Maharashtra Government Employees Strike Live : पुण्यातील ससूनमधील 60 टक्के कर्मचाऱ्यांची संपामधून माघार

| Updated on: Mar 17, 2023 | 6:12 AM

Maharashtra Government Employees Strike Live Updates : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

Maharashtra Government Employees Strike Live : पुण्यातील ससूनमधील 60 टक्के कर्मचाऱ्यांची संपामधून माघार
Maharashtra Government Employees StrikeImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. कालही या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने संपकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही संप सुरूच राहिल्यास खास करून रुग्णालयीन व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Mar 2023 02:50 PM (IST)

    पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू

    पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू

    8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सुरू होते उपचार

    रुग्णाला सहव्याधी हृदय रोग असल्याचं डॉक्टरांनी सांगितले

  • 16 Mar 2023 12:22 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात

    नाशिकमध्ये कर्मचारी आक्रमक

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात

    नाशिकच्या गोल्फ क्लब मैदाना पासून मोर्चाला सुरुवात

    जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी तीन दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे

  • 16 Mar 2023 11:34 AM (IST)

    पुण्यातील ससूनमधील 60 टक्के कर्मचाऱ्यांची संपामधून माघार

    ससूनमधील 60 टेक्निकल स्टाफ आजपासून कामावर हजर

    दरम्यान ससूनमधील नर्सेस मात्र अद्यापही संपावर कायम

    कंत्राटी पद्धतीने 100 नर्सेस आजपासून ससूनमध्ये कामावर हजर

    शस्त्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून स्वतः डिन संजीव ठाकूर करतायत शस्त्रक्रिया

  • 16 Mar 2023 11:02 AM (IST)

    मागण्या रास्त असू शकतात मात्र संप बेकायदेशीरच – सदावर्ते

    जुन्या पेंशनचा मुद्दा आता हायकोर्टात नेण्यात आला आहे

    वकील गुणरत्न सदावर्ते कर्मचाऱ्यांच्या संपावरून हायकोर्टात

    मागण्या रास्त असू शकतात मात्र संप बेकायदेशीरच

    गुणरत्न सदावर्ते तातडीच्या सुनावनीची मागणी करणार

    जुन्या पेंशनच्या मागणीसाठीचा आजचा तिसरा दिवस

  • 16 Mar 2023 09:40 AM (IST)

    पुण्यात ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस

    कर्मचाऱ्यांचा संपाचा ससून रुग्णालयाला फटका

    आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार

    ससून रुग्णालयाच्य प्रशासनाची माहिती

    700 नर्सेस तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन घेणार

    त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नर्सेस यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे, ससून अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच आवाहन

  • 16 Mar 2023 09:18 AM (IST)

    ससून रुग्णालयाला फटका

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस

    कर्मचाऱ्यांचा संपाचा ससून रुग्णालयाला फटका

    ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर.

    त्यामुळे आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार.

  • 16 Mar 2023 08:19 AM (IST)

    थोड्या वेळाने लाँगमार्च ठाण्याच्या दिशेने जाणार

    -शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँगमार्च सध्या शहापूर मधील कळंबे या ठिकाणी

    -थोड्या वेळाने लाँगमार्च ठाण्याच्या दिशेने जाणार

    -दिंडोरी येथून निघालेल्या मोर्चाचा आज पाचवा दिवस

    -आज दुपारी तीन वाजता लाँगमार्च शिष्टमंडळाची मुख्यमंत्री यांच्यासोबत होणार बैठक

    -काल रात्री मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांनी शिष्टमंडळाशी केली होती चर्चा

  • 16 Mar 2023 07:16 AM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस

    कर्मचाऱ्यांचा संपाचा पुण्यातील ससून रुग्णालयाला फटका

    रुग्णांचे होत आहेत अतोनात हाल

    ससून रुग्णालयातील 99 टक्के नर्सेस संपावर.

    त्यामुळे आज नर्सेस कामावर रुजू न झाल्यास नर्स आऊटसोर्स करणार.

    ससून रुग्णालयाच्य प्रशासनाची माहिती

    700 नर्सेस तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन घेणार

    त्यामुळे लवकरात लवकर कर्मचारी नर्सेस यांनी कामावर पुन्हा रुजू व्हावे.

    ससून अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच आवाहन

  • 16 Mar 2023 06:25 AM (IST)

    महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन यांचीही संपातून माघार

    14-15 मार्च रोजी काळ्या फिती लावून संपात झाल्या होत्या सहभागी

    15 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा, फेडरेशनला चर्चेसाठी वेळ देणार

    आता फेडरेशन आजपासून संपात सहभागी न होता, कामावर परतणार

    काळ्या फिती लावून काम करणार, फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी काढले प्रसिद्धीपत्रक

  • 16 Mar 2023 06:23 AM (IST)

    संपकरी कर्मचाऱ्यांना परभणी जिल्हा प्रशासनाकडून बजावण्यात आली नोटीस

    संपामध्ये सहभागी होणे गैरवर्तन समजून शिस्तभंगाची कारवाई करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली

    ‘काम नाही वेतन नाही’ असे धोरण शासनाने अवलंबिले असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख

    जिल्हाधिकारी कार्यालयासहित सर्वच कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत

    निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांची माहिती

  • 16 Mar 2023 06:21 AM (IST)

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुद्दत संपामुळे अमरावतीत वृध्दांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया रखडल्या

    वेळेत डोळ्यांची शस्त्रक्रिया न झाल्यास डोळे निकामी होण्याची रुग्णांनी व्यक्त केली भीती

    डॉक्टर आणि कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक गोरगरीब वृद्धांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या

    डॉक्टर संपावर गेल्याने शस्त्रक्रिया न करताच रुग्ण गेले घरी परत

  • 16 Mar 2023 06:19 AM (IST)

    राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशीही संप सुरूच

    कालही या संपावर कोणताच तोडगा न निघाल्याने संपकऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.

    जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

    या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

    त्यामुळे शाळा, महाविद्यालये ओस पडले आहेत. तर रुग्णालयीन कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

    एवढेच नव्हे तर पुरेसा स्टाफ नसल्याने अनेक रुग्णालयातील शास्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Published On - Mar 16,2023 6:14 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.