MVA Nagpur Rally : भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरुय : उद्धव ठाकरे
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत आज अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार. नवी मुंबईतील खारघर येथे हा सोहळा पार पडणार आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभेला उपस्थित राहणार. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सभेला जाणार की नाही? सस्पेन्स कायम. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांचं एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर प्रयागराजसह लखनऊनमध्ये अॅलर्ट. इंटरेनेट सेवाही बंद. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघातामुळे 8 जणांचा मृ्त्यू
मुंबईः
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्याला डाग
खारघरमधील आठ जणांचा उन्हामध्ये मृत्यू
नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील धक्कादायक घटना
आणखी मृत्यू वाढण्याची शक्यता
मृत्यूच्या नातेवाईकाना 5 लाखाची मदत जाहीर…..
-
इन्फोसिस विलिनीकरणाच्या वाटेवर
आयटी सेक्टरमधील मोठी घडामोड
सीईओंच्या वक्तव्याने बाजारात एकच खळबळ
मार्च तिमाहीत कंपनीला मोठा फायदा
कंपनीने प्रत्येक शेअरमागे जाहीर केला मोठा लाभांश
कंपनीच्या भूमिकेमुळे गुंतवणूकदार संभ्रमात, वाचा अपडेट
-
-
भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
महाविकास आघाडीची आजची दुसरी सभा आहे, त्यानंतर आज महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये होत आहे. मला जुने दिवस आठवले. तेव्हा एकत्र नव्हतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शिवसेना समारोसमोर होते. आम्ही त्यावेळी कर्जमुक्त करुन दाखवलं होतं.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, ही आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार कुणाच्या हस्ती देण्यात आला? सच्च्या समाजसेवकासमोर झुकावं लागतं. आप्पासाहेब यांचं घराणं मोठं आहे. या घराण्याची मोठी परंपरा आहे. त्यांचं घराणं व्यसनमुक्तीचं काम करतात. दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते. एवढी लोकं जमली आहेत. पण आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचा गिऱ्हाईक आणि सत्ताधाऱ्यांच्या मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. जगाच्या श्रीमंतीत अव्वल, यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालला आहे, पण गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे. ही तूच भूमी आहे ज्या भूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं आहे. हा डेकोरेशनचा भाग नाही. भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचं काम सुरु आहे. एका माणसाने देशाला घटना दिला. मग एवढी मोठी जनता संविधान वाचवू शकत नाही. मी घटना बचाव करणार असं म्हणार नाही तर घटनेचं संरक्षण मीच करणार असं म्हणेन.
मी हल्ली शब्द जपून वापरायला लागलो आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता. पण फडतूस बोलण्यामागील माझा उद्देश काय होता? मविआच्या सरकारवेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या पायांचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय.
आजच्या सभेचं वेगळेपण सांगतो. पहिले युती होते, पण आम्हाला फसवलं, त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. आमच्या सरकारने काम केलं मग जनतेसमोर आलोय. सरकार गद्दारी करुन पाडलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू आणि करु तर छातीवर करु. हे अवकाळी सरकार आलं आहे
अयोध्येला मी, संजय राऊत सुद्धा गेलो होतो. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा तो मुद्दा कोर्टात प्रलंबित होता. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही म्हणालो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचं सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. पण ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय?
मुख्यमंत्री खरे रामभक्त असते तर आधी सुरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले होते. आताचे उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले नव्हते. पण हे जातील म्हणून तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? म्हणत ते सुद्धा गेले.
रामराज्य महाराष्ट्रात कधी येणार? शेतकरी एवढा टाहो फोडत आहेत, आक्रोश करत आहेत, सरकार पंचनामे करायलाही जात नाही. मग मुख्यमंत्री जातात आणि आदेश देतात की, ताबडतोब पंचनामा करा. जेव्हा आपलं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात वेळेत मदत पोहोचत होती की नाही? आता शेतकरी बोलत आहेत की, पंचनामे कशाला करताय तर आमच्या मैताला या. हे निर्लज्ज आहेत, मैतालासुद्धा जातील.
मी घरात बसून कारभार केला. पण त्यावेळी माझे सहकारीदेखील काम करत होते. काम करायचं असेल तर कुठेही करु शकतो. नुसतं वणवण फिरला म्हणून काम झालं म्हणता येणार नाही. जनतेला मदत झाली नाही तर तुमच्या पदाचा उपयोग आहे. त्यावेळी संकट असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं.
पंतप्रधान मोदींनीसुद्धा आठ वर्षात काय केलं ते जनतेसमोर येऊन सांगत का नाही? ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव चोरलं, माझा बाप चोरलं, मग तुम्ही जनतेला कसं सांभाळणार?
चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. मी आव्हान देतो मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून येतो. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव घेऊन या. मैदानात या, एका व्यासपीठावर बोला. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, आम्ही जे बोलायचंय ते बोलू. जनता जनार्दन आहे
मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. पण मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. इकडे आलेली माणसं माणसं नाहीत का? हो संभाजीनगरच्या सभेला मुसलमान आले होते. ते माणसं नाहीत? भाजपने जाहीर करावं त्यांचं हिंदुत्व काय?
ते शिवसेनाप्रमुखांचं हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे.
आम्ही काँग्रेसबरोबर गेलो. आम्हाल कोणी घालावलं? प्राण न जाये, पण वचन न जाए, असं काही नाही. खुर्ची मिळाली भरपूर झालं.
एका महिलेवर तिच्या कार्यालयात घुसून महिला गुंडांकडून हल्ला केला जातो. रोशनी शिंदे तिचं नाव. ती हात जोडून मारु नका विनंती करते. ती माफी मागते. त्याचा व्हिडीओ देते. तरीही तिच्या पोटात लाथा मारल्या जातात. पोलीस तक्रार करायला तयार नाहीत. दुसऱ्या दिवशी मोर्चा होता. ती रुग्णालयात असताना तिला अटक करण्यासाठी डिस्चार्ज मिळवण्यासाठी दबाव आणतात, मग मी हा गृहमंत्री फडतूस आहे असं म्हणालो, तुम्ही काय म्हणाला असता? हा कारभार संघ, मोदींना आणि अमित शाह यांना मान्य आहे का?
देश कसा असला पाहिजे? मोकळा असला पाहिजे. देश म्हणजे दगड, धोंडे नाहीत. देश म्हणजे या देशाचे माणसे. क्रांतीकारकांनी आपल्यासाठी जीव दिला असेल तर निवडणुकीत कोण पर्याय असावा? क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या, त्यांनी फास घेतले, पण तुम्हाला फक्त बोटांनी निर्णय द्यायचा आहे. तेवढं तुम्ही करु शकता. हे नाहीतर कोण असा पर्याय उभा केला जातो. नाही तर कोण काय कुणीही येईल.
राहुल गांधी यांना अपात्र ठरवलं, केजरीवालांना आता आत टाकतील. सत्यपाल मलिक यांनी मोठा स्फोट केलाय. हिडनबर्ग संस्था तर बाहेरची आहे. पण सत्यपाल मलिक हे त्यांचे पक्षाचे आहेत. तुम्ही त्यांना राज्यपाल म्हणून बसवलं होतं. अशा व्यक्तीने विधान केलंय ते गंभीर आहे. ते पुलवामाच्या हल्ल्याबद्दल बोलले आहेत. या हल्ल्याचं ते राजकीय भांडवल करण्याची शक्यता आहे
कारगीलच्या युद्धावर वी पी मलिक यांनी पुस्तक लिहिलं आहे त्यात म्हटलं होतं की, विजयानंतर भाजपचं नाव लिहिलं जात होतं. पण ते म्हणाले होते हे असं होऊ शकत नाही. वाजपेयी यांनी पोस्टर्स मागे घ्यायला लावलं. एवढा मोठापणा त्यांच्यात होता. सरकार आती है जाती है लैकीन देश रहना चाहीए, असं ते म्हणाले होते. आमचं सरकार चांगलं चाललं होतं. पण तुम्ही आमचे गद्दार फोडले. त्यांना घेऊन तुम्ही राज्यकारभार करत आहात. ही सत्तेची नशा नाही तर काय आहे? यांचा गोविंदा निघाला आहे दिल्लीवरुन आणि दिसली हंडी की फोड, हा यांचा गोविंदा आहे?
तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो. गेल्या आठ वर्षात देशासाठी काय केलं ते सांगा. आम्ही तुम्हाला सत्ता देतो. तुमच्या गावात उज्वला योजना कितपर्यंत व्यवस्थित सुरु आहे. पीकविमा योजना व्यस्थित चालू आहे? तुम्हाला कळतंय तुम्ही कसे फसवले जात आहात?
सगळं आलबेल आहे, असा भ्रम निर्माण केला जातोय. मोदींचं सरकार येण्याआधी डॉलर, गॅस सिलेंडरचा भाव काय होता? कुणाच्या लक्षात आहे? या सरकारने आनंदाचा शिधा सुरु केलाय. पण त्यातून मिळालेल्या धान्याला बुरशी लागलेली आहे. संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे. आम्ही तुमच्यासाठी लढतोय. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुमच्यात वज्रमूठ आवळायची हिंमत होतेय ना?
आता एक-एक मुद्दे समोर येत आहेत. महागाई, बेकारी याचे चटके लागू नये यासाठी धार्मिक भ्रम निर्माण केला जातोय. या बुर्ख्यामागचा बेसूर चेहरा पाहा. जे चाललंय ते तुम्हाला मान्य आहे का? आम्ही करतोय ते तुम्हाला मान्य आहे की नाही? एक सुद्धा भाडखाऊ यामध्ये नाही, एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र!
-
भाजप का घाबरतं? : नाना पटोले
नाना पटोले यांच्या भाषणातील मुद्दे :
राज्यात ईडीच्या सरकारकडून या सभा होऊ नये यासाठी काळजी घेतली गेली, संभाजीनगरमध्ये मुस्लिम परिसरात हिंदू धर्माचा मंदिर आहे. राम मंदिरात राम नवमीच्या दिवशी दोन्ही समााजाकडून कार्यक्रम आयोजित केला. पण दहा-पंधरा मुलं गेली आणि त्यांनी वातावरण खराब केलं. पोलिसांनी दुर्लक्ष केलं. पण संभाजीनगरमध्ये सभा झाली. नागपुरातही सभा होऊ नये यासाठी जागेचा वाद निर्माण केला. कोर्टापर्यंत वाद गेला. भाजप का घाबरतं? चोर के दाढी को तिनका
नागपूरकरांना लुटलं जातंय, सगळ्यात महागडं हे शहर आहे, शहारत भयावह परिस्थिती आहे. विकासाच्या नावाने नागपूरकरांना लुटण्याचं काम सुरु आहे
-
दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावले?, जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
जयंत पाटील यांच्या भाषणातील मुद्दे :
नागपूर ही क्रांतीकारकांची भूमी आहे, नागपूरसारखं आदरातिथ्य कुठेही नाही. आम्ही नागपुरात जेव्हा एकत्र येतो, नागपुरात जे ठरतं ते पूर्णत्वास जातो. इंदिरा गांधी यांना देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी याच विदर्भाने साथ दिली. विदर्भाचा निर्णय देशात पोहोचतो
आमची वज्रमूठ ही विदर्भवासीयांची, शेतकऱ्यांची आहे, राज्य सरकारला विचारतेय की, तुम्ही काय दिवे लावले? या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिलं काय? कोणते नवे प्रकल्प विदर्भात आणले?
या सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलं
हे सरकार निवडणुकीला घाबरतंय, लोकांसमोर जाण्याची भीती आहे, त्यामुळे इव्हेंट आयोजित करत आहे. पण महाराष्ट्र दुधखुळा नाही. उद्धव ठाकरे सोडून गेले त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख करतात. पण मला सांगायचं आहे, कुछ तो मजबुरी हुई रहेंगी, युही बेवफा हुई होंगी, काहीतरी अडचण असेल, काहीतरी नस दाबली गेली असेल, समजून घ्या
-
-
या देशात लोकशाही जीवंत राहील का? असा प्रश्न : पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणातील मुद्दे :
भारत देश निर्णायक परिस्थितीवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधानांवर गंभीर आरोप आहेत. त्यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पण ते उत्तर देत नाहीत. एकामागेएक विस्फोटक बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी अदानी यांच्याविरोधात अमेरिकेतील कंपनीने गंभीर आरोप केले तेव्हा हा माणूस जगातील दुसऱ्या श्रीमंत उद्योगपतीच्या नावावरुन खूप खाली घसरले. अदानी यांचे 132 अब्ज डॉलर संपत्तीचा ऱ्हास झाला. इतक्या वेगाने ही व्यक्ती इतकी श्रीमंत का झाली? अदानींच्या 32 बेनामी कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ते पैसे कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गंभीर सवाल उपस्थित केले. गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते, ज्यांचं पंतप्रधान यांच्यावर प्रेम होतं ते सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले. 14 फेब्रुवारी 2019 ला भारतीय जवानांवर पुलवामात हल्ला झाला, ४० जवाल शहीद झाले, तेव्हा इंजेलिजन्सची माहिती आली होती, पण दुर्लक्ष केले गेले, नरेंद्र मोदी तुमच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत, नरेंद्र मोदी जवाब दो.
या देशात लोकशाही जीवंत राहील का? याबाबत प्रश्न निर्माण होतोय. संविधान आज धोक्यात आलंय, आपल्याला धोका थांबवायचं असेल तर मविआच्या वज्रमूठला साथ दिली पाहिजे. आपण ताकदीने एकत्र उभं राहिलं पाहिजे. काहीच कठीण नाही.
-
‘अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता’
अनिल देशमुख यांच्या भाषणातील मुद्दे :
मला खोट्या गुन्ह्याखाली फसवलं. माझ्यावर शंभर कोटी रुपयांचा आरोप केला, माझ्यावर शंभर कोटींच्या आरोपानंतर मी उद्धव ठाकरे आणि अजित पवार समोर आहेत, मी सांगितलं की चौकशी करा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या, एक वर्षभर चौकशी झाली, हायकोर्टाने जो निकाल दिला त्यामध्ये सांगितलं की, अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारावर आहेत, त्याचा कोणाताही पुरावा नाही, त्यांच्यावर आरोप करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे. माझ्यावर एवढे आरोप झाले आणि चार्जशीटमध्ये 1 कोटी 71 लाखांचा उल्लेख होता. माझ्यावर ज्याने आरोप केला तो बाहेरच्या देशात गेला होता. मी 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये आहे, अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है, अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता
शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही
कापसाची आयात केल्याने महाराष्ट्रात भाव पडले
राज्यातले मोठमोठे उद्योग बाहेर गेले
-
50 खोके एकदम ओक्के हे महाराष्ट्राचं दुर्देव : सुनील केदार
सुनील केदार यांच्या भाषणातील मुद्दे :
संविधान जे जाळतात, फाडून टाकता त्या लोकांना देशात राहायचा अधिकार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने या देशाला संस्कार दिले आहेत, जान जाए पण वचन न जाए, पण राजकारणाला काळीमा लावणारी कृती या महाराष्ट्राच्या राजकारणात दहा महिन्यांपूर्वी झालं.
50 खोके एकदम ओक्के हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे, हा कलंक आहे, हा कलंक आपल्याला कायम धुवायचं आहे.
-
उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार आणि सुनील केदार मंचावर दाखल
नागपूर :
उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार आणि सुनील केदार मंचावर दाखल
बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख यांच्यासह आणखी काही दिग्गज मंचावर उपस्थित
-
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
नागपूर :
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित
उद्धव ठाकरे काय बोलणार? याबाबत उत्सुकता
-
नितीन देशमुख यांच्याकडून बावनकुळे यांचा ‘मतीमंद’ असा उल्लेख
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या भाषणातील मुद्दे :
आठ-दहा दिवसांपूर्वी भाजपचा मतीमंद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर निघू देणार नाही. माझं त्या मतीमंद प्रदेशाध्यक्षांना आवाहन आहे, मातोश्रीच्या बाहेर सोडा, उद्धव साहेब नागपुरात आले. शिवसैनिकांना नागपुरात येऊन दाखव तेव्हा मी म्हणेल भाजपचा प्रदेशाध्यक्ष मतीमंद नाही म्हणून
हे सरकार कसं आलं ते मला माहिती आहे. या ईडीमुळे सरकार आलं नाही फक्त, तर महाराष्ट्र बदनाम झाला, आशिया खंडातील सर्वात जास्त बदनाम शिवसेनेचे ४० आमदार झाले, हा कलंक भाजप पक्षामुळे लागला
अधिवेशनात आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकतो, आमचे ४० आमदारही म्हणतात की, नरेंद्र मोदी यांचा फोटो बघून आम्ही निवडून आलो. २०१४ ला शिवसेने वेगळी लढली होती. २०१९ला आम्ही एकत्र निवडणूक लढलो. पण शिवसेनेचे आमदार कमी झाले
भावना ताई तुम्ही ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाच्या नेत्यावर अश्लिल चाळे करत असल्याचा आरोप करत गुन्हे दाखल करता? नितीन देशमुख यांचा सवाल
-
राम आमच्या हृदयात आहेत : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार यांच्या भाषणातील मुद्दे
राम आमच्या हृदयात आहेत त्यांच्या मनात मतासाठी राम आहे, प्रभू रामांचं नाव राजकारणासाठी वापरता, हीच जनता बजरंगबलीच्या रुपाने गधा घेऊन तुमच्यावर घाव घालणार आहे युपीत पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीवर जवळून येऊन गोळी झाडले जाते विदर्भ काँग्रेसचा गड आहे, हा कुणाचा बापाचा गड नाही, आता मविआ इथे एकत्र झाली आहे आम्ही करुन दाखवलं, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात जिंकलो, जिल्हा परिषदेत जिंकलो आता तुमच्या अंधपतनाचे दिवस येणार आहेत भ्रष्टाचाराने बरबरटलेले सरकारला पायउतार करण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. सर्वांनी हात वर करुन सरकारला चले जाओ म्हणा
-
नागपुरात मविआची सर्वात मोठी सभा, उद्धव ठाकरे सभास्थळाच्या दिशेला रवाना
नागपूर :
उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना
नागपूरमध्ये मविआची सर्वात मोठी वज्रमूठ सभा
तीनही पक्षांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे जनतेचं लक्ष
-
टाटा समूहाच्या या शेअरची कमाल
गुंतवणूकदारांना केले मालामाल
118 चा शेअर गेला 3100 रुपयांवर
एक लाखाचे झाले एक कोटी
दीर्घकालीन गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
तु्म्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली की नाही, वाचा बातमी
-
राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द
भारतीय कुस्ती महासंघाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द
उत्तर प्रदेशात झाली जनरल बॉडीची बैठक
बैठकीत एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे
शरद पवार गटाच्या कुस्तीगीर संघटनेला हा मोठा झटका आहे
राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे
कुस्तीगीर संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यावरही या बैठकीत चर्चा झाली
-
भारतीय कुस्ती महासंघाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नता रद्द
उत्तर प्रदेशात झाली जनरल बॉडीची बैठक, बैठकीत एकमतानं निर्णय घेण्यात आला
शरद पवार गटाच्या कुस्तीगीर संघटनेला हा मोठा झटका आहे
राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे
कुस्तीगीर संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती त्यावरही या बैठकीत चर्चा झाली, संदीप भोंडवे यांची माहिती
-
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मानवता सेवेचं काम करत राहणार; आप्पासाहेबांची ग्वाही
माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन
कार्य हे सर्वश्रेष्ठ आहे, ते पुढे नेले पाहिजे
समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे
कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा
-
माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो, तो लहान कधीच नसतो : आप्पासाहेब धर्माधिकारी
हा पुरस्कार माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं, तुम्ही साथ दिली, त्यामुळे या पुरस्काराचं श्रेय तुम्हाला जातं
एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात कुठे झाली नाही
-
नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा
उद्धव ठाकरेंच्या आगमनाआधीचं रेडीसन ब्लू हॉटेल परिसराची नागपूर पोलिसांकडून तपासणी
बीडीडीएस पथकानं किंग श्वानाच्या माध्यमातून केली तपासणी
उद्धव ठाकरे 5 रेडीसन ब्लु हॉटेलमध्ये होणार दाखल
त्या आधी पोलिसांकडून खबरदारी
-
तुम्ही कधीच गर्दीचा हिस्सा झाला नाही, तुम्ही तुमची एक वेगळी वाट निर्माण केली : अमित शाह
एखाद्या कुटुंबावर तीन तीन पिढ्या समाजसेवेचा संस्कार मी पहिल्यांदाच पाहिला आहे
एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा हाच पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ
-
समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात पाहिला नाही; अमित शाह यांच्याकडून गौरव
प्रचंड ऊन असतानाही तुम्ही आलात आणि सकाळापासून इथे बसून आहात यावरून तुमच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो
केवळ त्याग आणि सन्मानानेच हा आदर निर्माण होतो
दिल्लीतून मी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे
-
आप्पासाहेबांना पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली, महाराष्ट्राचा मानसन्मान वाढला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आप्पासाहेबांना पुरस्कार मिळाला यापेक्षा वेगळा आनंद नाही
आप्पासाहेबांचं कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये गेलेलं आहे
-
राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती सर्वात मोठी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठानाची गरज लागते
परवा रात्रीपासूनच श्री सदस्य कार्यक्रमाला आले
ज्या मैदानात नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्याच मैदानात आप्पासाहेबांना पुरस्कार मिळणं हा दैवी योग आहे
केंद्र सरकारनेही आप्पासाहेबांच्या कामाची दखल घेतली
-
खाद्यतेलाने दिली आनंदवार्ता
किंमतीत झाली मोठी घसरण
पामतेल आणि पामोलीन तेलाच्या आयातीचा परिणाम
यंदा 22 टक्के अधिक तेलाची आवक
अजून मोठा साठा भारतीय किनारपट्टीवर येणार
शेतकरी आणि ऑईल मिल मालकांची प्रचंड नाराजी
आयात शुल्क वाढीची केली मागणी, वाचा बातमी
-
जगात सात नाही तर आठ आश्चर्य आहे, आठव आश्चर्य म्हणजे श्रीसेवक; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
माणसांची खरी श्रीमंती संस्कारातून दिसते, हीच श्रीमंती मला श्री परिवारात दिसते
आप्पासाहेबांनी निरुपणातून आपल्या सर्वांना सकारात्मकता दिली
कपडे खराब झाले तर धुता येते, शरीरही अंघोळीने स्वच्छ करता येते. पण मन कसे स्वच्छ कसे करायचे? मन स्वच्छ कसे करायचे याची कला आप्पासाहेबांच्या निरुपणात आहे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे, त्यांचे आभार मानण्यासाठीच हा पुरस्कार दिला
-
Crime News : लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात, भयानक आवाजामुळं गाव घटनास्थळी पोहोचलं
Bus car accident : लक्झरी बस आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. बुलढाणा (Buldhana) शहरापासून काही अंतरावर येळगाव (Yelgaon) या गावजवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे पैनगंगा नदीवरील पुलावर लक्झरी बस आणि कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.
-
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
मानपत्र, शाल, श्रीफळ आणि 25 लाखाचा धनादेश देऊन डॉ. धर्माधिकारी यांचा सन्मान
लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शंभुराज देसाई आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित
-
आज एका कोहिनूर हिऱ्याचा गौरव; सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून गौरव
तळपत्या सूर्यप्रकाशातही श्रीसेवकांची प्रचंड गर्दी
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मानवी देहाचं सोनं केलं
आप्पासाहेब धर्माधिकारी जगातील सर्वात मोठं चुंबक
-
अजित पवार वज्रमूठ सभेसाठी नागपुरात दाखल होणार
अजित पवार आज दुपारी नागपुरात होणार दाखल
राष्ट्रवादीकडून कोण भाषण करणार याची उत्सुकता
स्थानिक नेता आणि वरिष्ठ नेता अशा दोन जणांनाच भाषणाची संधी दिली जाणार
आज कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सुरू, कार्यक्रम स्थळी प्रचंड गर्दी
खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रम स्थळी हजर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात कार्यक्रम स्थळी पोहोचणार
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी अलोट जनसागर लोटला
-
‘वाचाल तर टिकाल’ या शिकवणीनुसार विद्यार्थी आणि युवकांचं अनोख्या पद्धतीनं अभिवादन
सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर (Islampur) शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar jayanti 2023) यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, युवकांनी 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांच्या ‘वाचाल तर टिकाल’ या शिकवणीनुसार अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. राज्यात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर (social media viral video) आंबेडर जयंती उत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
-
या सरकारी कंपनीच्या विक्रीची तयारी
केंद्र सरकार राबविणार निर्गुंतवणूक धोरण
कंपनी खरेदीसाठी 4 कंपन्या उतरल्या मैदानात
पुढील महिन्यात आर्थिक बोली लावण्याची शक्यता
केंद्र सराकर निर्गुतंवणुकीचा अजेंडा राबविणार
तुम्हाला काय होणार फायदा, वाचा सविस्तर बातमी
-
नाशिकमध्ये मविआत बिघडी ?
एकीकडे नागपूरमध्ये मविआची वज्रमूठ सभा
तर दुसरीकडे नाशिकमध्ये मविआत बिघडी ?
शहरात लागले राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलीचे बॅनर
‘नाशिकच्या पहिल्या महिला भावी खासदार’ आशा आशयाचे बॅनर
नाशिक लोकसभेची जागा सुरुवातीपासून ठाकरे गटाकडे
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची शक्यता
-
Viral News : सासरच्या लोकांनी शिकवलं, पोलिस दलात भर्ती केलं, नंतर जावाई दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला,जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Viral News : सासरवाडीच्या लोकांनी जावयाला शिक्षण दिलं आणि शिपाई केलं, नोकरी लागताच दुसऱ्या लग्नाच्या धमक्या देऊ लागला, मग…
Bihar News : हे प्रकरण बिहार राज्यातील नाथनगरमधील आहे. एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी
-
सोन्या-चांदीची स्वस्ताई
ग्राहकांचा खरेदीची सुवर्णसंधी
चांदीची चमक पडली फिक्की
भावात झाली मोठी घसरण
सोमवारी दोन्ही धातूंची दिसेल करामत
सोने होणार का 70 हजारी मनसबदार?
चांदीच्या किंमती 80,000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता, वाचा बातमी
-
दहावी, बारावीचा निकाल नियोजित वेळेत लागणार
बारावीचा निकाल मे अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीेचे कामकाज 17 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार
तर दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज 20 एप्रिलपर्यंत पूूर्ण होणार
-
पुणे आरटीओला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न
वाहन फेरनोंदणीतून पुणे आरटीओला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला वाहनांच्या फेर नोंदणीतून सात कोटी रुपयांच्यावर उत्पन्न
एका वर्षात पुणे आरटीओकडे तब्बल 22 हजार 436 वाहनांची पुर्ननोंदणी
पुणे आरटीओला 7 कोटी 37 लाख रुपयांचा फायदा
-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार… कार्यक्रमाच्या स्थळी श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देणार
खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीसेवक दाखल, 20 लाख श्रीसेवक येणार असल्याचा दावा
-
Viral News : ही कसली अंधश्रद्धा, दोन मुलांचं कुत्र्यांसोबत लावलं लग्नं, संपूर्ण गावाला दिलं जेवण
Trending Story : ओडिशा राज्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बालासोर जिल्ह्यातील आदिवासी गावातील दोन अशी लग्न झाली आहेत की, त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. दोन मुलांची लग्न कुत्र्यांसोबत लावण्यात आली आहेत.
-
कच्चा तेलाची भाव वाढीची वर्दी
इंधनाच्या दरवाढीने महागाई भडकणार
पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केल्या किंमती
कुठे स्वस्त तर कुठे महागले आज इंधन
तुमच्या शहरात काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव, वाचा सविस्तर बातमी
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला जामीन
राजेश मारुती आगवणे आरोपीचे नाव
काही दिवसांपूर्वी राजेश आगवणे याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करत जीवे मारण्याची धमकी दिली होती
याच प्रकरणी पुण्यातील वारजे पोलिसांनी आगवणे याला ताब्यात घेतले होते
दारूच्या नशेत आणि कौटुंबिक वादातून त्याने हे सगळं कृत्य केल्याचे देखील उघड झालं होतं
10 एप्रिल रोजी पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी या आरोपीने दिली होती
-
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांची आतापासूनच पाण्यासाठी पायपीट
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाई
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात मार्च नंतर टँकरने पाणीपुरवठा सुरुवात करण्यात आला होता
पण यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल महिन्यातच टँकर सुरू करण्यात आले आहेत
जिल्ह्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर आंबेगाव तालुक्यातील 9 गावांमध्ये टँकर सुरू
-
गिरीश बापट यांना आज सर्वपक्षीय नेते श्रद्धांजली वाहणार
पुण्यात आज गिरीश बापट यांना सर्वपक्षीय नेते देणार श्रद्धांजली
खासदार गिरीश बापट यांच्या श्रद्धांजली सभेचे आज पुण्यात आयोजन
श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांची राहणार उपस्थिती
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सर्वपक्षीय नेते देणार गिरीश बापटांना श्रद्धांजली
काही दिवसांपूर्वीच पुण्याची खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं
त्यानंतर आज पुण्यात या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं आहे
-
जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नाशिकमध्ये विशेष मोहीम
30 एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार समता पर्व अभियान
इयत्ता अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम
-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी असते जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता
-
नागपुरात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’, अजित पवार येणार की नाही?; सस्पेन्स कायम
दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभेचं आयोजन, सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या ठाकरे गटाच्या सूचना
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करणार
संजय राऊत सभेसाठी नागपुरात कालपासून दाखल, सभेच्या तयारीचा घेतला आढावा
Published On - Apr 16,2023 8:16 AM