सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
HOTEL
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 6:19 PM

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे सुरु करण्याची सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना सुरु ठेवण्याची वेळ सरकारने वाढवली आहे. राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली सरकारने जाहीर केली आहे.

दुकाने रात्री अकरा वाजपेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा 

सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथीलकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यातील सर्व उपहारगृहे तसेच हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापरी तसेच सेवा क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यास मदत होणार आहे. सर्वांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

order

order

22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याआधी मुंबईतील हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा  18 ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.

maharashtra government cm uddhav thackeray decided to extend timing of restaurants hotels and shops till 12 pm

इतर बातम्या :

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय; राऊतांपाठोपाठ भास्कर जाधवही आक्रमक

‘मिशन कवचकुंडल’ अभियान दिवाळीपर्यंत चालू राहणार, लसीकरणाचा वेग वाढवणार- आरोग्यमंत्री

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.