AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Minister 2024: कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

Maharashtra Cabinet Minister 2024 Swearing Ceremony: राजकारणात एकमेकांना पराभूत करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. परंतु आता महायुतीच्या दोन पक्षांकडून ते दोन्ही नेते कॅबिनेट मंत्री झाले. तसेच आता राजकीय विरोधकही राहिले नाहीत. बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण मंत्री झाले आहेत.

Maharashtra Cabinet Minister 2024: कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे
| Updated on: Dec 15, 2024 | 5:29 PM
Share

Maharashtra Cabinet Minister 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे. तसेच सर्वच जातीच्या आणि धर्माच्या लोकांना संधी दिली गेली आहे. या मंत्रिमंडळात भाऊ-बहीण कॅबिनेट मंत्री झाले आहे. हे भाऊ-बहीण कधीकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते. राजकारणात एकमेकांना पराभूत करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. परंतु आता महायुतीच्या दोन पक्षांकडून ते दोन्ही नेते कॅबिनेट मंत्री झाले. तसेच आता राजकीय विरोधकही राहिले नाहीत. बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण मंत्री झाले आहेत.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधील लढत चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा बहीण-भाऊ यांच्यात हा सामना झाला. त्यात 2014 मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विजयी झाल्या. परंतु पुढील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांनी या पराभवाची परतफेड करत 2019 मधील निवडणुकीत विजय मिळवला.

अशी झाली दिलजमाई

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघं भाऊ-बहिणीमध्ये दिलजमाई होण्यासाठी अनेक पातळीवरून प्रयत्न झाले. अखेर परळी वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत ते एकत्र आले. या दोघं नेत्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत मैत्री दाखवली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारले. ते महायुतीत आले. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे महायुतीत आले. त्यामुळे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे या भाऊ-बहिणीचे संबंध सुधारु लागले.

महायुतीत धनंजय मुंडे कृषीमंत्री होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी सर्व जबाबदारी घेतली. परंतु पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे निवडून आले. आता हे दोन्ही मंत्री झाले.

दोन्ही नेते एकाच हेलिकॉप्टरने नागपुरात

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पोहचले. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना एकत्र अभिवादन केले. त्यानंतर आता दोघेही मुंबईच्या दिशेने एकत्र रवाना झाले आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.