विळखा वाढला! मुंबई, पुणे, नागपूर, कोरोनाचा स्फोट, राज्यात दिवसभरात 8 हजार 702 नवे बाधित
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे (Maharashtra Corona Update). गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होताना दिसत आहे
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे (Maharashtra Corona Update). गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होताना दिसत आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात तब्बल 8 हजार 702 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अक्षरक्ष: कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे (Maharashtra Corona Update).
राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 24, 2021
महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा स्फोट
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केल्याचं बघायला मिळत आहे. राज्याची राजधानी मुंबईत तब्बल 1145 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पाच रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्याचे उपराजधानी नागपूरमध्ये दिवसभरात तब्बल 1116 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 13 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुण्यात दिवसभरात तब्बल 766 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट, दररोज 500 पेक्षा जास्त रुग्ण
नागपूर हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून नागपुरात दररोज 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.
नागपूरातील गेल्या आठ दिवसातील आकडेवारी
24 फेब्रुवारी – 955 23 फेब्रुवारी – 551 22 फेब्रुवारी – 641 21 फेब्रुवारी – 551 20 फेब्रुवारी – 585 19 फेब्रुवारी – 603 18 फेब्रुवारी – 574 17 फेब्रुवारी – 499
अमरावतीतही भडका, दिवसभरात 906 रुग्ण
अमरावतीत देखील कोरोनाचा भडका उडालेला बघायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 906 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 6 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 32831 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 27764 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4580रुग्णांवर उपचार सुरू आहे.
मालेगावातही पुन्हा कोरोनाचा उद्रेक, नाशिकमध्ये 601 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचं बघायला मिळत आहे. मालेगावत गेल्या 24 तासात तब्बल 53 रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्य झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात तब्बल 601 रुग्ण आढळले आहेत.
राज्यात दिवसभरात 56 कोरोनाबाधितांचा मृत्यू
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह आता कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 56 रुग्णांचा कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाख 993 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.44 टक्के इतका आहे.
राज्यात सध्या सक्रिय रुग्ण किती?
राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोनाबाधितांचा आकडा फुगला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत होती. मात्र, लोकांनी काळजील न घेतल्याने पुन्हा या भयावह संकटाला संपूर्ण महाराष्ट्राला तोंड देण्याचं संकट ओढवताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 64 हजार 260 वर पोहोचली आगहे. आतापर्यंत राज्यातील एकूण 21 लाख 29 हजार 821 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 20 लाख 12 हजार 367 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 744 रुग्ण बरे झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 94.49 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
बाधित रुग्णांचे प्रमाण 13.29 टक्के
राज्यात आतापर्यंत 1 कोटी 6o लाख 26 हजार 587 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 21 कोटी 29 लाख 821 रुग्ण बाधित आढळले आहेत. बाधित रुग्णांचे प्रमाण हे 13. 29 टक्के इतके आहे.
कोणत्या शहरात किती रुग्णसंख्या? वाचा सविस्तर आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |