवी आणि वाकड परिसरात जोरदार पाऊस,

    दुपारपासूनच होते ढगाळ वातावरण

  • 29 May 2023 05:31 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात कांद्याला सरासरी 8 रुपये प्रति किलो भाव

    त्याचबरोबर हलक्या प्रतीच्या कांद्याला केवळ 1 रुपये किलोचा भाव

    तर उत्तम प्रतीच्या कांद्याला 18 रुपये प्रति किलो भाव

    कांद्याचे भाव कमी मिळत असल्याने शेतकरी हतबल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला 350 रुपये अनुदान देवूनही शेतकरी अडचणीतच

  • 29 May 2023 05:28 PM (IST)

    चाकण परिसात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

    पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली

    वाढते तापमान आणि उकाडा यापासून नागरिक हैराण झाले होते अशातच पावसाच्या सरी सुरू झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

    तर दुसरीकडे उन्हाळी बाजरी आणि जनावरांच्या खाद्य पिकांचे मोठे नुकसान

    अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह प्रवाशांची तारांबळ

  • 29 May 2023 05:25 PM (IST)

    नवी मुंबई महानगरपालिकेची मान्सूनपूर्व पाणी पुरवठा संबंधी कामे सुरू

    नवी मुंबई महानगरपालिकेची मान्सूनपूर्व पाणी पुरवठा संबंधी आवश्यक कामं करण्यात येणार आहेत

    तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर काम करण्यात येणार आहे

    त्याअनुषंगाने उद्या सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत पाणी पुरवठा १२ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे

    तसेच दि. ३१/०५/२०२३ सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे

  • 29 May 2023 05:23 PM (IST)

    प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी, तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू

    डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी,

    हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी कुरुलकर अटकेत,

    कुरुलकर यांना आज पुणे विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते,

    प्रदीप कुरुलकर यांची वेगवेगळ्या तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.

  • 29 May 2023 05:16 PM (IST)

    खासदार बाळू धानोरकरांच्या तब्येतीत सुधारणा

    खासदार बाळू धानोरकरांच्या तब्येतीत सुधारणा

    उपचारांना प्रतिसाद देतायेत

    कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माम करू नये धानोरकर कुटुंबियांची माहिती

    धानोरकरांवर गुडगावममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

  • 29 May 2023 05:15 PM (IST)

    नवी मुंबई महानगरपालिकेची झोपडपट्टीवरती कारवाई

    नवी मुंबई महानगरपालिकेची झोपडपट्टीवरती कारवाई

    अनधिकृत झोपडपट्टणवरती कारवाई करण्यात आली कारवाई

    बेलापूर येथील शाबास गाव व पंचशील या ठिकाणी 60 ते 70 झोपड्या तोडण्यात आल्यात

  • 29 May 2023 03:29 PM (IST)

    शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश – चंद्रकांत पाटील

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महापालिका आणि अग्निशमन विभागाला आदेश

    टिंबर मार्केटसह मार्केट यार्डमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर दिलेत आदेश

    वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांची पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल – चंद्रकांत पाटील

  • 29 May 2023 03:09 PM (IST)

    डोंबिवली | प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध देऊन चालकाची लूट

    प्रवाशी बनून लुबाडणाऱ्या दोन सराईत आरोपींना विष्णूनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

  • 29 May 2023 03:02 PM (IST)

    जेजुरी | माजी मंत्री विजय शिवतारेंनी घेतली जेजुरीतील ग्रामस्थांची भेट..

    जेजुरीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार..

    जेजुरीचा वाद मुख्यमंत्र्यांपुढे मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन..

    बाहेरील विश्वस्तांमुळे जेजुरीचं नुकसान; जेजुरीकरांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार

    विजय शिवतारे यांची माहिती..

  • 29 May 2023 03:01 PM (IST)

    नागपूर कोराडी 1320 मेगावॅटच्या वीजसंचाच्या जनसुनावणीत 90 टक्के लोकांची नव्या युनीटची मागणी

    कोराडीच्या आजूबाजूच्या 13 ग्राम पंचायतीतील बहुतांशी सरपंच आणि लोकप्रतिनिधींच्या प्रकल्पाला पाठिंबा
    प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीमुळे 90 टक्के लोकांचा नव्या वीज संचाला पाठिंबा
    स्थानिक नागरिकांनी जनसुनावणीत प्रकल्पाच्या बाजून व्यक्त केली आपली मतं
    प्रकल्पाचा विरोध करणाऱ्यांचा स्थानिक नागरिकांनी केला विरोध
    काही संघटनांचा विरोध, पण 90 टक्के लोक नव्या कोराडी औष्णीक वीज प्रकल्पाच्या बाजूनं
    जनसुनावणीत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांचा पाठिंबा
  • 29 May 2023 02:58 PM (IST)

    एकनाथ खडसेंचं डोकं तपासायला लागणार आहे – गिरीश महाजन

    एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
    भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका
    मला जास्त बोलायला लावू नका
    मी तोड उघडलं तर लोकं तुमच्या तोंडाला काळ लावतील
  • 29 May 2023 02:56 PM (IST)

    जाणीवपूर्वक न झालेले विषय उकरून काढायचे आणि भांडणं लावायची असे एवढंच काम विरोधकाना उरलंय

    मी स्वतः महाराष्ट्र सदनात राहतो, पुतळे तिथेच होते

    कुणीही जाणीवपूर्वक असं कृत्य करत नाही

    विरोधी पक्षाच्या लोकांना कुठलेही काम राहिलेले नाही

    शिवसेना खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया

  • 29 May 2023 02:47 PM (IST)

    माजी मंत्री विजय शिवतारेंनी घेतली जेजुरीतील ग्रामस्थांची भेट

    जेजुरीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार

    जेजुरीचा वाद मुख्यमंत्र्यांपुढे मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन

    बाहेरील विश्वस्तांमुळे जेजुरीचं नुकसान

    जेजुरीकरांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार

    विजय शिवतारे यांची माहिती

  • 29 May 2023 02:46 PM (IST)

    आम्ही एका बाजूला मोदी सरकारची कारकीर्द लोकसमोर घेऊन जात आहोत – प्रवीण दरेकर

    जागा वाटपबाबत महाविकास आघाडीत एकमत होऊ शकत नाही

    आम्ही आधीपासूनच सांगत आहोत

    एकमेकांचा पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे

    वेगवेगळ्या विचारधारा घेऊन आलेत

    त्यागी परंपरा लागते, भाजप त्याग करून वर आलं आहे

    संजय राऊत यांनी त्यागाची भाषा करू नये

    स्वतः राजीनामा देऊन दुसऱ्या शिवसैनिकांना संधी देणार आहेत का?

    सत्ता मिळाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे पालकमंत्री

    ही यांची त्यागाची परंपरा

  • 29 May 2023 02:44 PM (IST)

    हिंगणघाट रेल्वे स्थानकावर जयपूर-चेन्नई एक्सप्रेसचे स्वागत 

    चालकाचे शाल, श्रीफळ देत केले स्वागत
    खासदार रामदास तडस यांनी ट्रेनचे स्वागत व हिरवी झेंडी दाखवत मानले रेल्वे प्रशासनाचे आभार
    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनीही केले स्वागत
    हिंगणघाट येथील रेल्वे स्थानकावर तीन रेल्वे गाड्यांचे थांबे मंजूर
    खासदार रामदास तडस, रेल यात्री संघासह अनेकांचा सुरू होता लढा
    राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदिले यांनी दिला होता रेल रोकोचा इशारा
  • 29 May 2023 02:43 PM (IST)

    गिरीश महाजन परदेशात थंड हवा खाण्यासाठी जात आहेत

    शेतकऱ्यांबाबत यांना बोलण्यास वेळ नाही
    मुख्यमंत्र्याच्या जवळचे सांगतात तुमची पत आणि प्रतिष्ठा असेल
    तर शेतकऱ्यांसाठी खर्च करून दाखवा
    एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना सवाल
  • 29 May 2023 02:42 PM (IST)

    जेजुरी देवस्थान विश्वस्त निवड वाद

    जेजुरीकरांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस

    खोमणे प्रतिष्ठानने भक्त निवासासमोर मेंढ्या आणत व्यक्त केला निषेध

    विश्वस्त निवडीत राजकीय हस्तक्षेपामुळे जेजुरीकर संतप्त

  • 29 May 2023 02:41 PM (IST)

    मी याचिका केली त्या नंतर एनजीटीने डिमॉलिशनचे मान्य केले – किरीट सोमय्या

    पण अनिल परबकडे रोख पैसे कुठून आले, हे उत्तर द्यावाच लागेल

    जे जेल आणि बेलमध्ये आहेत, त्यांनी जास्त बोलू नये

    त्यांनी समुद्राची जागा बळकवली आहे

    हे फक्त तात्पुरताना निर्णय आहे, अजून हिशोब हा द्यावाच लागणार

    त्यांनी गैर व्यवहार केले आहेत

    मुख्य निर्णय येणार आहे आणि हे आता फक्त तात्पुरता दिलासा आहे

  • 29 May 2023 02:36 PM (IST)

    रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर शिवसेनेच्या गजानन पाटील यांची निवड

    रत्नागिरीत ठाकरे गटाला उदय सामंत यांचा दे धक्का

  • 29 May 2023 02:34 PM (IST)

    भारतीय जनता पार्टीचा देशभरात पक्षाचे अत्याधुनिक कार्यालय उभारण्याचा संकल्प

    केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हा संकल्प केला होता

    महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या नवीन कार्यालयाची उभारणी सुरुय

    कोल्हापुरातील भारतीय जनता पक्षाच्या या नवीन कार्यालयाचे काम नुकतेच पूर्ण झालंय

    महाराष्ट्रातील हे पक्षाचे पहिलंच अत्याधुनिक कार्यालय ठरलंय

    मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं

    यावेळी जिल्ह्यातील मान्यवरांनी चंद्रकांत दादांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

  • 29 May 2023 02:28 PM (IST)

    खासदार बाळू धानोरकर यांच्यावर आयुसीयुमध्ये उपचार सुरू 

    त्यांच्या प्रकृतीत किंचीतशी सुधारणा झाल्याची माहिती

    मल्टीऑर्गन इन्फेक्शन झालं आहे

    मेदांता हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत

    काल रात्रीपासून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत

  • 29 May 2023 02:27 PM (IST)

    महावितरण कार्यालयासमोर गंगापूर तालुक्यातील नागरिकांचे आंदोलन सुरू

    सरपंच पतीवर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आंदोलन सुरू

    गावाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणी करणाऱ्या सारपंचवर केला होता गुन्हा दाखल

    गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू

  • 29 May 2023 02:24 PM (IST)

    अनिल परब यांचे स्पष्टीकरण हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत – किरीट सोमय्या

    त्यांना रिसॉर्ट अर्धा तोडावा लागला आहे

    कारवाई तर झालीच आहे, हिशोब तर द्यावा लागणार आहे

  • 29 May 2023 02:23 PM (IST)

    सोलापूरातील बेडवर खिळलेल्या शिवसैनिकाची मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंना आर्त हाक

    एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांची शिवसेनेकडे औषधोपचाच्या मदतीसाठी आर्त हाक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आर्थिक मदत न देता केवळ औषधोपचाराचा खर्च द्यावा अशी मागणी

    मी बरा झाल्यानंतर काम करून आपले सर्व पैसे परत देईन, त्यामुळे आत्ता मला माझ्या पायावर उभे करा

    मी हाडाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी कोणाकडेही भीक मागणार नाही. फक्त मदत मागतोय

    सरकार ज्या योजना आणतेय, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात का हे मुख्यमंत्र्यांनी पहावं

    जर सत्ता असूनही शिवसैनिकाचे ही अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय?

  • 29 May 2023 02:19 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवा रामभरोसे

    गोंदिया जिल्ह्यात 50 ते 60 टक्के जागा अजूनही रिक्त

    रुग्णांची मोठ्या प्रमाणात होते हेळसांड

    जागा रिक्त असल्याचा फटका शहरी भागात सोबतच ग्रामीण रुग्णालयांना बसतो

    लवकरात लवकर आरोग्य विभागाची भरती करावी अशी नागरिकांची मागणी

  • 29 May 2023 02:17 PM (IST)

    बारामतीतील काटे आयकॉन प्रकल्पाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

    नविन पिढी पुढे काही करतेय – अजित पवार

    मी राजकीय सुरुवात केली त्यावेळी अनेकांनी साथ दिली

    87-88 ला मी कामाला सुरुवात केली

    आपला सगळा परिसर वाढतोय

    लवकरच नविन बसस्थानकाचे उद्घाटन

    नवीन पोलिस ठाणे इमारत, वाचनालयही सुरु होतंय

    प्रशासकीय भवनाशेजारी मोठं उद्यान

    कोणत्याही शासकीय निधीशिवाय हे 7 एकर जागेत उद्यान

    सीएसआरमधून हे काम करतोय

    भागीदारीत व्यवसाय करताना कोणतेही वाद होवू देऊ नका

    बारामतीत कायदा सुव्यवस्था पाळलाच पाहिजे

    कायदा हतात घेण्याचं काम कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये

    माझ्या जवळचा असला तरी कारवाईत हयगय नको

    बारामती बदलत असताना सर्वाना सुरक्षित वाटलं पाहिजे

    वाहतुकीच्या अनुषंगाने अनेक बदल

    लोकसंख्या वाढवण्यात आपण कमी पडत नाही, अजितदादांच्या कानपिचक्या

    माझ्या परिने जितकी सुधारणा होईल तितकी करेल, तुम्हीही वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे

    रस्ते मोठे झाले तरी वेगावर मर्यादा गरजेची

  • 29 May 2023 02:12 PM (IST)

    मंठा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे आसाराम पाटील बोराडे यांची निवड

    आसाराम बोराडे उद्धव ठाकरे गटाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख

    तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव बोराडे यांची निवड

    गेली पाच वर्षे या बाजारसमितीवर भाजपा आमदार आणि माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची सत्ता होती

    यावेळी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 12 महाविकास आघाडीचे सदस्य निवडून आले

  • 29 May 2023 02:11 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न

    विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत आहे

    प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे

    तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्या सूचना

    राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा

    तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे त्वरित सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  • 29 May 2023 12:58 PM (IST)

    मंत्रालयात प्रवेश करताना आता टोकन पद्धत

    – मंत्रालयातील वाढत्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी टोकन पद्धत सुरु करण्यात येणार आहे.

    – मंत्रालयात दररोज जवळपास पाच हजार अभ्यागत येत असतात.

    – या गर्दीचा ताण मंत्रालयाची सुरक्षा आणि इतर व्यवस्थेवर येतो.

    – सर्वच लोक एकदा मंत्रालयात प्रवेश करतात हे टाळण्यासाठी टप्प्या-टप्प्याने येत्या काळात लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

  • 29 May 2023 12:55 PM (IST)

    लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 23 कोटींचा अपहार, मुख्य आरोपीला अटक

    – लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 23 कोटींचा अपहार प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

    – लातुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असलेल्या मनोज फुलबोयने याने अभिलेखात घोळ करून 23 कोटी रुपयांचा अपहार केला होता.

    – अपहार करताना त्याने आपला भाऊ अरुण फुलबोयने याच्या तन्वी ऍग्रो एजन्सीच्या नावावर कोट्यवधी रुपये ऑनलाइन पाठवले होते.

    – मुख्य आरोपी असलेला अरुण फुलबोयने गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.

    – त्याला आता औरंगाबाद येथून लातुर पोलिसांनी अटक केली आहे.

  • 29 May 2023 12:50 PM (IST)

    अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने सांगितला दावा

    – अमरावतीमध्ये काँग्रेसला उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

    – अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाटेला आहे.

    – मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे हा आमचा अट्टाहास आहे असे त्या म्हणाल्या.

    – अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच प्रभुत्व आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली

  • 29 May 2023 12:44 PM (IST)

    10 कोटी रूपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, आजरा पोलिसांची कारवाई

    – आजरा मार्गावर गवसे नजिक तब्बल 10 किलो 688 ग्रॅम वजनाची सुमारे 10 कोटी 74 लाख रूपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

    – या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्ग कुडाळ येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    – आजरा पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

    – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आजरा मार्गे व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आजरा पोलीसांनी ही धडक कारवाई केली.

    – आरोपींकडून एक चारचाकी आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली.

  • 29 May 2023 12:32 PM (IST)

    किरीट सोमैया यांना माफी मागावी लागेल – अनिल परब

    – सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

    – खोटे आरोप करण्यात आले.

    – त्यांना माफी मागावी लागेल

    – आम्ही जो १०० कोटींचा दावा केला आहे तो द्यावा लागेल.

    – माझी जेवढी बदनामी करण्याची होती तेवढी करून झाली.

    – पण आमचा कोर्टावर विश्वास आहे.

  • 29 May 2023 12:27 PM (IST)

    साई रिसॉर्ट प्रकरणी माझी नाहक बदनामी केली – अनिल परब

    – हरित लवादामध्ये साई रिसॉर्टमध्ये काहीच सापडले नाही.

    – आपली अब्रू जाईल म्हणून हे प्रकरण सोमय्या यांनी मागे घेतले.

    – खोटे गुन्हे आहेत हे हायकोर्टात आम्ही सिद्ध करू.

    – माझ्यामार्फत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

    – रिसॉर्ट चालू झालेच नाही तर सांडपाणी समुदात जाईलच कसे.

  • 29 May 2023 12:19 PM (IST)

    पुण्याच्या प्रसिद्ध जंगली महाराज रस्त्यावर जेसीबी चालविण्याची नामुष्की

    – मागील ४८ वर्षांपासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्ता आता खोदला जाणार आहे.

    – चेंबर तयार करणे, पादचारी मार्गावर पावसाळी गटारासाठी पाइप टाकणे अशी कामे या रस्त्यावर केली जाणार आहेत.

    – त्यामुळे ४८ वर्षापासून एकही खड्डा पडला नाही अशी खाती असणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावर आता जेसीबी चालविण्याची नामुष्की ओढवणार आहे.

    – गटारांची क्षमता वाढविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा पालिकेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आता खोदला जाणार आहे.

  • 29 May 2023 12:11 PM (IST)

    जेजुरीच्या ग्रामस्थांचे आंदोलन पेटले, उद्या पुण्यातील विधान भवनावर मोर्चा

    – जेजुरीच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली.

    – ग्रामस्थांच्या आंदोलनास अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

    – हे आंदोलनकर्ते उद्या पुण्यातील विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत.

    – न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार असा आंदोलनकर्त्यांचा निर्धार आहे.

    – महिलाही या आंदोलनात सहभागी होणार आहेत

  • 29 May 2023 12:04 PM (IST)

    ठाण्यात पहिली क्लस्टर योजना किसन नगर भागात, पायाभरणी जून महिन्यात

    – ठाणेकरांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या क्लस्टर योजनेतील इमारतीच्या पायाभरणीचा मुहूर्त जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

    – ठाण्यात अनेक जुन्या इमारती असून या इमारती कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटना वाढत आहेत.

    – त्यामुळे ठाण्यात क्लस्टर योजना आखण्यात आली होती. अखेर या क्लस्टर योजनेला मुहूर्त मिळाला आहे.

    – जुनच्या पहिल्या आठवड्यात या योजनेतील इमारतीच्या पायाभरणीला सुरुवात होणार आहे.

    – हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सिडकोची मदत घेतली असून तसा सामंजस्य करारदेखील झाला आहे.

    – किसन नगर भागात ही पहिली क्लस्टर योजना राबवण्यात येणार असून मुंबई महापालिकेचा 77 गुंठे भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहे.

    – या ठिकाणी उंच इमारती बांधून सर्वप्रथम येथे नागरिकांना स्थलांतरित केले जाईल. त्यानंतर क्लस्टर योजनेतील इमारतींना सुरुवात केली जाणार आहे.

  • 29 May 2023 12:00 PM (IST)

    पुतळे हटवणाऱ्यांवर कारवाई करावी – भुजबळ यांची मागणी

    जयंत पाटलांची शिदे, फडणवीस सरकारवर टीका

    अहिल्यादेवी, सावित्रीबाईचे पुतळे हटवण्याची हिंमत कशी होते?- भुजबळ

    महाराष्ट्र सदनातसरकारचा द्वेष दिसला- भुजबळ

  • 29 May 2023 11:57 AM (IST)

    लेंडेगाव तलावात आढळला मानवी सांगाडा, पोलीस तपास सुरु

    – लातूर जिल्ह्यातल्या लेंडेगाव येथील तलावात मानवी सांगाडा आढळला आहे.

    – हा सांगाडा नेमका कुणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

    – किनगावपासून जवळच असलेल्या लेंडेगाव येथील तलावा जवळ मुले खेळायला गेली होती त्यांना हा मानवी सांगाडा आढळला.

    – मानवी कवटी आणि शरीराची काही हाडे यांच्याबरोबरच कपडेही पोलिसांना आढळले.

    – पोलिसांनी ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत तपास सुरु केला आहे.

  • 29 May 2023 11:35 AM (IST)

    पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसंदर्भात संजय राऊत यांचे ट्विट

    संवीधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा त्याग करावा लागेल

    पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतीक्रिया

  • 29 May 2023 11:29 AM (IST)

    हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मस्तानी अम्मा दर्गा उर्स शरीफला नाशिकमध्ये सुरुवात

    संदलमध्ये विविध फकीरांचा सहभाग

    विविध धार्मिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

  • 29 May 2023 11:21 AM (IST)

    ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणूका घड्याळ चिन्हावर लाढवणार

    ठाकरे गट राष्ट्रवादीत विलिन होणार, नितेश राणेंचा दावा

  • 29 May 2023 10:45 AM (IST)

    मुंबई : आज भाजपाची पत्रकार परिषद

    आज दुपारी १२ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मोदी @9 या कार्यक्रमाची माहिती देणार

    मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोगा मांडणार

    फडणवीस, बावनकुळे, निर्मला सीतारमण राहणार उपस्थित

  • 29 May 2023 10:35 AM (IST)

    मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणं मूर्खपणा आहे – छगन भुजबळ

    मंदिरात वस्त्रसंहिता लागू होत असेल तर पुजाऱ्यांनीही सदरा घालावा

    मविआतील जागावाटपाबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील, छगन भुजबळ यांनी केले स्पष्ट

  • 29 May 2023 10:27 AM (IST)

    भंडाऱ्यात वादातून एका तरूणाची हत्या

    ३ हल्लेखोरांना स्थानिकांनी दिला चोप, त्यात एकाचा मृत्यू

    शहरात तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

  • 29 May 2023 10:21 AM (IST)

    मान्सूनपूर्व आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक

    बैठकीत राज्यातील मान्सूनपूर्व स्थितीचा घेणार आढावा

    आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास काय तयारी, याचीही घेणार माहिती

  • 29 May 2023 10:16 AM (IST)

    जो जिंकेल त्याची जागा , या सूत्राने पुणे “लोकसभा” पोट निवडणूक महाविकास आघाडीस जिंकता येईल – संजय राऊत

    ‘कसेल त्याची जमीन’ याप्रमाणे ‘जो जिंकेल त्याची जागा’ हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणूक, महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाला थोडा थोडा त्याग करावाच लागेल ! असेही राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

  • 29 May 2023 10:07 AM (IST)

    आसाम : गुवाहाटीमध्ये रस्ते अपघातात 7 ठार, अनेक जखमी

    आसाममधील गुवाहाटी येथील जलुकबारी भागात रविवारी रात्री भीषण अपघात झाला.

    या अपघातात सात जण ठार तर अनेक जण जखमी झाले.

  • 29 May 2023 09:50 AM (IST)

    जेजुरी विश्वस्त मंडळ निवडीवरुन वाद

    बारामती : जेजुरी विश्वस्त मंडळ निवडीवरुन वाद

    – जेजुरीकर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भेटीला

    – अजित पवार यांच्याकडे मांडणार जेजुरीकरांच्या व्यथा

    – न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार

    – आंदोलनाचा आज चौथा दिवस

    – आंदोलनस्थळी मेंढ्यांचाही असणार ठिय्य्या…

    – मानकऱ्यांकडून अनोख्या पद्धतीने केला जाणार निषेध

  • 29 May 2023 09:40 AM (IST)

    उन्हाचा तडाखा वाढल्याने तरुण विहिरीत पोहण्याचा आनंद घेत आहेत

    सिन्नर परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्याने तरुण विहिरीत पोहण्याचा आनंद घेत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्याकरता दुपारच्या वेळेस शेतकरी तरुण विहिरीच्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील धोंडविरनगरला दिसत आहे.

  • 29 May 2023 09:31 AM (IST)

    बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरवात

    बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरवात होणार आहे

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे

    बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुनः परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहेत

  • 29 May 2023 09:31 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली

    मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

    यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.

    भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

    धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाले आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • 29 May 2023 09:09 AM (IST)

    मंदिराचे पावित्र्य जतन व्हावे यासाठी प्रस्ताव

    – मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये देखील मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता

    – साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव

    – स्थानिक गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर या निर्णयावर विचार करू –  सप्तशृंगी मंदिर समितीच्या विश्वस्तांची माहिती

    – दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये काही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा झाला आहे निर्णय

    – ड्रेस कोड लागू करण्यास विश्वस्त मंडळ सकारात्मक

    – मंदिराचे पावित्र्य जतन व्हावे यासाठी प्रस्ताव

    – अंतिम निर्णय मात्र भाविक आणि ग्रामस्थांशी चर्चा करूनच

  • 29 May 2023 09:04 AM (IST)

    ग्रामीण भागातील शेतीच्या कामाला वेग, बदलत्या हवामानामुळे शेतककरी चिंतेत

    परळी : परळी (parali) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळा (rain update) तोंडावर आला असून शेतीची कामे करण्यास वेग आला आहे. शेतीची मशागत, पाळी घालने, धसकट विचणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनावश्यक तण उगवणार नाही याची देखील शेतकऱ्यांनी काळजी घेतली आहे. मात्र याचबरोबर आवश्यकतेनुसार शेतात पाणी साठवणे व निचरा होण्याची व्यवस्था करणे, यासाठी बांधबंदिस्ती करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. सध्या शेतातील कामे (maharashtra farmer news) करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असल्याने घरातील सर्व जण एकत्र येऊन शेतात कामे करत आहेत.

  • 29 May 2023 08:59 AM (IST)

    बारावीची पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्टमध्ये घेण्यात येणार

    या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू

    संबंधित विद्यार्थ्यांना  http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाद्वारो अर्ज भरावा

    राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती

  • 29 May 2023 08:56 AM (IST)

    पुणे मेट्रोत चोरट्यांच्या अजब चोरीचा प्रकार उघडकीस

    मेट्रोच्या सिग्नल यंत्रणेतील तांब्याच्या तारा चोरट्यांना लांबवल्याची धक्कादायक घटना

    बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात घडली घटना

    चोरट्यांनी 69 हजार 352 रुपयांच्या तांब्याच्या तारा लांबवल्याचा प्रकार उघडकीस

    या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा केला दाखल

  • 29 May 2023 08:49 AM (IST)

    नाशिकमध्ये मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता

    साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या वणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव

    स्थानिक गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर या निर्णयावर विचार करू – सप्तशृंगी मंदिर समितीच्या विश्वस्तांची माहिती

    दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये काही मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा झाला निर्णय

    ड्रेस कोड लागू करण्यास विश्वस्त मंडळ सकारात्मक

    मंदिराचे पावित्र्य जतन व्हावे यासाठी प्रस्ताव

    अंतिम निर्णय मात्र भाविक आणि ग्रामस्थांशी चर्चा करूनच

  • 29 May 2023 08:42 AM (IST)

    कोल्हापूर | वैयक्तिक वादातून तरुणाला अपहरण करून मारहाण

    कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील घटना

    तीर्थराज या तरुणाचा अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

    नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

    घटनेप्रकरणी चार संशयिताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली अटक

  • 29 May 2023 08:35 AM (IST)

    कोल्हापुरातील रंकाळा तलावावरील विकासकाम हेरिटेज कमिटीचा मान्यते अभावी रखडली

    हेरिटेज कमिटीची मान्यता नसल्याने दगडी फरशी बसवण्याचे काम लांबलं

    नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रंकाळा तलावाला दिली होती भेट

    तलाव सुशोभीकरणासाठी 15 कोटींचा निधी देखील केला आहे मंजूर

    हेरिटेज कमिटीच्या मान्यतेने तात्काळ काम सुरू करण्याच्या श्रीकांत शिंदे यांनी केले होते सूचना

    मात्र श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनंतर ही महिनाभर हेरिटेज कमिटीची बैठकच नाही

  • 29 May 2023 08:28 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त नियुक्तीची प्रक्रिया सुरू

    पुढच्या पाच वर्षांसाठी होणार नियुक्ती

    इच्छुक उमेदवारांना नाशिक धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात करावा लागणार अर्ज

    स्थानिक हिंदू भक्तांमधून नियुक्त करण्याच्या चार सदस्यांसाठी होणार विश्वस्त नियुक्ती

  • 29 May 2023 08:21 AM (IST)

    भाजपचे शिष्टमंडळ आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार

    शहरातील नालासफाई तसेच पावसाळी ड्रेनेज लाईन सफाई संदर्भात घेणार भेट

    भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली घेणार भेट

    आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून निवेदन देणार

    शहरातील पावसाळी कामांची आयुक्तांकडून घेणार माहिती

  • 29 May 2023 08:14 AM (IST)

    सोलापूर | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता

    दोन महिन्यांपूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त झाल्याने कुलगुरूपद आहे रिक्त

    राज्यपाल भवनकडून नोटिफिकेशन निघाल्यानंतर तीस दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांना कुलगुरू पदासाठी अर्ज करता येणार

    राज्यपाल भवनाच्या चार सदस्यीय उच्चस्तरीय समितीकडून नवीन कुलगुरूंची होणार निवड

  • 29 May 2023 08:07 AM (IST)

    औरंगाबाद | राज्यातील 4500 तलाठ्यांच्या होणार बदल्या

    जूनमध्ये राज्यातील तलाठ्यांच्या होणार बदल्या

    वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बदल्यांचे निर्णय

    चार हजार पाचशे तलाठी भरतीची जाहिरात जूनमध्ये निघणार असल्याची माहिती

    राज्यातील 518 मंडळांना मंडळ अधिकारी नसल्याने तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी भरती करावी असे आदेश

  • 29 May 2023 08:00 AM (IST)

    पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच

    मध्यरात्री 2 वाजता मार्केटयार्ड, गोलमार्केट येथे आगीची घटना

    पुठ्ठ्याच्या गोडाऊनला आग, आगीचे कारण अस्पष्ट

    अग्निशमन दलाकडून 9 वाहनांमार्फत पहाटे 4 वाजता आगीवर नियंत्रण

    वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने गोडाऊन शेजारील रहिवाशी सुरक्षित

  • 29 May 2023 07:52 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर

    मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

    छत्रपती संभाजी नगरची महापालिका मनसे लढणार ताकतीने

    राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकारी बैठका, मेळावा आणि नागरिकांशी साधला जाणार संवाद

    छत्रपती संभाजी नगरात राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीला सुरूवात

  • 29 May 2023 07:40 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात

    पहाटे 6 वाजल्यापासून अजितदादा करताहेत विकासकामांची पाहणी

    बारामतीतील विविध विकासकामांचा अजितदादांनी घेतला आढावा

    विकासकामांचा दर्जा राखण्याच्या अजित पवार यांच्या सूचना

    कामांची गती कायम ठेवण्याचेही दिले निर्देश

  • 29 May 2023 07:35 AM (IST)

    नाशिकमध्ये पहिल्यांदाच शिक्षण संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल

    अनधिकृत शाळा बंद न केल्याने संचालकावर गुन्हा दाखल

    नाशिकरोड येथील एका शाळेने शाळा बंद करण्याचा आदेश न पाळल्याने संबंधित संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

    बालकांच्या मोफत आणि सक्तीचे शिक्षण अधिनियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार

  • 29 May 2023 07:33 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 11 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

    आकुर्डी, बारामती, चिंचवड, दौंड, देहूरोड, हडपसर, केडगाव, लोणावळा, पुणे जं., शिवाजीनगर पुणे, तळेगाव स्थानकांचा समावेश

    या यादीत राज्यातील जवळपास शंभरपेक्षा जास्त स्थानकांची नावेही देण्यात आली आहेत

    या योजनेव्दारे प्रवाशांच्या सुविधा अंतर्गत स्टेशन अपग्रेडेशनची कामे केली जाणार

  • 29 May 2023 07:31 AM (IST)

    वरळी-सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा

    मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचं भाजपकडून स्वागत

    शिंदे-फडणवीस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सावरकर गौरव दिन म्हणून साजरी केली

Published On - May 29,2023 7:27 AM

Follow us
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.