Maharashtra Breaking News Live : काही लोकांना हिंदूंची अ‍ॅलर्जी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्येतून विरोधकांवर टीका

| Updated on: Apr 10, 2023 | 10:01 AM

Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आणि खासदारांसोबत अयोध्येत पोहोचले आहेत. आज मुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. संध्यकाळी शरयू नदी किनारी महाआरती करणार आहेत.

Maharashtra Breaking News Live : काही लोकांना हिंदूंची अ‍ॅलर्जी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्येतून विरोधकांवर टीका
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अयोध्येत पोहोचले आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मंत्र्यांसोबत अयोध्येला जात आहेत. दोन्ही नेते अयोध्येत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. त्यानंतर राम मंदिर बांधकामांची पाहणी करणार आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील. संध्याकाळी दोन्ही नेते शरयू नदीवर महाआरती करतील. रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. नाशिकच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 350 जागांसाठी 18 मे रोजी मतदान होणार आहे. पुण्यात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज. यासह राज्य आणि देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Apr 2023 06:09 PM (IST)

    सोन्याची शुद्धता घरच्या घरी तपासा

    शुद्ध सोन्यासाठी करा या टिप्स फॉलो

    सराफा दुकानदार करत तर नाही ना फसवणूक

    डुप्लिकेट सोने कसे ओळखाल

    अस्सल सोन्यासाठी या स्टेप्स पडतील उपयोगी, वाचा बातमी 

  • 09 Apr 2023 05:17 PM (IST)

    पुण्यात आज भाजपची सावरकर गौरव यात्रा

    पुण्यातील सावरकर गौरव यात्रेला चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित

    चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड मतदारसंघात भाजपकडून सावरकर गौरव यात्रेचं आयोजन

    कर्वे रोड ते फर्ग्यूसन महाविद्यालयापर्यंत यात्रा

    थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होणार

  • 09 Apr 2023 05:06 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर वडेट्टीवार यांची बोचरी टिका

    राम आमच्या मनात आहे, ते मतांसाठी रामाची पूजा करतात – विजय वडेट्टीवार

    आम्ही राम राम म्हणून लोकांना जोडतो, ते श्रीराम म्हणून लोकांना तोडतात – विजय वडेट्टीवार

    जात आणि धर्माचा उपयोग राजकारणात करू नये- वडेट्टीवार

    हे रामाचे भक्त नाही तर मतांचे भक्त आहेत, वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रीया

  • 09 Apr 2023 04:32 PM (IST)

    शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीतर्फे टेंभीनाका येथे महाआरती

    अयोध्येतील मुख्यमंत्री यांच्या आरती सोबतच ठाण्याच्या आनंद मठात ही होणार आरती..

    आनंद मठा समोर आरतीची तयारी सुरू झाली आहे..

    अयोध्या येथे आज सायंकाळी 6 वा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरयू नदीची आरती करणार आहेत.

    त्याच वेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीतर्फे टेंभीनाका येथे महाआरती करणार आहेत.

    ही महाआरती सर्वाना पहाता यावी यासाठी आनंद मठा च्या समोर LED स्क्रिन लावण्यात येत आहे. तसेच टेंभी नाक्यावर डिव्हायडरला भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

    शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही महाआरती करण्यात येणार आहे..

  • 09 Apr 2023 04:10 PM (IST)

    रिलायन्सला जबरदस्त फायदा

    रिलायन्सने खोऱ्याने ओढला पैसा

    या कंपन्यांना पण लागली बंपर लॉटरी

    मुकेश अंबानी यांना एकाच आठवड्यात कमालीचा फायदा

    एकाच आठवड्यात इतक्या हजार कोटींचा फायदा, वाचा बातमी 

  • 09 Apr 2023 04:02 PM (IST)

    अयोध्या : मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महंत धनुष्यबाण आणि गदा देणार भेट

    वेगवेगळ्या पीठांचे संत महंत कार्यक्रमासाठी आले आहेत

    महतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे

  • 09 Apr 2023 02:42 PM (IST)

    उमरगा पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट

    धाराशिव जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत असून एका दिवसात तब्बल 41 नवीन रुग्ण सापडले आहेत. 41 रुग्णापैकी 23 रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत त्यामुळे उमरगा पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे

  • 09 Apr 2023 02:24 PM (IST)

    देशातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीला विटा भाळवणी येथे सुरवात

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनने विटा भाळवणी येथे रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे केले आयोजन

    प्रथम क्रमांक येणाऱ्या बैलगाडी विजेत्यास थार गाडी मिळणार बक्षीस

    यासह द्वितीय, तृतीय क्रमांकाला ट्रॅक्टर आणि इतर क्रमांकाच्या विजेत्यांना दुचाकी वाहन देण्यात येणार बक्षीस

    बैलगाडी प्रेमी ना बसण्यासाठी मैदाना जवळ गॅलरी केली आहे

    शर्यतीचा निकाल पाहण्यासाठी मैदानात मोठी स्क्रिन लावली आहे

  • 09 Apr 2023 02:22 PM (IST)

    माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी रिक्षा चालकांसोबत उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

    अध्यक्षपदी निवड झाल्याने सुवर्णा सहदेव करंजे या रिक्षा चालकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटल्या

    कांजूर भांडुप पूर्व रिक्षा चालक मालक सेना अध्यक्षपदी सुवर्णा सहदेव करंजे यांची निवड

  • 09 Apr 2023 01:43 PM (IST)

    पुणे शहरात चक्क पांढऱ्या कावळ्याच दर्शन

    पुणे शहर लुल्लानगर परिसरामध्ये आढळला पांढरा कावळा

    पांढरा कावळा दिसताच पुणेकर आश्चर्यचकित

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचा कावळा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो.

    जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची कमतरता कमी असल्याने हा प्रकार आढळतो तज्ञांचे स्पष्टीकरण

    पुण्यात आज हा पांढरा कावळा दिसल्यानंतर सर्वत्र चर्चा

  • 09 Apr 2023 01:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हनुमान गढीवर, हनुमानाचं घेतलं दर्शन

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हनुमानाचं दर्शन घेऊन निघाले

    भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार आणि आमदारही सोबत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू रामाची केली आरती, त्यानंतर केली राम मंदिराची पाहणी

  • 09 Apr 2023 12:51 PM (IST)

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची बातमी

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक

    संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

    विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी संसदीय समितीची आज बैठक

  • 09 Apr 2023 12:05 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती

    महाआरतीवेळी शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री हजर

    शंखनादात राम मंदिरात करण्यात आली आरती

    मंदिराबाहेर हजारो शिवसैनिकांची गर्दी

  • 09 Apr 2023 11:31 AM (IST)

    अमरावती : पश्चिम विदर्भात 7 हजार हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान

    सर्वाधिक 5 हजार हेक्टरवर अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान

    अवकाळी पावसामुळे अमरावती, अकोला,यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यात नुकसान

    काढणीला आलेला गहू, आंबीया बहारातील संत्रा, लिंबू,कांदा आणि भाजीपाल्याचे नुकसान

    वादळी वारा आणि पावसामुळे घरांची पडझड वाशिममध्ये पाच वानरांचा मृत्यू

  • 09 Apr 2023 11:12 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येत दाखल

    उत्तर प्रदेश सरकारकडून दोघांचं जंगी स्वागत

    शरयू येथे झालं दोन्ही नेत्यांचं जंगी स्वागत

    यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या

  • 09 Apr 2023 11:09 AM (IST)

    प्रिती झिंटाच्या मुलीला अज्ञात महिलेनं बळजबरीने केलं किस

    एका अनोळखी महिलेनं प्रिती झिंटाची मुलगी जियासोबत फोटो काढण्याचा केला प्रयत्न

    अभिनेत्रीने नकार दिल्यानंतर संबंधित महिलेनं बळजबरीने मुलीचा घेतला किस, वाचा सविस्तर..

  • 09 Apr 2023 11:05 AM (IST)

    कर्नाटकमध्ये 39 लाख रुपयांची चांदीची भांडी जप्त; समोर आलं बोनी कपूर यांचं नाव

    कर्नाटकमधील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून बीएमडब्ल्यू कारमधून चांदीची भांडी जप्त

    कारची नोंदणी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या नावाने

    कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या हेब्बालू टोलजवळील चेक पोस्टवर कारवाई

    कारमध्ये पाच पेट्यांमध्ये चांदीची भांडी भरली होती

    या भांड्यांची बाजारातील किंमत सुमारे 39 लाख रुपये, वाचा सविस्तर..

  • 09 Apr 2023 11:03 AM (IST)

    Entertainment News Live | इंडियन आयडॉलचे 6 सिझन होस्ट केलेल्या अभिनेत्रीकडून पोलखोल

    सूत्रसंचालक मिनी माथूरने सांगितलं शो सोडण्यामागचं खरं कारण

    टीआरपीसाठी निर्मात्यांकडून सूत्रसंचालकाला दिल्या जातात सूचना

    ‘इंडियन आयडॉल’ हा स्क्रिप्टेड शो असल्याचंही तिने म्हटलंय, वाचा सविस्तर..

  • 09 Apr 2023 10:53 AM (IST)

    पुण्यात चालकाविना धावली बस

    गाडीमध्ये प्रवासी, मात्र चालक गायब,

    कात्रज चौकातील घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने केला टि्वट

    सुदैवाने मोठा अपघात टळला

    चालकाच्या हलगर्जीपणाकडे डेपो मॅनेजरसह पीएमपीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

  • 09 Apr 2023 10:49 AM (IST)

    भारतातील टॉप-5 श्रीमंत महिला कोण?

    लीना तिवारी यांच्याकडे आहे कोट्यवधींची दौलत

    30 हजार कोटींपेक्षा अधिक संपत्तीची मालकीण

    या उद्योगात घेतलीये गगनभरारी

    यंदा भारतातील श्रीमंतांची संख्या इतकी वाढली, वाचा बातमी 

  • 09 Apr 2023 10:49 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संवाद

    फोनवरून योगी आदित्यनाथांनी केलं देवेंद्र फडणवीसांच स्वागत

    रामाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे, दुपारनंतर दिल्लीला बैठकीला जाणार असल्याचं सांगितलं

    देवेंद्र फडणवीसांनी योगी आदित्यनाथांची फोनवरून केली विचारपूस

  • 09 Apr 2023 10:44 AM (IST)

    शिवसैनिकांमध्ये उत्साह अपार आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय

    लखनऊपासून अयोध्येपर्यंत स्वागत केलं जातंय

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरनं एकत्र रवाना झाले आहेत

    थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल होतील

  • 09 Apr 2023 10:32 AM (IST)

    विदर्भात अवकाळी पावसाचा कहर दुसऱ्या दिवशीही कायम

    घरांचे नुकसान पिके उध्वस्त

    सिंधुदूर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

    सांगली जिल्हातील तासगाव तालूक्यात द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान

  • 09 Apr 2023 10:30 AM (IST)

    शरद पवार नाशिकमध्ये

    नाशिक तालुक्यातील देवरगावमध्ये आदिवासी आश्रम शाळा आणि महिला वसतीगृहाचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित आहे..

  • 09 Apr 2023 10:22 AM (IST)

    माथेफिरू युवक चढला चक्क ट्रेनच्या डब्यावर

    माथेफिरू युवक चढला चक्क ट्रेनच्या डब्यावर

    कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरचा प्रकार

    सुजित बारवी असं माथेफिरूच नाव

    अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर माथेफिरूला खाली उतरवल

  • 09 Apr 2023 10:05 AM (IST)

    Dhanashree Verma : चहलच्या बायकोसोबत पार्टीमध्ये दिसला टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू, Photos व्हायरल होताच गदारोळ

    Dhanashree Verma : IPL 2023 चा सीजन सुरु असताना युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांचा फोटो समोर येताच चर्चांना उधाण आलय. कुठल्या पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसले? वाचा सविस्तर…..

  • 09 Apr 2023 10:04 AM (IST)

    IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून CSK कितव्या स्थानावर? जाणून घ्या कोण आहे नंबर-1?

    IPL 2023 Points Table in Marathi : पॉइंट्स टेबलमध्ये सध्याची स्थिती कशी आहे? वाचा सविस्तर….

  • 09 Apr 2023 10:03 AM (IST)

    Amitabh Bachchan Health : अपघातानंतर बिग बी यांची प्रकृती अद्यापही नाजूक; मोठी अपडेट समोर

    अपघाताला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही अमिताभ बच्चन यांची प्रकृती नाजूक

    अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबियांकडून मोठी अपडेट समोर… वाचा सविस्तर

  • 09 Apr 2023 10:03 AM (IST)

    कोल्हापूरमध्ये कालवा फुटला,शेतीचं मोठं नुकसान

    भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द इथं कालवा फुटला

    कोल्हापूरच्या कुर उजव्या कालव्याला गळती लागल्याने फुटला कालवा

    कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया

    शेतीचं ही मोठं नुकसान

    परिसरातील शेतीला तळ्याचे स्वरूप

    पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच कालवा फुटल्याचा ग्रामस्थांचा आरोप

    फुटलेल्या कालव्याची पाहणी करायला आलेले अधिकारीही मध्यधुंद अवस्थेत

    ग्रामस्थांचा दावा

  • 09 Apr 2023 09:51 AM (IST)

    सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी

    दोन महिन्यांपासून सोने-चांदीत तेजी

    दोन दिवसांपासून किंमतीत मोठी घसरण

    खरेदीदारांना लागली लॉटरी

    सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता, वाचा बातमी 

  • 09 Apr 2023 09:47 AM (IST)

    कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी सापडली लाखोंची रोकड

    कोगनोळी टोल नाक्यावर बेकायदेशीर रोकड कारवाईचे सत्र सुरू

    काल पुन्हा बेकायदेशीरपणे नेली जात असणारी साडेतेरा लाखांची रोकड पकडली

    गुरुवारी तब्बल दीड कोटी शुक्रवारी साडेसात लाख तर काल पुन्हा साडेतेरा लाख रुपये सापडले

  • 09 Apr 2023 09:14 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येकडे रवाना

    मुंबईतील निवासस्थानातून विमानतळाकडे प्रस्थान

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंंत्र्यांच्या हस्ते शरयू नदी किनारी होणार महाआरती

    देवेंद्र फडणवीस अयोध्येत घेणार रामलल्लाचे दर्शन

  • 09 Apr 2023 09:10 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांच्या अडचणी वाढणार

    – पुण्यातील जम्बो कोविड सेंटर कथित घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांच्या अडचणी वाढणार,

    – सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या उद्या तक्रार दाखल करणार,

    – पुण्यातील शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे उद्या तक्रार दाखल करणार

    – मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्याचपद्धतीने पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  • 09 Apr 2023 09:10 AM (IST)

    ज्योतिबा यात्रेनंतर अंबाबाईच्या रथोत्सवा दरम्यानही चोरट्यांनी घातला धुमाकूळ

    ज्योतिबा यात्रेनंतर अंबाबाईच्या रथोत्सवा दरम्यानही चोरट्यांनी घातला धुमाकूळ

    रथोत्सवा दरम्यान महिलांच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्याने केले लंपास

    तीन महिलांची जुना राजवाडा पोलिसात धाव

    दोन दिवसांपूर्वी पारंपरिक उत्साहात पार पडलाय अंबाबाईचा रथोत्सव

    रथोत्सवात होती लाखो भाविकांची गर्दी

    गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

    ज्योतिबा यात्रेदरम्यान ही घडल्या आहेत चोरीच्या घटना

  • 09 Apr 2023 08:56 AM (IST)

    कच्चा तेलामुळे बजेट बिघडणार

    इंधनाची 100 डॉलरकडे आगेकूच

    अनेक अर्थव्यवस्थांना बसेल फटका

    भारतावर होणार मोठा परिणाम

    पेट्रोल-डिझेल150 रुपये लिटर होणार? वाचा बातमी 

  • 09 Apr 2023 08:42 AM (IST)

    मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू

    चंद्रपूर : मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी

    नागभीड तालुक्यातील सातबहिणीचा डोंगर येथील घटना

    मृतकांमध्ये नागपूर येथील अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे यांचा समावेश असून या दोघांचं वय अंदाजे ६० वर्ष आहे

    सातबहिणीचा डोंगर येथे आहे महादेवाचे मंदिर, मात्र या डोंगरावर मोठ्या प्रमाणात आहे मधमाश्यांचे पोळे

  • 09 Apr 2023 08:30 AM (IST)

    MI vs CSK 2023 : Mumbai Indians विरुद्ध जिंकूनही धोनीच्या चेन्नईला दुसरा मोठा झटका

    MI vs CSK 2023 : चेन्नईची टीम मुंबईवर विजय मिळवल्याच्या आनंदात आहे, पण….वाचा सविस्तर….

  • 09 Apr 2023 08:09 AM (IST)

    शेतकऱ्यांची फसवणूक, गुन्हा दाखल

    200 शेतकऱ्यांची 2 कोटी 19 लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा

    नाशिक जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांचे हजारो टन टोमॅटो खरेदी करून पसार झाले होते व्यापारी

    नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

    नाशिकच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये झाली फसवणूक

  • 09 Apr 2023 07:58 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत श्री रामाचं दर्शन घेणार

    अयोध्येतील पंचशील हॉटेल फुलांनी सजवलं

    हॉटेलबाहेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताते लागले होर्डिंग्ज

    उत्तर प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाने लावले मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज

  • 09 Apr 2023 07:56 AM (IST)

    सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी, सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा

    गेल्या तीन दिवसात लाखो भाविकांनी घेतल साईदर्शन

    पर्यटनस्थळासोबत धार्मिक स्थळी मोठी गर्दी

    रस्ते आणि बाजारपेठाही भाविकांच्या गर्दीने गेल्या फुलून

    कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना भाविकांकडून अद्यापही नियमांच पालन नाही

    दर्शनरांगेत अनेक भाविक दिसतायत विनामास्क

    अद्याप जिल्हा प्रशासन आणि संस्थान प्रशासनाकाडून निर्बंध किंवा मास्क सक्ती झालेली नाही

  • 09 Apr 2023 07:55 AM (IST)

    MI vs CSK 2023 : 6,4,4,4, Ajinkya Rahane ने एका ओव्हरमध्ये मॅचची कशी दिशा बदलली, ते पहा VIDEO

    MI vs CSK 2023 : Ajinkya Rahane चं तुफान, मुंबई इंडियन्स उद्धवस्त. मुंबईच्याच मुलाने मुंबई इंडियन्स विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. वाचा सविस्तर….

  • 09 Apr 2023 07:55 AM (IST)

    पुण्यात आज हलक्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा आजही येलो अलर्ट

    शहरातील तापमान वाढीमुळे वातावरणात मोठा बदल

    गेल्या दोन दिवसापासून पुण्यात होत आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस

    आजही पुणे शहरात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज

  • 09 Apr 2023 07:54 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 350 जागांसाठी 18 मे रोजी मतदान

    सहा ठिकाणी सरपंचपदासाठी थेट लढत, 18 मे रोजी होणार मतदान

    25 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र सादर करता येणार

  • 09 Apr 2023 07:52 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येच्या दिशेने, रामलल्लाचं दर्शन घेणार

    देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आमदारांसह अयोध्येच्या दिशेने निघाले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामलल्लाचं दर्शन घेणार

    दोन्ही नेत्यांच्या स्वागताचे अयोध्येत बॅनर्स आणि होर्डिंग्ज

Published On - Apr 09,2023 7:47 AM

Follow us
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.