Maharashtra Budget Session 2023 LIVE : संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ, सभागृह तहकूब

| Updated on: Mar 02, 2023 | 6:05 AM

Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 LIVE Updates : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिकच गाजणार असल्याची चिन्ह आहेत.

Maharashtra Budget Session 2023 LIVE : संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ, सभागृह तहकूब
Maharashtra Budget Session Image Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज विरोधकांकडून कोणत्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर, विरोधकांचा वार सत्ताधारी कसा पलटवून लावणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Mar 2023 11:08 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची 5 मार्चला खेडमध्ये सभा

    उद्धव ठाकरेंची 5 मार्चला खेडमध्ये सभा

    ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची माहिती

  • 01 Mar 2023 08:42 PM (IST)

    मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

    मुंबई : 

    मराठा आरक्षण बाबत दोन दिवस वाट पाहू अन्यथा गनिमी कावा करत रस्त्यावर उतरू

    मराठा क्रांती मोर्चाकडून राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

    आंदोलनाची दखल न घेतल्यानं राज्य सरकारचा निषेध

    सरकार कोणतंही असो मराठा नेत्यांनी बलिदान देऊनही कुणी न्याय मिळवून दिला नाही (विनायक मेटे,अण्णासाहेब जावळे)

    यांना एका रात्रीत पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळतं मग मराठा आरक्षणाच्या निर्णयाला इतका विलंब का?

    आझाद मैदानातील आजचं आंदोलन थांबलं असलं तरी उद्या सकाळी १० वाजता पुन्हा आंदोलनात उतरू

  • 01 Mar 2023 07:39 PM (IST)

    महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री यांची सद‍िच्छा भेट

    नवी दिल्ली : 

    महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज नार्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.

    बैस यांनी केंद्रीय गृह मंत्री शाह यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली. यावेळी केंद्रीय गृह मंत्री शाह यांनी बैस यांच्यासोबत महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.

  • 01 Mar 2023 06:51 PM (IST)

    ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी रहा सावध

    फसवणुकीपासून वाचण्यासाठी नवीन गाईडलाईन्स

    राष्ट्रीय देयके महामंडळाच्या नवीन सूचना फॉलो करा

    2022 मध्ये देशात युपीआयच्या माध्यमातून 12,6000 अब्ज रुपयांहून अधिक व्यवहार

    वापरकर्त्यांनी ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी नक्की वाचा सूचना

  • 01 Mar 2023 06:03 PM (IST)

    गौतम अदानी यांच्या संपत्ती वाढ

    एका महिन्यानंतर येऊन धडकली आनंदवार्ता

    अदानी समूहाच्या पाच कंपन्यांचे शेअर वधारले

    अदानी यांच्या पडझडीला लागला ब्रेक

    श्रीमंतांच्या यादीत अदानी आता टॉप-30 मध्ये दाखल, वाचा बातमी 

  • 01 Mar 2023 05:01 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज

    केंद्र सरकारने वाढवला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

    मोदी सरकारने बुधवारी महागाई भत्ता वाढविण्यास दिली मंजुरी

    जानेवारी आणि फेब्रवारीची थकबाकीही मार्च महिन्यात मिळणार

    पंतप्रधान होळीपूर्वी याविषयीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता, वाचा बातमी

  • 01 Mar 2023 03:49 PM (IST)

    कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचा उडाला फज्जा

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयावर कॉपीचा सुळसुळाट,

    12 वि च्या फिजिक्स च्या पेपर दरम्यान कॉपी पुरवताना चे विडिओ माध्यमाच्या हाती,

    कॉपी पुरविण्यासाठी केंद्रावर झुंबड.

  • 01 Mar 2023 03:35 PM (IST)

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी आपचे आमदार आणि नगरसेवकांची घेणार बैठक

    काल आपचे आमदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी दिल्ली मंत्रिमंडळाचा दिला होता राजीनामा

  • 01 Mar 2023 03:32 PM (IST)

    दिल्ली : पुल बंगश मेट्रो स्टेशनजवळ रोशनारा रोडवरील जयपूर गोल्डन ट्रान्सपोर्टमध्ये लागली आग

    अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल

    दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती

    आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही

  • 01 Mar 2023 02:27 PM (IST)

    नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरळीतपणे कांदा लिलाव सुरू

    सकाळपासून जवळपास 1500 ते 2000 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल

    मात्र कांद्याचे भाव स्थिर असल्याचे चित्र

    जवळपास 400 ते 600 रुपये क्विंटल भाव सुरू

    इथून मागे विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • 01 Mar 2023 02:24 PM (IST)

    पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना राज्याचे नेतृत्व मिळवून द्यायचं आहे : संजय राऊत

    कोल्हापुरातून गेलेला संदेश राज्यभर जातो हा इतिहास आहे

    पानगळ झाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही

    नवीन वसंत फुलायला सुरुवात झाली आहे

    आमदारांना द्यायला 50 खोके आहेत, मात्र महागाई कमी करायला पैसे नाहीत, संजय राऊत यांची घणाघाती टीका

  • 01 Mar 2023 01:38 PM (IST)

    यवतमाळ: पोलीस ठाण्याच्या आत अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न

    यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घटना

    अवैध धंद्याची तक्रारीची स्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला सहाय्यक पोलिस निरीक्षकाने मारहाण

    मारहाण झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली, त्यातून आत्मदहनाचा इशारा

    तक्रार बेदखल झाल्याचा आरोप करीत चक्क पोलीस ठाण्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्म्हदहन करण्याचा प्रयत्न

    पोलिसांनी तक्रारदार तरुणाला पकडल्याने मोठा अनर्थ टळला

    समाधान राऊत रा. कलगाव असे आत्म्हदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव

  • 01 Mar 2023 12:57 PM (IST)

    गोंधळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

    संजय राऊत यांच्या विधानावरुन प्रचंड गोंधळ

    विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज तहकूब

    संजय राऊत यांनी विधिमंडळला चोर म्हटलाचा आरोप

    दोन दिवसांत चौकशी करुन विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार

  • 01 Mar 2023 12:53 PM (IST)

    मोठी बातमी : संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा निर्णय ८ मार्च रोजी, नक्की काय झाले ?

    संजय राऊत यांच्या विधान विरोधात हक्कभंगाची कारवाई

    मुंबई : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले. यावरून शिवसेना आणि भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले.

  • 01 Mar 2023 12:40 PM (IST)

    टीका कुणाची ? आणि टार्गेट कोण ? संजय शिरसाट यांनी काढले उद्धव ठाकरे गटाचे वाभाडे

    शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात ज्या महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. ज्या विधिमंडळात ते बसत होते त्या विधिमंडळाला चोर म्हटले हे शोभत नाही. महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व आहे ते आदित्य ठाकरे त्यांना चोर म्हटला. अजित पवारला चोर म्हटलं. भुजबळ यांना चोर म्हटला, भास्कर जाधव यांना चोर म्हटलं, नाना पटोले यांना चोर म्हटले हा सभागृहाचा अपमान आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना चेतवण्याचा प्रयत्न केला.

    भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आचार्य अत्रे यांच्यापासून अनेक मोठे नेते या विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्या विधिमंडळाला चोर म्हटले. या इसमाचा इतिहास काय आहे ? एका महिलेबद्दल जे संभाषण केले त्याची क्लीक देशाने ऐकली. महिलांविषयी अपशब्द ही यांची संस्कृती. काय दोष होता त्या महिलेचा. जो स्वतः आर्थिक गुन्ह्यात जामिनावर आहे तो इसम आरोपी आहे तो महाराष्ट्र विधिमंडळाला चोर म्हणतोय. त्याबद्दल त्यांच्यावर हक्कभंग दाखल झालाच पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली.

  • 01 Mar 2023 11:53 AM (IST)

    IND vs AUS Test : Rohit Sharma ची विकेट खरंतर स्टार्कची होती, पण कॅप्टन स्मिथमुळे असं नाही घडू शकलं

    IND vs AUS 3rd Test : खरंतर रोहित शर्माची विकेट मिचेल स्टार्कची होती. पण कॅप्टन स्टीव्ह स्मिथमुळे ही विकेट कुहनेमनच्या खात्यात जमा झाली. वाचा सविस्तर….

  • 01 Mar 2023 11:52 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : भारताला धक्क्यावर धक्के, कुहनेमन-लियॉन जोडीने वाट लावली

    IND vs AUS 3rd Test : पहिल्या तासाभरातच टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्पिन बॉलर्सनी फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलला. वाचा सविस्तर….

  • 01 Mar 2023 11:19 AM (IST)

    संजय राऊत अडचणीत येणार

    संजय राऊत यांनी विधिमंडळास चोर म्हटल्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ

    कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

    सत्ताधारी सदस्य आक्रमक

    हक्कभंग दाखल करण्याची नोटीस

    विधिमंडळास चोर म्हटले त्या वक्तव्याचे समर्थन नाही- अजित पवार

    नियम पाळले गेले पाहिजे. त्या बातमीत तथ्य आहे का हे तपासून पहा- अजित पवार

  • 01 Mar 2023 11:17 AM (IST)

    सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

    सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

    खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आशिष शेलार यांचा आक्षेप

    खासदार संजय राऊत यांच्यावर विधानसभेत हक्कभंग आणणार?

    आशिष शेलार यांच्या आक्षेपानंतर सभागृहात गोंधळ

    सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

  • 01 Mar 2023 11:06 AM (IST)

    विधिमंडळाला चोर म्हणणं चुकीचं- अजित पवार

    कोणत्याही नेत्याकडून अशी वक्तव्यं नको

    चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही

    प्रत्येकानं बोलताना शिस्त बाळगावी

    शेलारांच्या मताशी मी सहमत

    विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांचं वक्तव्य

  • 01 Mar 2023 11:04 AM (IST)

    टाटा बिसलरी करार फिस्कटला

    करार होण्यापूर्वीच  खोडा

    दोन्ही कंपन्यांमधील बोलणी थांबली

    या कारणामुळे करारावरील बोलणी थांबल्याचे वृत्त

    टाटा समूह खरेदी करणार होता बिसलरी

    भारतीय बाजारात बिसलरीचा 60 टक्के वाटा, वाचा बातमी 

  • 01 Mar 2023 10:58 AM (IST)

    चोरमंडळ भोवणार, संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग?

    ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे

    संजय राऊत यांनी शिंदे गटाला चोरमंडळ म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्क भंग आणला जाणार असल्याचं सांगितलं जातं

    त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • 01 Mar 2023 10:16 AM (IST)

    SA vs WI Test : कॅचने फिरवली मॅच, धडाधड दक्षिण आफ्रिकेचे 7 विकेट, VIDEO

    खूपच अवघड कॅच होती पण फिल्डरने टॅलेंट दाखवलं पहा VIDEO, वाचा सविस्तर…..

  • 01 Mar 2023 10:08 AM (IST)

    पुढील 2 तासांत दिल्लीत पावसाचा अंदाज

    वायव्य दिल्ली, नैऋत्य दिल्ली आणि दिल्ली-एनसीआरच्या जवळील भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज

    हवामान खात्याने वर्तवला अंदाज

  • 01 Mar 2023 10:07 AM (IST)

    व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली

    आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये

    घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

    दिल्लीज 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये

  • 01 Mar 2023 10:05 AM (IST)

    ठाणे | घोडबंदर रोडवर काल रात्री भीषण अपघात

    भरधाव कार विजेच्या खांबाला धडकल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

    अपघातात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी

    जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात केलं दाखल

    पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

  • 01 Mar 2023 10:03 AM (IST)

    गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

    स्वस्तात खरेदी करा सोने आणि चांदी

    भाव सातत्याने उतरणीला, आजही किंमती घसरल्या

    उच्चांकापेक्षा सोने सध्या 3300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त

    चांदी उच्चांकापेक्षा 16973 रुपये प्रति किलो स्वस्त, वाचा सविस्तर

  • 01 Mar 2023 10:03 AM (IST)

    कर्नाटक | बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

  • 01 Mar 2023 09:58 AM (IST)

    प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी केला दहावीच्या विद्यार्थ्यांचा खून

    छत्रपती संभाजीनगर : मुलीच्या घरापासून एका हाकेच्या अंतरावर कुजलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह,

    वैजापूर तालुक्यातील भिलगाव येथील घटना,

    सचिन प्रभाकर काळे असे अल्पवयीन मयत मुलाचे नाव,

    वर्गातील मुलीसोबत सुरू होते प्रेमसंबंध,तर मुलीला दिला होता मोबाईल गिफ्ट,

    गव्हाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असता मुलीचे वडील,आजोबा,आणि काकांना घेतले ताब्यात.

  • 01 Mar 2023 09:54 AM (IST)

    राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    एकनाथ खडसे यांच्यावर 400 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

    मुक्ताईनगर येथील गौण खनीज प्रकरणाची चौकशी होणार

    महसूल विभागाकडून एसआयटी ची स्थापना

  • 01 Mar 2023 09:48 AM (IST)

    औरंगाबाद

    प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी केला दहावीच्या विद्यार्थ्यांचा खून

    मुलीच्या घरापासून एका हाकेच्या अंतरावर कुजलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह

    वैजापूर तालुक्यातील भिलगाव येथील घटना

    वर्गातील मुलीसोबत सुरू होते प्रेमसंबंध, तर मुलीला दिला होता मोबाईल गिफ्ट

    गव्हाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

    मुलीचे वडील, आजोबा, आणि काकांना घेतले ताब्यात

  • 01 Mar 2023 09:41 AM (IST)

    अंबरनाथच्या चिखलोली परिसरात गॅरेजला लागली आग

    महानगर सीएनजी पंपासमोरील गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी

    आगीत गाड्यांच्या सीएनजी टाक्यांचेही स्फोट

    अंबरनाथ, बदलापूर यासह एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

    आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

  • 01 Mar 2023 09:39 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने चूक सुधारली, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल

    IND vs AUS 3rd Test : टीम इंडियासाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. कारण WTC च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा कसोटी सामना जिंकावाच लागेल. कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकला. वाचा सविस्तर…..

  • 01 Mar 2023 09:38 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

    IND vs AUS 3rd Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात टॉसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंदोर कसोटीतही टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त मालिका विजयच नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर टीम इंडियाची नजर आहे. वाचा सविस्तर….

  • 01 Mar 2023 09:37 AM (IST)

    IND vs AUS 3rd Test : जाडेजा एक, अश्विन दोन आणि सिराज 4 पावलं दूर, इंदोरमध्ये बनू शकतो महारेकॉर्ड

    IND vs AUS 3rd Test : अश्विन, जाडेजा आणि सिराजने इंदोर कसोटीत आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला, तर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होतील. टीम इंडिया आधीच 4 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. वाचा सविस्तर…..

  • 01 Mar 2023 09:36 AM (IST)

    IND vs AUS Test : लाल की काळी माती? इंदोरमध्ये Ind vs Aus सामना कुठल्या मातीच्या पीचवर होणार?

    IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये प्रत्येक टेस्ट मॅचआधी पीचची चर्चा होते. कारण या सीरीजमध्ये पीचने महत्त्वाची भूमिका बजावलीय. या टेस्ट मॅचमध्येही पीच निर्णायक ठरेल. वाचा सविस्तर….

  • 01 Mar 2023 09:20 AM (IST)

    अदानी समूहावरील संकटांची मालिका सुरुच

    आता केंद्रीय बँकेने दिले हे नवीन निर्देश

    भारतीय बँकांना नवीन निर्देशानुसार द्यावा लागेल हा अहवाल

    अदानी समूहाला बँकांनी दिले 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज

    अदानी समूहाच्या अडचणी वाढणार का? वाचा सविस्तर 

  • 01 Mar 2023 09:06 AM (IST)

    ठाण्यातील शिवसेना नेते रवींद्र परदेशी यांचा मृत्यू

    ठाण्याचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रवींद्र परदेशी यांच्यावर काल भर बाजारपेठत प्राणघातक हल्ला केला गेला मात्र उपचाादरम्यान त्यांचा मृत्यु रवींद्र परदेशीं यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे..

    रवींद्र परदेशीं हे व्यापारी असून ठाणे मार्केट येथे रस्त्यावर कॉसमॅटिक विक्री करत असत

  • 01 Mar 2023 08:36 AM (IST)

    तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेल किंमतीत चढउतार

    पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीवरुन वातावरण गरम

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले कर कपातीचे संकेत

    आज 1 मार्च रोजी दरवाढीचा भार झाला का कमी, वाचा बातमी 

  • 01 Mar 2023 08:35 AM (IST)

    राज्यपालांच्या अभिभाषणावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशाण्यावर कोण?

    मुख्यमंत्री काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष

    आजही आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडणार

  • 01 Mar 2023 08:17 AM (IST)

    बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत

    ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालूक्यातील शेतकरी हवालदिल

    रस्त्याच्या कामामुळे पिकांची नासाडी

    कारली, घोसाळी आणि चवळी या पिकांचे मोठे नुकसान

  • 01 Mar 2023 08:09 AM (IST)

    घरगुती सिलेंडर तसेच CNG PNG च्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता

    आजपासून नवे नियम लागू होण्याची शक्यता

    आजपासून बँकेची कर्ज देखील महागण्याची शक्यता आहे

    रेल्वेकडून मालगाडी आणि प्रवासी भाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

  • 01 Mar 2023 07:54 AM (IST)

    पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरही आमदार म्हणून अश्विनी जगताप यांचे बॅनर झळकले

    मावळ, पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे फलक लागलेत

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली,

    गुरुवारी नागरिकांनी कुठल्या उमेदवाराला कौल दिला आहे हे समजणार

    त्याअगोदरच मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून फलक लावण्यात आलेत.

    पुण्यातील फलकाचे लोण द्रुतगती मार्गावर येऊन पोहचल आहे.

  • 01 Mar 2023 07:18 AM (IST)

    पुणे जिल्हा सत्र न्यायालयात लाखांवर खटले न्यायाच्या प्रतिक्षेत

    पुणे जिल्हा सत्र न्यायालयात लाखांवर खटले न्यायाच्या प्रतिक्षेत

    कोरोनानंतर खटल्यांमध्ये झाली मोठी वाढ

    जिल्हा न्यायालयात जवळपास 4 लाख 37 हजार इतके फौजदारी तर 1 लाख दिवाणी खटले प्रलंबित आहेत

    न्यायाधीशांची अपुरी संख्या, दोषारोपपत्र दाखल होण्यास पोलीसांकडून होणारा विलंब अशी अनेक कारणं यामागे आहेत

  • 01 Mar 2023 07:13 AM (IST)

    कसबा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

    पुणे : उद्या कोरेगाव पार्क या ठिकाणी अन्न धान्य गोदामात होणार मतमोजणी,

    कोरेगाव पार्कातील मतमोजणी परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे,

    सेंट मीरा कॉलेज ते अतुर पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गल्ली क्रमांक 1 मधून प्रवेश दिला जाईल,

    तर दरोडे पथ मार्गावर वाहनं उभी करता येणार नाहीत.

  • 01 Mar 2023 06:26 AM (IST)

    विधान परिषद प्रमाणे लोकसभेतील प्रतोद बदलावा अशी आम्ही मागणी करणार आहोत : भरत गोगावले

    विनायक राऊत यांना बदलून आमच्या पक्षाच्या खासदारांच नाव देऊ, लवकर तसं पत्र देणार

    विधान परिषदेमधील आमदार आणि काही खासदार आमच्या संर्पकात आहेत

    सत्ता सुनावणीत वकील त्यांची बाजू मांडत आहेत

    आता ठाकरेंकडे काहीच उरल नाही

    माझी प्रतोद नेमणूक बेकायदेशीर हे सिद्ध करावं, गोगावले यांचं आव्हान

  • 01 Mar 2023 06:18 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील आज अधिवेशनाला उपस्थित राहणार

    जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते.

    मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे

    कुटुंबातील विवाह असल्याने मागील दोन दिवस जयंत पाटील विधानभवनात हजर नव्हते

    निलंबनाच्या कारवाई नंतर आज ते पहिल्यांदाच विधानभवनात दाखल होत होणार आहेत

    जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विधानभवनातील विविध भाषणांचा एक टीझर तयार करून सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करण्यात आलीय

  • 01 Mar 2023 06:14 AM (IST)

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस

    विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा आमने सामने येणार

    विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार, सत्ताधारीही विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देणार

    कुठल्या मुद्द्यांवर आजचा दिवस गाजणार याकडे सर्वांचच लक्ष

Published On - Mar 01,2023 6:09 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.