Maharashtra Breaking News Live : तर महाविकास आघाडीची सभा थांबवणार

| Updated on: Apr 01, 2023 | 6:12 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : तर महाविकास आघाडीची सभा थांबवणार
Maharashtra Live News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : रामनवमीचा उत्साह देशभर सुरू असतानाच महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये आणि गुजरात तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंसा भडकली. तिन्ही राज्यात तणावपूर्ण शांतता. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावर महाविकास आघाडीची सडकून टीका. यासह देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Mar 2023 07:37 PM (IST)

    चांदीने केली गुंतवणूकदारांची चांदी

    सोन्याने इतका दिला परतावा

    मार्च महिन्यात सोने-चांदीच्या किंमती सूसाट

    तज्ज्ञांच्या मते, दोन्ही धातू अजून वधारणार

    1 एप्रिलपासून सोन्याची हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा बातमी 

  • 31 Mar 2023 06:46 PM (IST)

    अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ

    गुंतवणूकदारांना मिळणार जास्त व्याज

    या योजनांवरील व्याजदरात झाला बदल

    केंद्र सरकारने दरवाढीचा घेतला निर्णय

    गुंतवणूकदारांचा होणार फायदा, वाचा बातमी 

  • 31 Mar 2023 06:22 PM (IST)

    पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरूळी गावे अखेर वगळली

    पुणे : 

    फुरसुंगी उरूळी देवाची नगरपरिषदेचा अध्यादेश जारी

    पुणे महापालिकेतून फुरसुंगी उरूळी गावे अखेर वगळली

    नवीन नगरपालिकेच नाव फुरसु्ंगी उरूळी नगरपरिषद असणार

    राज्यात शिंदे फडणवीस यांच सरकार आल्यावर फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महानगरपालिकेतून वगळल्याची केली होती घोषणा

    त्यानंतर आज राज्य शासनाने काढला अध्यादेश

  • 31 Mar 2023 05:51 PM (IST)

    एप्रिलपासून विमा ही महागणार

    जीवन विमा पॉलिसीसह इतर खर्च वाढणार

    मध्यस्थ कमिशन वाढविण्याची करु शकतात मागणी

    कोणत्या प्रकारच्या विमा योजनांच्या किंमतीवर होणार परिणाम

    1 एप्रिलपासून बसू शकतो फटका, वाचा बातमी 

  • 31 Mar 2023 04:50 PM (IST)

    नवीन आर्थिक वर्षात होतील हे मोठे बदल

    एलपीजी भावापासून ते सोन्यापर्यंत असा होईल परिणाम

    कारच्या किंमती पण महागणार, नव्या बदलाचा परिणाम

    केंद्र सरकार एक योजना सुरु करणार, एक करणार बंद

    इतर पण अनेक बदलांची नांदी, वाचा बातमी 

  • 31 Mar 2023 04:10 PM (IST)

    राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणा- सुप्रिया सुळे

    छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडी सभा रद्द करण्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही,

    संभाजीनगरमधील वातावरणाची जबाबदारी गृहमंत्रालयाने घेतली पाहिजे,

    सावरकर गौरव यात्रेला माझ्या शुभेच्छा आहेत, मात्र ओरबाडून आलेल्या सरकारने जरा जनतेकडेही पाहावं, जरा मंत्रालयात पण जाऊन बसावं,

    संयोगीताराजे यांची पोस्ट मी वाचली नाहीय,त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही

  • 31 Mar 2023 03:55 PM (IST)

    छत्रपती संभाजी | फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळत सरपंचाचे आंदोलन

    तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत केलं आंदोलन

    विहिरीसाठी अधिकारी पैसे मागत असल्यामुळे नोटा उधळत केले आंदोलन

    गेवराई पायगा इथल्या सरपंचाने लाच देण्यासाठी आणलेले 2 लाख रुपये उधळून केले आंदोलन

    मंगेश साबळे असं नोटा उधळून आंदोलन करणाऱ्या सरपंचाचे नाव

  • 31 Mar 2023 03:52 PM (IST)

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील 14 हुतात्म्यांच्या वारसांना शासनाकडून मदत जाहीर

    2022-2023 वित्तीय वर्षासाठी 17 लाख 57 हजार एवढी अर्थ संकल्पीय तरतूद मंजूर

    यात हुतात्म्यांच्या वारसांना 20 हजार दर महा निवृत्ती वेतन

    500 रुपये वार्षिक प्रवास खर्च

    पाच हजार रुपये इतर अनुषंगिक लाभाचा समावेश

    यापूर्वी हुतात्म्यांच्या वारसांना 10 हजार दरमहा वेतन दिलं जात होतं

  • 31 Mar 2023 03:52 PM (IST)

    एक लाईक करा अन् 50 रुपये कमवाच्या चक्करमध्ये असा फसला की गमावले 1 कोटी

    नेहमी ऑनलाईन असणारे सायबर चोरटे फसवणुकीसाठी ग्राहक शोधत असतात. नवीन नवीन शक्कल लढवून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मग तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकताच तुमची आयुष्यभराची कमाई लंपास करतात. पुणे शहरात नुकताच असा प्रकार घडलाय….वाचा सविस्तर

  • 31 Mar 2023 03:47 PM (IST)

    मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून 12 हजार नव्या उद्योजकांना देण्यात आली संधी

    यामुळे राज्यात 35 ते 40 हजार रोजगार निर्मित होण्याची शक्यता

  • 31 Mar 2023 03:44 PM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला

    या बैठकीत संभाजी नगर येथील सभे बाबत देखील होत आहे चर्चा..

    दोन्ही नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना फोन लावून करत आहेत चर्चा..

    संभाजी नगर येथील सुरु झालेल्या वादानंतर सभा घायची की नहीं या वर होत आहेत चर्चा…

  • 31 Mar 2023 02:29 PM (IST)

    तर महाविकास आघाडीची सभा रोखली जाणार

    महाविकास आघाडीच्या सभेमुळं वातावरण बिघडेल गोंधळ होईल, असा रिपोर्ट पोलिसांनी दिल्यास सरकार सभा थांबवेल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसा निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री यावरती लक्ष ठेऊन आहेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेय.

  • 31 Mar 2023 01:46 PM (IST)

    सोलापुरात शाळकरी विद्यार्थ्यांनी मैंदर्गी नगरपरिषदेच्या सीईओ कार्यालयाबाहेर मारला ठिय्या

    मैंदर्गी नगर परिषदेने कर भरला नसल्याने जिल्हा परिषदेच्या तीन शाळांना कुलूप ठोकले आहे

    ऐन परीक्षेच्या काळात शाळेला कुलूप ठोकल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक संतप्त

    संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतून नगरपरिषदेपर्यंत मोर्चा काढत सीईओच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे

    अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगर परिषदेतील घटना

    जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी कर थकवल्याने नगर परिषदेच्या सीईओंचा अजब कारभार

  • 31 Mar 2023 01:01 PM (IST)

    इचलकरंजी : आम आदमी पार्टीचे पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन

    पंचगंगा प्रदूषण आणि केंदाळ मुक्त झाले पाहिजे

    अंगावर केंदाळ घेऊन प्रशासनाच्या विरोधात केले आंदोलन

    जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत नदीमधून न उठण्याची आपची भूमिका

    अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ

  • 31 Mar 2023 12:29 PM (IST)

    शहरातील पाणी कपातीवरून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक

    कोल्हापूर : दोन्ही पक्षाच्या वतीने महापालिकेवर घागर मोर्चा,

    रिकामी घागर दाखवत प्रशासनाचा करणार निषेध,

    पदाधिकारी कार्यकर्ते महापालिकेच्या दारात जमले.

  • 31 Mar 2023 12:08 PM (IST)

    बुलढाणा : मूक मोर्चा काढून कारवाईचा निषेध

    राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

    काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येत या मूक मोर्चा सहभागी

    राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेस आक्रमक

  • 31 Mar 2023 11:53 AM (IST)

    GT vs CSK : धोनीच्या 48 कोटींच्या चार टॉप प्लेयरवर हार्दिक पंड्याचा एक पहलवानच भारी

    GT vs CSK : गुजरात टायटन्सचा एक प्लेयर धोनीच्या चेन्नईला पाठवू शकतो घरी. त्याची क्षमता आणि रेकॉर्डच तसा आहे. त्यामुळे धोनीच्या चेन्नईला त्याच्यासमोर जरा जपूनच खेळाव लागेल. वाचा सविस्तर…..

  • 31 Mar 2023 11:53 AM (IST)

    पुण्याच्या वाहतूक पोलिसांची अनोखी शक्कल

    पुण्याच्या वाहतूक पोलिसांची अनोखी शक्कल

    हेल्मेट जनजागृती करण्यासाठी श्वानालाही हेल्मेट घालून करतोय जनजागृती

    वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकाना हेल्मेट घालण्याचे केले असे आवाहन

  • 31 Mar 2023 11:22 AM (IST)

    बिअर शॉपीमध्ये चोरी, सहा दिवस होऊनही पोलिसांचे दुर्लक्ष, तीन गुन्हेगार मोकाट

    करमाळा तालुक्यातील भाळवणी गावाच्या हद्दीमध्ये असलेले सरकारमान्य आर्यन बियर शॉपीमध्ये दिनांक 24 मार्च 2023 रोजी रात्रीच्या 2 वाजून 35 मिनिटांनी तीन दरोडेखोरांनी चोरी केलेली आहे. यामध्ये एकूण 10 हजार रुपयांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे दुकानाचे मालक मच्छिंद्र शिंदे यांनी माहिती दिली आहे.वारंवार पोलीस स्टेशनमध्ये माहिती देऊन अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मच्छिंद्र शिंदे यांनी दिली आहे.

  • 31 Mar 2023 11:19 AM (IST)

    आयपीएलमधून मुकेश अंबानी यांची मोठी कमाई

    केवळ जाहिरातीतूनच मिळतील हजारो कोटी

    आयपीएलच्या महाकुंभात अब्जावधींची उलाढाल

    प्रेक्षकांना मोफत आयपीएलमुळे मॅचचा आनंद लुटता येणार

    रिलायन्सला आयपीएल जाहिरातीतून लागली लॉटरी

  • 31 Mar 2023 11:14 AM (IST)

    विखे – तांबे साथ साथ…

    शिर्डी : महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नाशिक पदवीधरचे अपक्ष आ.सत्यजित तांबे एकत्र,

    श्रीरामनवमी उत्सवानिमित्त एकत्र घेतल श्रीरामांच दर्शन,

    मंदिरातून बाहेर आल्यानंतर केले एकत्रीत फोटोसेशन,

    दोन्ही नेते मिरवणुकीतही झाले होते सहभागी,

    पदवीधर निवडणुकीत विखे पाटलांनी दिला होता तांबे यांना पाठींबा,

    दोघे एकत्र आल्याने फोटो काढतेवेळी कार्यकर्त्यांकडून हास्यकल्लोळ.

  • 31 Mar 2023 10:53 AM (IST)

    संभाजीनगर दंगल, सात जणांना अटक

    छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा येथील घटनेत पोलीसांनी गुन्हा नोंद केला असून 7 आरोपीना अटक केली आहे, तर सीसीटीव्हीच्या आधारावर 20-25 आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिस घटनेनंतर ऍक्शन मोडवर आले आहेत.

  • 31 Mar 2023 10:51 AM (IST)

    मविआची सभा होऊ नये यासाठी हे कारस्थान – संजय राऊत

    छत्रपती संभाजीनगर येथील राड्यात एकाचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर येथील राडा प्रकरणी 7 जणांना अटक

    400 ते 500 अज्ञातांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

    उद्धव ठाकरेची सभा न होवू देण्यासाठी हे कटकारस्थान- संजय राऊत

  • 31 Mar 2023 10:49 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ओहर गावात राडा

    दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती

    अज्ञात कारणावरून झाला तुफान राडा

    गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात

    7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती

    जखमींना घाटी रुग्णालयात केले दाखल

  • 31 Mar 2023 10:39 AM (IST)

    कोल्हापूर | कागल चेक पोस्ट खाजगीकरणाचा वाद पेटणार

    चेक पोस्टच्या खाजगीकरणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध

    जमिनीचा योग्य मोबदला आणि भूसंपादन करताना दिलेली आश्वासन पाळली जात नसल्याचा आरोप

    कागलमधील चेक पोस्ट नाका अदानी समूहाने चालवण्यासाठी घेतलाय

    अदानी समूहाकडून उद्यापासून चेक पोस्ट सुरू करण्याच्या हालचाली

    स्थानिक शेतकऱ्यांचे मात्र चेक पोस्टच्या दारात धरणे आंदोलन सुरू

    खाजगीकरणाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

    मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत चेक पोस्ट सुरू करून देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा

  • 31 Mar 2023 10:00 AM (IST)

    पुणे : केंद्राची मदत घेऊन महिला सुटका करा

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं मोठं वक्तव्य

    राज्यातील अडीच हजार महिला ओमानमध्ये अडकल्या

    नोकरीचं आमिष दाखवून महिना तिकडे गेल्या

    पुण्यातील काही महिलांचा यामध्ये समावेश आहे

    राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये लक्ष घालावं

    केंद्राची मदत घेऊन महिला सुटका करा

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच देवेंद्र फडणवीसांना आवाहन

  • 31 Mar 2023 09:59 AM (IST)

    सोलापुरात एकाच दिवसात 20 कोरोनाबाधित

    सोलापुरात एकाच दिवसात 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ

    सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची बधितांची संख्या वाढताना दिसून येतेय

    काल आलेल्या अहवालानुसार शहर-जिल्ह्यात 20 कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवसात आढळले आहेत.

    शहरात 106 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यामध्ये 15 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत

    ग्रामीणमध्ये 74 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून यात 5 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत

  • 31 Mar 2023 09:31 AM (IST)

    सोने आता कोणता करणार विक्रम

    चांदी देणार का गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न

    गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ

    लग्नसराईत सोन्याने अनेकांचे तोंडचे पळवले पाणी

    सोन्याची मागणी प्रचंड वाढली, चांदीकडे पण ओढा,  माहिती एका क्लिकवर 

  • 31 Mar 2023 09:26 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर – शहरातील प्रोझोन मॉल समोरील केबलच्या दुकानाला भीषण आग

    घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या आणि पाण्याचे टँकरने आग विझवण्याचे काम सुरू

    सकाळच्या सुमारास दुकानाला लागली आग

    आगीमुळे दुकानातील भरपूर साहित्य जळून खाक

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

    मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

  • 31 Mar 2023 09:16 AM (IST)

    CSK vs GT Playing XI : हार्दिक विरुद्ध धोनी, पहिल्या मॅचमध्ये कुठल्या खेळाडूंना मिळणार संधी?

    CSK vs GT Best Playing 11: मागच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम 9 व्या नंबरवर होती. तेच गुजरात टायटन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर होती. वाचा सविस्तर….

  • 31 Mar 2023 09:15 AM (IST)

    GT vs CSK : 0 वर 10 विकेट घेणाऱ्या प्लेयरची CSK मध्ये एंट्री, ओपनिंग मॅचआधी धुमाकूळ घालणार बॉलर चेन्नईच्या टीममध्ये

    GT vs CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सच्या ओपनिंग मॅचआधी मुकेश चौधरीची रिप्लेसमेंट म्हणून हा गोलंदाज टीममध्ये आलाय. वाचा सविस्तर…..

  • 31 Mar 2023 08:48 AM (IST)

    संभाजीनगर- किराडपुरा राडा प्रकरण

    पोलिसांनी आतापर्यंत 7 संशयितांना घेतले ताब्यात

    तर सीसीटीव्ही फुटेज मधून तब्बल 25 ते 30 आरोपींची पटवली ओळख

    गेल्या 24 तासांपासून राड्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू

    आज सायंकाळपर्यंत आणखी आरोपींना ताब्यात घेण्याची शक्यता

    राडा प्रकरणी 400 ते 500 जणांवर दाखल आहे गुन्हा

    आरोपींची ओळख पटवून ताब्यात 10 पथके आणि शंभर अधिकारी कर्मचारी तैनात

  • 31 Mar 2023 08:44 AM (IST)

    कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

    सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची आक्रमक भूमिका

    संपामुळे सकाळपासून केएमटी सेवेवर परिणाम

    सर्वच केएमटी बसेस वर्कशॉप मध्ये थांबून

    संपात सहभागी कर्मचारी वर्कशॉप मध्ये जमले

    ठाम आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नाही

  • 31 Mar 2023 08:36 AM (IST)

    कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या

    आंतरराष्ट्रीय बाजारात भावात चढउतार

    पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी भाव केले जाहीर

    तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय

    पेट्रोल-डिझेल कधी येणार GST च्या कक्षेत

    सर्वसामान्य नागरिकांना कधी मिळणार दिलासा, वाचा बातमी 

  • 31 Mar 2023 08:33 AM (IST)

    पुणे | मेट्रोच्या कामामुळे पुणे शहरातील वाहतूक विभागात बदल

    कोरेगाव पार्क विभागात हा बदल

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू वरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे

    31 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान या वाहतुकीत बदल

    वेगवेगळ्या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे

  • 31 Mar 2023 08:23 AM (IST)

    ठाण्यात करोना उपचारासाठी आणखी विशेष कक्षाबरोबर 25 खाटांची स्वतंत्र व्यवस्था

    गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश..

    ठाणे शहरात करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विशेष कक्षाबरोबरच आणखी 25 खाटांची स्वतंत्र व्यवस्था

    शहरामध्ये गेल्या 12 दिवसांत करोनामुळे पाचजणांचा मृत्यु

    या रुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश..

    तसेच सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्थानक, मॉल याठिकाणी करोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश पालिका आयुक्त कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

  • 31 Mar 2023 08:14 AM (IST)

    ट्रॅक्टर खाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    ट्रॅक्टर खाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

    – शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन त्यामध्ये ट्रॅक्टर चालक तरुण शेतक-याचा मृत्यू

    तर एक जण जखमी

    – या घटनेत भूषण विजय रणदिवे ( वय-३१) यांचा मृत्यू झाला तर त्याचे वडील विजय रणदिवे हे जखमी

    – ट्रॅक्टरचा ब्रेक अचानक फेल होऊन ट्रॅक्टर रस्त्याच्या उजव्या बाजूचे खड्ड्यात जाऊन पलटी झाला.

  • 31 Mar 2023 08:14 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणूचा संसर्ग

    गेल्या दोन दिवसांत 6 रुग्णांची भर

    मार्च महिन्यात 11 रुग्णांची भर, त्यातील दोन जणांचा मृत्यू

    मृतांमध्ये 73 वर्षीय पुरुष आणि 87 वर्षीय महिलेचा समावेश

    आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 17 जण बाधित

  • 31 Mar 2023 08:14 AM (IST)

    राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

    राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का हे पाहण्यासाठी 10 आणि 11 एप्रिल ला राज्यभरात घेतला जाणार मॉकड्रिल

    राज्यात प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेण

    आलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे नमुने रोज जिनोमिक सिक्वेंसिंगासाठी पाठवण्याच्या सूचना

    रुग्णालयात औषधं व साहित्य उपलब्ध आहेत का याची खातरजमा करा

    राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना

  • 31 Mar 2023 08:13 AM (IST)

    IPL 2023 : Rohit Sharma च्या गायब होण्याच कारण आलं समोर, वाढणार Mumbai Indians च टेन्शन

    IPL 2023 Mumbai Indians News : सगळे होते, पण मुंबईचा कॅप्टन रोहित कुठे दिसत नव्हता. रोहित शर्मा ट्रॉफीसह कॅप्टन्सच्या फोटोशूटला नव्हता. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांच टेन्शन वाढलय. वाचा सविस्तर…..

  • 31 Mar 2023 08:12 AM (IST)

    पुण्यातील 64 वर्षीय आजोबा अडकले सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात

    व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉलिंग करून बनवला व्हिडीओ

    व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 5 लाख रुपये

    आजोबांनी पोलिसांत दिली तक्रार

    पायल शर्मा हिनं तुमच्या विरोधात तक्रार दिल्याचं सांगत उकळले पैसे

    पुणे पोलिसांकडून तपास सुरू

  • 31 Mar 2023 08:12 AM (IST)

    MS Dhoni IPL 2023 ची ओपनिंग मॅच खेळणार का? CSK च्या सीईओने दिली फिटनेस अपडेट

    IPL 2023 मधील ओपनिंग मॅचआधी चेन्नई सुपर किंग्सची टीम अडचणीत येणार? चेन्नई टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या फिटनेसबद्दल महत्वाची अपडेट दिलीय. वाचा सविस्तर….

  • 31 Mar 2023 08:10 AM (IST)

    पुणे | टिळक विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. गीताली टिळक यांची निवड

    पुढील पाच वर्षासाठी कुलगुरू म्हणून त्यांची निवड

    याआधी जयंतराव टिळक यांनीसुद्धा कुलगुरू म्हणून काम पाहिलं

    आता डॉ. गीताली टिळक यांनी स्विकारला पदभार

  • 31 Mar 2023 08:02 AM (IST)

    पुण्यातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबीराचं आयोजन

    पुणे : अपघात घडल्यानंतर काय करावं ? त्याची सगळी प्रक्रीया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगण्यात येतीये

    पुणे जिल्ह्यातील 183 पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते

    दर आठवड्याला एक शिबीर त्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी काय कार्यवाही करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येतंय

  • 31 Mar 2023 07:50 AM (IST)

    चेन्नईत सोमवारी सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

    मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी आयोजित केली परिषद

    देशभरातले 20 विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

    शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही आमंत्रण

    काँग्रेस व्यतिरिक्त देशभरातील अनेक विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रण

    तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, समाजवादी पक्ष, जेडीयू या पक्षांना परिषदेचे निमंत्रण

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थितीत होणार परिषद

  • 31 Mar 2023 07:42 AM (IST)

    सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन

    वणी येथे सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन

    भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने नाशिक विभागातून 210 जादा बसेसचे नियोजन

    धुळे आणि जळगाव विभागातून देखील जादा बसेसची व्यवस्था

    चैत्रोत्सवात वणी येथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी होते भाविकांची गर्दी

  • 31 Mar 2023 07:41 AM (IST)

    नाशिकला बोगद्यांसाठी 47 कोटी रुपयांचा निधी

    नाशिक शहरातील इंदिरानगर आणि राणेनगर येथील बोगद्यांसाठी 47 कोटी रुपयांचा निधी

    बोगद्यांची लांबी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने केला निधी मंजूर

    दोन्ही बोगद्यांची लांबी 15 मीटरने वाढून प्रत्येकी 40 मीटर होणार

    इंदिरानगर, राणेनगर बोगद्याजवळ सकाळ-संध्याकाळ होते वाहतूक कोंडी

  • 31 Mar 2023 06:22 AM (IST)

    मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील कैद्यांनी घेतला गाण्यांच्या मैफिलीचा आनंद

    कैद्यांनीही गायली गाणी आणि लुटला आनंद

    एका सामाजिक संस्थेने कैद्यांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम घेतला होता

    या कार्यक्रमात बंदिस्त कैदी मुनिशकुमार यादव याने मेरे रश्के करम हे गाणे गायले

  • 31 Mar 2023 06:21 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील वांगणीत रामनवमीच्या पालखीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन!

    रामनवमी उत्सवाला तब्बल 197 वर्षांची परंपरा

    पवित्र रमजान महिन्यात रामनवमी हा दुग्धशर्करा योग

    वांगणीतील मुस्लिम धर्मियांनी व्यक्त केल्या भावना

  • 31 Mar 2023 06:20 AM (IST)

    कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी रामनवमी उत्सवात धरला डीजेच्या तालावर ठेका

    जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमी उत्सवात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गिरीश महाजनांचा तूफान डान्स

    यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जोरदार घोषणा दिल्या

    जामनेर शहरातून रामनवमी उत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती

  • 31 Mar 2023 06:15 AM (IST)

    रामनवमीच्या दिवशी महाराष्ट्रासह बंगाल आणि गुजरातमध्ये प्रचंड हिंसा

    महाराष्ट्रातील जळगाव आणि संभाजीनगरात हिंसा

    गुजरातच्या वडोदरामध्ये दगडफेक, तर लखनऊ विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

    बंगालच्या हावडा आणि इस्लामपूरमध्येही जाळपोळ

Published On - Mar 31,2023 6:11 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.