Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच; मॉल, चित्रपटगृहांवर पुन्हा निर्बंध?
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मॉल आणि चित्रपटगृहांवर निर्बंध येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा ब्रेक द चेननुसार निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी गर्दी कमी करणे हा एकमेव उपाय असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध (Corona Restrictions) लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मॉल आणि चित्रपटगृहांवर निर्बंध येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकार पुन्हा एकदा ब्रेक द चेननुसार निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तसंच मार्चपर्यंत कोरोना निधीची तयारी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
निर्बंध वाढणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा
काही अनावश्यक गोष्टींमुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल, तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे कम सुरू असून, आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केले आहे.
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक रुग्ण
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरात आज 20 हजार 971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 490 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्वीटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 ङजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) January 7, 2022
इतर बातम्या :