Maharashtra News Live Update : गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपकडून शिक्कामोर्तब
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. तारखेनुसार दरवर्षी शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. तर यंदा तिथीनुसार शिवजयंती आज साजरी केली जाणार आहे. राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे जुन्नरमध्ये शिवजयंती उत्सवाला हजेरी लावतील. तर चांदीवली येथे मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची उपस्थिती होती.
भाजप विधीमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय. थोड्याच वेळात राजभवनावर जाऊन करणार सत्तास्थापनेचा दावा.
LIVE NEWS & UPDATES
-
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळं झोप उडालीय : संजय राऊत
लोकसभा, विधानसभा येणाऱ्या महापालिका यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं,
मराठवाडा आणि विदर्भात आम्ही जातोय
मुंबई आणि पुण्यातील टीम आमच्यासोबत असेल
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळं झोप उडालीय
मोदी 18 तास काम करतात हे सर्वांना माहिती, राज्यातील भाजप नेते जरा अधिक वाढवून सांगतात
-
नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली
नाशिक – नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली
विधान परिषद सभापतींनी दिले आयुक्तांच्या बदलीचे आदेश
सात हजार सदनिकांच्या संभाव्य घोटाळ्याचे प्रकरण भोवले
प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वरून केला होता आयुक्तांवर आरोप
आर्थिक दुर्बल घटकातील 20 टक्के घर म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याचा आरोप
आयुक्तांच्या चौकशीसह बदलीच्या आदेशानंतर खळबळ
-
-
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत, भाजपकडून शिक्कामोर्तब
प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजप विधीमंडळ गटाच्या बैठकीत निर्णय.
थोड्याच वेळात राजभवनावर जाऊन करणार सत्तास्थापनेचा दावा.
-
सुप्रिया सुळे यांनी घेतली प्रियंका गांधी यांची भेट
सुप्रिया सुळे यांनी घेतली प्रियंका गांधी यांची भेट
संसद परिसरात दोघींमध्ये झाली जवळपास वीस मिनिटे चर्चा
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिली माहिती
-
स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटणार
स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटणार
एकरकमी एफ आर पी वरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक
एफआरपी दोन टप्प्यातच देण्याची सहकार विभागाची भूमिका
एक रकमी एफआरपी देता येणार नाही सहकार विभागाच्या अप्पर सचिवांचे राजू शेट्टी यांच्या पत्राला उत्तर
रस्त्यावरची लढाई लढून एक रकमी एफआरपी द्यायला कारखानदारांना भाग पाडू
वेळ प्रसंगी त्यांच्या नरड्यावर पाय देऊन एफआरपी वसूल करू
राजू शेट्टींचा इशारा
-
-
गोवा भाजप विधिमंडळ नेता निवडणार, सावंत की राणे थोड्याच वेळात निर्णय
गोवा भाजपचे सर्व 20 नवनिर्वाचित आमदार बैठकीला उपस्थित
केंद्रीय निरीक्षक आल्यानंतर भाजप विधिमंडळ नेता निवडीची बैठक सुरू होणार
विश्वजीत राणे उपस्थित
-
कोकणातील रस्त्यांचा प्रश्न लोकसभेत
कोकणातील रस्त्यांचा प्रश्न लोकसभेत
कोकणातील रस्त्यांबाबत केंद्राने तात्काळ निर्णय घ्यावा
खासदार सुनील तटकरेंची केंद्र सरकारकडे मागणी
सुनील तटकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटणार
-
भाजप आमदार नितेश राणेंची शिवसेनेवर सडकून टीका
आत्ताची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना नाही
आताची शिवसेना दाऊद इब्राहिमची बी टीम झालीय
भाजप आमदार नितेश राणेंची शिवसेनेवर सडकून टीका
मुंबई-महाराष्ट्रातील हिंदू सुरक्षित नसेल तर मग काय?
सत्तेसाठी सोनिया गांधी, शरद पवारांसमोर कोण लाचार झाले?
संजय राऊतांना किती महत्व द्यायचे हे राजकारण्यांनी ठरवले पाहिजे
एमआयएमनं हिंदुत्वाचा द्वेषच केला, त्यामुळे त्यांना आघाडी आपली वाटते
-
भाजपला काही काम उरले नाही, सकाळ झाली की टीका करतात-आदित्य ठाकरे
भाजपला काही काम उरलेले नाही
सकाळी उठले की टीका करायला सुरुवात करतात
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
-
गोव्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज सुटणार
गोव्यात सत्तास्थापनेचा तिढा आज सुटणार
भाजप विधीमंडळ नेता आज निवडला जाणार
सायंकाळी 4 वाजता भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक
केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
भाजप विधिमंडळ नेता निवडीनंतर सायंकाळी 6 वाजता सत्तास्थापनेचा दावा करणार
23 तारखेला मुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांचा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये शपथविधी
-
शिवाजी पार्कवर शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
शिवाजी पार्कवर मनसेचा भव्य शिवजयंती सोहळा
शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची मनसैनिकांना शपथ
महाराष्ट्र धर्म निभावण्यासाठी मनसैनिकांना शपथ
शिवरायांनी स्थापन केलेलं सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करु
-
मराठी कामगार सेनेचा विधानभवनावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
मराठी कामगार सेनेचा विधानभवनावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा
आज विधानभवनावर सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धडक मोर्चा
राज्यभरातून सुरक्षा रक्षक आझाद मैदानावर शेकडोंच्या संख्येने दाखल
राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार मोर्चा
-
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान जखमी
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान जखमी
जखमी जवानांवर कॅपमध्येच उपचार सुरू
-
पंजाबमधील विजयानंतर ‘आप’ची मोठी घोषणा
पंजाबमधील विजयानंतर ‘आप’ची मोठी घोषणा
‘आप’कडून अशोक मित्तल आणि हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार
‘आप’कडून राज्यसभेसाठी पाच नावांची यादी जाहीर
-
नंदुरबारमध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील रोज 3 बालकांचा मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील रोज 3 बालकांचा मृत्यू
शासकीय आकडेवारीमधून धक्कादायक माहिती
नंदुरबार जिल्ह्यात 2021 मध्ये 889 बालकांचा मृत्यू
-
खोटं बोलू पण रेटून बोलू असा भाजपचा स्वभाव-सुनील प्रभू
खोटं बोलू पण रेटून बोलू असा भाजपचा स्वभाव
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांची टीका
हिंदुत्व संपूर्ण देशात पसरवण्याचं काम शिवसेनेनं केलं
शिवसेनेचं हिंदुत्व कडवट असल्यामुळे भाजपकडून बदनामीचा प्रयत्न
कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अनिल बोंडेचं वक्तव्य
महाराष्ट्रातील जनता दुधखुळी राहिलेली नाही
-
दुश्मन अंगावर आला, तर बोटं छाटली जातील-संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊतांची केंद्रावर टीका
दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीही झुकणार नाही
दुश्मन अंगावर आला, तर बोटं छाटली जातील
निधी वाटपाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
-
शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत शिवनेरीवर
शिवजयंतीनिमित्त इस्त्रायलचे राजदूत को. बी. शोषानी शिवनेरीवर
शिवनेरीवर किल्ल्यावर घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन
-
कळवा पूर्व येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 कामगार जखमी
ठाण्यात कळवा पूर्व येथे गॅस सिलेंडरचा स्फोटरात्री साडेअकरा वाजताची कळवा पूर्वमधील घटनास्फोटात 4 कामगार जखमी झाल्याची माहितीजखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवल -
मुंबईत आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबईत आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण
मुंबईतील 300 केंद्रावर करण्यात येणार लसीकरण
मुंबईतील फक्त 12 केंद्रावर प्रायोगिक तत्वावर लसीकरणाला परवानगी
-
शिवजयंतीनिमित्त शिवज्योत रायगडावरुन मुंबईत
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह
शिवजयंतीनिमित्त रायगडावरुन शिवज्योत मुंबईत
रायगड ते मुंबई शिवज्योत आणली धावत
श्री आग्रेश्वर गोविंदा पथक मुंबई वडाळा येथील शिवप्रेमींकडून मशाल
-
शिवसेनेची शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर
शिवसेनेकडून शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर साजरी करण्यात येणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, महापौर किशोर पेडणेकर राहणार उपस्थित
मुंबई विमानतळ परिसरामध्ये रांगोळी, भगवे झेंडे आणि फुलांची सजावट
-
शिवाजी पार्कवर शिवजयंती उत्सव, मनसेकडून बॅनरबाजी
शिवाजी पार्कवर मनसेकडून बॅनरबाजी
मनसेकडून पक्षाचे झेंडे संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये लावण्यात आले
शक्तिप्रदर्शन या शिवजयंतीला करण्यात येणार आहे
सकाळी 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार
मनसैनिकांकडून बाईक रॅली काढण्यात येणार आहे
बाईक रॅलीला परवानगी नाकारल्याने मनसैनिक विरुद्ध पोलीस संघर्ष होण्याची शक्यता
-
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासक
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आजपासून प्रशासक
जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपला
मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड प्रशासक म्हणून काम पहाणार
कार्यकाल संपल्याने वाहन आणि निवासस्थान जमा करण्याचे आदेश
जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार, याची उत्सुकता
-
शिवाजी पार्कवर ‘मनसे’कडून भव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह
‘मनसे’कडून राज्यभर शिवजयंती साजरी केली जात आहे
शिवाजी पार्कवर मनसेकडून भव्य शिवजयंतीचे आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार
मनसैनिक पारंपरिक वेशात साजरा करणार शिवजयंती उत्सव
शिवरायांच्या पुतळ्यावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार
-
मानोली पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात आढळला महिलेचा मृतदेह
कोल्हापुरातील मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात आढळला मृतदेह
पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह
शाहूवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते ३२ वर्षे असण्याची शक्यता
गळा आवळून महिलेचा खून केल्याचा पोलिसांना संशय
-
नाथ षष्ठीसंदर्भात मोठा निर्णय, वारकऱ्यांना कोरोना लस घेणं आवश्यक
राज्यातून लाखो भाविक पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात
नाथ षष्ठीसाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना लस घेणं आवश्यक असणार आहे
लस घेतल्याबाबतच्या पुरावा सोबत बाळगावा लागेल
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत ठेवा
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती
-
शिवसेना नेते संजय राऊत उद्यापासून नागपूर दौऱ्यावर
शिवसेना नेते संजय राऊतांचा 22 ते 24 मार्चदरम्यान नागपूर दौरानागपूर महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा दौरा
22 तारखेला नागपूर शहरात संघटन बांधणीबाबात आढावा बैठका
23 आणि 24 तारखेला नागपूर ग्रामीणच्या बैठका
22 तारखेला संजय राऊत नागपुरात घेणार पत्रकार परिषद घेणार
-
नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सुरू
नागपुरच्या महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जयंती उत्सव
ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्सव सुरु
नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शिवजयंती सोहळा
थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुग्धाभिषेक
-
रत्नागिरीच्या पावसमध्ये अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू
रत्नागिरीच्या पावसमध्ये अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू
चंद्रकांत सलपे असं मृताचे नाव
पावसमध्ये सुरमाडाची होळी करतानाची घटना
जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित
VIDEO : रत्नागिरीच्या पावसमध्ये अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRywSvh pic.twitter.com/yseB6vvYrb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
-
धुळ्यात उपोषणाला बसलेल्या वृद्धाचा मृत्यू
उपोषणाला बसलेल्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते उपोषण
वृद्धाचा मृत्यू तर वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक
14 तारखेपासून प्रशासनाच्या विरोधात सुरू होते उपोषण
नातेवाईकांकडून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, तर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा
जावयाने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यावरून वाद, प्रशासनाकडून न्याय मिळण्याची मागणी
-
ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार-चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सरकारवर टीका
ठाकरे सरकार हे डोक्यावर पडलेलं सरकार आहे
बुलडाण्यात कुटुंब नियोजनात रबरी लिंग दिल्याने चित्रा वाघ यांची टीका
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी
पुण्याचे पोलीस आयुक्तांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना कारवाई होत नाही
Published On - Mar 21,2022 6:39 AM