Maharashtra Breaking News Live : नवीन पेन्शन योजनेविषयीची नाराजी दूर करण्याचा केंद्र सरकारचा विचार

| Updated on: Feb 27, 2023 | 6:02 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : नवीन पेन्शन योजनेविषयीची नाराजी दूर करण्याचा केंद्र सरकारचा विचार
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला येणार. दिल्ली दौऱ्याचं कारण गुलदस्त्यात. राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आज वरळीतील जनतेला संबोधित करणार. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Feb 2023 08:10 PM (IST)

    पंढरपूर-

    सांगोला तालुक्यातील महूद ते दिघंची रस्त्यावर अपघात

    सांगोला येथील अपघातामध्ये आजी आणि नातू ठार

    रस्त्याच्याकडेला एस टी बसची वाट पाहत असताना अपघात

    द्रौपदा आटपडकर आणि सिध्देश्वर काळे हे दोघे ठार

    दोघांना भरधाव कारने उडवले

  • 26 Feb 2023 08:08 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्याची नोंद

    सकाळी 10.30 वाजता माण तालुक्यातील पळशी धामणी येथे भूकंपाचा धक्का

    पळशी धामणी येथे 3.6 रिकटर स्केलच्या भूकंपाची नोंद

    कराडच्या भूकंप संशोधन केंद्रात भुकंपाची नोंद

    भूकंपाचा केंद्रबिंदू माण पासून पाच किलोमीटर अंतरावर

  • 26 Feb 2023 08:01 PM (IST)

    ज्योतिबा मंदिरात महिलेकडून भाविकांच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न

    चोरी करणाऱ्या महिलेला देवस्थान कर्मचाऱ्यांनी शीतफीन पकडलं

    दागिन्यावर डल्ला मारताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    दोन चोऱ्या करून एसटीने पळून जात असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी पकडलं

    महिलेला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

  • 26 Feb 2023 06:55 PM (IST)

    सोलापूरमध्ये हिंदू गर्जना मोर्चाचे सभेत रूपांतर

    हजारोच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले

    हैद्राबादचे आमदार टी. राजासिंग यांच्या भाषण सुरु

  • 26 Feb 2023 06:48 PM (IST)

    या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

    रिलायन्ससोबत तांत्रिक भागीदारीचा केला करार

    इलेक्ट्रीक बसनंतर या प्रकल्पासाठी केली गुंतवणूक

    शेअरमध्ये एका महिन्यातच मोठी उलाढाल

    दोन वर्षांत शेअरची जोरदार भरारी, वाचा बातमी 

  • 26 Feb 2023 06:07 PM (IST)

    पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळा, शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित

    पुणे :

    पुण्यात ‘शरद पवार आणि महाराष्ट्र भाग 1’ पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात पार पडत आहे पुस्तक प्रकाशन सोहळा

    सोहळ्याला शरद पवार यांची उपस्थिती

    कार्यक्रमाला सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थीती

  • 26 Feb 2023 05:38 PM (IST)

    मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण

    श्रीमंतांच्या यादीत टॉप-10 मधून बाहेर पडण्याची शक्यता

    गौतम अदानी यांच्यानंतर अंबानी यांच्यावरही लक्ष्मी रुसली

    झपाट्याने संपत्ती घसरणाऱ्या यादीत अंबानी दुसऱ्या स्थानी

    मुकेश अंबानी यांची संपत्ती दोन महिन्यात इतकी झाली कमी, वाचा बातमी 

  • 26 Feb 2023 05:33 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल

    मुंबई :  

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल

    कॅबिनेट बैठकीसाठी पोहोचले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

    काही वेळातच कॅबिनेट बैठकीला होणार सुरुवात

  • 26 Feb 2023 05:15 PM (IST)

    गिरीश बापटांनी बजावला मतदानाचा हक्क

    अहिल्याबाई देवी हायस्कूल मतदान केंद्रावर येत मतदान केले

    ऑक्सिजन सिलेंडरसोबत घेऊन मतदानासाठी आले होते

    बोटावरील शाई दाखवतं त्यांनी मतदान केल्याचं दर्शवलं

    कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली

  • 26 Feb 2023 04:50 PM (IST)

    केंद्र सरकारचा निवृत्तीविषयी लवकरच मोठा निर्णय

    नवीन पेन्शन योजनेविषयीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

    जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटना आग्रही

    मार्च, एप्रिल महिन्यात अनेक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

    केंद्र सरकार पेन्शन वाढीसाठी घेऊ शकते मोठा निर्णय, वाचा बातमी 

  • 26 Feb 2023 04:01 PM (IST)

    नंदुरबार : चालत्या पिकअप गाडीला आग

    नंदुरबार नवापूर रस्त्यावर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळील घटना

    शॉर्टसर्किटमुळे गाडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

    आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवल्याने कुठलीही जीवितहानी नाही

  • 26 Feb 2023 03:50 PM (IST)

    मराठा समाज पुन्हा मोर्चा काढणार

    मराठा क्रांती मोर्चा काढणार 28 तारखेला
    कायगाव ते मुंबई लाँग मार्च काढणार
    मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांची माहिती
    चंद्रकांत पाटील यांना पुन्हा उपसमितीचे  अध्यक्षपद देऊन मराठा समाजाची वाट लावली
  • 26 Feb 2023 03:41 PM (IST)

    दादा भुसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    मंत्री दादा भुसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    वर्षा निवासस्थानी घेणार भेट

    मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी महत्वाच्या विषयांवर चर्चा

    अर्थसंकल्पीय अधिवेशासंदर्भात होणार चर्चा

  • 26 Feb 2023 02:17 PM (IST)

    Cricketer death : शेवटची मॅच ठरली, मैदानातच युवा क्रिकेटरच हार्ट अटॅकने संपलं आयुष्य

    या युवा क्रिकेटपटूच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसलाय. वाचा सविस्तर….

  • 26 Feb 2023 02:16 PM (IST)

    IND vs AUS Test : ‘टॅलेंट म्हणजे सर्वकाही नाही’, टीम इंडियाच्या खेळाडूवर रवी शास्त्रींचा अचूक वार

    IND vs AUS Test : रवी शास्त्री बऱ्याच गोष्टींवर स्पष्टपणे बोललेत. वाचा सविस्तर….

  • 26 Feb 2023 02:15 PM (IST)

    IND vs AUS Test : फॉर्मसाठी धडपडणारा KL Rahul आता ‘या’ मंदिरात पोहोचला दर्शनासाठी, VIDEO

    IND vs AUS Test : केएल राहुल अलीकडे बऱ्याच मंदिरात देवदर्शनासाठी माथा टेकवतोय. वाचा सविस्तर…..

  • 26 Feb 2023 02:14 PM (IST)

    Prithvi Shaw controversy : सपना गिलच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन पृथ्वीने उचललं पुढचं पाऊल

    Prithvi Shaw controversy : सपना गिलने पृथ्वीला एक्सपोज करण्याची धमकी दिलीय. वाचा सविस्तर…..

  • 26 Feb 2023 02:12 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची पहिली जाहीर सभा 5 मार्चला

    ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची महत्त्वाची घोषणा
    उद्धव ठाकरेंची पहिली जाहीर सभा 5 मार्चला, संध्याकाळी 5 वाजता कोकणात खेडला होणार
    कोकणातील आजपर्यंत झालेल्या सर्व सभांपेक्षा ही विराट सभा आम्ही करणार
    माझ्या लोकसभा मतदारसंघात ही सभा होणार आहे- गीते
  • 26 Feb 2023 01:57 PM (IST)

    Entertainment News Live | बिग बॉसच्या ट्रॉफीबाबत तीन वर्षांनंतर असिम रियाजची नाराजी समोर

    सिद्धार्थ शुक्लाचं विजयी होणं हे निर्मात्यांचं ‘सेट अप’ असल्याचं असिम रियाजने म्हटलं

    मी जिंकावं अशी निर्मात्यांची इच्छा नव्हती- असिम रियाज, वाचा सविस्तर

  • 26 Feb 2023 01:55 PM (IST)

    काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितची हत्या

    बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या काश्मिरी पंडिताची हत्या

    संजय शर्मा असं मृत्यू झालेल्या काश्मिरी पंडिताचं नाव

  • 26 Feb 2023 01:36 PM (IST)

    CBI कार्यालयाबाहेर निदर्शनं केल्याप्रकरणी ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि पक्षाचे इतर नेते पोलिसांच्या ताब्यात

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात

  • 26 Feb 2023 12:04 PM (IST)

    चंद्रपूर : घरात शिरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

    सिंदेवाही शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या कोटा या गावातील घटना

    एका घरात पहाटेच्या दरम्यान शिरला बिबट

    माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी दाखल

    गावातील नागरिकांची बिबट पाहण्याकरिता उडाली झुंबड

  • 26 Feb 2023 11:52 AM (IST)

    केरळ | कोची विमानतळावर दुबईहून येणाऱ्या प्रवाशाकडून 1,259 ग्रॅम सोने जप्त

    कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटची (AIU) कारवाई

    सोन्याची किंमत जवळपास 53 लाख रुपये

    प्रवाशाच्या शरीरात आढळल्या सोन्याच्या 4 कॅप्सूल्स

    संबंधित प्रवाशाला अटक

  • 26 Feb 2023 11:03 AM (IST)

    होळीच्या अगोदरच आनंदवार्ता

    खाद्यतेल झाले स्वस्त, दिल्ली बाजारात दरात घसरण

    मोहरी, सोयाबीन, कपाशी आणि इतर तेल झाले स्वस्त

    कच्चे पामतेल आणि पामोलिन तेलाच्या किंमती घसरल्या

    आयात वाढल्याने देशातील तेलबिया उत्पादकांवर मोठे संकट

    तेलबियांना किमान आधारभूत किंमतही मिळत नसल्याने शेतकरी नाराज, वाचा सविस्तर

  • 26 Feb 2023 11:01 AM (IST)

    कोल्हापूर : मुश्रीफ-घाटगे यांच्यातील वाद चिघळणार

    आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित घाटगे यांच्यामधील वाद चिघळणार

    आमदार मुश्रीफ विरोधात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल

    मुश्रीफ समर्थक संजय चितारी यांनी दिली मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार

    तक्रार दाखल करून घेण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्याबाहेर सहा तास आंदोलन

    संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या परवानगीविना खोटी तक्रार दिल्याबद्दल गुन्हा दाखल

  • 26 Feb 2023 10:46 AM (IST)

    दिल्ली | विपिन गार्डनमध्ये 38 वर्षीय राजेशने पत्नी आणि दोन मुलांची केली हत्या

    हत्येनंतर स्वत:च्या मनगटावर केली दुखापत

    राजेशवर उपचार सुरू

    मित्रांना आर्थिक अडचणीची दिली होती माहिती

    पीएस मोहन गार्डन इथं हत्येचा गुन्हा दाखल

    दिल्ली पोलिसांचा तपास सुरू

  • 26 Feb 2023 10:41 AM (IST)

    Entertainment Uptate : शाहरुख खान पुढे कार्तिक आर्यन, अक्षय कुमार फेल, चाहत्यांच्या मनात आजही ‘पठाण’

    कार्तिक आर्यन, अक्षय कुमार यांना देखील किंग खान याने टाकलं मागे, शाहरुख बॉक्स ऑफिसचा ‘बादशहा’

    ‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शनानंतर ३१ व्या दिवशी रचला नवा विक्रम… वाचा सविस्तर

  • 26 Feb 2023 10:29 AM (IST)

    NZ vs ENG Test : न्यूझीलंडच्या Tom Latham ची कमाल, अशी कामगिरी करणारा 7 वा बॅट्समन

    वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात Tom Latham ने काय कमाल केली? वाचा सविस्तर…..

  • 26 Feb 2023 10:29 AM (IST)

    VIDEO : अरेरे, बिचारा, LIVE मॅचमध्ये इंग्लंडचा विकेटकीपर कसा विचित्र पद्धतीने OUT झाला?

    हा VIDEO सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. वाचा सविस्तर…..

  • 26 Feb 2023 10:28 AM (IST)

    IND vs AUS : तिसऱ्या टेस्टमधून ‘हे’ 4 प्लेयर बाहेर, आता टीमसाठी Playing 11 निवडणं बनलं कठीण

    बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसऱ्या टेस्ट मॅचआधी 4 मॅचविनर खेळाडू बाहेर. वाचा सविस्तर…..

  • 26 Feb 2023 10:12 AM (IST)

    सोने-चांदी खरेदीदारांना मोठी लॉटरी

    सोन्याच्या भावात मोठी घसरण

    एका आठवड्यातच भावात 1200 रुपयांहून अधिक पडझड

    चांदीही झाली स्वस्त, खरेदीची ही संधी

    चांदीमध्ये किलोमागे 800 रुपयांची झाली घसरण, वाचा बातमी 

  • 26 Feb 2023 09:29 AM (IST)

    मद्य धोरण प्रकरणी सीबीआयकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना समन्स

    आज पुन्हा सीबीआयकडे जाणार आहे

    तपासात पूर्ण सहकार्य करणार आहे

    मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी पर्वा नाही

    मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे

    मनीष सिसोदिया यांचं ट्विट

  • 26 Feb 2023 09:27 AM (IST)

    कर्नाटक | म्हैसूर-चैन्नई वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्याच्या दोन खिडक्यांचं नुकसान

    ट्रेनवर दगडफेक केल्याने तुटल्या खिडक्या

    कृष्णराजपुरम-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांदरम्यान घडली घटना

    सुदैवाने घटनेत कोणी जखमी नाही

  • 26 Feb 2023 09:24 AM (IST)

    इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्यावर झाड कोसळले

    शहरातील जुन्या मुंबई आग्रा महामार्गावर जुने भेंडीचे झाड कोसळले

    सकाळची वेळ आणि रविवार असल्याने रहदारी नव्हती

    सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही

    वाहतूक नगरपालिका रोड मार्ग वळविण्यात आली

  • 26 Feb 2023 09:24 AM (IST)

    कोल्हापुरात पट्टेरी वाघाचा वावर

    आजरा तालुक्यातील महागोंडवाडीत पट्टेरी वाघाचा वावर

    दोन दिवसांपासून पट्टेरी वाघ परिसरात तळ ठोकून

    पायाचे ठसे आणि कुंपणात सापडलेल्या केसावरून वनविभागाने दिली वाघाच्या वावराला पुष्टी

    महागोंडवाडी उत्तर परिसरात वनविभागाने तिला सतर्कतेचा इशारा

  • 26 Feb 2023 09:15 AM (IST)

    मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथील प्रस्तावित थीमपार्कला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव द्या

    भाजपचे स्थानिक नेते संतोष पांडे यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

    डॉ. हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक

    भाजपकडून डॉ. हेडगेवार यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

    महालक्ष्मी रेसकोर्स बाहेर झळकले बॅनर

  • 26 Feb 2023 08:47 AM (IST)

    T20 WC : 90 दिवस मृत्यूशी झुंज, आत्महत्येचा प्रयत्न, दक्षिण आफ्रिकेच्या झुंजार क्रिकेटरची प्रेरणादायी गोष्ट

    आज ती वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळणार. इथवरचा तिचा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यातील मोठी लढाई लढून ती आज इथे पोहोचलीय. जिंकण्याची जिद्द निर्माण करणारी तिची गोष्ट एकदा वाचा. वाचा सविस्तर….

  • 26 Feb 2023 08:46 AM (IST)

    IPL 2023: Hardik pandya च्या गुजरात टायटन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी

    IPL 2023: हार्दिक पंड्याच्या टीमसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. वाचा सविस्तर….

  • 26 Feb 2023 08:40 AM (IST)

    नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडाचा महिलेवर हल्ला

    नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडाचा महिलेवर हल्ला

    अंगणातील चिकू तोडणाऱ्या गावगुंडास हटकल्याने केला हल्ला

    आरडाओरड झाल्याने शेजारील नागरिक झाले जमा

    संशयित गावगुंड महिलेस धमकावून झाला फरार

    ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • 26 Feb 2023 08:37 AM (IST)

    गोंदिया : शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक

    गोंदिया : शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक

    ओटीपी सांगताच खात्यातून 1.93 लाख ट्रान्सफर

    क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडींग करीत असल्याचे सांगितले

    शेतकरी भास्कर सुखदेव बाळबुद्धे यांच्यासोबत घडला

    प्रकार घडताच सायबरसेलकडे तक्रार करण्यात आली

  • 26 Feb 2023 06:54 AM (IST)

    अट्टल दुचाकी चोरटयाला भंडारा शहर पोलिसांनी केली अटक

    1 लाख 95 हजार रुपये किंमतिच्या 8 दुचाकी जप्त

    विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला चोरटा डाव्या पायाने अपंग

    चोरीच्या इतर 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याचे इतर गुन्हात सहभागाचा तपास भंडारा शहर पोलिस करत आहे

  • 26 Feb 2023 06:52 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारपासून सुनावणी होणार

    सलग तीन दिवस होणार सुनावणी

    मंगळवार, बुधवार, गुरुवारी घटनापीठासमोर होणार सुनावणी

    या आठवड्यातील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार

    या आठवड्यात शिवसेनेकडून युक्तिवाद केला जाणार

  • 26 Feb 2023 06:50 AM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे आज दिल्लीत येणार

    रात्री 9 वाजता एकनाथ शिंदे दिल्लीत येणार

    भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

    पक्ष चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे दिल्लीत येणार

    सत्ता संघर्षावरील सुनावणी बाबत वकिलांशीही चर्चा करण्याची शक्यता

Published On - Feb 26,2023 6:48 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.