Maharashtra Breaking News Live : विनोद तावडे यांना मातृशोक, मुंबईत दाखल होताच अमित शाह माजी शिक्षणमंत्र्यांच्या घरी पोहोचले
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे दोन खासदार आणि पाच आमदार जाणार आहेत. खोपोलीजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 7 जण ठार. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता सोलापूरकरांना आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. नाशिकच्या सप्तशृंग गडावर भाविकांसाठी सशुल्क दर्शन सुविधा सुरू. पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
VIDEO : बसमधील सीटसाठी दोन महिलांमध्ये ‘महाभारत’, भांडण पाहून तुम्ही सुध्दा डोके धरणार एवढं मात्र नक्की
Ladies Fight Video : एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बसमधील एका सीटसाठी भांडण झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आलं आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा नक्की डोके धरणार एवढं मात्र नक्की.
-
परभणीत धावत्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक, हल्लेखोर दुचाकीवरून पळाले
परभणी
परभणीत धावत्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक,
आखाडा बालापूर येथून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दोन दुचाकीवरून आलेल्या युवकांनी केली दगडफेक
परभणी शहरातील शिवाजी कॉलेजसमोरील घटना
हल्लेखोर दुचाकीवरून पळाले
सुदैवाने कोणीही जखमी नाही
पोलीस घटनास्थळी दाखल
-
-
राहुल गांधींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 18 मे ला होणार सुनावणी
मुंबई :
राहुल गांधींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 18 मे ला होणार सुनावणी
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून मिळाली तारीख
राहुल गांधींच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी केली होती याचिका
आजच्या सुनावणीत कोर्टानं पुढची तारीख दिली आहे
-
अमित शाह माजी मंत्री विनोद तावडे यांच्या घरी दाखल
मुंबई :
अमित शाह माजी मंत्री विनोद तावडे यांच्या घरी दाखल
विनोद तावडे यांच्या आईचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं होतं
विनोद तावडे यांना मातृशोक झाल्यानंतर त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी अमित शाह त्यांच्या घरी दाखल
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
मुंबई :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
त्यांचा ताफा मुंबई विमानतळाबाहेर दाखल
भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांकडून जय्यत स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांकडून अमित शाह यांचं स्वागत
भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
-
-
नितीन देशमुख यांची संघर्षयात्रा पोहोचली संत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत
अमरावती :
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पिण्याच्या पाण्यासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेचं तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज येथे आगमन
ठाकरे गटाचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही पायदळी निघालेल्या संघर्ष यात्रेत झाले सहभागी
अकोला ते नागपूर संघर्ष यात्रेचा आजचा सहावा दिवस
पाणी घेऊन नितीन देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते धडकणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एक तास उशिरा पोहोचणार
मुंबई :
केंद्रीयय गृहमंत्री अमित शाह मुंबई विमानतळावर एक तास उशिराने येणार
अमित शहा एक तास उशिरा पोहोचणार
विमानाचे लँडिंग एक तास उशिराने
सायंकाळी ६.५० ऐवजी रात्री ७.५० वाजता विमानाचे लँडिंग
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार
मुंबई :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार
अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल
भाजपचे अनके कार्यकर्ते मुंबई विमानतळावर दाखल, यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश
भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
-
अहमदनगर व्यापारी हल्ला प्रकरण
कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी भाजप खासदार सुजय विखे आक्रमक
दहा दिवसांत गुंडांचा बंदोबस्त करणार सुजय विखे यांचा इशारा
नगर शहरामध्ये व्यापाऱ्यांवर वारंवार हल्ले सुरू असून हल्लेखोरांचा बंदोबस्त तातडीने केला जाईल
नगर शहरातील अवैध व्यवसाय मटके, बिंगो, जुगार आदी अवैद्य व्यवसाय येत्या दहा दिवसात तातडीने बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देणार
जर पोलीस प्रशासनाने कामचुकारपणा केल्यास त्यांचेवरही कारवाई केली जाईल
नगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात
-
पुण्यातील कात्रज घाटात गारांचा पाऊस
मिनी काश्मीरसारखं घाटात पावसाचं दृश्य
रस्त्यावरून गारांचा वाहतोय थर
पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी
-
कल्याणमध्ये दिवसाढवळ्या केडीएमसीचे पाण्याचे पाईप चोरण्याचा प्रयत्न
नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी उघडकीस
खडकपाडा पोलिसांनी दोन लाखाचे पाईप चोरी करण्याचा प्रयत्न
दोन ट्रक आणि एक क्रेन चालक अशा तिघांना घेतले ताब्यात
-
नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी
शहराच्या पंचवटी, शालिमार भागात सायंकाळच्या सुमारास पावसाने लावली हजेरी
बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची उडाली धावपळ
दिवसभराच्या उकाड्यानंतर पावसाची हजेरी
-
अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर मोठ्या संख्येत पोलीस सज्ज
मुंबई :
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर आगमन होणार
अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येत पोलीस सज्ज
सह्याद्रीच्या समोर सध्या साफसफाई देखील सुरू
स्वागतासाठी भाजपा तर्फे बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर
थोड्याच वेळात अमित शाह मुंबई दाखल होणार
मुंबई विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला
सुरक्षेची संपूर्ण काळजी मुंबई पोलीस घेत आहेत
-
भंडारा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचे आगमन
– भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाचे आगमन
– पुन्हा एकदा सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना फटका बसणार असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे
-
पुण्यात पावसाला सुरूवात, कोथरूडमध्ये गारांचा पाऊस
पुणे :
पुण्यात पावसाला सुरूवात
पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
कोथरूडमध्ये गारांचा पाऊस
आज आणि उद्या पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता
पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता
दुपारच्या सुमारास आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे
-
गिरीश बापट यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
– गिरीश बापट यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
– शोकसभेला नितीन गडकरी, शरद पवार, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची उपस्थिती
– उद्या संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात शोकसभेचे आयोजन
-
पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
कोथरूडमध्ये गारांचा पाऊस
आज आणि उद्या पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता
पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता
दुपारच्या सुमारास आज पुन्हा पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे
-
पुण्यात पावसाला सुरूवात
पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
कोथरूडमध्ये गारांचा पाऊस
आज आणि उद्या पुणे शहरात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला होता
पुणे वेधशाळेकडून शहरात जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता
दुपारच्या सुमारास आज पुन्हा पावसाला सुरुवात
-
आदित्य ठाकरे यांची आज मातोश्रीवर पत्रकार परिषद. रडारवर कोण?; उत्सुकता ताणली
संध्याकाळी 5 वाजता मीडियाशी संवाद साधणार
मेट्रोसाठी कांजूर मार्गची जागा निश्चित करण्यात आली आहे, त्यावर भाष्य करण्याची शक्यता
महाविकास आघाडीच्या उद्याच्या सभेवरही भाष्य करण्याची शक्यता
-
उद्याच्या सभेआधी शिवसैनिकांना सूचना
उद्याच्या सभेसाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सूचना
उद्याची सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश
उद्या दुपारपर्यंत उद्धव ठाकरे नागपुरात होणार दाखल
नागपूरात आल्यानंतर सभेआधी नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता
उद्या सभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करा
संजय राऊत, विनायक राऊतांच्या शिवसैनिकांना सूचना
ठाकरे गटाकडून उद्याच्या सभेचं जोरदार तयारी
-
VIDEO | बिकिनीमध्ये फोटोशूट करणार्या मुलीला मुलगा पोज कशी द्यायची शिकवतोय, तेवढ्यात…
Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका जोडप्याला एक तरुण कशी पोज द्यायची हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
-
उद्याच्या सभेची ठाकरेगटाकडून जोरदार तयारी
उद्याच्या सभेची ठाकरेगटाकडून जोरदार तयारी
सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत,
आमदार सुनील प्रभू बैठकीसाठी उपस्थित
उद्याच्या सभेच्या नियोजनाचा घेतायेत आढावा
-
अमरावती मध्यवर्ती एसटी बस्थनकाच्या इमारतीची अनेक ठिकाणी दुर्दशा…
अनेक ठिकाणी स्लॅबचे लोखंड पडले उघडे….
अनेक ठिकाणी स्लॅब जीर्ण झाल्याने जिवीत हानी होण्याची शक्यता…
-
अपघाताची घटना दुर्देवी, 12 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
झालेली दुर्घटना दुर्देवी आहे. खासगी बस घाटात पडून दुर्घटनाग्रस्त झाली
12 जणांचा मृत्यू झाला आहे. एक मिसिंग आहे. 28 लोक जखमी आहे. सर्व जखमींना मी पाहिलं. पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे
या सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपचारही सुरू आहेत. घटना अत्यंत दुर्देवी आहे. शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख देण्यात येणार आहे
जखमींवर मोफत उपचार होणार आहेत
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्हा न्यायालयात जाणार
2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती लपविल्याचा आरोप करीत न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती
या संदर्भात आज प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर राहाणार आहेत
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खोपोली अपघातातील जखमींची विचारपूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात दाखल
जखमींची विचारपूस, मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन
अपघात घटनास्थळीही मुख्यमंत्री जाणार
-
VIDEO | आठ वर्षे भाऊ म्हणाली, त्याच्याशी तरुणीने लग्न, कारण ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, त्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की, त्या लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. सध्या तशीचं एक गोष्ट व्हायरल झाली आहे. त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याबरोबर ती गोष्टी सगळीकडे व्हायरल झाली. त्यावर अनेक लोकं कमेंट करीत आहेत.
-
VIDEO | पावसात भिजत बाई मुलाला कंबरेवरती घेऊन निघाली होती होती, मग एका व्यक्तीने…., लोकांनी केलं कौतुक
अचानक पाऊस सुरु झाल्यानंतर हातात छत्री नसलेली महिला आपल्या मुलाला कंबरेवरती घेऊन आडोसा शोधत आहे. त्याचवेळी एका अनोख्या व्यक्तीने आपल्याकडील एक वस्तू त्या महिलेला दिली. त्यामुळे लोकांनी त्याचं अधिक कौतुक केलं आहे. संपूर्ण बातमी एका क्लिकवर
-
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मुंबई पुणे महामार्गावर दुर्घटना स्थळ व रुग्णालयात जखमी भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार
थोड्याच वेळात ठाण्यातून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री जाणार
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे केले होते जाहीर
-
सरकारी सुवर्ण रोख्यातून जोरदार कमाई
पाच वर्षांपूर्वीच्या रोख्यांनी गुंतवणूकदारांची चांदी
आता रक्कम दोन दिवसांत येईल काढता
Gold Bond मुळे गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट
कसा मिळवला 105 टक्के नफा, वाचा सविस्तर
-
जखमींना शासकीय खर्चाने उपचार
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
-
पुणे चांदणी चौकात उसाचा ट्रक उलटला
पुणे चांदणी चौकात उसाचा ट्रक उलटला
दोघे जण किरकोळ जखमी
उसाचा ट्रक भुगावकडून पुण्याकडे येत होता
या अपघातात ट्रक चालकासह पंक्चर काढणारा टपरीवाला किरकोळ जखमी
-
महागाईच आता स्वस्त आहे
या 23 देशांच्या इशाऱ्यावर नाचते महागाई
जर्मनी, इंग्लंडसह तगड्या अर्थव्यवस्थांचे होते पानिपत
कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय
ओपेक देशांच्या संघटनेचा जगाला दणका
कच्चे तेलाच्या किंमती भडकल्याने अर्थव्यवस्थांसमोर नवे संकट, वाचा बातमी
-
पुणे बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
राष्ट्रवादी,मित्रपक्ष पुरस्कृत पॅनलची पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी, मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे 15 पैकी 10 उमेदवार जाहीर
या 10 जागांमध्ये राष्ट्रवादीला 9 तर उद्धव ठाकरे गटाला एक जागा देण्यात आलीय
तर उर्वरित 5 जागांची यादी आज संध्याकाळपर्यंत घोषित होणार
-
सोने चमकले, चांदीच्या किंमतीत घसरण
सोने-चांदीची विक्रमाकडे वाटचाल
गेल्या सहा महिन्यात दिला मोठा परतावा
जानेवारी ते मार्च दरम्यान सोन्याचा 8 टक्के रिटर्न
चांदीने केली गुंतवणूकदारांची चांदी
चांदीचा गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा, वाचा सविस्तर
-
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव काय?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 61, 500 रुपयांवर
तर चांदीचे भाव 76 हजार 500 रुपयांवर
सोन्याच्या भावात एकाच दिवसात 900 रुपयांची वाढ तर चांदीच्या भावात 1 हजार 400 रुपयांची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या भावात वाढ सोने तज्ञांची माहिती
मात्र ऐन सणासुदीत सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली
-
रायगडमध्ये पेट्रोल-डिझेल सर्वात स्वस्त
राज्यातील अनेक शहरात किंमतीत फरक
औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूरमध्ये किंमती चढ्याच
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात एक डॉलरच्या जवळपास वाढ
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव घ्या जाणून, एका क्लिकवर
-
पीएमपीएल बसच्या ब्रेकडाऊनमध्ये मोठी वाढ
पुणे शहरात पीएमपीएल बसच्या ब्रेकडाऊनमध्ये मोठी वाढ
मार्च महिन्यात पीएमपीएलच्या तब्बल १२७० बस पडल्या बंद
प्रवासादरम्यानच जवळपास १२७० बसेस पडल्या बंद
पीएमपीएल प्रशासनाचे मात्र जुन्या बसेस कडे दुर्लक्ष
दररोज बंद पडत आहेत सरासरी 41 बस
पीएमपीएल बस च्या ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढलं
-
पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज
पुणे : शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार
दोन दिवस पुणे शहराला हवामान खात्याचा येलो अलर्ट
आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार
तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता
पुणे वेधशाळेचा अंदाज
दुपारच्या सुमारास शहरात तापमानाचा पारा वाढणार
पुणेकरांनी काळजी घेण्याचा हवामान खात्याचा आवाहन
-
चंद्रपूरमध्ये स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने 2 मित्रांचा जागीच मृत्यू
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा फाट्याजवळील नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील घटना
दोघेही तरुण वरोरा शहरातील रहिवासी असून हर्षल पाचभाई (22) आणि अंकुश भडगरे (23) अशी त्यांची नावं आहेत
भद्रावतीला जात असताना पोलिसांच्या महामार्गावरील बॅरिकेटला दिली जोरदार धडक
ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरूणांचा घटनास्थळीच झाला मृत्यू झाला
अंकुश आणि हर्ष बीएमडब्ल्यू जी 310 आरआर बाईकवरून प्रवास करत होते आणि या बाईकची किंमत 3 लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे
-
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे दोन खासदार आणि पाच आमदार जाणार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रचारात उतरवले आहे
सोलापुरातील दोन खासदार आणि पाच आमदार आज बेळगाव विजयपूर यासह विविध जिल्ह्यात प्रचारासाठी जाणार
दरम्यान काँग्रेसकडून यापूर्वीच आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना प्रचारात उतरवण्यात आले
त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचे हे आमदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर कितपत परिणाम करतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे
-
नगरमध्ये व्यापाऱ्यांचा कापड बाजार बंद
काल दोघा व्यापाऱ्यांवर झालेले हल्ल्याप्रकरणी कापड बाजार बंदची हाक
शहरातील सर्व व्यापारी बंदात सहभागी होणार
अकरा वाजता कापड बाजारात आंदोलन करून घटनेचा निषेध करणार
दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत या दोन व्यवसायिकांवर झाला होता चाकूने हल्ला
या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी, तर शहरात अनेक संघटनाकडून निषेध व्यक्त
तर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार
-
इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम
सरकारने नवीन शैक्षणिक धोरण केले लागू
मात्र नवीन धोरणा नुसार दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम
सरकारच्या वतीने खुलासा करण्यात यावा अशी शिक्षण संस्था चालकांची मागणी
दहावीच्या ट्युशन सुरू देखील झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबईत; मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार
अमित शाह आज आणि उद्या मुंबईत येणार आहेत
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शाह उपस्थित राहणार आहेत
अमित शाह यांच्या स्वागताची मुंबई भाजपकडून जय्यत तयारी
Published On - Apr 15,2023 8:17 AM