Maharashtra Breaking News Live : रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप

| Updated on: Feb 28, 2023 | 7:39 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : आज मराठी राजभाषा दिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अखेर दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांना अटक. सीबीआयची मोठी कारवाई. आज आपचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2023 09:27 PM (IST)

    कांदिवलीत निवासी इमारतीची बाल्कनी कोसळली

    पश्चिमेतील न्यू पार्क अव्हेन्यू इमारतीच्या सातव्या मजल्याची बाल्कनी सहाव्या मजल्यावर कोसळली

    अपघातात दोन महिला जखमी

    दोघींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले

    अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  • 27 Feb 2023 09:15 PM (IST)

    नवी मुंबईतील घणसोली येथे लागली आग

    घणसोली येथील ओपन प्लॉटवर लागली आग

    राजीव गांधी कॉलेज जवळ घडली घटना

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

    अग्निशमन दलाचया गाड्या घटनास्थळी दाखल

  • 27 Feb 2023 07:31 PM (IST)

    अखेर दहा तासांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन मागे

    लासलगाव (नाशिक) :

    – गेल्या दहा तासांपासून सुरू असलेले कांदा प्रश्‍नी आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर मागे

    –  दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या सहा मागण्या

    – या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठकीचे नियोजनाचे आश्वासन

    – दिवसभर कांदा लिलाव बंद राहिल्याने एक ते सव्वाकोटीचा लिलाव ठप्प

    – लासलगाव बाजार समिती उद्या सकाळपासून नियमित वेळेनुसार कांद्याचे लिलाव होणार

  • 27 Feb 2023 07:15 PM (IST)

    पुण्यात भर दिवसा दागिन्यांच्या दुकानात चोरी

    पुणे : 

    पुण्यात भर दिवसा दागिन्यांच्या दुकानात चोरी

    हातचालाखी करत भवानी पेठेतील ज्वेलर्सचे दुकान चोरट्याने लुटलं

    खडक पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

    ग्राहक बनून आला आणि ५ लाखांच सोन केलं लंपास

    आरोपीने आधी खरेदी केले एक ग्रॅम सोने, आणि नंतर दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून घेतलं 69 ग्रॅम सोने लंपास

    हातचालाखी करत सोन्याच्या पाकिटात ठेवले दगड आणि पाकिटातले सोने केले गायब

    खडक पोलीस स्टेशन करत आहेत अधिक तपास

  • 27 Feb 2023 06:00 PM (IST)

    महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध

    धारशिव : उस्मानाबाद जिल्हा, नगर परिषद सह तालुकाचे नाव धाराशिव करण्याचे आदेश,

    उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानांतर आता पुर्ण जिल्ह्याचे नाव धाराशिव,

    उपसचिव संतोष गावडे यांनी प्रसिद्ध केले अधिसूचना.

  • 27 Feb 2023 05:26 PM (IST)

    महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध

    मुंबई :

    महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध

    उस्मानाबाद जिल्हा, नगर परिषद सह तालुकाचे नाव धाराशिव करण्याचे आदेश

    उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानांतर आता पूर्ण जिल्ह्याचे नाव धाराशिव

    उपसचिव संतोष गावडे यांनी प्रसिद्ध केली अधिसूचना

  • 27 Feb 2023 05:15 PM (IST)

    फेब्रुवारीत महिन्यातच पारा 38 सेल्सिअसजवळ, उन्हामुळे लाहीलाही

    Washim | वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 सेल्सिअस जवळपास

    वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

    फेब्रुवारी महिन्यामध्येच उन्हाळामुळे शरीराची लाहीलाही

  • 27 Feb 2023 04:57 PM (IST)

    समृध्दी महामार्गावर झायलो कारचा अपघात.

    झायलो कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती.

    अमरावतीच्या हिंगनगाव नाजिकची घटना.

    गाडीतील ७ प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू.

    जखमींना तातडीने नागपूर मध्ये हलविण्यात आले आहे.

  • 27 Feb 2023 04:21 PM (IST)

    विरोधकांकडून बिन बुडाचे आरोप सुरू आहेत – हेमंत रासने

    पुणे : विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा इतिहास तपासा. ते कसे निवडून येतात हे पण तपासा.

    निवडणुकीत मुस्लिमांनी 100 टक्के मतदान करावे असे कोण म्हणाले ?

    विरोधकांनी कोणी कुठून पैसे आणले आणि कुठे वाटले हे पण आम्हाला माहिती आहे ?

    राष्ट्रवादी ने किती आणले, विदर्भातून किती पैसे आले सगळं आम्हाला माहिती आहे.

    आम्ही कायदेशीर प्रक्रीयेला सामोरं जाऊ आमचे वकिल उत्तर देतील – हेमंत रासने, भाजपचे उमेदवार

  • 27 Feb 2023 03:53 PM (IST)

    वर्धा : लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

    महोत्सवात २२ खेळांचा समावेश करण्यात आला आहे

    या अंतर्गत काही स्पर्धा घेतल्या असून काही स्पर्धा आयोजित आहेत

    महोत्सवातून खेळाडूंना प्रोत्साहन देत व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न

    रुस्तम ए हिंद कुस्ती स्पर्धा मातीवरच्या आयोजित करण्याचा खासदार तडस यांचा मानस

  • 27 Feb 2023 03:49 PM (IST)

    जळगाव : प्रवीण चव्हाण यांना जिल्हा न्यायालयात करण्यात आले हजर

    मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात गुन्हा दाखल

    जळगाव शहर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांना घेतले होते ताब्यात

    आज जळगाव जिल्हा न्यायालयात प्रवीण चव्हाण यांना करण्यात आले हजर

  • 27 Feb 2023 03:49 PM (IST)

    ऍड. प्रविण चव्हाण यांना जळगाव जिल्हा न्यायालयात करण्यात आले हजर

    मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी काल ऍड. प्रविण चव्हाण यांना घेतले होते ताब्यात

    आज जळगाव जिल्हा न्यायालयात ऍड. प्रविण चव्हाण यांना करण्यात आले हजर

  • 27 Feb 2023 03:10 PM (IST)

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावत; राणी चन्नम्मा चौकातून रोड शोला होणार सुरुवात

    बेळगाव

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज बेळगावत रोडशो

    राणी चन्नम्मा चौकातून रोड शोला होणार सुरुवात

    दहा किलोमीटरचा रोडशो

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची झलक पाहण्यासाठी नागरिक तासभर आधीच चन्नम्मा चौकात जमले

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा

    सायंकाळी जाहीर सभा ही होणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमावादावर भाष्य करणार का याकडे लक्ष

  • 27 Feb 2023 03:07 PM (IST)

    सांगली : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

    शिराळा तालुक्यातील वारणावतीत पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

    गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद

    भर नागरी वस्तीत बिबट्याच्या वास्तव्यामुळे भीतीचे वातावरण

  • 27 Feb 2023 03:04 PM (IST)

    लासलगाव : गेल्या सहा तासांपासून कांदा लिलाव बंद

    कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची तीनदा मनधरणी

    जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांशी बैठकीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला

    पालकमंत्र्यांनी लासलगाव बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी

    मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने प्रशासनाला मनधरणी करण्यात अपयश

  • 27 Feb 2023 02:45 PM (IST)

    अभिनेत्री खुशबू राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख

    – अभिनेत्री खुशबू राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख

    – भाजपा नेता अभिनेत्री खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महीला आयोगाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती

  • 27 Feb 2023 02:06 PM (IST)

    मुंबईत आम आदमी पार्टीचे आंदोलन

    मुंबई : मनीष सिसोदियांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन,

    मनीष सिसोदियांच्या निषेधार्थ आंदोलन,

    मुंबईत आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर.

  • 27 Feb 2023 01:49 PM (IST)

    रविंद्र धंगेकरांचं मोठा आरोप

    मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीत दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा

    माझ्यावरचं अन्याय का ?

    हा पक्षपातीपणा कशासाठी?

    मी 15 ते 20 हजारांनी निवडून येणार

    रविंद्र धंगेकरांना विश्वास

    निवडून येत नाही म्हणून पैसै वाटले

    मी कार्यकर्ता आहे मला विजयाचा विश्वास

  • 27 Feb 2023 01:38 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

    ट्रेलर नाही गुढीपाडव्याला सिनेमाच दाखवतो, महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

    वाचा काय म्हणाले राज ठाकरे

  • 27 Feb 2023 01:28 PM (IST)

    रयत क्रांती संघटनेचे कांदा भाकरी आंदोलन

    नाशिक : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात केलं आंदोलन,

    अप्पर जिल्ह्याधिकार्यांच्या दालनात खाल्ली कांदा भाकरी,

    कांद्याला भाव मिळत नसल्याने आंदोलन.

  • 27 Feb 2023 01:22 PM (IST)

    मुंबई पोलिसांना NIA कडून सतर्कतेचा इशारा

    शहरात धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा संशय

    पोलिसांना सतर्क राहणाचा इशारा

    ‘सरफराज मेमन असे संशयास्पद व्यक्तीचे नाव’

    ‘चीन आणि पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन आलेली संशयास्पद व्यक्ती’

  • 27 Feb 2023 01:19 PM (IST)

    अरे बापरे, Shaheen Afridi चा डेंजर बॉल, बॅटचे दोन तुकडे VIDEO व्हायरल

    दांड्या गुल करणारा शाहीद आफ्रिदीचा लाजवाब यॉर्कर चुकवू नका. वाचा सविस्तर…..

  • 27 Feb 2023 01:18 PM (IST)

    Shardul Thakur Marriage : शार्दुल ठाकूरची होणारी बायको मिताली परुळेकर काय करते? जाणून घ्या

    Shardul Thakur Marriage : शार्दुल आपल्याच लग्नात किती दिलखुलास नाचला, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघा. वाचा सविस्तर….

  • 27 Feb 2023 01:16 PM (IST)

    Irani Trophy : 8 इनिंगमध्ये 556 धावा फटकावूनही मुंबईचा खेळाडू बाहेर, इराणी कपसाठी टीम जाहीर

    इराणी कपसाठी निवडलेल्या टीममध्ये मुंबईच्या प्लेयरला का स्थान दिलेलं नाही? वाचा सविस्तर…..

  • 27 Feb 2023 12:56 PM (IST)

    कर्नाटक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन

    – कर्नाटक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयरूप्पा यांना ८० वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

  • 27 Feb 2023 12:51 PM (IST)

    कल्याण : जगन्नाथ शिंदे यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

    राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांचा कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा

    प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती

    प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे दिला राजीनामा

    जगन्नाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय खंदे समर्थक म्हणून ओळख

    राजीनामा दिल्याने कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता

    पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याबाबत उत्सुकता

  • 27 Feb 2023 12:04 PM (IST)

    पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीचा कान कापल्याची घटना

    सोलापुरात (Solapur) एका व्यक्तीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीचा कान कापल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूरातील नवीन विडी घरकुल परिसरात ही घटना घडली आहे. त्यानंतर पीडित महिलेच्या आईने इतर नातेवाईकांनी महिलेला ताबडतोब शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल केले.

  • 27 Feb 2023 11:58 AM (IST)

    मालेगाव : कांदा भाव कोसळल्याने कांदा लिलाव बंद पाडून आंदोलन

    नांदगावात कांदा उत्पादक शेतकरी आणि महाविकास आघाडीने कांदा लिलाव पाडले बंद

    कांदा भाव कोसळल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केले आंदोलन

    राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

    माझी राष्ट्रवादीचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या सह ठाकरे गट आंदोलनात सहभागी

  • 27 Feb 2023 11:41 AM (IST)

    पुण्यात आज आम आदमी पक्षाचं आंदोलन

    पुण्यात आज आम आदमी पक्षाचं आंदोलन

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलन

    पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू

    मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 27 Feb 2023 11:29 AM (IST)

    नाशिकमधील आशियातील सर्वांत मोठा कांदा मार्केट लासलगाव मंडईतील काम बंद

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने मंडईतील काम बंद

    “मालाला योग्य भाव मिळत नाही, याच्या निषेधार्थ आम्ही बाजारात बोली लावणं बंद केलंय”, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

    सरकारने आम्हाला मदत करावी, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

  • 27 Feb 2023 11:17 AM (IST)

    भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर पुण्यातील समर्थ पोलिसात गुन्हा दाखल

    भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर पुण्यातील समर्थ पोलिसात गुन्हा दाखल

    पुणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप

    गणेश बिडकर ,मयूर चव्हाण, मयूर शेख आणि बाला शेख या चार जणावर पोलिसात गुन्हा दाखल

    गणेश बिडकर हे पुण्यातील मंगळवार पेठ या ठिकाणी मतदारांना पैशाचे वाटप करत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला असता मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता

    या मारहाण प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • 27 Feb 2023 10:52 AM (IST)

    एका महिलेचे पती आणि पत्नीसोबत संबंध, सत्य उजेडात आल्यानंतर पोलिसांना फुटला घाम

    पटना: राजधानी पटना (Patna) येथील दानापुरमधून (danapur) एक भयानक घटना पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत. एका महिलेचे पती आणि पत्नीसोबत संबंध होते. वाचा संपूर्ण प्रकरण 

  • 27 Feb 2023 10:51 AM (IST)

    कसबा पोटनिवडणूकीसंदर्भात  मोठी बातमी

    कसबा पोटनिवडणूकीतील भाजप उमेदवार हेमंत रासनेसह काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल

    शिवाय राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल

    धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग करत उपोषण केले

    तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केला

  • 27 Feb 2023 10:44 AM (IST)

    IND vs AUS : Axar Patel मुळे टीम इंडियातील एका युवा प्लेयरच करिअर संपल्यात जमा

    IND vs AUS : Axar Patel जितका चांगला परफॉर्मन्स करणार, तितका एका युवा खेळाडूच्या करिअरला धोका निर्माण होणार. वाचा सविस्तर…..

  • 27 Feb 2023 10:43 AM (IST)

    Shardul Thakur Marriage : टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूच्या गाण्यावर शार्दुलचा भावी पत्नीसोबत रोमँटिक डान्स

    Shardul Thakur Marriage : खास शार्दुलसाठी टीम इंडियाच्या या प्रसिद्ध क्रिकेटपटूने गाण गायलं. वाचा सविस्तर….

  • 27 Feb 2023 10:42 AM (IST)

    IND vs AUS Test : Pat Cummins च्या आईची एका गंभीर आजाराशी लढाई, त्याने निभावलं मुलाच कर्तव्य

    IND vs AUS Test : ‘या’ आजारावर मात करणं सोपं नाही. वाचा सविस्तर….

  • 27 Feb 2023 10:41 AM (IST)

    IPL 2023 : Mumbai Indians ला झटका, एका मोठ्या खेळाडूसंदर्भात वाईट बातमी

    हा प्लेयर खेळला नाही, तर यंदाच्या IPL 2023 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसेल. वाचा सविस्तर….

  • 27 Feb 2023 10:40 AM (IST)

    T20 World Cup सेमीफायनलमध्ये हरलेल्या टीम इंडियाला Prize Money पोटी किती रक्कम मिळाली?

    चॅम्पियन बनलेली ऑस्ट्रेलिया, उपविजेती दक्षिण आफ्रिका, टीम इंडिया आणि इंग्लंडची टीम सुद्धा मालामाल. जाणून घ्या बक्षिसापोटी कुठल्या टीमला, किती रक्कम मिळाली? वाचा सविस्तर….

  • 27 Feb 2023 10:25 AM (IST)

    मनीष सिसोदिया यांना आज राऊज एव्हॅन्यू कोर्टात हजर करणार

    दिल्ली | मद्य धोरणप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज राऊज एव्हॅन्यू कोर्टात हजर करणार

    सीबीआय मनीष सिसोदिया यांना कोर्टात करणार हजर

    सीबीआयने काल मनीष सिसोदिया यांना केली अटक

  • 27 Feb 2023 10:23 AM (IST)

    दिल्ली | आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात

  • 27 Feb 2023 10:22 AM (IST)

    अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन भारत दौऱ्यावर

    G 20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन भारत दौऱ्यावर

    1 मार्च रोजी अँटोनी ब्लिंकन भारत दौऱ्यावर

    मी कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि भारताच्या दौऱ्यावर जात असल्याचं ट्विट त्यांनी केलं

  • 27 Feb 2023 10:20 AM (IST)

    आमचा पक्ष मनीष सिसोदिया यांच्या पाठिशी – संजय राऊत

    मनीष सिसोदिया यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, त्यावरून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय

    हिमालयातून आणलेले संत, महात्मा किंवा साधू भाजपमध्ये बसले आहेत का?

    आमचा पक्ष मनीष सिसोदिया यांच्या पाठिशी उभा राहील

    शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य

  • 27 Feb 2023 10:01 AM (IST)

    या कारणामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात घट

    धुळे जिल्ह्यात (dhule) रब्बी हंगामात (Rabi season) गहू पीकाबरोबर हरभऱ्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यावेळी शेवटच्या टप्प्यात थंडी कमी झाल्याने हरभऱ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या (gram crop) उत्पन्नात घट झाली असून आता भाव चांगला मिळावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहे.

  • 27 Feb 2023 10:00 AM (IST)

    पेरुची शेती करा अन् लाखो रुपये कमवा

    नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड (nanded) तालुक्यातील कामळज (kamlaj) गावातील उच्चशिक्षित तरुणाने इस्त्रायल पद्धतीने सेंद्रिय पेरूची लागवड (Cultivation of guava) केली आहे. त्यातून तरुणाला आता एका एकर क्षेत्रातील पेरूच्या विक्रीतून वर्षाला चार लाखांचे उत्पन्न मिळत आहे. वाचा संपुर्ण बातमी

  • 27 Feb 2023 09:48 AM (IST)

    सोलापुरातील भाजप नेते सुनील कामाठी यांचे निधन

    मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने कामाठी हे रुग्णालयात होते दाखल

    मात्र आज पहाटे सुनील कामाठी यांचे वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी निधन झाले

    सुनील कामाठी यांची कट्टर शिवभक्त म्हणून ओळख होती

    सोलापुरातल्या खड्डा तालीम या संघटनेतर्फे करत होते तरुणांचे संघटन

  • 27 Feb 2023 09:35 AM (IST)

    पुण्यात आज आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते करणार आंदोलन

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात करणार आंदोलन

    पुण्यातील बालगंधर्व चौकात 11 वाजता आंदोलन

  • 27 Feb 2023 09:08 AM (IST)

    नाफेड चना नोंदणीला शेतकऱ्यांची तुफान गर्दी

    अमरावतीच्या धामणगाव रेल्वे नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी केली गर्दी

    नाफेड नोंदणी केंद्रावर पोलिसांनी सुरक्षा वाढविली

    पोलिसांची शेतकऱ्यांसोबत मध्यस्थीचा प्रयत्न

    नाफेडमध्ये नंबर लावण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

  • 27 Feb 2023 08:31 AM (IST)

    मराठी भाषा दिना निमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन

    नाशिक च्या कुसुमाग्रज निवासस्थाना पासून ग्रंथ दिंडीला सुरुवात

    आज दिवसभर मराठी भाषा दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • 27 Feb 2023 08:18 AM (IST)

    यवतमाळ :वडगाव गाढवे येथे बंजारा समाज लेंगी उत्सव

    यवतमाळ वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी वडगाव गाढवे लेंगी महोत्सव ठिकाणी दाखल

    लेंगी महोत्सव सुरू असताना बंजारा बांधव भगिनींसोबत घेतला खासदार भावना गवळी यांनी नृत्याचा ठेका

    बंजारा लेंगी नृत्य बघण्यासाठी नागरिकांची गाढवे वडगाव या ठिकाणी एकच गर्दी

    यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाज लेंगी उत्सव जिल्ह्यात वडगाव गाढवे येथे यावर्षी प्रथम आयोजन

    खासदार भावना गवळी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी लावली गाढवे वडगाव येथे हजेरी

  • 27 Feb 2023 08:16 AM (IST)

    औरंगाबाद शहरात G20 परिषदेचं शिष्टमंडळ दाखल

    सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या शिष्ट मंडळाचे विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं

    महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ढोल ताशे वाजवत आणि लेझीम खेळत स्वागत करण्यात आलं .

    आजपासून हे शिस्ट मंडळ औरंगाबाद शहरातील वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणार आहेत.

  • 27 Feb 2023 08:15 AM (IST)

    नागपूर : तलावात मोठे कासव सापडले

    नागपूरच्या ऐतिहासिक नाईक तलावात सापडले भले मोठे कासव

    तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी काढलं जात आहे तलावातील पाणी

    चिखलात दिसले मोठे कासव

    कासवाला पाहण्यासाठी जमली होती नागरिकांची गर्दी

  • 27 Feb 2023 08:08 AM (IST)

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरा भोवतीच्या खाजगी जागा संपादनाच्या हालचाली

    कोल्हापूर : 200 हुन अधिक मिळकत धारकांना देवस्थान समितीचे पत्र,

    संमती पत्रासाठी दोन मार्च ची दिली मुदत,

    मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध देण्याच्या दृष्टीने मिळकती ताब्यात घेण्याचा देवस्थानचा प्रयत्न,

    मिळकत धारकांनी संमती दिल्यानंतरच सुरू होणार तुमची प्रक्रिया,

    किती मिळकतधारक स्वतःहुन संमती पत्रासाठी प्रतिसाद देणार याकडे लक्ष.

  • 27 Feb 2023 07:30 AM (IST)

    कसबा पोटनिवडणुकीत दुपारी 3 नंतर तब्बल 20 टक्के मतदान

    कसबा पोटनिवडणुकीत दुपारी 3 नंतर तब्बल 20 टक्के मतदान

    दुपारनंतर वाढली मतदानाची टक्केवारी

    कसबा पोटनिवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद

    एकुण 50 .06 टक्के इतकं मतदान पार पडलं

    एकुण 1 लाख 37 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

  • 27 Feb 2023 07:12 AM (IST)

    आजपासून नाफेड मध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार….

    अमरावती : राज्यभरातील शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा विक्री करण्यासाठी आजपासून नाफेड मध्ये हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार,

    लवकरच राज्यात शासकीय दराने हरबरा खरेदी सुरू होण्याची शक्यता,

    5 हजार 334 रुपये प्रतिक्विंटल हरभराला आहे हमी भाव,

    नाफेडची नोंदणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी विकला खाजगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर हरभरा.

  • 27 Feb 2023 06:23 AM (IST)

    ज्योतिबा मंदिरात महिलेकडून भाविकांच्या दागिन्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न

    चोरी करणाऱ्या महिलेला देवस्थान कर्मचाऱ्यांनी शिताफीनं पकडलं

    भाविकांच्या दागिन्यावर डल्ला मारताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

    दोन चोऱ्या करून एसटीने पळून जात असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी पकडलं

    महिलेला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

    संबंधित महिलेने या आधीही अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दागिन्यांची चोरी करण्याचा केला होता प्रयत्न

  • 27 Feb 2023 06:20 AM (IST)

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदीया यांना अखेर अटक

    दीर्घ चौकशीनंतर सीबीआयकडून अटक, सिसोदिया यांनी प्रश्नांची उत्तरे टाळल्याने अटक केल्याचा दावा

    दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना करण्यात आली अटक

    सिसोदिया यांना संपूर्ण रात्र तुरुंगात घालवावी लागली

    आज सकाळी त्यांची वैद्यकीय चाचणी होणार

    सिसोदिया यांच्या अटकेनंतर आप कार्यकर्ते भडकले

    आपचे कार्यकर्ते आज राज्यभर निषेध आंदोलन करणार

  • 27 Feb 2023 06:17 AM (IST)

    चंद्रपूरच्या निंबाळा परिसरातील जंगलात आढळला मृत वाघ

    हा नर वाघ असून त्याचं वय अंदाजे 10 ते 12 वर्ष असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे,

    हा वाघ 3-4 दिवसांपूर्वी दुसऱ्या एका वाघासोबत झालेल्या झुंजीत हा वाघ गंभीर जखमी झाला होता

    वनविभाग या जखमी वाघावर होते पाळत ठेवून, मात्र काल संध्याकाळी झाला त्याचा मृत्यू,

    वाघाचा मृतदेह सध्या चंद्रपूर येथील ट्राझिंस्ट ट्रीटमेंट सेंटर येथे ठेवण्यात आला असून आज त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात येईल

  • 27 Feb 2023 06:14 AM (IST)

    धर्मावर संकट येईल तेव्हा पक्षनेते बाजूला राहू द्या मनगटाला मनगट लावून एकत्र लढा

    जळगाव येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तनातून आवाहन

    नेते व पक्षापूर्ती धर्म मर्यादित ठेवला तर धर्म बिघडेल

    धर्म वाचवणे ही काळाची गरज त्यामुळे पक्ष नेता यांच्यातील वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा

    इंदुरीकर महाराज यांचे अप्रत्यक्षपणे राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य

  • 27 Feb 2023 06:11 AM (IST)

    मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

    मुंबईसह राज्यात राजभाषा दिनानिमित्ताने कवीसंमेल, परिसंवाद आणि चर्चा सत्रांचं आयोजन

    ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन राज्यात केला जातो साजरा

Published On - Feb 27,2023 6:07 AM

Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.