Maharashtra Breaking News Live : सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर, कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

| Updated on: Mar 17, 2023 | 6:09 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर, कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद
Maharashtra Breaking NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यातील 18 कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मोर्चाचे पडसादही उमटण्याची शक्यता असून या दोन्ही आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Mar 2023 08:40 PM (IST)

    मोफत करा ऑनलाईन आधार कार्ड अपडेट

    एक छदामही खर्च नाही करावा लागणार

    या कालावधीत नागरिकांना घेता येईल सुविधेचा लाभ

    ऑनलाईन आधार अपडेट करण्यासाठी नाही खर्च

    UIDAI ने आणली खास योजना, वाचा बातमी 

  • 16 Mar 2023 07:56 PM (IST)

    पतंजलीमुळे तुम्ही होणार मालामाल

    लवकरच बाजारात येणार Foods FPO

    एप्रिल महिन्यात एफपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता

    प्रमोटर्सचे शेअर एनएसई आणि बीएसईने केले जप्त

    नियमांचे उल्लंघन केल्याने केली कारवाई, वाचा बातमी 

  • 16 Mar 2023 05:48 PM (IST)

    हा स्टॉक बुलेट ट्रेनपेक्षाही सूसाट

    बुलेट ट्रेनसाठी स्टेशन तयार करणाऱ्या कंपनीचा शेअर रॉकेटसिंग

    गुंतवणूकदारांमध्ये लागली अशी स्पर्धा

    या स्टॉकची किंमत आजही आहे कमी

    कंपनीला मिळाले 3,681 कोटी रुपयांचे कंत्राट, वाचा सविस्तर 

  • 16 Mar 2023 04:57 PM (IST)

    अपडेटेड आयटीआर फाईल केले का?

    अंतिम संधी सोडाल तर नाही मिळणार सवलत

    31 डिसेंबर 2023 नंतर पुन्हा संधी

    करदात्यांना दंड आणि व्याज ही करावे लागते जमा

    काय आहे प्रक्रिया, घ्या जाणून,  वाचा सविस्तर 

  • 16 Mar 2023 04:06 PM (IST)

    अंधेरी पश्चिम येथील कट्टा येथून ठाकरे गटाच्या नेत्याचा फोटो काढण्यावरून वाद

    मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात शिवसेनेच्या कट्ट्यातून ठाकरे गटाच्या नेत्याचा फोटो काढून गोंधळ उडाला आहे.

    शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या निधीतून हा कट्टा करण्यात आल्याचा आरोप आहे.

    गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो काढला.

    आणि आज काही लोकांनी या कट्ट्यातून ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो काढले होते.

    सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करून वातावरण शांत केले.

  • 16 Mar 2023 01:16 PM (IST)

    लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा पसरवली जात आहे- विजय वडेट्टीवार 

    महाविकास आघाडीची बैठक झाली

    जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली

    तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील, त्या अनुषंगाने ती बैठक होती

    कार्यकर्त्यांच मनोमिलन व्हाव यासाठी बैठक

    लोकसभेच्या वाटपाबद्दल अफवा पसरवली जात आहे

    तशी कोणतीही चर्चा झाली नाही

    कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नका

    जागावाटपाबद्दल चर्चा झाली नाही

  • 16 Mar 2023 12:54 PM (IST)

    19 तारखेला खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे

    खेडमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

    गोळीबार मैदानात होणार आहे जाहीर सभा
     याच गोळीबार मैदानामध्ये झाली होती उद्धव ठाकरे यांचे जाहीर सभा
     सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानातच  रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा
  • 16 Mar 2023 12:47 PM (IST)

    निवडणूक आयोगाचं काम राज्यपालांनी केल्यासारखं दिसतंय; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

    मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडलं

    शिंदेंच्या बेईमानीचं बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं

    बहुमताला नाही, ज्या परिस्थितीत आदेश दिला त्याला विरोध

    निवडणूक आयोगाचा निर्णय नसताना विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिल्याचं दिसतंय

    10 व्या सूचीत राजकीय पक्षाच्या फुटबाबत स्पष्टता

    तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी अल्पमतातील सरकार चालवून दाखवलं

  • 16 Mar 2023 12:45 PM (IST)

    सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर, कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

    राज्यपाल हे विधीमंडळ पक्षाशी संवाद ठेवू शकतात. वैयक्तिक कोणाशीही नाही

    पक्षातील अंतर्गत वादाकडे राज्यपाल लक्ष देऊ शकत नाही

    राज्यपाल कोणा एकाला तुम्हीच आता मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही, राज्यपालांनी शिंदे यांच्या बाबतीत तेच केलं

    राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही

    शिंदे गटाच्या वेगवेगळ्या भूमिका, आधी सांगितलं आम्हीच शिवसेना, नंतर सांगितलं पक्षप्रमुखांना कंटाळून बाहेर पडलो

  • 16 Mar 2023 11:34 AM (IST)

    Legends League : इंडियन महाराजाला ख्रिस गेलच्या बॅटचा तडाखा, 9 फोर, 1 SIX, जाम धुतलं

    Legends League : इंडियन महाराजाकडून कोण खेळलं? वाचा सविस्तर….

    chris gayle

  • 16 Mar 2023 11:31 AM (IST)

    अपात्रतेची कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबवू शकत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

    अविश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच

    अविश्वास प्रस्ताव आणि अपात्रतेची कारवाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत

    राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणी बोलावली

    शिंदे गटाने त्यांचाच व्हीप पाळला

  • 16 Mar 2023 11:24 AM (IST)

    इम्तियाज जलील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा

    संस्थान गणपती पासून काही वेळात निघणार मोर्चा

    संस्थान गणपती परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 16 Mar 2023 11:22 AM (IST)

    भाऊ, अमेरिकेतील बँकांची चिंता उगा करता कशाला

    भारतीय बँकांमधून मिळवा जोरदार परतावा

    भारतीय बँका करतील तुम्हाला मालामाल

    शेअर देतील इतका परतावा

    अभ्यासानुसार, या बँकाचा शेअर देईल फायदा, एका क्लिकवर बातमी 

  • 16 Mar 2023 11:15 AM (IST)

    महाराष्ट्र शासनाने तेथील ८०० गावाना सर्व निधी दिला आहे

    हे बघा महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमा प्रश्न अनेक वर्ष हा प्रश्न पडला आहे

    महाराष्ट्र शासनाने तेथील ८०० गावाना सर्व निधी दिला आहे

    शाळकरी मुलांना ही दिला आहे

    जे आज विरोध करतात हे त्यांनी विरोध करू नये

    त्या स्थानिकांची मेर्जी आहे की त्यांना कुठल्या सेवा घ्याच्या आहेत

    महाजन समिती ने अत्यंत चुकीचे केले आहे

    ज्यांना जिथे राहायचे आहे राहू द्या आणि त्यानं कुठल्या सेवा घ्याच्या आहेत त्या घेऊ द्या तो त्यांचा सांविधानिक अधिकार आहे

  • 16 Mar 2023 11:13 AM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींऐवढा खर्च नसतो- संजय गायकवाड

    लोकप्रतिनीधींना पगारापेक्षा जास्त खर्च करावा लागतो- संजय गायकवाड

    महापुरूषांच्या जयंती, सामाजीक कार्य यासाठी लोकप्रतिनीधींना खर्च लागतो, हा खर्च सरकारी कर्मचाऱ्यांना नसतो- संजय गायाकवाड

    जुन्या पेंशनच्या निर्णयासाठी सरकारला वेळ द्यावा, संजय गायकवाड यांची मागणी

  • 16 Mar 2023 10:51 AM (IST)

    गारपीट, अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना भिती

    भितीपोटी शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटमध्ये आणले
    कळमना मार्केटमध्ये आज संत्र्यांची विक्रमी आवक
    आवक वाढल्याने संत्र्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना फटका
     संत्र्याचे दर ६० रु. किलोंवरुन २५ रुपयांवर
    संत्र्याचे दर पडल्याने शेतकरी संकटात
  • 16 Mar 2023 10:31 AM (IST)

    दोन वेळचा चहा करेल करोडपती

    दोन वेळच्या चहावर सोडा पाणी

    अवघ्या 20 रुपयात व्हाल कोट्याधीश

    एसआयपी करेल जोरदार मदत

    अभ्यास आणि स्ट्रॅटर्जी करेल कमाल,  वाचा बातमी 

  • 16 Mar 2023 10:28 AM (IST)

    शेतकऱ्याचा हरभरा दिला पेटून

    अज्ञाताने शेतकऱ्याचा हरभरा दिला पेटून

    जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील घटना

    पोलिसात गुन्हा दाखल

    शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान

  • 16 Mar 2023 10:27 AM (IST)

    नागपुरात सदर भागात चर्चच्या कार्यालयावर ईडीचा छापा

    आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीची छापेमारी

    देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या ११ कार्यालयावर छापा

    नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दहा तास कार्यालयाची केली झाडाझडती

    नागपूरच्या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती

    बिशप पी शिंग यांनी मिशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शुल्काचा गैरवापर केल्याचा आरोप

  • 16 Mar 2023 10:07 AM (IST)

    राष्ट्रपती भवनात महाराष्ट्रातील खासदारांची राष्ट्रपतींसोबत चहापाणी

    नवी दिल्ली : आज राज्यातील सगळ्या खासदारांसोबत राष्ट्रपती संवाद साधणार,

    सर्वपक्षीय खासदार राष्ट्रपती भवनात उपस्थित असल्याची माहिती,

    राष्ट्रपती प्रत्येक राज्यातील सगळ्या खासदारांशी साधतायेत संवाद,

    आज महाराष्ट्रातील खासदारांसोबत चहापाण्याचा कार्यक्रम.

  • 16 Mar 2023 09:55 AM (IST)

    मुंबई नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा ते तळेगाव फाटा दरम्यान वाहतूक कोंडी

    पिंपरी फाटा येथे कंटेनर बंद पडल्याने वाहतूक कोंडी

    दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा

    वाहनचालक लवकर जायच्या नादात कुठल्याही दिशेने वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीत भर

    वाहतूक कोंडीमुळे सर्व्हिस रोड वरून अवजड वाहने नेल्याने सर्व्हिस रोडवरही वाहतूक कोंडी

    एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा

    महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी गेल्या दीड तासापासून करताय वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न

  • 16 Mar 2023 09:54 AM (IST)

    Russia vs America : समुद्राच्या तळाशी असलेल्या ड्रोनमुळे USA फुल टेन्शनमध्ये, अमेरिकेच्या मनात इतकी भिती कसली?

    Russia vs America : रशियाने काल अमेरिकेच MQ-9 रिपर ड्रोन हे शक्तीशाली विमान पाडलं. आता समुद्राच्या तळाशी विसावलेल्या या ड्रोनमुळे शक्तीशाली अमेरिका चिंतेत आहे. कारण….वाचा सविस्तर….

  • 16 Mar 2023 09:53 AM (IST)

    RCB vs UPW : 11 SIX, 45 फोर, 122 चेंडूत ट्रिपल सेंच्युरी, आता आजारातून उठून RCB साठी बनली मॅच विनर

    RCB vs UPW WPL 2023 : टीमसाठी ती बनली संकटमोचक. सोफी डिवाइन, स्मृती मांधना आणि एलिसा पेरीला OUT करुन यूपीला वाटलं मॅच आपलीच. पण कनिका आहुजाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. वाचा सविस्तर….

  • 16 Mar 2023 09:34 AM (IST)

    सोन्याच्या घौडदौडीला लागला ब्रेक

    सोन्याच्या उसळीने अनेकांना धडकी

    दरवाढ रेकॉर्ड मोडणार का?

    चांदीच्या किंमतींत मात्र तेजी

    चांदीचा भाव वधरल्याने गुंतवणूकदारांची चांदी

    अमेरिकेतील घडामोडींचा असा ही परिणाम, वाचा बातमी 

  • 16 Mar 2023 09:17 AM (IST)

    नराधम वृद्धाला बेड्या ठोकल्यात

    नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धाला बेड्या ठोकल्यात

    संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे

    घराच्या अंगणात खेळत असलेल्या पीडित मुलीला चॉकलेट चं अमिश दाखवून बलात्कार केला

  • 16 Mar 2023 09:02 AM (IST)

    नागपुरात अवकाळी पावसाचा फटका

    कळमना एपीएमसी मार्केटमध्ये धान्य पावसात भिजलं

    रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचं धान्य भिजलं

    काल झालेल्या लिलावाचं धान्य पोत्यात भरुन ठेवण्यात आलं होतं

    काही धान्य ताडपत्रीने झाकण्यात आलं, तर काही धान्य पावसात भिजलं

  • 16 Mar 2023 08:51 AM (IST)

    आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    आंतरराष्ट्रीय घडामोडींचा झाला परिणाम

    कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण

    मग नागरिकांना दर कपातीचा दिलासा केव्हा

    केंद्र सरकार अनुकूल, अनेकदा दिले संकेत

    प्रत्यक्षात नागरिकांना स्वस्ताईचा दिलासा मिळणार केव्हा, वाचा बातमी

  • 16 Mar 2023 08:43 AM (IST)

    Mumbai Indians IPL 2023 : पलटनला कमी समजू नका, कधीही शॉक देतील, ‘दुनिया हिला देंगे हम’

    Rohit Sharma यावेळी टेन्शन घेणार नाय, देणार. वाचा सविस्तर….

  • 16 Mar 2023 08:42 AM (IST)

    Video : शाहीन आफ्रिदी खवळला, डायरेक्ट मैदानात पोलार्डला भिडला, मैदानात ‘राडा’

    शाहीन आफ्रिदीचा स्वत:वरील ताबा सुटला. त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही. वाचा सविस्तर….

  • 16 Mar 2023 08:26 AM (IST)

    अंबरनाथमध्ये आज सकाळपासून अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

    पावसामुळे वातावरणात निर्माण झाला गारवा

    सकाळपासून होतोय अवकाळी पावसाचा शिडकावा

    अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जायला निघालेले चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांची तारांबळ

  • 16 Mar 2023 08:26 AM (IST)

    उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस

    रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीस

    त्वरित कामावर रुजू होण्याचे दिले आदेश

    दोन नोटीस बजावूनही कामावर न आल्यास होणार मेस्मांतर्गत कारवाई

    जवळपास 100 कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली नोटीस

  • 16 Mar 2023 08:17 AM (IST)

    वीज थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या पथकावर नाशिकमध्ये हल्ला

    नाशिकच्या भारत नगर परिसरातील घटना

    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कर्मचारी वैभव कांडेकर यांच्यावर एका कुटुंबाने केला हल्ला

    थकीत विज बिल संदर्भात वसुलीसाठी गेले असताना घडली घटना

    नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 16 Mar 2023 08:12 AM (IST)

    अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल

    नाशिक : द्राक्ष, कांदा, गहू , कोबी पिकांचे मोठे नुकसान,

    आधीच्या नुकसनाचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा एकदा अवकाळीचा फटका,

    हवामान खात्याकडून पुढचे तीन दिवस नाशिकला ऑरेंज अलर्टरात्रभर पावसाची संततधार.

  • 16 Mar 2023 07:55 AM (IST)

    ठाण्यात अवकाळी पावसाला सुरुवात

    ठाण्यातील रस्ते झाले जलमय

    या अवकाळी पावसाचे चाकरमान्यांचे, शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल

    ठाणेकरांनी घेतला छत्रीचा सहारा

    अचानक पडणाऱ्या पावसाने वातावरणात बदल

  • 16 Mar 2023 07:46 AM (IST)

    अवैध रेती उत्खनन करताना दोघांचा बुडून मृत्यू

    अवैध रेती उत्खनन करताना दोघांचा बुडून मृत्यू

    यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील चिकणी कसबा येथील घटना

    जिल्ह्यात अवैध रेती वाहतुक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम  144 लागू

    स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुळे अवैध रेती सुरूच

    अवैध रेती उत्खनन करताना नदीपात्रात दोघांचा बुडून मृत्यू

    कैलास पारधी आणि रामदास भुजाडे असे मृतकाचे नाव

    चिखली कसबा तलाठी,मंडळधिकारीवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष

  • 16 Mar 2023 07:41 AM (IST)

    यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बेलोरा शाळेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस

    यवतमाळ

    जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा

    पुसद तालुक्यात पुन्हा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार

    यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बेलोरा शाळेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस

    श्री शिवाजी विद्यालयातील प्रकार 10विचा भूमितीचा पेपरला टाकली उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी धाड

    केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक सह 11 खोलीवरील पर्यवेक्षक असे 13 जणांवर कारवाई केली शिक्षण मंडळाकडे प्रस्तावित

    जवळच्या अविरन ऑनलाइन सेंटरवरील कॉम्प्युटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन केली जप्त

    यापूर्वी याच पुसद तालुक्यातील कातखेडा येथील शाळेवर धाड टाकून 9 जनावर केली होती उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई

  • 16 Mar 2023 07:35 AM (IST)

    पुणे शहरात श्वानांचा धुडगूस

    गेल्या वर्षी तब्बल 16 हजार 569 लोकांचा श्वानांनी घेतला चावा

    पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला

    शहरात साडेतीन लाखांच्यावर भटक्या श्वानांची संख्या

    तर 16000 जणांचा या श्वानांनी घेतला चावा

    पुणे महापालिका प्रशासनाची माहिती

    एका वर्षात पुणे महापालिकेकडून 20 हजार 956 श्वानांची नसबंदी

  • 16 Mar 2023 07:21 AM (IST)

    नागपूरसह परिसरात आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात

    विजांच्या कळकळाटासह पावसाला सुरुवात

    नागपूरसह विदर्भाच्या काही भागात आज सकाळपासून ढगाळ हवामान

    नागपूरसह विदर्भात पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

    हवामान विभागाने विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट केला जारी

    अवकाळी पावसामुळे पुन्हा रब्बी पिकांच्या नुकसानीचे संकट

  • 16 Mar 2023 07:19 AM (IST)

    पुण्यात मेट्रोस्थानकातच चोरांचा डल्ला

    पुणे

    पुण्यात मेट्रोस्थानकातच चोरांचा डल्ला

    पुण्यातील गरवारे मेट्रोस्थानाकातून मेट्रोच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात चोरी

    गरवारे मेट्रोस्थानाच्या आवारातून ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

    गरवारे मेट्रोस्थानाच्या आवारातील पत्रे, छोटे पाईप, लोखंडी बॅरिकेड गेली चोरीला

    डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

  • 16 Mar 2023 07:13 AM (IST)

    वडिलांचा मृतदेह घरात, मुलगा परीक्षेला

    भंडारा : त्याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर,

    घरी वडिलांचा मृतदेह ठेवून तो परीक्षा केंद्रावर गेला,

    पेपर सोडवून आल्यावर प्रेताला अग्नी दिला,

    ही घटना भंडारा जिल्हाच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील घटना.

  • 16 Mar 2023 06:40 AM (IST)

    धुळे जिल्ह्याला आठवड्याभरात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने झोडपले

    जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा आणि धुळे तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची मुसळधार हजेरी

    वादळी वारा…विजांच्या कळकळाटासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

    पावसाळ्यात पडावा तसा पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल

    रब्बी पिकासह फळबागांच प्रचंड नुकसान, पंचनामे कोण करणार? हा मोठा प्रश्न

  • 16 Mar 2023 06:37 AM (IST)

    जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

    काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत

    वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने पादचारी आणि वाहनधारकांचे हाल

    हवामान खात्याने दिला अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता

  • 16 Mar 2023 06:35 AM (IST)

    पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवकाळी पावसाच्या भीतीने ज्वारी कापणीची लगबग

    हातातोंडाशी आलेल्या पिकांच पावसामुळं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांची पाहायला मिळतीय लगबग

    काढणीसाठी तयार असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांच पावसामुळे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

  • 16 Mar 2023 06:32 AM (IST)

    वसई-विरारमध्ये ढगाळ वातावरण, मध्यरात्री पावसाच्या सरीही कोसळल्या

    वसई-विरारमध्ये रात्री पासून ढगाळ वातावरण आहे

    मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी रिमझिम पाऊस पडला आहे

    सद्या परिसरात पाऊस नाही, पण दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे

Published On - Mar 16,2023 6:30 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.