विधान परिषद निवडणुकीसाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली, बंडखोरी अन् क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी…
Maharashtra legislative council election : महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तीन पक्ष आहेत. आता त्यांच्यामधून कोण २ उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाकडे त्यांची एक जागा निवडून आणण्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जोरदार हालचाली पडद्यामागे सुरु झाल्या आहेत. बंडखोरी आणि क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरु आहेत. आतापर्यंत दोन्ही आघाडी आणि युतीने मिळून ११ उमेदवार जाहीर केले आहे. १२ वा उमेदवार कोणी देणार नाही, असा प्रयत्न केला जात आहे. यामुळे या सर्व जागा बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यात सर्वाधिक पाच उमेदवार भाजपचे आहेत शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेने ठाकरे गट उमेदवार देणार आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
महायुती ९ उमेदवार देणार
विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून राजकीय हालचाली सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यानुसार विधानसभेतील सर्वांधिक सदस्य संख्या असलेला भाजप सर्वांधिक ५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यानुसार भाजपाने ५ उमेदवार उमेदवार जाहीर केले आहे. त्यानंतर महायुतीमधील सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी २ जागा मिळणार आहेत. त्यामुळे उरलेल्या २ जागांवर महाविकास आघाडी त्यांचे उमेदवार देणार आहेत.
महाविकास आघाडी दोन उमेदवार देणार
महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे तीन पक्ष आहेत. आता त्यांच्यामधून कोण २ उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाकडे त्यांची एक जागा निवडून आणण्यासाठी पुरेसे आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यापैकी कोणता पक्ष उमेदवार उभा करणार…? आणि जर का महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला तर मग विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे निवडणूक होणार आहे. परंतु विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विधानपरिषदेचे उमेदवार
भाजपचे उमेदवार :
- 1. पंकजा मुंडे
- 2. योगेश टिळेकर
- 3.डॉ. परिणय फुके
- 4. सदाभाऊ खोत
- 5. अमित गोरखे
शिवसेना :
- 1. भावना गवळी
- 2. कृपाल तुमाणे