राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर

महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 11:57 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 7 हजारांच्या पार गेला आहे. तर पुण्यातील रुग्णांची संख्यादेखील तब्बल 1200 च्या पार गेली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे (Maharashtra Corona Update).

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. महाराष्ट्रात आज 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 हजार 773 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईचे 20, तर पुणे शहरातील 3 आणि ठाणे शहरातील 2 रुग्ण आहेत. याशिवाय नागपूर शहर आणि रायगड येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा यात समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 459 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कल्याण-डोबिंवली, मीरा भाईंदर, वसई विरार, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर या शहरांमधील कोरोनाबाधितांचा आकडा 100 च्या पार गेला आहे. त्यापाठोपाठ यवतमाळमध्येदेखील कोरोनाचा आकडा 79 वर पोहोचला आहे. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येदेखील कोरोनाचा प्रदुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनाकडून पूर्णपणे सील करण्यात येत आहे. संशयित रुग्णांना क्वारंटाईन केलं जात आहे. तसेच नवे कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण किती व्यक्तींच्या संपर्कात आले याचादेखील शोध प्रशासन घेत आहे. यामध्ये कुणी संशयित आढळलं तर त्याची तपासणी केली जात आहे आणि क्वारंटाईन केलं जात आहे.

राज्यात आतापर्यंत 1 लाख 45 हजार 798 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 10 हजार 92 पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं.

राज्यात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 7061 374 290
पुणे (शहर+ग्रामीण) 1120 125 85
पिंपरी चिंचवड मनपा 72 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 460 36 8
नवी मुंबई मनपा 174 3
कल्याण डोंबिवली मनपा 163 3
उल्हासनगर मनपा 3
भिवंडी निजामपूर मनपा 17
मीरा भाईंदर मनपा 126 2
पालघर 41 1 1
वसई विरार मनपा 128 3
रायगड 24 5 1
पनवेल मनपा 47 2
नाशिक (शहर +ग्रामीण) 26 2
मालेगाव मनपा 171 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 42 16 2
धुळे 25 3
जळगाव 40 1 9
नंदूरबार 11 1
सोलापूर 99 6
सातारा 32 3 2
कोल्हापूर 14 2
सांगली 29 27 1
सिंधुदुर्ग 2 1
रत्नागिरी 8 2 1
औरंगाबाद 131 14 7
जालना 2
हिंगोली 15 1
परभणी 2
लातूर 12 8 1
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 3
अकोला 39 1 1
अमरावती 28 7
यवतमाळ 79 8
बुलडाणा 21 8 1
वाशिम 2
नागपूर 139 12 2
भंडारा 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 26 2
एकूण 10498 1773 459

संबंधित बातम्या :

देशातील 8,324 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 33 हजारांवर : आरोग्य मंत्रालय

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.