कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

राज्यातील कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज केली. (maharashtra Government's Relief To Agricultural Pump Holders)

कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 6:17 PM

मुंबई: कृषी पंपधारकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कृषी पंपधारकांचे 15 हजार कोटींचे वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज केली. (maharashtra Government’s Relief To Agricultural Pump Holders)

नितीन राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. 42 लाख कृषी पंपधारकांची 42 हजार 160 कोटी थकबाकी आहे. त्यामुळे आम्ही या थकबाकीपैकी 50 टक्के म्हणजे 15 हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयांतर्गत कृषी पंपधारकांकडून जी थकबाकी वसूली केली जाईल त्यातील 66 टक्के निधी हा गाव आणि सर्कलच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी वाटप करण्याचा अधिकार राज्याच्या पालकमंत्र्यांना असेल. ग्रामपंचायतीशी सांगड घालूनच हा पायाभूत विकास करण्यात येणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

गेल्या सरकारनं थकबाकीचा डोंगर उभा केलेला आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. लघू दाब, उच्च दाब, सौर यंत्रणेद्वारे वीज जोडण्यांना गती मिळणार आहे. थकबाकीसाठी व्याज आणि दंड माफ करून थकबाकी भरण्याची सवलत देण्यात येईल. कृषी पंपांची थकबाकी 40 हजार कोटीपर्यंत आहे. मार्च 2014 अखेर महावितरणाची थकबाकी 14154 कोटी होती. ही थकबाकी 59148 कोटीपर्यंत गेली आहे. त्याची निश्चित चौकशी केली जाईल. याबाबत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असंही ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, 100 युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असं राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

LIVE | “चंद्रशेखर बावनकुळेंचा अभ्यास इतकाच चांगला होता, तर त्यांचे तिकीट का कापले?”

वीज बिलाच्या वसूलीसाठी सक्ती नको, अन्यथा खळखट्ट्याक, डोंबिवली मनसेचा इशारा

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

(maharashtra Government’s Relief To Agricultural Pump Holders)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.