Maharashtra Live Updates : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार
Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एफपीओ रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय. गुंतवणुकदारांचे पैसे परत करणार. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
सोलापुरात बच्चू कडूंच्या कार्यालयाबाहेरच महिलेने प्रहारच्या कार्यकर्त्यांना धरले धारेवर
सोलापूर –
– सोलापुरात बच्चू कडूंच्या पत्रकार परिषदेच्या कार्यालयाबाहेरच महिलेने प्रहारच्या कार्यकर्त्यांना धरले धारेवर
– आमदार बच्चू कडू येणार म्हणून कार्यकर्त्यांनी गाड्या अडव्या लावून आडवला होता रस्ता
– कोणाच्या परवानागीने रस्ता आडवला, तुम्ही शिक्षित आहात ना? असा सवाल करत महिलेने विचारला जाब
– त्यानंतर कार्यकर्त्यांनी गाडी काढून महिलेस वाट मोकळी करून दिली
– आमदार बच्चू कडू यांची पत्रकार परिषद सुरु असताना सोलापुरात घडला प्रकार
– सोलापुरातील काळी मज्जिद परिसरात घडला प्रकार
-
पक्षातील लोकांच्या समस्यांवर चर्चा
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची थोड्याच वेळात बैठक
या बैठकीत गजानन किर्तीकर प्रतापराव जाधव रामदास कदम भावना गवळी आणि गुलाबराव पाटील , शंभूरजे देसाई हे मुख्य मार्गदर्शक
येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी कश्या रीतीने काम करावे, पक्षातील लोकांच्या समस्यांवर चर्चा होणार
पक्ष प्रवेश केलेल्या लोकांचे, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख पदाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार
युवा सेना कार्यकारिणी संदर्भात देखील होणार चर्चा
-
-
सूर्यकांत विश्वासराव हे उमेदवार आघाडीवर
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात अविश्वसनीय कलाटणी
सूर्यकांत विश्वासराव हे उमेदवार आघाडीवर
मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर
तर विद्यमान आमदार विक्रम पिछाडीवर
भाजपचे किरण पाटील तिसऱ्या क्रमांकावर
शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे खळबळ
-
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मोठी बातमी
मतपत्रिकांची मोजणी पूर्ण
एकूण 53 हजार 64 मतपत्रिका मोजणीतून आल्या समोर
53 हजार 64 शिक्षक मतदारांनी केलं मतदान
बाद मतांची केली जाणार छाननी
त्यानंतर ठरवला जाणार उमेदवाराच्या विजयाचा कोटा
-
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मोठी बातमी
मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मोठी बातमी
मतपत्रिकांची मोजणी पूर्ण
एकूण 53 हजार 64 मतपत्रिका मोजणीतून आल्यासमोर
53 हजार 64 शिक्षक मतदारांनी केलं मतदान
बाद मतांची केली जाणार छाननी
त्यानंतर ठरवला जाणार उमेदवाराच्या विजयाचा कोटा
-
-
IND vs AUS TEST पहायला येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुठल्या मॅचला राहणार उपस्थित?
कुठल्या स्टेडियममध्ये मोदी येणार? त्यांच्यासोबत कोण खास पाहुणे असणार? वाचा सविस्तर….
-
Team India : विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन, एकदम कडक डान्स, VIDEO व्हायरल
Team India : प्रोफेशनल डान्सर्सपेक्षा एकदम भारी डान्स. वाचा सविस्तर…
-
IND vs NZ 3rd T20 : गोळीसारखा 149KMPH वेगात बॉल, Rahul Tripathi चा तितकाच कडक SIX, VIDEO
VIDEO : राहुल त्रिपाठीने किती सहजतेने शॉट मारला, ते पाहून तुम्ही सुद्धा तोंडभरुन कौतुक कराल. वाचा सविस्तर….
-
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट
कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती
आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत
तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत
मतमोजणीसाठी 2 हॉल असून एकूण 28 टेबल आहेत
25 मतपत्रिकाचे एक गठ्ठा असे सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून त्याची एका हौदात सरमिसळ करण्यात आल्या आहेत
आतापर्यंत सर्व 98 मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत
प्रत्येक टेबलवर 1250 मतपत्रिका देण्यात येतील, त्यानंतर वैध व अवैध मतांची मोजणी होईल.
-
अमरावतीत एकूण 265 पोस्टल मतं पडली
अमरावतीत 265 पोस्टल मतांपैकी एक मत बाद, २६४ मते वैध
गुलाल कुणाचा? अमरावतीकरांचं लक्ष लागलं
-
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक
काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक
काल सादर झालेल्या अर्थसंकल्पावर करणार चर्चा
विरोधी पक्ष सभागृहात अर्थसंकल्पावर आक्रमक होण्याची शक्यता
संजय राऊत बैठकीला उपस्थित राहणार
थोड्या वेळात बैठक सुरू होईल
-
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एडी कडून दुसऱ्या दिवशीही चौकशी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत एडी कडून दुसऱ्या दिवशीही चौकशी
ईडीचे अधिकारी पुन्हा बँकेत पोहोचले
काल नऊ तासाच्या चौकशीनंतर आज पुन्हा चौकशीला सुरुवात
आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँक खात्यांची सुरू आहे चौकशी
चौकशी पूर्ण झाल्यानंतर आमदार हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलणार
-
अदानी समूहाच्या निर्णयाने बाजाराला हादरा
मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडला
सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण
निफ्टीचा ही आस्ते कदमचा नारा
गुंतवणूकदार अलर्ट मोडवर, आज काय होणार
दुपारनंतर बाजाराची दिशा कोण ठरविणार
-
अदानी समूह बॅकफुटवर
FPO रद्द करण्याचा मोठा निर्णय
अदानी एंटरप्राईजच्या संचालक मंडळाने घेतला निर्णय
गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार
चेअरमन गौतम अदानी यांनी केली घोषणा
-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपचा डंका
10 जागांपैकी 9 जागांवर अ.भा.वि.प. पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचा दणदणीत विजय
तर महाविकास आघाडीला मात्र जोरदार दणका
-
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपचा डंका
10 जागांपैकी 9 जागांवर अ.भा.वि.प. पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचा दणदणीत विजय
तर महाविकास आघाडीला मात्र जोरदार दणका
-
आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
कच्चा तेलाच्या किंमतीत पुन्हा घसरण
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.18 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.48 तर डिझेल 94.60 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 106.15 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.49 रुपये तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
-
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मनसेही लागली कामाला
पुणे : मनसेच्या इच्छुक चौघांची नावे राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलीत,
यामध्ये गणेश सातपुते,अजय शिंदे,निलेश हंडे, आणि गणेश भोकरे अशी इच्छुकांची नावे आहेत,
मनसेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या चौघांची नावे निश्चित करण्यात आलीय,
याबाबत आता राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार.
-
Suryakumar Yadav ने जिंकलं, 2 लाजवाब कॅच, सगळेच थक्क, VIDEO व्हायरल
स्लीपमधील Suryakumar Yadav ची फिल्डिंगमधील चपळता पाहून सगळेच थक्क झाले, एकदा हा VIDEO बघा. वाचा सविस्तर….
-
Shubman Gill : 5 महिन्यात विराटचा रेकॉर्ड मोडला, शुभमन गिल याच्या शानदार सेंच्युरीच्या 7 मोठ्या गोष्टी
Shubman Gill ने न्यूझीलंडच्या बॉलर्सना अक्षरक्ष: कुटलं. त्याचं शतक का खास आहे? ते जाणून घ्या….
-
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू
नाशिकमध्ये मतपेट्या उघडल्या
पोस्टल मतांची मोजणी सुरू
दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट
-
कोयता गँग पकडून देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून बक्षिस
कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास 3 हजारांचं बक्षीस देण्यात येणार
तसेच बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडल्यास 10 हजार बक्षीस मिळणार
मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर
-
कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात अजित पवार स्वतः लक्ष घालणार
अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची पुण्यात बैठक
कसब्यातील उमेदवारीवरून बैठकीत होणार चर्चा
कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून 10 उमेदवार इच्छुक
सकाळी 11 वाजता बारामती होस्टेलला होणार बैठक
-
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला सवाल
औरंगाबाद : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ची नावे बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला .? औरंगाबाद खंडपीठाचा सवाल,
या शहरांची नावे बदलण्यापूर्वी आक्षेप मागविले होते काय ? खंडपीठाकडून विचारणा,
नावे बदलण्याचा निर्णय अंतिम झाला नसताना त्याची अंमलबजावणी कशी करत आहात ? राज्य शासनाला मागवले स्पष्टीकरण,
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बाबतीत शासकीय कामकाजात काही ठिकाणी संभाजीनगर आणि धाराशिव असा केला होता उल्लेख,
नामांतरावरून दाखल याचिकेत न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाकडून मागवले स्पष्टीकरण,
शहराच्या नामांतराबाबत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असतानाही राज्य शासनाने शहराचे नामांतर केले केले याकडे वेधले लक्ष.
-
गोंदिया शहरात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
3 लॅपटॉप, 9 मोबाईल, वायफाय केला जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
3 लाख 24 हजार रुपयांचं साहित्य जप्त
रामनगर पोलिसात गुन्हा दाखल
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना बोलावलं
शिंदे गटातील सर्व 50 आमदार आज मुख्यमंत्र्यांकडे येणार
बैठकीच कारण अद्याप स्पष्ट नाही
मात्र पक्षचिन्हं आणि शिवसेना कुणाची याचा निर्णय अंतिम टप्प्यात असताना आजची बैठक महत्वाची मानली जात आहे
-
पुणे जिल्ह्यातील कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटाची बैठक
पुण्यात आज शिंदे गटाची बैठक
कसबा पोटनिवडणूकी बाबत आज शिंदे गट आणि भाजपमध्ये बैठक होणार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीला राहणार उपस्थितीत
शिंदे गट कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपला देणार पाठिंबा
-
पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक
अजित पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक
कसब्यातील उमेदवारीवरून बैठकीत होणार चर्चा
कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून 10 उमेदवार इच्छुक
आज सकाळी 11 वाजता बारामती होस्टेलला होणार बैठक
-
गुलाल कुणाचा? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल आज
नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार
सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात होईल.
नाशिकच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
नाशिकचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील?
थोड्याच वेळात होणार चित्रं स्पष्ट
Published On - Feb 02,2023 6:22 AM