1 डिसेंबरपासून वर्ग सुरु, विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास शाळा बंद, एका वर्गात 20 विद्यार्थी, नवी नियमावली जारी

शाळा यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 1 डिसेंबपासूनच कुरु होतील असे राज्य सरकारने आज सांगितले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. या शासन निर्णयात शाळा सुरु कराताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय.

1 डिसेंबरपासून वर्ग सुरु, विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास शाळा बंद, एका वर्गात 20 विद्यार्थी, नवी नियमावली जारी
school reopening
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 7:24 PM

मुंबई : राज्यात सर्व शाळा येत्या 1 डिसेंबपासून सुरु होणार होत्या. मात्र ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या नव्या विषाणूचा संसर्गदर बघता शाळा सुरु होण्याची तारीख लांबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता या शाळा यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 1 डिसेंबपासूनच कुरु होतील हे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. या शासन निर्णयात शाळा सुरु कराताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय.

शाळा सुरु करण्यासाठीची नियमावली 

सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन 100% लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

 जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी

 एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे या गोष्टींचे पालन करावे

 विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी,  विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत. तसेच कोविडग्रस्त विद्यार्थ्यांच्या शेजारील विद्यार्थ्यांचीसुद्धा कोरोना चाचणी करुन घ्यावी.

 शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य द्यावे. यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचनाचे (SOP)  पालन करावे. संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात किंवा गावात करावी.

 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी. वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात.

1 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी व महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांचे शाळेतील वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत करुन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा.

 1 डिसेंबर 2021 पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे. भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. वरील मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचेदेखील पालन करण्यात यावे.

इतर बातम्या :

परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी व्हावी, काँग्रेस नेते अतुल लोंढे आक्रमक

VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.