AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णालयात COVID यंत्रणा सुसज्ज ठेवावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

जगभरात पसरत असलेल्या जेएन १ व्हेरिएंटचा आचा भारतात ही शिरकाव झाला आहे. कारण केरळ नंतर आता महाराष्ट्रात देखील या व्हेरिएंटची प्रकरणे आढळली आहेत. गोव्यात देखील या प्रकाराची अनेक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात देखील सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रुग्णालयात COVID यंत्रणा सुसज्ज ठेवावी, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन
corona maharashtra update
| Updated on: Dec 20, 2023 | 9:12 PM
Share

Maharashtra Covid update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट उभं राहताना दिसत आहे. कारण जगभरात पसरत असलेल्या जेएन१ व्हेरिएंटचे प्रकरण वाढत आहेत.  देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवल्या आहेत. कोविड-19 च्या JN.1 च्या 21 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, उप-प्रकार JN.1 च्या नवीन 21 प्रकरणांपैकी 19 गोव्यात नोंदवले गेले आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कोविड यंत्रणा सुसज्ज ठेवावी असे आवाहन केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचं आवाहन केले आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकरणांबाबत, नीती आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाने बाधित सुमारे 91 ते 92 टक्के लोक घरी उपचाराचा पर्याय निवडत आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत म्हणाले की, रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी ९२.८ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत, जे सौम्य आजाराचे संकेत देतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोना विषाणूचा JN.1 प्रकाराचा जास्त धोका नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र काम करावे लागेल, असे मांडविय यांनी बैठकीनंतर सांगितले.

#कोविड जेएन १ या व्हेरियंटचा जगभर प्रसार होत आहे. याअनुषंगाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड यंत्रणा सुसज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वे,त्रिसुत्रींचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री

यांनी केले.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.