Maharashtra Corona Guidelines | नव्या कोरोना विषाणूमुळे यंत्रणा अलर्टवर, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी

खबरदरी म्हणून राज्यात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये जगभरातून प्रवासी येतात. त्यामुळे विमानतळावर उतरताच प्रवाशांचे अलगीकरण तसेच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकारने नव्या गाईडलान्स जारी केल्या आहेत.

Maharashtra Corona Guidelines | नव्या कोरोना विषाणूमुळे यंत्रणा अलर्टवर, राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:07 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. देशात आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट मोडमध्ये आल्या असून वेगवेगळ्या राज्यात खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा सरकारने नवे कोरोना नियम जारी केले आहेत.

विमानतळावर प्रवाशांची तपासणी होणार 

दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये आलेल्या दोन प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांच्यावर अपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र खबरदरी म्हणून राज्यात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये जगभरातून प्रवासी येतात. त्यामुळे विमानतळावर उतरताच प्रवाशांचे अलगीकरण तसेच कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे .

राज्य सराकरच्या नव्या नियमावलीमध्ये काय आहे ?

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

 सार्वजनिक वाहतुकीसाठी यूनीव्हर्सल पास बंधनकारक

 बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

 बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी संबंधित अधिकारक्षेत्रासाठी निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु 48 तासांची पूर्वसूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही.

 कोरोना नियमांचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला 500 रुपयांचा दंड असेल.

देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती येऊ शकते

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून पसरलेला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरस चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. “कोरोनाचे हे नवे रुप असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात आणि वेगानं पसरेल. त्यामुळे लोकांना संसर्ग होईल. या विषाणूवर अँटीबॉडीजचाही परिणाम होणार नाही. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती होऊ शकते. या व्हेरियंटमध्ये 30 म्युटेशन आढळून आलेत. हाँगकाँग, बेल्जियम, इस्त्रायल या देशात हा विषाणू वेगानं पसरतोय,” असे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगिलं. तसेच हा विषाणू देशातील डेल्टापेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोरोना नियम पाळा असे आवाहन भोंडवे यांनी केले.

इतर बातम्या :

Karnataka Corona | धोक्याची घंटा ? दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोना

आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केला नाही, राजकारण असंच असतं; नाथाभाऊंचा महाजनांना टोला

राज्यात ठिकठिकाणी बसेसवर हल्ले, दगडफेक; तर सरकारकडूनही कडक कारवाई, 3 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन

Non Stop LIVE Update
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.