Maharashtra Breaking News Live : मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 60 विद्यार्थी शिक्षक जखमी

| Updated on: Mar 23, 2023 | 5:59 AM

Maharashtra Breaking News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : मधमाशांच्या हल्ल्यात 50 ते 60 विद्यार्थी शिक्षक जखमी
Maharashtra Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : गुढी पाडवा मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. गुढी पाडव्या निमित्ताने राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. गुढी पाडव्या निमित्ताने तुळजा भवानीसह राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रिघ. डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार. आज दादरच्या शिवाजी पार्कात मनसेच्या मेळाव्याचे आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार. दिल्लीत काल रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांना जीवमुठीत घेऊन घराबाहेर पळावं लागलं. या भूकंपाच्या धक्क्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2023 08:16 PM (IST)

    या शेअरने दिला गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न

    या शेअरचा 100000 टक्के परतावा

    दीर्घकालीन गुंतवणूक करणारे एकदम मालामाल

    कंपनी पण झाली कर्जमुक्त

    दरवर्षी कंपनीच्या विक्रीत मोठी उलाढाल, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 07:32 PM (IST)

    जगातील या 30 बँका सर्वात पॉवरफुल

    एक जरी बुडाली तर आर्थिक जगतात त्सुनामी

    आर्थिक संकटाची मोठी चाहूल

    या यादीत भारतातील किती बँकांचा समावेश

    आपल्या अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम

    ठेवीदारांचा पैसा किती आहे सुरक्षित, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 07:21 PM (IST)

    नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर हिंदू हुंकार सभेचे आयोजन

    नाशिक :

    नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर हिंदू हुंकार सभेचे आयोजन

    साधू -संत आणि शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी

    प्रमुख वक्ता सुरेश चव्हाण के करणार मार्गदर्शन

    महामंडलेश्वर शांतिगिरिजी महाराज, भक्तीचरणदास महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह साधू महंत उपस्थित

  • 22 Mar 2023 06:39 PM (IST)

    केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    आधार कार्डधाराकांना लिकिंगसाठी दिली मुदत

    आधार कार्ड धारकांना यापूर्वी 31 मार्च ही होती अंतिम मुदत

    केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिला मोठा दिलासा

    गुढी पाडव्याच्या दिवशी दिली आनंदवार्ता, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 05:49 PM (IST)

    कमाईमध्ये या सेलिब्रिटीने तोडले रेकॉर्ड

    रणवीर सिंहने घेतली आघाडी, कोटींची कमाई

    मोस्ट व्हॅल्यूड सेलिब्रिटीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर

    रणवीरने त्याचा मुकूट हिसकावला

    आलिया भट्टने पण घेतली झेप, महिलांमध्ये सर्वात पुढे

    या यादीत इतर कोण कोण आहे, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 04:59 PM (IST)

    देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू

    नवी दिल्ली : 

    कोरोनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्यासह आरोग्य मंत्रालयातील अधिकारी बैठकीला उपस्थित

  • 22 Mar 2023 04:59 PM (IST)

    अस्सल सोन्यासाठी मोजावे लागले अतिरिक्त शुल्क

    24 कॅरेट सोने एकदम ओरिजिनलचं मिळणार

    पण त्यासाठी खिसा खाली होणार

    हॉलमार्क HUID साठी इतकी मोजावी लागेल अधिक रक्कम

    1 एप्रिलपासून नवीन नियम होणार लागू

    शुद्ध सोन्याची आता खरेदीदारांना मिळणार हमी, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 04:15 PM (IST)

    राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांचे वितरण

    नवी दिल्ली :

    राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांचे वितरण

    संध्याकाळी सहा वाजता होणार पद्म पुरस्कारांचे वितरण

    महाराष्ट्रातून झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण

    कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपुर यांना पद्मभूषण

    भिकू रामजी ईदाते यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री

    उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी राकेश झुनझुनवाला यांना पद्मश्री

    शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या डॉक्टर प्रभाकर मांडे यांना पद्मश्री , डॉक्टर रमेश पतंगे यांनाही पद्मश्री

  • 22 Mar 2023 02:51 PM (IST)

    मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी

    शिरपूर तालुक्यातील विखरण येथे माध्यमिक विद्यालयात मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 50 ते 60 विद्यार्थी शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षक यांना नागरिकांनी विखरण आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेस विद्यार्थी प्रार्थनेसाठी शाळेच्या मैदानावर एकत्र आले असता अचानक मधमाशांनी हल्ला केला यात धावपळ उडाली. मधमाशांनी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी शिक्षकांना चावा घेतला.

  • 22 Mar 2023 02:37 PM (IST)

    कोरोना संदर्भात राजधानी दिल्लीत बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

    संध्याकाळी साडेचार वाजता होणार बैठक

    आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक

    देशभरातील कोरोना स्थितीवर होणार चर्चा

  • 22 Mar 2023 02:36 PM (IST)

    पुण्यातील ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयाया मधला वाद विकोपाला

    पुणे : ओशो आश्रमाच्या बाहेर अनुयायांच मोठे आंदोलन सुरू,

    गेल्या अनेक दिवसांपासून ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमध्ये सुरू आहे वादंग,

    आज आंदोलन चिघळलं, अनुयायांचा धक्काबुक्की करत आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न,

    पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, ओशो आश्रमाच्या बाहेर अनुयायांच आंदोलन सुरू.

  • 22 Mar 2023 02:01 PM (IST)

    आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार

    राज ठाकरेंच्या सभेला गर्दी असतेच

    मोठ्या संख्येने मनसैनिक मुंबईकडे जातायेत

    आम्हालाही उत्सुकता आहे राज ठाकरे काय बोलणार

    पुण्याहून मुंबईकडे मनसैनिक रवाना

    शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची प्रतिक्रीया

  • 22 Mar 2023 01:58 PM (IST)

    निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर आले एकत्र

    निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर आले एकत्र

    कसबा गणपती मंदिरात दोघांनीही एकत्र येत एकमेकांना दिल्या शुभेच्छा

    रासने आणि धंगेकर यांच्या हातात हात देत एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

    कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर दोघेही पहिल्यांदाच आले एकत्र

  • 22 Mar 2023 01:14 PM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन

    सोलापूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन, पाण्याचे घागर फोडून प्रशासनाचा निषेध

    शहरातील समाधान नगर भागात मागील 15 दिवसापासून पाणी नसल्याने नागरिकांचे आंदोलन

    अचानक आलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारा मांडला ठिय्या

    पालिकेत येण्याजाण्याचा रस्ता या नागरिकांनी आडवून ठेवला आहे

    महापालिकेत पोलिस दाखल, नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न सुरु

  • 22 Mar 2023 12:48 PM (IST)

    थोड्याच वेळात नाशिकमधून मनसैनिक मुंबईच्या दिशेने होणार रवाना

    नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर आज सभा,

    शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते राजगड या कार्यालयापासून होणार रवाना.

  • 22 Mar 2023 12:46 PM (IST)

    संपाबाबतच्या निर्णयावरुन विविध संघटनांमध्ये धुसफुस सुरुच

    मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र मंजूळेंनी दिला पदाचा राजीनामा

    संप मागे घेण्यापूर्वी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेतल्याने दिला राजीनामा

    तसेच संप मागे घेण्याच्या निर्णयावरुन मंत्रालय कर्मचारी नाराज असल्याचा देखील पत्रात सूर

  • 22 Mar 2023 12:33 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोंबिवली मनसे मध्यवर्ती कार्यालयास भेट

    मुंबई : मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केला सत्कार,

    आज सायंकाळी एकीकडे राज ठाकरे यांचा मेळावा असून या मेळाव्यात मी काय बोलतो ते पहा असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे,

    तर दुसरीकडे मनसे कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट व मनसे आमदाराकडून  केलेला सत्कार बनला चर्चेचा विषय.

  • 22 Mar 2023 11:54 AM (IST)

    देशातील एटीएममध्ये बँका 2000 रुपयांच्या नोटा का जमा करत नाही?

    या नोटांसाठी एवढा खर्च झाला, एटीएममध्ये बदल केला

    मग कशाची हा वाणवा, का पडला नोटांचा दुष्काळ

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत केला खुलासा

    काय दोन हजारांची नोट बंद होणार? काय म्हणाल्या सीतारमण, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 11:48 AM (IST)

    खासदार नवनीत राणा यांच्या दिल्लीतील घरी गुढीपाडवा साजरा

    शासकीय निवासस्थानी खासदार राणा यांनी उभारली गुढी

    मी माझ्या स्वतःच्या हाताने आज पुरणपोळ्या बनवल्या : खासदार नवनीत राणा

    खासदार नवनीत राणा यांनी दिल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

    राजकीय भाष्य करण्याचे खासदार राणा यांनी टाळलं

  • 22 Mar 2023 11:22 AM (IST)

    शिंदे गटाचे आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार

    शिंदे गटाचे आमदार अयोध्या दौऱ्यावर जाणार

    आयोध्या दौऱ्यानंतर यात्रेला सुरुवात होणार

    माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची कोल्हापुरात माहिती

    बैठकीत पाच तारखेला अयोध्या दौऱ्याचं नियोजन

  • 22 Mar 2023 11:10 AM (IST)

    आधार कार्ड- पॅन कार्डच्या जोडणीविषयी मोठी बातमी

    अंतिम मुदतीविषयी होऊ शकतो उलटफेर

    काँग्रेसने आता घेतली ही भूमिका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र

    काय म्हटले आहे पत्रात, काय केली विनंती, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 10:54 AM (IST)

    कराडमध्ये गुळाला 4251 रुपये प्रति क्विंटल दर

    गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्याला कराडमध्ये गुळाला 4251 रुपये प्रति क्विंटल दर

    कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केट यार्ड आवारात आज पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे झाले

    गुळाळा कमाल दर 4251 रुपये तर किमान दर 3400 रुपये तर सरासरी दर 4001 रुपये प्रति क्विंटल निघाला

    284 गुळ रव्याची आवक

    गुळ हंगाम अंतिम टप्पात असूनही गतवर्षीपेक्षा 200 ते 300 रुपयाने दर चांगले

  • 22 Mar 2023 10:49 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शड्डू ठोकला

    स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार

    माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती

    लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर करणार

    आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात झाला निर्णय

  • 22 Mar 2023 10:38 AM (IST)

    लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शड्डू ठोकला

    स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले सह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार

    माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती

    लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करणार

    आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात झाला निर्णय

  • 22 Mar 2023 10:32 AM (IST)

    डोंबिवली- नववर्ष स्वागतयात्रेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

    सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील स्टेजवर उपस्थित

    अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री सना शिंदे यांचीही उपस्थिती

  • 22 Mar 2023 10:26 AM (IST)

    प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराचा परिसर झळकणार सोलर पॅनलद्वारे

    नाशिक : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएसआर फंड मधून होणार सोलर पॅनलची उभारणी,

    14 लाख 85 हजार रुपयांच्या फंड मधून 25 किलोवॅटचे सोलर पॅनल मिळणार,

    महिन्याला चाळीस हजार रुपयांची होणार बचत,

    मंदिराचे विश्वस्त शुभम मंत्री यांनी दिली माहिती.

  • 22 Mar 2023 10:25 AM (IST)

    नववर्षाला आरबीआयने दिली आनंदवार्ता

    जागतिक अर्थव्यवस्था सुस्तावल्या

    मग भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था काय

    यंदा गाठेल का भारत वृद्धी दर

    भारतीय अर्थव्यवस्थेत काय आहे अप -डाऊन्स

    आरबीआयच्या तज्ज्ञांचे मत तरी काय, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 10:19 AM (IST)

    अमळनेर शहरात गुढीपाडव्यानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गुढीपाडव्यानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

    शोभायात्रेत विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटना, तसेच सर्वधर्मीय नागरिकांनी नोंदवला सहभाग

    शोभायात्रेत सहभागी पारंपरिक वेशभूषेतील महिला, विद्यार्थ्यांनी वेधलं शहरवासीयांचे लक्ष

    या शोभायात्रेला 19 वर्षांची अखंड परंपरा आहे

  • 22 Mar 2023 10:14 AM (IST)

    राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा उत्साहात साजरा

    नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर गुढी उभारण्यात आली,

    गुढीपाडव्यासाठी नाशिक हून ज्ञानेश्वर माऊली तुपे हे आपल्या वारकरी भजन मंडळासह आले होते,

    नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे हा गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

  • 22 Mar 2023 10:13 AM (IST)

    दादा भूसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही- संजय राऊत

    शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांच भूसे यांनी काय केलं? – संजय राऊत

    दादा भूसे यांच्या प्रश्नावर संजय राऊत यांचे उत्तर

  • 22 Mar 2023 09:59 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आले पथसंचलन

    जामनेर : पथसंचलनात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग,

    संघाचे स्वयंसेवक म्हणून दसरा व गुढीपाडव्याला गिरीश महाजन आवर्जून होतात पथसंचलनात सहभागी.

  • 22 Mar 2023 09:52 AM (IST)

    दिल्लीत गुढीपाडव्याची धूम

    दिल्लीतही मराठी नवीन वर्ष साजरे करण्यात आले

    महाराष्ट्र सदनात पारंपारीक वारकरी वेशभूषेत साजरा करण्यात आले नवीन वर्ष

    या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील खासदार हेमंत गोडसे आणि इतर नेते होते उपस्थीत

  • 22 Mar 2023 09:51 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गुढीपाडव्यानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

    शोभायात्रेत विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, संघटना, तसेच सर्वधर्मीय नागरिकांनी नोंदवला सहभाग

    शोभायात्रेत सहभागी पारंपरिक वेशभूषेतील महिला, विद्यार्थ्यांनी वेधलं शहरवासीयांचे लक्ष

    या शोभायात्रेला 19 वर्षांची अखंड परंपरा आहे

    सामाजिक एकोपा टिकावा, परस्पर बंधूभाव वाढावा आणि मराठी संस्कृतीचं रक्षण व्हावं म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही शोभायात्रा काढण्यात आली

  • 22 Mar 2023 09:48 AM (IST)

    गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा, मराठी नववर्ष सर्वांना आनंदाचे जावो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कोरोनामुळे आपल्या सणावर आणि आपल्यावर निर्बंध आले होते

    मात्र आता दहीहंडी, गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी असे सगळे सण राज्यातील जनतेने उत्साहात साजरे केले आहेत

    आजचा हा गुढीपाडवा देखील मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत

    शोभायात्रामध्ये हजारो ठाणेकर सहभागी झालेले आहेत, अनेक चित्ररथातून समाजप्रबोधन केलं जात आहे

  • 22 Mar 2023 09:46 AM (IST)

    नाशिकची सर्वात उंच गुढी TV9 मराठीवर

    नाशिकची सर्वात उंच गुढी TV9 मराठीवर

    नाशिकच्या काळाराम मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

    आजपासून काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    उत्सवाच्या सुरुवातीला उभारली जाते कळसावर गुढी

    नाशिकच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात सर्वात उंच गुढीने

  • 22 Mar 2023 09:38 AM (IST)

    मुंबईतील गिरगावात शोभायात्रांना सुरुवात

    पारंपारिक पद्धतीने शोभायात्रा सुरू

    शोभायात्रेत महिलांचा सर्वाधिक सहभाग

    भगवे फेटेबांधून महिला शोभायात्रांमध्ये सहभागी

    लहान मुलेही शोभायात्रेत सहभागी

  • 22 Mar 2023 09:34 AM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा साजरा

    कळसावर उभारली गुढी

    देवीची अलंकार पूजा संपन्न

    तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी

  • 22 Mar 2023 09:32 AM (IST)

    नाशिक- काळाराम मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

    आजपासून काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    उत्सवाच्या सुरुवातीला उभारली जाते कळसावर गुढी

    नाशिकच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात सर्वात उंच गुढीने

  • 22 Mar 2023 09:32 AM (IST)

    नवीन वर्षात जनसेवेचा संकल्प : देवेंद्र फडणवीस

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत सामील

    फडणवीस यांनी दिल्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा

    कोव्हिडनंतर अतिशय मोकळ्या वातावरणात गुढीपाडवा साजरा होत आहे

  • 22 Mar 2023 09:28 AM (IST)

    नाशिकमध्ये मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

    नाशिकच्या काळाराम मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

    आजपासून काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

    उत्सवाच्या सुरुवातीला उभारली जाते कळसावर गुढी

    नाशिकच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात सर्वात उंच गुढीने

  • 22 Mar 2023 09:15 AM (IST)

    नवीन वर्षात सोने-चांदीची महागाईची गुढी

    दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर दरवाढीचा विक्रम

    भावात झाली मोठी वाढ, चांदी पण चमकली

    गेल्या आठवड्यापासून भावात जोरदार उसळी

    येत्या दिवसात नवीन विक्रमाला घालणार गवसणी, वाचा बातमी

  • 22 Mar 2023 08:59 AM (IST)

    सकल हिंदू समाज आयोजित नववर्ष स्वागत शोभायात्रा

    पुणे : कर्वेनगर,आंबेडकर चौकापासून शोभयात्रेला सुरुवात,

    पारंपरिक वेशभूषा करून महिला,तरुण लहान मुलं शोभायात्रेत सहभागी.

  • 22 Mar 2023 08:34 AM (IST)

    इंधन स्वस्ताईची लवकरच गुढी

    केंद्र सरकारने टाकले महत्वपूर्ण पाऊल

    डिझेलवरील कर मात्र वाढवला

    पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

    आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत चढउतार

    लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता, वाचा बातमी 

  • 22 Mar 2023 08:00 AM (IST)

    राज्यात काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

    राज्यात काही भागांत पुढील चार दिवस पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

    कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये २५ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज

    भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती

    मागील आठवडय़ात राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला

  • 22 Mar 2023 07:58 AM (IST)

    गुढी पाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला सुंदर सजावट

    पुणे : नव्या वर्षानिमित्त दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी,

    गुढी पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • 22 Mar 2023 07:27 AM (IST)

    गुढीपाडव्या निमित्ताने निघालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

    दरवर्षी ठाण्यात गुढी पाडव्या निमित्ताने शोभा यात्रा निघते

    ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथील पालखीला सुरवात

    यंदाही ही शोभायात्रा निघाली, या यात्रेत मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच शोभायात्रेत सहभागी झाले होते

  • 22 Mar 2023 07:17 AM (IST)

    ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथील पालखीला सुरवात

    ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या पालखी ला उपस्थित

    याच पालखी सोबत शोभा यात्रा व चित्र रथ होणार सुरु.

  • 22 Mar 2023 06:29 AM (IST)

    उल्हासनगरात मध्यरात्री हिंदू नववर्षाचं स्वागत

    भव्य रांगोळी, दीप प्रज्वलन आणि फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं

    उल्हासनगरच्या संतोष नगर परिसरात माजी सभागृह नेते धनंजय बोडारे यांच्या वतीनं नववर्षाचा हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता

    यावेळी महिलांनी 50 फूट बाय 15 फुटांची भव्य रांगोळी रेखाटली

    या रांगोळीभोवती दिवे प्रज्वलित करण्यात आले

    यानंतर रात्री 12 वाजता फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत जल्लोषात हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात आलं

    यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

  • 22 Mar 2023 06:27 AM (IST)

    निवडणूक आयोग राष्ट्रवादीची समीक्षा करणार?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत समीक्षा करणार

    देशातील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्ताने मोठी राजकीय खळबळ

    राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्यायचा की नाही याचा निर्णय लवकरच निवडणूक आयोग घेणार

    सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

    राष्ट्रीय पक्षाची अट पूर्ण केलेली असतानाही निवडणूक आयोग समीक्षा करणार असल्याने मोठी खळबळ

  • 22 Mar 2023 06:26 AM (IST)

    तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी राज्यभरातून मोठी गर्दी केली आहे

    मराठी नवीन वर्ष व साडे तीन शुभ मुहूर्त असा योग साधत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले

    पहाटे ब्रह्म मुहूर्त असल्याने भाविकांनी देवीचे दर्शन घेत खण नारळ आणि साडीचोळीने ओटी भरली

  • 22 Mar 2023 06:23 AM (IST)

    अमरावती जिल्हा परिषदेत सीईओंची अचानक भेट

    91 अधिकारी आणि कर्मचारी आढळले लेटलतीफ

    विभाग प्रमुखावर कारवाईची जबाबदारी

    आरोग्य विभागातील सर्वाधिक 10 कर्मचारी आढळले लेटलतीफ

    सीईओ अविशांत पांडा यांनी मंगळवारी 10 वाजून 10 मिनिटांनी दिली अचानक भेट

  • 22 Mar 2023 06:19 AM (IST)

    डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार

    मुख्यमंत्री सकाळी 9.30 च्या सुमारास थेट स्वागतयात्रेत पायी चालत सहभागी होणार असल्याची माहिती

    डोंबिवली हा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ

    राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवली शहराची ओळख

    गेल्या अनेक वर्षांपासून डोंबिवली शहरात निघते भव्य नववर्ष स्वागतयात्रा

Published On - Mar 22,2023 6:15 AM

Follow us
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...