महाराष्ट्राने केला 9.13 कोटी कोरोना लसींचा टप्पा पार

महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटी चा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली.

महाराष्ट्राने केला 9.13 कोटी कोरोना लसींचा टप्पा पार
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:37 PM

मुंबई– भारतात चालू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहियेत महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र ने आज लसीकरणाचा 9.13 कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 5,17,850 जणांचे लसीकरण केले गेले आणि 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 9,13,05,365 लोकांना लस देण्यात आली, राज्य सरकारने ही आकडेवारी जाहीर केली.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, 18 ते 44 वर्षे वयोगटातील 3,38,35,850 व्यक्तींना त्यांच्या पहिल्या लसीचा डोस मिळाला आणि 1 मे पासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 98,95,107 ला दुसरा डोस मिळाला. आतापर्यंत 12,93,707 आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर त्यापैकी 11,04,451 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील 21,45,282 फ्रंटलाईन कामगारांना आतापर्यंत त्यांचा पहिला लसीचा डोस मिळाला आहे आणि त्यापैकी 18,14,514 यांना दुसरा डोस मिळाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या –

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी 1,553 कोरोनाचे रुग्ण आढळले आणि 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,682 रुग्ण बरे झाले आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 65,89,982 रुग्ण आढळले आहेत आणि त्यात मृतांचा आकडा १,३९,७६० आहे.सर्व रुग्णांपैकी 64,16,998 आता पर्यंत बरे झाले आहेत व आता 29,627 सक्रिय रुग्ण आहेत .महाराष्ट्रातील केस रिकव्हरी रेट आता 97.38 टक्के आहे आणि मृत्यू दर 2.12 टक्के आहे.

मुंबई शहरात 319 नवीन कोविड -19 रुग्ण आढळले आणि तीन मृत्यूची नोंद झाली आहे, ज्यामुळे केसलोड 7,51,293 वर आणि मृतांची संख्या 16,180 झाली आहे. मुंबई विभागात 582 नवीन रुग्ण आणि पाच मृत्यू झाले. एकूण संक्रमणाची संख्या 16,91,183 आणि मृतांची संख्या 35,395 झाली. नाशिक विभागात 385 नवीन रुग्ण नोंदवली गेली, ज्यात अहमदनगर जिल्ह्यातील 230 चा समावेश आहे. पुणे विभागात 402, कोल्हापूर विभागात 119, औरंगाबाद विभागात 24 आणि लातूर विभागात 35 नवीन रुग्ण नोंद झाली.

(Maharashtra covid vaccination crosses 9.13 crore)

Edited by Devashri Bhujbal

इतर बातम्या

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

Weather: औरंगाबादसह मराठवाड्यात रात्रभर पावसाची रिपरिप, पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यांसह बरसात, काय आहे हवामानाचा अंदाज?

अमळनेरात परिवर्तनाची नांदी; नागरिकांनी वेश्या व्यवसायाला विरोध करणारे घराबाहेर लावले फलक!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.