लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

राज्यभरात कोरोनाचा कहर वाढलेला असतानाच विदर्भातही कोरोनाने हातपाय पसरल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Maharashtra Coronavirus: reimposes restrictions as COVID-19 cases rise in vidarbha)

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 1:25 PM

नागपूर: राज्यभरात कोरोनाचा कहर वाढलेला असतानाच विदर्भातही कोरोनाने हातपाय पसरल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रकोप वेळीच रोखण्यासाठी अमरावतीत तर 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि भंडाऱ्यातही थेट लॉकडाऊनचे जाहीर करण्यात आला नसला तरी लॉकडाऊनचे नियमांचं काटेकोरपालन करण्यावर भर दिला जात आहे. विदर्भात कुठे काय सुरू आहे याचा घेतलेला हा आढावा. (Maharashtra Coronavirus: reimposes restrictions as COVID-19 cases rise in vidarbha)

अमरावतीत अचलपूर, परतवाडा सर्वात मोठा हॉटस्पॉट

अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या बघता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरातील 12 कंटेनमेंट झोन घोषित केले आहे, या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहेत, असे प्रशासनाने म्हटलं आहे. श्रीकृष्ण पेठ ,सबनीस प्लॉट, महाजन पुरा, एलआयसी कॉलनी, भाजी बाजार, अनुराधा नगर, सदगुरू धाम वसाहत जवळ ,चंद्रावतीनगर ,उषा कॉलनी, भारत नगर ,साईनगर, खंडेश्वर कॉलनी आदी परिसरांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात कुणीही प्रवेश करू नये म्हणून या ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी कंटेन्मेंट झोन असलेल्या श्रीकृष्ण पेठ येथे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या 12 प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे. अमरावतीत परतडवाडा आणि अचलपूर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या दोन्ही शहरात घरोघरी रुग्ण आढळत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अमरावतीमध्ये आज लॉकडाऊन असल्याने जागो जागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत काही लोकं विनाकारण काम नसताना देखील घराच्या बाहेर निघत असल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. अत्यंत गरजेचं काम असलं तरच घराबाहेर पडा, असे स्थानिक प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र तरीदेखील काम नसताना अमरावतीकर बाहेर निघत असल्याने त्यांना पोलीस कारवाईचा सामना करावा लागत आहे.

अकोल्यात एका दिवसाचा लॉकडाऊन

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने अकोल्यात आज एका दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला होता. तसेच जिल्ह्यातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे सोमवारपासून पॉझिटिव्ह रुग्णाला थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2020 नंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटरबंद करून बहुतांशरुग्णांना होम आयसोलेशनमध्येच संदर्भित करण्यात आले होते. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर फेब्रुवारीमध्ये कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या बेफिकरीमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने पसरत आहे. परिणामी बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

वर्ध्यात कडक संचारबंदी, दुकानेही बंद

वर्ध्यात कडक संचारबंदी सुरू आहे. नागरिकांनीही संचारबंदीला उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र काही ठिकाणी संचारबंदीचा प्रवाशांना फटका बसलेला दिसत आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक प्रवाशांना एसटी स्थानकातच ताटकळत राहावे लागले आहे. रेल्वेने वर्ध्यात आलेल्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते उद्या सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्यमुळे वर्ध्यातील नागरिक चांगदलेच घाबरले आहेत. त्यामुळे दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. औषधांची दुकाने वगळता वर्ध्यात सर्वच अस्थापना बंद असल्याने शहरात शुकशुकाट निर्माण झाला आहे.

शेतकरी नेत्यांची सभा घेतली, आयोजकांवर गुन्हे

वर्ध्यात शेतकरी नेत्यांची सभा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी सभेच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. वर्धा कामगार शेतकरी आंदोलन कृती समितीचे अविनाश काकडे, अनिल जवादे, नीरज गुजर, मंगेश शेंडे, गजेंद्र सुरकार, श्रीकांत तराळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा पोलिसांनी आयोजकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी वर्ध्याच्या बजाज चौकात शेतकरी नेत्यांची सभा होती. यासभेला शेतकरी नेते राकेश टिकैत उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने सिंधु बॉर्डरवर आंदोलन करणारे त्यांचे सहकारी या सभेला उपस्थित राहिले होते.

नागपूर अॅलर्टवर

नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच नागरिकांना केलं आहे. तसेच अनिर्बंधपणे वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत नागरिकांकडून तब्बल 1 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून उद्या सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यानंतर सर्वाधिक 9443 चाचण्या झाल्या. त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह येण्याचं प्रमाण सध्या 7.67 टक्के इतक्यावर पोहोचला आहे. तर 6 जणांचा मृत्यू , तर 502 जण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात सतत होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत आहे. (Maharashtra Coronavirus: reimposes restrictions as COVID-19 cases rise in vidarbha)

यवतमाळवरमध्ये नव्याने निर्बंध लागू

यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात जिल्हाधिकार्‍यांनी थांबत नागरिकांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना दंडही केला. तसंच यापुढेही रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. (Maharashtra Coronavirus: reimposes restrictions as COVID-19 cases rise in vidarbha)

संबंधित बातम्या:

कोरोना वाढतोय, गरज असेल तरच घराबाहेर पडा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.