AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना येत्या 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. सरकारकडून रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

सरकारकडून तुम्हालाही 'हा' मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे
'हा' मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे
| Updated on: Aug 11, 2024 | 8:46 PM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्त अ‍ॅपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 रुपया आलेला आहे. तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरता आलेला नाही. तर दीड कोटी महिलांनी नोंदणी केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला आहे.

लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय?

ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV”, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल तर तुम्हालादेखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्यादेखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत.

मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून आणखी एक खूशखबर

या योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी आज परभणीत बोलताना आणखी एक खूशखबर दिली आहे. “लाडली बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे पुढचे 6 महिने तरी लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार हे निश्चित आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.