Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील आजचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात आज दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 492 आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 34 हजार 222 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यापैकी 65 लाख 47 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 1 लाख 41 हजार 614 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या 7 लाख 42 हजार 684 जण होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 463 जण कोविड सेंटरमध्ये आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.8 टक्के आहे. तर मृत्यू दर हा 2.7 टक्क्यांवर आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣ No new case of #OmicronVariant reported from Maharashtra today; 100 from Mumbai
*⃣ Patients infected with #Omicronvariant in Maharashtra reported till date- 876
(2/6)?@airnews_mumbai pic.twitter.com/oki3YKqWmZ
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 7, 2022
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारापेक्षा अधिक रुग्ण
मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत आज 20 ङजार 971 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजार 490 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. मुंबई शहरात सध्या 91 हजार 731 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 87 टक्क्यांवर आहे.
#CoronavirusUpdates ७ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- २०९७१
२४ तासात बरे झालेले रुग्ण-८४९०
बरे झालेले एकूण रुग्ण-७६४०५३ बरे झालेल्या रुग्णांचा दर-८७%
एकूण सक्रिय रुग्ण- ९१७३१
दुप्पटीचा दर-५६ दिवस कोविड वाढीचा दर (३१ डिसेंबर- ६ जानेवारी)-१.२३%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 7, 2022
मुंबईची आठवडाभरातील आकडेवारी चिंताजनक
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल ट्वीटरद्वारे मुंबईतील आठवडाभराची कोरोना आकडेवारी दिली होती. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कशाप्रकारे वाढत गेली हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे धोका दिवसागणिक वाढतो आहे. नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तिसरी संभाव्य लाट थोपवणे आपल्याच हाती आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
हे आहेत आपल्या मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचे आठवडाभराचे आकडे. धोका दिवसागणिक वाढतो आहे. नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तिसरी संभाव्य लाट थोपवणे आपल्याच हाती आहे.#NaToCorona #Omicron #COVID19 #कोविड_१९@mybmc pic.twitter.com/XFMCnUzac3
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) January 6, 2022
इतर बातम्या :