Maharashtra Breaking News Live : संजय राऊत धमकी प्रकरणात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई : वर्धा जिल्ह्यात 4 आणि 5 एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 9 एप्रिल रोजी कर्नाटकाच्या कोलार येथे जाहीर सभा, निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू आज तुरुंगातून बाहेर येणार. देशात एक कोटीहून अधिक लोकांनी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक केला. यासह देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
मोदी सरकारची महिलांसाठी खास योजना
आता होणार आर्थिक सन्मान, होईल मोठा फायदा
या योजनेतून मिळेल आर्थिक सहाय, इतके मिळेल व्याज
या योजनेत महिलेसह मुलींच्या नावे उघडता येईल खाते, वाचा बातमी
-
रिलायन्सची विस्ताराची नवीन खेळी
मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन
आता या क्षेत्रात ठोकणार मांड
या नवीन कंपनीचा झाला उदय
गुंतवणूकदारांचा काय होईल फायदा, वाचा बातमी
-
-
भारतीय रुपयाचा जगात डंका
अनेक देश व्यापारासाठी करत आहेत उपयोग
आतापर्यंत 35 देशांनी दिली मंजूरी
परदेशी बँकांनी रुपयात व्यापारासाठी उघडले खाते
आतापर्यंत 60 खास वोस्ट्रो खाते उघडण्यात आले, वाचा बातमी
-
वसंत मोरेंच्या मध्यस्थीनंतर फाटक आजी आजोबांना अखेर न्याय
मनसे नेते वसंत मोरेंच्या मध्यस्थीनंतर फाटक आजी आजोबांना अखेर न्याय
30 एप्रिलला अविनाश आणि माधुरी फाटक यांच्या घराचा ताबा दिला मिळणार
साडे तीन वर्षांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाडेकरू आतिष जाधव घराचा ताबा सोडणार
न्याय मिळत नसल्यामुळे फाटक आजी आजोबांनी उपोषण केलं होतं
-
वसंत मोरेंच्या मध्यस्थीनंतर ‘त्या’ आजी-आजोबांना न्याय मिळाला
मनसे नेते वसंत मोरेंच्या मध्यस्थीनंतर फाटक आजी-आजोबांना अखेर न्याय मिळाला
30 एप्रिलला अविनाश आणि माधुरी फाटक यांच्या घराचा ताबा दिला मिळणार
साडे तीन वर्षांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाडेकरू आतिष जाधव घराचा ताबा सोडणार
न्याय मिळत नसल्यामुळे फाटक आजी आजोबांनी उपोषण केलं होतं
दरम्यान वसंत मोरेंनी भाडेकरू आणि फाटक आजी आजोबांमध्ये मध्यस्थी करून वाद मिटवला
-
-
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांची खासदार राजन विचारे यांच्यावर टीका
नवी मुंबई : या लोकसभेमध्ये खासदार राजन विचारे यांचा टांगा आपल्याला पलटी करायचा आहे,
पूर्वी त्यांची कशी वागणूक होती हे आपल्याला माहीतच असेल,
लोकसभेत त्यांचा टांगा पलटी करायचा आहे अशी शपथ सर्वांनी घ्यायची आहे.
-
कालीचरण महाराजांचं कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य
कालीचरण महाराजांचं कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य
नथुराम गोडसे यांनी जे केल ते योग्यच
जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढे त्याचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधींचे विरोधक व्हाल – कालीचरण महाराज
राहुल गांधी वरील कारवाई योग्यच
जे हिंदू हिताची गोष्ट करतात ते यांच्यासाठी शत्रू आहेत
-
डोंबिवलीत मनसेची बॅनरबाजी
डोंबिवलीत मनसेची बॅनरबाजी
एप्रिल फुल कधी होणार पालावा पूल
मनसे आमदार राजू पाटीलने पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांना सवाल करत लावले बॅनर
-
राष्ट्रवादीचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात देशातील जनतेला नुसतीच आश्वासन दिली, एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही, वाढती महागाई, बेरोजगारी यावर मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत, याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात मोदींच्या विरोधात केक आणि जोकर आणून आंदोलन केलं, एक एप्रिलचा दिवस एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो,
-
जळगावात केळीला शोधला हळदीचा पर्याय
राज्यात व देशात जळगाव खान्देश रावेर तालुक्यातील केळी ही सर्वत्र प्रचलित असून सर्वात जास्त उत्पन्न या क्षेत्रात आहे मात्र सतत त्याने अवकाळी पाऊस वादळी वारा व नैसर्गिक आपत्तीमुळे त्या प्रमाणात वारंवार शेतकऱ्यांचं केळीचे नुकसान होत असते त्यामुळेच काही शेतकऱ्यांनी पर्यायी केळी उत्पादक शेतकरी आता हळदी लागवड कडे वळला असून अंदाजे दोनशे एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी हळदीची लागवड सुरू केली आहे
-
सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांचे आंदोलन
सत्ताधारी आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचा शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी ठिय्या
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह पाण्यासाठी सिंचन भवन कार्यालयाबाहेर मांडला ठिय्या
भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला
आमदार सुभाष देशमुख आणि शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोडला घाम
सीना नदी, कुरूल कॅनॉलमधून दक्षिण सोलापूर तालुक्याला पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक
-
शरद पवार सर्वेसर्वा असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची विदर्भात सुरुवात
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 100 एकर शेती खरेदी केली
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी घेतलेल्या शेतीची शरद पवार यांच्याकडून पाहणी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट विदर्भातील ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
नितीन गडकरी यांच्या माणस ॲग्रोचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सहकार्य
माणस ॲग्रोचे सुधीर दिवे यांनी ही माहिती दिलीय
-
एलॉन मस्क यांचा आणखी एक उद्योग
टेस्लानंतर केले होते ट्विटरचे अधिग्रहण
परफम्यु इंडस्ट्रीनंतर टकीलामध्ये आजमावले नशीब
आता बिअर बाजारात टेस्लाचे पाऊल, वाचा बातमी
-
मुंबई : बाईकवर स्टंट करणारे ते कोण?
चालत्या बाईकवर स्टंट करणाऱ्या आरोपींचा बांद्रा पोलिसांकडून शोध सुरू
मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये रात्रीच्या सुमाराचा व्हिडीओ व्हायरल
एक तरुण, दोन मुलींसोबत बाईकवर स्टंट करतानाचा व्हिडिओ
जीवघेणा स्टंट करतानाचा व्हिडियो पाहून अनेकांना बसला धक्का
-
GT vs CSK IPL 2023 : गुजरातची टीम जिंकली पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी
GT vs CSK IPL 2023 : अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं. वाचा सविस्तर…..
-
सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत मोठी अपडेट
केंद्र सरकारचा सराफासह ग्राहकांना मोठा दिलासा
केंद्र सरकारने दिली मुदत वाढ
या मुदतीपर्यंत विक्री करता येणार आभुषणे
देशातील काही सराफा व्यापाऱ्यांना दिला दिलासा
-
किराडपुरा राडा प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक
छत्रपती संभाजी नगर : अटक आरोपींची संख्या पोचली 11 वर,
रात्रंदिवस आरोपींना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू,
आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात यश,
400 ते 500 आरोपींवर दाखल आहे गुन्हा.
-
संजय राऊत धमकीप्रकरणी दोन जण ताब्यात
संजय राऊत धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्याहून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले
संजय राऊत यांना आलेल्या मेसेजचा पोलिसांनी केला तपास
-
सोन्याने गुंतवणूकदारांना केले मालामाल
पण चांदीने दिला अधिक परतावा
सोन्यापेक्षा चांदीने गुंतवणूकदारांची केली चांदी
जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वाधिक रिटर्न
आता सोन्याची काय आहे घौडदौड, बातमी एका क्लिकवर
-
संजय राऊत यांना धमकी
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी.
मोबाईलवर मेसज करुन दिली जीवे मारण्याची धमकी.
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
धमकी देणारा पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती
-
GT vs CSK IPL2023 : एक नाही, MS Dhoni च्या तीन चूकांमुळे झालं CSK चं नुकसान
GT vs CSK IPL2023 : धोनीच्या ‘या’ तीन चूका CSK ला भोवल्या. असं फार कमीवेळा झालय, जेव्हा एकाच सामन्यात एमएस धोनीकडून बऱ्याच चूका झाल्या आहेत. वाचा सविस्तर….
-
GT vs CSK : हार्दिकच्या ‘ब्रह्मास्त्रा’मुळे 4 बॉलमध्ये चेन्नई चीतपट, धोनी फक्त पाहत बसला, VIDEO
GT vs CSK IPL2023 : हार्दिकच्या ‘ब्रह्मास्त्रा’ने अचूक वार केल्यामुळे चेन्नईचा गेम ओव्हर. आधी बॉलिंग आणि नंतर बॅटिंगमध्ये या ‘ब्रह्मास्त्रा’ने आपली भूमिका चोख बजावली. वाचा सविस्तर…..
-
नागपूरच्या कळमना APMC मध्ये शेतकऱ्यांची लूट
नागपूरच्या कळमना APMC मध्ये शेतकऱ्यांची लूट
– अडत म्हणजे दलाली बंद असतानाही वसूली सुरु– शेतकऱ्यांकडून बेकायदा वसूल केली जाते ६ टक्के अडत– रोज हजारो शेतकऱ्यांची लूट, प्रशासन गप्प– सरकारने अडत बंद केली तरिही वसूली सुरुच– रोज लाखो रुपयांची शेतकऱ्यांची लूट -
Mumbai-Pune Expressway वरील प्रवास महागला
टोल टॅक्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ
सर्वसामान्यांच्या खिशावर ताण
प्रवाश्यांची तीव्र नाराजी
-
पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा पुसली पानं, केलं एप्रिल फुल!
एलपीजी सिलेंडरचे नवीन भाव काय, कोणाला मिळाला दिलासा
सर्वसामान्यांना मिळाला का दिलासा, किती झाली कपात
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झाली का वाढ
गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने सामान्य नागरिकांच्या खिशावर टाकला दरोडा
-
मविआची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी ठाकरे गटाकडून आरती
महाविकास आघाडीची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी ठाकरे गटाकडून आरती
छत्रपती संभाजी नगर शहराचे ग्रामदैवत खडकेश्वराची महाआरती सुरू
शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि कार्यकर्त्यांकडून आरती
सभेला कुठलीही विघ्ने येऊ नयेत म्हणून खडकेश्वराला ठाकरे गटाचे साकडे
खडकेश्वराच्या आरती साठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित
-
जितेंद्र आव्हाड आज नाशिकच्या काळाराम मंदिरात करणार दर्शन
नाशिक : संयोगीता राजे छत्रपती यांच्या ट्विट मुळे निर्माण झाला वाद,
महंत सुधीरदास महाराज यांनी काल केली दिलगिरी व्यक्त,
आजच्या आव्हाडांच्या दौऱ्याकडे लक्ष.
-
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराची उद्या रथयात्रा
नाशिक : 247 वर्षांची परंपरा असलेली रथयात्रा उद्या पडणार पार,
श्री राम आणि गरुड राथ यात्रेसाठी लाखा हुन अधिक भाविक येण्याची शक्यता,
रथ यात्रेच्या पर्शवभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल,
शहरात राहणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त.
-
कच्चा तेलाच्या किंमतीत आज वाढ
भाव 80 डॉलर प्रति बॅरलच्या दिशेने
देशात पेट्रोल-डिझेलचा भाव काय
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी भाव केले जाहीर
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कधी होणार कमी
सर्वसामान्य नागरिकांना कधी मिळणार दिलासा, वाचा बातमी
-
GT vs CSK : मुंबईकर मराठमोळ्या Impact Player चा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात फ्लॉप शो
GT vs CSK IPL2023 : Impact Player च्या नियमाची प्रथमच आयपीएलमध्ये अमलबजावणी करण्यात आली. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही टीम्सनी आपले इम्पॅक्ट प्लेयर वापरले. वाचा सविस्तर…..
-
GT vs CSK IPL2023 : ‘त्या’ 2 चेंडूंमुळे वैतागला धोनी, CSK च्या पराभवानंतर व्यक्त केलं दु:ख
GT vs CSK IPL2023 : कॅप्टन कुल धोनीला आपली नाराजी लपवता आली नाही. मनातली वेदना बोलून दाखवावी लागली. क्रिकेटच्या T20 फॉर्मेटमध्ये ती चूक गुन्ह्यासमान समजली जाते. वाचा सविस्तर….
-
live- संजय राऊत यांना देणार शंभर कोटींची नोटीस
लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे देणार नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी देणार नोटीस
-
पिंपरी चिंचवड भरती, उद्या होणार परीक्षा
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सन 2021 च्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची उद्या म्हणजेच दोन तारखेला लेखी परीक्षा होणार आहे
सकाळी साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी उमेदवारांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. परीक्षेसाठीचे हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षेला येताना लेखी परीक्षेसाठी असलेले हॉल तिकीटही आणावे लागणार आहे.
-
धाराशिव : कोरोनाने 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
कळंब तालुक्यातील इटकूर येथील एका रुग्णाचा मृत्यू
सोलापूर येथे उपचार सुरु असताना रुग्णाचा मृत्यू
रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
गेल्या 5 दिवसात धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचे 29 नवे रुग्ण
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, चिंता वाढली
-
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला
महिन्याभरात जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी
कोल्हापूर शहरासह कागल हातकणंगले येथील रुग्णांचा समावेश
113 तेरा जणांना कोरोनाची लागण
ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 54 वर यातील पंधरा जणांवर उपचार सुरू
वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
-
स्वारगेट बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट
स्वारगेट बसस्थानकावर लोकांची गर्दी वाढली आहे
याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जातोय
एका महिन्यात चोरीच्या 15 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
त्यापैकी दोन चोरी उघड करण्यात पोलिसांना यश आलंय
मात्र महिन्यात 16 घटना घडल्यानं प्रवाशांनी आपल्या वस्तूंची काळजी घेणं गरजेचं आहे
महिलांना एसटीत 50 टक्के सवलत दिल्यानं महिला प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे
-
पुणेकरांना मिळकत कराची बिलं 30 एप्रिल पर्यंत भरता येणार
पुणे : थकबाकीदारांकडून कोणताही दंड वसूल केला जाणार नाही,
1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं मात्र यावर्षी नवीनं बिलं ही 1 मे पासून पाठवली जाणार आहे,
30 एप्रिल पर्यंत मागील कराची बिलं नागरिक भरू शकतात.
-
राज्यात सध्या धरणांची पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे, त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती नाही
पूर्ण राज्यात टंचाई आराखड्याचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यात आलं आहे
पाणीपुरवठा विभागाकडून दर महिन्याला राज्यातल्या टंचाई स्थितीचा आढावा घेतला जात आहे
धरणांमध्ये पाणीसाठा असल्याने सध्या तरी पाणीटंचाईचे सावट राज्यावर नसल्याचे संकेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले
-
ठाण्यात 15 लाखांच्या रूमचा वाटा मिळण्यावरून वाद
पुतण्याने सख्ख्या काकाला भररस्त्यात संपवलं!
पोलिसांनी अवघ्या 3 तासात आवळल्या मुसक्या
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरातील प्रकार
-
यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून 13 एप्रिलपर्यत जमावबंदीचे आदेश
अप्पर जिल्हा दंडाधिकारी ललित व्हराडे यांनी काढले आदेश
जिल्ह्यात लव जिहादवरून आंदोलन निषेध मोर्चे काढण्याची शक्यता असल्याचे नमूद करत काढले आदेश
रमजान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सण उत्सव लक्षात घेता प्रतिबंधात्मक कलम 371 अन्वये काढले आदेश
-
पुण्यातील धक्कादायक प्रकार, मावशीच्या घरी पत्नीची आत्महत्या
तर विरहाने पतीने घेतला गळफास,
भोर तालुक्यातील केळवडे गावातील घटना
समृध्दी धीरज कोंडे ( वय 22) आणि धीरज कोंडे अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत
तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता
-
वर्धा जिल्ह्यात 4 आणि 5 एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा
देवळी, पुलगावची जबाबदारी खासदार रामदास तडस, राजेश बकाणे यांच्यावर
आर्वी विधानसभेची जबाबदारी आमदार दादाराव केचे, हिंगणघाट आमदार समीर कुणावार तर वर्ध्याची जबाबदारी आमदार पंकज भोयर, आमदार रामदास आंबटकर यांच्याकडे
Published On - Apr 01,2023 6:19 AM