Maharashtra Rain LIVE | मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून, मिरज-कोल्हापूर रेल्वे राहणार बंद

| Updated on: Jul 28, 2021 | 12:09 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

Maharashtra Rain LIVE | मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून, मिरज-कोल्हापूर रेल्वे राहणार बंद
Mumbai Rain

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jul 2021 10:44 PM (IST)

    मावळ तालुक्यातील थुगाव, बऊर या गावांना जोडणारा पवना नदीवरील पूल पडला

    पुणे : मावळ तालुक्यातील थुगाव आणि बऊर या गावांना जोडणारा पवना नदीवरील पूल पडला

    मुसळधार पावसामुळे पडला पूल,

    पूल पडल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला

    मंगळवारी दुपारी पावसामुळे पटला पूल

  • 27 Jul 2021 10:00 PM (IST)

    मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून, मिरज-कोल्हापूर रेल्वे राहणार बंद

    कोल्हापूर : मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून

    पुराचे पाणी ओसरल्याने ठीकठिकाणी भराव वाहून गेल्याचे चित्र

    भराव वाहून गेल्याने पुढील काही दिवस मिरज-कोल्हापूर रेल्वे राहणार बंद

    एक किलोमीटरवरील भराव गेला वाहून

    पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार

  • 27 Jul 2021 07:22 PM (IST)

    तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय, सतर्क ठेवा, नागपूरचे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले निर्देश 

    नागपूर – पूरपरिस्थिती हाताळण्यास प्रशासन सज्ज

    आंतरराज्यीय समन्वयाने करणार पूर नियंत्रण

    जिल्हाधिकारी विमला आर यांनी घेतली आढावा बैठक

    पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीला लक्षात घेता जिल्ह्यातील नदी–नाले, धरणे, तसेच तलाव आदीबाबत योग्य काळजी घ्यावी.

    तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय व 24 तास सतर्क ठेवावी

    जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले निर्देश

  • 27 Jul 2021 07:20 PM (IST)

    इचलकरंजी शहरातील पुराच्या पाण्यामध्ये अडकून बसलेला एका महिलेला केले रेस्क्यू

    इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील पुराच्या पाण्यामध्ये अडकून बसलेला एका महिलेला केले रेस्क्यू

    चार दिवसापासून ही महिला अडकली होती

    इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संजय कांबळे यांनी केले रेस्क्यू

    शहरातील पुराच्या पाण्यातून आज दोन महिलांना दिले जीवदान

    पुराच्या पाण्यामधील दोन घटनेमधील दोन महिलांना जीवदान

  • 27 Jul 2021 03:59 PM (IST)

    राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज

    राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज

    पुरामुळं झालेल्या नुकसानीचा सरकारचा प्राथमिक अंदाज

    कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीचा समावेश

    – पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश

  • 27 Jul 2021 03:33 PM (IST)

    कृष्णा नदीचे घरात शिरलेले पाणी ओसरत आहे, घरांची साफसफाई सुरु

    सांगली – कृष्णा नदीचे घरात शिरलेले पाणी ओसरत आहे

    गृहणी  त्यांच्या घरांची साफसफाई करत आहेत.

  • 27 Jul 2021 02:49 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गुहागरमध्ये आगमन, चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी

    चिपळूण -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गुहागरमध्ये आगमन

    काही वेळातच चिपळूण मधील बाजारपेठमध्ये येणार

    महापुरात नुकसान झालेल्या व्यापारी व नागरिक यांची चौकशी करून त्याची पाहणी करणार

  • 27 Jul 2021 12:39 PM (IST)

    रस्त्या वाहतुकीबाबत नितीन गडकरी यांच्याबाबत चर्चा करणार : अजित पवार

    कोल्हापूर

    अजित पवार

    रस्त्या वाहतुकीबाबत नितीन गडकरी यांच्या बाबत चर्चा करणार

    भराव टाकून पूल नको ही ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे

    पंचगंगा नदीमधील गाळ वाढला असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे

    ती ही शक्यता तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    पूर येतो तेव्हढ्या परत स्थलांतर करा अशी मागणी काहींनी केली

    कारखान्याच्या ठिकाणी वसाहत करून आशा लोकांच तात्पुरत स्थलांतर करता येईल का हा प्रस्ताव ठेवला आहे

  • 27 Jul 2021 12:04 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे महाड येथे आगमन, तळीये गावाला देणार भेट

    रायगड .

    राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे महाड येथे आगमन

    महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे हेलिकॉप्टरने आगमन

    राज्यपाल दरडग्रस्त तळीये गावाकडे रवाना

    तळीये गावाला देणार भेट दरड दुर्घटनेची करणार पाहणी ग्रामस्थानचीही घेणार भेट

  • 27 Jul 2021 11:41 AM (IST)

    गडचिरोली मेडीगट्टा धरणाच्या 79 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

    गडचिरोली मेडीगट्टा धरणाचे 79 दरवाजे सोडण्यात आले असून

    तीन लाख तीन हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे

    धरण पूर्णपणे भरल्याने आज सकाळी साडेआठ वाजता आहे सर्व दरवाजे सोडण्यात आले

    गडचिरोली जिल्ह्यात किंवा तेलंगणा राज्यात सध्या पाऊस नाही

    परंतु पूर आलेल्या नदी-नाल्यांच्या फटका गोदावरी नदीला व मेडीगट्टा धरणाला बसत आहे

    सध्या गोदावरी व प्राणहिता नदी धोका पातळीच्या खाली असून

    महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती तेलंगणा राज्यातील भाग कालेश्वरम या गावाला आला अलट करण्यात आला आहे

  • 27 Jul 2021 11:37 AM (IST)

    अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर पाहणी केलेल्या परिसरात नागरिकांमध्ये वाद

    कोल्हापूर

    अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर पाहणी केलेल्या परिसरात नागरिकांमध्ये वाद

    आमची घरे का दाखवली नाहीत असा सवाल करत पुढे पुढे करणार्यांना नागरिकांनी विचारला जाब

    शाहूपुरी परिसर पाचव्या गल्लीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार

    नुकसानीची पाहणी न केल्याने पूरग्रस्त नागरिक प्रचंड संतप्त

  • 27 Jul 2021 08:51 AM (IST)

    पुणे शहर आणि जिल्ह्यात 489.45 मिमी पाऊस

    पुणे

    पुणे शहर व जिल्ह्यात ४८९.४५ मिलिमीटर पाऊस

    पावसाचे हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या ६०.५४ टक्के

    १ जूनपासून २६ जुलैपर्यंतचा पुणे जिल्ह्यातील हा सर्वाधिक पाऊस

    जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार ५०४ मिलिमीटर पाऊस हा मावळ तालुक्यात झाला असून सर्वात कमी म्हणजेच केवळ १४२ मिलिमीटर पाऊस शिरूर तालुक्यात नोंदवला गेला

  • 27 Jul 2021 08:42 AM (IST)

    महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा हजारो कोटींचे नुकसान, भरपाई द्या, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांची मागणी

    महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा हजारो कोटींचे नुकसान

    सरकारनं तातडीने बिनव्याजी कर्ज आणि नुकसान भरपाई द्यावी

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांची मागणी

    विमा कंपन्यांकडून क्लेम देण्यामध्ये अडचणी येत असल्याचा 2019 चा अनुभव

    सरकारने विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

    ललित गांधी यांची माहिती

  • 27 Jul 2021 08:39 AM (IST)

    चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना

    चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना

    महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने रवाना

    पथकासोबत मिनी ट्रक, मिनी टिप्पर, 4 पाण्याचे टँकर, 2 टन कार्बोलिक पावडर आली पाठविण्यात

    आपद्ग्रस्तांसाठी 7 हजार लि. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, सतरंजी, ब्लॅंकेट, सॅनिटरी पॅड्स पॅकेट्स तसेच 5000 अंघोळीचे साबण पाठवले

  • 27 Jul 2021 08:37 AM (IST)

    नाशिक ब्रह्मगिरी माथ्यावरील दगड माती कोसळली

    नाशिक – ब्रह्मगिरी माथ्यावरील दगड माती कोसळली

    दरड कोसळण्याचा धोका कायम

    गंगाद्वार जवळील लोखंडी कठड्यांची झाली हानी

    पाऊस सुरू असल्यानं टळली दुर्घटना

    ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या वस्त्यांना धोका

    या घटनेत कोणालाही दुखापत न झाल्यानं दिलासा

  • 27 Jul 2021 08:30 AM (IST)

    राज्यात आलेल्या महापूराने शरद पवार चिंतातूर, 11 वाजता पत्रकार परिषदेत संवाद साधणार

    राज्यात आलेल्या महापूराने शरद पवार चिंतातूर… – गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार हे अस्वस्थ असल्याची माहिती… तातडीने बोलावली पत्रकार परिषद… – शरद पवार आज ११ वा. राज्यावर आलेल्या पूर परिस्थितीवर भाष्य करण्याची शक्यता… – राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकरी, कष्टकरी, ऊद्योजकांचं मोठं नुकसान झालंय… – शरद पवार हे त्यांचा दौरा घोषित करण्याचीही दाट शक्यता आहे… – पुरग्रस्त भागांचा ते आढावा घेऊ शकतात… – दरड कोसळणे, त्यासोबत दुष्काळातून बाहेर कसे पडावे यासाठीही ते सरकारला काही महत्वाच्या बाबी सुचवण्याची शक्यता… – राज्यासाठी केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासंदर्भातही ते भाष्य करण्याची शक्यता… सूत्रांची माहीती…

  • 27 Jul 2021 08:22 AM (IST)

    अजित पवार पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर, शिरोळ इचलकरंजी कोल्हापूरची पाहणी

    इचलकरंजी

    उपमुख्यमंत्री अजित पवार करणार शिरोळ इचलकरंजी कोल्हापूर पूरग्रस्तांच्या दौरा

    शिरोळ तालुक्याला दरवर्षी महापुराचा फटका बसतो अजित पवार करणार पूरग्रस्तांचे

    कृष्णा व पंचगंगा पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत चालली आहे

    शिरोळ इचलकरंजी या पूर पट्ट्तील पूरग्रस्तांना समोर अडचणीचा मोठा डोंगर

  • 27 Jul 2021 07:10 AM (IST)

    भुसावळच्या हातनुर धरणाचे 41 दरवाजे सलग पाचव्या दिवशीही उघडेच

    भुसावळच्या हातनुर धरणाचे आज सलग पाचव्या दिवशीही 41 दरवाजे पूर्ण उघडेच

    धरणातून 25497 क्युसेस  प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू तापी नदीत होत आहे

    पाच दिवस लगातार धरणाचे 41 दरवाजे उघडे राहण्याची पहिलीच वेळ

  • 27 Jul 2021 07:05 AM (IST)

    पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; विविध विभागाकडून मदत पथके रवाना

    पुणे महापालिकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; विविध विभागाकडून मदत पथके रवाना..!

    राज्यातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसान पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही विविध विभागातील पथके कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि रायगड या ठिकाणी मदतीसाठी पाठवली आहेत.

  • 27 Jul 2021 07:04 AM (IST)

    मुंब्र्यातील स्वास्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या दृष्टीने सील

    मुंब्रा येथील ठाकूर पाडा जवळ 8 मजली स्वास्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सील करण्यात आलेले आहे..

    इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला भंगदाड पडल्यामुळे स्वास्तिक इमारत धोकादायक परिस्थिती असल्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर काढण्यात आलेले आहे….

    घटनास्थळी पोलिस ,आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल.

Published On - Jul 27,2021 6:52 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.