27 April 2023, Maharashtra Temperature : विदर्भात पुन्हा पावसाचे संकट, राज्यातील कोणत्या शहराने गाठला तापमानाचा उच्चांक
Maharashtra City-Wise Temperature : राज्यातील तापमान वाढत असताना पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज्यातील अनेक शहरांमधील तापमानाने चाळीशी गाठली आहे.
पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर आहे. त्याचवेळी विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २७ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30-40 किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहे.
उष्णतेची लाट नाही
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा तडाखा चांगलाच बसला. आता एप्रिलचा शेवटचा आठवडा मात्र जास्त तापमानचा असणार नाही. हवामान खात्याने पुढील आठवड्याबाबत अंदाज व्यक्त करताना बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. एप्रिल व मे महिन्यात राज्यात उष्णतेची लाट असते.
Maharashtra temperature | |
शहर | तापमान |
जळगाव | 40.5 |
अकोला | 40.3 |
मुंबई | 33.2 |
पुणे | 38,3 |
नागपूर | 35.4 |
नाशिक
अमरावती |
37.8
36.8 |
पुणेकरांना दिलासा नाही
राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना पुणे आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला नाही. मुंबईचे तापमान ३३.२ अंशावर होते. पुणे शहराचे तापमान ३८.३ अंशावर जाऊन पोहचले. कालपेक्षा त्यात दोन अंशाने वाढ झाली. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.
Thunderstorm with lightning at isolated places over Akola, Amravati, Bhandara, Gondia, Nagpur, Washim and Yavatmal.
Possibility of hail at isolated places over Nagpur and Yavatmal.Possibility of gusty wind(30-40 kmph) at isolated places over Amravati,Nagpur,Washim and Yavatmal. pic.twitter.com/I8uU6FklFu
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) April 26, 2023
नांदेडमध्ये पाऊस
नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावलीय, आधी गारपीट आणि आता पडणाऱ्या पावसामुळे नांदेडचे कमाल तापमान 35 अंशावर घसरले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये सध्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे आजारी पडणाऱ्या मंडळींची संख्या वाढलीय.
हळद उत्पादकांना फटका
यवतमाळ जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. सध्या हळद काढणी व त्यावर बॉयलरमध्ये प्रक्रिया केली जात असताना पाऊस व गारपिटीने हळद भिजली आहे. पाणी साचल्याने हळद जागेवरच सडू लागली आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे.
जळगाव जिल्ह्यात पाऊस
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पाळधी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड तसेच घरावरील छत अनेकांचे हे उडून गेले आहेत त्यामुळे पंचनामे करून मदतीची मागणी या ठिकाणी होत आहे.