Maharashtra Breaking News Live : बाळासाहेब ठाकरे यांच्या मंडळ आयोगाच्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना सोडली- भुजबळ

| Updated on: Mar 20, 2023 | 5:55 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : बाळासाहेब ठाकरे यांच्या मंडळ आयोगाच्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना सोडली- भुजबळ
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोकणातील खेड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते कुणावर हल्लाबोल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा सहाव्या दिवशीही संप सुरूच. भारताला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, बागेश्वर बाबांचा मुंबईतून निर्धार. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Mar 2023 08:31 PM (IST)

    पीएफ खातेदाराला मोफत विम्याचे संरक्षण

    वारसदारांना मिळते भरभक्कम आर्थिक मदत

    या विम्यासाठी द्यावे लागत नाही कोणतेही शुल्क

    कंपनीकडून घेण्यात येते विम्यासाठी योगदान

    विम्याचा लाभ वारसांना मिळण्यासाठी ही आहे प्रक्रिया, बातमी एका क्लिकवर

  • 19 Mar 2023 07:46 PM (IST)

    टाटा समूहाच्या शेअरने दिला परतावा जोरदार

    गुंतवणूकदारांना केले मालामाल

    टाटा समूहाच्या कंपनीने 352 रुपयांचा दिला लाभांश

    आतापर्यंत 2,538.58 टक्क्यांहून दिला अधिकचा परतावा

    व्यवस्थापनात झाला मोठा बदल, मोठी घडामोड

    खांदेपालटानंतर कंपनीची घौडदौड कशी राहील? वाचा बातमी

  • 19 Mar 2023 07:00 PM (IST)

    प्रवासाची हौस भारी, आता विमा पण दारी!

    या जोखीमेसाठी घेता येईल विमा

    दुर्घटना, चोरी, प्रवास यासाठी विम्याचे संरक्षण

    ट्रॅव्हल इन्शुरन्सचा असा होईल फायदा

    काय घ्यावी विमा घेताना काळजी, वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 06:52 PM (IST)

    मुबंई-नाशिक महामार्गावरील आसनगाव रेल्वे ब्रीज जवळ भीषण अपघात

    मुबंई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

    कंटेनर आणि बाईकचा भीषण अपघात

    आसनगाव रेल्वे ब्रीज जवळ भीषण अपघात

    अपघातात बाईकस्वरचा जागीच मृत्यू

    कंटेनर ड्रायव्हर फरार, अपघातामुळे महामार्गावर प्रंचड वाहतूक कोंडी

  • 19 Mar 2023 05:56 PM (IST)

    कर वाचविण्यासाठी या सरकारी योजना जबरदस्त

    कर तर वाचणारच, पण बचतीवर मिळणार जोरदार परतावा

    उपयोगात येणार या सरकारी योजना

    इतका वाचणार पैसा, असा होणार फायदा

    करपात्र कमाईवर कर वाचविता येणार, वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 04:59 PM (IST)

    भारताची पेमेंट सिस्टम जगभर लोकप्रिय

    परदेशातही युपीआयचा बोलबाला

    आता परदेशातही व्यवहाराचा झंझावात

    सिंगापूरसोबत झाला युपीआयचा करार

    RBI गव्हर्नरने केला हा मोठा दावा, वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 04:14 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात गारांचा पाऊस; पिकांना फटका

    भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात गारांचा पाऊस

    काल सकाळी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती

    आज पुन्हा सकाळपासून आकाशात काळे ढग दाटून आले आहेत

    भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान

    गारांच्या पावसामुळे भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

  • 19 Mar 2023 04:09 PM (IST)

    घड्याळं श्रीमंत करणाऱ्या व्यक्तीचा संघर्ष

    एका अनाथ मुलाने उभारले साम्राज्य

    अनाथ मुलाने गरिबीशी केले दोन हात

    उभारली सर्वात मोठी Rolex कंपनी

    या घड्याळाची श्रीमंती तुम्हाला माहिती आहे का? एका क्लिकवर बातमी 

  • 19 Mar 2023 04:08 PM (IST)

    शिवसेना का सोडली, भुजबळांनी सांगितले

    मंडळ आयोगाच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्यामुळे मला शिवसेना सोडावी लागली अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांनी पोटाला जात नसते म्हणत मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे भुजबळ म्हणाले.

  • 19 Mar 2023 04:02 PM (IST)

    इगतपुरी शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

    जोरदार हवा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस

    तालुक्यातील काही भागात पडल्या होत्या तुरळक सरी

    आज शहरासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस

  • 19 Mar 2023 03:31 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळात ठाणे येथून खेडच्या सभेसाठी चॉपरने होणार रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल झाल्यानंतर जामगा या ठिकाणी रामदास कदम यांच्या निवासस्थानी स्थानिक पत्रकारांशी साधणार संवाद

    मुख्यमंत्र्यांच्या सभेची संपूर्ण खे़ड आणि दापोलीत जोरदार तयारी

    खेडमधील बेरोजगारीवर मुख्यमंत्री महत्त्वाचे भाष्य करण्याची शक्यता

    उत्तर सभेत मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांना काय उत्तर देणार याकडे दापोलीकरांचे लक्ष

  • 19 Mar 2023 02:35 PM (IST)

    रत्नागिरीतील खेडमध्ये मनसे-शिवसेना संघर्ष पेटला

    राज ठाकरेंच्या सभेचा बॅनर रामदास कदमांनी काढायला लावला

    वैभव खेडेकर राज ठाकरेंकडे करणार तक्रार

    राज ठाकरेंनी कोकणात लक्ष द्यावं तरचं संघटना टिकेल

    शिंदे गटाचे लोक मनसे संपवण्याचा प्रयत्न करतायेत, वैभव खेडेकरांचा आरोप

  • 19 Mar 2023 01:35 PM (IST)

    पुण्याला मिळणार 80 नव्या लालपरी

    75 इलेक्ट्रिक शिवाई आणि 100 इलेक्ट्रिक शिवनेरी

    मार्चखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

    एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

  • 19 Mar 2023 12:35 PM (IST)

    बागेश्वर बाबांच्या कालच्या कार्यक्रमात चोरी प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    महिलांचे गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र चोरी प्रकरणातील सहा आरोपींना मीरारोड पोलिसांनी घेतलं ताब्यात

    36 पेक्षा अधिक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत

    मीरारोड पोलीस ठाण्यात 36 भाविकांनी तक्रार दिली आहे

    चोरीचा गुन्हा नोंद करून पोलीस तपास करत आहे

  • 19 Mar 2023 12:32 PM (IST)

    बीड | जिल्हा भाजपची कार्यकारिणी बैठक

    पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक

    अंबाजोगाई येथे बैठकीचे आयोजन

    बैठकीला आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित

  • 19 Mar 2023 12:26 PM (IST)

    बाबा बागेश्वर धामला भेटण्यासाठी राजस्थानमधील लोक मीरा रोडवरील माहेश्वरी भवनाबाहेर जमले

    राजस्थानातील एका राजपूत कुटुंबाला बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना एक मूल आहे, ज्याला नीट बोलता येत नाही, मानेचा आजार आहे

    अनेक ठिकाणी उपचार केले पण बरे होत नाही, त्यांना आशा आहे की एकदा बाबांचा आशीर्वाद लाभला तर त्यांचे मूल बरे होईल

    हे कुटुंब कालपासून माहेश्वरी भवनाबाहेर बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी बसले असून बाबा त्यांना भेटून आपल्या मुलाला बरे करतील अशी आशाही त्यांना आहे

  • 19 Mar 2023 12:17 PM (IST)

    ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात

    पन्हाळ गडाच्या तटबंदीवरून कोसळला तरूण

    गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू, वाचा सविस्तर..

  • 19 Mar 2023 12:05 PM (IST)

    खेडमध्ये मनसे-शिवसेना संघर्ष पेटला

    राज ठाकरेंच्या सभेचा बँनर रामदास कदमांनी काढायला लावला

    वैभव खेडेकर राज ठाकरेंकडे करणार तक्रार

    राज ठाकरेंनी कोकणात लक्ष द्यावं तरचं संघटना टिकेल

    शिंदे गटाचे लोक मनसे संपवण्याचा प्रयत्न करतायेत

    वैभव खेडेकर यांनी केला आरोप

  • 19 Mar 2023 11:56 AM (IST)

    नवी दिल्ली : औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध

    येत्या 24 तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    छत्रपती संभाजीनगर नामकरणला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

    येत्या 24 तारखेला न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

  • 19 Mar 2023 11:35 AM (IST)

    Entertainment Update : Pathaan सिनेमात शाहरुख – दीपिका यांनी नाही तर, ‘या’ स्टार्सनी केलेत दमदार ॲक्शन सीन… अखेर फोटो समोर

    ‘पठाण’ सिनेमात शाहरुख – दीपिकाचे ॲक्शन सीन पाहून तुम्हीही थक्क झाले असाल?

    सिनेमात दमदार ॲक्शन सीन करणारे खरे स्टार ‘हे’ आहेत… वाचा सविस्तर

  • 19 Mar 2023 11:25 AM (IST)

    नावात हिंदुस्तान, मनात ब्रिटेन-नेदरलँड

    भारतातील प्रत्येक घराघरात युनिलिव्हरच्या उत्पादनाचा बाजार

    गेल्या 90 दशकांपासून देशात ठाण

    दहा पैकी नऊ घरात उत्पादनांचा होतो वापर

    या कंपनीची वादाशी पम आहे नाळ

    जाणून घ्या या कंपनीचा इतिहास, वाचा सविस्तर 

  • 19 Mar 2023 11:23 AM (IST)

    Entertainment Update : Oscars 2023 मध्ये असं काय झालं ज्यामुळे ‘आरआरआर’ सिनेमाच्या टीमला मोजावे लागले कोट्यवधी रुपये?

    Oscars 2023 पुरस्कार सोहळ्यात प्रवेश करताना ‘आरआरआर’ सिनेमाच्या टीमला आल्या अनेक अडचणी?

    ‘नाटू नाटू’ गाण्याने ज्यांनी जगाला उत्साहीत केलं, त्यांच्यासोबतच…, वाचा सविस्तर

  • 19 Mar 2023 10:41 AM (IST)

    पुण्यात तरुणांची ३०० कोटींत फसवणूक

    पुणे शहरात कर्ज टॉपअप करण्याच्या नावाखाली २०० युवकांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक तब्बल ३०० कोटींमध्ये आहे. एकाच वेळी अनेक बँकांमधून कर्ज घेऊन फसवणूक झाली आहे. कर्ज मिळवून देणाऱ्या चोरट्याने कर्जाचे पैसे आपल्या कंपनीत गुंतवण्यास लावले होते….वाचा सविस्तर

  • 19 Mar 2023 10:20 AM (IST)

    TCS ची कमान आता के. कीर्तिवासन यांच्या हाती

    राजेश गोपीनाथ यांचा राजीनामा

    कीर्तिवासन यांचा प्रेरणादायी प्रवास

    ज्या कंपनीत केली करिअरची सुरुवात, तिथेच सांभाळणार कमान

    कशी केली होती करिअरची सुरुवात, बातमी एका क्लिकवर 

  • 19 Mar 2023 10:06 AM (IST)

    जळगावमधील काही भागात शनिवारी अवकाळी पाऊस

    अवकाळी पावसामुळे फळबागायतदारांचं 50 ते 60 टक्के नुकसान

    फुल गळतीमुळे डाळींब पिकांचं 50 ते 60 टक्के नुकसान

    पीक विम्याची मदत तात्काळ मिळावी अशी फळ बागायतदार शेतकऱ्यांची मागणी

  • 19 Mar 2023 10:04 AM (IST)

    पुणे जिल्ह्यालाही गारपिटीचा फटका

    जिल्हयात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

    जिल्हयात झालेल्या गारपिटीने शेतीचं मोठं नुकसान

    कांदा, कलिंगड पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

    पंचनामे सुरू, प्रत्यक्ष नुकसान किती हे दोन दिवसांनी कळणार

    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

  • 19 Mar 2023 09:19 AM (IST)

    पॉलिथिन बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलीस तपासात गुंतले, नंतर म्हणाले…

    पॉलिथिन बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलीस तपासात गुंतले, नंतर म्हणाले…

    वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 09:19 AM (IST)

    सोन्याने केला नवीन रेकॉर्ड

    सोन्याच्या भावात जोरदार उसळी

    चांदीच्या किंमती ही भडकल्या

    दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर भावात एकदम वाढ

    पुढील आठवड्यात काय असेल भाव, वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 09:03 AM (IST)

    पुणे परिवहन महामंडळात दाखल होणार नव्याने 155 बसेस

    पुणे विभागात येणार नव्या 75 ई बसेस

    तर नव्याने 80 लालपरी पुणे परिवहन महामंडळात दाखल होणार

    एसटी महामंडळाकडून पुणे शहरासाठी देण्यात येणार नव्या 150 ई बसेस

    त्यातील 75 इ बसेस मार्चमध्ये होणार दाखल

    त्यात सोबतच नव्याने 100 शिवनेरी बसेस देखील पुण्यात दाखल होणार

    राज्य एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

    पुणे विभागाला मिळालेल्या सर्व 100 ई बस धावणार

  • 19 Mar 2023 09:02 AM (IST)

    उल्हासनगर : तरुणाचे अपहरण करत जीवे मारण्याची धमकी

    तरुणाच्या मित्राशी होता आरोपीचा जुना वाद

    अपहरणाचा प्रकार सीसीटीव्हीत झाला कैद

    पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा तरुणाचा आरोप

    पोलिसांकडून लवकरच आरोपींना बेड्या ठोकणार असल्याची माहिती

  • 19 Mar 2023 09:01 AM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अपघातांची संख्या सतत वाढत आहे. अनेक अपघात चालकांच्या चुकीमुळे होत आहेत. वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही, यामुळे अपघातांची संख्या वाढलीय. मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघात झाला. आतापर्यंत कधीच पाहिला नसणार, डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारमध्ये घुसला…वाचा सविस्तर

  • 19 Mar 2023 08:38 AM (IST)

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची घसरगुंडी

    पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या का

    तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय

    कधी होईल कर कपातीची घोषणा

    मार्चमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री घटली

    गेल्या तीन महिन्यात कच्चा तेलात मोठी उसळी नाही, वाचा बातमी 

  • 19 Mar 2023 08:37 AM (IST)

    अवकाळी पावसानंतर मावळात धुक्या सह गारवा जाणवू लागलाय

    मावळ,पुणे

    -अवकाळी पावसानंतर मावळात धुक्या सह गारवा जाणवू लागलाय

    -मावळात आज पहाटे पासूनच सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहयला मिळाली

    -मावळात सकाळच्या सुमारास ह्या धुक्यामुळे दृश्यमान कमी होऊन अगदी जवळचे देखील दिसत नव्हते

    -पहाटे पासून मावळातील वातावरण आल्हाददायक

    -मात्र ह्या धुक्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

  • 19 Mar 2023 08:36 AM (IST)

    महिलेला एकटी पाहून पुरुषाने घेतलं चुंबन, मग तिथून पळ काढला

    महिलेला एकटी पाहून पुरुषाने घेतलं चुंबन, मग तिथून पळ काढला, घटना CCTV मध्ये कैद, वाचा सविस्तर बातमी 

  • 19 Mar 2023 08:28 AM (IST)

    अहमदनगर | महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नुकसानीची पाहणी करणार

    राजूरी, ममदापूर इथं अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार

    शनिवारी अहमदनगर जिल्हयात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट

    गारपिटीमुळे शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान

  • 19 Mar 2023 08:27 AM (IST)

    अहमदनगर | अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू तर एक महिला जखमी

    श्रीरामपूर तालुक्यातील खोकर इथली घटना

    50 वर्षीय राजू मोरे यांचा वीज पडून मृत्यू तर पत्नी सुनीता मोरे जखमी

    विजेच्या धक्क्याने बाजूला असलेल्या गाईचाही मृत्यू

    अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस

  • 19 Mar 2023 08:01 AM (IST)

    पुणे : संजय गायकवाड यांच्या विरोधात कर्मचारी आक्रमक

    पुण्यात उद्या गायकवाड यांच्या विरोधात थाळीनाद आंदोलन

    गायकवाड यांनी केलेल्या अक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आंदोलन

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस

    जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर

    काल आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं

  • 19 Mar 2023 07:45 AM (IST)

    भंडारा : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

    रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

    राष्ट्रीय महामार्ग 6 वरील साकोली जवळील घटना

    बिबट्या दोन वर्षे वयाचा असल्याचा अंदाज

    वनविभागाची चमू पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल

  • 19 Mar 2023 06:17 AM (IST)

    पुण्यात उच्चशिक्षित असलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांची फसवणूक

    जवळपास 3000 विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना गंडवले

    मोठ्या पगाराचे आमिश दाखवून लाखो रुपयांची वसुली

    प्लेसमेंटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक

    खासगी कंपन्या आणि एजंटांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक

    बंडगार्डन पोलिसांमध्ये विद्यार्थ्यांकडून तक्रार

  • 19 Mar 2023 06:16 AM (IST)

    पुण्यात लाखो रुपयांचे विविध प्रकारचे ड्रग्स जप्त

    विक्रिसाठी आणलेले 11 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त

    अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

    आरोपी लायनल लेझली मेस्करेंस आणि रसल ऍंथोनी चंदनशिव यांच्याकडून ड्रग्स जप्त

    दोन्ही आरोपींविरुद्धध वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमान्वये कारवाई

  • 19 Mar 2023 06:13 AM (IST)

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना राज्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी विचारला जाब

    सरकारी कर्मचारी हे 95 टक्के भ्रष्ट असल्याचा संजय गायकवाड यांचा पुनरूच्चार

    कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार आणि आमदार गायकवाड यांच्यात वाद

    आमदार गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संपकरी कर्मचारी संतप्त

  • 19 Mar 2023 06:11 AM (IST)

    पुण्यातील बावधन जवळ भीषण अपघात

    पुण्यातील बावधन येथे ट्रॅव्हल बस पुलावरून रस्त्यावर कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली

    अपघातात गरोदर महिला आणि तिचे लहान बाळ जखमी झाले

    त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत

    गाडीत एकूण 36 प्रवासी असल्याची माहिती मिळतेय

    चालक सिगारेट पीत असल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे

  • 19 Mar 2023 06:07 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये सभा, उद्धव ठाकरे निशाण्यावर?

    खेड येथील गोळीबार मैदानावर आज होणार सभा

    याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष

Published On - Mar 19,2023 6:04 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.