Maharashtra New CM Government Formation LIVE : खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद : एकनाथ शिंदे
Maharashtra New CM Government Formation LIVE Updates : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. याबाबतचे ताजे अपडेट्स...
महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. महायुतीचे सगळे नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज दुपारी महायुतीचे नेते राजभवनावर जाणार आहेत. भाजपच्या विधानसभा गटनेतेपदाबाबत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल बैठक झाली. अर्ध्यातासाच्या बैठकीत दोघांमध्ये शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा झाली. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद
उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
वर्षा निवासस्थानावर हालचालींना वेग
वर्षा निवासस्थानावर हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बैठक सुरु आहे.
-
-
एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठक सुरु
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या २० मिनिटांपासून बैठक सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी मनधरणी केली जाणार आहे.
-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. दोन्ही नेत्यांवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरु आहे. एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे.
-
लोकसभेत रेल्वे दुरुस्ती विधेयकावर चर्चा
बुधवारी लोकसभेत रेल्वे दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाची भीती व्यक्त करत काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी बुधवारी सांगितले की, सरकारने प्रवासी भाडे, सुविधा आणि सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तर भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांनी रेल्वेमध्ये सर्वसमावेशक बदल केले जातील, असे सांगितले.
-
-
धर्मांतर विरोधी विधेयक आणणार, भाजप नेते नितीश राणेंची घोषणा
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपचे आमदार नितीश नारायण राणे यांनी आम्ही धर्मांतर विरोधी विधेयक आणणार असल्याचं म्हटलं आहे.
-
ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक
महाराष्ट्रातील ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत मीरा-भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मीरा रोड आणि नया नगर भागातील दोन निवासी संकुलांवर छापे टाकले. पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना मीरा रोड येथून आणि अन्य तिघांना नया नगर येथून पकडले जेथे ते कामासाठी आले होते.
-
जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत घरी परतणार नसल्याच्या शेतकऱ्यांच्या निर्धार
शेतकऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज झालेल्या महापंचायतीत शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत एकही शेतकरी आपल्या घरी जाणार नाही, अशी घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीपर्यंत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवर पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, पण शेतकरी थांबायला तयार नाहीत.
-
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद : एकनाथ शिंदे
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद होतोय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना सत्तास्थापनेचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यांसह पत्रकार परिदेषदेत ही प्रतिक्रिया दिली.
“अडीच वर्षापूर्वी इथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफरस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि समर्थनाचं पत्र दिलं आहे. आम्ही आधीच त्यांना पाठिंबा दिला होता. मोदी आणि अमित शाह असतील नड्डा असतील हे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा आनंद आहे. आतापर्यंतच्या इतिहासात एवढं बहुमत मिळालं नव्हतं”असं शिंदे यांनी म्हटलं.
-
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असणार की नाही याबाबत अनिश्चितता
राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतीने राज्यपालांकडे थोड्याच वेळापूर्वी सत्तास्थापनेचा दावा करत आमदारांच्या बहुमताचं पत्र दिलं आहे. त्यानंतर महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही पत्रकार परिषदेतून संबोधित आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदे हे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात असणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. “आम्ही शिंदेना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
-
महायुतीकडून राज्यपालाकंडे सत्तास्थापनेचा दावा
मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीकडून राज्यपालाकंडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांना सत्तास्थापनेचं पत्र देण्यात आलं आहे. आता त्यानुसार गुरुवारी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथे घेणार आहेत.
-
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राजभवनात दाखल
या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत. महायुती सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्याआधी तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.
-
आमंत्रण आलेले नाही तरी अभिनंदनाला जाणार – जितेंद्र आव्हाड
मला कुठलही आमंत्रण आलेले नाही तरीही फडणवीस यांना भेटायला जाणार आहे .पुष्पगुच्छ घेऊन जाणार आहे लपून छपून जाणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
-
देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल
देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
-
शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा देणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहे. विधीमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, किशोर आप्पा पाटील आणि इतर नेते भेटून शुभेच्छा देणार आहेत.
-
नंदुरबारमध्ये मोठा जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाल्यानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष. नंदुरबार शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी. ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव. देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा. लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. महिला कार्यकर्त्यांनी देखील केला जल्लोष.
-
भाजपच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष
देवेंद्र फडणवीस यांची गट नेते पदी निवड झाल्यानंतर भाजपच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला. तसेच फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होत असल्याने लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी देखील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तयारीत असल्याची भावना यावेळी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
-
त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं- देवेंद्र फडणवीस
“2019 रोजी जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात आपल्याला त्रास दिला. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थितीत अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार नेते संघर्ष करत होते. त्यातूनच 2022 मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
अमृतमहोत्सवी वर्षात आपण सरकार स्थापन करत आहोत- देवेंद्र फडणवीस
“हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, ती प्रक्रिया संविधानाने दिली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. हे महत्त्वाचं वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो – देवेंद्र फडणवीस
“यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेन या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,. असा कौल दिला आहे” असं देवेंद्र फडणवीस गट नेतेपदी निवड झाल्यानंतर म्हणाले.
-
हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश – निर्मला सीतारमण
“नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनताजर्नादनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे. ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे. हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाले.
-
भाजपच्या कार्यालयात जल्लोष सुरु
भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात जल्लोष सुरु झाला आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.
-
देवेंद्र फडणवीस यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु आहे. एकमताने सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे. भाजपचे केंद्रीय निरिक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने ही निवड झाली.
-
विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया सुरु
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मी महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव सूचवत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर सुधीर मुनंगटीवार यांनी मी विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो असे म्हटले.
-
देवेंद्र फडणवीस उद्या संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
-
भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीला सुरुवात
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेत्याच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी भाजपच्या सर्व आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले आहेत. यावेळी मंचावर भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमन हे उपस्थितीत आहेत.
-
भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु
आता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे मांडणार आहेत. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण हे या प्रस्तावावर अनुमोदन देणार आहेत.
-
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
-
नवी मुंबई- एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.
गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो 20 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
-
भाजपच्या कार्यालयात निरीक्षकांसोबत भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू
विधिमंडळाच्या भाजपच्या कार्यालयात भाजपच्या निरीक्षकांसोबत भाजप कोअर कमिटी ची बैठक सुरू आहे. निर्मला सीतारमन, विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरूवात झाली असून भाजपाचे महत्वाचे नेते या बैठकीस हजर आहेत.
-
नवी दिल्ली – दोन दिवस थांबूनही अजित पवार आणि अमित शहांची भेट नाहीच
नवी दिल्ली – दोन दिवस थांबूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झालीच नसून आज सकाळी अजित पवार पुन्हा मुंबईला रवाना झाले.
सोमवारी रात्रीपासून अजित पवार दिल्लीत तळ ठोकून होते. जास्त मंत्रीपदांसाठी आणि इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी अजित पवार हे अमित शाह यांना भेटणार होते. मात्र त्यांची भेट झालीच नाही. शपथविधी तोंडावर असतानाच शहा यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले.
-
अंबड – ट्रॅक्टर खाली दबून युवकाचा जागीच मृत्यू
जालन्यातील अंबड मध्ये कर्जत कडुन लोणार भायगाव कडे जाणाऱ्या ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालक युवकाचा दबून जागीच मृत्यू झाला.आदित्य भगवान उन्हाळे असं या तरुणाचे नाव असून रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला गेला आणि दुर्घटना घडली.
-
भाजपच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस निघाले
गटनेता निवडीसाठी आज भाजपची बैठक असून या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस निघाले आहेत. भाजपकडून बैठकीत विधीमंडळाचा नेता निवडला जाणार आहे.
-
Maharashtra News: पुण्यात अल्पवयीन आरोपींकडून गुन्हेगारीचे सत्र सुरूच..
अल्पवयीन आरोपीने केला अल्पवयीन मुलाचा धार-धार शस्त्राने वार करत खून.. गणपती विसर्जन मिरवणुकीत नंबर वरून झाले होते वाद…. पुण्यातील वडगाव बुद्रुकमधील मधील धक्कादायक घटना… मृत्यू झालेला मुलगा पब्जी खेळत असताना पाठीमागून येत केला धारदार शस्त्राने वार… याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल तीन अल्पवयीन ताब्यात…
-
Maharashtra News: अमृतसरमध्ये सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला
अमृतसरमध्ये सुखबीर बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे… गोल्डन टेम्पल परिसरात गोळीबार… शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार… नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे…
-
Maharashtra News: अमराठी माणसं मराठी माणसाला धमक्या देत आहेत – संजय राऊत
अमराठी माणसं मराठी माणसाला धमक्या देत आहेत… मुंबईतून मराठी माणसाला पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न… महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला धमक्या दिल्या जात आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: बहुमत मिळूनही भाजप अजून सरकार स्थापन करु शकला नाही – संजय राऊत
बहुमत मिळूनही भाजप अजून सरकार स्थापन करु शकला नाही… सरकार बनवणं भाजपला महाराष्ट्रात कठीण जातंय… मित्रपक्षांच्या कुरघोडीमुळे भाजपचं सरकार बनलं नाही… भाजपचं सरकार आल्यानंतर मुंबईत दादागिरी सुरु… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: भारतीय जनता पार्टीच्या गटनेता पदाची आज निवड होणार
भारतीय जनता पार्टीच्या गटनेता पदाची आज निवड होणार आहे. गटनेता निवडीनंतर पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अलका चौकात जल्लोष करण्यात येणार आहे.
-
Maharashtra News: कप केकमधून विष बाधा, दोन चिमूरड्या भावा बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
कप केकमधून विष बाधा झाल्याने दोन चिमूरड्या भावा बहिणींचा दुर्दैवी मृत्यू… कोल्हापूरच्या मुरगूड जवळील चिमगाव गावातील घटना… श्रीयांश अंगज आणि काव्या अंगज अशी मृत भावंडांची नाव… नातेवाईकांनी आणलेला खाऊ बेतला भावंडांच्या जीवावर…
-
सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
सायबर चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या घटनेत 75 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कचे आमिष, विश्रांतवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाली आहे. घरातून काम करण्यासाठी ऑनलाईन टास्कचे अमित दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची 42 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केलीय. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेसह शहरात आणखी दोन फसवणुकीच्या घटना उघडकीस आले आहे. या वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची 75 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
-
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात अपडेट आली आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांना पीडितेसह मित्राने ओळखले.दोन आरोपींविरोधात 500 पानी दोषारोपत्र दाखल झालं आहे. बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख चंद्रकुमार रवी प्रसाद कनोजिया या दोन आरोपींना पीडीता आणि घटनेच्या दिवशी जखमी झालेल्या तिच्या मित्राने ओळखले आहे. येरवडा कारागृहात घेण्यात आलेल्या ओळखपरेड दरम्यान आरोपींची ओळख स्पष्ट झाली आहे.
-
गडचिरोली भूकंपाचे धक्के
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के २० सेकंद जाणवले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची गडचिरोली अहेरी सिरोंचा आणि छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम या सर्व भागात 7.27 मिनिटांनी भूगमचे धक्के लागले. केंद्रबिंदू तेलंगाना राज्यातील मुलगु येथून हा भूकंप च्या धक्क्याचे सुरुवात झाली आहे. भूकंपमचा धक्का जास्त मोठा नसला तरी अनेक नागरिकांना हे धक्के जाणवले आहेत. दोन वर्षात तिसऱ्यांदा सिरोंचा तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात भुकंपलचे धक्के जाणवले.
-
बुलढाण्यात ईव्हीएमची पडताळणी होणार
बुलढाणा मतदार संघातील 5 बूथवरील ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी निवडणूक विभागाकडे 2 लाख 60 हजार रुपये भरले आहेत. बुलढाणा मतदार संघातून जयश्री शेळके यांचा 841 मतांनी पराभव झाला आहे. शिंदे सेनेच्या संजय गायकवाड यांनी केला जयश्री शेळके यांचा पराभव केला आहे. 45 दिवसानंतर evm ची पडताळणी होणार आहे.
Published On - Dec 04,2024 8:10 AM