Maharashtra Breaking News Live : वाशिम जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनीविरोधात दोषारोपपत्र दाखल. पण आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेखच नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. काँग्रेसचे महाजसिचव के.सी. वेणूगोपाल पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. अमरावतीत कापसाचे दर 8 हजार 200 ते 8 हजार 450 रुपयांवर. यासह राज्य आणि देशातील विविध घटना घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
लासलगावात लाल कांदे रस्त्याच्या कडेला ओतून देत शेतकऱ्याने केला संताप व्यक्त
लासलगाव (नाशिक) : – लिलाव न पुकारल्याने लाल कांदे रस्त्याच्या कडेला ओतून देत शेतकऱ्याने केला संताप व्यक्त – लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेरील घटना – शेतकऱ्याकडील या लाल कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी लिलाव केलाच नसल्याची शेतकऱ्याची माहिती – बाजार समिती परंतु विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्याला आला तीन हजार रुपये खर्च – याबाबत बाजार समिती प्रशासनाला काहीच माहिती नसल्याची भूमिका
-
हेमंत रासने यांनी घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
कसब्यातील भाजपचे नेते हेमंत रासने यांचा उद्या वाढदिवस
खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच निधन झाल्यानं वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
जाहीर पत्रक काढून पोस्टर न लावण्याचंही केलं आवाहन
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसाचे पोस्टर लावल्यानं भाजपवर टिकेची झोड उठली होती
मात्र हेमंत रासनेंनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
-
-
रत्नागिरी शहरात आज स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात
रत्नागिरी :रत्नागिरी शहरात आज स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेला सुरुवातपालकमंत्री उदय सामंत यात्रेत सहभागी
शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांची संयुक्त गौरव यात्रासावकरांना कारगृहात ठेवलेल्या ठिकाणापासून गौरव यात्रा निघालीढोल-ताशांच्या गजरात गौरव यात्रेला सुरुवात, पतीत पावन मंदिरापर्यंत जाणार गौरव यात्रा -
हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, उद्या 13 एप्रिलला सुनावणी
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
सत्र न्यायालयानं फेटाळलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज निर्णयाला दिलं उच्च न्यायालयात आव्हान
तातडीच्या सुनावणीसाठी केलेली विनंती झाली मंजूर
उद्या 13 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं ईडी तपास करत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुश्रीफ यांना दिलंय 14 एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण
-
पुण्यात तापमानात मोठी वाढ, शहराचे तापमान आज 38 अंश सेल्सिअस
पुणे :
पुणे शहराच्या तापमानात मोठी वाढ
शहराचे तापमान आज ३८ अंश सेल्सिअस
पुण्यात उनाचा कडाखा वाढला
दिवसभर पुणे शहरात कडक ऊन तर संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाची हजेरी
यावर्षी पुणे शहराचं तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची
पुणे वेधशाळेचा अंदाज
वाढत्या उनामुळे पुणेकरांची पुरती हैराणी
-
-
उद्धव ठाकरे यांची 23 एप्रिलला जळगावच्या पाचोऱ्यात भव्य सभा होणार
मुंबई :
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 23 एप्रिलला जळगावच्या पाचोऱ्यात भव्य सभा होणार
उद्धव ठाकरेंची खेड, मालेगावनंतर आता पाचोऱ्यात मोठी सभा होणार आहे
-
खडकपाडा हद्दीत मोठ्या घरफोडीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक
रोशन जाधव आरोपीचे नाव
डान्सबारमध्ये पैसे उधळण्यासाठी तो करायचा घरफोडी
सुरक्षा रक्षक व CCTV नसलेल्या इमारतीत शिरून दिवसाढवळ्या स्कू ड्रायव्हरच्या मदतीने घराचे लॉक तोडत करायचा घरफोडी
आरोपी वेळेवर पोलिसांना चकमा देण्यासाठी स्टेशन परिसरातील लॉजमध्ये राहून करायचा घरफोडी
खडकपाडा हद्दीत मोठ्या घरफोडीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक
CCTV च्या मदतीने पोलिसांनी 48 तासाच्या आत आरोपीला ठोकल्या बेड्या
आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत वीस लाखाचा मुद्देमाल केला जप्त
-
कल्याण डोंबिवली उन्हाचा पारा वाढला
आज कल्याण डोंबिवली 41°c तापमान
गर्मीमुळे नागरिक हैराण
-
वाशिम जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक
वाशिम, रिसोड,मानोरा ,कारंजा,मालेगाव, मंगरुळपिर
राष्ट्रवादी काँग्रेस मधून चंद्रकांत ठाकरे आणि शिवसेना उध्दव गटातून सुरेश मापारी या दोघांचा एकत्रितपणे बाजारसमितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय
दुसरीकडे काँग्रेसकडून चक्रधर गोटे शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून डॉ सुधीर कव्हर आणि वंचितचे डॉ.सिध्दार्थ देवळे यांनी स्वतंत्र गट स्थापन करुन बाजार समितीमध्ये आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले
भाजप -शिंदे गट शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र 20 तारखेला अर्ज वापस घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
-
चंद्रकांत दादांना अजून पुणे कळलं नाही
‘हम करे सो कायदा’ हे बरोबर नाही
चंद्रकांत दादांना अजून पुणे माहिती झाले नाही, ते नवीन आमदार आहेत, त्यांनी पुणेकरांना काय हवंय हे जाणून घ्यावे
वेताळ टेकडीच्या विकास प्रकल्पावरून खासदार वंदना चव्हाण यांची टीका
-
सांगलीतील कुपवाडमधील सावळी येथील आरटीओ कार्यालयात सदाभाऊ खोत यांचे हल्लाबोल आंदोलन
आरटीओ कार्यालयात हळदीची पोती ओतून प्रतिकात्मक सौदेबाजी करत सुरु केले आंदोलन
सौद्यासाठी राहुरीहून सांगलीकडे हळद घेऊन येत असलेल्या शेतकऱ्यांची गाडी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अडवत 30 हजारचा केला होता दंड
हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका केला होता दंड
सावळीच्या आरटीओ अधिकारी ऑफिसमध्ये हळदीची पोती ऑफिसमध्ये ओतून हळदीचा लिलाव सुरू केला आहे
लीलावातून आलेले पैसे दंड म्हणून भरणार असल्याचे सदाभाऊ खोत आणि शेतकऱ्यांनी सांगितले आहे
-
दिल्लीतील शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी
दिल्लीतील सादीकनगर भागातील इंडियन स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी
इमेलवरून आलेल्या धमकीनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले
बॉम्ब शोधक पथक शाळेत दाखल
पोलिसांचा शाळेत तपास सुरू
-
सरकारला सुबुद्धी दे; पुण्यात राम मंदिरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आरती
राज्य सरकारला सुबुद्धी देण्यासाठी काँग्रेसचं प्रभू श्रीरामाला साकडं
पुण्यातील तुळशीबाग मंदिरात काँग्रेसने केली महाआरती
पुणेकरांना मिळणारी 40% करसवलत पूर्ववत व्हावी यासाठी पुण्यातील तुळशीबाग येथील पुरातन राम मंदिरात काँग्रेसची आरती
प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला बुध्दी द्यावी, काँग्रेसचं प्रभू रामाला साकडं
-
अजित पवार यांच्यांकडून जीवाला धोका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यांकडून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार पुणे पोलिसांत दिली गेली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. तक्रार करणारा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे…सविस्तर वाचा
-
दहिसर बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान फास्ट ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटली
दोन गाड्या थांबवण्यात आल्या, प्रवासी रुळावर उतरून बोरिवली स्थानकात जात आहेत
अनेकजण एसी ट्रेनमध्ये अडकले, ओव्हरहेड वायर दुरूस्तीचे काम सुरू
-
कुणाल टिळक आणि शैलेश टिळकांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट
कसबा भागातील जुन्या वाडयांच्या बांधकामासंदर्भात केली चर्चा
मध्यवस्तीतील विकासाला अडथळा ठरणाऱ्या बांधकाम नियमावलीत बदल करण्याची टिळकांची मागणी
-
छत्रपती संभाजीनगरात छोट्याश्या चुकीमुळे भीषण अपघात
छत्रपती संभाजीनगर : वेगाने येणाऱ्या दोन दुचाक्यांमध्ये भीषण अपघात,
संपूर्ण थरारक अपघात CCTV मध्ये कैद,
बिडकीन इसारवाडी येथील शेकटा फाटा येथील अपघात,
वाहन चालक गंभीर जखमी.
-
विठूरायाच्या पूजेसाठी 2024 पर्यंतचे बुकींग फुल्ल
2024 या एका वर्षातील पूजेसाठी 300 बुकींग
विठ्ठल मंदिराला 75 लाख रूपये तर रूक्मिणी मंदिराला 33 लाख रूपयांचे उत्पन्न
कोरोना काळानंतर नित्त्य पूजेसाठी मोठ्या प्रमाणात बुकींग
-
DC vs MI 2023 : मुंबईच्या पहिल्या विजयानंतर रोहितला मैदानातच एका खास व्यक्तीचा VIDEO कॉल
DC vs MI IPL 2023 : मुंबईच्या विजयात रोहित शर्माच महत्वाच योगदान. रोहितने काल 45 चेंडूत 65 धावा फटकावल्या. रोहितने सुरुवातीलाच आक्रमण करुन दिल्लीच्या गोलंदाजीतील हवा काढून टाकली. वाचा सविस्तर…..
-
Team India: वनडे वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी
ODI World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप आधी (ODI World Cup 2023) टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. वनडे वर्ल्ड कप यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. वाचा सविस्तर….
-
DC vs MI IPL 2023 : मुंबई जिंकली, दिल्ली हरली, पण यात टीम इंडियाला दिसला भविष्यातला फिनिशर
DC vs MI IPL 2023 : कोण जिंकलं? कोण हरलं? यापेक्षा टीम इंडियाचा फायदा जास्त आहे. त्यांना भविष्यातला घातक फिनिशर मिळणार आहे. आयपीएलमधून असेच भविष्यातले स्टार मिळतात. वाचा सविस्तर….
-
DC vs MI 2023 : वीजेचा वेग,अर्जुनासारखा नेम आणि खेळ खल्लास, मुंबईच्या 22 वर्षाच्या मुलाची कमाल
DC vs MI IPL 2023 : मुंबईकडून चालू सीजनमध्ये त्याने डेब्यु केलाय. पदार्पणातच त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. त्याने ज्या अचूक थ्रो वर दिल्लीच्या फलंदाजाला रनआऊट केलं, तो विकेट मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा होता. वाचा सविस्तर….
-
केंद्र सरकारच्या वतीने उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन
71 हजार युवकांना उद्या मिळणार रोजगार
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार नियुक्ती पत्रांचे वाटप
व्हिडीओ काॅन्फरन्सीगद्वारे होणार कार्यक्रम
-
नागपूरनंतर कोल्हापुरात होणार मविआची वज्रमूठ सभा
नागपूर नंतर कोल्हापुरात होणार महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
28 एप्रिलला शहरातील गांधी मैदानमध्ये होणार सभा
नागपूरमधील वज्रमुठ सभेनंतर कोल्हापूरच्या सभेच्या तयारीला सुरुवात होणार
पश्चिम महाराष्ट्रातील वज्रमुठ सभांना कोल्हापुरातून सुरुवात होणार
-
पाण्यासाठी महिलांचा मोर्चा
करमाळा शहरातील रंभापुरा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त करत सकाळी सात वाजता करमाळा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला.
-
भाजप नेते आशिष शेलारांनी घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी
दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची घेतली भेट
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा
-
कर्नाटकातील निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार
भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली
या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे
यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे
यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे
-
शहरात पर्यायी जलस्रोत तयार ठेवा, राज्य शासनाचा पुणे महापालिकेला आदेश
पुणे शहरासह जिल्हयात देखिल कमी पावसाची शक्यता
याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात पाणी बचतीसह पर्यायी जलस्त्रोत तयार ठेवण्याच्या सरकारच्या सूचना
राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेला शहरातील बोअरवेल, विहिरी तसेच तलावांची माहिती तातडीने संकलित करण्याच्या सूचना
राज्याच्या मुख्य सचिवांच्या पुणे महापालिकेला ऑनलाईन बैठकीत सुचना
-
काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल पुढील आठवड्यात मुंबईत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार
वेणूगोपाल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष, ठाकरे-पवार भेटीत काय चर्चा होणार याकडे लक्ष
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काल सहा तास चर्चा झाली, या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांच्या दौऱ्याकडे लक्ष
Published On - Apr 12,2023 9:07 AM